सत्यान्वेषक, व्हिसलब्लोअर्स, तेहेलका मचानेवाले आणि तत्सम
आंतरजालाचा विस्तार जसजसा होत जातो आहे तसतसा ज्यांचं वर्णन "व्यवस्थेतील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार्या" असं करता येईल, अशा घटकांनी त्याचा वापर कसकसा केलेला आहे हे समजून घेण्याकरता या चर्चेचा प्रस्ताव मांडतो आहे.
हा विषय राजकीय दृष्ट्या बर्यापैकी निसरडा आहे याची मला जाणीव आहे. अमेरिकेसारख्या ठिकाणी, जिथे पोलिटिकल थिंकटँक्स, लॉबिंग वर करोडो डॉलर्स खर्च होतात, मोठमोठ्या उद्योजक, राजकारणी , आणि विविध स्वरूपाच्या संस्था यांची स्वताची प्रसिद्धी यंत्रणा असते त्या सर्वांचाच दावा आम्ही "सद् रक्षणाय, खल निग्रहणाय" आहे असा दावा असणार. जो न्याय अमेरिकेला लागू तोच सर्वत्र लागू आहे.
यापैकी ज्या सायटींचा उल्लेख मी इथे करतो आहे त्यांचं एक प्रमुख वैशिष्ट्य असं की त्या त्या संदर्भातलं कडवट, प्रसंगी भीषण सत्य समोर आणणं , त्या स्टोरीजना प्राधान्य देणं या गोष्टींमुळे मुख्यप्रवाहातल्या वृत्तसंस्था आणि वेगवेगळ्या माध्यमांपेक्षा त्या अधिक प्रामाणिक आहेत. एखाद्या विषयाला अधिक काळ लोकांसमोर ठेवणे , लोकांना त्याची वारंवार जाणीव करून देणे, प्रसंगी शोधपत्रकारितेच्या द्वारे त्याची पाळमुळं शोधणे अशा गोष्टी इथे दिसतात.
सुरवात मला माहिती असलेल्या स्थळांपासून करतो.
http://truth-out.org/ यांच्या मुखपृष्ठावर नजर टाकली असता असं दिसतं की ही साईट अमेरिकेतल्या राजकीय-सामाजिक घटनांशी संबंधित जरी प्रामुख्याने असली तरी अन्य देशप्रदेशांच्या प्रश्नांबद्दलचं लिखाण इथे येतं. "ऑक्युपाय द वॉल स्ट्रीट" , रिपब्लिकन पक्षाच्या उजव्या विचारसरणीची मीमांसा , भांडवलशाहीची चिकित्सा , गोल्डमन सॅक्सची लबाडी असे विविध विषय नेमाने इथे येतात. त्यातल्या अनेक स्टोरीज अत्यंत वाचनीय असतात.
वरील साईटची बहीण शोभावी अशी ही एक : http://www.countercurrents.org/ बर्याचदा या साईटच्या आणि truth-out च्या काही स्टोरीज , लेख सारखे असताना दिसतात.
आणखी एक साईट : https://www.facebook.com/ExposingTheTruth यांची स्वतःची अशी वेगळी साईट दिसत नाही. फेसबुकचे फीड्स देणं हेच यांचं वैशिष्ट्य दिसतं.
थोडा भारतातल्या काही सायटींकडे वळतो.
१९९० च्या उत्तरार्धात अस्तित्त्वात आलेली http://www.tehelka.com/ ही साईट सुपरिचित आहे. ती बनवणार्यांना इंटरनेटच्या ताकदीचा अंदाज आलेला होता हे मान्य करायला हवं. गोध्रा प्रकरणी त्यांचा आलेला रिपोर्ट माझ्या अजूनही लक्षांत आहे. भारतातल्या अनेकविध प्रकारच्या अपप्रकारांना प्रकाशात आणण्याचं काम ते वर्षानुवर्षे करत आहेत.
सुचेता दलाल यांनी चालवलेली http://www.moneylife.in/ ही साईट. भारतातल्या सरकारी/निमसरकारी/खासगी क्षेत्रांतल्या अर्थव्यवहारांमागची नीतीमत्ता, त्यातले अपप्रकार यावर नियमितपणे इथे माहिती येत असते.
या प्रस्तावात ज्या वेबसाईट्स चा मी उल्लेख केलेला आहे त्या केवळ उदाहरणादाखल आहेत. या आणि अशा वेबसाईट्स मधून अधिकाधिक लोकांपर्यंत नवनवी माहिती पोचून मुख्य म्हणजे त्यातून काही सामाजिक/राजकीय बदल घडू शकतो का ? घडला तर कसा घडवता येतो ? आदिंचा आपल्याला मागोवा घेता येईल. माझी आशा आहे की ऐसीअक्षरेच्या सदस्यांच्या सहभागातून या आणि अशा गोष्टींबद्दलचं अधिक सम्यक् आकलन आपल्याला होईल.
विकीलीक्स?
विकीलीक्स?
http://www.counterfire.org/
http://www.avaaz.org/
http://sumofus.org/
>>त्यातून काही सामाजिक/राजकीय बदल घडू शकतो का ?
माझ्या परिसरात अशा माध्यमांतून मतपरिवर्तन झाल्याचं एकही उदाहरण नाही. बहुतेक लोक आपापले पूर्वग्रह अधिकाधिक बळकट होतील अशा संकेतस्थळांवर जाताना दिसतात. प्रत्यक्ष अनुभवांतून मतपरिवर्तन झाल्याचे दाखले मात्र आहेत. उदाहरणार्थ, अभिजीत देशपांडे यांचं 'एक होता कारसेवक' हे पुस्तक डिसेंबर १९९२पश्चात त्यांचा हिंदुत्ववादी अजेंड्याविषयीचा झालेला भ्रमनिरास दाखवतं, तर प्रभाकर पाध्ये यांनी कम्युनिस्ट पक्षातून बाहेर पडल्यावर आपल्या अनुभवांबद्दल आणि विचारपरिवर्तनाबद्दल लिहिलं होतं (पुस्तकाचं नाव आठवत नाही.)
अहो काय हे ?
मुख्य म्हणजे त्यातून काही सामाजिक/राजकीय बदल घडू शकतो का ?
आंतरजालीय बदल सुद्धा घडू शकत नाहीत. इतर बदलांचे काय घेऊन बसलात ?
बाकी ओसाडगावात आम्ही अशाच एका प्रामाणिक जागल्या विषयी वाचलेली चर्चा आठवली आणि जोडीला एका अशाच बंद पडलेल्या ब्लॉगस्थळाची देखील आठवण झाली.
असो...
ऐसीअक्षरेप्रेमी
परा
समाज सत्य कशाला म्हणतो आणि
समाज सत्य कशाला म्हणतो आणि समाजाला सत्यान्वेषणात खरोखर रुची असते काय - असा एक प्रश्न मला नेहमीच पडतो अशा सत्यान्वेषक आणि तत्सम मुद्यांची कालांतराने झालेली अवस्था पाहून. त्याच्या जोडीला समाज म्हणजे काय, राजकीय सत्य आणि सामाजिक सत्य यांचे नाते, सत्यान्वेषणाची मोजावी लागणारी किंमत आणि तयारी, ती किंमत कुणाला मोजावी लागते - असे बरेच उपप्रश्न येतात. सध्या तरी भारतीय संदर्भात आर्थिक आणि राजकीय स्वरुपाचे घोटाळे उघडकीस आणणं इतकाच सत्यान्वेषणाचा अर्थ आपण लावत आहोत असे प्रसारमाध्यमे अणि जनतेचा त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून वाटते. त्यातून काही तात्कालिक बदल होतातही, पण ते किती काळ टिकतात आणि त्यातून व्यवस्था आणि रचना यांच्यात बदल होतात का - या प्रश्नांची उत्तरं फारशी आशादायक नाहीत माझ्यासाठी.
एक उदाहरण
सुचेता दलाल यांनी चालवलेल्या moneylife या इंटरनेट मॅगेझिन ने सर्वप्रथम राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी सेनादलाच्या मालकीच्या जमिनीवर हक्क (बेकायदेशीर रीतीने) दाखवला होता आणि तिथे काही अंशी बांधकाम सुरूदेखील झालेले होते. ही स्टोरी सुमारे दोन आठवड्यांपूर्वी प्रसिद्ध झाली होती.
आताच वाचलेल्या बातमीनुसार, पाटील यांनी प्रस्तुत जागेवरचा आपला हक्क सोडलेला आहे. सुचेता दलाल यांनी आपल्या मॅगेझिनमधील स्टोरीमुळे हे घडलेलं आहे असं जाहीररीत्या म्हण्टलेलं आहे.
बातमीचा दुवा : http://www.moneylife.in/article/pratibha-patil-gives-up-land-activists-…
सुचेता दलालाशी प्रत्यक्ष भेट
सुचेता दलालाशी प्रत्यक्ष भेट इंडीया इन्वेस्टर अँन्ड काँर्पोरेट मीटच्या वेळी झाली
कायदामंत्री वीरप्पा मोईली यांच्यासमोर सेबी कंपनी लाँ बोर्ड यांच्या गलथान कारभाराचे वाभाडे काढले होते
गूंतवणूक दाराच्या प्रश्नांना काँर्पोरेटमधे केराची टोपली दाखवली जाते हे सोदाहरण त्यांनी स्पष्ट केल होतं
फक्त माहितीकरिताच (?)
सुरूवातीला मलाही असा उत्साह होता - http://beftiac.blogspot.in/ मग पुढे फेसबुकावरही पुणे वाहतूक पोलिसांनी आवाहन केल्यावर त्यांच्या पानावर नियमभंग करणार्या वाहनांची छायाचित्रे अपलोड केली. नंतर अर्थातच याचा काही उपयोग होत नसल्याचे ध्यानात आल्यावर नाद सोडून दिला.
या जालीय जागल्यांच्या गर्जनांनी इतरांना माहिती होण्यापलीकडे फारसे काही (कारवाई इत्यादी) साध्य होत नाही असे दिसत आहे.