प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यावर्षी साजरा करूया मेणबत्ती विरहित ख्रिसमस.
मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल अस म्हटलं कि लोक विचारतात कस बर... हे वाक्य आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन याचं, ते सांगतात कि मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही.
आणी या मधमाशा कशाचे घर बनवतात ? मेणाचे - आणि मेणबत्ती कशाने बनते मेणापासून !
Dr. Humberto Boncristiani (honey bee husbandry applied researcher at the University of Florida Honey Bee Research and Extension Lab) म्हणतात कि एक साडेपाच इंच मेणबत्ती बनवण्यासाठी १३७.४८ मधमाशा चा बळी द्यावा लागतो . ख्रिसमसच्या दिवसात साधारण २३७ अब्ज मेणबत्त्या जगभर विकल्या जातात , तर किती मधमाशा मारल्या जात असतील! आणि यापासून तयार होणारा कार्बन डायऑक्साईड फटाक्यांच्या तुलनेत ५७. २२ पटीने जास्त असतो. फटाका ०.३ ग्रॅम तर मेणबत्ती १७.१६६ ग्रॅम.!
मेणबत्त्या अशा प्रकारे वाया घालवू नका, त्या वीज नसलेल्या छोट्या वाड्या वस्त्यांना दान करून त्यांची अंधारलेली घरे तेजोमय करण्यासाठी मदत करा. आजही जगात ४. ७ अब्ज लोक रोज अंधारात रात्र काढतात. विनाकारण पेटवण्यात येणार्या एवढ्या मोठ्या प्रमाणातील मेणबत्त्या १३२ कोटी गरीब लोकांना वर्षभर उजेड देऊ शकेल.
चला तर मग मेणबत्ती रहित ख्रिसमस साजरा करण्यासाठी सर्वांना फॉरवर्ड करा.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
तरीपण भारतात ख्रिसमस न साजरा करण्यासाठी सक्ती करू शकत नाही.
प्रदुषणाला आळा घालण्यासाठी ख्रिसमस साजरा करू नये हे इथे चालणार नाही. भारतात अल्पसंख्याक लोकांच्या सणांना टार्गेट करून तुम्ही सलोखा, ऐक्य वगैरे धोक्यात आणत आहात.
मुळात भारतात ख्रिसमस कमी प्रमाणात साजरा होतो लोकसंख्येच्या दृष्टीने. मग प्रदूषण पण कमीच होणार. मग का सामाजिक सलोख्यात मिठाचा खडा टाकताय?
आता फटाक्यांच्या बाबतीतही होऊ देत जनजागृती ;-)
दिवाळी साजरी केल्यानेच भारतात प्रदूषण होते. कारण भारतात दिवाळी खुप मोठ्या प्रमाणावर साजरी करतात. त्यामुळे दिवाळीत फटाक्यांची आतीषबाजी अजिबात करू नये.
ख्रिसमसचे फटाके कमी प्रदूषण निर्माण करतात त्यामुळे भारतात ते उडवायचेच.
:-) ;-) ;-)
जमणार नाही!
मी ख्रिसमस तसाही साजरा करीत नाही. मेणबत्ती लावून किंवा अन्यथा. जी गोष्ट मी मुळात करीत नाही, ती गोष्ट मेणबत्तीविरहित करणे मला शक्य नाही.
- यंदा मेणबत्तीविरहित ख्रिसमस साजरा करण्यासाठी यंदा मला ख्रिसमस साजरा करावा लागेल. करू का?
- हं, आता, मी दिवाळी कधीकधी (फॉर वाँट ऑफ अ बेटर ऑप्शन) घरात मेणाच्या पणत्या लावून साजरी करतो. ती बंद करू का? (म्हणजे, काय बंद करू? दिवाळीला मेणाच्या पणत्या लावणे बंद करू, की दिवाळी साजरी करणे बंद करू? आणि, मला हिंदूला मी दिवाळी साजरी करावी की नाही, किंवा केली तर कशी साजरी करावी, हे सांगणारे तुम्ही कोण? तुमच्या बैलाला घो!)
ठोकलेला विषय
मधमाश्यांच्या पोवळ्याचे मेण मिळवण्यासाठी माशा माराव्या लागत नाहीत। अर्थात त्या आइनश्टाइनच्या काळात राजांच्या आज्ञेवरून काम केले जात होते ती गोष्ट वेगळी. पोवळ्यातून मध आणि थोडे थोडे मेण सतत मिळू शकतेच. एकाच दमात सर्व पोळे पिळून मध काढून ( जिंजरब्रेडसाठी) पोळ्याचे मेण घेणे हे केलेही जात असावे. तरीही माशा दुसरीकडे जाऊन लगेच नवीन पोळे बांधतातच. बलिदान वगैरे गरजेचे नसते.
मधमाशा वाचवा
मला Humberto Boncristiani यांच्या कार्याची माहिती आहे. त्यांचा फोटो http://entnemdept.ufl.edu/media/entnemdeptifasufledu/honeybee/honey-bee… वर बघता येईल.
Humberto Boncristiani यांचा एक व्हिडिओ. या व्हिडिओत ते मेण बनवायच्या प्रक्रीयेत मधमाशांमध्ये व्हायरसचा प्रादूर्भाव कसा वाढतो याविषयी बोलत आहेत.