Skip to main content

डासांचे विजय गीत

(दर वर्षी आम्ही 2 लाखाहून जास्त माणसांचे बळी भारतात घेतो. )

शूर वीर डास आम्ही
बांधुनि कफन डोक्यावरी
तुटून पडतो शत्रुंवरती
त्यांचे रक्त पिऊनी
देतो विजयी आरोळी.

डेंगू मलेरियाच्या दिव्यास्त्रांनी
करतो हल्ला माणसांवरती
पाठवतो त्यांना यमसदनी.

घाबरून आमच्या फौजेला
मच्छरदानीत लपणार्‍या
भित्र्या भागुबाई माणसांशी
काहो करता तुलना आमुची.

करू नका अपमान आमुचा
पावसाळा आता दूर नाही .
रक्ताची आहे भूक आम्हा
रक्त पिऊनी माणसांचे
देऊ विजयी आरोळी.

विवेक पटाईत Sat, 28/05/2022 - 17:27

In reply to by 'न'वी बाजू

तुम्हाला कवितेचा संदर्भ कळलाच नाही. बाकी ज्याची जशी वृती असते तसा तो प्रतिसाद देतो. म्हणून बहुतेक खर्‍या नावाने तुम्ही इथे वावरत नाही. असो.

तिरशिंगराव Sat, 28/05/2022 - 17:56

एकदा तुम्हाला भेटून, अनेक विषयांवर चर्चा करायची आहे.

Rajesh188 Mon, 30/05/2022 - 14:33

डासांचे वर्तन आणि माणसाचा प्रतिसाद ह्या वर...
..काही गहन अर्थ नाही.
पण काही चुकीचे पण नाही.

Rajesh188 Mon, 30/05/2022 - 14:38

कोणाची बाजू घेत नाही.पण कोणतेही विचार सरळ नाकारणे हे दांभिक पणाचे लक्षण आहे.

ज्ञान गंगेचा प्रवाह दांभिक वृत्ती थांबवते.
दांभिक पना सोडून सर्वांचे विचार ऐका ९९ % ते विचार चुकीचे असले तरी 1% टक्का विचार पण खूप महत्वाचा संदेश देत असतो....

'न'वी बाजू Thu, 02/06/2022 - 19:36

In reply to by राजेश घासकडवी

हा अर्थ माझ्या लक्षात आला नव्हता!

(दर वर्षी आम्ही 2 लाखाहून जास्त माणसांचे बळी भारतात घेतो. )

हे वाक्य या संदर्भात विचारार्ह आहे.