" न्यू जर्सीतील दाढीवाले"
फडताळातिल सुवर्ण-व्हिस्की
उपयोगाची काही नाही
पुष्ट पोटऱ्या दाढी-दिक्षित
अखेरचे ते वळून पाही.
आणिक नंतर रबर-सोलचे
स्नीकर किमती चढवी पायी
टिकुन उन्ह ते असे तोंवरि
जॉगिंग करणे- त्याला घाई
गंजत पडल्या रेल-रुळांवर
शुभ्र ससा तो वेगे जाई
जमीन सरते पायाखाली
बाकी दिसतहि काही नाही!
संध्याकाळी कॅफेमध्ये
निळ्या जीन्समधली ती बाई
घामट तीही , घामट तोही
काळ हातातुन निसटत जाई !
xxx
नॉट फेअर!!!
घाटामध्ये शिरली गाडी
अन रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्रवीणा
अजून करिते दिडदा दिडदा
याचा अर्थ विचारण्याचा आगाऊपणा कधी केला होतात काय? (पण ते बाकीबाब पडले ना!)
बाकीबाब काय, शेक्सपियर१ काय, किंवा प्रस्तुत कवी काय, यांच्या कृतीत अर्थ शोधत बसायचा नसतो. उलट, यांच्या रचनेत काऽही (किंवा काहीऽही) अर्थ नाही, असे आगाऊ गृहीत धरूनच पुढे वाचायचे असते, नि रचनेचा आनंद लुटायचा असतो. (चुकून अर्थ सापडलाच, तर तो बोनस! अर्थात, कवीला तो अर्थ अपेक्षित असेलच – किंवा, कवीला कोठलाही अर्थ अपेक्षित असेलच – असे नाही, या मिठाच्या खड्यासकटच.)
रचनेला अर्थ असलाच पाहिजे, असे कवीवर बंधन नसते. किंबहुना, अर्थ नसलेल्या रचना बनविणे, हा तर कवीचा अधिकारच आहे! (पोयटिक लायसन म्हन्त्यात त्यास्नी.)
असो चालायचेच.
—————
१ वुड्डहौससाहेबाकडून साभार.
बाकी आपल्याला कविता वगैरे कळत
बाकी आपल्याला कविता वगैरे कळत नाही. पण बरेच दिवस दिसला नाहीत. आता आलात ,बरे वाटले. ऑल वेल ना मिलिंदराव ?