'दारु पिण्या'तला भ्रष्टाचार
सामना'च्या 2011 दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख. अंकात जागेच्या उपलब्धतेनुसार काही मजकूर गाळला गेला आहे. येथे दिलेला लेख पूर्ण आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
- Read more about 'दारु पिण्या'तला भ्रष्टाचार
- 21 comments
- Log in or register to post comments
- 13742 views
वाजंत्री वाजतात, वाड्यात काय झालं?
राम राम मंडळी,
मासिक धर्म सुरू होणं ही कुठल्याही मुलीच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना. निसर्गाने तिला बहाल केलेलं ते सन्माननीय स्त्रीत्व. आजच्या काळात मासिक धर्म सुरू होऊन जेव्हा एखादी मुलगी वयात येते, ते तिच्या आईशिवाय कुणालाच फारसं कळत नाही. फार तर तिच्या वडिलांना किंवा मोठ्या ताईला हे कळणं शक्य आहे. या व्यतिरिक्त ती घटना फारशी कुणाला कळावी किंवा तिचा गाजावाजा व्हावा असं त्यात विशेष काही नाही. ती एक नैर्सर्गिक गोष्ट आहे.
- Read more about वाजंत्री वाजतात, वाड्यात काय झालं?
- 13 comments
- Log in or register to post comments
- 6283 views
मी कोण?
का कधी केव्हा कुठे कशाला कोणासाठी...
सगळ्या प्रश्नांना तू पुरून उरलास
भव्यताः भव्यतेपेक्षा मोठी. विस्तारणारत जाणारी. अथांग
झपाटून टाकणा-या चेटुकासारखी.
म्हटलं तर तू नाहीस (तुला काहीच कळत नाही!)
आणि सगळीकडे पसरलेला
तुला मन नाही पण
तू खुबीने इन्स्टॉल केलंस माझ्यात
व लावून दिलीस किती लटांबरं मागे...
कोळ्याच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या माशीसारखा
मी अडकतोय सतत..
लक्षावधी पायांचा किडा मी.
अर्धे पाय जगण्यासाठी उत्सुक
अर्धे मरणाने घाबरलेले.
तू मात्र दगड.
कोणाशीही संबंध नसलेला. निश्चल.
आकाशगंगेला आलेल्या फोडाने
तुला दुखत नाही.
की तार्याला मुलगा झाल्यावर
- Read more about मी कोण?
- 6 comments
- Log in or register to post comments
- 5762 views
चंद्राचे फोटो
खाली चंद्राचा टेलिस्कोप वापरून काढलेला फोटो देत आहे. फोटो काढण्याच्या प्रक्रियेची माहिती द्यायची इच्छा आहे, पण ते फारच वेळखाऊ काम असल्याने ते पुन्हा केव्हातरी.

वरील फोटो चंद्राच्या २२० फ्रेम्स एकत्र करून बनवला आहे.
मोठ्या आकारतला फोटो येथे पहा.
याच तंत्राने काढलेला अजून एक फोटो.
- Read more about चंद्राचे फोटो
- 18 comments
- Log in or register to post comments
- 12647 views
डॉक्टर कापरेकर
"ओ ठाकरे! याला चार मरायच्या गोळ्या द्या"
असं प्रिस्क्रिप्शन खणखणीत आवाजात आपल्या कंपाऊंडरना देणारा डॉक्टर बहुदा कापरेकरांनंतर कोणी होईलसं वाटत नाही. दहिसरमधे तसे अनेक डॉक्टर होते मात्र या डॉक्टरांचे आणि आमचे ऋणानुबंध आजोबांच्या काळापासूनचे. मी अगदी लहान असल्यापासून त्यांच्याकडे जात असेनच. त्यामुळे त्यांना प्रथम कधी पाहिलं वगैरे प्रश्न या इसमाच्या बाबतीत गैरलागू आहेत. जितके माझे आई, वडील, आजी किंवा इतर कुटुंबीय माझ्या आयुष्यात जन्मापासून 'होते' तितकेच आमचे हे डॉक्टरही जन्मापासून 'होते'.
- Read more about डॉक्टर कापरेकर
- 41 comments
- Log in or register to post comments
- 18473 views
.
Taxonomy upgrade extras
.
- Read more about .
- 64 comments
- Log in or register to post comments
- 29784 views
..पर अंधेरे से डरता हु मै मां..!
मेरी मां.. (येथे ऐका)
"आई नको ना गं मला इथे एकट्याला ठेऊन जाऊस! मी तसं कधी बोलून दाखवत नाही पण मी अंधाराला खूप घाबरतो गं आई. इथे खूप अंधार आहे.
- Read more about ..पर अंधेरे से डरता हु मै मां..!
- 13 comments
- Log in or register to post comments
- 9129 views
मुसळी..
"रेषेवरची अक्षरे २०११" मधे प्रकाशित. तिथे जाऊन न वाचलेल्यांसाठी..
.....................................................
"मुसली दे दो मुझे एक..", मी म्हणालो.
लठ्ठपणामुळे अन शुगरची शंका येऊ लागल्यामुळे डॉक्टरांनी रोज सकाळी मला केलॉग्जची शुगर फ्री मुसळी दुधासोबत फळंबिळं घालून खायला सांगितली. हाय फायबर डाएट. बाकी मिसळ अन वडेबिडे सगळे बंद. फक्त मुसळी..
मी हिरमुसल्या तोंडाने डॉक्टरांच्या क्लिनिकजवळच एका अनोळखी केमिस्टाकडे जाऊन मुसळी मागितली.
- Read more about मुसळी..
- 26 comments
- Log in or register to post comments
- 8319 views
आणि ही कविता
या कवितेचं टायटल आहे -
''बँकेत पुरेसा बॅलन्स नसताना,
तरीही त्याविषयी शंका येऊ नये
एवढं पुण्य चेहर्यावर दिसत असताना,
मनात एक वीकेन्ड होम, एक कार,
एक शरीर,एक मन, एक जॉब, एक
फॅन्टॅस्टिक अचिव्हमेंट, एक ओळख
इ. स्थूल गोष्टींसकट एका
लाल रंगाच्या टोरुक पक्ष्यासोबतीने
अवकाश हिंडण्याची सूक्ष्म इच्छा
करत असताना म्हणायची कविता.''
या कवितेचं सबटायटल आहे -
''एक क्रिटिकल कर्मपुराण -
उठून उभं राहून तशीच्या तशी
अव्यवस्थित जगण्याची गाथा
गुंडाळू्न बकल लावताना
तोंड न उघडता, जीभ न हलवता
फक्तच उच्छवासावाटे
बाहेर टाकायची कविता.''
- Read more about आणि ही कविता
- 12 comments
- Log in or register to post comments
- 5475 views
I don’t know anything
I don’t know anything
I don’t know anything
कॉलेजात शिकवत होते मास्तर
म्हणाले सांगा कशात करणार करिअर
कोण म्हणाला, सीए. होणार डॉक्टर.
कोण म्हणाला हिंजवडीला जाईन
होईन सॉफ्टवेअर इंजिनिअर
जेव्हा माझ्यावरती आला नंबर
तेव्हा माझे होते उत्तर-
I don’t know anything
I don’t know anything
ज्योतिष्याने घेतला हात हातात
म्हणाला किती अर्थ आहे या रेषांत
तू खूप यशस्वी होशील
जर मला एक नोट देशील
सांगेन तुझं सगळं आयुष्य
काय असेल सांग तुझं भविष्य
त्याच्याकडे पाहिलं ब्लॅक झालो
हसलो आणि म्हणालो-
I don’t know anything
I don’t know anything
ती म्हणाली डोळ्यांत डोळे घालून
- Read more about I don’t know anything
- 12 comments
- Log in or register to post comments
- 6227 views