Skip to main content

जो जास्त बडबड करतो

Taxonomy upgrade extras

"जो जास्त बडबड करतो, तो सगळ्यांच्या लक्षात राहतो. जो गडबड करतो, तो लक्ष वेधून घेतो. जो तडफड करतो, त्याच्याविषयी सहानुभूती वाढत जाते. जो कडकड करतो, त्याला काही तरी मिळून जाते. गप्प राहणार्‍याचे मोती खपत नाहीत, पण बडबड करणार्‍याची वाळूही खपते म्हणतात" या साहित्यिक तत्वज्ञानावर मी भरपेट खूश आहे. मी यात स्वतः ला पडताळलं. तुमचं काय मत आहे?

मुलीची आई

मुलगी जन्मली
सगळे म्हणाले
लक्ष्मी आली घरी
खूप बरं वाटलं, कारण आईच ना मी ||१||
अंगणातल्या चिमण्या
घरीदारी नाचतात
तरी घरट्याकडे वळतात, सांजेच्या वेळात ||२||
झगे परकरपोलके झाले
साड्याचोळ्या ल्याल्या
पहातापहाता जरा मोठ्याच दिसू लागल्या ||३||
शिकल्या सवरल्या
स्वावलंबी झाल्या
आणि मन पोखरू लागल्या, उदासी सावल्या ||४||
आईचं काळीज
धडधडू लागलं
पण कर्तव्याची जाण मन खाऊ लागलं ||५||
मुलीची जात
नाही रहाणार घरात
जाईल परक्यात, पण नांदेल सुखात ||६||
तेव्हा वाटलं -
"आत्या व्हावं, मावशी व्हावं
भावाबहीणींची व्हावं ताई,पण कठीण होणं मुलीची आई" ||७||

अक्साई चीन

पहिल्यांदा "अक्साई चीन" हा शब्द वाचला-ऐकला होता तेव्हा एक परिचित "हा चीनने भारताचा ढापलेला प्रदेश आहे" अशी माहिती मला तावातावाने देत होते. अर्थातच या भागाबद्दल बाकी कोणतीही माहिती न देता सदर परिचितांच्या चर्चेची गाडी नेहरूंवर घसरली आणि जणू काही नेहरू नसते तर अक्साई चीन आपल्याकडून सुटला नसता अश्या आविर्भावात ते तावातावाने बोलत होते. त्यांच्या भावना प्रामाणिक होत्या मात्र त्या इतक्या खोलापर्यंत पोचल्या होत्या की त्यांच्या लेखी सत्य काय हे जाणण्यापेक्षा तत्कालीन राजकारण्यांवर राग व्यक्त करण्याचे साधन इतकेच महत्त्व 'अक्साई चीन' चे राहिले होते.

दोन उदास चेहरे

प्रेमासारख्या प्रकरणांच्या आठवणींचा दरवाजा सगळ्या शक्यतांचे द्वार बंद झाल्यावर आपोआप खुलतात.एका वयाच्या पावसाबरोबरच जुन्या प्रियेसीला याद करण्याचा मौसम सुरू व्हायला लागतो. मी खिडकीजवळ बसलो आहे. आणि बाहेर पाण्याबरोबरच आठवणींचा पाऊस कोसळू लागलाय. मन असं काही चिंब भिजून जातंय की, त्याचा कुणालाही पत्ता लागणं शक्य नाही. पण आता कुणी टपकलंच तर मात्र लपवणं कठीण होऊन जाईल.सालं भयंकर आहे सारं.

पिवळ्या पुस्तकांना संग्रालयात पाठवा

आमची प्रेरणा-पिवळ्या दिव्याला संग्रालयात पाठवा
हे विडंबन कृपया हलकेच घ्या. मूळ लेखाविषयी आम्हाला आदर आहेच.

दिवाळीचा फराळ : बेसन आणि खोबर्‍याचे लाडू

नमस्कार मंडळी,
सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा !!!

दिवाळी म्हटलं की रांगोळी, दिव्यांच्या रोषणाई, फटाक्यांच्या आतषबाजी सोबत आठवतो तो दिवाळीचा फराळ. तसा मी लहानअसल्या पासून तिखटखाऊ. फराळातल गोडं धोड सहसा आवडत नाही. अपवाद म्हणजे बेसनाचे लाडू.
तर आजची सुरवातच या आपल्या लाडक्या बेसनलांडूंनीच करु.

साहित्य :

गोष्ट

एक गोष्ट लिहीन म्हणतो
पहाटेच्या कोवळ्या उन्हात
आनंदाने डोलणार्‍या फुलांची

सूर्य माथ्यावर येऊन थांबेल तेव्हा
जगांची अदलाबदल सुरू झालेली असेल
जुन्या वाटा बुजून नवीन रस्ते बनू लागलेले असतील
काठांवर फुलारून येत असतील
मोहांच्या नवीन मालिका

सुरू झालेली प्रत्येकच गोष्ट
संपणारी असते कधीतरी
तशा संपू लागतील या मालिका देखील,
कधी तरी, दिवसाच्या शेवटच्या प्रहरात

रात्रींच्या अंधारात;
सगळेच दुवे हरवून जातील, बुडून जातील
आठवणींच्या गल्लीबोळा
रस्ते, घरे आणि नदीकाठ

सभोवताली जमून येतील
सांगण्याजोग्या हजार गोष्टींचे ढीग
वर्षांबरोबर वाहत आलेली सुख दःखे
आणि काहीबाही

सौदा - भाग ५

सौदा - भाग १
सौदा - भाग २
सौदा - भाग ३
सौदा - भाग ४

विक्रमने गाडी सरळ घरी नेली. घरात मामी आणि दिलआंटी हजर होत्याच. आपली डिलिवरी इथेच होणार हे अनघा समजून चुकली होती. या सर्वांच्या तावडीतून सुटायला आता कोणताच मार्ग शिल्लक नव्हता. अनघाच्या डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखे झाले आणि नंतर काय घडते आहे त्याची शुद्ध तिला राहिली नाही....

आता पुढे...