Skip to main content

राजकीय

प्रादेशिक पक्ष आणि फाजिल अस्मिता

Taxonomy upgrade extras

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कॉंग्रेस-मुक्त भारताचे स्वप्न साकार होताना दिसत आहे,ही अभिनंदनीय गोष्ट आहे. त्याचबरोबर फाजील प्रादेशिक अस्मिताना पायबंद घालून प्रादेशिक पक्षांचे कंबरडे मोडणे देखील अपेक्षित आहे . याचे कारण गेल्या 20-25 वर्षात प्रादेशिक पक्षांच्या लांगूलचालन करीत कसेबसे केंद्रसरकार् चे पांगूळगाडे हाकणारे दुर्बल पंतप्रधान भारताला पहावे लागले .

थायलैंड हायवे

Taxonomy upgrade extras

>>> मोदी सरकार चा आणखी एक धडाडक निर्णय
भारताची पुर्वोत्तर राज्ये जागतिक अर्थव्यव्स्थेशी जोड़ण्यासाठी
2017 पर्यन्त भारतातून थायलैंड ला जायला महामार्ग करण्याच्या निर्णयावर नरेन्द्र मोदी ह्यांनी शिक्का मोर्फत केला आहे । गुवाहाटी - म्यानमार मधील यांगून शहर मार्गे थायलैंड असा हां मार्ग असेल ...
इतर 2 देश देखील आपले 8 पदरी मार्ग खुले करण्यास राजी झाले आहेत ..
पुढे कम्बोडिया आणि व्हिएत्नाम पण जोडण्याचा विचार आहे
माननीय प्रधानमन्त्री श्री नरेन्द्र भाईजी मोदी यान्चे हार्दिक अभिनन्दन अन आभार !

ट्विटर सरकारविरोधात कोर्टात

Taxonomy upgrade extras

आपल्या नागरिकांवर आणि इतरांवर पाळत ठेवण्यासाठी अ​मेरिकन सरकार गूगल, ट्विटर वगैरे कंपन्यांकडून काय प्रकारची माहिती मिळवते आहे​,​ हे जगाला सांगण्या​चा हक्क मिळवण्यासाठीही ह्या कंपन्यांना कायदेशीर लढाई लढावी लागते आहे. 'स्वातंत्र्य' आणि 'लोकशाही'च्या व्याख्याच तपासून पाहण्याची गरज आहे का?

काही प्रश्न काही उत्तरे

Taxonomy upgrade extras

दाऊदच्या व्याह्याला स्वयंपाकघरात नेऊन आग्रहाने भरवत होता, मुडदे पाडण्यासाठी आणलेली शस्रे सांभाळणारा गद्दार संजय दत्त तुम्हाला माफ करण्यालायक वाटत होता तेव्हा तुमचा हा हंगामी हिंदुत्ववाद कुठे गेला होता?

मायकेल जँक्सनला नाचवून रोजगारनिर्मिती केली ती फक्त स्वतःसाठी. स्वतःची मुलं व्यवस्थितरित्या इंग्लिश मिडीयम मध्ये शिकवायची, उठसुट परदेशात मनसोक्त सुट्या घालवायच्या आणि ईकडे मराठी आणि महाराष्ट्राच्या नावाने गळा काढून मतांचा जोगवा मागायचा हा दांभिकपणा मतदारांच्या लक्षात येत नसेल का?

अमेरिकेतील भारतीयांचे तेथील वास्तव्य

Taxonomy upgrade extras

तिथल्या कार्यपद्धतीची, कार्यक्षमतेची ओळख होऊन त्यांची मने भारतातल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात, म्हणजे काँग्रेसच्या समजवादाविरोधात झुकू लागली. समाजवादी मात्यापित्यांची ही मुले कट्टर उजवी बनू लागली. क्रां

स्वातंत्र्योत्तर भारतात समाजवादाची वाटचाल- भाग २ : मध्यमवर्गाचा विस्तार.

Taxonomy upgrade extras

पुढे इंदिरा गांधींची टीवी क्रांती आणि राजीव गांधींची टेलिकॉम आणि कम्प्यूटर क्रांती यांमुळे बरेच काही बदलले. पारंपरिक उद्योगक्षेत्राहून भिन्न अशा इलेक्ट्रॉनिक्स आणि आय.टी. क्षेत्रात उच्चशिक्षितांसाठी रोजगार उपलब्धता पुष्कळच वाढली. खेडोपाडी, तालुक्याच्या गावी इंजीनीअरिंग कॉलेजांचे पेव फुटले. टीवीमुळे ग्राहकोपयोगी वस्तूंची दृश्यमानता वाढली. वाहिन्या वाढल्या, परदेशी वाहिन्या वाढल्या, जाहिराती वाढल्या. वस्तूंमध्ये निवडीचे पर्याय निर्माण झाले. मशेरीऐवजी कोल्गेट आली. तथाकथित चंगळवाद वाढला. आर्थिक उदारीकरणानंतर ट्रेड आणि कॉमर्स ला महत्त्व येऊ लागले.

स्वातंत्र्योत्तर भारतात समाजवादाची वाटचाल

Taxonomy upgrade extras

व्यवस्थापकः या धाग्यावर (इथे )झालेल्या चर्चेनुसार तीनही प्रतिसाद एकत्र करून वेगळा धागा काढत आहोत.
राही या धाग्याचे संपादन करून आवश्यक ते बदल करू शकतील. तसेच उर्वरित लेखनही याच धाग्याला संपादित करून अथवा प्रतिसादात स्वतंत्रपणे देऊ शकतील.

=======

सेक्युलरीझ्म आणि दहशतवाद

Taxonomy upgrade extras

जिहादी दहशतवादा चे भूत युरोप आणि अख्ख्या जगाच्या देखील च्या मानगुटीवर बसले आहे. ब्रिटिश /फ्रेंच सरकारच्या सेक्युलर अन उदारमतवादी धोरणांचा परिपाक म्हणून प्रचंड प्रमाणात पाकिस्तानी व इतर इस्लामिक लोकसंख्या युरोपात स्थायिक झाली . आणि मुले होण्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याने गेल्या 50 वर्षात ही मुस्लिम लोकसंख्या झपाट्याने वाढली . तर याउलट यूरोपियन देशात कुटुंबसंस्था उद्ध्वस्त झाल्याने लग्नाशिवाय एकत्र राहणे/मुले होऊ न देणे यामुळे नेटीव्ह यूरोपियन लोकांची लोकसंख्या कमी होत गेली .त्यातून अतिशय भयानक प्रश्न निर्माण झालेले असून आता तिकडे शरीयत कायदा लागू करावा यासाठी आंदोलने होत आहेत.