मानवी शरीर आणि भारतीय संस्कृती (भाग १)
‘झीरो फिगर’चं आकर्षण, ऋजुता दिवेकर आणि त्यावरून दिवे लावणारा चिंजंचा धागा हे या "चित्रलेखाचे" कारण. शेंबड्या पोरांना काय कळतं ते ही या धाग्यातून दिसावं हाही एक उद्देश. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात मानवी शरीर कशा प्रकारे दर्शवलं गेलं आहे त्याचा हा एक धावता प्रातिनिधिक आढावा आहे.
(सध्या या लेखात फक्त चित्रपटांतील शरीरांचा आढावा आहे. त्यामागचं कारण एवढंच आहे की चित्रपटांतील सर्व "नमुने" जालावर सापडायला सोपे जातात. शक्य झालं तर पाश्चात्य चित्रपटांतील नमुने नंतर कधीतरी देण्याचा प्रयत्न करेन.)
‘मातृदेवता’ वगैरे म्हणत ४००० वर्षे मागे जाण्यापेक्षा ४० वर्षे मागे जाऊ. उदाहरणार्थ हे पाहा :
मादक सौंदर्याचे 'आयटम' बॉम्ब
बॉम्ब१.शशिकला
बॉम्ब२. आणि बिंदू (मोना डार्लिंग)
पाश्चिमात्यांनाही लाजवेल अशी आमची देशी ब्युटी
नितू सिंग. दारासिंगाची कोणी नाही. पण रणबिर कपुरची आई.
रुस्तमे हिन्द दारा सिंग. दारा सिंगला या प्रतिसादातुन श्रध्दांजलीही अर्पण करतो. सर्व ग्रीक आणि रोमन शिल्पे ज्याच्यापुढे झक मारतील असा आमचा नरपुंगव दारासिंग.
छातीवरले केस भादरायची तसदी न घेता हँडसम दिसणारा हाफ न्युड धरमिंदर एडोनिसापेक्षा श्रेष्ठच.
अखेरिस धर्मात्मातला रणजित. कहर आहे नुसता कहर.
थोडक्यात, 'निखळ सौंदर्य', प्रमाणबद्धता आणि आदर्शवादासाठी ग्रीक-रोमनांपर्यंत पोहोचण्याची गरज नाही. आमच्या जुन्या पैलवान नट्या आणि पैलवान नट पाहिले की बर्याचशा व्याख्यांचा उलगडा होईल.
पोस्ट-कलोनियल
अरेरे. चाळीस वर्षांपेक्षा थोडं मागे जाता तर भारतीय सिनेमाच्या इतिहासात आमच्या मराठमोळ्या पवारबाईंनी बेबी फॅटशिवाय लिहिलेली काही कमनीय सुवर्णाक्षरं दिसती -
हिंमत-ए-मर्दा उर्फ लॉर्ड ऑफ द जंगल (१९३५)
थोडक्यात, एखाद्या शशिकलाबाई सोडता उत्तर भारतीयांविषयीचा पोस्ट-कलोनियल मराठी न्यूनगंड आपल्या अभ्यासात सापडतो असे नोंदतो. तात्या अभ्यंकरांची शिकवणी वेळीच लावली असती तर थोडे दाक्षिणात्य नमुने पण आपल्या रसिक वाचकांना देता आले असते. पण असो.
सबओल्टर्न सौंदर्यबोध
पाश्चिमात्य कल्पना पाश्चिमात्य नजरेतुन मांडण्याएवढी माझी पोच नाही. त्यामुळे मानवी शरिराच्या सबओल्टर्न सौंदर्यबोधाचे अव्यक्त आकलन जनसामान्यांना व्हावे यास्तव मी वरील प्रयत्न केला आहे. मी काश्मीरपासुन कन्याकुमारीपर्यंत मानवी शरिराचा त्याच दृष्टीने सौंदर्यास्वाद घेत असतो हा खचितच माझा दोष आहे. याबाबत मी पक्का सावरकरवादी आहे. बादवे, कोण तात्या अभ्यंकर?
ताजा कलम:
हा फक्त पहीला भाग आहे. दुसरा भाग कधी टाकताय. तो आल्यावर कुठल्या राज्यात घुसायचे ते ठरवतो.
प्राचीन भारतातील स्त्री-सौंदर्याचे आदर्श
आपल्या संस्कृत साहित्याकडे ओझरती नजर जरी टाकली तरी आदर्श स्त्री-सौदर्याचा निकष लक्षात येतो. ३८-२४-३८ अशा आकारलाच तो लागू पडतो. ह्यापलीकडे भरदार मांडया,लांब मान इत्यादींचाहि उल्लेख होतो. स्त्रियांच्या बाबतीत करभोरु (हत्तीच्या सोंडेसारख्या पुष्ट मांडया असलेली), पृथुस्तनी अशी विशेषणे संस्कृत साहित्यकारांची विशेष आवडती.
ह्या संदर्भात एक (आज विनोदी वाटेल असा) श्लोक देण्याचा मोह आवरत नाही:
’तन्वङ्ग्या: स्तनयुग्मेन मुखं न प्रकटीकृतम्।
हाराय गुणिने स्थानं न दत्तमिति लज्जया॥'
(श्लोकात गुणिन् - म्हणजे गुणवान् - ह्यावर श्लेष आहे. गुणिन् म्हणजे एकतर गुणवान् पण दुसरा अर्थ म्हणजे गुण किंवा दोर्यात ओवलेला.)
तन्वंगीच्या स्तनयुग्माने लज्जेने मुख लपविले. का की 'गुणवान' मालेला त्याने स्थान दिले नाही. (स्तनांच्या भरदारपणामुळे हार त्यांच्यामधोमध स्थान मिळवू शकला नाही! असल्या श्लोकांमुळेच आमचे कॉलेजातील आंबटशोकी मित्र, त्यांचे विषय फिजिक्स-केमिस्ट्री सारखे शुष्क असल्यामुळे, आमच्या संस्कृतच्या वर्गात येऊन बसत असत. असो. त्यांचे पाप त्यांच्याबरोबर, आपल्याला काय त्याचे?)
कालिदासाने मेघदूतात केलेले यक्षपत्नीचे वर्णन एक मानदंड मानायला प्रत्यवाय नाही.
'तन्वी श्यामा शिखरिदशना पक्वबिम्बाधरोष्ठी|
मध्ये क्षामा चकितहरिणीप्रेक्षणा निम्ननाभि:|
श्रोणीभारादलसगमना स्तोकनम्रा स्तनाभ्याम्|
या तत्र स्याद्युवतिविषये सृष्टिराद्येव धातु:||'
(मेघा, तिला तू अशी ओळख -) सडपातळ, श्यामवर्णी, टोकदार दातांची, पिकलेल्या बिंबफळाप्रमाणे आरक्त अधरोष्ठ असलेली, शरीराच्या मध्यभागात बारीक, चकित हरिणीप्रमाणे इकडेतिकडे बघणारी, खोल नाभि असलेली, पृथुनितम्बभारामुळे संथ चालणारी, स्तनभारामुळे किंचित वाकल्याप्रमाणे वाटणारी अशी ती जणू काय स्त्रीविषयातील विधात्याची पहिलीच निर्मिति आहे.
पुरुषी सौंदर्याची वर्णने त्या मानाने कमी आढळतात. महाबाहु, नरपुंगव (पुरुषांमधील बैल) अशा वर्णनांनी त्यांची बोळवण होते. तरीपण कालिदासाने रघुवंशात केलेले दिलीप राजाचे वर्णन पहा:
'व्यूढोरस्को वृषस्कन्धो शालप्रांशुर्महाभुजः|
आत्मकर्मक्षमं देहं क्षात्रो धर्म इवाश्रित:||'
विशाल छातीचा, बैलासारखी पाठ असलेला, सालाच्या वृक्षासारखा उंच, भरदार हातांचा असा तो जणू काही 'आपले कार्य करण्यास योग्य देह' असे मानल्याने क्षात्र धर्माने वसति केल्यासारखा होता.
हिचं काय करायचं?
>>आपल्या संस्कृत साहित्याकडे ओझरती नजर जरी टाकली तरी आदर्श स्त्री-सौदर्याचा निकष लक्षात येतो. ३८-२४-३८ अशा आकारलाच तो लागू पडतो.
अन् मग हिचं काय करायचं?
मोहेंजोदारो इथे सापडलेल्या मूर्तीची छत्रपती शिवाजी संग्रहालयातली नक्कल
>>पुरुषी सौंदर्याची वर्णने त्या मानाने कमी आढळतात. महाबाहु, नरपुंगव (पुरुषांमधील बैल) अशा वर्णनांनी त्यांची बोळवण होते.
आणि नटराज? तो तर अजिबात बैल वगैरे दिसत नाही.
असेल बॉ...
असेल बॉ. आम्ही तर असली सगळीच प्रतिकं फाट्यावर मारतो.
सौंदर्य, सौष्ठव वगैरेविषयीच्या आमच्या कल्पना आमच्याच कल्पनाविश्वातून येतात. तिथं तो नटराज नाचतानाचा असेल तरच त्या आकृतीत सौंदर्य वगैरे 'दिसू' शकतं (आम्हालाच). एरवी त्याची देहयष्टी, तिचं प्रमाण, तिची मापं वगैरे पाहण्याचं कारण आम्हाला दिसत नाही. ;-)
येथे पाहिजे जातीचे
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ही ओळ वाचुन मला एक शंका आली आहे. ..कदाचित ती चुकीचीही असेल्...ब्राह्मण्-ब्राह्मणेतर वादातुन तर या लेखनाकडे आणि त्यातील चित्रांकडे पाहिले जात नाहीहे ना?
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे । येरा गाबाळाचे काय काम ॥३॥
अनुभव येथे व्हावा शिष्टाचार । न चलती चार आम्हा पुढे ॥धृ॥
हा हा हा.... मस्त विडंबन. पण
हा हा हा.... मस्त विडंबन.
पण गेल्या चाळीस वर्षांतच प्रचंड फरक पडला आहे तुम्हीही मान्य करालच. त्या काळी जेवढा गुबगुबीतपणा चालायचा, कदाचित आवडायचाही तो आता साफ झीरोवर आलेला आहे. कदाचित हिंदी सिनेसृष्टीचं 'बेबी'फॅट गेलं असेल. हा चाळीस वर्षांतला बदल ४०००० वर्षांपर्यंत एक्स्ट्रापोलेट केला तर नक्कीच चिंजंनी दिलेली चित्रं मिळतील की.