Skip to main content

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ४ : सावली

पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे: सावली
प्रकाशामधे अडथळा आल्यामुळे पडलेली...आणि मायेची, प्रेमाची, दु:खाची सावली वगैरे...सर्व कल्पनांचं स्वागत.
सर्वांना शुभेछा !

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे प्रकाशित करता येतील.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहिल.)
४. एक स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट १२ ऑगस्ट रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल व १३ ऑगस्टच्या सोमवारी विजेता घोषित होईल व तो विजेता पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचाराव्यात, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्याचे असतील. त्यासाठी त्याने ठरविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल).आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व लेन्सची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास एफ्झिफ डेटा द्यावा.

चला तर मग! "सावली" या विषयाला वाहिलेली छायाचित्रे येऊदेत!

नवी सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपण काढलेले फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
फोटो अपलोड करताना, अपलोड करणार्‍यांनी जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून डिलीट करावा. कृपया याची नोंद घ्यावी.

मागचा धागा: विषय - वाट आणि ऋता यांनी टिपलेले विजेते छायाचित्र

स्पर्धा का इतर?

ऋता Mon, 30/07/2012 - 23:21

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ग्रहण !कधी चंद्र पृथ्वीच्या सावलीत तर कधी पृथ्वी चंद्राच्या..कोणत्या वर्षीचं सूर्य ग्रहण आहे हे?
ही आणखीन एक खगोलीय सावली:

शनीच्या कड्यांची सावली शनीच्या वरच्या थरातल्या ढगांवर पडली आहे. शनीचा एक उपग्रहसुद्धा फोटोत आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 31/07/2012 - 01:55

In reply to by ऋता

२०१० सालचं कंकणाकृती सूर्यग्रहण आहे, कन्याकुमारीहून.

वरचा शनीचा फोटो रोचक आहे. कारण कडी अशा कोनात असताना छोट्या दुर्बिणींमधून कडी दिसत नाहीत. पण कदाचित कड्यांची अशी सावली दिसू शकेल.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 06/08/2012 - 00:11

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वरच्या फोटोची एक्झिफः

अपर्चरः f/8, एक्स्पोजर: १/२५०० सेकंद, फोकल लेंग्थः ४९ मिमी. कॅमेरा: कॅनन S3 IS. हा फोटो मोठ्या आकारात इथे आहे.


अपर्चरः f/3.2, एक्स्पोजर: १/१०० सेकंद, फोकल लेंग्थः ५१ मिमी. कॅमेरा: कॅनन S3 IS.

आतिवास Mon, 30/07/2012 - 12:21

कारेकल जिल्ह्यातून (पोंडिचेरी) प्रवास करताना सावलीतून पाहिलेलं हे एक दृष्य.

KODAK EASYSHARE M853 ZOOM DIGITAL CAMERA
Exposure: 0.002 sec (1/464), Aperture: f/5.6; Focal Length: 6.2 mm; ISO Speed: 80; Flash Used:No

आणि राजस्थानमधल्या बाडमेर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात भर दुपारी दोन वाजता फोटो काढताना फक्त स्वतःचीच सावली समोर यावी इतका सावलीचा अभाव.

KODAK EASYSHARE M853 ZOOM DIGITAL CAMERA; Exposure:0.002 sec (1/431); Aperture: f/5.6; Focal Length:6.2 mm; ISO Speed: 80; Flash Used: No

ऋषिकेश Fri, 17/08/2012 - 10:38

In reply to by आतिवास

मला यातील दुसरा फोटो विशेष आवडला. केवळ हलक्या पिवळसर रंगाच्या वाळूच्या टेक्श्चरवर उमटलेली सावली.. हे चित्र पाहून 'सावली' हा एकच विषय डोळ्यासमोर येतो
तुम्ही तोटो काढताय हे सांगताय म्हणून मानतो,, अन्यथा ती सावली पाण्याचा घडा डोक्यावरून वाहणार्‍या स्त्रीची सुद्धा वाटेल :)

धनंजय Mon, 30/07/2012 - 23:54

ऍल्कट्रॅझ तुरुंगातील खिडक्या
पूर्वप्रकाशन दुवा
ऍल्कट्रॅझ तुरुंगातील एकांतवासाची (सॉलिटरी कनफाइनमेंट) झालेल्या कैद्यांना 'डी' ब्लॉकमध्ये ठेवत. त्यांच्या छोट्या-छोट्या पिंजर्‍यांच्या गजातून संध्याकाळी त्यांना हे दृश्य दिसले असू शकेल. ("वाचनालय" पाटीखालील दरवाजा तुरुंगातील वाचनालयाकडे जात असे. या तुरुंगात सध्या कैदखाना नाही, संग्रहालय आहे, पर्यटनाची मुभा आहे.)


फोटो तपशील :
कॅमेरा : ऑलिंपस ई-५००
कृष्णधवल करण्यासाठी प्रणाली: गिंप २.६.२
छिद्रमान : एफ्/५
अनावरण : १/६०
आयएसओ : १००

सर्वसाक्षी Thu, 02/08/2012 - 23:22

नाईल विहार करताना एस्ना जलबंध (वॉटर लॉक) परिसरात एम. एस. नाईल फेस्टिवलच्या डेक वरुन टिपलेले हे चित्र. एस्ना लॉक पाहायला अनेक प्रवासी डेक वर जमले होते, मी बोटीचा पुढचा भाग चौकटबद्ध करत सगळ्यांच्या फक्त सावल्या डेकच्या कठड्यासकट टिपल्या. माझी सावली डावीकडुन दुसरी:)
boat16

कॅमेरा निकॉन डी ६० / किट लेन्स निक्कॉर १८-५५ मिमि (चित्र १८ मिमि वर टिपले आहे)
आय एस ओ २००
शटर स्पीड १/८०
एक्सपोजर ४.५

मराठे Fri, 03/08/2012 - 22:59

परवाच एक बोट राईड ला गेलो होतो तेव्हा त्या बोटीच्या कठड्याची सावली जाम आवडली म्हणून फोटो काढला होता. लगेच उपयोगी पडेल असं वाटलं नव्हतं !

खवचट खान Sat, 04/08/2012 - 00:35

किर्र रानात माझी सावली
मागून येऊन चोरपावली
माझ्याच अंगावर धावली...
आणि मला खाऊन टाकून
घालत बसली शतपावली :(

ऋषिकेश Sat, 11/08/2012 - 08:08

मी एक प्रयोग मनात योजला होता मात्र अजून तरी वेळ आणि उन यांचे गणित जमलेले नाही :(
बहुदा स्पर्धा संपायच्या आत ते चित्र काढणे जमणार नाही. नंतर काढल्यावर स्पर्धाबाह्य म्हणून टाकेन

राजेश घासकडवी Sat, 11/08/2012 - 10:03

जेव्हा तेजस्वी सूर्य अस्ताला जातो तेव्हा पायाखालच्या सावल्या लांब होऊन खुजी माणसंदेखील महाकाय वाटतात...
आमच्या भागात मात्र सावल्या लांब होण्यासाठी सूर्य अस्ताला जाण्याची गरज नसते.
खालचा फोटो भर दुपारी सव्वाबाराच्या सुमाराला काढलेला आहे. सूर्य सगळ्यात वर असताना. गेल्या वर्षीच्या डिसेंबर १४ ला.
(उत्साही वाचकांना प्रश्न - हा फोटो किती अक्षांशावर काढला असेल हे अंदाजे सांगा)


फोटो आयफोनने दुपारी भरपूर प्रकाशात काढलेला आहे, त्यात विशेष काही महत्त्वाची सेटिंग्ज नाहीत.
सर्व बाजूंनी थोडा कातरला आहे. पिकासा वापरून कॉंट्रास्ट व सॅच्युरेशन वाढवलेलं आहे.

ऋषिकेश Fri, 17/08/2012 - 10:45

In reply to by राजेश घासकडवी

चित्रात सावलीची दिशा दिलेली नाही त्यामुळे रेखांशांचे दोन अंदाज काढता यावेत

जर सावली उत्तर दिशेकडे पडलेली असेल तर ३० ते ४० अंश उत्तर अंशावर पोल असावा, जर सावली दक्षिण दिशेकडे निर्देश करत असेल तर मात्र तुम्ही अंटार्क्टिकावर असायला हवात.

अर्थात तुम्ही अंटार्क्टिकावर गेला आहात असे चित्रातले वातावरण बघता वाटत नसल्याने चित्र ३० ते ४० अंश उत्तर रेखांशावर काढले असले पाहिजे

संदर्भ

राजेश घासकडवी Sat, 18/08/2012 - 12:58

In reply to by ऋषिकेश

ऍनिमेशन छान आहे.

मी उत्तर साधारण तोंडी काढलं. सावलीचा कोन सुमारे पंचवीस अंशाचा आहे. १४ डिसेंबर म्हणजे जवळपास सगळ्यात लहान दिवस. तेव्हा अक्ष बरोबर २३.५ डिग्री कललेला. ९० - (२५+२३.५) = ४१.५. (खरं उत्तर ४२.७)

रवि Sat, 11/08/2012 - 13:38

सावली आणि प्रतिबिंब तसे माझ्या आवडिचे विषय.

धाग्यामधे सध्या काही खगोलीय उनसावल्या आहेत. मी जरा भु गोलीय सावल्यांच्या सफरीवर घेउन जातोय.
चला तर मग.

१. अभिवादन

दगडी पायरीच्या छोट्याशा फटित आलेल हे गवताचं पातं.
छोट्याश्या टॉर्चलाइटच्या पुर्णलोग प्रकाशझोतापैकी अर्धगोल प्रकाशझोताने उजळलय.
आपली कला सादर करून झाल्यावर अभिवदन करनारा कलाकारच जणू.

अभिवादन
post processing : normal brightness and contrast

Exif data
Camera Sony DSC-W80
Exposure 0.1 sec (1/10)
Aperture f/3.5
Focal Length 8.7 mm
ISO Speed 400
Exposure Bias 0 EV

२. उन-सावली

भर उऩ्हाळ्यात
दुपारी
गर्द झाडाच्या पानांतुन जमिनिवर पोहचणारी जाळीदार सावली.

filtered

Exif data
Camera Sony DSC-W80
Exposure 0.006 sec (1/160)
Aperture f/2.8
Focal Length 5.8 mm
ISO Speed 125
Exposure Bias -1 EV

३. बर्फ़ाची सावली

याला तांत्रिकद्रुष्ट्या सावली म्हनाव कि नाही हा प्रश्नच आहे.
संथगतीने
तिरप्या दिशेने
होणार्या हिमवर्षावामुळे तयार झालेली झाडांची जणू सावलिच.

Ice shadow

Exif data
Camera Sony DSC-W80
Exposure 0.003 sec (1/320)
Aperture f/5.0
Focal Length 15.1 mm
ISO Speed 125
Exposure Bias 0 EV

४. पानसावली

पोतदार दगडावर पडलेली
छोट्या पानांच्या फांदिची सावली
जणू त्यावरच चितारली असावी एवढी एकरूप भासतेय.

shadow on texture
post processing : normal brightness and contrast

Exif data
Camera Sony DSC-W80
Exposure 0.003 sec (1/320)
Aperture f/8.0
Focal Length 5.8 mm
ISO Speed 125
Exposure Bias 0 EV

५. निवांत

सोफ्याच्या बाजुला
खिडकिची तिरपी सावली
आणि ती बघत बसलेला मी
निवांतपणा निवांतपणा तो आणखी काय ?

hmm.....??

Exif data
Camera Sony DSC-W80
Exposure 0.003 sec (1/400)
Aperture f/8.0
Focal Length 5.8 mm
ISO Speed 125
Exposure Bias -2 EV

६. सावल्यांची रांग

patches of shadow

Exif data
Camera Sony DSC-W80
Exposure 0.004 sec (1/250)
Aperture f/8.0
Focal Length 5.8 mm
ISO Speed 125
Exposure Bias 0 EV

७. पुरक

कदाचित हे चित्र निरस भासू शकतं.
बिल्डिंगच्या कोपर्यातले पाईप आणि त्याची सावली.
परंतू दिवसाच्या विशिष्टवेळी टाकिच्या आत जानार्या काळ्या पाईपाची सावली जणू पाईपच पुढे जातो आहे असा भास तयार करतेय.
आणि शिडिची सावली तर आहेच व आत येनारा पाईप व बाहेर जानारी पाईपची सावली.

the complements

Exif data
Camera Sony DSC-W80
Exposure 0.004 sec (1/250)
Aperture f/8.0
Focal Length 5.8 mm
ISO Speed 125
Exposure Bias 0 EV

पहिले तीन फोटो स्पर्धेसाठी ग्राह्य धरावेत अशी आयोजकांना विनंती.

विसुनाना Sat, 11/08/2012 - 16:26

भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकावर पडलेली सावली.

Camera KODAK Z712 IS ZOOM DIGITAL CAMERA //ISO 64 //Exposure 1/160 sec //Aperture 2.8 //Focal Length 6mm

विसुनाना Sat, 11/08/2012 - 17:19

ही मायकेल जॅक्सनची सावली - :). एका कार्यक्रमाच्या मी काढलेल्या व्हिडिओतून कातरलेली आहे...

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 11/08/2012 - 22:23

सूर्यग्रहणाचा फोटो ग्राह्य धरावा का असा विचार करत होते. सूर्यग्रहणाच्या वेळेस आपण सावलीत असतो, चंद्राच्या रात्रीचा भाग आपल्याला दिसत रहातो. रवी यांनी बर्फाच्या थरात झाडांची 'सावली' दाखवली आहे तसंच काहीसं. चंद्रगहणात मात्र निश्चितच सावली दिसते.

ऋता Mon, 13/08/2012 - 01:51

सावली विषयावर बर्याच वेगवेगळ्या कल्पना पहायला मिळाल्या. ही चित्र दिल्या बद्द्ल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.
अदितीच ग्रहणाचं दुसरं चित्र छान आहे. त्यात चंद्राच्या सावलीतून ग्रहण बघणारे सावलीत दिसत आहेत..आणखीन चांगली फ्रेम जमवता आली असती असं वाटल. श्रावण मोडकांचं पहिलं चित्र खूप आवडलं. आतिवास यांचं दुसरं चित्र फारच अर्थपूर्ण वाटलं. तरी त्यातून मला ही चित्र सगळ्यात आवडली:
क्रमांक ३. धनंजय वैद्यः तुरुंगातील खिडक्या
सावली या चित्रात अंधार या अर्थी दिसते. सावलीत डांबून ठेवलेल्यांना प्रकाशाच्या कवडशांचाच आधार !
क्रमांक २. सर्वसाक्षी: हा खेळ सावल्यांचा
पाण्यावर पडलेल्या सावलीत घेतलेला ग्रूप फोटो आवडला.
क्रमांक १. रवि: ऊन-सावली
सावली म्हटलं की अगदी लगेच मनात येणारं दृश्य टिपलं आहे. या चित्राचा साधेपणा खूपच आवडला.

ओव्हर टू रवि.

रवि Mon, 13/08/2012 - 16:24

उशिराबाबद दिलगिर आहे.
पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे रात्र. कुन्या एका चित्रकाराचे उद्गार आठवतात की रात्र दिवसापेक्षा जास्त रंगित व जिवंत भासते ...
आपल्या कल्पनाशाक्ति भरारी द्या आणि येउद्यात फोटो. ...
संपादकांना विनंती की नविन धागा तयार करावा .

- रवि