धाग्यांना तारे देण्याची सुविधा आणि इतर सुधारणा

'ऐसी अक्षरे' सर्वांसाठी उपलब्ध केल्यानंतर अनेक सदस्यांच्या सहकार्यातून संस्थळाच्या रचनेत असणार्‍या त्रुटी, इतर हव्या असणार्‍या सुविधा इत्यादी गोष्टींवर चर्चा झाली. या फीडबॅकमधून काही गोष्टी करण्यात आल्या आहेत.

या संस्थळाची उद्दीष्टं साध्य करण्यासाठी प्रतिसादांना व धाग्यांना श्रेणी देता येणं ही एक महत्त्वाची सुविधा आहे. संस्थळावरचं उत्तमोत्तम लेखन अधोरेखित करणं, तसंच प्रतिसादांना इतर वाचकांकडून फीडबॅक मिळून संस्थळाच्या अपेक्षा सदस्यांकडूनच सदस्यांना कळाव्या ही अपेक्षा आहे. या दोन्ही गोष्टींमुळे संस्थळावरच्या सदस्यांचा व लेखकांचा अनुभव सुधारेल अशी खात्री वाटते. जाहीर करायला आनंद होत आहे की ऐसी अक्षरेवर धाग्यांना श्रेणी देण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे.

एकंदरीत तांत्रिक टीमने गेल्या दोन आठवड्यांत केलेल्या सुधारणांचा आढावा.

१. खरडवह्यांचा फॉर्मॅट सुधारला, बारीकसारीक त्रुटी काढून टाकल्या.
२. खरडवह्या व स्वतःच्या माहितीत चित्र टाकण्याची सोय केलेली आहे.
३. नवीन प्रतिसादांमधल्या 'नवीन' हा टॅग वेगळ्या रंगाचा दिसतो आहे.
४. धाग्यांना तारे देण्याची सोय झालेली आहे. (याचा आणि कर्म, पुण्य, कर्म-मूल्य यांचा संबंध नाही.) ही सोय सध्या तरी श्रेणीदात्यांनाच उपलब्ध आहे. पण श्रेणीदात्यांची संख्या आता ८० च्या आसपास आहे. जसजशी सदस्यांची वागणूक दिसत जाईल तसतशी ही यादी वाढवत नेण्याचा प्रयत्न चालू आहे.

येत्या काही दिवसांत पुढच्या गोष्टी करण्यात येणार आहेत:
१. श्रेणीदात्यांची निवड आपोआप होणं कितपत शक्य आहे याची तपास.
२. धाग्यांच्या श्रेणीनुसार सॉर्ट करून सर्वाधिक श्रेणी असलेले धागे वर दिसतील असा वेगळा ट्रॅकर उपलब्ध करणे.
३. कौलांमधे पार्श्वभूमी देण्याची सोय सध्या नाही. लवकरच ही सोय उपलब्ध होईल.
४. कौलांमध्ये अजूनही सुधारणा करण्याचा विचार चालू आहे.

ऐसी अक्षरे व्यवस्थापनातर्फे साइटवर सतत सुधारणा करण्याचा प्रयत्न राहील. आपला पाठिंबा या प्रयत्नांना राहील अशी आशा आहे.

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

नावबदलू सरडेपणा आणि ड-आयडी

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

इमेजेस ची हाइट अन विड्थ

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

एक प्रश्न मला सदैव सतावतो,

एक प्रश्न मला सदैव सतावतो, 'श्रेणी देण्याची गरजच का? आपण काही शाळेतले मास्तर नाही आणि पेपर ही तपासत नाही अमुक उत्तर ९०% , तमुक उत्तर २०% लायकीचे आहे, हे ठरविणारे आपण कोण? जे चांगल असेल ते काळप्रवाहात तरंगत राहिलं, बाकीचे नष्टच होईल. दैव विपरीत असल्यास चांगले लेखन कुणा क्रूरकर्माच्या हातून नष्ट होते. (ऐकले आहे नालंदा विश्विद्यालय ६ महिने जळत होते, लाखोंच्या संख्येत पुस्तके नष्ट झाली,काहीच वाचली.

नालंदा विश्विद्यालय ६ महिने

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

श्रेणीची सुविधा भावी

श्रेणीची सुविधा भावी इतिहासकारांना 'कोल्हटकरांचे प्रतिसाद माहितीपूर्ण होते' हे सिद्ध करण्यासाठी नाही. भविष्यापेक्षा आत्ताच्या गरजेतून ती सुविधा आलेली आहे. श्रेणींच्या उपयुक्ततेबद्दल थोडी चर्चा वर झालेली आहेच, पण मुख्य कारणं पुन्हा एकदा

१. नुसतंच +१ म्हणणारे प्रतिसाद कमी होतात, आणि वाचनीयता वाढते.
२. वादविवाद न करता नापसंती व्यक्त करता येते.
३. जर कोणाला फक्त उत्तम प्रतिसादच वाचायचे असतील तर थ्रेशोल्ड वाढवून ती सोय करता येेते.
४. चांगले प्रतिसाद देणारांनाही एक दाद मिळते.

मला तरी श्रेणी व्यवस्था खूप

मला तरी श्रेणी व्यवस्था खूप आवडते. आपण लिहितोय ते कोणी वाचतंय हे कळतं.
================
पण ही व्यवस्था गुप्त नसायला पाहिजे. नक्की कोणी कोणेती श्रेणी दिली हे कळले तर दुर्वापर कमी होईल.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

चांगल्या श्रेणी ने मला तरी

चांगल्या श्रेणी ने मला तरी शाबासकी मिळाल्यासारखी वाटते. (स्माईल)

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

श्रेणीविषयक तक्रार

एक श्रेणी देताना सारे पान ताजेतवाने (म्हणजे रिफ्रेश (डोळा मारत) ) होते. मग नवे प्रतिसाद (नवे म्हणून) दिसत नाही.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

क्रोमवर असे होत नाही.

क्रोमवर असे होत नाही.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पण आय इ वर देखिल मागे असे

पण आय इ वर देखिल मागे असे व्हायचे नाही.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

काटेचमचे, मुखवटे आणि चष्मिष्ट

काटेचमचे, मुखवटे आणि चष्मिष्ट वाचकाच्या खाली तुम्हांला बाकी तीन चित्रे दिसत नाहीयेत का? :-।

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ते संपादकांना अपडेटावे लागत

ते संपादकांना अपडेटावे लागत नाहीत. त्यावर क्लीक केले की त्याप्रकारचे सर्वच धागे दिसतील. सर्वात नवा धागा वर दिसेल.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उजव्या बाजूचे वर्गीकरण आवडते

उजव्या बाजूचे वर्गीकरण आवडते आहे. फक्त ते कायम अपडेटवत राहण्याचे काम संपादकांच्या गळ्यात पडणार!

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कुठले वर्गीकरण

कुठले वर्गीकरण?

अमुक एका लेखकाने (अमुक हे

अमुक एका लेखकाने (अमुक हे सामान्यनाम. अमुक, मन, मी.... यांनी साली पंचाईत करून ठेवली आहे. असो.) नवीन लिहिले आहे (प्रतिसाद किंवा लेख किंवा दोन्ही. जे काही जमेल ते.) अशी सूचना इमेलीने स्वतःला मिळवणे शक्य होईल का?

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हॅशटॅग

एसीवरील प्रतिसादांना 'हॅश-टॅग'ची सोय करणे शक्य आहे काय? टॅग करण्याची सोय कर्मानुसार(गुणांनुसार असावी), तसे केल्यास काही उत्तम प्रतिसाद सहज सापडणे सोयीचे होइल.

सर्च

चांगल्या सर्च इंजिनाशिवाय हे शक्य नाही. ड्रुपल सर्चची अवस्था वाईट आहे.

ड्रुपल सर्च

ड्रुपल सर्च वाईट आहे असे का वाटते? मी ते वापरतो आणि माझ्या साइटवर ते नीट चालते. किती टक्के इंडेक्सिंग झाले आहे, ते पण ड्रुपलमध्ये कळते. १००% टक्के इंडेक्सिंग होण्यासाठी क्रॉन जॉब वारंवार चालवावा लागतो. सर्च नीट चालण्यासाठी क्रॉन जॉब schedule करून व्यवस्थित पूर्ण व्हावा लागतो.

ड्रुपल सर्च - काही प्रश्न

>> ड्रुपल सर्च वाईट आहे असे का वाटते? <<

  1. शब्द/समूह 'क्ष' हवा पण 'य' नको, 'क्ष'जवळ 'य' हवा वगैरे सर्च करता येतात का?
  2. शब्दसमूह जसाच्या तसा आला तरच हवा आहे असं सर्च करता येतं का? (उदा : "राखी सावंत"; पण निव्वळ 'राखी' किंवा 'सावंत' असलेले रिझल्ट्स सोडून)
  3. ज्यावर सर्च करायचा आहे तो शब्द/समूह एखाद्या धाग्याशी कीवर्ड किंवा हॅशटॅग म्हणून असोसिएट केले असतील तर त्याला सर्च रिझल्ट्समध्ये अधिक वजन मिळेल का?
  4. अधिकाधिक सर्च केल्या जात असलेल्या शब्द/समूहांचा टॅग क्लाउड वगैरे त्यात दाखवता येतात का? ते काळानुसार कसे बदलत आहेत (म्हणजे काल / गेल्या महिन्यात / गेल्या वर्षी ह्या दिवशी काय होते आणि त्यांत कसे उतारचढाव होत आहेत वगैरे) हे दाखवता येतं का?

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ड्रुपल सर्च

१. माझी वेबसाइट बघा. तिथे 'कमी' हा शब्द शोधला तर ३ रिझल्ट दिसतात. 'कमी -खर्च' शोधला तर फक्त २ रिझल्ट दिसतात, 'खर्च' हा शब्द असणारा रिझल्ट नाहीसा होतो.
२. "कमी खर्च" हा शब्द शोधला तर ते दोन्ही शब्द असणारा फक्त १ रिझल्ट दिसतो.
३. ही पोस्ट बघा. याला २ कीवर्ड जोडले आहेत. Buffett आणि Investment advice. (ड्रूपलमध्ये यांना टॅक्सोनॉमी टर्म असे म्हणतात.) या दोन्हीपैकी कुठल्याही शब्दावर शोधले, तर ती पोस्ट दिसते.
४. माझ्या वेबसाईटवर टॅग क्लाउड डावीकडे सर्वात खाली दाखवला आहे किंवा इथे बघू शकता. (Open source आणि Investments हे टॅग्ज चालत नाहीत, कारण मी ते नोड सध्या पब्लिश केलेले नाहीत, पण इतर टॅग्ज चालू आहेत.)

सर्च सेटिंगसाठी तुमच्या ड्रूपल साइटमध्ये खालील ठिकाणी बघा:
Home › Administration › Configuration › Search and metadata
क्रॉन सेटिंगसाठी तुमच्या ड्रूपल साइटमध्ये खालील ठिकाणी बघा:
Home › Administration › Configuration › System > Cron

मुख्य म्हणजे content type, taxonomy आणि terms नीट वापरले पाहिजेत आणि मग साइटचे नीट इंडेक्सिंग केले पाहिजे. ऐसीवर content type नीट नाहीत आणि taxonomy प्रत्येक content type ला नीट जोडलेली नाही, हा मुख्य प्रॉब्लेम आहे.

उदय, तुझी साईट कोणती?

उदय, तुझी साईट कोणती?

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

उदय डॉट नेट

आणि हो, अवग्रह कसा लिहायचा?

आणि हो, अवग्रह कसा लिहायचा?

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अवग्रह आणि प्रतिसादाचा दुवा

>> अवग्रह कसा लिहायचा? <<

टंकनसाहाय्य दुवा

ऽ लिहिण्यासाठी a~ टंकावं लागेल.

प्रतिसादाचा दुवा देण्यासाठी - कोणत्याही प्रतिसादाच्या मथळ्यावर अगदी उजवीकडे (तारीख आणि वेळ दिसते त्याच्याही उजवीकडे) एक चिन्ह दिसेल. तो प्रतिसादाचा दुवा असतो. त्यावर राइट-क्लिक केलं तर Copy link address किंवा तत्सम पर्याय मिळेल. तो वापरून प्रतिसादाचा दुवा हवा तिथे कॉपी-पेस्ट करता येतो.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

एका धाग्यातल्या एका विशिष्ट

एका धाग्यातल्या एका विशिष्ट प्रतिक्रियेचा दुवा कसा द्यायचा? मला हे काही केल्या जमत नाही. कुणी तंत्र सांगितलं तर फार बरं होईल.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुला ज्या प्रतिसादाचा दुवा

तुला ज्या प्रतिसादाचा दुवा द्यायचाय त्याला उपप्रतिसाद देण्यासाठी क्लिक कर. मग url पहा. www.aisiakshare.com/comment/reply/112/50382 अशी येइल. त्यातला 112 हा धागा क्रमांक आहे आणि 50382 हा प्रतिसाद क्रमांक. आता तुला हवी आहे तिथे www.aisiakshare.com/node/112#comment-50382 अशा फॉर्मेटमधे लिँक दिलीस तर ती त्या प्रतिसादावर जाइल.

Amazing Amy

किंवा

ज्या प्रतिसादाची लिंक द्यायची आहे त्याच्या उजव्या बाजुला, तारीख आणि वेळेच्या उजव्या बाजूला साखळीचं चित्र दिसतं. त्यावर उजवी टिचकी मारून copy link location करावं. लिंक चोप्य झालेली असते

अर्रः खालचा प्रतिसाद वाचायच्या आधि हा प्रतिसाद टंकला.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

कर्मसिद्धांत

ठरवलेलं काम पूर्ण झालं आहे, त्याचे काही दृष्य परिणाम नाहीत (नसावेत).

हे कर्मसिद्धांतासारखं झालं, इथे छुपे सनातनी-प्रयोग चालु आहेत काय?

:ड

(दात काढत)

इतक्यातच अजून एकदा अपडेट्स करायला लागतील, काल फक्त कोअर अपग्रेड केला. आणि पुढेही असं करायला लागेल. काल जे अपग्रेड्स केले त्यात म्हणे security loopholes बंद केली गेली. जोपर्यंत त्याचे परिणाम दिसत नाहीत तोपर्यंत ते चांगलं चाललंय असं म्हणायचं. काही भलतं दिसलं तर गडबड आहे.

सध्या व्यनी पाठवल्यावर (भयंकर गुलाबी पार्श्वभूमीवर) एरर मेसेज येतो आहे. त्याकडे दुर्लक्ष करावं ही विनंती. शक्यतोवर ते घालवण्याचा प्रयत्न करते आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'असामी असामी'तील भिकाजी

'असामी असामी'तील भिकाजी जोशींच्या काळात वेळच्यावेळी सुतकाची सोय करण्यास अत्यंत उपयुक्त अशा तारांचे सुतक आजपासून सुरू होत आहे. भारतीय आणि जागतिक इतिहासात संवादाचे एक महत्त्वाचे व ऐतिहासिक साधन ठरलेल्या या माध्यमाला ऐसीअक्षरे तर्फे मुजरा.

ह्या नसुतकी श्रद्धांजलीमुळे एक चांगला लेख वाचनात आला, धन्यवाद.

While the telegram was used to convey urgent and oftentimes tragic news, it also provided a unique outlet for personal creativity. For, before the dull anonymity of the telephone number, there was the telegraphic address, a word or series of words chosen freely by the owner.

One of my own favourite addresses belonged to the Parsi merchant Jehangir B. Petit, who, buoyed either by personal hubris or civic pride, directed correspondents to wire him at ‘Immortal Bombay’.

(संस्थळावरील) टोपणनावाचा तारखात्यातला इतिहास रोचक असणार!

'इतर सुधारणा'

धाग्यात/प्रतिसादात दिलेल्या ऐसीच्याच इतर लेखाच्या लिंकेवर क्लिक केल्यास उघडणार्‍या पानात मी साईन आऊट झाल्याचे दिसते, व परत साईन इन करावे लागते. नवीन लेखनाच्या पानावरून क्लिक करून उघडलेल्या धाग्यांत असे होत नाही, म्हणजेच मी साईन आऊट होत नाही.
नक्की काय होते आहे?

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

दिनवैशिष्ट्य मस्त प्रकार आहे,

दिनवैशिष्ट्य मस्त प्रकार आहे, रंजक आहे.

२२ जून.
१९३३: पोपच्या दबावाखाली गॅलेलियोने मान्य केले की सूर्यमालेच्या केंद्रस्थानी पृथ्वी आहे.
१८९७: चाफेकर बंधूंनी रँड व आयर्स्ट यांच्यावर गोळ्या घालून त्यांना ठार केले.
१९४०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली व याच दिवशी फ्रान्सने हिटलरसमोर गुडघे टेकले.

बाकी उद्याचा दिवस फारच भारी आहे म्हणायचा.

१९३३: पोपच्या दबावाखाली

१९३३: पोपच्या दबावाखाली गॅलेलियोने मान्य केले की सूर्यमालेच्या केंद्रस्थानी पृथ्वी आहे.

एक दिवस आधी मान्य केलं असतं तर २१ जून (विष्टंभ, उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस) असा "मुहूर्त" साधला गेला असता.

(तिथे १६३३ पाहिजे, १९३३ झालंय. दुरूस्ती करते.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भडकाऊ आणि खोडसाळ समान वाटतात

भडकाऊ आणि खोडसाळ समान वाटतात त्यामुळे त्यातली एकच ठेवली तरी चालेल असे सुचवते.
आणि सर्वसाधारण पण काढुन टाकली तर चालेल. उगाच मार्क वाढतात आणि बरेचदा चुकुन ती श्रेणी दिली जाते.

Amazing Amy

फार न वापरल्या जाणार्‍या

फार न वापरल्या जाणार्‍या श्रेणी यादीच्या तळाशी ढकलण्यात 'सर्वसाधारण'लाही खाली ढकलता येईल.

भडकाऊ आणि खोडसाळ पैकी एक ठेवल्यास रिकामी जागा कशाने भरावी?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओह रिकामी जागा तयार होइल का?

ओह रिकामी जागा तयार होइल का? नक्की? मला वाटतं ब्याटमन, ननि यांनी एक पर्याय सुचवलेला कधीतरी. लाळगाळु आठवतोय पण त्याचा खाण्यापिण्याच्या धाग्याशिवाय इतर कुठे उपयोग होणार नाही.
आणि एक शंका श्रेणी देणारा व ज्याला श्रेणी देतोय तो दोघांच पुण्य २ असेल तर पहील्या श्रेणीत मार्क २ ने वाढतात हे योग्य आहे का?

Amazing Amy

कुरापती

अशा सुचना करून सारख्या कुरापती काढणार्‍या लोकांसाठी कुरापती श्रेणी देता येईल. (डोळा मारत)

हवी असेल तर कुरापत्नी घ्या! उगाच लिंगभेदाच्या तलावारी घेऊन आमच्यावर चालून येऊ नका म्हणजे झाले!

आपले मत काय?

दिवसाला २५ श्रेणी देता येणे जरा जास्त होतय का? म्हणजे उधळपट्टी म्हणतेय मी. जरी विशेष "श्रेणीयोग्य" नसेल तरी मुक्त/सढळ हस्ताने वापर होतोयसं वाटतं Sad
अर्थात मला पहील्यांदा काही श्रेणी मिळाल्याने अधिकाधिक "सेन्सिबल" लिहावेसे वाटू लागले आहे. (जीभ दाखवत)
पण जर दिवसाला २५ पेक्षा कमी केल्या तरी चालेलसे वाटते.

कायच्या काय!

दिवसाला २५ श्रेणी देता येणे जरा जास्त होतय का? म्हणजे उधळपट्टी म्हणतेय मी.

ओ काकू, काही काय! माझे दिवसाला ३०-३५ तरी प्रतिसाद असतात, २५ ने काय होतंय? उलट वाढवा म्हणतो मी!

जरी विशेष "श्रेणीयोग्य" नसेल

जरी विशेष "श्रेणीयोग्य" नसेल तरी मुक्त/सढळ हस्ताने वापर होतोयसं वाटतं

असं कधीमधी मलाही वाटतं. एखादा प्रतिसाद पाच मार्क मिळवण्याएवढा आवडलेला नसतो, पण थोडा आवडतो. अशा वेळेस इतर कोणी श्रेणी दिलेली असेल तर मी देत नाही. असा विचार सगळ्यांनीच करावा अशी सक्तीही नाही.

२५ श्रेणी देता येतात म्हणून देण्याची सक्ती नाही. वेश्यागमन बेकायदेशीर नाही म्हणून करायलाच हवं असं नाही.

हा धागा वर आलेलाच आहे तरः
१. वाईट प्रकारच्या श्रेणी यादीच्या तळाशी घालवणे
२. कैच्याकै आणि निरर्थक या दोन श्रेणींच्या जागी निरर्थक ही एकच श्रेणी ठेवणे.
३. खवचट अशी एक सकारात्मक (+ve) अर्थाची श्रेणी आणणे.

असे बदल होणार आहेत. अन्य काही सूचना?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुधारणा

लोगौट .एफ ए क्यू हे इंग्रजी शब्द खटकतात .
इग्रजीत ठेवण्यामाग्चे कारण काय ?
पर्यायी मराठी शब्द "आता पुरे ,"प्राथमिक शंकासमाधान वापरू शकता .

अर्थात सबळ कारण (वेबसाईट स्टेन्डर्ड् पाळणे असे काही ) असल्यास याकडे दुर्लक्ष करा

कमीतकमी अक्षरांत अपेक्षित

कमीतकमी अक्षरांत अपेक्षित तेवढाच अर्थ व्यक्त करणारे शब्द न सापडणे. उदा: 'गमन' हा शब्द आहे, पण त्याला जोडून येणारे इतर अर्थ आहेत, म्हणून नको.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"चर्चा विषय" ह्या सदरात

"चर्चा विषय" ह्या सदरात येणारे धागे संपादन करून प्रकाशित करावे ही विनंती.
चर्चा सोडून इतरच काहीच्या कही वाचावं लागतं नहीतर असा अनुभव येतो आहे.

योग्य तांत्रीक सुधारणा केल्या

योग्य तांत्रीक सुधारणा केल्या आहेत. तंत्रज्ञांचे अभिनंदन.


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

खरडवहीत नवीन खरड असेल तर तसे

खरडवहीत नवीन खरड असेल तर तसे मुखपृष्ठावर कळत नाही. खरडवहीत गेल्यावरच नवीन खरड आल्याचे कळते. मुखपृष्ठावर किती नवीन खरडी आहेत हे कळले पाहीजे.

- सूर्य

धाग्यांना तारे देण्याची सोय

धाग्यांना तारे देण्याची सोय करण्यामागे मुख्य उद्देश असा आहे की त्यातून संस्थळावरचे उत्तमोत्तम धागे लगेच सापडावेत. ही सुविधा सुरू झाल्यापासून काही तासांतच उत्तम म्हणता येऊ नये अशा काही धाग्यांना तारे दिलेले दिसत आहेत. त्यामुळे उत्तम वाचक म्हणून परिचित असणार्‍या सदस्यांनाच सध्या तारे देण्याची सुविधा आहे. धाग्याला मिळालेलं तारांकन आणि कर्म, कर्म मूल्य यांचा संबंध नाही. संस्थळावर कोणते धागे संस्थळ प्रवर्तकांना उत्तम वाटतात यासाठी तारे देण्याची सुविधा ऑटोमेशन म्हणून वापरण्यात येत आहे.

नगरीनिरंजन यांनी विचारलेला प्रश्नः

धाग्याची सध्याची श्रेणी धागा उघडण्याआधीच कळायची काही सोय आहे का? म्हणजे धागे उघडायचेही कष्ट वाचतील आणि प्राधान्यक्रम ठरवता येतील.

याची लिंक लवकरच उपलब्ध करून देत आहे.
पण हे मत संस्थळावरच्या उत्तम वाचकांचं असेल; व्यक्तिगत मतांसाठी सदस्य 'बुकमार्क'ची सोयही वापरू शकतात. शिवाय आपले बुकमार्क इतरांना दिसतात त्यामुळे सदस्यांना जे उत्तम वाचक वाटत असतील त्या सर्वांचे बुकमार्क्स लॉगिन केल्यावर उपलब्ध आहेतच.
यात काही बदल केल्यास पुन्हा कळवण्यात येईल.

फक्त ठराविक 'लेखकांचे' धागे दिसावेत अशी काही सोय करून देणे शक्य आहे काय? हे म्हणजे "माय व्हिउ" सारखा प्रकार आहे, किंवा "फिल्टर बाय लेखक"?

सध्यातरी नाही. पण याचा प्रयत्न करून पहाते; याची चाचणी यशस्वी झाल्यावर सांगते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यादी द्यावी

श्रेणी देण्याची सुविधा ज्यांना आहे त्यांची नावे प्रसिद्ध केल्याप्रमाणे धाग्यांना तारे देण्याची सुविधा/अधिकार आहे त्यांची यादी द्यावी ही विनंती.

खरे सांगायचे तर

खरे सांगायचे तर लेखकाने/लेखिकेने स्वतःच्या धाग्याला श्रेणी देण्याची सुविधा काढून घेण्यात यावी कारण प्रत्येक जण स्वतःच्या धाग्याला "ऑस्सम" श्रेणी च देणार (डोळा मारत)

आम्ही

आम्ही एका सुविधेची मागणी केली होती. ती फाट्यावर मारलेली दिसते. ठीक आहे. (स्माईल)

फिल्टर?

फक्त ठराविक 'लेखकांचे' धागे दिसावेत अशी काही सोय करून देणे शक्य आहे काय? हे म्हणजे "माय व्हिउ" सारखा प्रकार आहे, किंवा "फिल्टर बाय लेखक"?

अदिती मी राजेशना आत्ताच खव

अदिती मी राजेशना आत्ताच खव मध्ये हा प्रश्न विचारला आहे - मला समजा "साडेसाती" या विषयावर चर्चा सुरु करायची आहे तर मी करु शकत नाही
Sad कारण फक्त राजकिय/आर्थिक आणि सामाजिक वर्गवारी आहे.

ज्योतिष ही वर्गवारी टाकायचा विचार नाही का?

मला सुचलं नाही. आणखी काही

मला सुचलं नाही. आणखी काही वर्गवारी हवी असल्यास सांगणे, वाढवते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

by limbutimbu (मीच आधी निरर्थक म्हणतो, घ्या, -१ श्रेणी)

ज्योतिष असा वर्ग काढण्या ऐवजी "धार्मिक" असा वर्ग केला, तर त्यात ज्योतिष/स्तोत्रे/कर्मकाण्ड/देवदेवस्थाने असे अनेक प्रकारचे सर्वधर्मिय वा निधर्मी धागे काढता येतिल.

धन्यवाद!!!!

धन्यवाद!!!!

दा(ल)न द्या!

आमच्या कलेला?

हॉय रे हॉय. ते ही लगेच केलं

हॉय रे हॉय. ते ही लगेच केलं आहे. हे धागे एकत्र बांधायची सोयही लवकरच करते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ट्रॅव्हलॉग हा टीम बीएचपीसारखा

ट्रॅव्हलॉग हा टीम बीएचपीसारखा सुप्परझकास विभाग इथे सुरु केल्यास भटकंतीप्रेमींना बहार येईल. म्हणजे नुसते ठिकाणाचे वर्णन असेच नव्हे तर पूर्ण ड्रायव्हिंगचा रुट, आलेल्या अडचणी, रस्त्यावरची अनपेक्षित गावलेली सुंदर ठिकाणे, न चुकवण्यासारखे रोडसाईड ढाबे आणि ईटरीज..

अनुभवाच्या टिप्स, हमखास रस्ता चुकण्याचे धोक्याचे पॉईंट्स आणि ते टाळण्यासाठी लँडमार्क्स.. पेट्रोल पंपांची मुबलकता किंवा अभाव असलेल्या एरियाजचे इशारे..

.... रूट्ससाठी जमल्यास गूगलसाहाय्याने डायरेक्शन्स..

एकाच जागी पोहोचण्यासाठी (उदा मुंबई-गोवा) तीन ते चार वेगवेगळे मार्ग आणि प्रत्येकाचे फायदे तोटे.. (उदा पुणे कोल्हापूर निपाणी मार्गे जास्तीतजास्त फास्ट (कमी वेळात आणि कमी थकव्यात) पण मोनोटोनस आणि कमी निसर्गरम्यता..

कोकणातल्या वाटेने ड्रायव्हिंग प्लेजर खूप, सुंदर निसर्ग सर्वत्र सोबतीला, घाट आणि वळणांची मजा (ज्याला येते त्याला) आणि त्रास (ज्याला वळणं "लागतात" त्याला). शिवाय दमणूक जास्त आणि एका दिवसात गोव्याला पोहोचणं कठीण..

अशा असंख्य गोष्टी ट्रॅव्हलॉगमधे मांडता येतात आणि पुढच्या मुसाफिराला अत्यंत उपयोगी पडतात..

विचार करावा..

मोनोटोनस् ड्रायव्हिंग

+ सहमत
विशेषत: कोल्हापूर-निपाणी-संकेश्वर या मार्गाने गोव्याला जाणे हे किती मोनोटोनस आहे हे त्या मार्गाने नित्यनेमाने जाणार्‍यांना चांगलेच उमगते. अर्थात आंबोली घाट सुरू झाल्यावर मात्र निसर्गराजा चांगली साथ देतो ते अगदी पोन्जी पोन्जी आवाज कानी येईपर्यंत.

पण कोल्हापूर-राधानगरी मार्गे काय किंवा गगनबावडामार्गे काय....रस्त्यांची दुर्दशा अशी काही झालेली आहे गवि....की तुम्हाला वाटेल झक मारले ते निसर्गसौन्दर्य, गुमान निपाणीमार्गे आलो/गेलो असतो तर फार बरे झाले असते.

(येते शनिवार/रविवार/सोमवार सलग तीन दिवस गोव्यात आहे....जमवा तुम्हीही शक्य झाल्यास....'वॉर्फ' ला भेट देणार आहेच.)

अशोक पाटील

पण कोल्हापूर-राधानगरी मार्गे

पण कोल्हापूर-राधानगरी मार्गे काय किंवा गगनबावडामार्गे काय....रस्त्यांची दुर्दशा अशी काही झालेली आहे गवि....की तुम्हाला वाटेल झक मारले ते निसर्गसौन्दर्य, गुमान निपाणीमार्गे आलो/गेलो असतो तर फार बरे झाले असते.

तरीही दोनातली एक ट्रिप त्यामार्गाने होते कारण आमच्या बापू घोलपचं मटणाचं हॉटेल आहे ना फोंडाघाटाच्या वरच्या खिंडीत.. (दाजीपूर).. कॉलेजच्या दिवसांपासूनची चटक लागलीय त्याच्या हातच्या स्वर्गीय खाण्याची.. त्यापुढे बाकीचं सगळं म्हणजे उगीच कॉम्प्रोमाईज हो.

तस्मात, रस्ता कसाही झाला तरी आम्ही जाणार.. (लास्ट ट्रिप करुन वर्ष झालं, तेव्हाही रस्ता वाईटच होता.. (स्माईल) )

धाग्याना श्रेणी द्यायच्या

धाग्याना श्रेणी द्यायच्या सुविधेचा वापर कसा करावा हे लक्षात येत नाहीये अजून!

या मॉड्यूलचं वर्तन पहाता काही सजेशन्सः
१. अजिबात टाकाऊ धाग्यांना अजिबात तारे देऊ नयेत.
२. चांगल्या धाग्यांना मार्क दिल्याप्रमाणे १ तारा = २०%, २ तारे = ४०% ... याप्रमाणे तारे द्यावेत. सगळ्या धाग्यांना तारे द्यावेतच अशी अपेक्षा नाही. धागा खरोखर आवडला तरच तारे दिले असं केल्याचा जास्त फायदा होईल.

धाग्याची सध्याची श्रेणी धागा उघडण्याआधीच कळायची काही सोय आहे का? म्हणजे धागे उघडायचेही कष्ट वाचतील आणि प्राधान्यक्रम ठरवता येतील.

असे 'तारांकित' धागेच दिसतील असा ट्रॅकर बनवते आहे.

श्रेणीदात्यांची आपोआप निवड होताना ड्युप्लिकेट आयडी आपोआप खड्यासारखे निवडण्याची सोय आहे काय?

गुड क्वेश्चन! सध्यातरी नाही. पण या डुप्लिकेटांना श्रेणी देण्यासाठी सगळ्या आयडींतून चांगलंच लिखाण करावं लागेल अशी सोय करता येईल.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ठीक!

पण या डुप्लिकेटांना श्रेणी देण्यासाठी सगळ्या आयडींतून चांगलंच लिखाण करावं लागेल अशी सोय करता येईल.

ठीक. मी ड्युप्लिकेट आयडीतून चांगले लेखन केले पण मग श्रेणीसुविधा मिळाल्यावर इतर चांगल्या प्रतिसादांना खोडसाळपणे भडकाऊ, अवांतर, खोडसाळ इ. श्रेणी दिल्या तर चालेल ना! (स्माईल)

आय होप यू आर गेटिंग मी!

अनामिकः तारांकन न झालेले,

अनामिकः

तारांकन न झालेले, परंतू चांगले असलेले धागे मागे पडतील असे वाटते.

ज्यांना तारे देण्याची आणि श्रेणी देण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यांच्याकडून योग्य मतदान होण्याची अपेक्षाही आहे. 'ऐसीअक्षरे'वर संपादक हा शब्द वापरणं मुद्दामच टाळत आहोत. पण फार काही नाही तरी मॉडरेटर्सचं दोन गोष्टींकडे लक्ष असणं अपेक्षित आहे; एक म्हणजे चांगल्या प्रतिसादांना चुकून किंवा मुद्दाम वाईट श्रेणी मिळत नाहीत ना (असं झाल्यास चांगल्या प्रतिसाद आणि प्रतिसादकांसाठी मुद्दाम मत खर्ची करणे). आणि दुसरं म्हणजे चांगल्या धाग्यांना चांगलं तारांकन मिळेल. फक्त कचरा उचलणं आणि शिस्त लावणं यापलिकडे काही कन्स्ट्रक्टीव्ह काम या (आम्ही) मॉडरेटर्सनी करावं अशी आमची अपेक्षा आहे. फक्त मॉडरेटर्सच कशाला, संस्थळाच्या सर्व वापरकर्त्यांकडून ही अपेक्षा आहेच.

प्रियाली:

ड्युप्लिकेट आयडीतून चांगले लेखन केले पण मग श्रेणीसुविधा मिळाल्यावर इतर चांगल्या प्रतिसादांना खोडसाळपणे भडकाऊ, अवांतर, खोडसाळ इ. श्रेणी दिल्या तर चालेल ना!

एकतर हे करायला डुप्लिकेट कशाला, आहे ते सदस्यनामही वापरता येईलच की! दुसरी गोष्ट म्हणूनच अधिकाधिक लोकांनी श्रेणीचा वापर करावा अशी अपेक्षा आहे कारण असं कोणी चुकून किंवा मुद्दाम केल्यास इतरांच्या मतांमुळे अशा एक-दोन लोकांच्या मताला फारसं वजन रहाणार नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लक्षात घ्या

एकतर हे करायला डुप्लिकेट कशाला, आहे ते सदस्यनामही वापरता येईलच की! दुसरी गोष्ट म्हणूनच अधिकाधिक लोकांनी श्रेणीचा वापर करावा अशी अपेक्षा आहे कारण असं कोणी चुकून किंवा मुद्दाम केल्यास इतरांच्या मतांमुळे अशा एक-दोन लोकांच्या मताला फारसं वजन रहाणार नाही.

कृपया लक्षात घ्या. आपली (आपल्या देशातील म्हणा) चांगली जनता ही नेहमीच उदासीन राहिली आहे. परिस्थितीशी जुळवून घेणं जमलं नाही तर वेगळी चूल मांडणे हा पर्याय ते निवडतात पण परिस्थितीशी मुकाबला करणे, गुन्हा होताना दिसत असताना तो थांबवण्याचा प्रयत्न करणे, अगदी मतदानापासूनही अनेकदा सोकॉल्ड चांगला माणूस दूर राहतो. श्रेणी प्रक्रियेचेही असेच होईल असे वाटते.

उलट, ज्या खोडसाळ माणसाला स्वतःला आणि त्याच्या ड्युप्लिकेट आयडीला श्रेणी सुविधा मिळेल तो इतरांचे उच्चश्रेणींचे धागे दोन वेळा/ तीन वेळा खाली उतरवू शकतो आणि हे तर आजही ज्यांचा स्कोरः१ आहे अशा अनेक आयडींबाबत होते आहे. यावरून खोडसाळपणाच अधिक सुरु आहे असे वाटते.

असे 'तारांकित' धागेच दिसतील

असे 'तारांकित' धागेच दिसतील असा ट्रॅकर बनवते आहे.

असं करण्यापेक्षा त्या त्या धाग्यासमोर कंसात त्या धाग्याचे तारांकन आणि किती जणांनी तारांकित केलंय ही माहिती दिली तर जास्तं योग्य होईल असे वाटते. ज्यांना तो धागा तारे बघून उघडायचा आहे त्यांना मदत होईल. पण तू म्हणतेस त्याप्रमाणे जर फक्तं तारांकित धागेच दिसलेत तर तारांकन न झालेले, परंतू चांगले असलेले धागे मागे पडतील असे वाटते.

-अनामिक

श्रेणीदात्यांची आपोआप निवड

श्रेणीदात्यांची आपोआप निवड होताना ड्युप्लिकेट आयडी आपोआप खड्यासारखे निवडण्याची सोय आहे काय? (डोळा मारत) तंत्रज्ञानाच्या अधीन राहून सर्वसाधारण कॉमन सेन्स तर नाही ना गमावला जाणार?

बाकी, धाग्यांना रेटिंग देण्याची ड्रुपलचे मोड्युल उपयुक्त वाटत नाही.

धाग्याची सध्याची श्रेणी धागा

धाग्याची सध्याची श्रेणी धागा उघडण्याआधीच कळायची काही सोय आहे का? म्हणजे धागे उघडायचेही कष्ट वाचतील आणि प्राधान्यक्रम ठरवता येतील.

Hope is NOT a plan!

धन्यवाद!

पण आता धाग्याना श्रेणी द्यायच्या सुविधेचा वापर कसा करावा हे लक्षात येत नाहीये अजून!

नायल्याने जोजोकाकू वगैरे

नायल्याने जोजोकाकू वगैरे चहाटळपणा बंद केला. आमचा हा अवतार कामी आला असे मानतो.

धन्यवाद!

सुधारणांबद्दल धन्यवाद.

नवीन प्रतिसाद

नवीन प्रतिसादांवरचा 'नवीन' हा टॅग कालपर्यंत लाल रंगात आणि उजवीकडे दिसत होता. पण आज पुन्हा आधीसारखा म्हणजे काळ्या रंगात डावीकडे दिसतोय.
मी विंडोज + गूगल क्रोम वापरते.

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...