सिद्धोबा

मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो.
थोडं आत वळल्यावर -
भर दुपारी अचानक
एक हिरवाकंच पाचू सामोरा येतो.
मूळ खोड नसणाऱ्या
पारंब्यांच्या वडाखाली
मोरांचा एक थवा
केकारवत फिरतो इकडेतिकडे.
तहानलेल्या डोंगराच्या पायथ्याशी
एक नितळ झरा आहे, थंडगार!
वेळू आणि आमराई
वगैरेही-

निळंशार आकाश, स्वच्छ मन,
निवलेले डोळे, अक्षय शांती-
तोच सिद्धोबा!

पण थोडं आत वळावं लागतं -
स्वतःच्या.
कारण मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो -
तिथे रहदारी असते फक्त.

.

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (8 votes)

प्रतिक्रिया

आवडली रचना. शेवटचा भाग अगदी कळसाकडे नेतोय. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सिद्धोबा मस्ताड आवडल्या गेला आहे एकदम!!!!!! आत वळण्याची प्रोसेस खासच दाखवलीये. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्तच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is NOT a plan!

फार छान.
खूप आवडला सिद्धोबा!
ते सहज पण दुर्मिळ दर्शन उत्तम व्यक्त झाले आहे.
नुस्तं वाचून देखिल एवढं छान वाटलं...
'रहदारी'चा उल्लेख मात्र उगीच ढोबळ वाटून गेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता आवडली.

>>पण थोडं आत वळावं लागतं -
स्वतःच्या.

या ओळींमधला शेवटचा शब्द टाळता आला असता. माझ्यामते तरीही सूचकता अधोरेखित झाली असती आणि कदाचित अधिक धारदार बनती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

असेच म्हणतो. अर्थात आमच्यासारख्या औरंजेबांना 'स्वतःच्या आतमध्ये वळणे' ही सांकेतिकता हा शब्द नसता तर कळाली असती याची ग्यारंटी नाही. त्यामुळे हाये ह्येच ब्येस हाये.
कविता एकूणात आवडली. नाना, जरा आत वळा आणि अधिक लिहीत चला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

निवड केली खरी.
कवितेची आवर्जून दखल घेतल्याबद्दल धन्यवाद.

सन्जोप राव, आज्ञापालनाचा कसोशीने प्रयत्न करीन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे क्या बात है !मस्त मस्त एकदम मस्त...
खूप दिवसांनी सुंदर रचना वाचायला मिळाली !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाददात्यांची मते स्वागतार्ह आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चला ह्या कवितेचा वापर करुन नानामहाराज ब्रँड बनवता येईल. नाहीतरी सध्या बर्‍याच बुवाबाबांचे शेयर्स कोसळले आहेत हा नवा एनएफओ भारी दिसतोय!!

Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लय ब्येस.. अतिशय आवडली
बर्‍याच दिवसांनी कवितेला पाच चांदण्या द्यायचा योग आल Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता आवडली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कारण मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो -
तिथे रहदारी असते फक्त.

खरे आहे. फ-क्त रहदारी!
अफाट कविता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको