पास्ता कॉन ब्रॉक्कोली अर्थात पास्ता विथ ब्रॉक्कोली

बोलोन्यातल्या वास्तव्यात कॅन्टीनमध्ये जवळजवळ रोज पास्ता खाल्ला जातो. शाकाहारी तसेच मांसाहारी, अनेक वेगवेगळे पास्त्याचे प्रकार खाल्ले आणि पाहिले जातात. मी फक्त खाण्यापुरती नॉन व्हेज आहे, बनवण्याची वेळ आली की व्हेज :). त्यामुळे बाहेर खाल्लेल्यात माझं विशेष लक्ष शाकाहारी पदार्थांकडे असतं. त्यातून कुठला शाकाहारी पदार्थ खूप आवडला, आणि मुख्य म्हणजे बनवायला सोपा आहे असं वाटलं की मी तो घरी करतेच.
तर असंच या 'पास्ता कॉन ब्रॉक्कोलीचं' झालं. कँटीन मध्ये केला जाणारा हा पास्ता पाहून मी घरी केला...आणि अगदी तसाच मस्त झाला चवीला. त्याची कृती देत आहे. करायला अर्धा तास खूप झाला.

साहित्य आणि प्रमाण (एका माणसा पुरतं देत आहे):
ब्रॉक्कोली: साधारण ३ इंच व्यासाचं फूल(?), एक इंचाचे तुकडे करून
लाल सिमला मिरची : मध्यम आकाराची अर्धी, बारीक चिरून
पास्ता : मूठ भर ('पेन्ने' प्रकारचा घेतला मी)
लसूणः २ मोठ्या पाकळ्या चिरून
तेलः २ चमचे सन फ्लॉवर(किंवा तत्सम कोणतही, फोडणीसाठी), २-३ चमचे ऑलिव
मीठः चवीनुसार
पाणी: लागेल तसं

कृती:

सॉस बनवणे आणि पास्ता उकळणे या दोन गोष्टी दोन बर्नर असल्यास एका वेळी करू शकतो. नाहितर सॉस आधी करा आणि मग पास्ता उकळा.

सॉसः
एका पॅनमध्ये २ चमचे सन फ्लॉवर तेल तापवा. त्यात चिरलेली लसूण आणि चिरलेली सिमला मिरची घाला. थोडं परतून मग ब्रॉक्कोलीचे तुकडे घाला. सगळं ढवळा आणि मग त्यावर २-३ चमचे ऑलिव तेल घाला. मग पॅन झाका. १ मिनिटानंतर उघडून पहा. जर मिश्रण कोरडं झालं असेल तर पाण्याचा एक हबका मारा. मीठ घाला आणि परत झाका. ४-५ मिनिटात हे मिश्रण मंद आचेवर शिजतं. ब्रॉक्कोलीचे तुकडे थोडं दाबल्यावर मोडले पाहिजेत, पण अगदी पीठ व्हायला नको ! पुरेसं शिजलं की मिश्रण गॅस बंद करून झाकून ठेवा.

पास्ता:
एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा (पास्ता व्यवस्थित बुडेल एवढं तरी हवंच :)). उकळी आली की त्यात मीठ घाला आणि पास्ता टाका.
अधून मधून लागलं तर (चिकटायला लागला पास्ता तर) ढवळा. ७-८ मिनिटांनी पास्त्याचा तुकडा काढून हवा तेवढा शिजला का ते पहा. मला मऊ आवडतो त्यामुळे १०-१२ मिनिटं तरी लागतात शिजायला (पास्त्याच्या प्रकारावरही अवलंबून आहे, मी पेन्ने पास्ता घेतला होता).

पास्त्यातले पाणी गाळून टाका आणि तो सॉस मध्ये मिसळा. हे मिश्रण ०.५-१ मिनिट मंद आचेवर ठेवा आणि मग गॅस बंद करून तयार 'पास्ता कॉन ब्रॉक्कोली' थेट प्लेटमध्ये घ्या. वाफाळता खायला मजा येते. मी फोटो काढण्यापुरता कसाबसा धीर धरला.

टीपः शिंपले किंवा फुलपाखराच्या आकाराचा पास्ता कँटीनमध्ये या ब्रॉक्कोली सॉस बरोबर वापरतात. माझ्याकडे फक्त पेन्ने पास्ता होता, त्यामुळे तो वापरून मी हा प्रकार केला.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्त! छान दिसतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भूक लागली. विशेषतः फोटोतली वाफ पाहून.

पास्ता शिजल्यानंतर गाळून घेतलेला बरा असतो, त्यावर मेणचट काहीतरी पदार्थ असतो. तो चवीला कसातरीच लागतो. पास्ता एकमेकांना चिकटू नये म्हणून वरून थोडं ऑलिव्ह तेल घातलेलं उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणि एवढे सगळे करून ('चकली हसली' या चालीवर) पास्ता फसला तर तिळगूळ ब्याक् अप् म्हणून ठेवावा काय ? Wink

(पास्ता शिजल्यावर आणि पाणी काढून टाकल्यावर तसाच गरम ठेवला तर एकमेकांस चिकटू शकतो. ते टाळण्यासाठी त्यावर लगेच थण्ड पाणी ओतावे अशी एक टीप एका इतालीच्या मैत्रीणीने दिल्याचे आठवते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो...ब्याक अप असलेला बरा म्हणीन...मी फक्त सोप्या न फसणार्या पाककृती करते आहे त्यामुळे संक्रांतीपासून ब्याकअप तसाच पडून आहे :). ही पाककृती मला जमली म्हणजे कोणालाही जमू शकेल वाटतं.
एका बर्यापैकी पाककुशल इतालियन मैत्रीणीची फसलेली न्योक्की पाहिली आहे. तसं काही करायला घेतलं (माझ्यासारख्या नवख्यांनी) तर बॅकअप हवा.

शिजलेला पास्ता गाळण्यानीच पाण्यातून काढून सरळ सॉसमध्ये घालते. त्यामुळे चिकटण्याची वेळ आली नाहीये. सॉस मधल्या तेलानी तो सुटासुटा रहातो. नाहीतर ३_१४वि.अदिती सुचवत्ये त्याप्रमाणे तेल घालावं. थंड पाण्याची टीपही उपयोगी पडेल कुणाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या इटालियन मैत्रिणीकडून न्योक्कीची चांगली कृति घेता येईल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच!!

बाकी शेजारच्या तिळगूळाचे प्रयोजन काही समजले नाही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

:).
फोटो काढला तेव्हा त्यात पास्त्या व्यतिरिक्त काय आलय हे पाहिलच नाही....इथे देताना नंतर सगळं दिसलं. पण फोटोचा आस्पेक्ट रेशिओ बदलेल म्हणून कातरलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पास्ता शिजवताना केवळ गरम पाण्यात न घालता चांगल्या उकळत्या पाण्यात घालून एकदा ढवळायला हवा. तसे न केल्यास, पास्ता बनवताना(लाटताना) त्याला लागलेले कोरडे पीठ भांड्याच्या तळाशी चिकटते, परिणामी पास्ता भांड्याला/एकमेकांना चिकटतो. पास्ता उकळत्या पाण्यात घातल्यावर झाकण न ठेवता शिजवावा.

पास्ता सहसा 'अल् डेन्टे' शिजवण्याचा(सर्वसाधारण ८-९ मिनीटे. बर्‍याचदा कितीवेळ शिजवावा त्याचे पाकिटावर कोष्टक असते.) प्रघात आहे. तसा शिजवलेला पास्ताही चिकटत नाही. अर्थात मऊ शिजवलेला आवडत असेल, तर थंड पाणी अथवा तेलाचा प्रयोग करावा लागतो. 'अल् डेन्टे' म्हणजे टचटचीत नव्हे, पण मऊही नव्हे असा शिजवलेला पदार्थ. आपल्याकडे सिनियर गृहिणी, जशा डाळींब्या शिजवायला सांगून नवीन सुनेची परिक्षा घेतात आणि वर ऐकवतात, "डाळींब्या शिजवताना एकही डाळींबी मोडायला किंवा बोटचेपीही व्हायला नको, पण एकही डाळींबी कच्चीही रहायला नको!" तसा. अशा शिजवलेल्या पास्त्याची 'ग्लायसेमीक इंडेक्स' कमी असते.

आवडत असल्यास विकतचे पास्ता सॉसही भरीला घालता येतील. केव्हातरी घाईच्या वेळी, फ्रोजन मिक्स् व्हेजटेबल्स घालूनही पास्ता चांगला होतो. आवडत असल्यास ताजे, बाटलीतले ऑलिव्ह पण घालता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थँक्स सानिया. इथे 'अल् डेन्टे' असतो पास्ता...पण मी घरी करताना त्यापेक्षा थोडा मऊ करते. 'ग्लायसेमीक इंडेक्स' माहित नाही काय आहे. गुगलून पाहीन.
मला ही रेसीपी त्याच्या चवीमुळे आणि त्यात लागणार्या अगदी कमी साहित्यामुळे भावली. आवडीनुसार यात भर घालता येईल...जसे चिली फ्लेक्स/मिरपूड, चीज पूड वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेस्टॉरंटमध्ये मिळणार्‍या इटॅलियन गोष्टींमध्ये हमखास टोमॅटो असतोच. त्यावरून असा प्रश्न पडत असे की १५व्या-१६व्या शतकात दक्षिण अमेरिकेतून टोमॅटो 'जुन्या जगा'त येण्यापूर्वी इटलीत लोक काय खात असतील? आता कळले की टोमॅटो सॉसशिवायहि इटॅलियन गोष्ट बनू शकते!

एकच अडाणी प्रश्न. वरच्या कृतीत कसलाच मसाला वा herb वा चीज नाही. हे कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चीज एक वेळ वरून भुरभुरू शकतो किंवा आरोग्यासाठी टाळूही करू शकतो पण सलूण सोडून कुठलाच मसाला नाही हे थोडे मलाही खटकले. किमानपक्षी शेवटी मिरे तरी हवेच.
मी तेलावर ओरेगानो किंवा थाईम टाकतो. टोमॅटो-लसूण-ओरेगानो एकत्र शिजताना विशेषतः ओरेगानोमुळे एकदम तजेला देणारा गन्ध येतो.
हा टोमॅटो आणि ओरेगानो वापरून केलेला पेन्ने पास्ता -

ओरेगानोची छोटी पाने जवळून -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरेच टोमॅटो शिवाय करता येण्यासारखे सॉस आहेत...(मला हे इथे राहिल्यावरच कळलं). जसे गोर्गोंझोला चीज, साल्मन, इंक वगैरे घालून केलेले पास्ता टोमॅटो शिवाय असतात. इथे काही लोक नुसता उकळलेला पास्ता, वरून मीठ आणि चीज पूड घालून, खातात.

मसाला किंवा हर्ब न घालता झाला खरा हा पास्ता...पण इटालियन्स यावर चीज पूड घालूनच खातील. मला आवडतो असाच साधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! चीजचे कष्ट (कष्टाचं चीज नव्हे Wink ) न घेता केलेला झटपट मामला आवडला.

मी "व्हाईट सॉस" पंथीय असल्याने त्याचा गोळा घरी अनेकदा बनवून ठेवतो. फ्रिझरमध्ये ४-५ दिवस सहज टिकतो. जेव्हा पास्ता खावासा वाटेल तेव्हा हवा तो पस्ता + भाज्या वाफवाव्यात त्यात तो सॉस टाकून परतावे की पास्ता तय्यार हा मार्ग मी वापरतो. त्या मनाने तुमचा पास्ता अधिक झटपट आहे.

अवांतरः व्हाईट सॉसमध्ये पालक उकडून+पेस्ट बनवून टाकावा आणि पास्त्यात वाफवलेले मका-दाणे घालून बघा.. छान मजा येते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"मी "व्हाईट सॉस" पंथीय असल्याने त्याचा गोळा घरी अनेकदा बनवून ठेवतो. "
याची कृती द्यावी अशी विनंती आहे. फक्त बाजारात तयार मिळणारे टिकाऊ सॉस वापरले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हाईट सॉसच्या अनेक पाककृती आहेत पण अजिबात गुठळ्या न होता चविष्ट सॉस बनण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. मी अनेक वर्षे हीच पाकृ वापरते आहे.

थोडे मश्रूम्स लोण्यावर भाजून त्यात चवीला मीठ-मिरपूड घालून ते वरील सॉसमध्ये मिसळले आणि त्यात पास्ता घोळला की त्याचाच 'पास्ता अल् फंगी' तयार होतो. पार्मेसान चीझचे शेव्हिंग्ज आणि चिरलेली पार्स्ली बहुतेक सगळ्या पास्ता प्रकारांवर पसरल्यास चव वाढते.

बेसिल्-पाईन नट्सचा पेस्तो (घरी बनवल्यास चांगला पण चांगल्या प्रतीचा विकतही मिळेल, विशेषतः इटलीत!) गरम पास्त्यात मिसळला आणि त्यात हव्या त्या भाज्या ऑलिव्ह ऑईल मध्ये परतून घातल्यास कमी वेळात छान जेवण बनवता येते. मी दर आठवड्याला एक बाटलीभरून पेस्तो बनवून ठेवते, तो सँडविचला लावायलाही उपयोगी पडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा.. आता वेगळी पाकृ द्यायला नको.. मी ही असेच थंड दूध तेही तीन टप्प्यात (कधी चार टप्प्यातही - फ्लेमच्या अंदाजाने) घालतो.
एकदा वापरून झाले की उर्वरीत सॉस फ्रीझरमध्ये टाकतो(त्याचा गोळा होतो).
बाहेरच ठेवल्यास चालेल काय? (चीज असल्याने भारतीय हवेत बाहेर ठेवावा की नाही?)

बाकी वरील विडीयोत मिरपूड घातल्यानंतर आणि चीज घालायच्या आधी काहितरी चिमुटभर घातले ते काय आहे? नीट उच्चार समजला नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चिमुटभर जायफळाची पूड घातली आहे, मीही ती नेहमी घालते, स्वाद छान येतो. मी हा सॉस बहुदा ताजाच बनवते पण राहिलाच तर फ्रीजमधे एक-दोन दिवस टिकू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिरपूड घातली नाही तर भेसळ केलेली बासुंदीच आहे की ही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थँक्स रूची आणि ऋषिकेश. एकदा बनवून पाहीन असा सॉस...बनवायला वेळ किती लागतो साधारण? व्हिडियो मध्ये २ मिनटात बनल्यासारखा वाटला :).
इथे एका मैत्रीणीने 'पान्ना' म्हणून एक क्रीम सारखं काही मिळतं तयार ते व्हाइट सॉस करता वापरायला सांगितलं. ते एकदा ट्राय केलं...पण आपण व्हाइट सॉस पंथीय नाही बहुतेक असं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मी "व्हाईट सॉस" पंथीय असल्याने त्याचा गोळा घरी अनेकदा बनवून ठेवतो. फ्रिझरमध्ये ४-५ दिवस सहज टिकतो. जेव्हा पास्ता खावासा वाटेल तेव्हा हवा तो पस्ता + भाज्या वाफवाव्यात त्यात तो सॉस टाकून परतावे की पास्ता तय्यार हा मार्ग मी वापरतो.<<

व्हाईट सॉसविषयी फार प्रेम नसल्यामुळे मी अनेकदा घरी ताजा टोमॅटो सॉस बनवून त्यात पास्ता बनवतो. हा सॉसदेखील असा बनवून काही दिवस टिकवता येतो. त्याची कृती अशी -

चिरलेला लसूण ऑलिव्ह तेलावर गुलाबी करून घ्या. (लसूण आवडीनुसार कमीअधिक घालावा.) मग त्यात अख्खे टोमॅटो घाला. जोवर त्यांची शिजून एकजीव पेस्ट होत नाही तोवर ते (पावभाजी करत असल्यासारखे) ठेचत ठेचत परता (झाकण न ठेवता, कारण त्यांतलं पाणी उडून जायला हवं.). एकीकडे हे होत असताना चिरलेला कांदा ऑलिव्ह तेलावर गुलाबी परतून घ्या. टोमॅटोची पेस्ट सॉससारखी घट्ट झाली की गॅस बंद करा. त्यात परतलेला कांदा घाला. असेल तर थोडं बेसिल (किंवा इतर गवत आवडीनुसार*) घाला.

* - ओरेगानोसारखं गवत घातलं तर शिजताना शेवटच्या पाच मिनिटांत घाला. मग त्याचा स्वाद अधिक चांगला उतरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वा! मलाही हा सॉस आवडतो. मी फक्त टोमॅटोची प्युरी करून ठेवली होती. बाकी सगळं ऐनवेळी करते. असही करून ऐनवेळी करायच्या गोष्टी कमी करता येतील.
अमुकनी जवळजवळ अशाच सॉस मधल्या पास्त्याचा सुंदर फोटो दिला आहे.

या सॉस मध्ये ऑलिव्ज (काळे/हिरवे), बाकीचा सॉस परतून तयार झाल्यावर, घालून मस्त लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0