अ‍ॅन्ड्रॉईडः अडखळती पहिली पाऊले

गूगल ने विकत घेतल्यानंतरही अ‍ॅन्ड्रॉईडचे मुख्य ध्येय तेच होते - एक असा प्लॅटफॉर्म जो कोणत्याही software इंजिनीअर ला मुक्तपणे त्याला हवा तसा वापरता येईल. त्यामागे अजून एक उद्देश हाही होता की अशी खुली बाजारपेठ उपलब्ध करून देऊन सेलफोन कंपन्यांची हुकुमशाही मोडीत काढणे. तो पर्यंत अमेरिकेत सेलफोन सेवादाते त्यांना हवे तसे फोन हँड्सेट निर्मात्यांकडून बनवून घेत होते. ह्याला कारण म्हणजे अमेरिकीतील कंत्राट पद्धत. तुम्ही तुमच्या सेवादात्याबरोबर २ वर्षे बांधिलकीच्या कंत्राटावर सही करायची आणि त्या बदल्यात तो सेवादाता तुम्हाला फुकट अथवा नगण्य किमतीत हँड्सेट देणार. ह्यामुळे लोक पूर्ण पैसे देऊन हँड्सेट विकत घेणे जवळपास बंदच झाले आणि मग हँड्सेट निर्मात्यांकडे आपले हँड्सेट विकण्याचा एकुलता एक मार्ग उरला तो म्हणजे ह्या कंपन्यांची मनमानी सहन करणे. गुगलचा आणि अ‍ॅन्डीचा असा होरा होता की जेव्हा प्रतिभाशाली software developersना असा शक्तिशाली प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल तेव्हा विविध apps निर्माण होतील आणि मग एकदा की ही apps आणि त्यांची उपयुक्तता लोकांना पटली की मग सेलफोन कंपन्या देतील ते गोड मानून न घेता ग्राहकाला त्याला हवे ते software वापरणे शक्य होईल.

अ‍ॅन्ड्रॉईड येण्याआधी बाजारात मायक्रोसॉफ्ट ची विंडोज ची मॊबाईल आवृत्ती होती पण मायक्रोसॉफ्ट हँड्सेट बनवणाऱ्या कंपन्यांना ती वापरण्यासाठी लायसन्स फी भरायला लावत असे. गूगलने मात्र वेगळाच मार्ग अवलंबला. गूगल ने ठरवले की अ‍ॅन्ड्रॉईड कोणालाही फुकट वापरू देत. आपण आपल्या (गूगलच्या) बाकीच्या उत्पादनांप्रमाणेच आपले उत्पन्न जाहिरातींमधून मिळवू. हँड्सेट वापरकर्त्याच्या आवडी निवडी आपल्याला आधीपासूनच माहित असणार, (कारण गूगल वर तुम्ही जे सर्च करता ती सगळी माहिती गूगल साठवून ठेवते), त्याला लोकेशन च्या माहितीची जोड मिळाली की मग अधिक अचूक आणि नेमक्या जाहिराती ग्राहकाला दाखवता येतील व ह्या नेमक्या जाहिरातींमधून आपल्याला पैसे मिळवता येतील.

अ‍ॅन्ड्रॉईड विकत घेतल्यानंतर गूगल ने २००५ ते २००७ या काळात त्याबाबत काहीच भाष्य केले नाही पण बऱ्याच जणांना गूगल मोबाइल क्षेत्रात काहीतरी करत आहे अशी काहीशी कुणकूण लागलीच होती. २००६ च्या डिसेंबर मध्ये बीबीसी आणि वॉल स्ट्रीट जर्नल च्या सूत्रांनी गूगल त्यांची सर्च आणि इतर apps ची मोबाईलसाठीची आवृत्ती लिहायला लागल्याचे सांगितले तर छापील माध्यमांनीही गूगल आपला स्वत:चा फोन बाजारात आणणार असल्याची शक्यता व्यक्त केली.

iphone
पहिला आय फोन

जरी गूगलने अधिकृतरित्या कोणत्याच वृत्ताला दुजोरा दिला नसला तरी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी सुरू होत्या. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या अभियंत्यांनी मिळून सूरू केलेल्या अ‍ॅन्ड्रॉईड वर १०० एक लोक काम करत होते. गूगल ने LG ह्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील दादा कंपनीबरोबर पहिलावहिला अँड्रॉईड हँड्सेट आणण्याबाबत बोलणी सुरू केली होती. LG ने आधीच आपला LG Prada हा त्यांची स्वतःची प्रणाली असलेला टच स्क्रीन फोन १२ डिसेंबर, २००६ मधे बाजारात आणला होता. आणि आपली टच स्क्रीन बनवण्याची क्षमता दाखवून दिली होती.

२००७ च्या मध्यावर मात्र ही बोलणी फिस्कटली आणि LG ने आपले अंग काढून घेतले. ह्या बसलेल्या धक्क्याने डगमगून न जाता अ‍ॅन्डी ने HTC ह्या तेव्हा फारश्या कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या कंपनीबरोबर बोलणी सुरू केली. HTC तोपर्यंत विन्डोज प्रणाली असलेले हँड्सेट बनवत होती. T-mobile ह्या GSM सेलफोन सेवादात्याबरोबर बोलणी करून फोनसाठीचे plans निश्चीत केले, आणि QualComm Inc. ह्या कंपनीला micro processor पुरवण्याचे कंत्राट दिले.

हे सगळे होईपर्यंत अ‍ॅपलने आपला पहिला iPhone बाजारात आणला देखील होता. दिवस होता २९ जून, २००७.त्यानंतर तब्बल ४ महिन्यांहून अधिक काळानंतर, ५ नोव्हेंबर, २००७ रोजी गूगल ने Open Handset Alliance ह्या खुल्या मोबाईल बाजारपेठेसाठी मानके निश्चीत करणार्‍या संघटनेच्या (जो गूगल, HTC, LG, Samsung, व ३० इतर बड्या कंपन्यांनी एकत्र येऊन बनवला होता) घोषणेबरोबरच अ‍ॅन्ड्रॉईडबाबत पहिल्यांदा अधिकृत घोषणा केली. ह्या सर्व कंपन्यांनी हे जाणले होते की जगात जवळपास ३०० कोटी मोबाईल वापरकर्ते आहेत परंतु प्रत्येक कंपनी आपली वेगळी प्रणाली वापरत असल्याकारणे ह्या सर्वांना वापरता येईल अशी apps लिहीणे अशक्य आहे. त्यामुळे ह्या संघटनेने अ‍ॅन्ड्रॉईडला आपला standard platform मानून त्यावर apps लिहीण्याचे निश्चीत केले. ह्याने अ‍ॅन्ड्रॉईडला आणि ह्या सर्व कंपन्यांनाही फायदा होणार होता.

नोकिया आणि मायक्रोसॉफ्टने तर अ‍ॅन्ड्रॉईड कडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. नोकियाने म्हटले: "आम्हाला ह्यापासून काही भिती आहे असे वाटत नाही". मायक्रोसॉफ्टने म्हटले: "आम्हाला कळत नाही हे कितीसा ठसा उमटवणार आहेत". मायक्रोसॉफ्टचा सीईओ स्टीव्ह बामर ने तर हसत OHA ची हसत खिल्ली उडवली होती. "आमच्याकडे आधीच लाखोंनी ग्राहक आहेत. त्यांचे (अ‍ॅन्ड्रॉईडचे) आमच्या जगात स्वागत आहे." (आज ५ वर्षांत परिस्थिती ही आहे की विन्डोज फोन ४थ्या स्थानावर फेकले गेले आहेत आणि अवघा ४ एक टक्के हिश्श्यावर कसे बसे तग धरून आहेत.)


ह्या घोषणेनंतरही सर्वसामान्य लोकांच्या हाती पहिला अ‍ॅन्ड्रॉईड फोन येण्यासाठी मात्र जवळपास वर्ष जावे लागले. २२ ऑक्टोबर, २००८ ला HTC ह्या कंपनीने G1 ज्यालाच HTC Dream असेही म्हटले जाते हा फोन बाजारात आणला.
ह्या फोनबाबत समीक्षकांचे मत फारसे अनुकूल मत नसले तरी हँड्सेट निर्मात्यांना आणि सेल्युलर सेवादात्यांना मात्र ह्या फोन ने भुरळ घातली आणि ते अ‍ॅन्डीला भेटण्यास स्वतःहून तयार झाले.

पण अ‍ॅन्ड्रॉईडचा प्रवास सोपा नव्हता. हा फोन येईपर्यंत iPhone ने बरीचशी बाजारपेठ काबीज केली होती आणि नोकिया आणि मायक्रोसॉफ्ट हे दोघे अजूनही एकूण वापरकर्त्यांचा बर्‍यापैकी हिस्सा राखून होते.

तसेच iPhone च्या तुलनेत G1 दिसण्याच्या बाबतीत म्हणजे मर्सेडिज समोर आपली मारुती दिसावी तसा होता. पण गूगलच्या इतर सर्वच उत्पादनांप्रमाणेच ही फक्त सुरूवात होती. दिखाव्यावर भर देण्यापेक्षा उपयुक्ततेवर पहिले लक्ष दिले होते.

G1 हा फोन software developers मधे मात्र बराच लोकप्रिय झाला. याचे एक मुख्य कारण म्हणजे rooting. अ‍ॅन्ड्रोईडचा पाया आहे Linux Kernel(एक ऑपरेटिंग सिस्टम). ह्या लिनक्स मधे root म्हणजे अ‍ॅड्मिन. एकदा का तुम्ही root म्हणून लॉग-इन करू शकलात की तुम्हाला अक्षरशः वाट्टेल ते करता येते. ह्या फोन मधे तुम्हाला root म्हणून लॉग-इन करून (तुम्हाला ह्या फोनच्या operating system च्या मुळाशी जाऊन पूर्ण operating system च बदलता येणे शक्य होते. अ‍ॅन्ड्रॉईड open source असल्या कारणाने बर्‍याच software developers नी पूर्ण सोर्स कोड उतरवून घेऊन त्यात हवा तसा बदल करून आपले स्वतःचे ROM (अशी बदलेली अ‍ॅन्ड्रॉईडचे पूर्ण पॅकेज) बनवले आणि इतरांनाही वापरायला दिले.अ‍ॅन्ड्रॉईड व्हर्जन १.०.

अ‍ॅन्ड्रॉईड Power Bar Widget

G1 हा फोन वापरत होता अ‍ॅन्ड्रॉईड चे व्हर्जन १.०. यात बर्‍याचशा गोष्टी नव्हत्या ज्यांच्याविना आपण आज स्मार्ट्फोनची कल्पनाही करू शकत नाही. उदा. On screen Keyboard, pinch to zoom (दोन बोटे स्क्रीनवर ठेवून झूमइन/ झूम आउट करणे), multi touch, apps विकत घेण्याची सुविधा. पण काहीही झाले तरी एक भरभक्कम पाया मात्र तयार होता. पण अ‍ॅन्ड्रॉईड्ने या पहिल्याच व्हर्जन पासून काही अतिशय चांगल्या गोष्टी अतिशय उत्तमपणे implement केल्या. सर्वात महत्त्वाच्या काही म्हणजे

 1. Pull Down Notification: तुम्ही अ‍ॅन्ड्रॉइड फोनच्या स्क्रीनच्या अगदी वरती स्पर्श करून खाली खेचल्यासारखे बोट फिरवलेत की जो नुकत्याच घडलेल्या गोष्टींची यादी असलेला स्क्रीन दिसतो तो. अ‍ॅपलला iOS मधे हे करायला तीन वर्षे लागली
 2. Widgets:अजून एक वैशिष्ट्य जे अ‍ॅपलच्या iOS मधे अजूनही नाही आहे. बाजूच्या फोटोमधे घड्याळ दिसते आहे ते एक अगदी साधे widget आहे. पण Widgets ही अतिशय उपयुक्त ठरू शकतात. उदा. power bar हे widget तुम्हाला सेटिंग्स मधे ना जाता एका टॅप मधे तुमचे wifi, bluetooth, GPS, screen brightness बदलू देते. पहिल्या व्हर्जन मधे एकच असलेली त्रुटी म्हणजे अद्यापही developers ना त्यांची स्वत:ची widgets बनवून android market मधे वितरीत करणे शक्य नव्हते.
 3. Gmail: आत्तापर्यंत चांगल्याच लोकप्रिय झालेल्या gmail चे android इतके चांगले अ‍ॅप कोणत्याच दुसर्‍या प्लॅट्फॉर्म वर नव्हते. बाकीच्या फोन्स वर मेल वाचणे वगैरे शक्य होते पण gmail ची खास लेबल, आर्काईव्ह वगैरे फीचर्स मोबाईल मधे मात्र फक्त android app वरच उपलब्ध होती.


जरी अधिकृत रित्या म्हटले नसले तरी हे Beta व्हर्जन होते, ज्यात काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे चालत नाहीत/ मधेच बंद पडतात. पण गूगलच्या इतिहासाप्रमाणेच ४ महिन्यांच्या आतच, फेब्रुवारी २००९ मधे गूगलने अ‍ॅन्ड्रोईड्चे पहिले व्हर्जन अपडेट, १.१ Over The Air वितरीत केले. Over The Air म्हणजे तुमचा फोन अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या संगणकाला जोडण्याची गरज नसते तर फोन स्वतःच पॅकेज install करू शकतो. ही सुविधा देणारा अ‍ॅन्ड्रॉईड हा पहिला "मोठा प्लॅटफॉर्म" होता. हीच सुविधा देण्यासाठी अ‍ॅपल iOS ला नोव्हेंबर २०११ - तब्बल साडेचार वर्ष - iOS ५ पर्यंत वाट बघावी लागली. वर मोठा प्लॅट्फॉर्म अधोरेखित अशासाठी केले आहे की हा OTA updates करू शकणारा पहिला फोन नव्हता. पहिला “मोठा” प्लॅटफॉर्म (operating system म्हणा हवं तर) होता. पहिला फोन होता Danger OS वापरणारा अ‍ॅन्डीनेच बनवलेला साईडकिक. तर हे १.१ म्हणजे बहुतांशपणे १.० मधे असलेल्या त्रुटी सुधारण्यासाठी (बग फिक्सेस) वितरीत केलेले होते.

त्यानंतर तीन महिन्यांच्या आतच गूगलने १.५ हे अपडेट वितरीत केले. ह्याच अपडेटपासून सुरू झाला प्रत्येक मोठ्या अपडेटला कोणत्यातरी गोड पदार्थाचे (dessert) नाव देण्याचा सिलसिला. १.५ हे तांत्रिकदृष्ट्या अ‍ॅन्ड्रॉईड्चे तिसरे व्हर्जन असल्याने त्याचे तिसर्‍या इंग्रजी अक्षरापासून सुरू होणारे Cup Cake हे होते.

ह्या वितरणामधे मात्र वापरकर्त्याला दिसण्यार्‍या अगदी छोट्याछोट्या गोष्टींवर (user interface) काम केले गेले होते.

उदा. खालील दोन चित्रे


अ‍ॅन्ड्रॉईड १.१

अ‍ॅन्ड्रॉईड १.५

Android Keyboard

पण ह्यापेक्षाही महत्त्वाच्या भरपूर नवनवीन गोष्टी ही होत्या ज्या अ‍ॅन्ड्रॉईडला इतरांपासून वेगळे ठरवण्यास कारणीभूत झाल्या आणि त्यातल्या काही आजही फक्त आणि फक्त अ‍ॅन्ड्रॉईडमधेच पाहायला मिळतात.

 1. Extensible On Screen Keyboard: खरे तर G1 ला असणार्‍या physical की-बोर्ड ची गरज नव्हती. पण तेव्हा अ‍ॅन्ड्रॉईडचा On Screen Keyboard बहुधा तयार नसावा. त्यामुळे ६ महिने थांबण्याऐवजी गूगलने खर्‍याखुर्‍या की बोर्डसहित G1 वितरीत केला. गूगलने नुसताच हा कीबोर्ड वितरीत न करता त्याबरोबरच लोकांना/ software developers स्वतःचे हवे तसे की बोर्ड बनवण्यासाठीच्या सुविधाही दिल्या (Extensible/ Custom Keyboards). हे वैशिष्ट्य आजही अ‍ॅन्ड्रोईडला इतर मोबाईल Operating Systemsपासून वेगळे ठरवते. पहिला कीबोर्ड विरहीत अ‍ॅन्ड्रॉईड फोन होता HTC Magic/ myTouch 3G
 2. Extensible Widgets: उपयुक्तता वर लिहिलीच आहे. आता developers ना स्वत:ची widgets android market मध्ये वितरीत करता येणार होती.

या व्यतिरिक्त अजूनही भरपूर नवनवीन फीचर्स होते ज्यांच्या शिवाय आज आपण स्मार्ट फोनची कल्पनाही करू शकत नाही.HTC Magic/ myTouch 3G

Motorola Droid

याच सुमारास अमेरिकेतील बडी सेल्युलर कंपनी व्हरायझन (Verizon) ने अ‍ॅन्डीशी बोलणी करायला सुरुवात केली होती. आत्तापर्यंत फक्त HTC चेच Android फोन बाजारात होते. व्हरायझनचा प्लॅन होता android वापरून एक मोटोरोलाचा फोन एका प्रचंड मोठ्या मार्केटिंग कॅम्पेनसह बाजारात आणायचा.

या फोनचे नाव ठेवले गेले Droid.
ऑक्टोबर २००९ मधे Droid बाजारात आले आणि Android ला पहिल्यांदा मोठ्ठ्या यशाची चव चाखायला मिळाली.

क्रमशः

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

लेखमाला उत्तम चालु आहे. वाचतो आहोत. आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उत्तम लेखांक. वाचते आहे.

याच्या जोडीला नोकीया, मायक्रोसॉफ्ट, ब्लॅकबेरी मागे का पडले, त्यांनी काय प्रयत्न केले इ. वाचायलाही आवडेल.

हा पहिल्या भागाचा दुवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

असेच म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचतो आहे. ज्ञानात काही भर पडते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

छान लेखमाला. पुभाप्र.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुढील भाग कधी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी याबाबत ऐकीव विस्कळीत माहिती होती. ती इतक्या सुसूत्रपणे आणि विस्ताराने दिल्याबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.