थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्‍या महायुद्धातील एक पान --अंक २

भाग १
पुजालोच्या खाजगी आयुष्याबद्दलः-
त्याने शाळा अर्धवट सोडली होती. अनेक लहानमोठी कामे तो शिकला होता. कधी हार्डवेअरच्या दुकानात काम कर तर कधी पोल्ट्री फार्म शिक असे त्याचे सुरु होते. वडलांनी मागे थोडिफार संपत्ती सोडली होती. पण स्पॅनिश युद्धादरम्यानच्या काळात तिथल्या कामगारांनी ताब्यात घेतली.
स्पॅनिश यादवी युद्धात एका बाजूला इटाली- नाझी समर्थित फॅसिस्ट गट होता, तर दुसरीकडे रशिया समर्थित कम्युनिस्ट होते. दोन्ही बाजूकडून त्याला हीन वागणूक मिळाली, कुणी त्याच्या कुतुंबियांचा छळ केला तर कुनाची विचारसरनी त्याला पटेना; म्हणून तो दोन्ही पक्षांवर वैतागला होता. त्याने दोन्ही बाजूकडून एकेकदा काम केले होते, पण अर्थातच एकही गोळी त्याने कधी कोणत्याही बाजूकडून झाडली नाही.
.
.
१९४० दरम्यान त्याला हेरगिरी करण्याची संधी त्याने स्वतःहून मागनी करुनही(बहुदा त्यामुळेच) ब्रिटनने दिली नाही. पण मग त्याने ब्रिटनला कार्यालयीन कामासाठी जाउ-येउ शकणारा "कट्टर नाझी समर्थक" असा स्पेन सरकारचा अधिकारी म्हणून एक धादांत खोटी ओळख तयार केली.पोर्तुगालमधील स्पेनिश दूतावास्त काम करत असल्याची बतावणी करुन त्याने खास स्पॅनिश राजदूतांसाठीचा पासपोर्टही बनवला. "फ्रेडरिको" टोपणनाव असणार्‍या जर्मन गुप्तचरास त्याने गाठले; भुलवले. जर्मनांनी मग त्यास हेरगिरीचा क्रॅश कोर्स चे प्रशिक्षण दिले. संकेतलेखन/गुप्त लेखन(secret writing), अदृश्य शाई , संकेत पुस्तिका(code book) आणि खर्चायला ६०० पाउंड ह्याचा त्या कोर्समध्ये समावेश होता. त्याला अराबेल हे टोपणनाव जर्मनांनी दिले.
त्यास आता ब्रिटनला जाउन इतर हेरांची भरती करण्यास सांगण्यात आले. पण तो ( पोर्तुगालची राजधानी) लिस्बन इथे गेला. तिथून त्याने चक्क सार्वजनिकरित्या सहज उपलब्ध असणार्या स्रोतातून माहिती घेत खरे रिपोर्ट म्हणून विश्वास बसावेत इतके कैक खोटे रिपोर्ट खुशाल बनवले.इंग्लंडचे टुरिस्ट गाइड, रेल्वे वेळापत्रक, चित्रपट रिळे आणि अगदि मासिकातील जाहिरातीही त्याने ह्यासाठी वापरल्या.ब्रिटन फिरत असल्याचा त्याने बहाणा केला. ब्रिटिश रेल्वे गाइड वापरत त्याने फिरण्याचा खर्चही मागितला! ब्रिटनमधील गणनपद्धती त्याला धड समजत नसे.(त्याकाळात इंटरनेट नव्हते, मदतीला "गूगलबाबा"ही नव्हते. जिंदगी लैच अवघड होती.) पण मग त्याने कुठे कुठे गेलो हे फक्त सांगण्यास सुरुवात केली व सर्व खर्चाची एकूण गोळाबेरीज नंतर पाठवतो असे तो सांगत राहिला. त्याचे काल्पनिक, अस्तित्वात नसलेले गुप्तचर ब्रिटनभर पसरलेले होते. अर्थात तो कधीच यू के मध्ये गेला नसल्याने त्याने काही चुकाही रिपोर्ट मध्ये केल्या. पण रिपोर्ट मधील इतर तपशील इतके चपखल बसत होते, की ह्या चुकाही ढकून गेल्या.(ग्लासगो , स्कॉटलंडमधील एक एजंट वाइनवेडा अस्लयाचे त्याने रिपोर्ट मध्ये लिहिले. प्रत्यक्षात स्कॉटलंडच्या पेयपानाच्या सवयीत वाइनचे स्थान फार वरती नाही.)
.
अमेरिका युद्धात उतरल्यावर ,१९४२ मध्ये त्याने अमेरिकेशीही संपर्क केला. लेफ्टनंट डिमोरेस्ट ह्यांनी ह्या पठ्ठ्याची क्षमता ओळखली व आपल्या ब्रिटनच्या सहकार्‍यांकडे त्याची शिफारस केली. एकदा पुजोलच्या रिपोर्ट च्या आधारे अस्तित्वातच नसलेल्या , नुसताच बागुलबुवा केलेल्या ब्रिटनच्या काही नाविक तुकड्यांचा शोध आणि वेध घेण्यासाठी जर्मनांनी बहुमूल्य वेळ आणि ऊर्जा खर्च केली होती. ह्यामुळे जर्मनांची कुणीतरी जाणीवपूर्वक दिशाभूल करीत आहे हे ब्रिटनच्या लक्षात आले होतेच. ब्रिटनने मग २४ एप्रिल १९४२ रोजी त्याला ब्रिटनमध्ये प्रवेश दिला. त्याची अधिकृत नेमणूक केली. गार्बो हे टोपणनाव ब्रिटिशाम्णी दिले.
पुजालोला ब्रिटिश गार्बो म्हणत, जर्मन त्याला अराबेल म्हणत. टॉमी हॅरिस ह्या ब्रिटिश बोस्-कम सहकार्‍याच्या सोबतीने त्याने तब्बल ३१५ पत्रे(सरासरी २००० शब्द असलेले) लिस्बनमधील एका जर्मन पोश्ट्बॉक्सात पाठवले.(जर्मनांना आपण त्यांचा तथाकथित गुप्त रिपोर्ट पाठवित आहोत असे तो ह्या ३१५ पत्रातून भासवित होता.) त्याने भरभरून पाठवलेल्या माहितीने व त्याने भासवलेल्या गुप्तहेरांच्या काल्पनिक नेटवर्कमुळे अत्यानंदित झालेल्या जर्मनांनी ब्रिटनमध्ये अधिक हेर पाठवायचा विचारही केला नाही!
.
त्याने दिलेली माहिती हे एक मिश्रण होते. फुल्ल थापा(काल्पनिक कथा), खरी पण लष्करी दृष्ट्या निरुपयोगी माहिती, आणि लष्करासाठी खरोखरीच अत्यंत उपयोगी पण अतिविलंबाने मिळालेली( म्हणूनच निरर्थक ठरलेली) माहिती ह्याचे ते मिश्रण होते.
.
आफ्रिकेत जर्मन सेनानी रोमेल ह्याच्या झंझावाती मोहिमा सुरु होत्या. त्यास पायबंद घालण्यासाठी १९४२च्या अखेरिस दोस्तांनी ऑपरेशन टॉर्च सुरु केले. हे ऑपरेशन सुरु होउन गेल्यानंतर, दोस्तांच्या हल्ले करणार्या नौका वगैरे यथास्थित आफ्रिकेत पोचल्यावर मग पुजोलोने आपला तथाकथित गोपनीय अहवाल तयार केला. "आमच्या क्लायड नदीवरील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार दोस्तांच्या नौका निघाल्यात. आफ्रेकेत(भूमध्य सागरात) त्या जाणार असल्याचे ते खात्रीलायकरित्या कळते" अशा अर्थाचा तो अहवाल होता. काही दिवस पूर्वीची तारिख, त्यातारखेचा सही -शिक्का म्यानेज करुन तो अहवाल एअरमेलने लिस्बनमधील जर्मन पोस्ट बॉक्सला धाडून दिला. उशीरा आली असली तरी जर्मन इतकी अचूक माहिती पाहून चकित झाले. "उशीरामुळे माहिती उपयोग करु शकलो नाही; खेद आहे. पण तुमची कामगिरी भूषणावह/भन्नाट आहे" असे शिफारसपत्र त्यास जर्मनीकडून मिळाले. हे संदेश तो त्यांच्याकडे कसे पाठवी? तर पैशासाठी पत्रे नेणारे पायलट त्याकाळी हॉलंडच्या विमानसेवेत होते. त्यांच्या मार्फत तो ही पत्रे लिस्बन शहरात पाठवी. पण त्यामुळे पाठवण्याच्या वेळा, संख्या ह्यावर बंधने आली. म्हणून जर्मनांच्या मागणीनुसार त्याला आता रेडियो संदेश देणारी व्यवस्था करायची होती. मग त्याने काय केले? अजून एक काल्पनिक रेडियो ऑपरेटरचे पात्र उभे केले!
कधीकधी माहिती उशीरा पोचवण्यासाठी त्याच्या ह्या "एजंट्स"ची कारणे तो पुढे करी. एकदा तर "लिव्हरपूल मधील एजंट आजारी पडल्याने तिथे सुरु असलेल्या अत्यंत महत्वाच्या हवाई हाल्चालीची माहिती मिळू शकत नाही" असे त्याने सांगितले. ते पटावे म्हणून काही काळाने तो लिव्हरपूल मधील एजंटचा "मृत्यू" सुद्धा झाला. ही बतावणी खरी वाटावी म्हणून त्याने स्थानिक पेप्रात याच्या नावाचा शोकसंदेशही छापला. ते पाहून गहिवरलेल्या जर्मनांनी त्या लिव्हरपूल मधील एजंटच्या पश्चात त्याच्या "विधवा" पत्नीसाठी पेन्शनसुद्धा सुरु केली! असे कैक किस्से आहेत.
युद्धकालात रेडोयोद्वारे संदेश पोचवायचे काम अर्थातच सरळ होत नसते. थेट संदेश कुणी कुणाला देत नाही. कारण ते हॅक केले जाउ शकतात. त्यामुळे आधी ते सांकेतिक लिपीत लिहितात(encryption) आणि पुन्हा तो मेसेज मिळेल तेव्हा मूळ रुपात परत आणतात (decryption). ह्यादरम्यान तो कुणाच्या हाती लागला तरी त्यातून काहिच अर्थबोध होउ नये हा हेतू. आता जर्मनांनी पुजालोशी रेडियोद्वारे संवाद सुरु केल्याने ब्रिटिशांना आयताच विदारुपी कच्चा माल मिळाला. त्यामुळे जर्मनीचे इतरही शेकडो हजारो सांकेतिक संदेश वाचणे ब्रिटनला शक्य झाले. कल्पना करा. शत्रूचा एखादा गुप्त संदेश सरळ तुमच्या हाती पडतोय. अहो, तुम्ही आख्खे युद्ध पालटवू शकाल ना थोड्याशाच अवधीत आणि श्रमात. हेरगिरी खरोखर बहुमूल्य ठरते ती अशी.
.
ऑपरेशन फोर्टिट्यूड आणि ऑपरेशन ओव्हरलॉर्ड
जानेवारी १९४४ पासून तयारी सुरु झाल्की युरोपवरील दोस्तांच्या निर्णायक चढाईची. नॉर्मंडीवर ते हल्ला करणार होते. त्याचे नाव होते ऑपरेशन ओव्हरलॉर्ड. ह्या योजनेबाबत जर्मनांची दिशाभूल करण्याचे, नॉर्मंडीमध्ये सेना उतरत नसून Pas de Calais ह्या ठिकाणी त्या उतरत असल्याचे भासवायचे एकहाती कंत्राट अर्थातच पुजालोला देण्यात आले. ह्या दिशाभूल करण्याच्या धंद्याचे नाव होते ऑपरेशन फोर्टिट्यूड. जानेवारी १९४४ ते प्रत्यक्ष घटनेपर्यंत त्याने जवळपास पाचेकशे रेडियो संदेश पाठवले. कधीकधी दिवसाला पंचवीसही संदेश होत.
संदेशांची विश्वासार्हता टिकावी म्हणून " अराबेल"रुपी पुजालो किंवा त्याचा एखादा तथाकथित एजंट ह्यांनी मोठ्या हल्ल्याची तारिख,व इतर काही तपशील द्यावेत असे ठरले. अर्थातच हे तपशील इतके उशीरा दिले जाणार होते की लष्करीदृष्त्या निरर्थक ठरावेत, शत्रूपक्षास हालचाल करण्याचीही उसंत मिळू नये. ५-६ जूनला एक "एजंट" , अति महत्वाची माहिती घेउन येणार आहे, अशी हवा निर्माण करण्यात आली. रात्री ३ला केलेल्या कॉलला सकाळी आठ वाजेपर्यंत "गार्बो" रुपी पुजालोला जर्मनांकडून काहिच प्रतिसाद मिळाला नाही.( ते ह्याचा कॉल उचलू शकले नाहित, मिस्ड कॉल ठरला.) नेमक्या ह्याच गोष्टीचे भांडवल करत गार्बोने अधिकाधिक तपशीलांची भर घालत आपली विश्वासार्हता वाढवत ठेवली. त्याने उलट जर्मन अधिकार्यांशी बोलताना चिडचिड्/नाराजी व्यकत केली. " इतकी निष्काळजीपणा बरा नव्हे. मी तत्वांसाठी इथे माझा जीव धोक्यात घालतोय, अन्यथा .....( हे काम सोडून दिले असते)" असे उलट त्यांनाच ऐकवले.
.
"ब्रिटनच्या आग्नेयेला(दक्षिण पूर्व) फार मोठा फौजफाटा जमा होतोय. खरा हल्ला तिकडूनच होणार आहे. त्या खर्‍या हल्ल्यापासून लक्ष इतरत्र वळवण्यासाठी नीच ब्रिटिश व अमेरिकन्स नॉर्मन्डीवर एक छोटा हल्ला चढवतील" अशा अर्थाचे संदेश गार्बोरुपी पुजालो व त्याचे काल्पनिक एजंट ऐकवू लागले. ह्या थापा खर्‍या वाटाव्या म्हणून ब्याकग्राउंड मध्ये विमान, रणगाडे, व्हॅन्स ह्यांचे आवाज, गोंगाट हे ही सुरु ठेवले. जणूकाही त्या लश्करी तळावरूनच हे साहेब संदेश पाठवून राहिलेत. ही माहिती इतकी महत्वाची वाटली की नाझींनी ती थेट हिटलरलाही दाखवली. ही माहिती त्यांना अति-अति महत्वाची वाटली. अत्यंत ऋणी असल्याचा सूर असल्याचा एक प्रतिसंदेश नाझींनी त्याला पाठवला. परिणामी जर्मन Pas de Calais इथे खरा मोठा हल्ला होणार आहे असे समजत होते. त्यांनी नॉर्मंडीवरील लढाईदरम्यान २ चिलखती डिव्हिजन्स, तब्बल १९ पायदळाच्या डिविजन्स भलतीकडेच , Pas de Calais मध्ये अडकवून ठेवल्या. खुद्द अत्युच्च सेनानी रोमेलने पुनः पुनः विनंती करुनही नॉर्मन्डीला फौजा हलवण्यास त्याला मनाई केली गेली. नॉर्मन्डीवर हल्ला झाल्याच्या दिवशी Pas de Calais इथे जर्मन फौजा अडकल्या होत्या हे ठीक आहे. पण त्यानंतर चक्क दोन महिन्यांतरही Pas de Calais इथेच मोठे जर्मन लश्कर होते, उलट तिथेच ते अधिकाधिक जमा करीत होते.
.
ह्यानंतर जून महिन्याच्याच शेवटी जर्मनीने लंडनवर v1 ह्या क्षेपनास्त्राने हल्ले सुरु केले.(मोठ्या प्रमाणात वापरले गेलेले हे पहिलेच अशा प्रकारचे क्षेपणास्त्र असावे. तोवर मानव चलित विमानेच काय ती बॉम्बफेक करीत.) ते हल्ले कसे होताहेत, थीक होताहेत की नाही, कितवर हानी झाली ह्याचे तपशील जर्मनांनी पुजालोला विचारण्यास सुरुवात केली. आता आली का पंचाइत. ह्याबद्दल संशय येउ न देता थापा मारणे त्याला जमणार नव्हते. आणि खरी माहिती देणे त्याला स्वतःला पटणार नव्हते. मग काय. त्याला ब्रिटनने "अटक" केली आणि त्याच्या सेवेत खंड पडण्याचे कारण पुरवले. काही दिवसातच "अटके"तून तो परतला. पण पुन्हा लंडनभोवती हेरगिरी करण्यास असमर्थ आहोत असे म्हणत स्वतःची सुटका त्याने करुन घेतली.
जर्मनांनी त्याला त्याच्या तथाकथित एजंटच्या नेटवर्कच्या खर्चापोटी तब्बल तीन लाख चाळिस हजार डॉलर दिले. ह्या नेटवर्क मध्ये एकेकाळी सत्तावीस एजंट असल्याचे त्याने त्यांना कळवले होते.
.
"अराबेल"रुपी पुजालोला २९ जुलै १९४४ ला जर्मनांतर्फे चक्क Iron Cross रेडियोवरून घोषित करण्यात आला. युद्धानंतर त्याच्या संपर्कातील एका जर्मन अधिकार्‍याने तो प्रत्यक्ष त्याच्या हाती सुपूर्त केला . शक्यतो हा प्रत्यक्ष लढाईतील सैनिकांना देण्यात येइ. हिटलरच्या प्रत्यक्ष परवानगीनंतरच हा दिला जाई.(आपल्याकडील शौर्य पुरस्कार्,वीर चक्र,महावीर चक्र, परमवीर चक्र सारखा हा जर्मन पुरस्कार आहे.)
इकडे किंग जॉर्ज ह्यांच्या हस्ते ब्रिटनच्या वतीने त्याला MBE(Most Excellent Order of the British Empire ) हा ही अत्युच्च सन्मान देण्यात आला!!
दोन्ही बाजूंकडून असे पुरस्कार मिळणे ही एक अतिदुर्मिळ अशी गोष्ट.
आपल्याला मूर्ख बनवण्यात आले हे नाझींना अखेरपर्यंत समजलेच नसावे.
.
.
युद्धोत्तरः-
आपली खरी ओळख शिल्लक राहिलेल्या नाझींना झाली तर आपली खैर नाही हे तो जाणून होता. युद्ध संपताच तो अंगोला ह्या आफ्रिकन देशात गेला. १९४९ मध्ये स्वतःच्या मृत्यूचा बनाव त्याने रचला.(जेणेकरुन आपला पिच्छा सोडून द्यावा) आणि तो जो व्हेनेझुएलाला गेला तो तिकडेच राहिला. तिथे एका संपूर्ण वेगळ्या ओळखीसह त्याने वास्तव्य केले. जणू काही तो भूमिगत झाला. अज्ञातवासात गेला.
१९८४ पर्यंत तो असाच शांत अज्ञात जीवन जगत होता. मात्र त्यावर्षी त्याला त्याच्यासंबंधी पुस्तक लिहू पाहणार्‍या रॉबर्ट अ‍ॅलिसन ह्या ब्रिटिश राजकारण्याने अथक परिश्रम घेउन हुडकलेच(अर्थातच गुप्तहेर जगतातील वर्तुळ, पुजोलचे त्या काळातील मित्र, सहकारी बॉसेस आणि इतर कॉन्टॅक्ट्स त्याला वापरावे लागले.).
१९८४ला पुजोलला ब्रिटनमध्ये आमंत्रत करण्यात आले. त्याचा प्रिन्स फिलिप ह्यांच्या हस्ते भव्य सत्कारही करण्यात आला. त्याने पुन्हा अआठवणी जागवण्यासाठी ब्रिटन ते फ्रानसचा नॉर्मन्डी हा किनारा असा प्रवासही अचाट कामगिरीनंतर तब्बल चाळिल्स वर्षांनी केला.
.
अंक दोन २ .
******************************संपूर्ण*****************************************
--मनोबा

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

मनराव, त्या शेंबूड पुराणानंतर तुमचा हा लेख म्हंजे कसा वाटला सांगू का ?
एखादा ताकदीचा ब्याटमन जसा एखाद्या सत्रात टुकूटुकू खेळून खेळ पाहायला आलेल्या प्रेक्षकांचा अपेक्षाभंग कर्तो लोकन्च्या शिव्या खातो (मनातल्या मनात बर्का )
ब्रेक नंतरच्या सत्रात मात्र समोरच्या बोलिंग पार्टी ची पिसं काढतो तसा वाटला.सुंदर.
हॉलीवूड वाल्यांनी अराबेल/गार्बो वर एखादा चित्रपट काढण्या इतके नाट्य,थरार ,भव्यता या कथेत आहे. माहिती दिल्याबद्दल थांकू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लै भारी.. उत्तरार्ध अधिक माहितीपूर्ण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्व वाचकांचे आभार.
पहिल्या अंकाच दुवा स्वतःहून ह्या अंकात जोडण्याबद्दल ऋषिकेशला विशेष धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

गहिवरलेल्या जर्मनांनी त्या लिव्हरपूल मधील एजंटच्या पश्चात त्याच्या "विधवा" पत्नीसाठी पेन्शनसुद्धा सुरु केली!

" इतकी निष्काळजीपणा बरा नव्हे. मी तत्वांसाठी इथे माझा जीव धोक्यात घालतोय, अन्यथा .....( हे काम सोडून दिले असते)" असे उलट त्यांनाच ऐकवले.

अफलातुन गुप्तहेराचा परिचय करुन दिलात .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

... कुणी त्याच्या कुतुंबियांचा छळ केला तर कुनाची विचारसरनी त्याला पटेना;

गुजराथी मुस्लिमांची हीच व्यथा असेल काय?

लेखन आवडले. हा माहितीपट पाहिला आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.