Skip to main content

आपण असं विचित्र का वागतो?

पुरेसे भंपक ,थिल्लर, उथळ किंवा काही बाबतीत chauvinist झाल्याशिवाय लोकप्रिय (मराठीत पॉप्युलर) होणं अवघड आहे.
"ठेचून काढा साल्यांना", "फार झालय आता" , "एखादा अणुबॉम्बच टाकला पाहिजे " असे म्हटल्याशिवाय टपरीवर ढोसल्या जाणार्‍या चहाला चव काही येत नाही.
अणुबॉम्ब सोडा, गेलाबाजार नुन्सता बॉम्ब टाकणं सोपय का? तुम्ही त्यासाठी काय काय सोसायला तयार आहात?
बॅटल् ऑफ ब्रिटन च्या दरम्यान, दुसर्या महायुद्धात नाझींनी बेसुमार बॉम्बफेक करुन इंग्लंड बेचिराख करायचा चंग बांधला.
त्यातही लंडन तर भुइसपाट व्हायची वेळ आली.धडाधड बिल्डिंगा पडल्या.(हो. त्याच. स्क्वेअर फुट, फुटाफुटांच्या दराने घेतल्या जाणार्‍या जमिनिंसारख्याच अपार्टमेंटा धडाधडा पडल्या.
रस्त्यात बॉम्ब पडले. मूलभूत सुविधा उखडून पडल्या. रस्त्यात पाच्-पाच दहा फुट व्यासाचे खड्डे पडले. कुठे पाणीपुरवठा बंद पडला. कुठे वीज पुरवठ्यानं राम म्हटलं.
अशा वेळी तुम्ही हापिसात कसे जाणार? राहणार कुठं ? पोराला शाळेत कसे सोडणार? मुळात शाळाच उध्वस्त झाली असेल तर कसे करणार?
सोसवेल हे? झेपेल हे?) तसं आपल्याकडं झालं तर चालणार आहे का? हा विचार ही माणसं चहाच्या घोटासोबत करत असतील का?
.
एकाशी शेवटी बोलताना हा मुद्दा मांडला तर त्यानं तावातावात "हो. चालेल. एकदाच काय व्हायचं ते होउ द्या." असं उत्तर दिलं .
पण त्याला खरच चालणार होतं का? तासभर वीज गेली तर काय भंबेरी उडते शहरात हे आपल्याला चांगलच ठाउक आहे. एकदम दोन्-चर दिवस वीज नाही. आठ-दहा दिवस पाण्याची बोंब ;
जागचे हलू शकत नाहित असे खड्डे हे सगळे सोसाल? (हॅ हॅ हॅ पुण्यात ऑलरेडी खूप खड्डे आहेत वगैरे अवांतर व्हायचा इथे स्कोप आहे. पण इथल्या खड्ड्यातून कुरकुरत का असेना तुमची बाइक्,कार, बस जाउ शकते.
आख्ख्या बसचं चाक रुतून बसेल इतके मोठे खड्डे रस्त्यात सर्वत्र पडले असतील तर चालेल? ते खड्डे नसतना तुमच्या वाहतूक परिस्थितीचा विचार करा; मग बोला.)
असो.
.
.
चहाला किंवा इतरत्रही कुठलाही मुसलमान भेटला तर गप्पांत की अचानक "सब पॉलिटिशियन बुरे हय ; वहिच झगडा लगाते हय" हे तरी वाक्य येतं
किंवा " सभीच धरम मे अच्छाइच सिखाया हय. लेकिन कुच बुरे लोग सभी तरफ हय."
हे अधनं मधनं ऐकवणं कम्पलसरी आहे का? आडून आडून "आम्ही तुलाही बरोबरीचेच मानतो बरं का" हे सुचवणं विचित्र नाहिये का? वाटाघाटीच्या टॅबलावर बसल्यासारखं कृत्रिम वागणं का असतं पब्लिकचं?
जो खरोखर एखाद्याला बरोबरीचा मानत असेल तो "मी तुला/तुम्हाला बरोबरीचा मानतो" हे पुन्हा पुन्हा ऐकवेल का?
समजा साठे आणि माटे नामक दोन व्यक्ती भेटताहेत. ते सरळ "छ्या बुवा फार उकडतय हल्ली. " किंवा " चल जरा भेळ खाउ" असं म्हणतील आणि इकडचं तिकडचं बोलतील की नाही?
की साठे पुन्हा पुन्हा माटेंना म्हणतील "खरेतर तुम्हीही चांगलेच आहात हो. तुमच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे."
"थोरामोठ्यांनी चांगलं वागायचाच उपदेश केला. माणुसकी हाच धर्म.(इन्सानियत ही धरम हय)" असलं विचित्र बोलाल.(म्हणजे सर्वसाधारण परिस्थितीत, साठे अणि माटे हे दोन परिचित गृहित धरलेत;
सहज चहापाण्याला भेटतात तसे भेटलेत. )
.
एखादा "सलिम" साठ्यांना भेटला तर ते साठे आडून आडून नम्रपणाचा आणि विशेषतः उदारतेचा आव का आणतात?
सलिमला डायरेक "काय बे अशात कोणता पिक्चर पाहिलास" किंवा "काय कुठे फिरायला जायचा प्लॅन आहे ह्या वीकांतास " असे विचारणे ह्यांना पुरत नाही का? का पुरत नाही? सलिमची आयडेंटिटी एक मुस्लिम म्हणूनच गृहित धरतो. मुस्लिम हा एक टेम्प्लेट आणि ते सगळे काही कोटी ह्यातच बसणारे असं काही इतरांच्या ब्याक ऑफ द माइंड मध्ये चाललेलं असतं का?
.
.
त्याहून चमत्कारिक प्रकार म्हणजे भारताचे राष्ट्रपती नि पंतप्रधान विचित्र शुभेच्छा का देतात. त्यांच्या शुभेच्छांत विचित्र अध्याहृत्/गर्भित विनवणी का असते?
"तमुक तमुक सण्/धर्म शांती आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देतो" असे हे दर सणाला का म्हणतात? गपगुमान किम्वा मनमुराद सेलिब्रेट का करत नाहित?
किंवा सरळ "हा दिवस चांगला जावो ही शुभेच्छा" इतक्या सरळ शुभेच्छा देणं पुरेसं नाहिये का? दरवेळी "ईद हा सामाजिक ऐक्याचा संदेश देते" हे का ऐकायचं.
ते खरं जरी असलं तरी तुमचं त्यामागचं टोनिंग प्रामाणिक आहे का? तुम्ही म्हणताय तेच तुम्हाला म्हणायचय का?
.
परवा तर चक्क कुणीतरी "दसरा हा सुद्धा सामाजिक शांततेचा संदेश देतो. सोनं लुटून आणणं हे शांतता नांदवण्याचं प्रतीक आहे" असाही संदेश दिला.
आणि ह्याच्याच पाठोपाठ "आपले पराक्रमी राजे रजवाडे शेजारी मुलूख लुटून ते लुटीचे खरेखुरे सोने आणत " हे सुद्ध दरवेळी पेप्रात छापून येतं; इलेक्ट्रॉनिक मिडियात ऐकू येतं.
अरे? लुटालूट ना ही? शांततेचा संदेश कसा देइल ? हयतही एक भंपक "समन्वयवादी" पळवाट आहेच. "अरे ते शेजारच्या राज्यातून आणायचं" किंवा "स्वतःचं घर नाही लुटायचं काही. शेजारच्यांचं लुटायचं!"
हे शिकवलं जातं. अरे पण सगळ्यांनीच अशी सगळ्या शेजार्‍यांशी मारामारी करायची काय? मग काय घंटा शांतता मिळणार ? आनंद आहे.
.
.
बरं हा मवाळवाद, समन्वयवाद कुठल्या टोकाला जाइल ह्याचा नेम नाही. आज चक्क एकानं "बकरी ईद म्हणजे काही खरे बकरे बळी द्यायचे नसतात्.तर स्वतःतील दुर्गुणांचा बळी(sacrifice)द्यायचे असते."
असे ऐकवले. त्याला विचारलं की बाबा रे , असं कुठं लिहिलय ते तरी सांग, एखादी कुराणातील आयत नि सूरा सांगता नाही आली तरी चालेल, एखादी हदिस मधील घटना/कथा ह्याला आधार म्हणून आहे का?
तर मात्र सटपटून अ‍ॅक्च्युअली ते माझं इंटरप्रिटेशन आहे वगैरे वगैरे बडबड सुरु केली. अरे पण असं ज्याचं त्याचं इंटरप्रिटेशन असेलच की! हे तुझं तुझ्यापुरतं आहे.
.
.
हे का होतं? गोष्टी पवित्र मानल्या जातत. आणि मग पवित्र गोष्टी आपल्या मानसिक चौकटीपेक्षा वेगळ्या दिसल्या की मग चौकट आणि पवित्रतेचे नियम दोन वेगळे आहेत हे सरळ साधं मान्य करणं सोडून
त्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न होतो. ती गोष्ट कशी माझ्या चौकटीला अनुसरुन आहे हेच मी सांगतो.
ह्यानं कधीच प्रगती शक्य नाही.
.
.

"आपल्याला सगळ्यांची एकजूट हविये. भांडण नकोय. शांतता हे सर्वोच्च मूल्य. विनाकारण मारामारी/विध्वंस नको." हे असं एखादं मूल्य आपण ठरवतो.
पण त्याचवेळी ह्याविरुद्ध असलेल्या परंपरेनं केल्या जाणार्‍या गोष्टींना अफाट जनसागराचा पाठिंबा दिसतो. मग ९९.९९% लोकांना "तुम्ही आणि तुमचे वाडवडिल करताहेत ते पटत नाही" असं स्वच्छ सरळ सांगता येत नाही.
हे होतं कधी आदरयुक्त(आपुलकीयुक्त) भीतीने किंवा कधी भीतीयुक्त आदराने.
पहिली केस म्हणजे एखादी व्यक्ती घरच्यांना दुखावणे टाळते. दुसरी केस म्हणजे मुस्लिमांशी बोलताना जरा टरकूनच बोलते.(मुस्लिम "छ्छी छ्छी" आहेत तसेच ते "भयंकर" आहेत, हे घट्ट रुजलय डोक्यात.
ह्याच्यावर उपाय काय? तर समन्वयवादी मंडळी परंपरांचा "खरा अर्थ" चांगलाच आहे; कालौघात तो बदलला आहे वगैरे वगैरे सांगतात.
आपल्या परंपराविरोधी सुधारणांना परंपरांचाच आधार घेउ पाहतात. हे विचित्र आहे.
हा विचित्रपणा मी कशाला म्हणतो? "खुदा के लिये" पाच सात वर्षांपूर्वी आलेला एक पाकिस्तानी बहुचर्चित चित्रपट. ह्यात शेवटच्या प्रसंगात नसीरुद्दीन शहा
ह्यांनी भूमिका केलेले एक पात्र आहे. हे पात्र मौलवी का तत्सम धार्मिक पदावर कार्यरत आहे. पण ते बरेच मवाळ आहे. चित्रपटातील घटना पाकिस्तानी धर्मांधतेच्या
काळात घडत असताना धार्मिक क्षेत्रातील अशा व्यक्ती आशेचा किरण असू शकतात हे ध्वनित करणारे हे पात्र. त्याची कोर्टातील जुबानी(तपासणी/साक्ष??) घेतली
जाण्याचा प्रसंगात अत्यंत कौतुक केला गेला. ह्यात तो उठसूट इस्लाम कसा पुरोगामी आहे; तो किती छान आहे; शांतता; अमन वाला आहे वगैरे वगैरे
सांगत असतो.दरवेळी त्यासाठी तो कुराण आणि हदिसमधली उदहरणं काढून देतो. काही प्रेक्षक एवढ्याने भारावून जाउन इस्लाम आणि अमन हे समानार्थीच आहेत असे मानत बाहेर पडतात.
म्हणजे दोन समूहांतील काही लोकांचं एकमेकांबद्दल, एकमेकांच्या श्रद्धांबद्द्ल चांगलं मत होतय तर. चांगलय की!
हो; होत असेल तर चांगलच आहे हो. पण फक्त एक शंका आहे.
"अहो बघा हे धर्मग्रंथातही सांगितलय . म्हणून हा कायदा(किंवा अमुक एका व्यक्तीची वागणूक) बरोबर आहे. ह्याला मान्यता द्या हो." अशी विनवणी केल्यासारखं होत नाही का? म्हणजेच दरवेळी धर्मग्रंथाची साक्ष काढलिच पाहिजे का? ह्याचा साइड इफेक्ट म्हणून मग एखादी गोष्ट धर्मग्रंथाला अनुसरून नसली तर त्यावर सरसकट बंदी
घालणार का? म्हणजे हा "शरिया" गळी उतरवण्याचाच प्रकार झाला की.
धर्मग्रंथाचं प्रामाण्य नाकारणारा कोपरनिक्स , अंत समयीचा गॅलिलिओ , सचोटिचा सॉक्रेटिस हे इथून पुढे अशा समाजात अगदि एक्विसाव्या शतकातही निर्माण होणे शक्य कसं होइल?
पूर्वी लोकमत वगैरे पेपरमध्येसुद्धा पैगंबरवासी रफिक झकेरिया ह्यांचं सदर येइ. त्यातही "अमुक चांगली गोष्ट आमच्यकडे कशी सांगितली आहे" हे येइ.किंवा लेखाचा टोन समजावणीचा असे. "चार बायका केल्याच पाहिजेत असे नाही. अमुक अमुक हदिस पहा." असा तो टोन असे. असे विचार व प्रयत्न उदात्त आहेतच.
पण त्यातून दरवेळी ग्रंथाची साक्ष, मौलवींची परवानगी घेण्याचा प्रयत्न विचित्र आहे. म्हातारी गेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावता कामा नये म्हणतात ते हेच की.
.
अर्थात ह्याचा प्रतिवाद म्हणून लागलिच "अरे पाकिस्तानात तालिबानी आहेत तसे तुमच्यातही काही जुनी आत्मघातकी खोडं आहेतच की" असं उत्तर येण्याची दाट शक्यता.
तसे असेलही, पण मूळ मुद्दा फक्त एका धर्माचा नसून प्रवाहीपणा नसण्याचा आहे. दरवेळी फार पूर्वी लिहून ठेवलेल्या कशाला तरी आमचे कायदे, वागणूक , आख्खं आयुष्य
compliant असावं अशी अपेक्षा ठेवत बसण्याला आहे. तो त्यांच्यात असू शकेल तसा ह्यांच्यातही असू शकेल.
.
.
ता क :- कुठल्याही धर्माच्या व्यक्तीबद्दल केवळ तो त्या विशिष्ट धर्माचा आहे म्हणून मला द्वेष नाही. (हे असं सांगावं लागणं सुद्धा ह्या लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या
भंपक उदाहरणाच्या लायनीवर जातय ह्याची कल्पना आहे; पण नाव घेउन लिहिल्यानं गैरसमज होउ शकण्याची शंका वाटली, म्हणून खुलासा.)
.
--मनोबा

Node read time
6 minutes
6 minutes

अजो१२३ Tue, 15/10/2013 - 23:47

विचार सुंदर आहेत. अगदी माझ्या मनातलं बोलला आहात तुम्ही.
१. बॉलिवूडमधे, चित्रपटात ९०-९५% हिरो हिंदु असतात, पण हिरोच्या घराबाहेर कटाक्ष टाकला कि दुसरा वा तिसरा माणूस मुसलमान असतो. मुसलमान न दाखवता चित्रपट पूर्ण होत नाही, ९९%. बरे दाखवा मुसलमान, त्यात काय वाईट. आता त्यांच्यात भाईचारा कसा आहे हे चित्रपटाच्या विषयाशी काही संबंध नसताना, 'अगदी आवर्जून' दाखवणे काय गरजेचे आहे?
२. राम जन्म भूमी वर जेव्हा अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल आला तेव्हा देशात शांती राहिली (कि लष्करामुळे?) हे खूप चांगले. पण एक गोष्ट फार दुखवून गेली. दोन हिंदू जज , एक मुसलमान. तिघानी वेगवेगळा न्याय दिला, आणि एक विचित्र प्रकारचं बहुमत काढलं गेलं. चला हे ही ठीक होतं, पण मुसलमान जजने जागा मजिदीला हवी म्हटले, ब्राह्मण जज मुसलमानांनी आक्रमण केले म्हणाला, मुसलमान जज नाव न घेता मंदिरात अन्य धर्माचे अवशेष मिळाले म्हणाला, इ इ. त्यांची मतांतरे वाचली तर चीड येईल, यासाठी नाही कि मते भिन्न आहेत, पण यासाठी कि त्यांचा एक विशिष्ट पॅटर्न आहे. संवेदनशील मनाला लाज वाटेल असा मला तो निवाडा वाटतो. म्हणजे तिन्ही जज मुसलमान असते तर माझ्या बाजूचा निकाल न्यायपालिकेतही लागणार नव्हता असे हिंदूना वाटवून देणारा निकाल होता. कसलं मातीचं आलंय आपलं धर्मनिरपेक्ष प्रजातंत्र!
३. मागे वळले कि लगेच शिव्या देणे ही दांभिकता तर फारच! तुम्हाला मुसलमानांना शिव्या घालायच्या ना, तोंडासमोर घाला. 'मला आडवाणी आवडतात' इतकेपण त्यांच्यासमोर बोलायला कचरणारे लोक पाहिले आहेत. किमान मध्यमवर्गीय हिंदुना कॉलेजात, ऑफिसात भेटणारे मुसलमान फार सर्जनशील असतात आणि तुम्ही त्यांच्यासमोर कितीतरी इस्लाममधल्या न आवडलेल्या गोष्टींवर कडाडून टिका करू शकता. ते त्यांच्यापरिने तुमच्या टिकेला शंका मानून उत्तर द्यायचे प्रयत्न करतात. शेवटी 'वादे वादे जायते संवाद' प्रकार होतो.
४. धर्माच्या नावावर जर मुसलमानांनी काही वाईट केले तर, 'आपल्या इतर' सौम्य(च) उजव्या वा सेक्यूलर हिंदू मित्रांमधे त्यांच्यावर टिका करताना, प्रत्यक्ष त्या कृतीवर टिकाच करत येत नाही. ते लगेच त्याचे हिंदू धर्मातले समांतर उदाहरण देतात. अरे, विषय काय ते तरी पहा, इतके डिफेन्सिव का होता? Can't we criticize an Islamic mistake/superstition/crime standalone, without refering to any other religion? उदाहरण नाही मिळाले तर 'प्रत्येकच धर्मात बरे/वाइट....' अशी नॉन्-स्पेसिफिक लाइन पकडतात. याला नाकारणे अशक्यच असते.
५. माझ्या निदर्शनास आलेला सर्वात मोठा गाढवपणा म्हणजे 'स्वतः धार्मिक असताना' सर्व धर्म समान असतात असे घटना म्हणते म्हणून म्हणणे. हा प्रकार दररोज सकाळ संध्याकाळ पालक पनीर खाऊन मला सर्व भाज्या समान आवडतात असे म्हटल्यासारखा आहे. मग अशा माणसाला 'अरे राजा, सर्वधर्मसमभाववादी हे भारतीय संघराज्य आहे, घटना आम्हाला समान मानते. तुला जर काही कारणांनी माझा हिंदू धर्म मुस्लिम धर्मापेक्षा महान आहे असे वाटत असेल तर आरामात, बिनधास्त वाटून घे. जोपर्यंत आपण घटनेला अभिप्रेत नसलेली, इतरांच्या धर्मस्वातंत्र्यात बाधा आणणारी काही गोष्ट नाही केली, तोपर्यंत आयुष्यभर हिंदूच धर्म सर्वात श्रेष्ठ आहे असे मानत जगलास तर शासनास काहीच हरकत नाही.' असे सांगीतले तरी कळत नाही. (बरखा आणि राजदीप या मूर्खांत मोडतात का असा प्रश्न मला नेहमी पडतो पण ती त्यांची व्यक्तिगत धार्मिकता आहे (जिचा देशावर फार परिणाम होतो पण काय करा...)म्हणून मी काही म्हणू शकत नाही.)
६. काही विचित्र लोक त्यांचे गझलांचे, उर्दू साहित्याचे, शायरीचे प्रेम इस्लामवरचे प्रेम म्हणून खपवायचा प्रयत्न करतात. महान मुस्लिम शास्त्रीय गायक, वादक यांच्याबद्दल आदर पण काही लोक असेच करतात. मी म्हणतो बिस्मिला खानांकडे नुसते पाहिले (नाव माहित नसताना) तर माणूस त्यांच्या प्रेमात पडतो. त्यांची मिठास ही मी इस्लामची प्रातिनिधिक मिठास म्हणणार नाही.

इस्लामवर खरंच विशेष प्रेम असलं तर टायर पंक्चर काढणारा, मे़कॅनिक, भाजीवाला, इ इ अहमद, अब्दुल , इ इ जे असतात, जे भारतीय दरिद्री इस्लामच्या सामान्यापेक्षा जास्तच सामाजिक भयानकतेत, आपल्या धर्माच्या नावातल्या 'इमान' शब्दाला जागत कोणतीही गुन्हेगारी न करता आनंदाने जगत असतात, त्यांना कोणत्या वेगळेपणानं न वागवणं, आणि कडवट उजव्या विचारसरणीचे असाल तर गझनीच्या आक्रमक काफिल्यात त्या बिचार्‍याला न नेऊन ठेवणे. कोणताही उपकार नको, अपकार नका करू!

बॅटमॅन Wed, 16/10/2013 - 01:12

In reply to by अजो१२३

मुद्दा क्र. ४ चे नक्की काय करायचे हा लै अवघड प्रश्न आहे. अवघड जागेचे गळू आहे ते. आणि तसे सांगणारे तथाकथित लोक बहुतेकवेळेला फक्त आणि फक्त मनसोक्त ट्रोलिंग करत असतात. म्हणजे कसे की आपण काही बोललो तर प्यारलल उदाहरणे द्यायची, शिवाय आपण समाजापासून वेगळे असल्याचा आव आणायचा-स्वतः कितीही वायझेड असले तरी. पण ही पिलावळ सगळ्यात ढोंगी असते. आपण समतावादी आहो, असा सारखा ढोल पिटायची ज्यांना गरज वाटते, ते बर्‍याचदा न्यूनगंडाने तरी पछाडलेले असतात नैतर फक्त ट्रोलिंग करतात आणि त्याला गोंडस मुलामा देतात. या जाली(य) तथाकथित लिबरल लोकांना त्यामुळे तितपतच सीरियसलि घ्यायचे इतःपर ठरवले आहे. स्वतः फक्त आणि फक्त आरडा ओरडा करण्यापलीकडे यांच्या हातून काहीही होत नाही. सगळे तद्दन वांझोटे.

बाकी मूळ लेखाबद्दल काय बोलावे? मन यांचा आजवरचा सर्वोत्तम लेख म्हणता येईल. बाकी लेखातले मुद्दे नेहमीचेच आहेत पण निरीक्षणे मार्मिक आहेत. बहुतेकदा जिथे अस्मितांचा प्रश्न या ना त्या निमित्ताने चर्चेला येत नाही, तिथे काही अडचण नसते. बाकी साधारणपणे चार चौघांत उठा-बसायला साधा, बहुतेक कुठे तुटेपर्यंत न ताणणारा माणूसच चांगला असतो. स्वतःची कशी लाल आहे हे सांगण्याच्या भानगडीत आपला ऑडियन्सच हरवतो आहे हे कैक लोकांना कळतच नाही आणि वर समाज आमचे ऐकत नाही म्हणून भ्यांऽ करून हंबरडा फोडल्या जातो.

मन Wed, 16/10/2013 - 09:40

In reply to by अजो१२३

१. बॉलिवूडमधे, चित्रपटात ९०-९५% हिरो हिंदु असतात, पण हिरोच्या घराबाहेर कटाक्ष टाकला कि दुसरा वा तिसरा माणूस मुसलमान असतो. मुसलमान न दाखवता चित्रपट पूर्ण होत नाही, ९९%. बरे दाखवा मुसलमान, त्यात काय वाईट. आता त्यांच्यात भाईचारा कसा आहे हे चित्रपटाच्या विषयाशी काही संबंध नसताना, 'अगदी आवर्जून' दाखवणे काय गरजेचे आहे?
ह्याचे उत्कृष्ट उदाहरण फर एन्ड ह्यांच्या तिरंगा चित्रपटात होते.
http://www.aisiakshare.com/node/1742
२. राखी का दिन. तीन भाऊ, एक बहीण. आधीच्या अन्यायामुळे त्यातील एक दोन जण रागावले आहेत. तिसरा त्यांना रक्षाबंधनाचे महत्त्व पटवून देतो. तो त्या तिघातील कोण असेल? (हिंटः त्यातील एक मुस्लिम आहे). नंतर एकजण मरतो. तो कोण असेल? (हिंटः मागची हिंट पाहा).
शिवाय
३. तीन "ऐटम बम" वाले शास्त्रज्ञ. त्यांना व्हिलन धमकावतो "सिक्रेट" देण्यासाठी. त्यातील एकजण 'आमच्या रक्तात बेइमानी नाहीये' असे सांगून ते साफ नाकारतो व मरतो. तो कोण असेल? (हिंटः बाकीचे दोन हिंदू आहेत).
.

२. पण एक गोष्ट फार दुखवून गेली. दोन हिंदू जज , एक मुसलमान. तिघानी वेगवेगळा न्याय दिला, आणि एक विचित्र प्रकारचं बहुमत काढलं गेलं. चला हे ही ठीक होतं, पण मुसलमान जजने जागा मजिदीला हवी म्हटले, ब्राह्मण जज मुसलमानांनी आक्रमण केले म्हणाला, मुसलमान जज नाव न घेता मंदिरात अन्य धर्माचे अवशेष मिळाले म्हणाला, इ इ. त्यांची मतांतरे वाचली तर चीड येईल, यासाठी नाही कि मते भिन्न आहेत, पण यासाठी कि त्यांचा एक विशिष्ट पॅटर्न आहे. संवेदनशील मनाला लाज वाटेल असा मला तो निवाडा वाटतो. म्हणजे तिन्ही जज मुसलमान असते तर माझ्या बाजूचा निकाल न्यायपालिकेतही लागणार नव्हता असे हिंदूना वाटवून देणारा निकाल होता. कसलं मातीचं आलंय आपलं धर्मनिरपेक्ष प्रजातंत्र!
यस्स. मलाही असं वाटून गेलं खरं. पण आपल्याला स्वतःला न्यायव्यवस्थेची पुरेशी माहिती नाही, चाल्लय ते बरोबरच असावं अशी मी स्वतःची समजूत घालून घेतली.
कुणाला अधिक माहिती असल्यास त्यानं दिलेली बरी.
.
४. धर्माच्या नावावर जर मुसलमानांनी काही वाईट केले तर, 'आपल्या इतर' सौम्य(च) उजव्या वा सेक्यूलर हिंदू मित्रांमधे त्यांच्यावर टिका करताना, प्रत्यक्ष त्या कृतीवर टिकाच करत येत नाही. ते लगेच त्याचे हिंदू धर्मातले समांतर उदाहरण देतात. अरे, विषय काय ते तरी पहा, इतके डिफेन्सिव का होता? Can't we criticize an Islamic mistake/superstition/crime standalone, without refering to any other religion? उदाहरण नाही मिळाले तर 'प्रत्येकच धर्मात बरे/वाइट....' अशी नॉन्-स्पेसिफिक लाइन पकडतात. याला नाकारणे अशक्यच असते.
+१
.
५.हा प्रकार दररोज सकाळ संध्याकाळ पालक पनीर खाऊन मला सर्व भाज्या समान आवडतात असे म्हटल्यासारखा आहे.
उदाहरण आवडलं!
.
बाकी, फुरसतीत परतेन.

मन Tue, 22/10/2013 - 10:23

In reply to by अजो१२३

मूळ धाग्याचच एक्स्टेंशन असलेला हा प्रतिसाद असल्यान्ं पहिल्या पानावर रहावा ह्यासाठी इथे देत आहे.
.
धागा एकदम हिंदु-मुस्लिम ह्या नेहमीच्या वळणावर गेला. तो तसा जाइल असे धागा प्रकाशित करताना वाटले नव्हते.(अर्थात जायलाही हरकत नाहिच फक्त मी त्या आखाड्यात उतरणार नाही.)असो.
पण धाग्यातील एक मुद्दा वागण्यातील कृत्रिमतेचाही होता. तो कसा?
मी नुकताच एक आंतरराष्ट्रिय ब्यंकेची सॉफ्ट्वेअर पाहणार्‍या उपकंपनीत भरती झालोय.(software arm of MNC, international bank असं म्हणता यावं.)
इथे ऑफिस भारतात असले तरी कित्येक युरोपीय वंशीय काम करतात. त्यांच्याशी कसे वागावे ह्यावरही एक भाग होता.(बहुदा त्यांच्या फीडबॅक वरून त्यातील सिलॅबस तयार केला असावा.)
तिथे सुरुवातीच्या वागणूक मार्गदर्शन शिबिरात(behaviour training) काही पथ्ये सांगितली.
वागणूक प्रोफेशनल असावी ही कुठलीही कॉर्पोरेट वर्तुळातील अपेक्षा तिथे होतीच. पण वातावरण फ्रेंडली असावं हाही मुद्दा ठसवण्यात येत होता.
अर्थात फ्रेंडली ह्याचा अर्थ नको तितके वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसणे नव्हे ; हे ही आवर्जून सांगितले. त्याचा सारांश:-
भारतीयांच्या प्रतिक्रिया ह्या एकट्या राहणार्‍या प्रौढ व्यक्तीबद्दल विचित्र असतात. स्त्रिया , अधिक वयाच्या असतील तर अजूनच विचित्र.
आणि स्त्री घटस्फोटित किंवा विधवा ; त्यातही तिला अपत्ये असतील तर अजूनच विचित्र.
युरोपीय वंशीय लोकांच्यात हे सिंगल लोकांचे प्रमाण भारतापेक्षा अधिक आहे.( मनोबा, विदा द्या. जा फुट. देत नै.)
भारतीय "स्त्री एकटी आहे ह्याचा अर्थ ती available आहे" असा घेताना दिसतात.
त्यातही तिने चुकून कॉफी किंवा लंच वगैरे बोलावले, ट्रीटला बोलावले तर त्यांची खात्रीच होउन जाते.
घटस्फोटित असली तर आडून आडून कुठे सहानुभूतीचा उगीचच खांदा द्यायला जातात किंवा "नक्की कुणात प्रॉब्लेम असावा" ह्याची डिटेक्टिवगिरी सुरु करतात.
पण सगळं कसं आडून आडून. घटस्फोटिता ही चिडकी, निराश, हताश किंवा अतिआक्रमकच किंवा माजोरडी असली पाहिजे किंवा गरिब बिचारी, victim म्हणून जगणारी असली पाहिजे असे पब्लिक ठरवूनच टाकते.
सगळं कसं type casting.आम्ही इतर काही म्हणून पाहूच शकत नाही. दरवेळी उगीचच स्वतःच्या कृत्रिमतेने दुसर्‍यास अवघडायला लावतो.
.
गे लोकांबद्दलही हेच आणि असेच्.विचित्र नजरेने पाहणे.
.
ह्या ट्रेनिंगच्या उपदेशानंतर आठवला तो अगदि असाच मुद्दे असलेला वर्षभरापूर्वीचा TOI मधील एक लेख (हो. अजूनही TOI वाचतो.(गटणे "पूर्वी पीत होतो" असा कबुली जबाब देतो ना, तसेच.)).
त्यातही हेच मुद्दे मांडण्यात आले होते.
.
स्वतःपुरते:-
माझे स्वतःचे सांगायचे तर पूर्वी गे लोक आसपास असले तरी अंगावर घाण पडल्यासारखे वाटे.(अमुक एक व्यक्ती गे आहे हे तुला कसे कळे रे मनोबा? काही नाही, ते ऐकण्यात येइ;
क्वचित व्यक्तीने स्वतःच कधी तसे घोषित केलेले असे.) हल्ली त्यांची वैयक्तिक प्राथमिकता मान्य किंवा तो पूर्ण मुद्दा दुर्लक्षित करण्याइतकी तरी समज आहे. पण स्त्रैण वागणारे
पुरुष पाहिले की अजूनही शिसारी येते. डोक्यात जातात ही मंडळी. गंमत म्हणजे आकर्षक बांधा असलेल्या मुलीची पुरुषी हालचाल (कमी लवचिकता, अधिक मोकळेधाकळेपणा, शारिइर्क सलगी अधिक)
अजिबात डोक्यात जात नाही. उलट अधिकच आकर्षक वाटते. गंमत आहे.

ॲमी Tue, 22/10/2013 - 10:44

In reply to by मन

तू जे स्वतःबद्दल लिहल आहेस ते लिँग आणि लैँगिकता निरपेक्ष पहा अस सुचवते. तुला व्यक्तीमधला स्मार्टनेस किँवा आक्रमकता आवडते. त्या व्यक्तीच आणि तुझ लिँग, लैँगिकता याचा या आवडण्यात संबंध असेलच असं नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 22/10/2013 - 17:42

In reply to by मन

आकर्षक बांधा असलेल्या मुलीची पुरुषी हालचाल (कमी लवचिकता, अधिक मोकळेधाकळेपणा, शारिइर्क सलगी अधिक) अजिबात डोक्यात जात नाही. उलट अधिकच आकर्षक वाटते. गंमत आहे.

तुमच्या सर्व पूर्वजांना त्यासाठी दुवा द्या किंवा नावं ठेवा. हेटरोसेक्शुअल पुरुषांचा हा सर्वसाधारण गुणधर्म आहे. यात मनोबा-स्पेसिफिक काहीही नाही.

भारतीय "स्त्री एकटी आहे ह्याचा अर्थ ती available आहे" असा घेताना दिसतात.

जगभरात अभ्यासावरून हेच दिसून आलेलं आहे. सर्वसाधारण भारतीय पुरुष "आता ही आपलीच" असा समज करून घेतात, तो जगभरात सगळीकडे दिसेलच असं नाही.

मी Tue, 22/10/2013 - 18:08

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भारतीय "स्त्री एकटी आहे ह्याचा अर्थ ती available आहे" असा घेताना दिसतात.

जगभरात अभ्यासावरून हेच दिसून आलेलं आहे. सर्वसाधारण भारतीय पुरुष "आता ही आपलीच" असा समज करून घेतात, तो जगभरात सगळीकडे दिसेलच असं नाही.

छे छे एकटी नसली तरी ती/तो available असु 'शकते/तो' असा समज असायला हरकत नाही. - एक पुरोगामी

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 22/10/2013 - 18:59

In reply to by मी

पुरोगामी लोक सगळे विज्ञान आणि उत्क्रांतीविरोधी. चर्च उत्क्रांतीचा फक्त तोंडी विरोध करतं, हे पुरोगामी लेकाचे कृतीमधून विरोध करतात.

मी Wed, 16/10/2013 - 19:45

जोपर्यंत तुमच्यात आणि 'इतरांच्यात' रोटी-बेटी चे व्यवहार २/३ पिढ्यांपर्यंत होत नाहीत तोपर्यंत हा फरक बहूतांशी जाणवत रहाणार आणि तो सहाजिक आहे, मुसलमानाची जागा, गोरा, काळा, चीनी, जपानी, बुटके, उंच घेतील. हा सांस्कृतीकरणाने पडलेला फरक शिक्षणाने तुमच्या/माझ्या जसा लक्षात आला नाही तसाच इतरांच्या लक्षात येणं कठिण आहे.

ऋता Wed, 16/10/2013 - 00:42

राजीव मल्होत्रा यांनी हिंदू आणि इतर धर्म यांच्यात असणार्‍या फरकां बद्दल केलेलं विवेचन जरूर पहा/वाचा. हिंदू धर्मात दुसर्‍या धर्माच्या माणसाला पूर्ण सन्मान देण्याची सोय आहे जी ख्रिश्चन-इस्लाम आदींमध्ये तत्त्वतःच नाहिये. या कारणाने कितीही शांततेचे तह झाले तरी शांतता येणं अशक्य आहे. इतर धर्मातून जोवर ते हिंदूंचा आदर करतात असा आवाज येत नाही तोवर हिंदूंकडून कलेक्टिवली (भारतात तरी) काही समानता प्रकट होईल असे वाटत नाही. हे राजीव मल्होत्रा यांचे मत मला तरी लॉजिकल वाटले. हिंदू मेजॉरिटी नसलेल्या देशांत त्यांची काय परिस्थिती होत आहे ती सुद्धा लक्षात घेतली पाहिजे.मायनॉरिटी कोणाला मानावे आणि का याबद्द्लही त्यांचे विचार -विचार करायला लावणारे आहेत.
पर्सनल लेव्हलला सगळेच समान वागणूक देतात-किंवा किमान देऊ इच्छितात. पण जर दुसरे धर्म कायम तुम्हाला कधी एकदा आमच्यात नेतोय (नाहितर संपवतोय) अशी आशा बाळगून आहेत तोवर शांततेची अपेक्षा कशी करणार?

अगदी निधर्मी म्हणवणार्‍या 'साठेनी' सुद्धा कुठे आपल्या घरात 'इतर धर्मिय' भाडेकरू ठेवल्याचे पहाण्यात नाही. आणि त्याचे काहीच आश्चर्य नाही....सगळे तेवढ्याच खोल पाण्यात आहेत.

मन Wed, 16/10/2013 - 09:48

In reply to by ऋता

तुमचा आशय समजतो आहे, पण तपशिलाबद्दल थोडा वेगळा नजरिया....
हिंदू धर्मात दुसर्‍या धर्माच्या माणसाला पूर्ण सन्मान देण्याची सोय आहे जी ख्रिश्चन-इस्लाम आदींमध्ये तत्त्वतःच नाहिये.
हजाराहूनही जास्त, सुमारे अकराशे वर्षांपूर्वी(इस ९५०च्या आसपास) भारतावर गझनीच्या महमूदाने वारंवार(बहुतेक १७ वेळेस) हल्ले केले. त्या काळात अल बेरुनी हा मुस्लिम इतिहासकार्/अभ्यासक भारतात फिरत होता.
तेव्हा भारतात मुस्लिमांची संख्या नगण्य होती.(आजचा बलुचिस्तान, पश्चिम अफगणिस्तान आणि सिंध प्रांताचा अल्प भाग वगळता). थोडक्यात आजच्या दक्षिण आशियात १-२ टक्क्यांच्या पुढं ते नसावेत.
त्या कालात अल बेरुनीनं केलेला हिंदुंच्या मानसिकतेचा उल्लेख काय आहे? "हिंदु स्वतःत मश्गुल असतात; बाहेरच्या जगाशी देणंघेणं नसल्यासारखे. मुस्लिमांना ते हीन समजतात; मुस्लिम लढाया जिंकले तरी!"
हा असा आहे.म्हणजे समाज कसा वागतो प्रत्यक्षात त्याचं ते उदाहरण आहे; धर्मतत्वांचं अर्थातच नाही.
.
पुस्तक वाचण्याचा अवश्य प्रयत्न करेन.

ऋता Wed, 16/10/2013 - 18:38

In reply to by मन

मी सध्या हिंदू अल्पसंख्य असलेल्या भागात आहे...आजच्या दृष्टीकोनातून लिहायचे तर मलाही फिरताना असे जाणवले आहे की "इथले (प्रगत देशातले) लोक स्वतःतच मशगूल असतात आणि जगात (तिसर्‍या जगात) काय चालले आहे त्याच्याशी काहीही देणेघेणे नसल्यासारखे वागतात/रहातात. ते स्वतःला बाहेरच्या देशातून आलेल्या लोकांपेक्षा ग्रेट समजतात*(उलट लिहायचे तर इतरांना हीन समजतात)...अगदी त्यांना न जमणारी कामे बाहेरच्यांनी करून दाखवली तरी !"
* आपापल्या देशाचा संस्कृतीचा अभिमान बाळगतात यालाच एखादा माणूस 'दुसर्‍यांना हीन समजतात' अशा अर्थाने म्हणू शकतो.

असो. मला म्हणायचं आहे की एक अल्प्संख्य जेव्हा दुसर्‍या बहुसंख्य भागात फिरेल तेव्हा बेरूनींचे शब्द थोड्याफार फरकाने आढळले तरी लगेच बहुसंख्य लोक अगदी टोकाचे असमान वागले असे म्हणता येणार नाही.

कुणी लढाया जिंकल्या म्हणून एखादी विचारसरणी (फिलॉसॉफी) वरचढ मानावी असे मला वाटत नाही.

अजो१२३ Thu, 17/10/2013 - 16:59

In reply to by ऋता

हिंदू धर्मात दुसर्‍या धर्माच्या माणसाला पूर्ण सन्मान देण्याची सोय आहे जी ख्रिश्चन-इस्लाम आदींमध्ये तत्त्वतःच नाहिये.

If I have to comment on the word ' by principle' above, I think it is factually incorrect. Without exception, all religions preach all good principals. Hinduism may appear to be superior to some in this aspect, which is okay, aspect but to say that others religions are totally wanting in it is incorrect.

हिंदू मेजॉरिटी नसलेल्या देशांत त्यांची काय परिस्थिती होत आहे ती सुद्धा लक्षात घेतली पाहिजे.

In Indonesia, where Muslims form majority, Hindus as a minority are highly respected. They may be even being considered 'better' or 'superior'. If this was not enough, in case of a typical Indonesian with fair amount of understanding of history, it is highly likely that such person is very proud of his Hindu ancestry.

However, taking precaution to avoid making a sweeping comment (this time), let me say it is not the same case when applied to majority Muslims in Iran and minority Parsis there.

aaNi he saaThe koN?

बॅटमॅन Thu, 17/10/2013 - 17:43

In reply to by अजो१२३

इंडोनेशियन केस अन्य मुस्लिम मेजॉरिटी देशांच्या तुलनेत लैच युनिक आहे. आपला सख्खा शेजारी पाकिस्तान- तिकडे काय स्थिती आहे ते पहा, बाकी जगाचं नंतर पाहू. इजिप्तमध्येही कॉप्ट पंथीय लोकांवरचे अत्याचार नवे नाहीतच. बाकी अरेबियन देशांचे सोडाच. तुर्की मध्ये लै सुधारलेला पण तिकडेही आता कट्टरपंथीय जोर करून आहेत अशा बातम्या आहेत.

अजो१२३ Thu, 17/10/2013 - 18:17

In reply to by बॅटमॅन

What if the case is unique. After all it is a case of Muslim country.

Anyway, my basic point was that religious generosity is not copyright of Hinduism. They are several mixtures of several types in many countries and in many of them there is good harmony and there Hinduism is not the majority.

While I feel that Indian Hinduism is softer, etc than Indian Islam, but that argument does not convey that elsewhere in the world the majority religions have been illiberal compared to Indian Hinduism. Majority minority relations in each country are different, many better than India, many worse. No categorical observation about Indian Hinduism can be made elevating it to such level as Ruta has did.

बॅटमॅन Thu, 17/10/2013 - 18:28

In reply to by अजो१२३

हिंदवेतर धर्म कायमच वैट्ट असतात असे आजिबात म्हण्णे नै. पण त्या त्या धर्माची मेजॉरिटी असलेल्या ठिकाणी अन्यधर्मीयांना दिलेली वागणूक पाहिली तर सहिष्णू इ. कदाचित समजून यावे. खरे तर युरोप काय मध्यपूर्व काय, तिथे एक विचारसरणी रुजली की रुजतेच- आणि काही शे/हजार वर्षे गेली की समूळ नष्ट होते. याला अपवाद भारत आणि रेनेसाँनंतरचा युरोप. त्यातही भारताची केस युनिक आहे.

अवांतरः हिंदू धर्मही कदाचित भारतात रुजल्यामुळेच जितका सहिष्णू आहे तितका झाला असावा असे मला काहीवेळेस वाटते. 'आपण' आणि 'इतर' हे भारतात अगोदरपासून जितके ठळकपणे दिसते तितके अन्य देशांत अलीकडे दिसू लागलेय. त्यांना अजून याची सवय नाही. आपल्यापेक्षा वेगळे आणि तेही लै लोक असल्याने आपली विचारसरणी लादण्याचा फोर्स भारतात अन्य देशांच्या तुलनेत म्हणूनच तुलनेने मवाळ होत असावा. त्याउलट हिंदू धर्म भारतात न पसरता कुठे युरोप-अरेबिया इ. ठिकाणी असता तर तसाच अंमळ कडवा झाला असता.

आता यात चीनला कोणी ओढू पाहील-पण त्यांची केस वेगळी आहे. लोकसंख्या आपल्यासारखीच असली तरी मुख्य म्हञ्जे अब्राहमिक धर्मीय लोक तिथे ना के बराबर आहेत. भारताला सर्व कडबोळी घेऊन एकत्र नांदवायचा लै पुराना तजुर्बा आहे. चीनमध्ये हानवंशीयांची सत्ता गेली दोनेक हजार वर्षे तरी टिकून असल्याने एकारलेपण त्यांच्यासाठी स्वाभाविक असावे.

अजो१२३ Thu, 17/10/2013 - 18:33

In reply to by बॅटमॅन

Baaki Pratisaad rocak aahe.

हिंदू धर्मही कदाचित भारतात रुजल्यामुळेच जितका सहिष्णू आहे तितका झाला असावा असे मला काहीवेळेस वाटते.

he jaraa khulwoon saangta ka? Ha pEraa kaLalaa naahee.

बॅटमॅन Thu, 17/10/2013 - 18:45

In reply to by अजो१२३

हे मी प्रतिसादात अंमळ स्पष्ट केलेय. यावर विचार फार नै, थोडासा केलाय. म्हणजे बघा, वैदिकधर्मीय लोकांची जुनी वस्ती सप्तसिंधूच्या प्रदेशात होती. तिथून ते भारतभर पसरले. त्यांची संख्या जास्त नव्हती-यद्यपि ते युद्धपद्धती इ. बाबतींत सुधारलेले असले तरी. त्यामुळे त्यांची राज्ये हळूहळू अख्खा उत्तर भारत व्यापून तयार झाली, पण अन्य टोळ्या, त्यांची उपासनापद्धती, इ. शी त्यांना कायम जुळवून घ्यावे लागले. आणि वैदिक काळात एकच एक प्रदेश नव्हता की जिथे ते स्वतःचे स्पिरिच्युअल-पॉलिटिकल सेंटर बनवतील. त्यामुळे सप्तसिंधूच्या प्रदेशाशी सांस्कृतिक लिंक कायम राहिली तरी ते लोक डीसेंट्रलाईझ झाले हळूहळू.

भारतात इतके वेगवेगळ्या प्रकारचे आणि इतके जास्त लोक अनादि काळापासून आहेत, की त्या सर्वांशी जुळवून घेऊन वर आपले सांस्कृतिक/राजकीय आधिपत्य प्रस्थापायचे झाले तर सहिष्णूपणा इज द बेस्ट पॉलिसी ऑफ लीस्ट रेझिस्टन्स असे दिसल्याने हिंदू धर्म आपोआप सहिष्णू झाला, विशेषतः उपासनापद्धतीच्या बाबतीत. अन्यत्र असे इतके दिसत नाही. वैविध्य असले तरि संख्याबळ इतके नसावे. त्यामुळे अ‍ॅकल्चरेशन हे अंमळ कडवे होणे माईट हॅव बीन द नॉर्म. इकडे तसे नाही.

कदाचित हे वाटणे चूकही असेल....अजून नीट विचार केला पाहिजे. काही कौंटर एक्झांपल्स दिसताहेत सध्या, पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी. हा फक्त एक तर्क आहे, तगेल किंवा नष्टेल.

बॅटमॅन Thu, 17/10/2013 - 18:56

In reply to by अजो१२३

नष्टणे, तगणे हे शब्द 'पुण्यामुम्बैकडच्या ष्ट्याण्डर्ड" मराठीतही अस्सेच वापरले जातात-किमानपक्षी ग्रांथिक भाषेत तरी. :)

नितिन थत्ते Thu, 17/10/2013 - 19:45

In reply to by बॅटमॅन

हिंदू (म्हणजे जे काय असेल ते) तथाकथित सहिष्णु असण्याचे कारण इथल्या समाज रचनेत आहे. एक म्हणजे हिंदू ही भारतातल्या कोणाचीच आयडेंटिटी नाही. म्हणजे भारताबाहेरचे लोक इथल्या लोकांना हिंदू म्हणत तसे इथले लोक काही स्वतःला हिंदू म्हणवत नसत. भारतातल्या लोकांची आयडेंटिटी म्हणजे जात आणि त्याअंतर्गत कुटुंब. त्यादृष्टीने प्रत्येकच जातीचे लोक एकूणात अल्पसंख्यच. त्यामुळे आपले आचारधर्म कोणावर लादण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे इतरांबाबत सहिष्णु असणे हे नाइलाजास्तव भागच होते.

इन प्रिन्सिपल म्हणावे तर सर्व स्मृती नियम सांगतात पण पुढे "तरीही शास्त्रापेक्षा कुळाचार श्रेष्ठ" असे सांगून टाकतात. म्हणजे पुन्हा लादणे ही कन्सेप्ट नाहीच.

बाकी भारतीय सहिष्णु होते हे धार्मिक आचारविचाराबाबतच कदाचित सत्य असावे. बाकी जातीच्या उतरंडीतील पर्सिक्युशन सर्वज्ञातच आहे.
[शैव आणि वैष्णवांच्या दंगली नित्यनेमाने होत असत असे कुठेकुठे वाचले आहे पण जालावर त्यासंबंधी विशेष काही वाचायला मिळत नाही].

बॅटमॅन Thu, 17/10/2013 - 19:49

In reply to by नितिन थत्ते

बाकी सहमतच. नेहमीचेच मुद्दे आहेत अन त्यात खोट काढण्याला जागाही नाहीच.

शैव-वैष्णव दंग्यांबद्दलः हे फक्त दक्षिणेत, त्यातही तमिळनाडूतच झाल्याचे उल्लेख सापडतात. आणि यांच्या इंटेन्सिटीबद्दल उलटसुलट मते तमिऴ मित्रांकडून ऐकायला मिळतात. पण नक्की एकच एक असे पुस्तक मिळत नाही. काही आचार्यांच्या चरित्रात अधूनमधून उल्लेख येतात तेवढे वगळता फारसे काही सापडत नाही.

पाहतो काही मिळाले तर.

'न'वी बाजू Thu, 17/10/2013 - 21:50

In reply to by बॅटमॅन

शैव-वैष्णव दंग्यांबद्दलः हे फक्त दक्षिणेत, त्यातही तमिळनाडूतच झाल्याचे उल्लेख सापडतात. आणि यांच्या इंटेन्सिटीबद्दल उलटसुलट मते तमिऴ मित्रांकडून ऐकायला मिळतात. पण नक्की एकच एक असे पुस्तक मिळत नाही. काही आचार्यांच्या चरित्रात अधूनमधून उल्लेख येतात तेवढे वगळता फारसे काही सापडत नाही.

इतरत्र दंगे होत नसतीलही कदाचित, परंतु सहिष्णुता होती, असे म्हणता येईल काय?

दक्षिण महाराष्ट्रातील / कानडी आघाताने मराठी बोलणार्‍या मुलखातील वैष्णवांच्या कट्टरतेचे किस्से लहानपणी पूर्वजांकडून ऐकलेले आहेत. ('आम्ही'ही मूळचे 'त्यांच्या'तलेच. माझा त्या भागाशी /त्या संस्कृतीशी कधीही व्यक्तिशः थेट संबंध आलेला नसला, तरी.) तेथे काय म्हणे मराठीतून बोलताना साधे 'कपडा शिवायला टाकला' म्हणायचे नाही, 'कपडा वैष्णवायला टाकला' म्हणायचे; सोवळ्यात असताना 'मला शिवू नको' म्हणायचे नाही, 'मला वैष्णवू नको' म्हणायचे. चुकून तेवढेसुद्धा शिवाचे नाव घेतले तरी पाप लागते म्हणे! बरे, ही माणसे तशी (एकमेकांना किंवा इतरांना) कधी शिव्या देत नसतील, अशातलाही भाग नाही - खुद्द आमचे पूर्वज चांगलेच वैष्णवराळ असल्याचे आठवते. आता याला काय म्हणाल?

(आमच्या पूर्वजांचे सोडा. पु.लं.च्या 'रावसाहेबां'च्या भाषेतील वैष्णव्या आठवत नाहीत? सांगायचा मुद्दा, वैष्णव शिव्या द्यायचे. एरवी मात्र शिवाचे चुकूनही नाव नको!)

मी Thu, 17/10/2013 - 22:05

In reply to by 'न'वी बाजू

तेथे काय म्हणे मराठीतून बोलताना साधे 'कपडा शिवायला टाकला' म्हणायचे नाही, 'कपडा वैष्णवायला टाकला' म्हणायचे; सोवळ्यात असताना 'मला शिवू नको' म्हणायचे नाही, 'मला वैष्णवू नको' म्हणायचे.

सहमत, हे वैष्णव जमीन पुसताना देखिल उभी पुसतात, आडवी पुसली तर शिवाचे भस्माचे पट्टे वाटायला नकोत म्हणे. आता एकाची उभी दुसर्‍याची आडवी हे सांगायला नको, पण विनोदच तो.

बॅटमॅन Thu, 17/10/2013 - 23:54

In reply to by 'न'वी बाजू

दक्षिण महाराष्ट्रातील / कानडी आघाताने मराठी बोलणार्‍या मुलखातील वैष्णवांच्या कट्टरतेचे किस्से लहानपणी पूर्वजांकडून ऐकलेले आहेत. ('आम्ही'ही मूळचे 'त्यांच्या'तलेच. माझा त्या भागाशी /त्या संस्कृतीशी कधीही व्यक्तिशः थेट संबंध आलेला नसला, तरी.) तेथे काय म्हणे मराठीतून बोलताना साधे 'कपडा शिवायला टाकला' म्हणायचे नाही, 'कपडा वैष्णवायला टाकला' म्हणायचे; सोवळ्यात असताना 'मला शिवू नको' म्हणायचे नाही, 'मला वैष्णवू नको' म्हणायचे. चुकून तेवढेसुद्धा शिवाचे नाव घेतले तरी पाप लागते म्हणे! बरे, ही माणसे तशी (एकमेकांना किंवा इतरांना) कधी शिव्या देत नसतील, अशातलाही भाग नाही - खुद्द आमचे पूर्वज चांगलेच वैष्णवराळ असल्याचे आठवते. आता याला काय म्हणाल?

हा हा हा, द्या टाळी. आम्हीही मूळचे त्यातलेच. सुदैवाने गेल्या ४-५ पिढ्या महाराष्ट्रदेशी काढल्यामुळे असला वैष्णवराळपणा कधी अनुभवला नाही. घरी तर नाहीच नाही. आजोळचे तर सगळेच शैव. तिथेही कधी याचा बाऊ व्हायचा नाही, मात्र असे किस्से सांगितले जायचे. हार्डकोअर वैष्णव दिसतो कसा आननी हे पहायलाही तशी अनेक वर्षे गेली.

हां तर मूळ मुद्दा: कुणी व्यक्ती वैष्णव न असता शैव असेल म्हणून त्याला ठार न मारणे ही माझ्यापुरती तुलनेने बरी सहिष्णुताच आहे. असो.

ऋता Thu, 17/10/2013 - 20:25

In reply to by नितिन थत्ते

'एक म्हणजे हिंदू ही भारतातल्या कोणाचीच आयडेंटिटी नाही. म्हणजे भारताबाहेरचे लोक इथल्या लोकांना हिंदू म्हणत तसे इथले लोक काही स्वतःला हिंदू म्हणवत नसत. '
इथे सरसकटीकरण करण्याबद्द्ल भरपूर वाद होतात. ते हिरीरीने घालणार्‍यातली मी नेहमीची खेळाडू नाही...पण ही वाक्य अती आहेत. भारता बाहेरच्या लोकांच्या लेखी तपशीलांना काय महत्त्व असते? मला मी भरतातून आले आहे हे बाहेरच्यांना सांगायला आणि त्यांना स्मजायला सोपे असते....मी माझ्या तालुका गाव पातळीवर पत्ता सांगितला तर त्यांच्यासाठी ती माहिती डोक्यावरून जाणारी असते. तशीच हिंदू अशी ओळख असणे याबद्द्ल एक्वेळ म्हणता येइल. भारतातही मी स्वतःला हिंदू म्हणवते आणि अनेक जे तसे म्हणवतात त्यांना ओळखते. तुम्ही कोणत्या भारतात रहाता याबद्द्ल मला शंका आहे--जाणून घ्यायची उत्सुकता अजिबात नाही.

नितिन थत्ते Thu, 17/10/2013 - 20:51

In reply to by ऋता

>>तुम्ही कोणत्या भारतात रहाता याबद्द्ल मला शंका आहे--जाणून घ्यायची उत्सुकता अजिबात नाही.

पण तुम्हाला जाणून घ्यावेच लागेल. ज्याच्या वायव्येकडे पाकिस्तान आहे आणि दक्षिणेकडे श्रीलंका हा देश आहे त्या भारतात मी राहतो.

माझ्या प्रतिसादातील हिंदू ही आयडेंटिटी नसण्याचा उल्लेख हा ऐतिहासिक काळापासून चालत आलेल्या सिस्टिमचे वर्णन आहे. कदाचित गेल्या चार-पाच शतकांपासून भारतालले लोक स्वतःला हिंदू म्हणवत असतीलही. पण तरीही "आपण सारे हिंदू" अशी कल्पना फार जुनी नाही.

बाहेरचे लोक जैनांना-बौद्धांना शीखांनासुद्धा (आणि कदाचित भारतात राहणार्‍या मुसलमानांनाही) हिंदूच म्हणत असतील. पण ते काही स्वतःला हिंदू म्हणवत नसतील. वेगवेगळे ब्राह्मण, शेतकरी, जमीनदार, आदिवासी वगैरे स्वतःला हिंदू म्हणत नसतील. आपल्यातले सेपरेशन हे प्राणपणाने टिकवण्याची गोष्ट होती. ब्राह्मण आळी, तेली गल्ली, धोबी आळी, भोईवाडा या गावागावातल्या वस्त्या ही त्याचीच साक्ष देतात.

आजचे (ख्रिश्चन, शीख, मुसलमान नसलेले) भारतीय स्वतःला हिंदू म्हणवून घेऊ लागले आहेत. पण ती काही (ऐतिहासिक) खरी ओळख नाही. राजकीय सोयीसाठी निर्माण झालेली ती ओळख आहे. तशी ओळख निर्माण होणे चांगले आहे हे खरे.

ऋता Thu, 17/10/2013 - 21:38

In reply to by नितिन थत्ते

भारता बाहेरचे लोक भारतातल्यांना ती त्यांची आयडेंटिटी नसाताना तसे ओळखत होते म्हणजे कमालच आहे....असो.
खरे खोटे नि मुळात काय खरे वगैरे बद्दल मी माझ्या सवडीने जाणून घेइन. असो. पाचशे नि हजारो वर्षांपूर्वी नक्की सगळे कसे होते याबद्दल अगदी ठाम असलेल्यांचं कौतुक वाटतं. माझा कशावरच पूर्ण विश्वास बसत नाही.
प्रतिसादात काहीही सरसकट विधाने आहेत ती निदर्शनास आणून द्यायची होती. ती कोणत्या पुस्तकांच्या वाचन/अभ्यासावर आधारित आहेत हे संगितलेत तर बरे-ते स्पेसिफिक दिलेत तर सोयीचं पडेल.

बाकी मुद्दे मुद्दा सोडून आहेत माझ्यामते.

नितिन थत्ते Thu, 17/10/2013 - 21:52

In reply to by ऋता

>>भारता बाहेरचे लोक भारतातल्यांना ती त्यांची आयडेंटिटी नसाताना तसे ओळखत होते म्हणजे कमालच आहे....असो.

परक्या माणसाला ना देण्यासाठी त्याची अ‍ॅक्च्युअल आयडेंटिटी जाणायची गरज नसते. दक्षिण भारतीयाला (बरेच)इतर भारतीय सरसकट मद्रासी म्हणतात. तो कन्नड/तेलुगु/तमीळ/मल्याळी की कोण आहे हे पहात नाहीत तसेच हे आहे. (अमेरिकेत मिस अमेरिकाला अरब म्हटले गेले तसे).

ऋता Thu, 17/10/2013 - 22:11

In reply to by नितिन थत्ते

' भारता बाहेरच्या लोकांच्या लेखी तपशीलांना काय महत्त्व असते? मला मी भरतातून आले आहे हे बाहेरच्यांना सांगायला आणि त्यांना स्मजायला सोपे असते....'
मी आधी हेच म्हटले होते. हिंदू ही सगळ्यात डीटेल्ड ओळख असे मी म्हणतच नाहिये. पण तुम्ही जे हिंदू वगैरे काहीच कोणत्याच लेव्हलला नसल्याचे म्हणत होतात त्याला माझा विरोध आहे.
तुम्ही तुमचा मुद्दा काय होता तो परत वाचा.

'न'वी बाजू Fri, 18/10/2013 - 16:26

In reply to by नितिन थत्ते

माझ्या प्रतिसादातील हिंदू ही आयडेंटिटी नसण्याचा उल्लेख हा ऐतिहासिक काळापासून चालत आलेल्या सिस्टिमचे वर्णन आहे. कदाचित गेल्या चार-पाच शतकांपासून भारतालले लोक स्वतःला हिंदू म्हणवत असतीलही. पण तरीही "आपण सारे हिंदू" अशी कल्पना फार जुनी नाही.

बाहेरचे लोक जैनांना-बौद्धांना शीखांनासुद्धा (आणि कदाचित भारतात राहणार्‍या मुसलमानांनाही) हिंदूच म्हणत असतील. पण ते काही स्वतःला हिंदू म्हणवत नसतील. वेगवेगळे ब्राह्मण, शेतकरी, जमीनदार, आदिवासी वगैरे स्वतःला हिंदू म्हणत नसतील. आपल्यातले सेपरेशन हे प्राणपणाने टिकवण्याची गोष्ट होती. ब्राह्मण आळी, तेली गल्ली, धोबी आळी, भोईवाडा या गावागावातल्या वस्त्या ही त्याचीच साक्ष देतात.

आजचे (ख्रिश्चन, शीख, मुसलमान नसलेले) भारतीय स्वतःला हिंदू म्हणवून घेऊ लागले आहेत. पण ती काही (ऐतिहासिक) खरी ओळख नाही.

शिवाजीमहाराजांनी गागाभट्टाकडून - म्हणजे एका परधर्मीयाकडून! - राज्याभिषेक करवून घेतला. ओन्ली इन इंडिया!
==============================================================================================

शिवाजीमहाराज आणि गागाभट्ट यांच्यात कॉमन धार्मिक आयडेंटिटी नव्हती, म्हणजे शिवाजीमहाराजांच्या दृष्टीने गागाभट्ट हा परधर्मीय झाला. राज्याभिषेक हा माझ्या कल्पनेप्रमाणे धार्मिक विधी असावा. (चूभूद्याघ्या.) आपल्या आयुष्यातल्या एका अतिशय महत्त्वाच्या धार्मिक विधीची पूर्तता एका परधर्मीयाकडून करवून घेणार्‍या शिवाजीमहाराजांच्या (अगोदरच परमटौटेड) सर्वधर्मसमभावी क्रेडेन्शियल्ज़ना या घटनेमुळे आणखी चार चाँद लागावेत!

नितिन थत्ते Fri, 18/10/2013 - 16:50

In reply to by 'न'वी बाजू

तसे नाही. विस्कळीत समाजात एकमेकावर* (उपासनापद्धतीची) लादालादी नव्हती.
मात्र राज्याभिषेक ब्राह्मणाकडून करून घ्यायचा असतो ही सर्वमान्य रूढी होती. परधर्मियाकडून राज्याभिषेक करून घेतला अशी परिस्थिती नव्हती. [शिवाजीच्या काळात हिंदू म्हणजे वैदिक** असे समीकरण झाले असू शकेल]

*वैदिकांची अवैदिकांवर, वैदिकांमधल्या एका जातीची दुसर्‍या जातीवर.
**वैदिक पेक्षा पारशी, मुसलमान, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, शिख नाहीत ते हिंदू असे समीकरण.

'न'वी बाजू Fri, 18/10/2013 - 17:00

In reply to by नितिन थत्ते

मात्र राज्याभिषेक ब्राह्मणाकडून करून घ्यायचा असतो ही सर्वमान्य रूढी होती. परधर्मियाकडून राज्याभिषेक करून घेतला अशी परिस्थिती नव्हती.

राज्याभिषेक ब्राह्मणाकडून करवून घेणे हे राज्याभिषेक परधर्मीयाकडून करवून घेण्यासमान नाही, ते (कोणत्यातरी पातळीवर) कॉमन धार्मिक आयडेंटिटी असल्याखेरीज? (भलेही उपासनापद्धतींत अंतर्गत वैविध्य असो, आणि सामाजिक पातळीवर अगदी अंतर्गत बेटीव्यवहार बंद असो.)

नितिन थत्ते Fri, 18/10/2013 - 17:35

In reply to by 'न'वी बाजू

हिंदू अशी आयडेंटिटी नव्हती या आर्ग्युमेंटचा उगम "इतरांप्रती हिंदूंची अलेज्ड सहिष्णुता" या स्टेटमेंट/कन्जेक्चर पासून सुरू झाली. हिंदूंनी हिंद्वेतरांवर आपली उपासना पद्धती लादली नाही कारण भारतीयांची हिंदू अशी आयडेंटिटी नव्हती आणि सर्व हिंदूंची एक (इतरांवर लादावी अशी) उपासनापद्धतीही नव्हती. आणि कुहलीही एक "संपूर्ण उपासनापद्धत" घेतली तर ती पाळणारे कायम अल्पसंख्यच असतील.

रोटीबेटीव्यवहाराखेरीज इतर व्यवहार परस्परांमध्ये होतच असत. त्यात तर सहिष्णुतेचा काहीच संबंध नाही.

मुसलमान-ख्रिश्चन-शीख-बौद्ध-जैन-पारशी वगैरे सोडून उरलेले आपण सारे हिंदू ही कल्पना शिवाजीच्या काळापर्यंत रुजलेली असू शकेल हे मी मान्यच करायला तयारच आहे. [मुसलमानांनी त्यांची उपासना पद्धती इथे लादायला सुरुवात केल्यावर ती भावना निर्माण झाली असू शकेल].

'न'वी बाजू Fri, 18/10/2013 - 17:46

In reply to by नितिन थत्ते

ठीक. मुसलमान येण्यापूर्वीचीच परिस्थिती विचारात घेऊ.

१. 'ब्राह्मणाकडूनच राज्याभिषेक करवून घ्यायचा' ही पद्धत पाळणार्‍या तत्पूर्वीच्या राजांपैकी (कदाचित काही तुरळक अपवाद वगळल्यास) किती टक्के राजे स्वतः ब्राह्मण होते?

२. राज्याभिषेक करणारे ब्राह्मण हे नेहमी स्थानिकच असत का? (ही उपशंका. कदाचित इर्रेलेवंट.)

बॅटमॅन Fri, 18/10/2013 - 17:55

In reply to by 'न'वी बाजू

ब्राह्मण राजांची उदाहरणे लै कमी, पण आहेत. पुष्यमित्र शुंग ब्राह्मण होता. गुर्जर-प्रतिहार राजवटीचा संस्थापक ब्राह्मण असल्याचे आठवते. दक्षिणेतले पल्लव राजेही मूळचे ब्राह्मण. यांपैकी पल्लव राजांचे नंतर क्षत्रियीकरण झाले ते पाहणे रोचक ठरेल. एका तमिऴ जालमित्राने सांगितल्यानुसार सुरुवातीच्या १-२ पिढ्यांत नावानंतर -शर्मा हा सफिक्स लागे तो पुढे बदलून -वर्मा असा झाला.

बॅटमॅन Fri, 18/10/2013 - 16:40

In reply to by नितिन थत्ते

सेपरेशन प्राणपणाने टिकवले पण ते कुठल्या लेव्हलवर?

बेटीव्यवहार बंद- हे मान्यच.

मात्र रोटीव्यवहार अन रोजबरोजचा काँटॅक्ट सरसहा बंद नव्हता. तथाकथित पूर्वास्पृश्य यातून अर्थातच वगळले आहेत. पण जुने सोर्सेस पाहिले तर गावगाड्यात त्यांचीही एक सेपरेट जागा होती आणि त्यांचा काही ठिकाणी वेगळा मानही असायचा. अँड्रे बीटेल म्हणतो त्याप्रमाणे अलीकडे सबाल्टर्न लोकांबद्दल आधीपेक्षा सहानुभूतीने बोलले जात असले तरी त्यांचा सहवास कुणालाही नको असतो. त्याउलट आधी भले त्यांना हीन समजत असतील पण त्यांबरोबर रहायची लोकांना सवय होती. आणि धर्माधारित बंधने पाळूनही आपसांत चांगले संबंध जुळवल्याची उदाहरणेही आहेत.

आपण सारे हिंदू अशी विचारधारा किमान भक्ती चळवळीपासून सुरू झाली असे म्हणता यावे. त्याआधीही पाहिले तर देवतांचे एकीकरण करून समाजाचे जमेल तसतसे एकीकरणच केले गेले. हे एकीकरण पोलिटिकली मोबिलाईझ केल्याची उदाहरणे दिसत नसतील म्हणून ते नव्हतेच असे कसे म्हणता यावे?

ऋता Thu, 17/10/2013 - 19:44

In reply to by अजो१२३

Without exception, all religions preach all good principals.
हा मुद्दाच नाहिये. तुमच्या धर्माच्या नसलेल्या माणसाचं काय करायचं किंवा त्याला काय समजायचं या बद्द्ल मी म्हणत आहे. काफिर, जिहाद याला हिंदूंमध्ये पॅरॅलल असे काही आहे का?

काळा मठ्ठ बैल … Fri, 18/10/2013 - 11:01

In reply to by ऋता

काफिर, जिहाद याला हिंदूंमध्ये पॅरॅलल असे काही आहे का?

ताई इकडे सगोत्र लग्न केलं तरी जीव जातो.
आणि जातिबाहेर केलं तरी.
घरचाच जिहाद जास्त झालाय
मग बाहेरच्यांशी जिहाद-जिहाद खेळायला वेळ कधी भेटणार?

ऋता Fri, 18/10/2013 - 22:40

In reply to by काळा मठ्ठ बैल …

'मग बाहेरच्यांशी जिहाद-जिहाद खेळायला वेळ कधी भेटणार?'
म्हणजे जो काय खेळ म्हणताय तो नाही खेळत ना ते? (-असतील तर माहित करून घ्यायला आवडेल). तेवढाच माझा मुद्दा आहे. बाकी त्यांनी अंतर्गत कोणते खेळ खेळावेत ते बदलत जाईलच.

नितिन थत्ते Sat, 19/10/2013 - 19:19

In reply to by ऋता

बाहेरच्यांशी जिहाद खेळत नाहीत म्हणजे "सहिष्णु" ठरत नाहीत.

बाहेरच्यांशी जिहाद खेळायला आतले-बाहेरचे अशी स्पष्ट कन्सेप्ट हवी. तीच नव्हती.

ऋता Sat, 19/10/2013 - 20:56

In reply to by नितिन थत्ते

मला 'आय्डेंटिटी' या पुस्तकी कल्पने बद्द्ल काही माहित नाही त्यामुळे मी त्याबद्द्ल (हिंदू होते की नव्हते वगैरे) प्रतिसाद देत नाही. मला तुमच्या पक्क्या कल्पनांचा स्रोत हवा आहे पण तुम्ही तो दिलेला नाही. असो.
मी हिंदू सहिष्णु आहेत की नाही त्याबद्द्ल काहीच म्हणत नाहिये.हे लेबल तुम्ही लादताय. तेही असो.

माझा इतकाच मुद्दा आहे की हिंदू (-म्हणून ज्या काही जाती प्रकार होते त्यांच्या) कुणाच्यातच जिहाद हा प्रकार नाही-किंवा इतर धर्मियांशी काय व्यवहार करावा यबद्द्ल काही शत्रुत्त्वाची अशी शिकवणी नाही. त्यामुळे व्यवहारात बराच फरक पडतो.
हा मुद्दा मांडण्याचे कारण असे: लेखाचे जे शीर्षक आहे त्या प्रश्नाचे उत्तर यातच असण्याची शक्यता आहे की 'आपण'(हिंदू म्हटलेलं चालत नाहीसं दिसतय त्यामुळे ते जे कोणी इस्लाम, ख्रिस्ती, शीख, बौद्द्ध वगैरे वगैरे नसलेले) सामुदायिक लेव्हलला असुरक्षित असल्याची एक भावना आहे जी कृत्रीम समानतेच्या पोकळ संवादात रूपांतरित होते. लेखक ते तसे असल्याबद्द्ल खंत व्यक्त करत आहे असे काही वाटले-किंवा ते तसे असण्यामध्ये 'आपण'(म्हणजे तेच ते इतर कोणी नसलेले असे ते आपण) फारच कुठेतरी कमी पडतोय समानता आणण्यात असे काही मला लेखातून वाटले. म्हणून मला म्हणायचे आहे की समानता आणण्यासाठी जबाब्दारी फक्त बहुसंख्यांवर नसून त्यांचा विश्वास संपादन करण्याची जबाबदारी अल्पसंख्यांवरही आहे.

नितिन थत्ते Sat, 19/10/2013 - 22:05

In reply to by ऋता

>>हिंदू (-म्हणून ज्या काही जाती प्रकार होते त्यांच्या) कुणाच्यातच जिहाद हा प्रकार नाही-किंवा इतर धर्मियांशी काय व्यवहार करावा यबद्द्ल काही शत्रुत्त्वाची अशी शिकवणी नाही.

हा क्लेम रोचक आणि धाडसी आहे.

अवांतरः तुम्ही मुळात अरुण जोशींनी दिलेल्या इंडोनेशियातील मुस्लिमांच्या सहिष्णुतेविषयक प्रतिसादाला प्रतिवाद म्हणून 'हिंदूंमध्ये काफिर जिहाद याला पॅरॅलल काही आहे का' असं विचारलं ज्याअर्थी तसं हिंदू धर्मात काही नाही याचा अर्थ हिंदू इतर धर्मियांबाबत सहिष्णु असतात (आणि मुसलमान नसतात) असे तुमचे म्हणणे आहे. सहिष्णु हे लेबल तुम्ही लावलं नाही या म्हणण्याला काही आधार नाही.

ऋता Sat, 19/10/2013 - 23:26

In reply to by नितिन थत्ते

'>>हिंदू (-म्हणून ज्या काही जाती प्रकार होते त्यांच्या) कुणाच्यातच जिहाद हा प्रकार नाही-किंवा इतर धर्मियांशी काय व्यवहार करावा यबद्द्ल काही शत्रुत्त्वाची अशी शिकवणी नाही.

हा क्लेम रोचक आणि धाडसी आहे.'

माझा पहिला प्रतिसाद लेखकाने दिलेल्या चर्चा विषयाशी निगडीत आहे. मी राजीव मल्होत्रा(हा व्हिडियो ११:२३ मिनिटापासून पहा) यांनी हा मुद्दा दिलेला आहे(फक्त या व्हिडिअयोत नव्हे तर इतरही वाचन केले त्यांनी केलेले तर वेगवेगळ्या शब्दात येतो) तो मला तर्क शुद्ध वाटला असे म्हटले आहे. तो मुद्दा लेखाकाने दिलेल्या चर्चा विषयाशी मी जोडला एवढेच.
आणखीन एक प्रतिसाद माझा वाचलात तर कळेल की मी हिंदूं बद्द्ल मला माहित नसलेल्या गोष्टी जाणून घ्यायला उत्सुक आहेच. तुम्हाला जिहाद काफिर वगैरे सारख्य समांतर हिंदूंमधल्या कल्पना माहित असतील तर सांगा.

मी या पलिकडे काही प्रतिसाद देणार नाहिये या चर्चेत कारण अवांतर प्रतिसाद आणि तेच ते परत सांगण्याचे प्रतिसाद इतके झालेत की वीट आला आहे. मुद्द्यांबद्द्ल चर्चा नसून इतरच काही मोटिवने लोक लिहितात असा एक विचार येऊ लागला आहे मनात.

आडकित्ता Sun, 02/03/2014 - 14:58

In reply to by ऋता

मुद्दा सहिष्णू असण्या/नसण्याचा आहे, अन ह्या ताई फक्त जिहाद अन काफिरवर अडकून पडलेल्या आहेत.

बाटवून मुसलमान वा ख्रिश्चन बनवायची सोय त्या धर्मात आहे, तिथे काफिर किंवा पागन/पेगन किंवा धर्मयुद्ध/जिहाद ही कन्सेप्ट आज आहे. अ‍ॅक्चुअली ती आज फारशी जिवंत असलेली मला तरी दिसत नाहिये- म्हणजे तलवारीच्या बळावर धर्म वाढविणे. कदाचित आमचा अभ्यास नसावा.

बाटवून हिंदू बनवायची सोय द्या, धर्मयुद्धे अन फतवे काढायला एका पायावर तयार असलेले अनेक लोक दाखवतो.

बाकी बौद्ध धर्माचा वाढता पगडा संपविण्यासाठी हिंदूंनी फक्त चर्चाच केल्या या मतावरही ताई ठाम असतीलच. त्या बाबीचा जिहादशी काडीचाही संबंध नाहीच बहुतेक.

बॅटमॅन Sun, 02/03/2014 - 17:39

In reply to by आडकित्ता

बाकी बौद्ध धर्माचा वाढता पगडा संपविण्यासाठी हिंदूंनी फक्त चर्चाच केल्या या मतावरही ताई ठाम असतीलच. त्या बाबीचा जिहादशी काडीचाही संबंध नाहीच बहुतेक.

नसतीलही. पण नक्की काय केलं याबद्दल एखाददुसरा तुरळक उल्लेख वगळता आजवर काहीच वाचनात आलेले नाही. तुमच्या वाचनात काही आलेले असेल तर कळवावे ही इणंती.

आडकित्ता Sun, 02/03/2014 - 23:34

In reply to by बॅटमॅन

जे काही केलं, ते हिंदू धर्मप्रसारासाठीच केलं, हे बरोबर की चूक? @ ब्याटोबा.
त्यात तलवारी घेऊन केलेल्या कत्तली असोत, विहिरीत पाव फेकणे असो, की गोड बोलून, किंवा तत्वज्ञान पटवून कळपात ओढणे असो. हे 'जिहाद' वा तत्सम नव्हेच काय?
ताईंना धर्मयुद्धांशी सिमिलर असे आम्हा हिंदूत नव्हतेच हो! अशा वाक्याची पक्की भुरळ पडली असावीसे वाटले म्हणून एक उदाहरण दिले इतकेच. शिवाय, त्या बौद्धविनाशा/विजया-नंतरच 'हिंदू' हा शब्द प्रचलित झाला असेही ऐकिवात आहेच.

त्यानंतर बाटवून हिंदू बनवणे बंद केले/झाले. ते परत सुरू केले तर हिंदूधर्मयोद्धे लैऽ मोट्ठ्या प्रमाणात फुरफुरायला आजही तयार आहेत, या वाक्या बद्दल आपले काय मत?

शिवाय बाटवून हिंदू केले तर कोणत्या जातीत आणावे, हा डायलेमा आहेच. त्यामुळेच थत्तेचाचांचे, 'आपली(म्ह्णजेच हिंदूंची, म्हणजेच, 'हिंदुस्थान' नामक भूभागातील लोकांची) मूळ ओळख = जातीची ओळख' हे प्रतिपादन पटले.

बॅटमॅन Mon, 03/03/2014 - 07:48

In reply to by आडकित्ता

धर्मप्रसारासाठी केलं हे एकवेळ पटणीय आहे. त्याची तुलना जिहादशी करणे तर्कदुष्ट आहे. तसे तर बौद्धांनीही धर्मप्रसार दणकून केलेला होता, पण त्याला जिहाद कोणी म्हणत नाही. असो.

बाकी फुरफुरणार्‍या हिंदुधर्मयोद्ध्यांबद्दल साशंक आहे हे मत नोंदवून मी आपली रजा घेतो.

बॅटमॅन Tue, 04/03/2014 - 01:05

In reply to by आडकित्ता

धर्मप्रसारासाठी अवलंबलेल्या कुठल्याच मार्गांत तत्त्वतः फरक नाही कारण अंतिम उद्देश सारखाच आहे इ. म्हणायचे असेल तर असो.

आडकित्ता Wed, 05/03/2014 - 00:33

In reply to by बॅटमॅन

एक्झॅक्टली तेच म्हणायचे आहे.
अन अमुक धर्मात प्रसार करतात, म्हणून माझा धर्म चांगला, असे सांगण्याच्या तर्काबद्दल आक्षेप आहे, इतकेच. कारण बाटवून माझ्या धर्मात घेता येत नाही, हे आजही सत्य आहेच.

बॅटमॅन Wed, 05/03/2014 - 01:23

In reply to by आडकित्ता

कारण बाटवून माझ्या धर्मात घेता येत नाही, हे आजही सत्य आहेच.

नाही.

याचा व्हिडो.

अन 'बाटून' हिंदू न होणे हे गेल्या हजार वर्षांपुरतेच खरे आहे, पण तो वेगळा विषय आहे. तूर्तास फक्त थाई ब्राह्मणांचे उदा. देतो अन थांबतो.

ही उदा. सोडली, तर एकूण असहमती दिसत नाही.

आडकित्ता Thu, 06/03/2014 - 20:49

In reply to by बॅटमॅन

ब्याटोबा,

तुमच्याशी चर्चा करताना असहमती सहसा येत नाही, याचे कारण तुम्ही व्यासंगी व बेसिकली ओपन माईंडेड आहात. मनाची कवाडे बंद करून त्यांची झापडे तुम्ही अद्याप बनविलेली मला तरी दिसली नाहीत. गब्बरसिंगासारखे थोडे अनकन्व्हेन्शनल असते तुमचे, पण ते माझ्या समजूतीत बसेल इतकेच अत्तापर्यंत दिसलेले आहे.

आता 'न होणे हे गेल्या हजार वर्षांपुरतेच खरे आहे' हा वाक्प्रयोग करताना, 'हिंदू' हा शब्दप्रयोग 'धर्म' या अर्थाने आदिशंकराचार्यांनंतर स्वीकारला गेला असे जर समजले, तर, किंवा तरीही, आपला (होय, मीही हिंदू आहे.) हिंदू धर्म व्यक्तिंच्या कन्व्हर्शन बाबतीत अत्यंत रिजिड, अन त्याचवेळी धर्मसमुदायांना पोटात घालून घेण्याबद्दल अती सहिष्णू दिसतो (जैन, बौद्ध हे धर्म नाहीतच, जस्ट पंथ आहेत हो हिंदूंचे.. इ.) हा प्याराडॉक्स / विरोधाभास : कसाकाय विषद / एक्स्प्लेन करायचा?

बॅटमॅन Fri, 07/03/2014 - 04:35

In reply to by आडकित्ता

अपडेटः आपली चर्चा पुन्हा वाचली व त्यानंतरचे मत पहिल्या परिच्छेदात अपडेटवतो. साध्य इतके महत्त्वाचे आहे का, की ज्यापुढे साधने कुठली? हा प्रश्न गैरलागू व्हावा? अन असे पर्सेप्शन इतर ठिकाणी आहे की फक्त इथे? असेल तर का? धर्मप्रसारार्थ केल्या जाणार्‍या कत्तलींत आणि तदर्थच केल्या जाणार्‍या शांततामय प्रचारास सारखेच लेखण्याचे कारण काय?

अशा ठिकाणी बहुतेकदा एखादी पिढीच लै त्रास भोगते, त्यांपुढील पिढीस इतका त्रास होत नै. २-३ पिढ्यांनंतर तर जणू आलबेलच होते. पण म्हणून हाईंडसाईटमध्ये त्या पिढीच्या यातनांना काहीच किंमत नाही? तुमच्या मताचे हे एक्स्टेन्शन मला तर्कदुष्ट वाटते, सबब असहमती नोंदवतो.

अन

आता 'न होणे हे गेल्या हजार वर्षांपुरतेच खरे आहे' हा वाक्प्रयोग करताना, 'हिंदू' हा शब्दप्रयोग 'धर्म' या अर्थाने आदिशंकराचार्यांनंतर स्वीकारला गेला असे जर समजले, तर, किंवा तरीही, आपला (होय, मीही हिंदूच आहे.) हिंदू धर्म व्यक्तिंच्या कन्व्हर्शन बाबतीत अत्यंत रिजिड, अन त्याचवेळी धर्मसमुदायांना पोटात घालून घेण्याबद्दल अती सहिष्णू दिसतो (जैन, बौद्ध हे धर्म नाहीतच, जस्ट पंथ आहेत हो हिंदूंचे.. इ.) हा प्याराडॉक्स / विरोधाभास : कसाकाय विषद / एक्स्प्लेन करायचा?

हम्म. गुप्तोत्तर काळात क्रमाक्रमाने जातीव्यवस्था अधिक रिजिड होत गेली, कारण धर्माच्या प्रमाणीकरणाला तेव्हा सुरुवात झालेली होती. त्यामुळे आचारात हळूहळू रिजिडिटी आली.

मात्र, त्या काळापर्यंत बौद्ध धर्म हळूहळू हिंदू धर्माशी दैनंदिन आचारदृष्ट्या अधिकाधिक सारखा होत गेल्याने हिंदू व बौद्ध धर्मात फरक इतके कुणी मानेनासे झाले व अखेरीस बुद्धालाही विष्णूचा अवतार बनवून या प्रकारावर फायनल स्ट्रॉ टाकण्यात आला.

माझ्या मते अन्य धर्मसमुदायांना पोटात घालण्याबद्दल सहिष्णू असणे अन एकदा का आपल्यात आले की त्यांना कडक नियम लावणे यात खरे तर विरोधाभास असायचे कारण नाही. आपला प्रभाव वाढवणे हा हेतू असल्याने आपल्या कक्षेबाहेरचे लोक आपल्यात आणण्यास विरोध नाही, मात्र एकदा का ते आपले झाले की त्यांनी विशिष्ट नियम पाळलेच पाहिजेत हे सर्वच जण करतात. इथे सर्वच जण म्ह. सर्व धर्मांचे इतकाच अर्थ नाही. अगदी आयटी कंपन्याही तसेच करतात, नै का? आता हे तर्कदुष्ट वैग्रे असेल, पण सगळे अ‍ॅक्रॉस टाईम अँड स्पेस असेच करताना दिसत नाहीत का? मला वाटते दिसतात.

तुलनेने जैन धर्माचे आश्रयदाते नेहमी मालदार व्यापारी पार्टी राहिल्याने त्यांचे छोटेसे पण स्वतंत्र अस्तित्व टिकून राहिले.

अवांतरः असे असले तरी याच काळात धर्मांतराला प्रायश्चित्त देणारा देवलस्मृतीसारखा ग्रंथही लिहिला गेला. कैकदा शास्त्राद्रूढिर्बलीयसी असे असले तरी सैद्धांतिक पातळीवर असे काही होत होते हेही माझ्या मते धर्मविचाराच्या जिवंतपणाचे एक प्रतीक आहे. विशेषतः नंतर संन्याशाच्या पोराची मुंज करावी की न करावी या खटाटोपात अडकलेल्यांच्या तुलनेत हे उठून दिसते खरेच. अन याच काळात नव्या सामाजिक परिस्थितीला अनुसरून धर्माचा नवीन आविष्कार-भक्तीपर धर्म-उदयास आला.

धर्मात काय दिसते अन व्यवहारात काय दिसते यांचा परस्परसंबंध तसा व्यामिश्र आहे, अगदी एकास एक नाही. तस्मात तूर्तास फक्त धर्मावर जास्त फोकस ठेवून बोललो इतकेच. चूभूदेघे.

गब्बर सिंग Fri, 07/03/2014 - 08:39

In reply to by आडकित्ता

गब्बरसिंगासारखे थोडे अनकन्व्हेन्शनल असते तुमचे, पण ते माझ्या समजूतीत बसेल इतकेच अत्तापर्यंत दिसलेले आहे.

इक्बाल नही था तो मजदूरोंका खून ..... (हलकेच घ्या हो आडकित्ता साहेब. मिश्किलपणे म्हणतोय. वैसे आप तो जानते है के हम आपके चाहनेवालोंमे से एक है)

You stopped short of saying something !!!

चायवाला Mon, 03/03/2014 - 14:28

In reply to by आडकित्ता

लव्ह जिहाद असे सर्च करुन पहा.
जागोजागी उभी असलेली अनधिकृत मशीदी/मदरसे पहा.
बौद्ध धर्म का फोफावला नाही भारतात त्याचा "अभ्यास" करा.
आणि मग बोला :)

सुनील Thu, 06/03/2014 - 14:47

In reply to by चायवाला

बौद्ध धर्म का फोफावला नाही भारतात त्याचा "अभ्यास" करा

तो करूच. पण पूर्व अशियात फोफावलेला हिंदू धर्म नाहीसा कसा काय झाला त्याचा "अभ्यास" कोण करणार आहे?

सुनील Thu, 06/03/2014 - 15:19

In reply to by चायवाला

कंबोडिया-विएट्नाममध्ये इस्लामी आक्रमण?

ते सोडा, तुम्हाला जे मलेशिया-इंडोनेशिया अपेक्षित आहे, तिथेदेखिल इस्लाम फोफावण्यासाठी कुणी आक्रमण केले होते, हे सांगितलेत तर बरे!

मन Thu, 06/03/2014 - 15:31

In reply to by सुनील

+१.
पण विषय भरकटतो आहे.

ऋता Thu, 17/10/2013 - 21:56

In reply to by अजो१२३

मला वाटते की एखाद्या अल्पसंख्य समूहाने आदर संपादन करण्यासाठी स्वतः बहुसंख्यांचा विश्वास जिंकण्याची अपेक्षा रास्त आहे. अल्पसंख्यांचा आदर करा असे नुसते बहुसंख्यांनी वरवर म्हणण्याने काहीच होत नाही-तेच लेखकाने लिहिलेल्या मुद्द्यांतून मला जाणवले. अरब आणि उंटाच्या कथेतला उंट हे अल्पसंख्य नाहीत यावर बहुसंख्यांनी कोणत्या आधारे विश्वास ठेवावा?

साठे लेखात आलेले आहेत....तेच ते.किंवा त्यांना कुठल्याही हिंदू नावाने रिप्लेस केलेत तरी फारसा फरक नाही पडणार.

'न'वी बाजू Fri, 18/10/2013 - 16:33

In reply to by ऋता

अरब आणि उंटाच्या कथेतला उंट हे अल्पसंख्य नाहीत यावर बहुसंख्यांनी कोणत्या आधारे विश्वास ठेवावा?

या निमित्ताने अरबस्थानच्या वाळवंटाची जनगणना आणि उष्ट्रगणना करून तौलनिक अभ्यास करणे रोचक आणि उद्बोधक ठरावे. (असा अभ्यास बहुधा यापूर्वी झाला नसावा.)

अशा अभ्यासाअभावी, अरब आणि उंट यांपैकी कोणताही एक गट अल्पसंख्य आहे आणि दुसरा बहुसंख्य आहे, असे मानणे धाडसाचे ठरावे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 16/10/2013 - 02:47

यू.के किंवा यू.एस.मधे कोणी पाकीस्तानी टॅक्सीड्रायव्हर भेटला तरी दोन्ही देशांमधल्या राजकारण्यांच्या कुळांचा उद्धार होतो. त्या टॅक्सीवाल्याने कुराण वाचलं असू देत वा देवा-धर्माशी त्याचा काही संबंध नसू देत, तिसऱ्याच समृद्ध देशात भेटल्यावर "कोणाला हवे आहेत तंटेबखेडे" यावरही एक टॅक्सी परिषद भरते. चौथ्याच प्रगत देशाचा/ची नागरिक आपल्या सोबत असेल तर तो/ती यात रस दाखवतात. मग युद्ध आणि इतरांचा द्वेष हे कसं निरूपयोगी, नव्हे तापदायक आहेत यावर समाप्ती होते. प्रवास संपल्यावर, आपण आपल्या रस्त्याने, बाकीचे त्यांच्या.

मी तर या टॅक्सीवाल्यांचं नावही विचारत नाही; मला लक्षात रहात नाही, कशाला विचारायचं? मी आणि चौथ्याच प्रगत देशाचा/ची नागरिक एकत्र बसून दारू पितो आणि सिरीयात जे चालू आहे त्याबद्दल खेद व्यक्त करतो.

---

मुंबई विद्यापीठात माझ्या वर्गात एक इमरान होता. मी आणि इमरान बरेचदा एकत्र बसून आकाशातले तारे असे का, याबद्दल चर्चा करायचो. इमरानने जिथून पीएच.डी. केली तिथे तो माझ्या एका मित्राचा सहकर्मचारी झाला. मी आणि हा मित्र (कोणत्याही मितीत) भेटल्यावर हमखास इमरान कसा आहे याबद्दल थोड्या गप्पा होत असत. इमरानचं काम सध्या बरं चाललेलं नाही, याबद्दल आम्ही सिरीयापेक्षा बरीच जास्त खंत व्यक्त केली होती. त्या भावनेत दोघांनाही काही विचित्र वगैरे वाटलं नव्हतं.

बाकी माझ्या वर्गात इतर बरेच मानसी, प्रशांत, अर्चना, सुजय वगैरे लोक होते. पण आज इमरानच आठवला.

तसा आंजावरच्या (आपल्या) वाहीदाचा विषय निघाल्यावरही हमखास "सध्या कुठे असते ती? मागे आमचं बोलणं झालं होतं तेव्हा ती ठाण्यात होती" असं आपसूक डोक्यात येतं.

मन Wed, 16/10/2013 - 10:08

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

इम्रान, मानसी,प्रशांत ही सारीच नावं आपण कॅज्युअली घेतो हे आपण(काहिच explicit न लिहिता) सूचित केलय. छान.
हे इतरत्रही, इतरांच्या वागण्यात दिसत नाही; त्याबद्दलच मी लिहिलय.
इमरानच्या माघारीही त्याची विचारपूस वगैरे करता म्हणजे तुम्ही त्याचे हितचिंतक्,मित्र वगैरे खरोखर असावात.
चांगली गोष्टय.
तुम्ही अदिती अ‍ॅज अ पर्सन तसे करत नसालही ; पण इतरत्र -- पण ते तसे नसताना, त्याच्यासमोर मुद्दाम तसा आव आणणं विचित्र वाटतं हे मी म्हणतो आहे.
.
तुम्ही जशी सर्व नावं एका ओळीत कॅज्युअली घेतली तशीच ती घेता आलित तर बरं होइल; सर्वांनीच.
.
माझा वैयक्तिक अनुभव सांगायचा तर काही काळ उत्तर भारतात रहायची वेळ आली होती. अतिरेकी कामामुळे शक्यतो मी कामाचा डेस्क आणि झोपायचा पलंग ह्याच दोन गोष्टींवर
बव्हंशी आढळत असे. तरीही क्वचित बाजूच्यांशी बोलणं होइ. त्यात दरवेळी "मी मराठी असलो तरी मी मनसेवाला नाही हो. " किंवा "मी मराठी असलो तरी उत्तर भारतीयांच्या जीवावर उठलेलो नाही हो"
असं म्हणण्याची अध्याहृत अपेक्षा असे. विशिष्ट वर्तुळाकडून आडून आडून भाषिक-वादाबद्दल विचारणा होइ.
तसच मुस्लमान भेटला की "मी मुस्लिम असलो तरी मी देशभक्त आहे हो" असं त्यानं ऊठसूट म्हणण्याची अपेक्षा धरली जाते.
(पुन्हा तेच; ही अपेक्षा लिखित असत नाही. अध्याहृत आहे. पुरावे,संदर्भ देण्यास असमर्थ आहे.)
.
"कभी खुशी कभी गम" नामक एक करण जोहरचाच असल्यामुळं थिल्लर असणारा मनोरंजनपट आला होता. त्यातही शाहरुख दत्तक पुत्र असला, तरी मातृ-पितृ प्रेम त्यास किती असावे?
हे दाखवण्यासाठी डायरेक तो कोणत्यातरी सणाला आई-बाबांना पाया पडायला हेलिकॉप्टर घेउन थेट गच्चीवर का अंगणातच उतरतो असं दृश्य.
ते इथे आठवलं.
.
अवांतरः-
जिचं नाव तुम्ही घेतलय त्या वाहिदाचा एका संस्थळावरचा अनुभव काय आहे ; हल्ली तिचा वावर कमी का झालाय हे विचारा तिलाच.
आझाद हिंद फौजेबद्दल तिच्या स्वतःच्या घरचा अनुभव लिहिण्यासारखं तिच्याकडं असतानाही ती हात का आखडता घेते? असो.
हारुन शेख, वाहिदा ही नावं पाहिल्यावर एका संस्थळावर त्यांना आलेल्या प्रतिक्रिया पाहून मी चकित झालो होतो.(बहुतेक मुंबैमध्ये मुस्लिम बहुसंख्या असलेल्या जमावाने
जाळपोळ्,दगडफेक सुरु केली होती, खुद्द पोलिस महिलांवरही हात टाकला होता. त्याबद्दल धागा सुरु झाला होता. धाग्यानं विचित्र टोक गाठलं होतं.
लेखात लिहिलय त्याच्या विरुद्ध टोकाची वागणूकही तिथे होती.)

बॅटमॅन Wed, 16/10/2013 - 12:21

In reply to by मन

त्यात दरवेळी "मी मराठी असलो तरी मी मनसेवाला नाही हो. " किंवा "मी मराठी असलो तरी उत्तर भारतीयांच्या जीवावर उठलेलो नाही हो"
असं म्हणण्याची अध्याहृत अपेक्षा असे. विशिष्ट वर्तुळाकडून आडून आडून भाषिक-वादाबद्दल विचारणा होइ.
तसच मुस्लमान भेटला की "मी मुस्लिम असलो तरी मी देशभक्त आहे हो" असं त्यानं ऊठसूट म्हणण्याची अपेक्षा धरली जाते.
(पुन्हा तेच; ही अपेक्षा लिखित असत नाही. अध्याहृत आहे. पुरावे,संदर्भ देण्यास असमर्थ आहे.)

सतीश वाघमारे अन हारुण शेख यांच्या काही लेख-प्रतिसादांतून हे जाणवलं होतं अंमळ वेगळ्या संदर्भात.

मिहिर Wed, 16/10/2013 - 09:23

लेख आवडला.
समन्वयवादावरून 'जागर'मधील नरहर कुरुंदकरांचा 'बुद्धिजीवी वर्गातील वैफल्य' हा लेख आठवला. वाचला नसल्यास जरूर वाचावा असे सांगेन.

ऋषिकेश Wed, 16/10/2013 - 10:13

In reply to by मिहिर

+१ अगदी हेच म्हणतो.

बाकी प्रत्येक मुद्द्यावर सहमती आहेच असे नाही पण मांडणी इतकी छान आहे की खंडन करावेसे वाटत नाहि ;)

मन Wed, 16/10/2013 - 10:18

In reply to by ऋषिकेश

खंडणी अवश्य होउ द्यात.
प्रवाहातील दगड फुटल्याशिवाय पाणी स्वच्छ वाहतं होत नाही.
तुमचंही म्हणणं येउ द्यात, गाडी पुढं जाउ द्यात.

ऋषिकेश Wed, 16/10/2013 - 10:47

In reply to by मन

मला समजलं नाही ते फक्त मुसलमानांचेच उदाहरण घेऊन चर्चा इतकी सिमीत का केलीये?
तुम्ही लिहिलंय त्यात खंडन नाही पण लेखनसीमा निव्वळ एक उदाहरण म्हणून न येता मुख्य विषय म्हणून येते ते खटकले - खटकले पेक्षा नक्की काय म्हणायचेय ते समजले नाही.

हिंदु-मुसलमानच नव्हे तर कोणत्याही दोन संख्येने बर्‍यापैकी अस्तित्त्व असणार्‍या गटांत मोडणार्‍या व्यक्ती समोर आल्या की तुम्ही लिहिलेत तसे-तत्सम प्रसंग दिसतात. (अगदी 'पुरूष' आणि 'महिलां'मधील एकत्रित चर्चाही बघा.) आणि त्याचे कारण स्वतःची जपलेली सुडो-मुल्ये किंवा धर्मनिरपेक्षतेचा / सर्वधर्मसमभावाचे कंडिशनिंग/आव वगैरे पेक्षा एकूणच भारतीयांत असणारा 'न्यूनगंड' किंवा 'अपराधी भावना' अधिक कारणीभूत आहे असे वाटते.

बॅटमॅन Wed, 16/10/2013 - 12:25

In reply to by ऋषिकेश

मला समजलं नाही ते फक्त मुसलमानांचेच उदाहरण घेऊन चर्चा इतकी सिमीत का केलीये?
तुम्ही लिहिलंय त्यात खंडन नाही पण लेखनसीमा निव्वळ एक उदाहरण म्हणून न येता मुख्य विषय म्हणून येते ते खटकले - खटकले पेक्षा नक्की काय म्हणायचेय ते समजले नाही.

एक उदाहरण घेतल्यावर तुम्हाला नक्की प्राब्ळम काये? की (उगा) ब्यालन्स्ड करण्याचा अट्टाहास ;)

हिंदु-मुसलमानच नव्हे तर कोणत्याही दोन संख्येने बर्‍यापैकी अस्तित्त्व असणार्‍या गटांत मोडणार्‍या व्यक्ती समोर आल्या की तुम्ही लिहिलेत तसे-तत्सम प्रसंग दिसतात. (अगदी 'पुरूष' आणि 'महिलां'मधील एकत्रित चर्चाही बघा.) आणि त्याचे कारण स्वतःची जपलेली सुडो-मुल्ये किंवा धर्मनिरपेक्षतेचा / सर्वधर्मसमभावाचे कंडिशनिंग/आव वगैरे पेक्षा एकूणच भारतीयांत असणारा 'न्यूनगंड' किंवा 'अपराधी भावना' अधिक कारणीभूत आहे असे वाटते.

दिसतात हे मान्य पण हिंदू-मुसलमान इश्श्यू अखिल भारतव्यापीच नाही, तर अतिशय जिव्हाळ्याचा आहे. अगदी उत्तर-दक्षिण वाद असो नैतर स्त्रीपुरुष वाद असो त्याहीपेक्षा जास्त संवेदनशील आहे. आणि तो ऑनलाइन जगातच तसा नाही, तर प्रत्यक्ष जगातही अंमळ जास्तच सेन्सिटिव्ह आहे. हा मुद्दा चर्चेला घेतला की बाकीचे मुद्दे का घेतले नाहीत या म्हणण्याला आणि घेतलेच पाहिजेत अशा छुप्या अट्टाहासाला काय अर्थ आहे? जे दिसते त्याबद्दल बोला की, बाकीचे मुद्दे प्रसंगोपात आले की चर्चा होईलच आणि यथासांग होतेही.

ऋषिकेश Wed, 16/10/2013 - 13:03

In reply to by बॅटमॅन

केवळ जन्तेला अधिक इन्टरेस्ट म्हणून हाच इश्यु निवडला असेल तर हरकत नैच.
असलेच तर, सदर इश्यु इतर अनेक तत्सम इश्युंपेक्षा वेगळा का वाटला / करावासा वाटला याचे कुतूहल होते.

(मूळ विषयावर इथे, या चर्चेत, अन्यत्र, बरेच लिहून झाले आहे त्यापेक्षा वेगळे/नवे काय लिहावे असेही वाटले)
बाकी, या विषयावर चर्चा करू नये असा अर्थ जर माझ्या प्रतिसादातून ध्वनित होत असेल तर ती माझ्या लेखनातील चूक समजावी.

मन Wed, 16/10/2013 - 14:01

In reply to by ऋषिकेश

जन्तेचा इंट्रेस्ट वगैरे काहिच डोक्यात नव्हतं. जे समोर दिसलं ते लेखणीनं उतरलं. उदा, लिंकनच्या काळात वंशभेद करु नका, रेसिझ्म करु नका. आफ्रिकनांनाही बरोबरीचे माना. असा संदेश असे.
म्हणजे मग नंतरच्या काळात जे चीनी कामगार प्रचंड संख्येने अमेरिकेत गेले कष्टकरी म्हणून (आपल्याकडे बिहारी येतात त्यासारखे) त्या "चीनी कामगारांना वांशिक दृष्टीने वेगळ्या नजरेने पहा "
असे चळवळवाल्यांना अपेक्षित होते का? अर्थातच नाही. त्यांना समोर काळा-गोरा भेद दिसला; तो तसा नसणं ठीक नाही असं त्यांच्या विवेकाला वाटलं; ते बोलले. इतकी साधी ती गोष्ट होती.
.
एखाद्या गोष्टीचा उल्लेख का केला, हे एकवेळ सांगता येइल, पण उल्लेख राहून का गेला; हे सांगणं कठीण आहे.
जाणीवपूर्वक अनुल्लेख करण्याचा, अनुल्लेखानं मारण्याचा उद्देश नाही हे पटवून देणं तर अजूनच अवघड आहे.
.
मागच्या काही दिवसात जे आसपास दिसलं, त्यावर जे डोक्यात आलं, ते लिहिलय. " हिंदु-मुस्लिम" हा एकच मुद्दा लेखात आहे; असे नाही.
त्या मुद्द्याशिवायही जे काही पाहण्यात आलं; अगदि ह्याच्याशी संपूर्णतः असंबद्ध; ते सुद्धा लिहिलेच आहेत की.

लिखाणाचं विश्लेषणः-
पहिले दोन परिच्छेद तावातावानं वाटेल त्या गफ्फा हाणण्याबद्दल आहेत.(शेजारच्या देशावर बॉम्ब टाकत सुटणे )
परिच्छेद तीन व चार हे मुस्लिमांशी आपल्या वागणुकीबद्दल आहेत.("सब पॉलिटिशियन बुरे हय " व साठे-माटे -सलिम प्रकरण)
पाचवा व सहावा परिच्छेद सरकारी व जाहिर शुभेच्छांतील वैचित्र्याबद्दल आहे.
सातवा परिच्छेद सहाव्या परिच्च्छेदात डोकावणार्‍या सुरु झालेल्या समन्वयवादी वैचित्र्याबद्दल आहे.("बकरी ईद म्हणजे स्वतःतील दुर्गुणांचा बळी(sacrifice)")
हा समन्वयवाद अमेरिकन इतिहासातही दिसतो. लिंकनच्या काळानंतर जाहिर गुलामगिरी तर सुरु ठेवता येइना; आणि गोर्‍यांचे मन "त्यांना" बरोबरीचेही धड मनू देइना.
मग separate but equal status असं अजब रसायन निघालं. ते शतकभर सुरुच होतं; अगदि मार्टिन ल्यूथर किंग ने त्याला च्यालेंज करेपर्यंत ते सुरुच होतं.
either it is separate or it is equal. How can it both be??
.
नवव्या परिच्छेदानंतरचं सगळं हे कसं होत असेल हा अंदाज आणि हे दिसायला सौम्य दिसत असलं तरी त्यात काय घोटाळा आहे, हे लिहिलय.
अर्थात ह्यात उदाहरण पुन्हा खुदा के लिये हा पिच्चर आणि मुस्लिम मानसिकता ह्यांचच घेतलय. कारण ते ठळक आहे. इतरत्रही असतील अशी उदाहरणं पण इतका धडधडित
विरोधाभास(पुरोगामी म्हणवत म्हणवत दरवेळी धर्मग्रंथाची साक्ष काढणे) चटकन आठवली नाहित.
.
स्त्री- पुरुष म्हणाल तर ते तेवढं ठळक हल्ली जाणवलं नाही. निदान ह्या लायनीवर तरी नाही(ऊठसूट स्त्रीला "मी तुला बहिणच मानतो" नै तर "तुसुद्धा बरोबरीची आहेस" असं म्हणणं).
त्यासंदर्भात मला होत असलेला प्रॉब्लेम मी "त्रागा धागा" (http://www.aisiakshare.com/node/1603) नावाचं इरिट्न्ट काढून त्यात पूर्वी लिहिला होता. तेच इथे उद्ध्रुत करतोयः-

"मुलींची शाळा", "मुलांची शा़ळा" ...ई ई ई ई ई....यक्क्क्क.........
अशा सेपरेट शाळा काढणं हा राष्ट्रिय गुन्हा म्हणून जाहिर करायला हवा. त्याच्यानं पर्सन्यालिटी प्रॉब्लेम होतो.
.
शाळा सोबत ठेवली तर पोरं मोठी झाल्यावर बावचळल्यासारखं करायची किंवा उचकल्यासरखं किंवा हपापल्यासारखं करायची शक्य्ता कमी होते. मला अजूनही कमी परिचित स्त्रियांशी बोलताना गोंधळल्यासारखं होतं. कळतं पण वळत नाही.म्हणजे समजा अगदि ग्रुप जमलाय कींवा कट्टा सुरु आहे; तेव्हाही अगदि शेजारी येउन , नाव घेउन कुणी स्पष्ट प्रश्न विचारला तरच मी उत्तर देतो. उत्तरही जेवढ्यस तेवढे असते. बोलायचे टाळतो. विनाकारण कॉन्शिअस होतो. नक्की काय होते सांगता येत नाही. जीभ ,मान आक्रसते. मी मनानेही आकुंचित पावतो. मनातल्या मनात कोपर्‍यात जाउन बसतो. अन्यथा ग्रुप मध्ये बसलो आहोत, सगळे बोल्ताहेत असे चित्र असेल तर त्या चित्रातील गप्प बसलेला तो प्राणी मीच असतो. बर्‍यापैकी आता ग्रुप असताना आजही कमी परिचित स्त्रियांबद्दल माझा reflex हा असाच आहे. मला मिक्सअप होण्यास भयंकर वेळ लागतो. कधी कधी अनंत वेळ घेतला तरी मी मिक्स अप होउच शकत नाही. हा मी असा आहे हे मला ठाउक असतानाही मुळात माझ्या मागे कुणी लागूच कसं शकतं हे आजवर मला समजलेलं नाही.
अर्थात भारतात मला माझ्यासारखेच शतमूर्ख सहस्रसंख्येने सापडले. आपण एकटे नाहित ह्या कल्पनेने सुखावलो.
.
म्हणूनच "शेपरेट शाळा हा राष्ट्रिय गुन्हा" आहे.
.
टू द टॉप ऑफ धिस आय सरप्राइझ अबाउट वन थिंग . आमची "भावी ही" आहे. तिला हे असं आहे हे सगळं सगळं ठाउक आहे. तिला हा चक्क प्लस पॉइंट वाटतो.मध्यमवर्गीय चष्म्यातून हा बावचळलेपणा म्हणे सभ्यतेचा पुरावा आहे!
.
इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला माझी प्रोजेक्ट मेट घरी वगैरे यायची.(प्रोजेक्ट टीम मी निवडली नव्हती. HOD ने सिलेक्ट करुन दिली होती. माझी मुलींना एकदम चक्क "माझ्या सोबत प्रोजेक्ट करणार का" इतका भयंकर चावट, लज्जास्पद, अश्लील वगैरे प्रश्न थेट विचारायची हिम्मत नव्हती.)
तर ती यायची तेव्हाही घरचे(त्यातही स्त्रीसदस्य) विनाकारणच उगीचच सलगीनं वागायचे. "आम्हाला चाल्तं हो. आम्हीही तसे फार मागासलेले वगैरे नाही. मोकळ्या विचारांचे आहोत." असं उगीच अधून मधून आडून आडून सात सांगत वैताग आणायचे. त्यांच्या ह्या सांगण्यामुळं ते खरोखर तसे नाहित; त्यांना फक्त तसे दाखवायचे आहे आणि तेसुद्धा तसेच अवघडल्यासारखे आहेत ह्यावर शिक्कामोर्तब व्हायचे.
.
ह्या परिस्थितीत वढल्यानं परवापरवापर्यंत पार वाट लागलेली होती. जसाजसा सोशल मिक्स अप झाला तसा निखळपणे दंगा करता आला. हा असाच आधीची वीस बावीस वर्षे नि:संकोचपणे करता आला असता हे समजलं.
.
बादवे, मी स्वभावाने "शांत"नाही. एखादा मुद्दा मिळाला तर त्याबद्दल मी बिनदिक्कत काहीहे पिंका टाकित सुटतो. किंवा अमुक विषयाची माहिग्ती व्हावी म्हणून शंका वगैरेही विचारतो. प्रॉब्लेम कधी होतो? प्रॉब्लेम माझा तेव्हा होतो जेव्हा इकडचं तिकडचं बोलायचं असतं. मुद्द्यांशिवाय सहज, गप्पाटाप्पा करायच्या असतात. हां तेव्हा मात्र आख्खा कोराच असतो. ब्लँक. ह्या सर्व गोष्टीचं १००% खापार शाळेवर जात नाही; पण त्याचाही काही प्रमाणात तरी महत्वाचा सहभाग आहेच.

बाकी स्त्री-पुरुष क्रुत्रिमता आणि मोकळेपणाचा आव आणणे हे मुद्दे असतील तर ते मी वेगळ्या धाग्यात कव्हर केले आहेत.पुरोगामी! (एक किस्सा) (http://www.aisiakshare.com/node/1563)
.
.
थोडक्यात काय, तर सध्या जे आसपास दिसलं ते तसच कागदावर उतरलं एवढच म्हणेन अजून काही नाही.
जन्तेचा इंट्रेस्ट बरोब्बर टार्गेट करुन त्याबरहुकूम लिहिण्याइतकी प्रतिभा अजून कमावली नाही :( ;)

ऋषिकेश Wed, 16/10/2013 - 14:22

In reply to by मन

:)
तुम्ही सांगितलंत म्हणून मी फक्त असहमती असणार्‍या मुद्द्यांबद्दल लिहित होतो.
बाकी आगा-पिछा सहमतीचा असल्याने वेगळे लिहिले नाही

अजो१२३ Wed, 16/10/2013 - 13:39

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेशचा प्रतिसाद म्हणजे माझ्या निरीक्षणाचा उत्तम दाखला आहे.

४. धर्माच्या नावावर जर मुसलमानांनी काही वाईट केले तर, 'आपल्या इतर' सौम्य(च) उजव्या वा सेक्यूलर हिंदू मित्रांमधे त्यांच्यावर टिका करताना, प्रत्यक्ष त्या कृतीवर टिकाच करत येत नाही. ते लगेच त्याचे हिंदू धर्मातले समांतर उदाहरण देतात. अरे, विषय काय ते तरी पहा, इतके डिफेन्सिव का होता? Can't we criticize an Islamic mistake/superstition/crime standalone, without refering to any other religion? उदाहरण नाही मिळाले तर 'प्रत्येकच धर्मात बरे/वाइट....' अशी नॉन्-स्पेसिफिक लाइन पकडतात. याला नाकारणे अशक्यच असते.

ऋषिकेश Wed, 16/10/2013 - 14:14

In reply to by अजो१२३

एखाद्या व्यक्तीने वाईट केले असेल तर वाईट केले हे स्पष्ट असेल तर त्यात चर्चा करण्यासारखे काही नाही.
मात्र ज्या व्यक्तीने वाईट केले त्याच्या धर्मावरून कोणत्याही एका (यात हिंदूही आले) धर्माला टारगेट का करावे हे समजत नाही. कोणतीही एक व्यक्ती एखाद्या धर्माच्या लोकांच्या वर्तणूकीची प्रतिनिधित्त्व कसे करू शकतो?

इथे शीत कराब आहे याच्याशी सहमती असतेच पण शितावरून भाताची परिक्षा करू पाहण्याला विरोध असतो.

आता मन यांना आलेले अनुभव हे प्रातिनिधीक नक्कीच नसावेत कारण माझ्या ओळखीतल्या कित्येक मुसलमान, ख्रिश्चन धर्मिय मित्रांसोबत धर्मावरून चर्चाच नाही तर निखळ खोड्याही काढल्या जातात प्रसंगी वादही घातले जातात. कदाचित मी मुंबईत तेही एका ख्रिश्चन वस्तीत लहानाचा मोठा झाल्याने + मुळातच मित्रांमध्ये मराठी व्यक्ती नाममात्र असल्याने + मित्रपरिवारात "धार्मिक" कोशंट कमी असल्याने असूही शकेल पण मूळ लेखनाचा सूर/अनुभव माझ्या वैयक्तिक अनुभवापेक्षा वेगळाच नव्हे तर विपरीत आहे.

बाकी Can't we criticize an Islamic mistake/superstition/crime standalone, without refering to any other religion?
यावर इतकेच म्हणेन माझ्यामते 'इस्लामिक चुका'/'इस्लामिक गुन्हे'/'इस्लामिक अंधश्रद्धा' असे काही नसते - असू नये. असतात त्या चुका, गुन्हे व अंधश्रद्धा व त्या वय/लिंग/धर्म/जात/स्थान/स्थिती निरपेक्ष असतात. उगाच एकालाच धोपटण्यासाठी वेगळे का काढावे? याचे उत्तर मात्र काही केल्या मिळत नाही.

मात्र ज्या व्यक्तीने वाईट केले त्याच्या धर्मावरून कोणत्याही एका (यात हिंदूही आले) धर्माला टारगेट का करावे हे समजत नाही. कोणतीही एक व्यक्ती एखाद्या धर्माच्या लोकांच्या वर्तणूकीची प्रतिनिधित्त्व कसे करू शकतो?

१. एखाद्या सवर्ण हिंदूने धार्मिक समजुतीच्या पगड्याखाली दलितांवर अत्याचार केले

२. एखाद्या मुसलमानाने कुणा हिंदूवर धार्मिक समजुतीच्या पगड्याखाली अत्याचार केले

तर त्यांच्या वागणुकीला धर्म कारणीभूत आहे की नाही? आणि अशावेळी सिमिलर उदाहरणे घेऊन धर्म टारगेट झाला तर त्यात नवल आणि चूक ते काय?

इथे शीत कराब आहे याच्याशी सहमती असतेच पण शितावरून भाताची परिक्षा करू पाहण्याला विरोध असतो.

मजा इतकीच, की उदा. क्र. १ मध्ये असा विरोध शक्यतोवर कोणी करत नाही, मात्र उदा. क्र. २ मध्ये कडाडून विरोध होताना दिसतो. ही धूळफेक नाहीतर काय आहे?

बाकी Can't we criticize an Islamic mistake/superstition/crime standalone, without refering to any other religion?
यावर इतकेच म्हणेन माझ्यामते 'इस्लामिक चुका'/'इस्लामिक गुन्हे'/'इस्लामिक अंधश्रद्धा' असे काही नसते - असू नये. असतात त्या चुका, गुन्हे व अंधश्रद्धा व त्या वय/लिंग/धर्म/जात/स्थान/स्थिती निरपेक्ष असतात. उगाच एकालाच धोपटण्यासाठी वेगळे का काढावे? याचे उत्तर मात्र काही केल्या मिळत नाही.

चुका, गुन्हे, अंधश्रद्धा या य/लिंग/धर्म/जात/स्थान/स्थिती यांच्याशी अतिशय घट्ट नाते आहे. हे सेपरेट करणे हा कैक वेळेस भाबडेपणा ठरतो. वय धर्म आदि निकषांवर न्यायनिवाड्यात भेदभाव करणे हे जसे एक टोक झाले तद्वतच त्यांचे खंप्लीट सेपरेशन हेही भाबडेपणाचे दुसरे टोकच म्हटले पाहिजे.

बाकी अधोरेखित प्रश्न तथाकथित लिबरलांना विचारावा अशी फार इच्छा आहे. उत्तर मिळणार नाही हे माहिती आहेच, पण तरीही...असो.

तर त्यांच्या वागणुकीला धर्म कारणीभूत आहे की नाही?
असे वाटत नाही. त्यांच्या वागणूकीला ती व्यक्तीच कारणीभूत आहे - असते - असावी.

आणि अशावेळी सिमिलर उदाहरणे घेऊन धर्म टारगेट झाला तर त्यात नवल आणि चूक ते काय?

>> एखाद्या सवर्ण हिंदूने धार्मिक समजुतीच्या पगड्याखाली दलितांवर अत्याचार केले
यावेळी जर एखादी व्यक्ती केवळ हिदू-सवर्ण आहे म्हणून ती दलितांवर हल्ले करणारच किंवा त्यांचा नेहमी उद्देश तोच असतो किंवा तत्सम टिकाही मला चुकीचीच वाटते. कोणत्याही समजूतीच्या पगड्याखाली कोणत्याही व्यक्तीवर अत्याचार होणे गैर आहे. त्या व्यक्तीचे 'सवर्ण हिंदूत्त्व' हायलाईट करून काय साधते? हे म्हणजे एखाद्या किंवा काही मिशी असणार्‍या व्यक्तींनी चोरी केल्यावर बहुतांश मिशीवाले पुरूष चोर असतात म्हटल्यासारखे आहे. तेव्हा अशी उदा देऊन कोणताही एक धर्म टारगेट करणे हे मते मिळावण्यासाठी गरजेचे असेलही पण अयोग्य वाटते.

तेच इतर क्रायटेरियांना लागू

चुका, गुन्हे, अंधश्रद्धा या य/लिंग/धर्म/जात/स्थान/स्थिती यांच्याशी अतिशय घट्ट नाते आहे.

कसे ते कळले नाही.
एखाद्द्या विशिष्ट लिंगाच्या, धर्माच्या, जातीच्या, ठिकाणच्या, स्थितीची व्यक्ती असली की ती ह्या ह्या चुका करणारच किंवा ही ही चुक केली वा हा हा गुन्हा घडला तर तर ते त्या त्या गटाचेच काम असले पाहिजे असा नातसंबंध मला गैर वाटतो.

आता तुम्ही सहसा/साधारणतः वगैरे न मोजता येणारे व दखल न घेतले जाणारे शब्द वरील वाक्यात घातलेत की "सौम्य" उजव्यांचा भास निर्माण करता येतो हे वेगळे ;)

बाकी अधोरेखित प्रश्न तथाकथित लिबरलांना विचारावा अशी फार इच्छा आहे. उत्तर मिळणार नाही हे माहिती आहेच, पण तरीही...असो.

खरे आहे लिबरलच काय मला याचे उत्तर स्वतःला कोणत्याही एका गटाचा ठाम सदस्य असणार्‍या-म्हण(व)णार्‍या कोणीही दिले तरी आवडेल ;)

बॅटमॅन Wed, 16/10/2013 - 15:30

In reply to by ऋषिकेश

समजा धर्म किंवा अजून कशाचाही व्यक्तीच्या मनावर पगडा नसेल असे मानायचे असेल तर मग प्रश्नच मिटला. पण हा अतिशय भाबडा प्रकार आहे, कचरा कार्पेटखाली सरकवायचा प्रकार आहे. त्यामुळे खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याकडून आलेली आवडतीलः

अस्पृश्यता पाळणारे लोक सगळे काय हरामखोर होते काय? धर्माप्रमाणे आचरण करायचे म्हणून अस्पृश्यता पाळणारे अदरवाईज डोके ताळ्यावर असणारे लोक कमी होते की जास्त?

जाणूनबुजून अन्य धर्मीय लोकांना टारगेट करणारे सगळे लोक स्वभावतः नेहमीच दुष्ट असतात काय?

स्त्रियांना शिक्षणाची संधी न देणारे लोक सगळे कॉन्शस स्त्रीद्वेषाने भारलेले असतात काय?

अंधश्रद्धेपोटी देहदंडन करून घेणारे लोक (जिभेतून सळई वैग्रे आरपार काढणारे इ.इ.) विकृतच असतात काय?

वरीलपैकी प्रत्येक उदाहरणातील आक्षेपार्ह वागणुकीला धर्माची शिकवणूक जराही जबाबदार नसेल असे म्हणायचे आहे का?

ऋषिकेश Wed, 16/10/2013 - 16:01

In reply to by बॅटमॅन

एखाद्या धर्माचा पगडा आणि केलेली कृती यांचा काय, कसा व किती संबंध लावावा?

अस्पृश्यता पाळणारे लोक सगळे काय हरामखोर होते काय?

त्यांचे अस्पृश्यता पाळणे आता गैर वाटते. तेव्हा जे केले ते तत्कालिन योग्यायोग्यतेच्या कल्पनांनुसार योग्य असेलही/नसेलही. मात्र एखादी तत्कालीन व्यक्ती हिंदु सवर्ण आहे म्हणजे ती नक्की अस्पृश्यता पाळणारच, तेव्हाचे सवर्ण म्हणजे असले अत्याचारी होते हा धर्माला/जातीला चिकट(व)लेला घाऊकपणा गैर वाटतो. याच्याच उलट एखाद्या व्यक्तीचे (चांगले-वाईट कसेही) कृत्य हे त्याच्या जातीधर्माचे प्रातिनिधीक कृत्य धरणेही चूकच.

धर्माप्रमाणे आचरण करायचे म्हणून अस्पृश्यता पाळणारे अदरवाईज डोके ताळ्यावर असणारे लोक कमी होते की जास्त?

खरतर प्रश्नाचा उद्देश कळला नाही पण उत्तर द्यायचेच तर अदरवाईज धर्माप्रमाणे आचरण करणारे पण अस्पृश्यता न पाळणार्‍या लोकांपेक्षा त्यांचे डोके कमी ताळ्यावर होते असे म्हणता यावे. :)

जाणूनबुजून अन्य धर्मीय लोकांना टारगेट करणारे सगळे लोक स्वभावतः नेहमीच दुष्ट असतात काय?

कशा प्रकारचे टार्गेट? दुष्ट वगैरे सापेक्ष आहे.

स्त्रियांना शिक्षणाची संधी न देणारे लोक सगळे कॉन्शस स्त्रीद्वेषाने भारलेले असतात काय?

असे वाटत नाही. अशीच घाऊक वक्तव्ये नकोत असे वाटते.

अंधश्रद्धेपोटी देहदंडन करून घेणारे लोक (जिभेतून सळई वैग्रे आरपार काढणारे इ.इ.) विकृतच असतात काय?

सध्याच्या काळाअत अशी कृती विकृत वाटते.

वरीलपैकी प्रत्येक उदाहरणातील आक्षेपार्ह वागणुकीला धर्माची शिकवणूक जराही जबाबदार नसेल असे म्हणायचे आहे का?

शिकवणूक जबाबदार असेलही किंवा नसेलही. मुद्दा तो नाही. मुद्दा आहे की त्या त्या वर्तणूकीसाठी त्या व्यक्तीचा धर्म एवढा एकच क्रायटेरीया (किंवा कोणताही एकच क्रायटेरीया) ग्राह्य आणि जबाबदार धरून त्यावर आधारीत चर्चा/झोडपणे करणे योग्य कसे?

बॅटमॅन Wed, 16/10/2013 - 16:18

In reply to by ऋषिकेश

प्रतिपादनात परत एकदा गल्लत होते आहे. माझा मुद्दा एकतर नीट समजला नसावा किंवा बगल तरी दिल्या गेली आहे. असो, परत मांडतो.

जे लोक अशी काही आजच्या विचाराप्रमाणे चूक ठरणारी कृत्ये करतात, त्यामागे बर्‍याचदा इन्स्टिट्यूशनल थिंकिंगचा हात असतो असे म्हणायचे आहे. ते नाकारण्याचे कारण आणि मीमांसा पाहिजे होती तर "अमुक एका धर्मीय/जातीय व्यक्तीने अमुक एक आक्षेपार्ह कृत्य केले म्हणून जातीला/धर्माला लेबल लावू नये" असे तुमचे प्रतिपादन चाललेय.

या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, हे पुन्हा एकदा लक्षात आणून देतो.

सरतेशेवटी अजून दोन उदाहरणे देतो.

उदा. क्र. १:

संभाजी ब्रिगेड ही ब्राह्मणद्वेष पसरवणारी संघटना आहे. बरेच लोक या संघटनेत जाऊन माथी भडकून घेतात. अदरवाईज डोके ताळ्यावर असलेले कैक लोक त्यांत आहेत.

माझे म्हणणे यासंदर्भात असे, की ब्राह्मणद्वेषामागे इन्स्टिट्यूशनल थिंकिंग आहे.

तर तुम्ही म्हणू पाहताहात, की प्रत्येक मराठा समाजाच्या व्यक्तीबद्दल गैरसमज करून घेऊ नये.

दोन गोष्टींचा काय संबंध? माझ्या म्हणण्याची परिणती मराठाद्वेषात होणारच असे छुपे अ‍ॅझम्प्शन जाणवतेय तुमच्या प्रतिपादनातून.

उदा. क्र. २:

हिटलरने जवळपास ६० लाख ज्यू मारले.

यामागे इन्स्टिट्यूशनल थिंकिंग होते की नाही? त्याचा अ‍ॅनॅलिसिस आणि निषेध कर्तव्य आहे की नाही?

यामागच्या इन्स्टिट्यूशनल थिंकिंगचा विरोध केला तर जर्मन लोकांना अयोग्यपणे द्वेषाचे टारगेट केले जाईलच असे वाटते का?

मी आणि तुम्ही अंमळ वेगळ्या पातळीवरून बोलतो आहोत.

नितिन थत्ते Wed, 16/10/2013 - 18:15

In reply to by बॅटमॅन

आम्ही कधी कधी आमच्या समाजातल्या गैरप्रवृत्तीवर टीका करतो तेव्हा असेच काहीतरी आर्ग्युमेंट केले जाते. म्हणजे तुम्ही फक्त आमच्या अंधश्रद्धांना का झोडपता? "त्यांच्या" अंधश्रद्धांवर का बोलत नाही वगैरे वगैरे....

शेवटी काय दोन्ही कडून सेम आर्ग्युमेंट....

म्हणजे पोस्ट-गोध्रा म्हटले की लगेच पोस्ट-गांधी हत्या किंवा पोस्ट-इंदिराहत्या लगेच काउंटर आर्ग्युमेंट म्हणून येतेच.

बॅटमॅन Wed, 16/10/2013 - 18:22

In reply to by नितिन थत्ते

दोन्हीकडून असे अर्ग्युमेंट केले जाते. कुठली बाजू जास्त डॉमिनंट आहे त्यानुसार "आम्हालाच का बोलता अन त्यांना का नाही" या वक्तव्याचे वक्ते बदलतात.

बाकी, पोस्ट गोध्रा/गांधी बद्दल आता मौन पाळायचे ठरवले आहे :D

मन Wed, 16/10/2013 - 19:42

In reply to by बॅटमॅन

टेस्ट मॅचमध्ये ऑफ स्टम्प बाहेरच्या चेंडूला सोडून देणेच इष्ट.