चला तयारी करा , फ़ार थोडे दिवस आहेत आपल्या हातात , २१ डीसेंबर जवळ येतोय !

सानंदा चा कल्ट

मानसशास्त्रज्ञ लिऑन फ़ेस्टींजर ने ही कॉग्नीटीव्ह डिसोनन्स ही थियरी विकसित केली. त्याच्या उगमाची कथा इंटरेस्टींग आहे, १९५६ मध्ये प्रकाशीत त्याच्या व्हेन प्रॉफ़ेसी फ़ेल्स या पुस्तकात ही विस्ताराने दिलेली आहे ती अशी. मारीयो कीच या लेकसीटी मिनिओपोलीस मध्ये राहणारया एका साध्या गृहीणीला अचानक एक दिवस एक मेसेज सानंदा नावाच्या देवाकडुन आला, की २१ डीसेंबर च्या मध्यरात्री अटलांटीक महासागरात प्रलय होईल आणि संपुर्ण जग त्यात बुडुन जाईल, अवघा रशिया तर एक समुद्र होऊन जाईल इ. हे जगात जे काय अपावित्र्य निर्माण झालेल आहे त्याला प्युरीफ़ाय करण्यासाठी होईल परंतु जे लोक सानंदा त विश्वास ठेवतील ते मात्र यातुन वाचतील.हीचा नवरा डॉ, आर्मस्ट्रॉंग हा एक डॉक्टर होता त्यानेही यावर पुर्ण विश्वास ठेवला. दोघांनी मोजक्या लोकांना ही घटना सांगितली त्यांनाही पटली मग एक छोटा कल्ट तयार झाला.त्यांनी एकच बातमी प्रेस ला दिली आणि सुरुवातीला प्रसिध्दी टाळली पण बातमी वारयासारखी पसरली आणि ती फ़ेस्टींजर पर्यंत पोहोचली. फ़ेस्टींजर ने या कल्ट मध्ये शिरकाव करण्याचे ठरविले आणि काही मिंत्रासहीत त्याने यात खोटी आस्था दाखवुन प्रवेश मिळवला. आणि मग त्याचा जवळुन अभ्यास सुरु झाला.यात शेवटचा मेसेज हा एखाद्या हींट सारखा येईल असे सांगण्यात आले होते.मेंबर्स नी नोकरया सोडल्या, घरं विकली लौकीक जीवनाचा त्याग करुन सानंदा ला शरण जाण्याची पुर्ण तयारी केली. शेवटी २१ डीसेंबर ची रात्र आली कीच च्या घरी सर्व मेंबर मंडळी जमली. मग एक पत्र्याचा आवाज आला ती हींट समजुन त्याचा अर्थ मेंबर्स नी आता आपल्या शरीरावरील सर्व धातु मेटल च्या वस्तु काढुन टाकाव्या असे सांगण्यात आले. कारण सानंदा च्या स्पेसशिप मध्ये बसण्यासाठी त्याचा अडथळा होणार होता. मग बायांनी ब्रा चे हुक पासुन आणि पुरुषांनी झिप च्या मेटल हुक काढण्यास सुरुवात केली. डॉ. आर्मस्ट्रॊंग एकीकडे घड्याळाकडे काळजीने बघत सरळ हुक सहीत चेन्स उखडुन टाकण्यास मदत करु लागला.शेवटी ११.५० झाले काही कल्ट मेंबर्स रडु लागले काही वारंवार पडदा उघडुन बघु लागले की बाहेर काही दिव्य प्रकाश सानंदाची स्पेसशिप दिसत आहे का असे.
परंतु असे काहीही झाले नाही जग १२ वाजेनंतर ही बुडाले नाही सानंदा ची स्पेसशिप ही आली नाही.प्यान्टी ब्रा परत तुटलेल्या हुकांसहीत कशाबशा चढविण्यात आल्या.

स्पष्टीकरणांची मालिका

आणि मग फ़ेस्टींजर ने आणखी एक आश्चर्य बघितले ते असे की कल्ट मेंबर्स या घटनेपुर्वी मीडीया ला जाणीवपुर्वक दुर ठेवत होते, मात्र आता त्यांनी स्वताहुन सर्व मीडीयाला फ़ोन लावण्यास सुरुवात केली लाइफ़, टाइम आणि न्युजविक ला ही संपर्क केला, पुढील काही दिवसांत आता मारीयो, आर्मस्ट्रॉंग आणि कल्ट मेंबर्सनी सुरु केली एकामागोमाग एक स्पष्टीकरणांची रॅशनलायझेशन्स ची मालिका. त्या सर्वांचा सुर एकच होता की आम्ही जे म्हणत होतो ते अगदी खरेच होते असे झाले नाही याचे कारण सानंदा ने आम्हाला पृथ्वी वासियांना सेकंड चान्स दिलेला आहे , ही वॉर्नींग आहे आता आम्हा मेंबर्सना सानंदा ने लोकांना पृथ्वी ला अधिक कलुषीत करण्यापासुन रोखण्याची, बाकी पृथ्वि वासियांना जागृत करण्याची जबाबदारी सोपवली आहे इत्यादी इत्यादी अशी अनेक अतार्कीक वेडगळ स्पष्टीकरणे त्यांनी दिली.
कॉग्नीटीव्ह डीसोनन्स ची मुलभुत तत्वे
या च्या अभ्यासा वरुन आणि यानंतर च्या अनेक प्रयोगांवरुन फ़ेस्टींजर ने एक महत्वाची थेअरी बनविली ती म्हणजे कॉग्नीटीव्ह डिसोनन्स ची या अनुसार
१-माणस ही जेव्हा आपल्या मान्यते च्या, श्रध्देच्या विरोधात असलेल्या वास्तवाला- सत्याला सामोरे जातात तेव्हा त्यांच्या मनात एक प्रकारची तीव्र अस्वस्थता, विसंवाद निर्माण होतो. यालाच तो डिसोनन्स म्हणतो.
२-हा विसंवाद ही अस्वस्थता मानवी मन तात्काळ संपविण्याचा प्रयत्न करु लागते त्याशिवाय त्या मनाला शांती मिळत नाही.
३-हा डीसोनन्स संपवुन टाकण्यासाठी माणुस तीन पर्याय निवडतो.
अ- श्रध्दा बिलीफ़ शी तडजोड करणे - आपली चुकीची कृती न बदलता वा सत्याला सामोरे जाउन आपली चुकीची श्रध्दा न बदलता तीच्याशी च तडजोड करुन तीचेच समर्थन करणे.
आ- नविन श्रध्दा जुनीच्या समर्थनासाठी निर्माण करुन तिला च चिकटुन राहणे.
इ- सत्याला प्रामाणिकपणे सामोरे जाणे/ चुकीच्या श्रध्दा अथवा कृती चा त्याग करणे.

या थेअरीनुसार माणुस सहसा पहीले दोन पर्याय च निवडतो अगदी क्वचित तिसरया पर्यायाचा अवलंब केला जातो. वरील केस मध्ये जेव्हा वास्तवाने त्यांची श्रध्दा खोटी ठरविली तेव्हा कल्ट मेंबर्स नी तिच्या जागी नव्या श्रध्दा निर्माण केल्या पण तिसरा पर्याय नाही वापरला. पुन्हा आपल्या जुन्याच चुकीच्या विश्वासाला चिकटुन राहीले.या थेअरी ला अनेक प्रयोगांनी सिध्द करण्यात आले आहे विकीपेडियाचे हे पेज याची अधिक व्यवस्थित माहीती येथे देते ती एकदा जरुर वाचावी.

तिसरा पर्याय न निवडणारे व त्यांची वागणुक

वरील तिसरा पर्याय न निवडणारे मग आपल्या विरोधी विचार असलेल्यांना एकतर टाळतात किंवा कायम आपल्या मतांना पुष्टी जेथुन मिळेल त्याचाच आधार घेतात. तीच पुस्तक वाचतात तीच व्याख्याने ऐकतात आणि त्याच मतांना आपली टाळी देतात. हा डिसोनन्स टाळण्याचा विरोधी आवाज/ मता विषयी जाणीवपुर्वक विकसीत केलेला बहीरेपणा असतो जो डिसोनन्स( बेसुर) ने होणारा त्रास वाचविण्याची एक केविलवाणी धडपड असते. जितका माणुस रीजीड तीतकी त्याची विरोधी विचाराला सामोरे जाण्याची इनफ़ॅक्ट स्वमत विरोधी वास्तवाला सामोरे जाण्याची क्षमता कमी असते.. याला च फ़ेस्टींजर या शब्दात मांडतो “human behavior cannot be explained by reward theory alone. Human beings THINK . They engage in the most amazing mental gymnastics, all just to justify their hypocrisy. “

थेअरीचा फ़ोकस

ही थियरी तिसरया पर्यायासंबंधी जास्त भाष्य करत नाही या थियरी चा फ़ोकस डिसोनन्स कसा निर्माण होतो आणि त्यासाठी सर्वसामान्यपणे पहील्या दोन पर्यायांचा वापर कसा केला जातो हा आहे. थोडीशी एकांगी अशी ही आहे. एलियट अरोन्सन या विषयातील अधिकारी व्यक्तीला जेव्हा विचारण्यात आल की ही थेअरी तिसरा पर्याय वापरण्याविषयीच्या व्रुत्ती वर फ़ारसा प्रकाश टाकत नाही असे का? त्यावर त्यांच उत्तर होत की जोन्सटाउन च्या( धुमकेतु वाला कल्ट ) केसमध्ये ९०० लोकांनी स्वत:चे जीवन संपवुन स्वत:चा डीसोनन्स संपविला होता. त्यातील काहींनी असे केले नाही हे जरी खरे असले (तरी इतक्या बहुसंख्य लोकांनी वरील दोन पर्याय च निवडले होते) आणि म्हणुन ते म्हणतात की “So this theory focuses on , the vast majority who hang on to their beliefs even until death.”

मला वाटत की ,

खोट्या श्रध्दांना कवटाळुन व त्याने मिळवलेल्या तथाकथित शांति पेक्षा डिसोनन्स ने निर्माण झालेली व्याकुळता मला अधिक महत्वाची वाटते. रेडीमेड उत्तर मिळविण्यापेक्षा कठोर वास्तवाला सामोर जाउन घेतलेला शोध आणि निवडलेली मुल्ये अधिक महत्वाची असे मला वाटते.दांभिकपणे आपण बाळगलेली चुकीची तत्वे वास्तवाने खोटी ठरविल्यानंतर ही त्याचा प्रामाणिकपणे त्याग न करता त्यांनाच मरेपर्यंत चिकटुन राहणे हीच माणसाची सर्वात मोठी अधोगती असावी असे वाटते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
4.4
Your rating: None Average: 4.4 (5 votes)

प्रतिक्रिया

इंटरेस्टिँग!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्याबाबत काही आणखी मेट्रिक आहे का? उदा. किती खोलवर एखादी श्रद्धा/ विश्वास गेला/गेली की ह्या वागणुकीस सुरुवात होते?
कुठले लोक पर्याय ३ ची निवड करतात आणि शिक्षणामुळे यात काही फरक पडतो का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes

अर्थ जी

असे काही मेट्रीक आहेत का याची तर मला माहीती नाही पण कधी ह्या वागणुकीस सुरुवात होते कीती थरापर्यंत हे जस्टीफीकेशन जाते याचे या संदर्भात एक अत्यंत विलक्षण अशी सत्यकथा आहे एक एक्स्ट्राऑर्ड्रीनरी अ असलेली ही स्टोरी आहे जी माझ्याकडच्या पुस्तकात आहे ती येथे देतो ती जरुर वाचा.
I KNOW A story. It's one Festinger would probably like. N o t far from
m e , in the small city of Worcester, Massachusetts, lives a walking talking
epitome of rationalization. Her name is Linda Santo. Fifteen years
ago, her three-year-old daughter, Audrey, fell into the family swimming
pool and was discovered floating face down, in the deep end.
She was rescued and resuscitated, but her brain had been blotted out,
just a few electrical squiggles at the base, where the heartbeat is c o n trolled,
where the sweat glands send their signals, that sort of thing.
T h e base.
Fifteen years ago Linda Santo—about whom I have read many
articles and who has appeared many times on local television as halfhero,
half-oddity—fifteen years ago she brought her baby Audrey
home, hooked up to life support, a tracheotomy hole drilled in her
throat, and she bathed the child and turned her ten times a day so her
skin stayed rosy and not a single bedsore puckered, and she propped
her girl's head on white satin pillows, shaped like hearts, and she surrounded
her girl with religious relics, because Linda's Catholic faith
had always been strong. Audrey lay in bed while on a ledge above
her, Jesus held his heart and Mary looked on in an attitude of
ecstasy—tiny statues, huge statues, stigmata on porcelain palms, the
blood beet-red and dried.
A few months after the accident, according to various newspaper
articles, her husband left her. N o w she had no money. She had three
other children. T h e religious relics around Audrey's bedside began to
move. T h e y would, of their own accord, turn and face the tabernacle.
Real blood oozed out of Christ's cracked wounds. Strange oils began
to track the faces of the saints. And Audrey herself, well, her eyes
opened and ticked back and forth, back and forth, and every Lent she
screamed in pain, and then fell into a deep, deep sleep, on Easter.
People began to come to Audrey, people with multiple sclerosis
and brain tumors and heart disease and depression. T h e y began to
come and take home with them some of the miraculous holy oils
dripping from the relics. In the Santo household, miracles occurred
fast, one after the other, as the ill pilgrims kneeling by the girl's bedside
went from blindedness to sight, as Audrey herself began to bleed
from every orifice as though she were suffering the sins of t h e whole
world. Linda claims that she was not mystified. She knew her daughter
was a saint, that God had chosen Audrey to be a victim soul, to
take on the pains of other people so that they could be healed. Linda
had seen it with her own eyes. Furthermore, the date of Audrey's
drowning was August 9, at 11:02 in the morning, and only forty
years before that, on August 9, at 11:02 in the morning, the United
States had dropped the bomb on Nagasaki. O n e incident, according
to Linda, had shamed all of humankind; now this incident was to
redeem it.T h e Santo story is classic Festinger, the way the mother's mind
twists to turn a terrible tragedy into something of salvage, consonance
achieved through a series of rapid rationalizations. How, I
wonder, would a person who so embodies Festinger's theory actually
react to its explication?
L I N D A ' S V O I C E ON the phone i s hoarse and slow; something in its
sound surprises me. I 'm a writer, I tell her. I've seen her on TV. I 'm
exploring b e l i e f and faith and a man named Festinger—
"What is it you want to know?" Linda asks. Perhaps what I hear is
simply celebrity fatigue. O n e more interview in the thousands she's
given, but she'll do it again if she has to—for Audrey, to spread the
word.
" I f you're a journalist who wants to come photograph my girl, I
can tell you right now, you have to ask the church—"
"No," I say. "I want to know if you know of a man named
Festinger, and his experiments . . . "
"Festinger," she says, cackling, and then she doesn't say anything else.
" T h e r e was once this group," I say, "and they believed a savior
would come for them on December 2 1 , and Festinger, a psychologist,
studied what happened when December 21 came around and
they weren't saved."
There's a long pause on the phone. What I 'm doing seems suddenly
cruel. When they weren't saved. In the background I can hear
mysterious sounds, a knocking, the screech of a crow flying skyward.
"Festinger," Linda says. " I s that a Jewish name?"
"Absolutely," I say.
"Jewish people ask good questions," she says.
"And Catholics?" I say.
"We can question. Faith in our God," Linda says. " I t isn't always
absolute. Even if you have a direct email to Jesus, the line goes down
sometime." She stops speaking; I can hear something clotted in her
voice.
" F o r you?" I say. "Has the line gone down?"
"I have breast cancer," Linda continues. "I've had it for the last
seven years. I just found out I 'm in my fifth recurrence, and I'll tell
you, today I 'm tired."
I lift my hand to my own chest, which has its own chiseled spots
from multiple biopsies, the cells beneath the skin squirming recklessly.
"Can Audrey, would you ask her to heal—"
Linda interrupts me. "You want to know the truth?" she says, her
voice sharp. " D o you and Festinger want to know what's what? On a
bad day, a day like today, I doubt whether suffering has meaning.
W r i t e that down," she says.And yet, Linda Santo points to the flaws in this theory, and the
experiments designed to test it. Somewhere, not far from me, right
this minute, sits a woman in semidarkness, and she can cling to nothing.
Her cancer, and her daughter's failure to heal it, are dissonant
with her prevailing paradigm, but instead of seeking consonance
through rationalization, as Festinger, and I, predicted, Linda seems to
be in some suspended place, where beliefs break up and form new
patterns we cannot yet quite see. W h o knows what new shapes of
faith might emerge from Linda's willingness to withhold rationalization
for real revision? Festinger never explored this phenomenon—
how dissonance leads to doubt and doubt leads to light. N o r does he
explore why some people choose rationalization as a strategy, and
others choose revision. I think about Linda. I think about others.
What allowed Isaac Newton to exchange the palm of god for gravity,
or Columbus to come away with a curved rimless world? Throughout
all of history there have been examples of people who, instead of
clapping their hands over their ears, pushed into dissonance, willing
to hear what might emerge. Festinger, actually, i s one of those people.
His ideas and experiments were highly dissonant with the Skinnerian
wisdom of his day. And he pursued it. Why?

लहान मुलाला अमुक एक करु नकोस असे सांगु नये, त्यापेक्षा काय करावे हे सांगावे. लेक्चर नको असते, काय करु नये ह्याबरोबर काय करावे हे पण सांगावे लागते. अंध/श्रद्धा हा प्लेसहोल्डर असल्याने त्यात काय भरायचे हे फ़ेस्टींजर सांगतो काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी जी !
फ़ेस्टींजर ने एक विषय घेतला एका महत्वाच्या मानवी प्रवृत्ती वर फ़ोकस करुन तीच्यावर संशोधन केल. आता त्यात त्याच्या काळानुसार त्याने बघितलेल्या त्या वेळच्या कल्ट मेंबर्स च्या निरीक्षणातुन ही गोष्ट हा पॉईंट त्याला महत्वाचा वाटला की माणस अस जस्टीफ़िकेशन जुन्या श्रद्धेत मॉडीफ़िकेशन करुन अथवा त्या जागी नविन श्रध्दा प्रस्थापित करुन आपल्या मुळ चुकीच्या च धारणांना का चिकटुन राहतात? नकळत पणे असे का वागतात ? त्यामागे परस्परविरोधाने निर्माण झालेल्या डिसोनन्स ची व्याकुळते ची प्रेरणा कशी असते ? त्याच्याशी माणस कस डील करतात ? इतक्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी प्रयोग केलेत आणि काही अतिशय उपयोगी अशी सिध्दांत शोधुन काढली. हे जे इतके केले हे ही करण सोप काम नाही. इतक्या सिध्दते साठी ही बराच वेळ एनर्जी अर्थातच लागते. आता हे खरे आहे की हा प्रॉब्लेम काय आहे तो डिफ़ाइन केला मात्र सोल्युशन काय त्याने दिलेल दिसत नाही. पण मला सर्वात आश्चर्य या गोष्टीच वाटत की त्याने जी इतकी महत्वाची मुलभुत संकल्पना जी मांडली ते योगदान काय कमी आहे का? आणि संशोधन अस च होत असत एक माणुस सर्वच प्रश्नांची उत्तर नाही देउ शकत. आता पुढील येणारे संशोधक या बिंदुपासुन पुढे सरकतात व पुढच्या सोल्युशन चा शोध घेतात. त्यांना इथपर्यंत केलेल्या कामाच्या पायरीवरुन पुढच्या पायरीवर पाय ठेवता येतो. ही तर सलग चालणारी एक अखंड प्रक्रिया आहे ती फ़ेस्टींजर ने च पुर्णत्वाला न्यावी अशी अपेक्षा थोडी अन्यायकारक आणि त्यापेक्षा अव्यव्हार्य ही वाटते.आणि काही प्रॉब्लेम व्यवस्थित मांडण हे तर कधी कधी सोल्युशनपेक्षाही अतिशय महत्वाच ठरत. उदा. वैद्यकीय क्षेत्रात जस एखादा रोगाच कारण निश्चीत करण कशामुळे होतो हे अगोदर जस शोधण महत्वाच असत तस. मग ऒषध सोल्युशन्स ची निर्मीती त्या नंतर क्रमाने होत च असते.पण मुळात रोग काय कशामुळे होतो ते ही शोधण महत्वाच नाही का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत. थिअरी खरेच सत्य शोधुन काढते ह्याबद्दल दुमत नाही. तुम्ही दिलेल्या निष्कर्षाबद्दल मी मत मांडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गंमतीशीर आहे.
काही प्रमाणात आसपासही दिसतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

गमतीशीर आहे याबद्दल सहमत. आसपासचं माहित नाही पण मला स्वतःमध्ये अशी वागणूक दिसते.
मनुष्यनिर्मित हवामानबदलावर व खनिजस्रोत संपतात किंवा दुष्प्राप्य होत जातात यावर माझा अंधविश्वास आहे.
जेव्हा हे सगळं खोटं ठरेल तेव्हा "इ" पायरीवर व्याकुळ न होता जाण्याची ईश्वर मला शक्ती देवो हीच प्रार्थना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी मनातलं बोललात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आपण स्वत: असेच बर्‍यापैकी brainwashed असतो हा विचार थरार आणणारा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

२१-२२ डिसेंबर/मार्च्/सप्टेंबर्/जून हे दिवस (days of equinoxes, maximum light, minimum light) मनोरुग्णांत सायकॉसिस होण्याचे दिवस असतात.
http://www.bphope.com/Item.aspx/109/seasonal-swings-in-light-and-mood

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मनोरुग्णांना lunatic म्हणतात; lunar- चांद्र कलेशी संबंधित भावनिक हिंदोळ्यावर असल्यामुळे.
अर्थात त्यात तथ्य आहे की नाही, हे ठाउक नाही.
मनोरुग्णांना पौर्णिमा-अमावस्येला अधिक त्रास होतो अशी ऐकिव माहिती आहे.
(ग्राम्य भाषेतः- वेड्यांना अमवस्या पौर्णिमेला वेडाचा झटका अधिक येतो.)
.
.
सूर्याचा संबंध प्रथमच ऐकतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अमावास्या- पौर्णिमेला वेडाचे झटके येण्याबद्दल बोलले जाते. परंतु ह्या समजुतीला बळकटी देणारे ठोस संशोधन नाही.
हिवाळ्यात सोर्यप्रकाश बराच कमी मिळतो अशा देशांमध्ये हा काळ मूड- डिसऑर्डरचा त्रास जास्त होण्याचा असतो हे मात्र सिद्ध झालेले आहे. उन्हात बाहेर पडा, घरात कृत्रिम प्रखर प्रकाश करा, पडदे मागे ओढून ठेवा इ सल्ले अशा वेळी देण्यात येतात. ह्या काळात घरी किंवा इनडोअर राहणे वाढ्ते. शारीरिक चलनवलन , व्यायाम कमी झाला की शरीरातली नैसर्गिक अँटीडिप्रेसंट घटतात. हाच काळ सणासुदीचा देखील असतो. त्यामुळे मोठ्या खर्चाचा ( भेटवस्तूंची खरेदी, प्रवास, मेजवान्या, घरसजावट/ अपग्रेड इ )काळदेखील असतो. शिवाय कौटुंबिक गाठीभेटींच्या निमित्तने नवेजुने कलह उफाळून येणेही संभवते. सूर्यप्रकाशाच्या कमतरतेबरोबर ह्याही घटकांचा मूड डिसऑर्डर बळावण्यात सहभाग असू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम माहिती. अच्युत गोडबोलेंच्या मनात या पुस्तकात ही माहिती पृष्ठ क्र२४९ वर दिली आहे. त्यातील छटा थोडी वेगळी आहे. मारीयो कीच च्या ऐवजी त्यात लिसा ही गृहीणी म्हटल आहे. पण आपण दिलेले विश्लेषण मला अधिक सुसंगत व सुत्रबद्ध वाटले. काही प्रॉब्लेम व्यवस्थित मांडण हे तर कधी कधी सोल्युशनपेक्षाही अतिशय महत्वाच ठरत हे आपले मत अंशतः मान्य आहे. प्रॉब्लेम व्यवस्थित मांडणे ही सोल्युशन कडे नेणारी एक भरवश्याची वाट आहे. १९५६ नंतर च्या काळात मानसशास्त्रात अनेक घडामोडी झाल्या असणार. त्यात डिझोनन्स थिअरी विषयी अधिक वाटचाल असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

उत्तम माहीती. लेख आवडला.

खोट्या श्रध्दांना कवटाळुन व त्याने मिळवलेल्या तथाकथित शांति पेक्षा डिसोनन्स ने निर्माण झालेली व्याकुळता मला अधिक महत्वाची वाटते. रेडीमेड उत्तर मिळविण्यापेक्षा कठोर वास्तवाला सामोर जाउन घेतलेला शोध आणि निवडलेली मुल्ये अधिक महत्वाची असे मला वाटते.दांभिकपणे आपण बाळगलेली चुकीची तत्वे वास्तवाने खोटी ठरविल्यानंतर ही त्याचा प्रामाणिकपणे त्याग न करता त्यांनाच मरेपर्यंत चिकटुन राहणे हीच माणसाची सर्वात मोठी अधोगती असावी असे वाटते.

काही वेगळा विचार वाचल्याचा आनंद मिळाला. सिम्प्ली सुपर्ब!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थेअरी ला अनेक प्रयोगांनी सिध्द करण्यात आले आहे विकीपेडियाचे हे पेज याची अधिक व्यवस्थित माहीती येथे देते
.........पानाचा दुवा द्यायचा राहिला आहे.
---
लेख वाचून शर्लॉक होम्सचे एक वाक्य आठवले -
Never theorise before you have data. Invariably, you end up twisting the facts to suit theories, instead of theories to suit facts.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमुक जी

या काही चांगल्या लिंक्स या विषयावरच्या यातील प्रिझन चा प्रयोग जबरदस्त आहे. माझा लेख फारच त्रोटक व अपुरा आहे पण खालील वाचनाने या विषयाचे
आकलन अधिक व्यवस्थित व अचुक होइल अशी खात्री वाटते व माझ्या मांडणीतील कच्चे दुवे ही क्लीअर नक्कीच होतील असा विश्वास वाटतो.

१-http://en.wikipedia.org/wiki/Cognitive_dissonance
२-http://web.mst.edu/~psyworld/cognitive_dissonance.htm
३-http://psychclassics.yorku.ca/Festinger/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. मांडणीदेखील छान झालेली आहे.

खोट्या श्रध्दांना कवटाळुन व त्याने मिळवलेल्या तथाकथित शांति पेक्षा डिसोनन्स ने निर्माण झालेली व्याकुळता मला अधिक महत्वाची वाटते.

श्रद्धांना कवटाळून मिळणारी शांती आणि त्या सोडण्यामुळे येणारी व्याकुळता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण दुःखाचा अभाव अशी सुखाची व्याख्या करता येते. मात्र कुठच्या दृष्टिकोनातून बघतो यावर श्रद्धा सोडून डिसोनन्सवर मात करण्याचा प्रयत्न करायचा की श्रद्धेतून सुख मिळतं असं म्हणून त्यांचा पाठपुरावा करायचा हे ठरतं. त्यामुळे ही मांडणी महत्त्वाची आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक, मार्मिक लेखन तर आहेच पण बर्‍याच प्रमाणात आत्मपरिक्षणास भाग पाडणारे लेखन आहे.
आपल्या कित्येक समजुती या खरच श्रद्धा आहेत का सत्या आहेत यावर अनेकद विचार चालुच असतो. काही गोष्टींवर अनेकांबरोबर मतभेद झाले की स्वतःची मते सतत विदा/अनुभव/तथ्ये/विज्ञान/विवेक यांच्या कसोटीवर घासून पाहत राहणे हाच उपाय रहातो. एकदा का स्वतःकडेच त्रयस्थासारखे बघायची सवय झाली की मग तिसरा पर्याय निवडणे तितकेसे कठीण रहात नसावे.

"कशावर" तरी अतिशय घट्ट विश्वास ठेवणार्‍या व्यक्तींचा स्वतःवर तितकाच ठाम विश्वास असतो असे निरिक्षण. आमच्यासारख्या संशयी/ इतरांवर (व्यक्तीच नाही तर कोणत्याही घटनेवर/माहितीवर/फॉर दॅट मॅटर बहुतांश अनेक गोष्टिंवर) पटकन विश्वास न ठेवणार्‍या व्यक्ती स्वतःच्या अनेक मतांबद्दलही सतत साशंक असतात - व मत बदलायला तयारही असतात.

या मनुष्यस्वभावाच्या दोन प्रकारांतील चांगले/वाईट करता येणे अयोग्य ठरावे. त्या त्या प्रसंगात त्या-त्या स्वभावाचे आपले एक महत्त्व असते. आणि माणसाचा गाडा पुढे जाण्यासाठी दोन्ही प्रकारची माणसे तितकीच गरजेची असतात असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"कशावर" तरी अतिशय घट्ट विश्वास ठेवणार्‍या व्यक्तींचा स्वतःवर तितकाच ठाम विश्वास असतो असे निरिक्षण. आमच्यासारख्या संशयी/ इतरांवर (व्यक्तीच नाही तर कोणत्याही घटनेवर/माहितीवर/फॉर दॅट मॅटर बहुतांश अनेक गोष्टिंवर) पटकन विश्वास न ठेवणार्‍या व्यक्ती स्वतःच्या अनेक मतांबद्दलही सतत साशंक असतात - व मत बदलायला तयारही असतात.

हे खरय.
पण अजून एक क्याटेगरी आहे. "कशावर" तरी घट्ट विश्वास करणारी मंडळी स्वतःवरही विश्वास ठेवत नाहित. स्वतःच्या विवेकावरही नाही.
नाहीतर समोर दिसणआर्‍या आणि सामान्य तर्क असणार्या गोष्टींनाही त्यांनी नाकारलं नसतं.
ते पट्टीचे "शरण" जाणारे असतात. मेलेला माणूस पुन्हा आलेला कुणी पाहिलेला नाही हे स्वतःला ठाउक असूनही "कशावर" किंवा "कुणावर" तरी विश्वास असल्याने हे लोक डोके गुंडाळून ठेवतात.
स्वतःच्याच डोक्यावर विश्वास नाही ना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मला म्हणाय्चे होते "त्यांच्या विवेकाने - बुद्धीने" एक गोष्ट येनकेनप्रकारेण मान्य केली की झाले! स्वतःवर (म्हवता:च्या श्रद्धेवर) इतका विश्वास असतो की एकदा बनवलेले ते मत बदलणे त्यांना मान्यच होऊ शकत नाही म्हणून ते झापडे लाऊन बसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!