ट्रोजन युद्ध भाग ३.२- अकिलीसच्या शवाभोवतीची लढाई, अंत्यविधी व फ्यूनरल गेम्स. जजमेंट ऑफ आर्म्स आणि थोरल्या अजॅक्सची आत्महत्या.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
रोचक
रोचक.
चितेचा, केश-वपन/अर्पणाचा उल्लेख हिंदू संस्कृतीशी जवळाचा वाटतो, तसेच रात्री युद्ध बंद करण्याचे नियम महाभारतातील युद्धबंदीप्रमाणेच वाटतात, हे मधेच 'ऑलिम्पिक' काय चालू झाले, बायका काय भेट मिळतात, आणि ते लोकं एकमेकांचं चुंबन वगैरे काय घेत आहेत हे जरा इतका वेळ लागलेला मुड पटकन बदलणारं वाटलं. भाल्यानेच बरेचसे युद्ध केल्याचे दिसते आहे, इतर शस्त्रांबद्दल फारशी माहिती दिसत नाही.
एकंदर हा भागही मस्त झाला.
धन्यवाद! फ्यूनरल गेम्स हा
धन्यवाद!
फ्यूनरल गेम्स हा तत्कालीन ग्रीक कल्चरचा अविभाज्य भाग असणार नक्कीच. पॅट्रोक्लस आणि अकिलीस या दोघांच्याही मृत्यूनंतर ते खेळलेले दिसतात. एवढेच नव्हे तर वृद्ध नेस्टॉरही आपल्या तरुणाईत खेळलेल्या गेम्सची आठवण करून देतो त्यावरून ते कल्चर एकदम रुजलेलं दिसतं. आणि जर मूळ काव्ये वाचलीत, तर युद्धाच्या वर्णनाइतकीच या गेम्सची वर्णने एकदम जिवंत वाटतात. उत्सवी वातावरण एकदम दिसून येते त्यांतून. अन बायका भेट मिळणे हेही तत्कालीन कल्चरप्रमाणेच होते.
अन ते किस वैग्रे गालांवर अथवा कपाळावर असेल असा अंदाज आहे ;)
आणि इतर शस्त्रे फारशी दिसत नाहीत हे खरेच आहे. लाँग रेंजला मुख्यतः भालाच. त्याचे दोन प्रकार होते असेही दिसते. कारण भाषांतरात स्पीअर आणि जॅव्हेलिन असे दोन शब्द येतात. म्हणजे हेवीवेट ड्यूटीसाठी एक मोठा भाला आणि एक लाईटवेट ड्यूटीसाठी दुसरा. बाकी मग तलवार अन धनुष्यबाण इतकीच शस्त्रे दिसतात. गदा वगैरे भानगडी त्यांना ठाऊक असल्याचे दिसत नाही. त्याचे काम धोंड्यांनीच भागवत असत असे दिसते. उत्खननात नानाप्रकारची तत्कालीन शस्त्रे अन चिलखते व हेल्मेट्स मिळालेली आहेत, त्यांचे यथावकाश पुढे वर्णन येईलच.
इथे पोस्टहोमेरिकाचे पाचवे बुक
इथे पोस्टहोमेरिकाचे पाचवे बुक संपते.