रमले मी!

www.pustakjatra.com चे श्री. राज जैन यांनी एक छान विषय डोक्यात घुसवला....
ते म्हणाले,
"आयुष्यात एकदा का होईना वाचावीच अश्या पुस्तकांची सूची करू या असे मनात आहे.... चला करा सुरवात!
आपली आवडती पुस्तके सांगा!"

अन भरभर यादी तयार होत राहिली ---

समग्र जी.ए. कुलकर्णी (अनुवादित पुस्तकांसहित, जसे की रान-गाव-शिवार,वाटेवरला प्रकाश, सोन्याचे मडके)
समग्र माधव आचवल
समस्त इंदिरा संत
समग्र विजय पाडळकर
दुर्गा भागवतांची निवडक - उदा. व्यासपर्व, पैस
समग्र चिं. त्र्यं. खानोलकर
समग्र पु. शि. रेगे
समग्र मेघना पेठे
इरावती कर्वे - युगांतर
समग्र भैरप्पा
समग्र प्रकाश नारायण संत
समग्र कविता महाजन
समग्र मिलिंद बोकील
रविन्द्रनाथ टागोर - पोरवय, तीन भाषणे, नष्टनीड, एकविंशति
निवडक तारा वनारसे - तिळा तिळा दार उघड, केवल कांचन, श्यामिनी
निवडक सुबोध जावडेकर - कुरूक्षेत्र, मेंदूतील माणूस
राजीव तांबे
समग्र चं. प्र. देशपांडे
किरण नगरकर - सात सक्कं त्रेचाळीस
निवडक सतीश तांबे - राज्य राणीचं होतं, माझी लाडकी पुतनामावशी, रसातळाला ख.प.च.
निवडक सानिया - आवर्तन, स्थलांतर, काही निवडक कथासंग्रह, प्रवास
निवडक महेश एलकुंचवार - मौनराग, पश्चिमरंग
तत्त्वमसि - ध्रुव भट्ट
गंगेमध्ये गगन वितळले - अंबरीश मिश्र
रस अनौरस - राजन खान
आवरण - भैरप्पा
अमृता-इमरोज
शिवाय
जे. कृष्णमूर्ती,
स्वा. विवेकानंदांची विविध योगविषयक,
विनोबा भावे - ज्ञान ते सांगतो पुन्हा, गीता-प्रवचने

ह्यातील बरीचशी वाचली आहेत. वाचावीशी वाटणारी आणलेली आहेत
कोणती आणायची याची मनातल्या मनात यादी बनवत आहे, पण आधीची संपविल्याशिवाय नवीन आणण्याचा धीर होत नाहीये.

थोडक्यात,
फारसा वेळ देऊ शकता येत नाहीये तरीही...
पुस्तकांच्या हव्याहव्याशा पसार्‍यात.....

रमले मी!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars