भारताची प्रगती ७: कपडालत्ता

भारताची प्रगती १: प्रास्ताविक
भारताची प्रगती २: घृतं पीबेत
भारताची प्रगती ३: जीवेत शरदः शतम्
भारताची प्रगती ४: सहस्रेषु च पंडितः
भारताची प्रगती ५: अवघाची संसार
भारताची प्रगती ६: अन्न हे पूर्णब्रह्म
अन्न वस्त्र निवारा या तीन महत्त्वाच्या गरजांपैकी गेल्या भागात आपण अन्नाच्या उत्पादनात गेल्या काही दशकांत झालेली नेत्रदीपक वाढ बघितली. धान्याचं उत्पादन दरडोई दीडपट होऊन भारत हा आयात करणारा देश हे चित्र पालटून स्वयंपूर्ण व निर्यात करणारा देश बनला. धान्यापलिकडे इतरही अन्नाचं - फळं, भाज्या, तेल, साखर, मांस, अंडी यांचं - उत्पादनही दरडोई अनेक पटीने वाढलेलं दिसलं. या लेखात आपण दुसऱ्या महत्त्वाच्या गरजेकडे, म्हणजे कपड्यांच्या गरजेकडे बघू.

भारतात कापड उत्पादनाला फार मोठा इतिहास आहे. म्हणजे हजारो वर्षांचा. मात्र एखादं तंत्रज्ञान देशात असणं आणि त्याचे फायदे सर्वांना असणं यात प्रचंड मोठा फरक आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर शेतीचीही हजारो वर्षांची परंपरा आहे. याचा अर्थ सर्वांनाच पोटभर अन्न सदासर्वकाळ मिळत होतं असा होत नाही. दुर्दैवाने कोण किती कपडे वापरत असे याचे उल्लेख कमी येतात. नोंदी केल्या जातात, आणि सर्वसामान्यांना माहीत असतात त्या राजेरजवाड्यांच्या, श्रीमंतांच्या, तालेवारांच्या. भारतीय कपडानिर्मितीबाबत बोललेलं असतं ते श्रीमंत प्रवाशांनी आणि व्यापाऱ्यांनी. ढाक्याच्या मलमलीबाबत आपण अशी अनेक वर्णनं ऐकलेली असतात 'त्या मलमलीचं धोतर घडी करून काडेपेटीत ठेवता येत असे' 'ती गवतावर पसरली तर जणू काही दवच पडलंय असं वाटे'. यातलं काव्य किती आणि सत्य किती हा प्रश्न क्षणभर बाजूला ठेवू. पण खरोखऱ किती लोकांना कपडे वापरायला मिळत याबद्दल आपल्याला काहीच उत्तर मिळत नाही.

भारताच्या कापडाच्या इतिहासाबाबत बोलायचं झालं तर त्यात ब्रिटिशांच्या राज्यामुळे आणखीन प्रश्न निर्माण होतात. ब्रिटिशांनी आपल्या राजवटीत इथले उद्योगधंदे खच्ची केले, आणि भारताला केवळ कच्चा माल पुरवणारा देश म्हणून वापरलं. साहजिकच एकोणिसाव्या शतकात जी स्थित्यंतरं झाली ती आपल्याला नजरेआड करता येत नाहीत. पण स्वातंत्र्यकाळी आपल्या देशात कच्चा माल म्हणून तरी पुरेसा कापूस पैदा होत होता का? आज आपल्याकडे प्रगत टेक्स्टाइल इंडस्ट्री आहे. तितून प्रत्येकाला पुरेसा कपडा मिळतो का? मुळात कपडा अधिक प्रमाणात निर्माण होतो का?

सर्वात प्रथम आपण कापसाच्या उत्पादनाकडे बघू. डावीकडच्या आलेखात १९४७ सालपासूनचं कापसाचं उत्पादन दाखवलेलं आहे. १९४७ साली भारतात २.८ मिलियन गासड्या कापूस व्हायचा. विसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत तो आकडा सुमारे साडेसहापट वाढून १७.८ वर गेला. आणि २०१३ सालपर्यंत अजून दुपटीने वाढून ३७.५ मिलियन गासड्या इतकं उत्पादन झालं. नुसतं उत्पादनच वाढलं असं नाही, तर कापसाची प्रतही सुधारली.

The import of cotton, particularly of Egyptian and Sudanese long and extra long staple cotton, which was a regular phenomenon till 1978-79 was no longer required ass India now is now is not only self sufficient in her cotton requirement but also has emerged a net exporter of cotton including cottons comparable to Egyptian and Sudanese types.

थोडक्यात कच्च्या मालाचं उत्पादनही अगदी तुटपुंजं होत असे. गेल्या दशकांत हे दुर्भिक्ष्य कमी झालेलं आहे.

आलेखासाठी विदा आणि उद्धरणं इथून, इथून घेतले आहेत.

पण कापसाचं उत्पादन वाढलं, त्याच प्रमाणात दरडोई उपलब्ध कापड वाढलं का? इतिहासात मागे जाऊन पाहिलं तर काय दिसतं? दरडोई कपड्याचा वापर हा गेल्या काही दशकांत प्रचंड वाढलेला आहे.
THE per capita availability of all-cloth in the country in the last decade, i.e. from 1989-90 to 1999-2000, has gone up from 22.65 sq.mtr. to 30.55 sq.mtr., registering an average annual growth of 3.4 per cent. But the availability of cotton cloth had de clined from 14.63 sq.mtr. to 14.16 sq.mtr. during the same period.
ही वाढ मुख्यत्वे बिनसुती कपड्यांतून आलेली आहे. संदर्भ


गेल्या सहा दशकांत झालेले बदल हे चारशे वर्षांच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर ठेवून पहाणं फारच रोचक ठरतं. (वरील आलेखात दरडोई कापडाची उपलब्धता स्क्वेअर मीटरमध्ये दिलेली आहे) अकबराचा काळ म्हणजे सोळाव्या शतकाचा शेवट आणि सतराव्या शतकातली सुरूवात हा भारतीय इतिहासातला तत्कालीन आर्थिक उच्चीचा काल मानला जातो. त्यानंतर एकंदरीतच सतराव्या आणि अठराव्या शतकांत समृद्धीचा ऱ्हास होत गेला. ब्रिटिशांच्या काळात त्यावेळी युरोपात पसरलेल्या औद्योगिक क्रांतीचा जेमतेम गंध भारतात पोचला. कपड्याच्या उपलब्धतेतून हे चित्र स्पष्ट होतं. १६०० ते १८०० या काळात दरडोई उपलब्ध कपडा थोडा थोडा कमी झाला. १९ व्या शतकात दरडोई कापडाची उपलब्धता किंचित वाढली. या आलेखात १८७१ ते १९६० यामधले आकडे नाहीत, त्यामुळे तिथे दिसणारी वाढ ही नक्की कशी झाली हे सांगणं कठीण आहे. पण महत्त्वाचा मुद्दा असा की १६०० ते १८७१ या २७१ वर्षांच्या कालखंडात बदल जवळपास नव्हता. आजकाल आपल्याला दरवर्षी पाच सहा टक्क्यांनी उत्पादन वाढण्याची, वीस वर्षांत उत्पादन दुप्पट होण्याची सवय आहे. इथे दोनशे वर्षांत थोडी घट पुढच्या सत्तर वर्षांत थोडी वाढ संथ 'प्रगती'चं चित्र दिसतं. सरासरी प्रगतीचा दर किती? २७१ वर्षांत बावीस टक्के! म्हणजे वर्षाला सरासरी ०.०७%. या पार्श्वभूमीवर १९६० ते २०१० या पन्नास वर्षांत झालेली प्रगती थक्क करून टाकणारी आहे. सतत पन्नास वर्षं दरडोई उत्पादनात सुमारे ३ टक्के वाढ झाली. आणि हेसुद्धा लोकसंख्या अडीचपट झालेली असताना. २००३ ते २०१० या सात वर्षांत कापडाची दरडोई उपलब्धता दरवर्षी ५ टक्क्यांनी वाढली! तीन शतकांचा विदा इथून, आणि गेल्या दशकांचा विदा इथून घेतला आहे.

या लेखमालेतल्या आधीच्या भागांवर जो आक्षेप घेतला गेला होता, तो इथेही घेतला जाईल याची कल्पना आहे. म्हणजे 'घासकडवी, तुम्ही सरासरी सुधारली हे दाखवलं, पण वितरण सुधारलं हे दाखवलेलं नाही.' हा आक्षेप अर्थातच मान्य आहे. मात्र माझा अजूनही दावा आहे की जेव्हा दरडोई उत्पादन अत्यंत तुटपुंजं असतं तेव्हा वितरण अतिशय वाईट असतं. कारण आडातच नाही तर पोहऱ्यांमध्ये येणार कुठून? पोहरा लहान आणि आड मोठा हे एकदा मान्य केलं की आडातलं पाणी वाढल्यावर जास्त पोहरे भरणार हे उघड आहे. तसंच दरडोई उत्पादन वाढलं की अधिक टक्केवारी लोकांना त्या वस्तू मिळतात. याची काही उदाहरणं आपल्याला पुढच्या लेखांमध्ये पहायला मिळतील. तूर्तास तरी उत्पादनवाढ ही पहिली पायरी आहे लक्षात घेऊ - कारण सगळ्यांना पुरेसं मिळण्यासाठी आधी मुळात पुरेसं बनायला हवं. ही पहिली पायरी चढणं ही प्रगती मानू.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

२००० सालाच्या आसपास असं काय घडलं की कापूस उत्पादन असं खाडकन वाढलं?

कापडाची किंमत आणि माणशी उत्पन्न यांची प्रत्येक वर्षासाठी तुलना केली तर हे तयार झालेलं कापड लोकांना विकत घेण्याइतकं स्वस्तं होतं का याचा पण अंदाज येईल. आणि त्यायोगे वितरणाबाबत अंदाज येऊ शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

२००० सालाच्या आसपास असं काय घडलं की कापूस उत्पादन असं खाडकन वाढलं?

गेल्या दशकात बीटी कापसामुळे उत्पादन वेगाने वाढलेलं आहे.

कापडाची किंमत आणि माणशी उत्पन्न यांची प्रत्येक वर्षासाठी तुलना केली तर हे तयार झालेलं कापड लोकांना विकत घेण्याइतकं स्वस्तं होतं का याचा पण अंदाज येईल. आणि त्यायोगे वितरणाबाबत अंदाज येऊ शकेल.

एका अर्थाने हा द्राविडी प्राणायाम झाला. वस्तूंची किंमत उपलब्धतेनुसार ठरते हा अर्थशास्त्राचा नियम आहे. सप्लाय वाढला की किंमत कमी झाली हे उघड आहे. माणशी उत्पन्न आणि किमती काढणं म्हणजे हा नियम तपासून पाहणंच नाही का? (हे इतकं सोपं नाही हे माहीत आहे, पण फर्स्ट अॅप्रोक्झिमेशन बरोबर आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आलेखामधे दोन ठिकाणी, १९७५च्या जवळपास आणि १९९० च्या जवळपास, लक्षणीय घट दिसत्येय. दुष्काळ/अपुरा पाउस, आर्थिक मंदी, कपाशीवरचा रोग असं काही ढोबळ कारण आहे त्याचं?

त्याच्या अनुषंगाने अजून एक प्रश्न - वरच्या प्रतिसादात तुम्ही म्हंटलंय की "गेल्या दशकात बीटी कापसामुळे उत्पादन वेगाने वाढलेलं आहे." बीटी कापसामुळे का साधारण पाऊसपाणी चांगलं झालंय म्हणून? (बीटी = ?. genetically modified असलेली एखादी बुयाण्याची जात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

Just a quick suggestion. You can use NSSO data to say a lot about consumption of various things. This can make your claim more robust.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes

मात्र माझा अजूनही दावा आहे की जेव्हा दरडोई उत्पादन अत्यंत तुटपुंजं असतं तेव्हा वितरण अतिशय वाईट असतं. कारण आडातच नाही तर पोहऱ्यांमध्ये येणार कुठून? पोहरा लहान आणि आड मोठा हे एकदा मान्य केलं की आडातलं पाणी वाढल्यावर जास्त पोहरे भरणार हे उघड आहे.

एखाद्या आडातील उत्पादन वाढलं तर पोहर्‍यांच्या संख्येतही वाढ अपेक्षित आहे. जर एकच पोहरा बसवला असेल तर आडात कितीही पाणी निर्माण होऊदे बाहेर एका मर्यादेहून अधिक येऊच शकत नाही.

बाकी, बीटी कॉटनमुळे झालेले दूरगामी नुकसान कालांतराने भारताला व जगालाही कित्येक गोष्टी (इन्क्युडिंग अन्न) मोठ्या प्रमाणात आयात करायला लावेल असे दिसते. विशेषतः हा तहानलेला कापूस ज्या वेगाने भूगर्भातले पाणी पितो, त्यावेगाने हा कापूस पसरला तर प्यायला सुद्धा विहिरींत पाणी राहिल का शंका वाटते. यंदा मराठवाड्यातील माझ्या काही मित्रांचे पालक बोअरवेलला पिण्यापुरतेही पाणी नाही म्हणून ऐन पावसाळ्यात पुण्याला शिफ्ट झाले आहेत (मात्र त्या पट्ट्यात याआधीचे काही वर्षे बीटी कापसाच्याच पिकांचा सोस होता कारण परतवा छान मिळत होता आता मात्र एकूणच तोंडचे पाणीही पळाले आहे) . अश्यावेळी ही वरवर दिसणारी - की अट्टाहासाने दाखवली जाणारी? - प्रगती लांबचा विचार करता मोठा घात करेल अशी भितीही वाटते. (आधीच पाण्याच्या कमतरतेमुळे यंदाचे कापसाचे पीक अपेक्षेहून कमी आले आहे. संदर्भ पंजाब, विदर्भ

शिवाय त्यामुळे निर्माण होणारे सामाजिक प्रश्नही भयावह आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बीटी कॉटनमुळे पेस्टिसाइड्सचा वापर कमी होतो, दरएकरी कापसाचे उत्पादन तसेच शेतकर्‍याचे उत्पन्न वाढते यावर मोठ्या प्रमाणावर संशोधन उपलब्ध आहे. पण बीटी कॉटनमुळे भुजलपातळी खालावते याबद्दल काही संशोधन सापडू शकले नाही. सामाजिक प्रश्न निर्माण होतात याविषयी दिलेला दुवा निश्चितपणे पक्षपाती संस्थेच्या संकेतस्थळाकडे घेऊन जातो. त्यांचा बीटी कॉटनला विरोध असणे हे मॉन्सान्टोने बीटी कॉटनचे समर्थन करण्यासारखे आहे. बीटी कॉटनचे अर्थातच तोटे असू शकतील पण पाणी किंवा सामाजिक प्रश्न हे तोटे आहेत याला काही विश्वसनीय पुरावा आहे काय?

१. Permaculture Research Institute: Permaculture integrates land, resources, people and the environment through mutually beneficial synergies वगैरे वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण बीटी कॉटनमुळे भुजलपातळी खालावते याबद्दल काही संशोधन सापडू शकले नाही.

जरा गुगलले तर काही व्हाईटपेपर्स, लेखांमध्ये पुढिल प्रकारची वाक्ये मिळतील.
In addition to the above drawbacks, Bt cotton was found to require far more water than its non-Bt counterpart. And Bt cotton seeds are expensive, priced at approximately four times the cost of high-performance non-Bt cotton hybrids. This raises input costs for farmers, putting them in a difficult position if yields and pesticide savings are not substantial.

वानगीदाखल हा व्हाईटपेपर म्हणतो:
Farmers, who according to GEAC’s earlier statements that they would earn an additional income of Rs. 10,000 per acre with Bt cotton, actually lost more than this amount by planting Bt varieties. Not only is the cost of the seed higher than that of non Bt varieties but also Monsanto’s varieties need more fertilizer and water

कापसाचे उत्पादन वाढते हे खरेच पण भरपूर पाण्याची सोय नसल्यास, बियाणांतील गुंतवणूकीचा खर्चे मोठा असल्याने शेतकरी चांगलेच तोट्यात जातात व कर्जबाजारी होतात. वरच्या प्रतिसादातील विदर्भाच्या संदर्भाने द हिंदुमधील आलेला लेख पहावा.

दुसरे भारतात विशेषतः गुजरातमध्ये बीटी कापसालाही नव्या प्रकारची कीड लागत आहे. त्यावर मॉन्सॅटोलाही उपाय मिळाला नाहिये व गोल गोल उत्तरे देणे चालु आहे. अर्थात तिथे पेस्टिसाईड्सचा वापर वाढलाच आहे. याच्याशी समांतर असा बीटी कॉटनविषयक हे आक्षेप व अभ्यास लक्षात घेण्यासारखा आहे.

बाकी बीटी कॉटन भारतात मोठ्या प्रमाणात होतो आहे (विकीनुसार ९३%). भविष्यात या बियाणांमुळे काही धोका उत्पन्न झाला तर अख्ख्या देशावरा बराच मोठा परिणाम असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गुगलल्यास पृथ्वीचे वय ६००० वर्षे असल्याबद्दलही श्वेतपत्रिका आणि लेख सापडतात. हे लेख ज्या संकेतस्थळांकडे घेऊन जातात त्यावरून या लेखांच्या विश्वसनीयतेबद्दल कल्पना येते. तुम्ही जो परिच्छेद उदधृत केलेला आहे तोही एका पक्षपाती संस्थेच्या संकेतस्थळावर असलेल्या लेखाकडे घेऊन जातो. ज्या लेखात हा परिच्छेद आहे, त्यात अनेक दावे आहेत कुठलाही सांख्यिकीय पुरावा दिलेला आढळत नाही. त्यातही बीटी पीकांना इतर कापसापेक्षा जास्त पाणी लागते हा दावा मान्य केला तरी त्यावरून भूजलपातळी खाली खाली जाते हे मान्य करण्यासाठी किती जास्त पाणी लागते याबद्दल काही सांख्यिकीय प्रमाण द्यावे लागेल. थोडक्यात भूजल पातळी खालावते हे तथ्य असल्यास ते स्पष्ट करण्यासाठी आवश्यक असलेले सांख्यिकीय तपशील असलेल्या लेखांना थोडेफार महत्त्व आहे. तुम्ही उदधृत केलेला दुसरा परिच्छेद वंदना शिवा यांचा आहे. त्यांचे जागतिकीकरणविरोधी पर्यावरणप्रेम प्रसिद्ध असल्याने त्यांच्या दाव्यांकडेही (पूर्ण १९ पानी श्वेतपत्रिका उपलब्ध नसल्याने वाचू शकलो नाही) विश्वसनीय म्हणून पाहता येत नाही. त्यांच्या लौकिकाकडे दुर्लक्ष करून वाचण्याइतपतही काम केलेले नसल्याने तो प्रयत्न आधीच सोडून दिला होता. अन्यत्र उर्वरीत एकमेव दुवाही 'थर्ड वर्ल्ड नेटवर्क' या वेलमिनिंग परंतु बायस्ड संकेतस्थळाचाच आहे.

तुम्हाला स्वतंत्र संशोधकांनी केलेले संशोधन शोधून सापडत नसल्यास काळजी करू नये. मलाही सापडू शकलेले नाही. बीटी कॉटनला पाणी जास्त लागत असेल किंवा नव्या प्रकारची कीडही कदाचित लागत असेल पण हे सगळे मान्य करण्यासाठी काही किमान विश्वसनीयतेचे निकष पाळणारे दाखले हवे आहेत. २०११ पर्यंत जवळजवळ ९०% एकूण कापसाच्या पीकापैकी बीटी कापसाचे होते. शेतकर्‍यांचे नुकसान होत असूनही त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी बीटी कॉटन का स्विकारले असावे हा प्रश्न अनुत्तरीत आहे. कदाचित शेतकर्‍यांचे हीत शेतकर्‍यांपेक्षा सस्टेनेबल विकासवादी लोकांना जास्त चांगले समजत असावे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता हे म्हणजे काँग्रेसचा विरोध भाजपाने केला तर त्याच्याकडे बघयाचेच नाही म्हणणे झाले. ते मान्य नसेल तर खोडून काढा. पण ग्राह्यच नाही?

असो.
हे बघा बिटी बियाणांचे रिसर्च सेंटर CICR (central institute of cotton research) काय म्हणते: [सदर प्रश्नोत्तरांचा सुर बीटी बियाणांची स्तुती करण्याचाच दिसतोय कित्येक प्रश्नोत्तरांत तर प्रश्नाला बगल देत बिटी बियाणांची स्तुती केलीये / जबाबदारी टाळलीये]

5. Is Bt-cotton best suited only for irrigated regions?
Bt cotton technology is in the form of only Bt-hybrids. In general, hybrids have a longer duration with large number of bolls per plant, with a long fruiting window period. The boll retention is high in Bt-cotton plants and therefore there is a need for continuous supply of soil moisture and nutrients. Such plants need more water and nutrients to ensure proper nutrition for the developing bolls all through the fruiting phase. Irrigated regions can provide such conditions and therefore ideal for high yielding Bt-cotton hybrid cultivation.

त्याच डॉक्युमेंटमध्ये शेतकर्‍यांची आत्महत्या आणि बीटी बियाणांचा संबंध नसल्याचे म्हटले आहे, मात्र त्याच डॉक्युमेंटमध्ये एक तक्ता आहे (पान ३८) त्यात कॉटनवर्मसाठी लागणार्‍या इन्सेक्टिसाईड्समध्ये लक्षणीय घट आहे, मात्र त्याच वेळी सकिंग पेस्ट्सना मारणार्‍या जंतुनाशकांमध्ये कितीतरी अधिक वाढ आहे. व त्यामुळे कीटकनाशकांचा एकूणवापर २००६पेक्षा दुपटिने वाढला आहे.

त्याच प्रश्नोत्तरांतील शेवटचा चाप्टर (चाप्टर १०) तर सर्वात रोचक आहे. तिथे म्हटलंय
The area under Desi cotton was 97% in 1947; 42% in 1990; 28% in 2000 and is estimated to be less than 3% in 2011. Desi cotton species G. arboreum are native to India and are highly resistant to drought, insect pests and diseases. Desi cotton is grown only in India and several high yielding short staple coarse fiber varieties are
best suited for surgical cotton. India could have easily created a huge exclusive global market for ‘surgical cotton’ and ‘organic-surgical-cotton’ using the native Desi varieties. The fields in which Desi cotton varieties were cultivated were either saline or marginal and unsuitable for hybrid cotton. The cost of cultivation of Desi cotton is low since the requirement for pesticides and fertilizers is low.

74. Are new pests and diseases appearing on cotton and why?
Bt-cotton is toxic to bollworms and does not control any of the sucking pests of cotton. The Bt-cotton currently released in India is only moderately toxic to the leaf eating caterpillar Spodoptera. Over the past seven years, coincidentally after the introduction of Bt-cotton, cotton cultivators in India have been facing new problems with insect pest management in many parts of the country, mostly presumed to be a consequence of low insecticide usage. New sucking pests have emerged as major pests causing significant economic losses.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुम्ही आधी दिलेल्या दुव्यांतून अनेक दावे केलेले दिसले पण त्याच्या समर्थनार्थ काही आकडेवारी दिसली नाही. जर तसे काही असते तर फक्त एका विशिष्ट विचारधारेने प्रेरीत या एकाच कारणावरून त्या आकडेवारीस नाकारता आले नसते. साधारणतः एखाद्या धोरणाचे फायदे किंवा तोटे तटस्थ अभ्यासक करतात तेव्हा त्यांच्या संशोधनामागची गृहितके, त्याच्या मर्यादा, त्याकरता वापरलेली साधने याविषयी बर्‍यापैकी पारदर्शकता असते.

इरिगेटेड जमिनीसाठी बीटी कॉटन अधिक योग्य आहे. पीकाच्या लाइफ सायकलच्या एका टप्प्यात बीटी कॉटनला जास्त पाणी लागते वगैरे ठीकच आहे. पण प्रतिक्विंटल बीटी कापसाला इतर कापसापेक्षा अधिक पाणी लागते हे त्यावरून कसे ठरवता येईल? त्यापुढे जाऊन भूजलपातळी बीटी कॉटनमुळे खालावते हे कसे ठरवता येईल? आणखी पुढे जाऊन पिण्याचे पाणीच न मिळू शकणे वगैरे समस्यांशी बीटी कॉटनचा संबंध कसा लावता येईल? दुर्दैवाने याबाबत CICR ची प्रश्नोत्तरे फारसे मार्गदर्शन करत नाहीत. अर्थात CICR चा हा (वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे) उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे.

पुरवणी: गावात विहीरी आटलेल्या आहेत. पिण्याचे पाणी सहजपणे मिळत नाही. बीटी कापसाचे महागडे बियाणे विकत घ्यावे लागते. महागडे किटकनाशकही वापरावे लागते. यासाठी शेतकर्‍याला जमिन-जुमला गहाण ठेवावा लागत आहे. तरीही वर्षानुबर्षे बीटी कापूस लावणारा शेतकरी चक्रमच असला पाहीजे. आमच्या शहरात कापडाची विविध दुकाने आहेत. आम्ही त्या दुकानांतून दिवसेंदिवस अधिकच कापड आणत असतो. संध्याकाळी हापिसातून आल्यावर स्नान करून स्वच्छ कपडे घालून आम्हाला आपण, समाज, निसर्ग, पृथ्वी, पक्षी, नद्या, समुद्र, डोंगर हे एकत्र हार्मोनियसली झिम्मा-फुगडी खेळत असल्याची स्वप्ने पडतात. आम्ही नक्कीच जास्त हूशार आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेतकरी स्वतःचा क्षणिक फायदा बघत असेल तर त्याला दोष देता येईल का?
स्वयंपूर्णतेच्या गरजेहून बरेच अधिक पीक घेऊनही, शिवाय कपड्यांसाठी आता सुती कापडाला पर्याय व अधिक मागणी असूनही हे भरपूर पाणी पिणारे, इन्सेक्टिसाईड्सचा खर्च (व वापर) वाढवणारे कापसाचे उत्पादन व वाढ वेगात चालु असेल तर सरकारने हस्तक्षेप करून काही स्ट्रीमलायनिंग करणे अपेक्षित आहे असे आपले माझे मत.

तुमच्या आक्षेपांचा सूर बघता, तुम्हाला मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून खिजवण्यात इंटरेस्ट जास्त दिसतोय. (हे ही माझेच मत, ते दुर्लक्षण्यास, अव्हेरण्यास, अग्राह्य ठरवण्यास तुम्ही मुखत्यार आहातच याची कल्पना आहे). तरी या अशा माहितीपूर्ण धाग्यावर ते वळण टळावे म्हणून मी थांबतो आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> भरपूर पाणी पिणारे, इन्सेक्टिसाईड्सचा खर्च (व वापर) वाढवणारे

या सब्जेक्टिव्ह विधानांना पुष्टी हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वरच्या प्रतिसादात विदा आधीच दिलाय
वाढत्या पेस्टिसाईड्सचा तर तक्ता कोणत्या पानावर आहे तेही दिलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रतिक्विंटल बीटी कापसाला साध्या कापसापेक्षा अधिक पाणी कसे लागते? त्या अधिक पाण्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कशी खालावते? माहितीपूर्ण धाग्यावर यावर काही प्रकाश पडू शकेल अशी अजुनही आशा वाटते.

आधीच्या पुरवणीकडे दुर्लक्ष करा किंवा हलके घ्या किंवा कसेही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके. माहिती शोधुन देतो. कदाचित जरा वेळ लागू शकेल कारण माझ्या आठवणीप्रमाणे याबद्दलची माहिती एका मासिकात आली होती, ते मासिक घरी ढुंडाळावे लागेल.

ऑल्सो, कॉलिंग गवि, त्यांच्याकडेही विदा असायची शक्यता मोठी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माहिती नसल्यास साधारण कारणमिमांसाही चालेल. मधल्या काळात बीटी कॉटनमुळे जगाला 'अन्न आयात करावे लागेल' (जग अन्न कुठून आयात करेल?? पण ते असो) या माहितीवर विचार सुरू ठेवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाण्याचे कन्झम्प्शन न वाढता उत्पादन कसे वाढू शकेल याचे काही उत्तर सापडत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पाण्याचा वापर वाढतच नाही किंवा वाढतोच असा काही माझा दावा नाही.

झाडांचं बहुतांश वस्तुमान, cellulose, हवेतून, CO2 शोषून येतं. कापूस हा सुद्धा cellulose चा बनलेला असतो, त्यामुळे ठराविक शेतातल्या रोपांचं वस्तुमान फार वाढलं नाही, फक्त कापूसच वाढला तर पाणी शोषून घेणं काही प्रमाणात वाढेल हे तर्कामुळे पटतं, पण कापसाचं बहुतांश वस्तुमान हवेतून येत असावं. पाणी किती प्रमाणात जास्त लागतं हे आकडेवारीसह शोधणं महत्त्वाचं हा मुद्दा मान्य आहे.

(उसामुळे पाणी जास्त लागतं हे चटकन समजतं/पटतं. उसाचं अर्ध्याधिक वस्तुमान पाणीच असतं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म्हणून मी आधी कलिंगडाचं उदाहरण घेतलं. कलिंगडाच्या एखाद्या वाणाने एकरी उत्पादन दुप्पट आलं तर पाण्याचा खप दुप्पट होणारच (साधारणतः). अशा वेळी या नव्या वाणाने पाण्याचं एकरी कन्झम्प्शन वाढलं (तब्बल दुप्पट झालं) असं गाणं गाण्याला काही अर्थ नाही.

म्हणून दर टन उत्पादनामागे किती पाणी लागले ते पहायला हवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दुप्पट कापूस येणार्‍या रोपट्याला जास्त पाणी कदाचित लागतही असावे. प्रति क्विंटल/टन पाणी जास्त वापरले जाते का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

पर्जन्यवृष्टीचा परिणाम तसेच लागवडीखाली असलेले क्षेत्र या व इतर घटकांना नियंत्रित करून पाण्याची पातळी खाली जाण्याइतपत जास्त पाणी वापरले जाते असा निष्कर्ष काढणे योग्य ठरू शकेल पण पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवल्याने स्थलांतर करणार्‍या लोकांकडे पाहून बीटी कॉटनला त्याबद्दल झोडपणे तितकेसे संयुक्तिक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरच्या तीन प्रतिसादांमधे झाडात/फळात साठवलेलं पाणी विचारात घेतलं जातंय. पण यापेक्षा कितीतरी पट पाणी त्या झाडाच्या आयुष्यात पानातनं हवेत सोडून दिलं जात असेल त्याचं काय? कदाचित बीटी कॉटनच्या झुडूपात याचं प्रमाण साध्या कापसाच्या झुडूपापेक्षा १०% / २०% / ??% जास्त असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

पाण्याचा वापर प्रति झुडूप बीटी कापसात साध्या कापसापेक्षा अधिक असण्याची शक्यता नाकारलेली नाही. बीटी कॉटनमुळे पाणी प्यायलाही न मिळण्याइतपत दुर्मिळ झालेले आहे हे दाखवायचे असल्यास - इतर घटक जे पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम करू शकतात - त्या घटकांमध्ये होणारे बदलही तपासले जावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेलही.

माझ्या मूळ प्रतिसादात झुडुपाला पाने जास्त असण्याबद्दल लिहिले आहेच. पण दर टन उत्पादनामागे किती पाणी लागते हे पहायला पाहिजे. म्हणजे झाडाला पाने १०% जास्त पण पर झाड उत्पादन ५०% जास्त असेल तर?

बियाण्याचा खर्च (आणि इतर खर्च) सुद्धा दर टन उत्पादनामागे मोजायला हवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दर टन उत्पादनामागे किती पाणी उपसले जाते त्याचा काही विदा उपलब्ध आहे का?

म्हणजे कलिंगडाचे उत्पादन* दुप्पट झाले तर पाण्याचा उपसा दुप्पट होणार हे उघड आहे. त्याचा कलिंगडाचे कोणते वाण लावले याच्याशी संबंध असू नये.

कापसाच्या दोन वाणांची तुलना करताना एका प्रकारच्या कापसाच्या झाडाला बोंडे कमी आणि पाने जास्त असतील तर ते झाड अधिक पाणी वापरेल हे खरे आहे. पण त्याचवेळी त्या झाडातून कापसाचे उत्पादन कमी मिळेल असे वाटते. उत्पादन वाढत असेल तर त्या प्रकारच्या कापसात पाने कमी आणि बोंडे जास्त असावीत असा अंदाज आहे.

*या प्रकारे विचार केल्यास (पावसाळी सोडून) कसल्याच पिकाचे उत्पादन वाढवूच नये असा रोचक (आणि क्रूर) निष्कर्ष पुढे येतो. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

या प्रकारे विचार केल्यास (पावसाळी सोडून) कसल्याच पिकाचे उत्पादन वाढवूच नये असा रोचक (आणि क्रूर) निष्कर्ष पुढे येतो.

शेवटचे वाक्य खरोखरच खरे आहे.
गरजा नियंत्रित ठेवा (मर्यादित कन्झमप्शन, local food संकल्पना , साधेपणा वगैरे) म्हणण्यामागे गांधी - विनोबा स्कूल ऑफ थॉट्सचा हाच विचार होता.
लालबहादूर शास्त्रींनी हरित क्रांतीचा विचार केला, पण " आख्ख्या देशाने एक दिवस उपास पाळावा " असेही सांगितले.
आज हे सारेच चेष्टेचा विषय ठरते आहे.
त्यातला अतिरेकी आग्रह सोडला, तरी मुळात त्यात काही खरोखर उपयोगी तत्व असू शकते हेच मान्य होत नाही.
जो स्रोतांचा जितका जास्त उपसा चालवेल तो अधिक श्रेष्ठ.
आणि हरेकाची धडपड श्रेष्ठ होण्याकडे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

गांधी काय किंवा विनोबा काय... प्रत्येकाला पुरेसे अन्न, वस्त्र मिळावे ही त्यांची इच्छा असणारच. तेव्हा उत्पादन वाढवू नये असे तेही म्हणाले नसते. कमीत कमी गरजा भागवण्याइतके (२२०० कॅलरी) तरी उत्पादन हरित क्रांतीपूर्वी होत होते का?

शिवाय आपला देश साम्यवादी नसल्याने गरजा नियंत्रित करणे हा मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे श्रीमंत जास्त कन्झम्प्शन करणार हे तर उघड आहे. त्यांना ओकारी येण्याइतके त्यांचे पोट भरले की पुढच्यांना उरलेले मिळेल हे तत्त्वही आता आपल्याला मान्य* असल्यामुळे तेवढे उत्पादन करणे भागच आहे.

*मान्य म्हणजे उरलेली तत्त्वे चुकीची असल्याचे "जगभर सिद्ध झाले असल्यामुळे".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वरील प्रतिसादातील बाबच मी म्हणत आहे, विशेशतः शेवटचे वाक्य; अगदि तयतील अवतरणचिन्हासहित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

एखाद्या आडातील उत्पादन वाढलं तर पोहर्‍यांच्या संख्येतही वाढ अपेक्षित आहे. जर एकच पोहरा बसवला असेल तर आडात कितीही पाणी निर्माण होऊदे बाहेर एका मर्यादेहून अधिक येऊच शकत नाही.

मी दिलेलं उदाहरण तुम्ही ताणत आहात, आणि त्याचा काहीतरी भलताच अर्थ निघतो आहे म्हणून सविस्तर स्पष्टीकरण देतो. पाणी, आड, पोहरे वगैरे सोडून आपण कापडाविषयीच बोलू. (आकडे हिशोबाच्या सोयीसाठी राउंडऑफ केलेले आहेत)

१. १७०० साली ५ स्क्वेअर मीटर दरडोई कापड उपलब्ध होतं. याचा अर्थ काय? प्रत्येक माणसाला दरडोई दरवर्षी रेशनिंगने कापड मिळायचं का? नाही. तेव्हाही सर्वात वरच्या पाच टक्क्यांचं उत्पन्न पन्नास टक्के होतं. आणि तळागाळातल्या चाळीस टक्क्यांचं उत्पन्न वीस टक्के होतं. हे आकडे अंदाजे आहेत. मुद्दा असा की तेव्हाही वितरण न्याय्य नव्हतंच. पण अन्याय्य डिस्ट्रिब्यूशन मुळातच तुटपुंज्या असलेल्या उत्पादनाला लावलं तर अॅब्सोल्यूट आकड्यांमध्ये वितरण महाभयंकर होतं. म्हणजे तळागाळातल्या चाळीस टक्के लोकांना फक्त दरडोई १ स्क्वेअर मीटर कापड मिळेल
२. २०१२ साली ४५ स्क्वेअर मीटर दरडोई कापड उपलब्ध होतं. आता वितरण १७०० सालचंच राहिलं तरीही तळागाळातल्या चाळीस टक्के लोकांना दरडोई ९ स्क्वेअर मीटर कापड मिळेल. १७०० साली बहुधा सर्वात वरचे १५ ते २० टक्के लोक सोडले तर कोणालाच इतकं कापड मिळत नव्हतं. आता ते तळातल्या चाळीस टक्क्यांना मिळतं!

हे गणित पटत असेल तर 'उत्पादन वाढल्यावर डिस्ट्रिब्यूशन फंक्शन तेच राहिलं तरी वाढीपूर्व काळात तळातल्या लोकांना जितक्या वस्तू मिळायच्या त्यापेक्षा अधिक मिळतात' हे तुम्हाला मान्य करावं लागेल. मग वस्तू वाढणं ही सुधारणा आहेच का वगैरे मुद्दे वेगळेच. वस्तू वाढवण्यासाठी जी किंमत द्यावी लागली आहे ती योग्य आहे का हाही मुद्दा वेगळा. पण 'वितरण चांगलं नाही तेव्हा गरीबांची परिस्थिती सुधारली नाहीच्च' असं म्हणणं बरोबर नाही.

३. आणि खरंतर मूलभूत गरजांच्या बाबतीत आणि बहुतेक इतर गरजांच्या बाबतीतही श्रीमंत लोक ती वस्तू परवडते म्हणून किती घेतात यावर मर्यादा येतात. आपल्या गणितात १७०० साली सर्वात वरच्या पाच टक्क्यांना दरवर्षी दरडोई ५० स्क्वेअर मीटर कापड परवडायचं. आता २०१० साली उत्पादन नऊपट झाल्यावर दरवर्षी दरडोई ४५० स्क्वेअर मीटर कापड घेतात असं वाटतं का? नाही. कुठेतरी मार्जिनल युटिलिटीची मर्यादा येतेच. त्यामुळे खरंतर उत्पादन वाढल्यावर उत्पन्नाचं वितरण तेच राहिलं तरी अनेक गोष्टींचं उपभोगाचं वितरण सुधारतं. हे मी अत्यंत क्लिष्ट गणित मांडून सिद्ध करू शकतो. त्याऐवजी त्या युक्तिवादाचा आराखडा या लेखमालेच्या 'घृतं पीबेत' या भागात दिलेला आहे.

असो. एकंदरीत ही सुधारणा आहे हे पटवण्यासाठी मला इतके कष्ट घ्यावे लागतील असं वाटलं नव्हतं. त्यापेक्षा तुम्ही असं का करत नाही? सुधारणा म्हणजे काय याची व्याख्या तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करून पहा. (हे फक्त एकट्याला उद्देशून नाही, तर माझा युक्तिवाद न पटलेल्या सगळ्यांसाठीच आहे) समजा तुम्ही जगाचे बेनेव्होलंट डिक्टेटर आहात. आणि तुम्हाला जग, मनुष्याचं आयुष्य सुधरायचं आहे. तर तुम्ही तुमच्यापुढे काय ध्येयं ठरवाल? असा विचार करणारे एक दहा मुद्दे मांडा. ते इंप्लिमेंट कसे करायचे याबद्दल तुम्ही काही बोलण्याची गरज नाही. किती काळात करायचे यावरही बंधन नाही. तुम्ही तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या सर्व देशांच्या प्रमुखांकडे 'हे हे व्हायला पायजेलाय' असं म्हणताय अशी कल्पना करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरच्य अमुद्द्यांचं खंडन थोडावेळाने करतोच
तुर्तास घाईत असल्याने:

एकंदरीत ही सुधारणा आहे हे पटवण्यासाठी मला इतके कष्ट घ्यावे लागतील असं वाटलं नव्हतं

या बाबींमध्ये सुधारणा नाही हे मी म्हटलंच नाहिये. हे लेख ती सुधारणा दाखवून द्यायला कमी पडतातेत असा माझा आक्षेप आहे. एखाद दोन विदाबिंदू घेऊन अख्खा मनोरा उभा करायचा प्रयत्न असल्याचा भास होतोय.

याच लेख मालेतील सुरवातीच्या लेखांपैकी काही लेख विविधांगांनी विचार करत लिहिलेले होते किंवा मग लेखाचा स्कोपच मर्यादीत ठेवला होता. इथे लेख बराच घाऊक दावा करतो पण तितक्या मोठ्या दाव्याला पुरेसे पाठबळ देत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे लेख ती सुधारणा दाखवून द्यायला कमी पडतातेत असा माझा आक्षेप आहे.

ओके. हा आक्षेप पार्शियली मान्य आहे. खंडनाची वाट बघतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देशातले कापड-कपडा उत्पादन वाढले आणि ते दरडोई प्रमाणातही वाढले आहे हे घासकडवींचे मत सपशेल मान्य आहे.
गावागावात - शहरातही आता अर्धनग्न अथवा पूर्णनग्न माणसे, (अथवा मुख्यतः) बालके दिसत नाहीत.
इतकेच काय पण फाटके कपडे घालणारी मनुष्येही बरीच कमी झाली आहेत. अर्धमध्यमवर्गाची "एक वस्त्र गांडीवर-एक वस्त्र दांडीवर" ही परिस्थिती आता मुळीच नाही.

बाकी अन्न, वस्त्र आणि निवारा (यांबरोबरच सुबत्ता इ.) या गोष्टींमध्ये स्वयंपूर्णता यायची म्हणजे भारतासारख्या खंडप्राय देशात नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर वाढणारच. त्याला कोणी पर्यावरणाचे नुकसान /निसर्गाची लुबाडणूक म्हणत असेल तर म्हणो बापडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही किरकोळ शंका (मला कापडातलं काही कळत नाही, त्यामुळे माझ्या म्हणण्यात काही मूलभूत चूक असेल तर सांगा)-
१) नुसत्या कापसाच्या उत्पादनाकडे बघून संपूर्ण चित्र स्पष्ट होते का? प्रगतीचं एकंदर चित्र देशांतर्गत मागणी किती आणि त्यानुसार उत्पादन किती वाढलं यावरून जास्त स्पष्ट होईल असे वाटते.
२)शिवाय त्यात वितरण व्यवस्थेचा एक अँगल आहेच. अर्थात अन्नधान्याप्रमाणे वितरण व्यवस्थेचा कापडाच्या सर्वसाधारण पब्लिकसाठी असलेल्या उपलब्धतेवर कितपत परिणाम होत असावा माहित नाही.
३)वर दाखवलेल्या एका आलेखात १९६०-७० नंतर मनुष्यनिर्मित कापडाचे उत्पादन खूप वाढलेले दिसते (आठवा: 'नायलॉनचा शर्ट धुवून वर काढताना असा वाळत वर येतो', वगैरे - पुलं). त्याचाही दरडोई उपलब्धतेवर मोठा परिणाम नक्कीच झालेला आहे. त्यासंदर्भात काही विदा उपलब्ध आहे काय? म्हणजे एकूण कापडाच्या दरडोई वापरात सुती/सुतीसदृश आणि सिंथेटीक (कृत्रिम?) कापडाचा हिस्सा किती, वगैरे? कारण आजकाल सुती कापड सिंथेटिकपेक्षा नक्कीच महाग आहे.

अशा अजूनही काही शंका आहेत. पण त्या खूपच किरकोळ असल्याने इथे देत नाही.

पण एकुणात ऋषिकेशरावांच्या वरील प्रतिसादाशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रगतीचं एकंदर चित्र देशांतर्गत मागणी किती आणि त्यानुसार उत्पादन किती वाढलं यावरून जास्त स्पष्ट होईल असे वाटते.

मी एकूण मागणीपेक्षा गरजेच्या पातळीचा विचार करतो. कुठच्याही महत्त्वाच्या वस्तूची गरज ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत प्रचंड निकडीची (जवळपास जीवनावश्यक) गरज, त्यापुढच्या काही भागासाठी जीवन सुधारणारी गरज, त्यानंतर जीवन आनंददायी करणारी, आणि त्यानंतर चैनीची, आणि नंतर ज्याला अनेक लोक अनावश्यक किंवा उधळपट्टी म्हणतील अशा चढत्या श्रेणींत विभागलेली असते. माझा अंदाज असा आहे की माणसाला सुमारे एक ते दोन स्क्वेअर मीटर कापडाची किमान गरज असते, जिला प्रचंड निकडीची म्हणता येईल. जर दरडोई उत्पादनच तितकं असेल तर बहुतांश लोकसंख्या त्या गरजेच्या बाबतीत दारिद्र्यात राहते असा निष्कर्ष काढायला हरकत नाही. म्हणजे वापर आणि वितरण हे पुरवठ्याने मर्यादित आहे. मागणी किती का असेना, पुरवठाच कमी असेल तर ती वस्तू पुरेशी महाग होते.

म्हणजे एकूण कापडाच्या दरडोई वापरात सुती/सुतीसदृश आणि सिंथेटीक (कृत्रिम?) कापडाचा हिस्सा किती, वगैरे?

याचं अगदी अचूक नाही, पण ढोबळमानाने उत्तर त्या आलेखाकडे पाहूनच मिळतं. १९६० साली मानवनिर्मित कापडाचा हिस्सा साधारण दहा टक्के होता. २०१० पर्यंत तो वाढत जाऊन पन्नास टक्क्यांपलिकडे गेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी मुळात तुम्ही जे जेनरीक तत्त्व म्हणता आहात

'उत्पादन वाढल्यावर डिस्ट्रिब्यूशन फंक्शन तेच राहिलं तरी वाढीपूर्व काळात तळातल्या लोकांना जितक्या वस्तू मिळायच्या त्यापेक्षा अधिक मिळतात'

यावर "ढोबळ" ऑब्जेक्शन घेत नाहीये. तर या स्पेसिफिक केसमध्ये निष्कर्षावर येण्यासाठी जी गृहितके आहेत, जे प्री-रिक्वीसिट्स आहेत ते पूर्ण होताहेत हे दाखवणे गरजेचे आहे. या प्रतिसादात केवळ वरील प्रतिसादाचे खंडनच नाही तर अख्खी भुमिका तपशीलाने मांडतो आहे.

आधी या विधानापुरते तुम्ही दिलेले उदाहरण घेऊ यात. तुम्ही दरडोई कापड 'उत्पादन' वाढले हे दाखवता.
त्याच काळात किती कपड्याची निर्यात झाली, कपड्याची मागणी व पुरवठा किती? हे दाखवल्यानिवाय कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही. एकीकडे तुम्ही म्हणता उत्पादन वाढले. लेखात सांगता

सतत पन्नास वर्षं दरडोई उत्पादनात सुमारे ३ टक्के वाढ झाली.

पैकी गेल्या काही वर्षातला आलेख अगदी ५-६% वाढ दाखवतो. दुसरीकडे पेपर सांगतो निर्यातवाढीचा दर १६ ते १७% आहे! मग टक्केवारीच्या बाहेर येऊन अ‍ॅबसोल्युट आकड्यांकडे वळावे लागेल. ते या लेखात येत नाही.

थोडक्यात कापडाच्या उपलब्धतेत प्रगती आहे हे ठरण्यासाठी किमान पुढिल गोष्टी दाखवणे गरजेचे ठरावे:
अ. उत्पादन -(वजा) निर्यात लक्षात घेऊनही दरडोई कापडाच्या उत्पादनात वाढ [कापडाच्या बाबतीत निर्यातदर दुर्लक्षण्याइतका कमी नाही]
ब. कपड्याची मागणीचा दर (लोकसंख्या वाढली आहे) व त्यावेळी कपड्याची उपलब्धता [थोडक्यात मागणी व पुरवठ्यातील अंतर कमी होताना दिसले पाहिजे]. लेखात दरडोई उपलब्धता समजते पण त्यावेळी मागणी किती होती?
क. कपड्याच्या टिकाऊपणातील बदल. [भारतात एक व्यक्ती एक कपडा सरासरी किती काळ वापरू शकते आहे] { हे यासाठी की नुसती कापड निर्मिती वधारली नाहिये तर त्याची क्वालीटी तितकीच आहे किंवा सुधारली आहे किंवा किंचितच घटली आहे - जे काय असेल ते}

पैकी या लेखापुरते "क" ऑप्शनल आहे हे मान्य. ते या लेखात आले नाही तर समजु शकतो पण नुसते उत्पादन वाढले म्हणून अधिक लोकांपर्यंत माल पोचला हे म्हणायसाठी इतर गृहितके सत्य आहेत हे दाखवावे लागेल.
=======

बाकी हे मुद्दे माझ्यासाठी दुय्यम आहेत. ढोबळपणे चार अधिक लोकांच्या अंगावर कपडे दिसत आहेत, लोकांच्या अंगावर चार अधिक कपडे दिसत आहेत हे दोन्ही मला मान्य आहे.
मात्र हा विदा या लेखासाठी यासाठी आवश्यक आहे की ही मालिका 'विदा' देऊन काही तथ्ये मांडायचा प्रयत्न करते आहे. मी माझ्या कित्येक लेखांत लिहितो तसा "ढोबळ विदा देत गोळीबार" करणारे लेखन असते तर इतका छिद्रान्वेशीपणा केलाही नसता.

======

आता माझ्या दृष्टीने मुख्य मुद्द्यावर येतो, ज्यावर राजेशरावांनी पूर्णपणे अळिमिळी गुपचिळी धरलेली आहे.

मात्र, खाली विसुनाना आक्षेप घेतात

अन्न, वस्त्र आणि निवारा (यांबरोबरच सुबत्ता इ.) या गोष्टींमध्ये स्वयंपूर्णता यायची म्हणजे भारतासारख्या खंडप्राय देशात नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर वाढणारच. त्याला कोणी पर्यावरणाचे नुकसान /निसर्गाची लुबाडणूक म्हणत असेल तर म्हणो बापडे.

याच लेखाच्या सुरवातीला कच्च्यामालाच्या उत्पादनातील वाढ दाखवली आहे आणि पुढे एकुण कपड्यांच्या उत्पादनात झालेली वाढही दाखवली आहे. तिथे तुलना करता निव्वळ सुती कपडे - जे केवळ कापसापासून बदत आहेत त्यांची झाली पाहिजे. सुती कपड्याच्या उत्पादनातही वाढ दिसत आहेच पण ती एकूण कापड उत्पादनाच्या वेगापेक्षा बरीच कमी आहे. कित्येकदा घटलेली आहे. आणि इतर प्रकारचे कापड आता सुती कापडांपेक्षा बर्‍याच वेगाने वाढत आहे. एकुणात अर्थ असा की ज्या प्रकारच्या कापडाची मागणी आहे त्यासाठी एका मर्यादेहून अधिक कापूस पिकवायची गरज नाही. तरीही पर्यावरणाला घातक कापसाच्या प्रजातींची लागवड होतेच आहे. कापसाच्या लागवडीचा, उत्पादनाचा दर वेगात घोडदौड करतोच आहे.
अर्थात स्वयंपूर्णतेसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहे, ती जनतेत स्वीकार्ह आहे - अनेकांना परवडते आहे, तेव्हा कपड्यांचा बागुलबुवा उभा करून या बिटी बियाणांना पुढे करायसाठी हे जे चित्र उभे केले जात आहे त्यामागे स्वयंपूर्ण होण्यापेक्षा बरेच मोठे काही आहे असे वाटते. आक्षेप त्याला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

निर्यातेचा मुद्दा रोचक आहे.
३०% कापूस निर्यात होतो असं दिसतं.
http://www.thehindu.com/business/Industry/export-incentives-for-onion-co...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

उत्पादन वजा निर्यात याचा विचार करायला हवा हे मान्य.
लोकसंख्यावाढीचा आक्षेप अमान्य, कारण दरडोई उत्पादनाचा विचार केला की लोकसंख्यावाढीचा आपोआप विचार केला जातो.
उत्पादन दर्जाबद्दल - खरं तर एकंदरीतच वस्तूंच्या दर्जामधील सुधारणा हा आणखीन एका लेखाचा विषय आहे.
आक्षेपांचा रोखही सर्वसाधारणपणे मान्य केलेला आहेच. या लेखांतल्या त्रुटी सुधारण्याचा पुढे प्रयत्न करेन.

कंझम्प्शन स्टॅटिस्टिक्स - काळानुसार आणि पर्सेंटाइलनुसार मिळालं तर उत्तम. ते कुठे मिळेल हे वाचकांपैकी कोणी सांगू शकेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्या प्रकारच्या कापडाची मागणी आहे त्यासाठी एका मर्यादेहून अधिक कापूस पिकवायची गरज नाही.
हे जे अधिक मागणीवाले कापड आहे ते कृत्रिम धाग्याचेच असणार ना? तसे असेल तर त्याच्या अधिकाधिक उत्पादनामुळे देखील भूगर्भांतर्गत स्रोतांचा वापर आणि प्रदूषण हे मुद्दे उपस्थित होतीलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर आहे. हे मान्य.
परंतु हा परिणाम किती असेल हे समजल्याशिवाय त्या पर्यायाला झिडकारता येणार नाही असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खतरनाक प्रतिसाद. खालील मुद्द्यांशी प्रचंड सहमती:

  1. अ. उत्पादन -(वजा) निर्यात लक्षात घेऊनही दरडोई कापडाच्या उत्पादनात वाढ [कापडाच्या बाबतीत निर्यातदर दुर्लक्षण्याइतका कमी नाही]
  2. एकुणात अर्थ असा की ज्या प्रकारच्या कापडाची मागणी आहे त्यासाठी एका मर्यादेहून अधिक कापूस पिकवायची गरज नाही. तरीही पर्यावरणाला घातक कापसाच्या प्रजातींची लागवड होतेच आहे. कापसाच्या लागवडीचा, उत्पादनाचा दर वेगात घोडदौड करतोच आहे. अर्थात स्वयंपूर्णतेसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहे, ती जनतेत स्वीकार्ह आहे - अनेकांना परवडते आहे, तेव्हा कपड्यांचा बागुलबुवा उभा करून या बिटी बियाणांना पुढे करायसाठी हे जे चित्र उभे केले जात आहे त्यामागे स्वयंपूर्ण होण्यापेक्षा बरेच मोठे काही आहे असे वाटते. आक्षेप त्याला आहे.

अर्थात हे सगळे चांगले मुद्दे-गुद्दे, संवाद-वाद होण्याचे मूळ कारण म्हणजे राजेशरावांचा मेहनत घेऊन लिहिलेला उत्तम लेख. हे सगळे इंटरेस्टिंग डिस्कशन निर्माण होण्याचे सर्व श्रेय त्यांचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक, माहितीपुर्ण लेख आणि चर्चा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0