चिलॅक्स!

गेले आठ दिवस एकच चर्चा, तुकारामाच्या गाथेसारखी वर येत्ये. गाथा असती तरी बोअरच झालं असतं. फेसबुकाच्या मेसेजमधेही तेच सात लोक, तीच चर्चा आणि त्याच लोकांबद्दलचं गॉसिप. बेकार कंटाळा आला. फेसबुकाचं न्यूज फीड उघडलं. सध्या अमेरिकेत आहे म्हणून काही अमेरिकन वृत्तसंस्थांना तिथे उकाडा टाकायला सांगितला आहे. बातम्यांचा. तिथे सोची हिवाळी अॉलिंपिक. एकामागोमाग एक बहुतांश बातम्या रश्यात कसे भटके कुत्रे मारले, सोचीच्या शेजारच्या गावात साधे पूलसुद्धा धडके नाहीत आणि पुतिन कसा LGBT द्वेष्टा आहे याच्या. आणि या सगळ्या नकारात्मकतेचा कंटाळा आला की अमेरिकेच्या झेंड्याचे (गचाळ दिसणारे) स्वेटर्स कसे चांगले आहेत म्हणून सांगत होते. पण 'न्यूयॉर्कर'वर माझा विश्वास आहे. माझाच कशाला लोकसत्ताच्या कुबेरांचाही आहे. तिथल्या ओलेता आणि कुबेरांचं काहीतरी आहे. असणारच, हे आणि हे पहा. (बाय द वे, व्हॅलेंटाईन डे आलाय हे माहित्ये, पण ओलेता हे आडनाव आहे, कोण ओलेता, कधी ओलेता, किती ओलेता वगैरे चौकशा करू नयेत.) दोघेही एकाच विषयावर, एकाच व्यक्तीवर, साधारण एकसारख्याच प्रकारचे लेख लिहीतात. आणि दोन्ही सायटींवर बातम्या चार-सहा-आठ पानात विभागलेल्या असतात. म्हणून 'न्यूयॉर्कर'वर गेले. बोरोविट्झचा या आठवड्याचा लेखही "हा हा हा विनोदी" नाही. खरंतर तो लेखच नाही. कायतरी एकोळी धागे आंजावर काढावे किंवा फेसबुकावर विचारवंत छापाचं वाटेल असं काहीतरी दळावं तसं माप या बोरोविट्झनेही टाकलंय. तिथलं कार्टूनही बोअर निघालं. एक कार्टून सोची हिवाळी अॉलिंपिकबद्दल आणि एक जेंडर इश्यूवर. च्यायला, इथेही तेच दळण. क्रॅप.

चॅटवर तीन-चार लोक पिंग करत होते. अर्ध्या लोकांना गॉसिप सांगायचं होतं; बाकीच्यांना विचारायचं होतं. काय वैताग आहे च्यायला. मेलं सुखात वैतागूही देत नाहीत. कोणतासा फेसबुक समूह का बंद पडला, त्याच समूहात ज्यांची ओळख झाली आहे तो एक माणूस किती पकवतो, आज व्यायाम नाही केलास तर काय जाडी होणार नाहीयेस, आणि अॉनलाईन आले होते म्हणून पिंग केलं, अशी चार वेगवेगळी कारणं या लोकांकडून मिळाली. सालं टेलिफोन एक्स्चेंज झालंय डोक्याचं.

या सगळ्यांना BRB सांगून मी पाचव्याच मित्राला पिंग केलं. गेल्या आठवड्यात त्याचा एक पेपर पब्लिश झाला. त्याचं भलतंच. "सोड गं. तुझं काय चाललंय सांग." म्हणजे, यालाही गॉसिप हवंय? मी त्याला खरंखरं सगळं सांगायला लागले. "गप गं. किती बोलतेस? मुळात तू एवढं बोलतेस कारण तू फार rigid आहेस. Loosen up. Relax. Get drunk ... or something" सकाळी उठल्या उठल्याच मिळालेला सल्ला Get drunk!

हा मित्र तसा हुशार आहे, त्याच्यासमोर काय वाट्टेल ते बरळता येतं. पण तरीही Get drunk? एवढ्या सकाळी? पण मी खरंच विचार केला, समजा मी आत्ताच दारू प्यायला सुरूवात केली, तर काय होईल? लोकं मला बेवडी म्हणतील हे झालं, पण लोकांना कशाला सांगायला जाऊ, मी दारू पित्ये हे! आणि समजलं तर समजलं. लोकं काय, काहीही बडबडतात. मग मी खरंच नैष्ठिक दारू प्यायला सुरूवातच केली. दोन-चार कॉमेंट्स टाकल्या, खरडी केल्या आणि कचकवून त्यात च्यायला, आयला वगैरे असभ्य शब्द वापरले. बरं वाटलं. कोणीतरी, कोणत्यातरी धाग्यावर माझ्या नावाने शंख करत होतं. वायझेड आहेत माझ्यासकट सगळे, असं म्हणून आणखी एक ग्लास भरला. कधीतरी समजेल यांना, मी किती थोर आहे ते, आणि नाही समजलं तर नाही समजलं. कोणालातरी काहीतरी नाही समजलं किंवा माझं मत नाही पटलं तर काय जगाचा अंत होणारे? हं ... ही जगाच्या अंताची कल्पना काही वाईट नाही. सगळ्यांनीच तिकीट काढलं तर मग कोण-बरोबर-कोण-चूक याने काय घंटा फरक पडणारे! कोणाला काही फरकच नाही पडणार या आनंदात समोरचा ग्लास रिकामा केला.

लोकं उगाच च्यायला, अर्धा ग्लास रिकामा का भरलेला याबद्दल चर्चा करत बसतात. शिवाय या चर्चा करण्याबद्दल लोकं लेखबिख लिहीतात. फेसबुकावर काय चालतं, पाडला एक लेख. जालावर ट्रोलिंग कसं चालतं, भरले मजकुराचे रकाने. यडपट लेकाचे! वर म्हणे, प्रश्न तत्त्वाचा आहे. डायलॉगबाजी करायला हा काय सिनेमा आहे काय? हेरॉईक असणं हा गुण समजण्यातून च्यायला लोकांचे भलते गैरसमज होतात. आचरट बकबक करतात आणि वाटतं आपण सालं जग बदलू शकतो. Chillax, get drunk.

हां, आता कसं बरं वाटलं. हलकं हलकं. हळूच पुन्हा कंप्यूटरकडे पाहिलं. आईशप्पथ सांगते, चुकून ती 'ओनियन'वरची लिंक उघडली, Woman Who Had Almost Formed Healthy Sense Of Self Rejoins Social Media. मग पुन्हा भीती वाटली. आता मी समजा फेसबुक किंवा ऐसी उघडलं तर हे लोक माझीच टर उडवतायत असं होईल. साला लफडाच झाला. ओनियन तर dawg पेपर आहे. हे लोक आपली टिंगल करत आहेत म्हणजे आपल्यात काहीतरी सीरीयस प्रॉब्लेम आहे. हळूच चष्मा काढला, डोळे मिटायची गरज नाही. हातापायला तेल चोपडलं, आता कोणी पकडलं तरी आपल्याला निसटता येईल.

आणि अल्लाद 'गार्डीयन' उघडला. ब्रिटीशांकडून माझ्या जरा जास्त अपेक्षा आहेत. अमेरिकन मेले संस्कृतीहीन आहेत. ब्रिटीश कसे, विनोदाची (आणि राजघराण्याचीही) संस्कृती सांभाळून आहेत. आणि माहेर आहे माझं तिथे. अमेरिका द्वाड आहे. (आठवा पाहू भोंडल्याची गाणी.) कसंही असेल पण ब्रिटीश लोक पातळी नाही सोडणार, गार्डीयनतर नाहीच नाही. आणि काय हा चमत्कार. तिथे व्हँलेंटाईन डे आणि त्याच्यावरून हल्लागुल्ला. स्वतःला स्त्रीवादी म्हणवणाऱ्या एका वेट्रेसवर बरीच टीका झाली. पण त्या एकवीस वर्षाच्या मुलीला जे समजलं ते मला फार आवडलं, ... people needed to take themselves less seriously.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

'ट्यूजडेज् विथ ३_१४' या लेखमालिकेचा पहिला भाग आवडला Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एंड ऑफ द वर्ल्ड

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

नेमके काय प्यायला, हा महत्त्वाचा तपशील तेवढा नाही; नसते लांबण तेवढे नको तितके लावलेय. उपयोगाचा भाग दिला सोडून, नुसतीच फुकाची बडबड!

अमेरिका द्वाड आहे. (आठवा पाहू भोंडल्याची गाणी.)

सोडा हो! आमच्या 'वैट्ट्ट्ट्ट्ट! वैट्ट्ट्ट्ट्ट!! वैट्ट्ट्ट्ट्ट!!! वैट्ट्ट्ट्ट्ट!!!! वैट्ट्ट्ट्ट्ट!!!!! वैट्ट्ट्ट्ट्ट!!!!!! दुष्ष्ष्ष्ट!!!!!!!'ची सर तुमच्या त्या भोंडल्यातल्या 'द्वाड'ला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मणिकर्णिकाने दोन वर्षांपुर्वी नेमेचि येतो. . %@#! लिहिलान. कालचा/आजचा तिचा नंतरचा लेख, निव्वळ माणसांबद्दलची गोष्ट, शंभर नंबरी लिखाण आहे. तू आता असं 'आधीच्या लिखाणावर उतारा' वाटावा असं लिखाण करायला दोन वर्ष घेउ नकोस म्हणजे झालं ;-))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

खिक! मस्त झालाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

Smile Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Blum 3 Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वाचतोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आणखी डोकं भंजाळून घ्यायचं असेल तर तिकडे मंत्रसामर्थ्यावर चेर्चा चालू आहे ती वाच. तुझ्या अनेक हरवलेल्या गोष्टी परत मिळतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

You made my day. धागा वाचूनच दिवस चांगला जाणार याची खात्री पटली. Wink

(लिंक दिलीत तरी चालेल हो. ज्यांना 'तिकडे' म्हणजे काय माहित नाही त्यांनाही गंमत समजू देत की.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ह्या गोष्टी म्हणजे चेष्टा वाटतात तुम्हाला ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नाय बा, मी असं काहीच म्हटलेलं नाही. वाक्याचा अर्थ कसाही लावता येतो. पण मूळ धागा काय आहे हे पाहिलं तर मला काय म्हणायचंय हे अधिक स्पष्ट होतं. आणखी किती भस्सकन बोलायचं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यांना इकडे बोलवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिथे व्यक्तीपेक्षा विचारांना प्राधान्य तिथेच रहावे.व्यक्तीस्तोम माजले की नाश हा ठरलेलाच.

हा मित्र तसा हुशार आहे, त्याच्यासमोर काय वाट्टेल ते बरळता येतं. पण तरीही Get drunk? एवढ्या सकाळी? >> चक्क खोटं बोल्तेय्स तू. मी तुला Get Drunk कुठे म्हणालो? It's my time to get drunk असं म्हणालो मी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

सालं टेलिफोन एक्स्चेंज झालंय डोक्याचं.

ओ तै, ते तुमच्या कामाचं ऑक्युपेशनल हॅजर्ड आहे. हौशीहौशीने सगळ्यांकडून गॉसिपं गोळा करायची, त्यातली काही टोकदार गॉसिपं एकाकडून दुसऱ्याकडे अशी अल्लद सोडायची की ती योग्य त्या तिसऱ्यापर्यंत पोचून टोचली पाहिजेत याची खबरदारी घ्यायची, त्यातून मग नवीन गॉसिपं निर्माण होतात ती त्या तिसऱ्याच्या चौथ्या मित्राकडून मिळवून पहिल्याला गॉसिपची परतफेड करायची. असा गॉसिप इंपोर्ट-एक्स्पोर्टचा बिझनेसच भयंकर आवडीने आणि चवीचवीने करायचा आणि वर त्रास होतो म्हणून बोंबा मारायच्या! धन्य आहे.

people needed to take themselves less seriously.

हे विधान मात्र समाजविघातक आहे (किंवा किमान ऐसीविघातक आहे) म्हणून ऐसीवरून काढून टाकावं अशी विनंती मी ऐसीच्या व्यवस्थापकांना करतो! जर लोकांनी स्वतःला सीरियसली घेतलं नाही तर भले भले उद्योगधंदे ढासळून पडतील. वृत्तपत्रांमध्ये 'आज तसं काय फारसं महत्त्वाचं झालं नाही राव, आणि झालंच तरी की फरक पेंदा? चिलॅक्स!' असे मथळे येतील. फेसबुकावरच्या चर्चा 'असेल ब्वॉ तुमचं खरं. चला ग्लास भरूयात.' असं म्हणून पुढे सरकणारच नाहीत. ऐसीवरती 'अहो असतात काही विचित्र आणि विक्षिप्त मुली! वाचा आणि द्या सोडून' असं लोक म्हणायला लागले तर ऐसीचा सर्व्हर बिनवापराने गंजून जाईल त्याचं काय? लोकं डोक्याला ताप करून घेणार नाहीत. ज्यांच्या अंगाला डिओचा सुगंध येतो त्यांच्या अंगावर जशा शेकडो पोरी कबुतरखान्यात पडणाऱ्या शिटांप्रमाणे सटासट कोसळतात तर आपल्या का नाही? असा विचार आल्यावरही चिलॅक्स, मरू देत ना! म्हटलं तर डीओंचे खप कोसळतील. आणि त्यावर आधारलेली, १९९१ पासून वाढीला लावलेली आख्खी मार्केट इकॉनॉमी कोसळेल. मग सगळेच लोक गरीब होऊन लोकांना कारच परवडल्या नाहीत तर टोलचा प्रश्न कसा उभा राहणार? आणि त्याविरुद्ध लढा देऊन मनसेला आपली करीअर कशी करता येणार?

अशा समाजविघातक लेखनावर सोटा उगारला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL
ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ROFL ROFL ROFL

गुर्जी, नमस्कार घ्यावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन