मराठी भाषा दिन व भाषाभ्रम

मराठी भाषादिनानिमित्त टिप्पण करणारा डॉ. प्रकाश परब यांचा एक रोखठोक लेख मराठी भाषा दिन व भाषाभ्रम लोकसत्तात वाचला. मराठी भाषा अस्तंगत होते आहे, आणि काहीतरी जनजागृती उत्सव करून ती टिकेल हा भ्रम आहे असा लेखाचा रोख आहे. लेख मुळातच वाचावा, पण सारांश खाली मांडतो आहे
- मराठी दिनानिमित्त शुभेच्छांचा पाऊस पडतो, भाषेचा अभिमान असल्याचं जाहीर होतं, पण खरं चित्र काय आहे? इंग्रजी ही लोकभाषा व ज्ञानभाषा होणार आहे हे सत्य आपण 'पोपट मेला' प्रमाणे उच्चारायचा धीर करत नाही.
- मराठी ही ज्ञानभाषा कधीच होऊ शकणार नाही हे मान्य करायला हवं, कारण ती शिक्षणभाषा म्हणूनही टिकू शकलेली नाही. जी ज्ञानभाषा नाही ती जागतिकीकरणाच्या धबडग्यात टिकूच शकणार नाही.
- मराठी भाषा टिकवण्याचा प्रश्न सामाजिक किंवा सांस्कृतिक नाही - तर आर्थिक आहे. जी भाषा अर्थार्जन पुरवू शकत नाही तिची पाळंमुळं दुर्बळ होणार. आणि कधी ना कधी तो वृक्ष उन्मळून पडणार.
- भाषा सुदृढ नसताना ती आहे असं म्हणत राहणं धोकादायक आहे. प्रत्यक्षात पाहिलं तर मराठी शाळा मरताना दिसतात, मराठी महाविद्यालयांना अवकळा आलेली आहे. हा ऱ्हास थोपवण्यासाठी सरकारने काही करणं अत्यावश्यक असूनही सरकार निष्क्रिय आहे. इतर भाषांबाबत हे प्रयत्न होताना दिसतात.
- स्वभाषा हे मूल्यच राहिलेलं नाही.

या मांडणीकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे हे निश्चित. गेली तीसपस्तीस वर्षं तरी मराठी मरत चालली आहे, आजकाल कामवाल्या बायकांनाही त्यांची मुलं इंग्लिश शाळेत घालण्याचा सोस असतो वगैरे ऐकू येतं आहे. त्याचबरोबर आपल्याला परबांनी म्हटल्याप्रमाणे अनेक शाळा सेमीमराठी होताना दिसताहेत. यावरून मराठी भाषा पुढची पन्नास-शंभर-दोनशे-पाचशे वर्षं टिकेल असं म्हणता येईल का? ऐसीकरांना याविषयी काय वाटतं?

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

मराठी भाषा मेली काय आणि जगली काय , आपल्याला असा काय फरक पडणार आहे?

आपण सर्व आणि मी, मराठी घरात जन्माला आलो म्हणुन मराठी बोलतो. स्पेन मधे जन्मलो असतो स्पॅनिश बोललो असतो. आपण सर्व मराठी भाषेत फार चांगले साहित्य आहे, किंवा ती ज्ञानभाषा आहे म्हणुन ती वापरत नाही.

आपल्याला चॉइस नव्हता, म्हणुन मराठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जो पर्यंत आपण मराठी बोलतो आहे, मराठी मरणे शक्य नाही. इंटरनेट मुळे भाषेला एक नवे जीवन मिळाले आहे. माझ्या सारखा जर वयाच्या पन्नासी नंतर मराठी लिहिणे शिकला तर महाराष्ट्रातील मराठी भाषिक (आंग्ल भाषेत टंकन करावे लागले तरीही ते मराठीत लिहू शकतील.

दुसरे आज इंटरनेट मुळे जास्ती लेख, जास्ती कविता मराठीत लिहिल्या जातात आहे.

बाकी देश्यात सर्वत्र आंग्ल भाषेतच शिक्षण लोक घेत आहे. पण कुठलीही भाषा मेली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या परिसंवादाच्या उद्घाटनातली ही दोन भाषणे.

बीजभाषणः रमेश धोंगडे, भाषातज्ज्ञ

अशोक सोलनकर ,संचालक-राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने