दूरचित्रवाणीवरील नवी क्रांती

अलीकडे संध्याकाळचा टीव्ही मालिकांचा माझा रोजचा रतीब एकदा टाकून झाला आणि नंतर थोडा वेळ आपल्या पार्टीचे पारडे वर जावे म्हणून एकमेकाशी खोटी खोटी भांडणे करणारे राजकीय पार्ट्यांचे प्रवक्ते आणि स्वत:ची हुशारी दाखवणारे टीव्ही अ‍ॅन्कर यांच्यामधली तथाकथित भांडणे आणि वाद-विवाद बघून झाले की मी दूरचित्रवाणी वाहिन्या बघणे बंद करतो व इंटरनेट टीव्ही या नावाने ओळखले जाणारे एक नवीन उपकरण चालू करतो. खरे सांगायचे झाले तर या नवीन उपकरणाने माझ्यावर एवढी छाप टाकली आहे की या उपकरणाला मी आता दूरचित्रवाणी मधील एक नवीन क्रांती असेच मानायला सुरूवात केली आहे.

भारतात दूरचित्रवाणीचे आगमन 1970 च्या दशकात झाले आणि दूरचित्रवाणीचा पडदा रंगीत होण्यासाठी 1980 च्या दशकापर्यंत वाट पहावी लागली. सुरवातीच्या काळात सरकारी नियंत्रणाखाली असलेली, दूरदर्शन नावाची फक्त एक वाहिनी, आणि ती सुद्धा फक्त संध्याकाळचे साडेचार तास, बघायला मिळत असे. या वाहिनीवर सरकारी ऑफिसात बसलेले बाबू लोक प्रेक्षकांनी काय बघायचे ते ठरवत असत. लोकांना काय बघायला हवे आहे?त्याच्याशी त्यांना काही सोयरसुतक नसे. त्या वेळेला, लांब अंतरावरची (उदा. मुंबई व दिल्ली) दूरदर्शन केंद्रे एकमेकाशी मायक्रोवेव्ह दुव्यांनी जोडलेली नसल्याने प्रत्येक केंद्र कार्यक्रमाच्या बाबतीत स्वतंत्र आणि स्वयंभू असे. पुढे दूरदर्शनची केंद्रे मायक्रोवेव्ह दुव्यांनी जोडली गेली आणि पडद्यावर दिसणारे कार्यक्रम अधिकच निराशाजनक बनले. आता मुंबईच्या बाबू मंडळी ऐवजी दिल्लीला बसलेले बाबू, संपूर्ण देशातील प्रेक्षकांनी काय बघावे हे ठरवू लागले. या मुळे एक गोष्ट झाली, टीव्ही वरचे कार्यक्रम अधिकच कंटाळवाणे व बोअर बनले.

1990 च्या दशकात प्रथमच, उपग्रहाद्वारा संदेश ग्रहण करून,ते केबल वरून ग्राहकांच्या घरापर्यंत पोचणार्‍या,दूरचित्रवाणी वाहिन्या भारतात अवतरल्या. सरकारी नियंत्रणाखाली असलेल्या टीव्ही माध्यमाला कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठी या वाहिन्या एखाद्या सुखद वार्‍याच्या झुळुकीसारख्या भारतातील प्रेक्षकांना भासल्या यात नवल असे ते काहीच नव्हते. यानंतर दूरचित्रवाणी झपाट्याने बदलत गेली. प्रथम करमणूकप्रधान वाहिन्या आल्या आल्या आणि त्यांच्या मागोमाग फारसा काळ न दवडता, सिनेमा, बातम्या, खेळ, आणि अखेरीस डॉक्यूमेंटरीज दाखवणार्‍या विशेष वाहिन्या प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करू लागल्या. या बरोबरच दूरचित्रवाणीवर जाहिरातयुग स्वाभाविकपणेच अवतरले. अखेरीस थेट उपग्रहाद्वारा सेवा देत असलेल्या डीटीएच वाहिन्या ग्राहकाला उपलब्ध झाल्या व शहर, गाव यासारख्या प्रादेशिक आणि भौगोलिक बंधनांमधूनही दूरचित्रवाणी मुक्त झाली. एक साधी उपग्रह थाळी घराच्या गच्चीवर बसवून देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातला अगदी सामान्य माणूस सुद्धा अगदी नवीन चित्रपट सध्याच्या फॅशन्स, बातम्या आणि मुख्य म्हणजे टीव्ही मालिका बघू लागला.

हे सर्व वर्णन मी जरी भारतामधले केलेले असले तरी मला असे वाटते की ते अमेरिका सोडली तर जगातल्या इतर बहुतेक सर्व राष्ट्रांनाही लागू पडते. अमेरिकेत मात्र सरकारचे कोणतेही नियंत्रण नसलेल्या अनेक वाहिन्या बर्‍याच आधीच्या काळापासूनच प्रक्षेपण होत होत्या. आज जगातल्या, काही अपवाद सोडून, जवळजवळ सर्व राष्ट्रांमधील टीव्ही प्रेक्षक, करमणूक, बातम्या, खेळ यासारख्या विशिष्ट विषयाला वाहिलेल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण वाहिन्या पाहू शकतात.

हे सर्व जरी आजमितीला शक्य झालेले असले तरी यात एक मुलभूत कमीपणा आहे असे मला नेहमीच वाटत राहिलेले आहे. अगदी 200 वाहिन्या जरी उपलब्ध असल्या तरी या सर्व वाहिन्यांवर, त्या आपल्याला जे दाखवू इच्छितात तेच फक्त आपण बघू शकतो. एका उदाहरणावरून मला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट होईल. मागच्या आठवड्यात मी पाकिस्तान मधील मोहेंजो-दारो या सुप्रसिद्ध स्थळाबद्दल एक ब्लॉगपोस्ट लिहित होतो व माझ्या मनात मोहेंजो-दारो हाच विषय घोळत असल्याने या स्थळाबद्दलची एखादी डॉक्यूमेंटरी बघायला मिळाल्यास मला हवी होती. परंतु हे शक्य नव्हते आणि डॉक्यूमेंटरी दाखवणार्‍या नॅशनल जिओग्राफिक किंवा डिसकव्हरी या सारख्या वाहिन्या जे कार्यक्रम दाखवू इच्छित होते तेच बघणे मला भाग होते. काही सुधारलेल्या देशात आजकाल ‘टीव्ही ऑन डिमान्ड‘ या नावाची सेवा सुरू झाली आहे. येथे आपण निवडलेली कोणतीही चित्रफीत आपल्याला शुल्क दिल्यास बघता येते. परंतु आपली निवड बहुधा लोकप्रिय चित्रपटांच्या पर्यायांमधूनच करण्याची शक्यता असते आणि प्रत्येक वेळी शुल्क भरण्याची कल्पना बहुतेक लोकांना पटत नाही. एकदा महिन्याचे केबल किंवा उपग्रह थाळी शुल्क भरले की तो महिनाभर टीव्ही बघण्याची कल्पना आता सर्वसाधारणपणे रूढ झाली आहे. त्यानंतर परत एकदा आपल्याला हवा तो कार्यक्रम बघण्यासाठी म्हणून परत शुल्क भरणे मला तरी रुचत नाही.

5 ते 6 वर्षांपूर्वी,जपानी आणि कोरियन दूरचित्रवाणी संच उत्पादकांनी प्रथमच भारतीय बाजारात इंटरनेट टीव्ही या प्रकारचे संच वितरित केले. या संचांमध्ये अंतर्गत इंटरनेट जोडणी बसवलेली असल्याने लॅन केबल किंवा डॉन्गल या नावाचे एक छोटे उपकरण संचाला जोडून वाय-फाय पद्धतीने हा दूरचित्रवाणी संच इंटरनेटला जोडणे शक्य होते. मी या प्रकारचा एक दूरचित्रवाणी संच 3 वर्षांपूर्वी खरेदी केला होता. परंतु माझ्या असे लक्षात आले होते की या संचातील अंतर्गत इंटरनेट जोडणी फारशी कार्यकुशल व विश्वासार्ह नसल्याने तितकीशी उपयुक्त ठरत नाही. हाताच्या बोटावर मोजण्यासारखी अ‍ॅप्लिकेशन्स यावरून रडतखडत कशीतरी चालू शकतात व बहुतेक वेळा फक्त एक दातेरी चक्र गरागरा फिरत असलेले संचाच्या पडद्यावर दिसत राहते. हे चक्र बराच वेळ पाहिल्यानंतर साहजिकच प्रेक्षकाचा पेशन्स संपतो व कंटाळून तो हा इंटरनेट संच बंद करून आपले नेहमीचे टीव्ही प्रक्षेपण बघणे पुन्हा सुरू करतो.

3 ते 4 वर्षांपूर्वी अमेरिकन व इतर विकसित देशांमध्ये,अ‍ॅपल कंपनीने अ‍ॅपल टीव्ही असे नाव दिलेले एक उपकरण बाजारात आणले. याचे नाव टीव्ही असले तरी प्रत्यक्षात याचे स्वरूप 5 किंवा 6 चौरस इंच आकाराची व काळ्या रंगाची एक चपटी डबी असेच आहे. ही डबी आपल्या दूरचित्रवाणी संचाला असलेल्या एचडीएमआय सॉकेटला याच प्रकारच्या केबलने जोडली व दुसर्‍या वायरने या अ‍ॅपल टीव्हीला आपला नेहमीचा वापरातला वीज पुरवठा जोडला की याचे कार्य सुरू होते. अ‍ॅपलने बाजारात आणलेली अ‍ॅपल टीव्हीची पहिली दोन मॉडेल्स तशी या क्षेत्रात प्रवीण असलेल्या लोकांना तर्‍हेतर्‍हेचे उपद्व्याप करणे शक्य होईल अशी होती व त्यामुळे लोकांनी ही दोन्ही मॉडेल्स लगेचच जेलब्रेक केली व XBMC सारखे मिडिया सर्व्हर्स या अ‍ॅपल टीव्हीच्या माध्यमाने दूरचित्रवाणी संचाला जोडता येतील अशी व्यवस्था करण्यात ते यशस्वी झाले. अ‍ॅपल कंपनीला हे समजल्याबरोबर त्यांच्या हे लक्षात आले की यामुळे त्यांच्या या व्यवसायात शिरण्याच्या मुख्य उद्देशाला: त्यांच्याकडे कॉपीराइट्स असलेली गाणी किंवा चित्रपट लोकांनी भाड्याने किंवा विकत घ्यावी, यालाच छेद जातो आहे. त्यामुळे त्वरेने त्यांनी तिसरे मॉडेल बाजारात आणले की ज्यावर कोणतीही फेरफार किंवा जेलब्रेक करणे सध्यातरी अशक्यप्राय आहे आणि अ‍ॅपल कंपनीला अपेक्षित आहे त्याच पद्धतीने हे उपकरण वापरणे शक्य आहे. ज्या मंडळींना जास्त स्वतंत्रपणे प्रयोग करून पहाण्याची इच्छा असते त्यांच्यासाठी अ‍ॅपल शिवाय वेस्टर्न डिजिटल सारख्या इतर काही कंपन्यांच्या पण अ‍ॅपल टीव्हीसमान असणार्‍या इतर काळ्या पेट्या उपलब्ध आहेत. या काळ्या पेट्या दुसर्‍या मिडिया सर्व्हर्स बरोबरही उत्तम चालू शकतात.

हे वर लिहिलेले सगळे वर्णन न कंटाळता वाचणार्‍या वाचकांना असा प्रश्न पडण्याची शक्यता आहे की या नवीन उपलब्ध झालेल्या हार्डवेअर संबंधीची माहिती आणि या लेखाचा विषय असलेली दूरचित्रवाणीवरील क्रांती याचा कसा काय संबंध लावायचा? परंतु अ‍ॅपल टीव्ही किंवा तत्सम इतर काळ्या पेट्या पेट्या उपयोगात आणूनच ही क्रांती घडते आहे. दूरचित्रवाणी प्रक्षेपणाच्या क्षेत्रात हा जो नवा बदल घडतो आहे त्याची माहिती करून घेण्यासाठी अ‍ॅपल टीव्हीचे उदाहरण मी घेतले आहे कारण तांत्रिक कुशलता ज्यांना नाही अशा लोकांना सुद्धा अ‍ॅपल टीव्हीची ही काळी पेटी वापरण्यास सर्वात सुलभ आहे असे मला वाटते.

अ‍ॅपल टीव्ही 3 प्रकारे वापरता येतो. यामध्ये सर्वात प्रथम अ‍ॅपल कंपनीची ही काळी पेटी ग्राहकांनी कशी वापरायची याबद्दलची कंपनीची स्वतःची काय अपेक्षा आहे हे बघूया. अ‍ॅपल कंपनीने गाणी, चित्रफिती आणि चित्रपट यांचा एक मोठा खजिना स्वतःच्या वेब साइटवर उपलब्ध करून ठेवला आहे. या खजिन्याला अ‍ॅपल कंपनी ‘अ‍ॅपल स्टोअर‘ म्हणते. अ‍ॅपल कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे अ‍ॅपल टीव्हीच्या ग्राहकांनी ही गाणी किंवा चित्रपट ऑन-लाइन विकत घेऊन ते अ‍ॅपल टीव्हीच्या सहाय्याने बघावे अशी अपेक्षा आहे. अशा विकत घेतलेल्या गोष्टी अगदी विनासायास अ‍ॅपल टीव्ही जोडलेल्या आपल्या दूरचित्रवाणी संचावरून बघता येतात. अमेरिकेतील ग्राहकांना या गोष्टी कदाचित अतिशय स्वस्तात मिळत आहेत असे वाटण्याची शक्यता आहे, परंतु भारतात राहणार्‍या बहुतेकांना या किमती परवडू शकणार नाहीत, निदान मला तरी त्या परवडत नाहीत. त्यामुळे अ‍ॅपल टीव्ही वापरण्याच्या आणि सहज परवडू शकणार्‍या इतर पद्धतीकडे आपण वळूया.

अ‍ॅपल टीव्ही वापरण्याची दुसरी पद्धत म्हणजे याच्या सहाय्याने आपल्या घरातल्या आणि वाय-फाय पद्धतीने जोडणी केलेल्या कोणत्याही स्मार्ट फोन, संगणक, टॅबलेट किंवा ढगात (क्लाऊड मेमरी) यावर संग्रह केलेली गाणी, चित्रफिती किंवा चित्रपट हे आपल्या हॉल मधील टीव्ही वरून कोणत्याही केबल्स किंवा तारा यांचा वापर न करता (वायरलेस) बघणे. परंतु येथे सुद्धा एकूण उपलब्ध असलेले पर्याय जरा मर्यादितच असतात असे वाटते. अशी किती गाणी किंवा चित्रपट आपण संग्रहात ठेवू शकतो? माझा अनुभव असा आहे की आपल्या संग्रहातील गाणी किंवा चित्रपट बघण्याचा थोड्याच दिवसात कंटाळा येतो.

अ‍ॅपल टीव्ही वापरण्याच्या तिसर्‍या पद्धतीकडे आता आपण वळूया. ही पद्धत माझ्या सर्वात जास्त पसंतीची आहे. यात अ‍ॅपल टीव्हीच्या मुख्य स्क्रीनवर उपलब्ध असलेल्या यू ट्यूब किंवा व्हिमिओ सारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. जगभरातील हौशी लोक या दोन अ‍ॅप्सवर आपल्या आवडीची गाणी किंवा चित्रफिती अपलोड करून ठेवत असतात. अ‍ॅपल टीव्ही प्रमाणेच वेस्टर्न डिजिटल कंपनी किंवा इतर कंपन्यांचे सिरियल मिडिया कन्ट्रोलर्स सुद्धा आपल्या स्क्रीनवर ही अ‍ॅप्स आपल्याला उपलब्ध करून देतातच. त्या साठी अ‍ॅपल टीव्हीच आपल्याकडे असला पाहिजे असे जरूर नाही. मी फक्त उदाहरणार्थ अ‍ॅपल टीव्ही घेतला आहे. आपण फक्त हवा तो हे अ‍ॅप्स निवडून त्यावर क्लिक केले की झाले. आपल्या डोळ्यासमोर मनोरंजनाचा एक खजिनाच उलगडतो आहे याची प्रचिती लगेच येते. मी मोहेंजो-दारो चे उदाहरण वर दिले आहे. यू ट्यूब च्या शोध फलकात हे शब्द टंकलिखित केल्याबरोबर अनेक पर्याय आपल्या समोर येतात. यूनेस्को ने या विषयावर केलेली एक फिल्म मला त्या वेळी लगेचच बघायला मिळाली होती.

मराठी मधील अगणित कार्यक्रम यू ट्यूब वर उपलब्ध आहेत. यात नाट्य संगीत, भावगीते, शास्त्रीय संगीत, नाटके या सर्वांचा समावेश आहे. अनेक नवोदित कलाकार आपली कला या माध्यमातून लोकांपुढे सध्या ठेवत आहेत. गेल्या काही काळात बुजुर्ग कलाकारांबरोबर अशा अनेक नवीन कलाकारांनी सादर केलेले कार्यक्रम मी बघितले आहेत व बघतो आहे.

माझ्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांसाठी तर अ‍ॅपल टीव्ही किंवा तत्सम उपकरणे हे एक वरदानच आहे. यू ट्यूब वर घेतलेला शोध हा एखाद्या गुप्त खजिना शोधण्याच्या मोहिमेसारखा असतो असे मला नेहमी वाटते. गेल्या महिन्याभरात 1940-50 किंवा 1960-70 या दशकातील अनेक लोकप्रिय गाण्यांचा पुनर्शोध मला घेता आला आहे. अक्षरशः: हजारो गानप्रिय लोकांनी आपल्या जवळ असलेला आणि वर्षानुवर्षे सांभाळून ठेवलेला जुन्या जुन्या गाण्यांचा आपला रेकॉर्ड्सचा संग्रह, डिजिटल स्वरूपात बदलून व नंतर तो यू ट्यूब वर अपलोड करून तुमच्या किंवा माझ्या आनंदात भर घालण्यासाठी हा खजिना खुला करून ठेवला आहे. यू ट्यूब वर असलेली गाणी किंवा चित्रफिती ही लोकांसाठी लोकांनी तयार करून ठेवलेले कार्यक्रम आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यू-ट्यूब वर मला जे बघण्याची किंवा ऐकण्याची इच्छा असते ते मी कोणतेही शुल्क न देता बघू किंवा ऐकू शकतो.

रोज रात्री भोजन घेतल्यावर पुढचे कंटाळवाणे तास दोन तास काय करायचे हा माझ्यासारख्यांना पडणारा यक्षप्रश्न, अ‍ॅपल टीव्हीने बर्‍यापैकी सोडवला आहे हे नक्की. जाहिरातींचा बुजबुजाट असलेल्या टीव्ही वाहिन्यांवर कोठेतरी काहीतरी बघत बसण्यापेक्षा यू ट्यूबवर अर्धा किंवा एखादा तास, आवडणार्‍या संगीताचा आस्वाद घेता येणे हे तदनंतर सहज रितीने निद्रादेवीच्या आधीन होता यावे या साठी एक गुरूकिल्लीच मला मिळाली आहे असे मी मानतो. दूरचित्रवाणीने आपल्या आयुष्यात अनेक क्रांत्या घडवून आणल्या. मात्र काय कार्यक्रम बघायचे किंवा ऐकायचे याचे संपूर्ण स्वातंत्र्य आपल्याला बहाल करणारी ही नूतन क्रांती या सर्वांचा कळसच आहे असे म्हटले तरी चालेल.

माझ्या मूळ इंग्रजी लेखासोबत असलेली छायाचित्रे या दुव्यावर बघता येतील.

25 फेब्रुवारी 2014

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

चांगली माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

चांगले लेखन.
हे नवे माध्यम हळु हळु मार्केट बळकावेल व टिव्हीला सॅच्युरेशन येत जाईल की टिव्ही आल्यानंतरही चित्रपट उद्योग तितक्याच जोमात चालु राहिला (मात्र चित्रपटांच्या लांबीवर परिणाम झालाच) तसा एक अधिकचा पर्याय निर्माण होईल हे लवकरच कळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान लिहिलय. हळूहळू टीव्ही आणि संगणक/laptop हा भेद कमी होईल असं वाटतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ह्या प्रवासात होणारा छळ टाळण्याचा उपाय मात्र काही सापडत नाही.
लोक चेपुवर असतात, म्हणून चेपुवर आलो.
आम्ही ल्यापटॉप व इंटारनेट वापरु लागेपर्यंत ते औट ऑफ फ्याशन झाले; लोक त्या साडेतीन इंची स्क्रीनकडे पहात चित्कारु लागले.
संपर्क ठेवायला म्हणून तिथे यावे लागले.
पण ते फार कटकटिचे वाटते. बोटे दुखतात.
त्या इवल्याशा स्क्रीनवर सगळे मावत नाही; आणि लोकांच्या उठवळ मतांच्या पिंकांवर दुर्लक्षही करता येत नाही.
काही ग्रुपवरील असले वर्तन पाहून प्रतिसाद देत बसलो तर बोटे दुखतात.
प्रतिसाद न दिल्यास डोके दुखते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

त्या इवल्याशा स्क्रीनवर सगळे मावत नाही; आणि लोकांच्या उठवळ मतांच्या पिंकांवर दुर्लक्षही करता येत नाही.

काही ग्रुपवरील असले वर्तन पाहून प्रतिसाद देत बसलो तर बोटे दुखतात.
प्रतिसाद न दिल्यास डोके दुखते.

कंडुअतिशमनार्थ Wink ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ५-६ वर्षांपासून हा प्रश्न कसा सोडवला आहे ते लिहितो.

मी एलजीचा चांगला मोठा फ्लॅटस्क्रीन टीवी आणला. येथील केबलची डिजिटल बॉक्स त्याला जोडली. त्यामुळे नेहमीच्या टीवीचे हवे ते चॅनल्स पाहता येतात. ह्याशिवाय मी एक टेबलटॉप प्रकारचा २००जीबी हून अधिक हार्डड्राइव असलेला नुसता संगणक - मॉनिटरशिवाय - आणला आणि तो एचडीएमआय केबलने टीवीला जोडला. आता मला केवळ सिग्नलसोर्स बदलून इच्छेनुसार माझा टीवी केबलवरचे चॅनल्स पाहण्यासाठी वापरता येतो आणि हवे तेव्हा संगणकाचा मॉनिटर म्हणूनहि वापरता येतो. ह्याचा कीबोर्ड आणि माउस हे वायरलेस असून मी त्यांचा वापर आरामखुर्चीमध्ये बसून करतो. त्यांना ठेवण्यासाठी एक छोटे टेबल समोर ठेवतो. कीबोर्ड आणि माउस ह्यांची रेंज १० फुटांपर्यंत आहे. ह्या सर्व सेटअपला माझ्या सिटिंगरूममध्ये ठेवले आहे. अशा रीतीने आता माझ्याकडे एक लॅपटॉप आणि एक साधा संगणक आहे. इंटरनेट कनेक्शन वायरलेस आहे

ह्याचे अनेक लाभ माझ्या लक्षात आले आहेत. हल्ली यूट्यूबच्या माध्यमातून संगीत, देशपरदेशचे चित्रपट अशी अमर्याद करमणूक उपलब्ध आहे आणि तिला काहीहि खर्च येत नाही. असे सर्व सिनेमे मी संगणकाच्या मार्फत मोठया स्क्रीनवर पाहू शकतो. लॅपटॉपवर पाहण्यापेक्षा हे कितीतरी अधिक सुखकारक आहे. हे पाहणे एकाहून अधिक प्रेक्षक एकावेळी करू शकतात, जे लॅपटॉपवर शक्य होत नाही. आपली छायाचित्रे, गूगल अर्थ इ. मोठया पडद्यावर पाहणे हा एक सुखद अनुभव आहे

ह्या संगणकाचा वापर मी संगणक म्हणूनहि सर्रास करतो. त्यासाठी पडद्यापासून तीन फूट अंतरावर बसावे लागते. पण अक्षरे मोठी असल्याने लॅपटॉपपेक्षा डोळ्यांना ताण कमी पडतो. लॅपटॉप आणि संगणक एका होमग्रुपमध्ये असल्याने एकातली माहिती वा एकावर केलेले काम दुसर्‍यामध्ये सहज नेऊन ठेवता येते. अशा मार्गाने हा एक बॅकअपच झाला आहे. (ह्याशिवाय मी एक ऑनलाइन बॅकअप सेवाही वार्षिक पैसे भरून वापरतो.)

बेडरूममधील टीवी बदलून मी तेथे एक स्मार्ट टीवी आणला. त्यावर नेटफ्लिक्स, यूट्यूब बघण्याची मर्यादित सोय आहे. पण माझ्या बसण्याच्या खोलीतील टीवी समोर त्याची कुवत अगदीच कमी आहे असे माझ्या नंतर लक्षात आले.

केबलचे डिजिटल टर्मिनल आणि एलजीचा टीवी ह्यांच्यामध्ये एक फिलिप्सचा डिजिटल रेकॉर्डर ठेवला आहे. गैरसोयीच्या वेळचा एखादा टीवी शो बघायची इच्छा असेल तर तो रेकॉर्ड करून सवडीने पाहता येतो. पुनः जाहिराती एफएफ करून टाळता येतात हा लाभ आहेच.

करमणुकीसाठी ह्या सर्व सोल्यूशनचा मला खूप लाभ होत आहे.

(चंद्रशेखर यूट्यूबचा वापर करतातच. मोहेन्जो दारोच्या अनेक क्लिप्स तेथे आहेत. २० मिनिटाहून अधिकचा फिल्टर लावल्यास पुरेशा मोठया - आणि त्यामुळे जास्ती माहिती देणार्‍या - क्लिप्सहि दिसतात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पॉप्युलर कल्चरमध्ये, विशेषतः अमेरिकेत अशा प्रकारच्या नविन उपकरणांचा वापर करून केबल कंपनीचे कनेक्शन काढून टाकण्याला 'कॉर्ड कटिंग' असे म्हणले जाते. मी तीन वर्षांपूर्वी कॉर्ड कट केली. सद्ध्या माझ्या टीव्हीला अ‍ॅपल टीव्ही, क्रोमकास्ट, एक्स बॉक्स आणि एक पीसी जोडलेले आहेत.

अ‍ॅपल टीव्ही तंत्रज्ञान आणि भरवश्याच्यादृष्टीने सर्वोत्तम आहे असे माझे मत आहे. चंद्रशेखर यांनी म्हणल्याप्रमाणे मलाही अ‍ॅपल टीव्हीवरील अ‍ॅप्स वापरणे सर्वात जास्त आवडते. पण त्याच वेळेला कंप्युटरवरून डिरेक्ट वायरलेस स्ट्रीमींग टीव्हीवर करणे जास्त सोयीचे वाटते.

पण, अ‍ॅपल कडे अ‍ॅप सपोर्ट तसा तोकडा आहे. शिवाय अ‍ॅपलद्वारे गोष्टी विकत घ्यायच्या म्हणजे जरा महाग पडतं. अ‍ॅपल टीव्ही, तुमच्याकडे हायस्पीड ब्रॉडबँड आहे असे गृहित धरून बनवल्याने जरा प्रॉब्लेम होतो. (१० एमबीपीएस कनेक्शन असले तरी वायफायने बेडरूमपर्यंत सिग्नल येईतो बराच लॉस झालेला असतो.) पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे मॅकबूक नसेल तर अनेक गोष्टी स्ट्रीम करताना फार अडचणी येतात.

म्हणून मग मी क्रोमकास्ट घेतला. गुगलने बनवलेला क्रोमकास्ट क्रोम ब्राउझर वापरून तुमच्या कोणत्याही लॅपटॉपवरून काहीही टीव्हीवर वायरलेस स्ट्रीम करू शकतो. नेहमीप्रमाणे गुगलने यात पुर्ण लक्ष न घातल्याने यातही अनेक अडचणी शिल्लक आहेतच. मुख्यतः, युट्युब सोडल्यास इतर काही स्ट्रीम करायचे असेल तर फार सीपीयु खर्च होतो, नविन लॅपटॉप नसेल तर खास वैताग येतो. पण स्वस्तात मिळणारा हा डाँगल लवकरच उपयुक्त होईल अशी आशा आहे.

या तोट्यांमुळे मी एक्स बॉक्स घेतला. एक्स बॉक्सवर मी जवळजवळ सर्व प्रकारचे स्ट्रीमिंग करू शकतो, अ‍ॅपल प्रमाणे त्यांचेही म्युझिक, सिनेमे, टीव्ही वगैरे आहेतच. शिवाय नेटफ्लिक्स, अमेझॉन, पीबीएस, सोनीचे क्रॅकल वगैरे आहेतच. त्याशिवाय इंटरनेट ब्राउझर वापरून मी फुकटातल्या म्युझिक स्ट्रीमिंग साईट्स, एनपीआर वगैरे जवळजवळ सर्व गोष्टी एक्स बॉक्स द्वारे पाहू शकतो. एक्स बॉक्सवर तुम्ही फोन/कंप्युटर इत्यादी वापरून युट्युब वगैरे स्ट्रीमिंग करू शकता. पण सर्वात मोठा फायदा म्हणजे एक्स बॉक्स व्हॉईस कमांड्स ने वापरता येत असल्याने रिमोट कंट्रोलची कटकट जरा कमी होते (शिवाय तुमचा फोन रिमोट कंट्रोल होऊ शकतो). अर्थात, व्हिडिओगेम्स वगैरे खेळणार नसाल तर एक्स बॉक्स हे प्रकरण महाग आहे.

शिवाय रोकू चा बॉक्सही वापरून पाहिला. रोकूचेही काही फायदे आहेत, पण माझ्याकडे अ‍ॅपलचे 'एन्व्हायर्नमेंट' असल्याने अ‍ॅपल टीव्ही जास्त उपयुक्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

HDMI Dongle वापरून हा प्रश्न निकाली काढता येतो.
हे पाहा:
http://www.kogan.com/au/buy/agora-smart-tv-quad-core-hdmi-dongle/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद

चित्रपट, गाणी, चांगल्या टीव्ही मालिका विकत घेऊन पाहणाऱ्यांना अॅमेझॉन व्हीडीओ हा पर्यायही उपलब्ध आहे.

अमेरिकेत मिळणारे काही सेटटॉपबॉक्स इंटरनेटवरच चालतात. उदा. AT&T. यात नेहेमीच्या टीव्हीचा येणारा डेटासुद्धा इंटरनेटच्या तारेतूनच (घरापर्यंत) येतो. घरात एकापेक्षा जास्त सेटटॉपबॉक्स वापरायचे असतील तर ते वाय-फायवर चालतं. काही वाहिन्या किंचित जास्त पैसे देऊन घेता येतात, जिथे जाहिरातींशिवाय मालिका, चित्रपट पाहता येतात. जाहिरातींशिवाय दिसणाऱ्या मालिका आणि मुळातच रस घेऊन बघावा अशा मालिका भारतात कधी येतील कोण जाणे! पण सर्वसाधारण भारतीय जाहिराती मला अमेरिकन जाहिरातींपेक्षा जास्त आवडतात.

अॅपलची उत्पादनं भारतात किती चालतील याबद्दल मला शंका आहे. चकचकीत दिसतं हे ठीक आहे. पण आमच्या बागेत आलात की आमच्याच बागेत खेळायचं, दुसऱ्या बागेत बघायचंही नाही, हे अॅपलचं तत्त्वज्ञान बऱ्याच भारतीयांना आवडेल असं वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अॅपलची उत्पादनं भारतात किती चालतील याबद्दल मला शंका आहे. चकचकीत दिसतं हे ठीक आहे. पण आमच्या बागेत आलात की आमच्याच बागेत खेळायचं, दुसऱ्या बागेत बघायचंही नाही, हे अॅपलचं तत्त्वज्ञान बऱ्याच भारतीयांना आवडेल असं वाटत नाही.

पण हे आडमुठेपणाचे तत्त्वज्ञान आम्रविकनांना इतके कसे काय आवडते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नखरे परवडत असले की चालायला लागतात.
अमेरिकनांना ते "चालत" असावेत. "आवडत " असावेत की नाही ह्याबद्दल साशंक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पण हे आडमुठेपणाचे तत्त्वज्ञान आम्रविकनांना इतके कसे काय आवडते?

अ‍ॅपलची प्रोडक्ट्स इतकी का खपतात हा प्रश्न थोडक्यात सोडवणं अवघड आहे. पण काही गोष्टी थोडक्यात सांगू शकतो.

१. क्वालिटी: अ‍ॅपलच्या गोष्टींची क्वालिटी ही 'उत्तम' प्रकारात मोडते. अर्थात, हा थोडा सबजेक्टीव्ह मुद्दा आहे, पण थोडा शोध केलात तर सर्वसाधारणपणे माझा मुद्दा पटेल.
२. सपोर्टः अ‍ॅपलच्या प्रोडक्ट्सना अ‍ॅपलचा उत्तम सपोर्ट असतो. उदा. म्हणून अ‍ॅन्ड्राईड आणि अ‍ॅपल फोन्स घ्या. इथे विद्याचा वापर करून तुलना केलेली आहे. :"अ‍ॅन्डॉईड ऑर्फन्स" (तुलना २०११ची आहे.)
३. रिलायबिलिटी: आयपॉड सोडून अ‍ॅपलची सर्व उत्पादनं मी वापरली (विकत घेतलेली) आहेत. तसंच ब्लॅकबेरी, अ‍ॅन्ड्राईड उत्पादनंही वापरलेली आहेत. अ‍ॅपलच्या प्रोडक्टची रिलायबिलिटी इतरांपेक्षा मला नेहमीच जास्त आहे असे अनुभवास आले आहे.

iPhone found to be 300% more reliable than Samsung smartphones

The second, in which the representative asked Cook to commit on the spot to only making moves that were profitable for the company, drew the most intense comeback we've heard from the executive. Chaffin writes:
"When we work on making our devices accessible by the blind," he said, "I don't consider the bloody ROI." He said that the same thing [applies] about environmental issues, worker safety, and other areas where Apple is a leader
Read more: http://www.businessinsider.com/tim-cook-versus-a-conservative-think-tank...

४. असे म्हणणारे सीईओ विरळाच सापडतील.

पण आमच्या बागेत आलात की आमच्याच बागेत खेळायचं, दुसऱ्या बागेत बघायचंही नाही, हे अॅपलचं तत्त्वज्ञान बऱ्याच भारतीयांना आवडेल असं वाटत नाही.

५. जसं काही भारतीय लोक जगापेक्षा कोणत्या वेगळ्या पातळीवरचं जगतात. परदेशांत राहणार्‍या भारतीय लोकांकडे अ‍ॅपल चालतं का नाही हे पाहिल्यास याचं उत्तर मिळेल. भारतात अ‍ॅपल चालत नाही याचं मुख्य कारण किंमत. आयफोन ५ जेव्हा भारतात आला तेव्हा त्याची भारतातली किंमत 'होंडा अ‍ॅक्टीव्हा' पेक्षा जास्त होती.

असो. हा वाद थोडक्यात संपणारा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अ‍ॅपल प्रॉडक्टसचा 'user experience' अप्रतीम असतो. आणि रिलायबिलिटी सुद्धा. पण लय महाग. i-phone 5S अठ्ठेचाळीस ते पन्नास हजार रुपायला मिळतो. भारतात एवढा महागडा फोन परवडण शक्य नाही जनतेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अॅपलची उत्पादनं दिसायला चांगली असतात, आणि सुरूवातीला वापरायला सोपी तीच होती याबद्दल वाद नाही. आता बाजारात, विशेषतः मोबाईल, लॅपटॉप इ, बऱ्याच कंपन्या आहेत. आणि त्यात वापरायला सोपं हा प्रकार बाकीच्यांकडेही आहे. फोनच्या बाबतीत मार्केट एवढं बदलतं असतं, विशेषतः अमेरिकेत हे पाहिलं, की आज चांगला वाटलेला फोन महिन्याभराने बघायला जावं तर दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर गेलेला असतो. उगाच म्हणून, चालू मार्केटमधल्या पहिल्या दोन-तीन फोन्सची तुलना केली तर लोकांची मतंसुद्धा फक्त अॅपलला आहेत असं दिसत नाही. अँड्रॉईड बनवणाऱ्या कंपन्यांचा मार्केट शेअर कमी नाही. पण त्यात अॅपलला, वापरण्यासाठी सोपी उत्पादनं बनवण्यात, पहिलं असण्याचा फायदा अजूनही होतो, असं माझं मत.

ज्यांना अॅपल परवडतं ते घेतात. भारतासारख्या (चहा-कॉफीत साखर ढवळल्यावर चमचा चाटल्याशिवाय सिंकमधे न टाकणाऱ्या*) समाजात मोठ्या प्रमाणावर यशस्वी होणार ते मायक्रोमॅक्ससारख्या कंपन्या, ज्या लोकांना जे काही हवंय ते स्वस्तात उपलब्ध करून देतात. परवडत असूनही, "पातिव्रत्या"बद्दल आत्यंतिक मतं असल्यामुळे अॅपलची उत्पादनं न वापरणारे (माझ्यासारखे यडपट) लोक कमीच.

हल्ली लॅपटॉपचे कीबोर्ड्स अॅपलसारखे दिसायला लागले आहेत. निदान यूएस्बी कीबोर्ड्सतरी दणदणीत राहतील आणि साच्यातले बनणार नाहीत अशी अपेक्षा.

*यात काहीही हिणवणं नाही. मी हेच करते. हल्ली लोकांच्या भावना टरारून फुगलेल्या गळवासारख्या दिसतात म्हणून हे स्पष्टीकरण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अँड्रॉईड बनवणाऱ्या कंपन्यांचा मार्केट शेअर कमी नाही. पण त्यात अॅपलला, वापरण्यासाठी सोपी उत्पादनं बनवण्यात, पहिलं असण्याचा फायदा अजूनही होतो, असं माझं मत.

मार्केट शेअर बाबत अ‍ॅपल कधीचं पहिलं नव्हतं. मुळात कोणत्याही अ‍ॅपल प्रोडक्ट्सचा मार्केट शेअर तुलनेने फारच कमी आहे. (आयफोनने प्रचंड मार्केट घेतलं हे आता खरं आहे. आणि हळूहळू मॅकही बरंच मार्केट घेतो आहे.)

मार्केट शेअर कमी असूनही अ‍ॅपल नफा जास्त कमवतं. त्याला अनेक कारणं आहेत. एक कारण अ‍ॅपल करता लोक जास्त पैसे द्यायला तयार असतात. तसंच अ‍ॅपल विकत घेणारे अ‍ॅप्स वगैरे 'सढळ हाताने' विकत घेताना दिसतात.
दुवे;
१. IDC data shows 66% of Android's 81% smartphone share are junk phones selling for $215
२. Apple's iOS Completely Blew Away Google's Android For Shopping On Christmas
३. Android Dominates Market Share, But Apple Makes All The Money
४. Apple vs. Android: The state of the mobile Web - 12/1/2013

गेल्या तीन चार वर्षांतील ह्या बातम्या सातत्याने अशाच आहेत.

आज चांगला वाटलेला फोन महिन्याभराने बघायला जावं तर दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर गेलेला असतो. .

या वाक्यातील पहिला भाग आणि दुसरा भाग परस्पर विसंगत आहेत. Smile आणि हाच अ‍ॅन्ड्रॉईड फोन्सचा मोठा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. (अ‍ॅन्ड्राईड ऑर्फनचा दुवा साधारण हेच सिद्ध करतो.) किमान वर्षभर नंबर टिकवेल असे फोन जोवर येत नाहीत तोवर अ‍ॅन्ड्राईडचे अवघड आहे. बाकी लोकांची मतं काय आहेत यावर नो कमेंट. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अॅपलची उत्पादने वापरायला म्हणजे नक्की कशासाठी सोपी असतात हे नक्कीच सबजेक्टिव आहे. मी आयपॉड घेतला होता. मात्र त्यावेळी काही केल्या माझ्या लिनक्स प्रणालीवर गाणी टाकणे शक्य होत नव्हते. काही दिवसांनी जीटीकेपॉड, अॅमेरॉक, रिदमबॉक्स वगैरे ठिकाणी आयपॉडमध्ये गाणी टाकण्याच्या सोयी व्यवस्थित चालू लागल्या. तोपर्यंत आयपॉड वापरण्याचा उत्साह त्याच्या अवघडपणामुळे संपून गेला. त्यानंतर आयपॉडच्या एक चतुर्थांश किंमतीत उपलब्ध असलेला सॅनडिस्कचा एमपी३ प्लेअर घेतला व त्यात गाणी टाकणे किंवा काढून टाकणे हे यूएसबी ड्राईव लावण्याइतके सोपे होते. तेव्हापासून अॅपलकडे आपला बिझनेस गेलेला नाही. शिवाय आयफोनसाठी अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत फक्त एटी-टी/वेरायझॉन वगैरे 'पर्याय'च होते. आता एका आयफोनच्या तुलनेत साधारण त्याच कॉन्फिगरेशनचे २ नेक्सस फोन्स किंवा एका आयपॅडपेक्षा स्वस्तातला किंडल घेणे बरे वाटते.

थोडक्यात ज्यांच्याकडे विंडोज किंवा मॅक आहे त्यांच्यासाठी ही उत्पादने वापरायला सोपी असावीत पण everything should be simple but not simpler या न्यायाने वापरायला थोडी अवघड असलेली अँड्रॉईड किंवा नॉन अॅपल उत्पादने मला नक्कीच आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण आमच्या बागेत आलात की आमच्याच बागेत खेळायचं, दुसऱ्या बागेत बघायचंही नाही, हे अॅपलचं तत्त्वज्ञान बऱ्याच भारतीयांना आवडेल असं वाटत नाही.

मुळात हे तत्त्वज्ञान एक्सक्लुजिवली अॅपलचं राहिलेलं आहे असं वाटत नाही. ऐसीवर मी या बातमीचा दुवा दिला होता. भारतात अँड्रॉईड फोन्स सर्वाधिक खपतात मात्र गूगलचे तत्त्वज्ञानही अॅपलपेक्षा फारसे वेगळे आहे असे दिसत नाही. त्यामुळे भारतीयांची आवडनिवड ही क्लोज्ड सोर्स विरोधाच्या तत्त्वज्ञानाशी निगडित निश्चितच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेव्हापासून व्हिमिओ थोडंफार वापरायला सुरूवात केली. फोनवर फायरफॉक्स आहे. शक्यतोवर एकचएक गूगल अकाऊंट न वापरण्याचा प्रयत्न करते, इ. (हा झाडूने समुद्र परतवण्याचा प्रयत्न आहे याची कल्पना आहे. ते फक्त मनाचं समाधान आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. हुशारी.
अमुक कंपनीचं कार्डं घेतलं, की त्यासोबत नोकियाचा फोन फुकट, अशी जी इंडियन सोय फार कमी ठिकाणी उपलब्ध आहे, तशी सोय अम्रिकेत लै जुन्या काळापासून आहे.
अम्रिकेतल्यांनी सांगावं की किती लोकांनी नुसता आयफोन विकत घेऊन मग आवडेल त्या कंपनीचे नेटवर्क विकत घेतलेले आहे?

२. दीडशहाणपणा.
माझ्या मालकीच्या आयफोनवर मी ३०० ऑडिओ फाईल्स अपलोड केल्या.
या सगळ्या, त्या आयफोनने डिलीट केल्या. का? कारण त्या ३०० पेशंट नोट्सचा प्रताधिकार त्यांना सापडला नाही. अन मी ३०० ऑडिओ फाइल्स 'क्रिएट' करू शकतो यावर यांचा विश्वास नाही.
अ‍ॅपल अ‍ॅझ्युम्ड की मी 'पायरसी' करतो आहे.

३. हिरवा माज.
Wink

४. अनाकलनीय ब्रँड लॉयल्टी/स्टाईल स्टेटमेंट.
अधिक लिहिता येईल, पण अँड्रॉईड व्हर्सेस अ‍ॅपल नेटवर इतकं उपलब्ध आहे, की त्यापुढे फेकू-पप्पू काहीच नाही..
तेव्हा, आवरतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अॅपलची आणखी एक अडचण म्हणजे त्यांच्या सगळ्या वायरी वगैरे नॉन स्टँडर्ड इंटरफेसवाल्या असतात. अॅपलच्या इतर उत्पादनांना त्या चालू शकतात पण नॉन अॅपल उत्पादनांना नाही. उदा. माझ्याकडे असलेली सॅमसंग, नेक्सस, किंडल वगैरे उत्पादने मायक्रोयूएसबी केबल वापरुन मी चार्ज करु शकतो. माझी उदा. किंडलची वायर हरवली तर नेक्सससोबत आलेली केबल मी किंडलसाठी वापरू शकतो. ती 'सोय' अॅपलच्या रुढअर्थाने सोयीस्कर आणि सोप्या उत्पादनांना नाही. तीच गोष्ट लॅपटॉप चार्जरची. मी डेल-एचपी वगैरे लॅपटॉपचे चार्जर आलटून पालटून वापरले आहेत. मात्र मॅकला हे चार्जर चालणार नाहीत. त्यामुळे यूजर एक्सपीरियन्स मध्ये फक्त जी-यू-आय आणि मेटॅलिक चकचकीतपणा ह्या गोष्टी वगळता इतर गोष्टीही ध्यानात घेतल्यास अॅपलचा स्कोअर खाली जातो.

मी चाचणी म्हणून १०० गाणी गूगल म्युझिकवर अपलोड केली, तर गूगलने त्यांच्याकडे असलेल्या त्या गाण्यांच्या चांगल्या दर्जाच्या अधिकृत प्रती माझ्या अकाऊंटमध्ये रिप्लेस करुन दिल्या.

बाकी ब्रँड लॉयल्टी वगैरे गोष्टींवर नो कमेंट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अॅपलची आणखी एक अडचण म्हणजे त्यांच्या सगळ्या वायरी वगैरे नॉन स्टँडर्ड इंटरफेसवाल्या असतात. ...

हे आणि गाण्यांचं जे तुम्ही लिहीलं आहेत तेच ते "आमच्या बागेत आला आहात तर दुसरीकडे जायचं नाही". मायक्रोयूएस्बी केबल बऱ्याच कॅमेरा, कॅमकॉर्डर्सनाही लावता येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.