मातृभाषेतील संवादाचं महत्त्व...

तीनेक वर्षांपूर्वी हे पुस्तक वाचल्यानंतर जे टिपून ठेवलं होतं ते आज अचानक पुढ्यात आलं. जाणवलं, ‘आपण काहीही करू शकत नाही’ असा टोचर्‍या-बोचर्‍या खेदासह काही पुस्तकं मनात उरलेली असतातच.
(तिथली सध्याची परिस्थिती कशी असेल?)

द रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स - सोमाली माम.....
(अनुवाद: भारती पांडे - मेहता प्रकाशन)

‘मला जग बदलण्याचा प्रयत्न करायचाही नाहीये. आणि मला ते जमेल असंही वाटत नाही. हे जे काही लहानसं आयुष्य माझ्यासमोर उभं आहे, यातना भोगतंय त्याला मदत करता आली, त्यात काही बदल करता आला तर तेवढाच मला करायचायं. एकाच लहान मुलीचं नशीब- जे अगदी वास्तव आहे. तेवढंच मला बदलायचं आहे. मग आणखी एका- त्यानंतर आणखी एका- कारण मी जर हे केलं नाही तर मला स्वत:कडे मान वर करून बघता येणार नाही की रात्री झोपता येणार नाही.’ -- सोमाली माम, कंबोडिया.
१९८६ साली सोळा वर्षांची असताना जिला एका वेश्यागृहामध्ये वेश्या म्हणून विकण्यात आलं अशा सोमालीचं हे आत्मकथन ‘द रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स...’
दरवर्षी वेश्याव्यवसायामध्ये विकण्यात येणार्‍या ‘त्या’ हजारो लहानग्या मुलींना तिने तिचं हे आत्मकथन अर्पण केले आहे.
ती म्हणते, ‘आज याहूनही लहान वयाच्या अनेक वेश्या कंबोडियामध्ये आहेत. प्रत्येक मोठ्या शहरामध्ये कुमारिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि त्यांच्या कौमार्याची खात्री पटावी म्हणून कित्येक वेळा पाच किंवा सहा वर्षांइतक्या लहान वयाच्या मुलीही विकल्या जातात.’
‘ह्यातील बहुतेक अभागी मुली त्यांच्या आई-वडिलांनी किंवा नातेवाईकांनी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी वेश्यागृहात पोचवलेल्या असतात. त्यांना त्यांच्या आई-वडिलांची आज्ञा पाळावीच लागते. धाकट्या भावाच्या शिक्षणासाठी किंवा आईच्या जुगाराच्या नादासाठी रस्त्याच्या कडेला उभं राहून स्वत:ला विका असं जर मुलीला तिच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलं तर ते तिला मान्य करावंच लागतं. तिच्यापुढे दुसरा पर्यायच नसतो.’
‘हे कुंटणखाने घाणेरड्या-गलिच्छ जागी असतात, ह्या जागांचे मालकही हिंसक असतात आणि तिथे पहारेकरीदेखील असतात जेणेकरून मुलींनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू नये.
एकदा कळून चुकलं की आपल्याला पळून जायला जागाच नाहीये तर त्या तसा प्रयत्नदेखील करत नाहीत. कारण घरातल्या लोकांना त्या परत यायला नकोच असतान. आता त्या ‘अपवित्र’ झालेल्या असतात. त्यांना कुठलीही कला अगर कोणतंही काम येत नसतं. स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतील असं एकही कौशल्य त्यांच्याजवळ नसतं. मरेपर्यंत स्वत:ला विकत रहाण्याशिवाय त्यांच्या नशिबात दुसरं काहीही नसतं.’
सोमाली म्हणते, ‘त्यांच्या मनातील ही भयानक भितीच मला सतत जाणवते, माझ्या स्वत:च्या अनुभवाचा तो जणू प्रतिध्वनीच असतो.’
सोमालीसारख्या, नरकयातना भोगत जगणार्‍या निष्पाप, निरागस मुलींचं भयावह आयुष्य अन त्यातून बाहेर पडण्यासाठी सोमालीने दाखवलेलं धाडस... कल्पनेपलिकडचं सगळं!

माणसाच्या जगण्यात संवाद महत्त्वाचा का असतो? सोमालीचे म्हणणे जेव्हा वाद-संवादावाटे समजून घेतले गेले त्याचवेळी तिच्यापुढे सुटकेचा मार्ग खुला झाला.
आपल्या जगण्यातील अन्याय-अत्याचारांची सोमालीला जसजशी जाणीव होत गेली, तसतशी त्याविरुध्द लढण्याची तिची जिद्ददेखील अधिकाधिक धारदार होत गेली. ह्या असल्या जगण्यातून सुटण्याचे तिचे काही प्रयत्न निष्फळ ठरले आणि त्यामुळे तर आधीपेक्षा अधिकच जाच तिच्या वाट्याला आला. त्यामुळे ती निराश होत गेली, पण मनातील तिची उमेद खचली नाही, उलट ती जास्त तीव्र झाली. आणि जसजशी संधी मिळत गेली तशी तिने बाहेर पडण्याचा मार्ग शोधून काढलाच. ह्यात तिला मदत झाली काही फ्रेंच व्यक्तींची. अशा व्यक्ती ज्यांना तिच्या तळमळीची ओळख पटली. पण त्यांची खात्री पटण्यासाठी मदत झाली ती संवादाची, तिच्या मातृभाषेतून तिच्याशी संवाद साधू शकणार्‍या एका फ्रेंच माणसाची.
तो एकमेव माणूस असा होता की जो तिची ख्मेर भाषा समजू शकला, तिचं म्हणणं, तिचं दु:ख, तिची कळकळ त्याच्यापर्यंत अगदी थेटपणे जशीच्या तशी पोचली. आणि आपलं म्हणणं तो ऐकून घेतोय हे लक्षात आल्यावर त्याच्याशी ती संपूर्ण मोकळी झाली. ती त्या भोगवट्यातून बाहेर पडली.

--- चित्रा... ०२.०४.२०११

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

दुर्दैवी! मात्र कंबोडियातील हा प्रकार इतका साधा-सरळ व/वा आर्थिक नसावा. त्याला काही धार्मिक तर काही तस्करीसारखे पदर आहेत
या कंबोडियन वेश्याव्यवसायावर मागे हिमालमध्ये एक माहितीपूर्ण लेख वाचला होता. आता मिळत नाहीये. मिळाला की इथे देईनच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!