पुराणमतवादी म्हणजे नक्की कोण?

(संपादक : संस्थळांची किंवा सदस्यांची तुलना किंवा त्यांवर टीका / चिखलफेक न करता पुराणमतवादी आणि पुरोगामी अशा मूलभूत संकल्पनांवर चर्चा व्हावी ह्यासाठी मूळ धाग्यातून हे वेगळे काढलेलं आहे. 'पिसाळलेला हत्ती' हवं तर चर्चाप्रस्ताव त्यानुसार संपादित करू शकतात.)

मिसळपाववर पुराणमतवादी सदस्यांची संख्या सध्या जास्त आहे अशा स्वरूपाचे वक्तव्य नितिन थत्ते आणि अतिशहाणा यांनी केले आहे.मला मिसळपाव विरूध्द ऐसीअक्षरे असे भांडण लावायचे नाही.तरीही पुराणमतवादी म्हणज्जे नक्की कोणत्या स्वरूपाचे लिखाण करणारे सदस्य यांना अपेक्षित आहेत हे कळले नाही.मी मिसळ्पाववरचा अगदी प्रत्येक लेख आणि प्रत्येक प्रतिसाद (आणि ऐसीवरचेही बरेचसे लेख आणि प्रतिसाद) वाचला आहे.मला स्वत:ला चांगले लिहिता येत नाही म्हणून इतर कोणी चांगले लिहित असेल तर त्यातून चार गोष्टी शिकता आल्या तर चांगले असा माझा उद्देश असतो. मी जे काही मिसळपाववर वाचले आहे त्यावरून लिहितो:

१. मिसळपाववर स्त्रीशिक्षणाला विरोध कोणी केल्याचे ऐकिवात नाही.
२. मिसळपाववर स्त्रीयांनी चूल आणि मूल सोडून तिसरी गोष्ट करू नये असे कोणी म्हटल्याचेही ऐकिवात नाही.
३. मिसळपाववर तथाकथित सामाजिक उतरंडीतील खालच्या जातीतील लोकांचे वास्तव्य गावकुसाबाहेरच असावे, त्यांनी कमरेला झाडू लावून चालावे आणि गळ्यात मडके घालावे असेही कोणी म्हटल्याचे ऐकिवात नाही.
४. मिसळपाववर स्त्रियांनी नवरा गेल्यानंतर एकतर केशवपन करावे किंवा सती जावे असे कोणी म्हटल्याचे मी तरी कधी वाचले नाही.
५. तथाकथित सामाजिक उतरंडीतील वरच्या जातीतील लोकांसोडून इतर कोणाला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही असे मिसळपाववर कोणीही म्ह्टल्याचे मी तरी वाचलेले नाही.

असे अनेक गोष्टींविषयी लिहिता येईल.मग थत्तेचिच्चा आणि अतिशहाणा म्हणत आहेत ते पुराणमतवादी नक्की कोण? (इथे नावे अपेक्षित नाहीत तर पुराणमतवादीपणाची लक्षणे अपेक्षित आहेत).की कॉंग्रेसचे समर्थन करण्याऐवजी मिसळपाववर भाजप समर्थकांची संख्या जास्त आहे म्हणून पुराणमतवादी हा शिक्का तुम्ही मारत आहात? तसा राजकीय मतभेदांसाठी पुराणमतवादी हा शिक्का मारत असाल तर दोन गोष्टी--

१. वर कोणीतरी म्हटले आहे की विरोधी मत सहन होत नसेल तर यांची पर्वा का करावी. ही गोष्ट सर्वप्रथम थत्तेचाचा आणि अतिशहाणा यांना लागू होत नाही का? आणि ही गोष्ट लक्षात न घेता असल्या प्रतिसादांना मार्मिक वगैरे श्रेणी येते हेच श्रेणीपध्दत फेल गेल्याचे लक्षण नाही का?
२. तुम्ही भाजपसमर्थकांना पुराणमतवादी म्हणत असाल तर तुम्हालाही कॉंग्रेस समर्थनाबद्दल इतरांना भ्रष्ट म्हणायचा हक्क का नाही?मिसळपाववरही या कॉंग्रेस समर्थनावर राजकीय टिका थत्तेचाचांवर भरपूर झाली आहे आणि होतच राहिल.तरीही त्यांना भ्रष्ट वगैरे कोणी म्ह्ट्लेले नाही.आणि तसे म्ह्टले तर ते चुकीचेच असेल हे पण सांगतो.हाच तुमच्या भाषेतल्या पुराणमतवादी मिसळपाववरच्या सदस्यांच्या सभ्यतेचा आणि सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही का?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

वर्ची चर्चा थोडी इकडम तिकड्म झालीशी वाटली.
@पुरोगामित्वः उदा-
अ) युटोपिया म्हणूया. इथे आदर्श वगैरे समाज आहे. कुणीही काहीही बोलायला परवानगी आहे. तुमच्या भावना, कल्पना साधना दुखावल्या तर स्वताची पुस्तकंबिस्तकं, सीड्या, गाडी, घर काय वाट्टेल ते जाळायला परवानगी आहे.
ब) मोठोपिया - थोडा कमी पण युटोपियाच. वाट्टेल ते बोला, चाला वगैरे चालेल पण कृती ही कायद्याने मान्य असेल तरच करता येइल.
क) छोटोपिया - काहिही बोलण्या किंवा लिहिण्याआधी इथल्या कुणालाही त्याचा भावनिक, शारिरीक, मानसिक, वैश्विक असा कुठ्लाही त्रास होत नाही ह्याची खात्री करुनच मग विचार मांडा.
अशी उतरती भाजणी वगैरे वगैरे.

एखाद्या forumच्या पुरोगामित्वासाठी "विचार निर्धास्तपणे मांडता येणे" असा निकष ठेवला जाउ शकतो. विचार कसलेही - जुने, नवे, धार्मिक, सामाजिक, विनोदी, राजकीय, पाणचट, अश्लील हे सगळे तपशील झाले.
"विचार मांड्ता येणे" ह्या बेसिक गोष्टीलाच जर विरोध होत असेल, तर मग तो forum किंवा समाज तिकडेच हुकला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने