फलज्योतिषावर आधारलेल्या राजकीय भाकितांचे भवितव्य !
लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष आणि ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी ४ एप्रिल २०१४ रोजी एक पत्रकार परिषद बोलवून देशातील 'मतसंग्रामा'ची बित्तंबातमीचे भाकीत वर्तविले होते. मंडळाच्या कार्याध्यक्ष मालती शर्मा, आनंदकुमार कुलकर्णी, प्रवीणचंद्र मुळे, मेघश्याम पाठक, अरुंधती पोतदार, शांता केकरे, वर्षा नागनाथ आदी या वेळी उपस्थित होते.
नंदकिशोर जकातदार यांनी देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणार्या भारतातील सुमारे चार हजार पत्रिकांचा अभ्यास करून वर्तविलेले भाकित व प्रत्यक्षनिवडणुकीचे निकाल व त्यावरून काढलेले निष्कर्ष खाली दिलेले आहेत.
अंदाज/भाकितं | निकाल | निष्कर्ष |
नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाही | चूक | |
कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही | भाजप 282 | चूक |
काँग्रेसच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही | युती 334+ | चूक |
भाजपला १५५ ते १६५ जागा | 282 | चूक |
काँग्रेसला ११५ ते १२६ जागा | 44 | चूक |
राष्ट्रवादीला ८ ते १० जागा | 6 | चूक |
शिवसेनेला १० ते १२ जागा | 18 | चूक |
समाजवादी पक्षाला १८ ते २२ जागा | 5 | चूक |
बसपाला १६ ते १८ जागा | 0 | चूक |
महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीसारखीच परिस्थिती | चूक | |
आम आदमी पक्षाला अपेक्षित यश मिळणार नाही | बरोबर | |
वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी मोदींना यश मिळेल | बरोबर | |
वाराणसीत त्यांना 'आप'च्या अरविंद केजरीवाल यांची कडवी लढत मिळेल | फरक 371784 | चूक |
एकही सेलिब्रेटी निवडून येणार नाही | बरोबर | |
पुण्यात विश्वजित कदम आणि अनिल शिरोळे यांच्यात अटीतटीची लढत | फरक 315769 | चूक |
विश्वजित कदम यांची सरशी होणार | चूक | |
मुंबईत सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील. | सर्व जागा युतीला | चूक |
मावळला लक्ष्मण जगताप निवडून येणार | बारणे विजयी | चूक |
शिरूरला शिवाजीराव आढळराव पाटील निवडून येणार आहेत | बरोबर | |
नितीन गडकरींना केवळ पाच ते दहा हजार मतानी विजय मिळेल | फरक 284828 | चूक |
येणारे सरकार दोन ते तीन वर्ष टिकणार | वाट पाहू या | |
त्या निवडणुकीतून येणारे सरकार पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल | वाट पाहू या |
माहितीमधल्या टर्म्स
श्री नंदकिशोर जकातदार यांच्या
श्री नंदकिशोर जकातदार यांच्या मते
एकही सेलिब्रेटी निवडून येणार नाही
महाराष्ट्रात महेश मांजरेकर, दीपाली सय्यद, नंदू माधव, राखी सावंत, नवनीत राणा असे सेलिब्रेटी उमेदवार निवडणूक लढवित आहेत. मात्र, एकाही सेलिब्रेटीला विजय मिळणार नाही.
म्हणूनच यासंबंधीच्या भाकिताला बरोबर असे म्हणावे लागले.
दाते पंचांगात विजय केळकरांनी
दाते पंचांगात विजय केळकरांनी वर्तवलेले भाकित पण चुकलेच कि! पहा http://faljyotishachikitsa.blogspot.in/2014/03/blog-post.html
परेश रावलच का? बाकीही निवडून
परेश रावलच का? बाकीही निवडून आलेले आहेत सेलेब्रीटी, जसे की :
हेमामालिनी ( स्वारी, पण मला ही बाई अतिशय मंद वाटते, राजकारणात आणि अजून काय देव जाणे)
किरण खेर
शत्रुघ्न सिन्हा
विनोद खन्ना
(कदाचित वरील नावे हे केवळ सेलेब्रिटी नसून पुर्वीपासूनच राजकीय लोक होते म्हणून तुम्ही त्यांची नावं वेगळ्याने केवळ सेलेब्रिटी म्हणून दिली नसावी).
??
या ज्योतिष्यांना काही येत नाही म्हणून तुम्ही शास्त्राला नावं ठेवू नका ... असं या विषयाबद्दल अजूनपर्यंत ऐकलेलं नाही.
ज्योतिषसमर्थक हेच तर नेहमी म्हणत असतात. क्षयझ ज्योतिषी असे असे म्हणून तोंडावर आपटला म्हटले की त्याच्या मेथडॉलॉजीत फॉल्ट काढणे इ. सुरू होते. कुछ भी करनेका लेकिन (सूडो)शास्त्र को नै हात लगानेका ही मेंटॅलिटी.
ज्योतिषांचे तेच,
ज्योतिषांचे तेच, वैज्ञानिकांचे तेच, शिक्षकही तसेच, राजकारणी तर काय बघायलाच नको, जनता तर चुकाच करत असते, काँग्रेसवाले अडाणी आहेत, संघाबद्द्ल तर बोलुच नका, ऐसीवरच्या पुरोगाम्यांची मते ग्राह्यच नाहीत, प्रतिगामी इथे कोणी नाहितच, समलिंगी संबंधं ठेवणारे आजारी आहेत, भिन्नलिंगी संबंध ठेवणार्यांनी कुटुंबसंस्था उद्ध्वस्त करायचा घाट घातला आहे, गांधीजीतर लैंगिक प्रयोगामुळे महात्मा पदावरून खाली उतरले आहेत.
त्यामुळे सध्या भारतात फक्त दोनच व्यक्तींना काय ती समज व सारे सारे ज्ञान आहे
एक श्री.अरुणजोशी व दुसरे श्री.मोदी!
हो की नै हो!
:) ;)
तेच ते, पण थोड्या सुधारणा
ज्योतिषांचे तेच- Yes, it is utter nonsense.
वैज्ञानिकांचे तेच - Well, yes, an astonishing amount of nonsense is being sold as science.
शिक्षकही तसेच - ?
राजकारणी तर काय बघायलाच नको - Come one, I defend politicians very strongly.
जनता तर चुकाच करत असते - I won't spare them because they are rulers.
काँग्रेसवाले अडाणी आहेत - I never said this. I said Narendra Modi is (virtually) illiterate.
संघाबद्द्ल तर बोलुच नका - Not at all. I have always insisted that RSS should not be a Taboo word.
ऐसीवरच्या पुरोगाम्यांची मते ग्राह्यच नाहीत - Again, I am opposed only to the cynical, extremist progressive.
प्रतिगामी इथे कोणी नाहितच - I am there.
समलिंगी संबंधं ठेवणारे आजारी आहेत - This is how the extremist progressives twist what is said. I have said that it is scientific fact that the homosexuality is result of harmonal imbalance from its normal state.
भिन्नलिंगी संबंध ठेवणार्यांनी कुटुंबसंस्था उद्ध्वस्त करायचा घाट घातला आहे - ?
गांधीजीतर लैंगिक प्रयोगामुळे महात्मा पदावरून खाली उतरले आहेत- The concept of celibacy and purifying oneself by practicing it is a complete rubbish. Gandhiji has escaped due censure for the thoughts and experiments. These facts are not in the knowledge of grass-route people and had they been, the stature of the Mahatma would have been in serious danger.
And there is only one scholarly person on the whole planet- well, your guess is right.
हा विषय अनंतदा चर्चून झालेला
हा विषय अनंतदा चर्चून झालेला आहे.
मनुष्य विद्वान असणे वेगळे नि उत्तम नेता असणे वेगळे. देशाच्या कल्याणाकरिता नेता राज्यकर्ता स्वतःच विद्वान असणे आवश्यक असले तर मोदी ती अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत असे मी म्हटले होते. त्यावर मी कायम आहे.
गुजरातच्या विकासावरच्या प्रश्नांवरील मोदींची उत्तरे ऐकताना ते लक्षात येते.
स्कोर तोच आला असता. कोणत्या
स्कोर तोच आला असता. कोणत्या क्रमाने बेरीज-वजाबाकी करताय याने फायनल उत्तरात फरक पडत नाही.
कोणत्या क्रमाने श्रेणी मिळते याचा नि फायनल श्रेणीचा संबंध आहे का? > आहेदेखील आणि नाहीदेखील. मला अजून नीटसा समजला नाहीय. लॉजीक थोडं काँप्लिकेटेड आहे असं वाटत. सध्या जी श्रेणी दिसतेय ती जास्तीजास्त लोकांनी दिलीय. पण जर दोन मार्मिक आणि दोन विनोदी मिळाल्या तर काय होतं कल्पना नाही.
वैज्ञानिकांचेही तेच असते, पण
वैज्ञानिकांचेही तेच असते, पण दिवस त्यांचे आहेत.
तुम्हाला तथाकथित वैज्ञानिकांचं म्हणायचं आहे का? की स्वघोषित वैज्ञानिकांचं? की स्यूडोवैज्ञानिकांचं? कारण खरोखरच्या वैज्ञानिकांबद्दल तरी ज्योतिषांशी तुलना करण्याचं कारण दिसत नाही.
तुम्ही मोबाइलफोन वापरता. त्यात दर क्षणाला अक्षरशः कोट्यवधी घटना घडतात. आणि त्या सर्व वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी केलेल्या भाकितांप्रमाणे घडतात. नाहीतर मोबाइल फोन चालू शकला नसता. याचा अर्थ तुम्ही एक वापरकर्ते म्हणून क्वांटम मेकॅनिक्स, इलेक्ट्रिसिटी, ध्वनि, सिग्नल प्रोसेसिंग, स्पेशल रिलेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन-प्रोटॉन मॉडेल, थर्मोडायनॅमिक्स वगैरे विज्ञानाच्या अनेक शाखांमध्ये शेकडो शास्त्रज्ञांनी लावलेले शोध बरोबर आहेत की नाहीत हे तपासून पाहता. आणि तुमच्या लक्षात येतं की नाही माहीत नाही, पण ते सगळे बरोबर आहेत. कारण तुमचा सेलफोन चालतो. प्रत्यक्षात पलिकडून आवाज येतो, आणि तुमचा आवाज पोचतो! तुम्ही बोललेल्या लाखो सेकंदात, कोट्यवधी वेळा जे बरोबर आलेलं आहे त्याची तुलना धड एक भाकित बरोबर न येणाऱ्या ज्योतिषांबरोबर करता हे दुर्दैवी आहे.
विधानं करताना जपून करावीत. तशाही भाषेमध्येच त्रुटी आहेत, त्यामुळे अर्थ पलिकडे पोचायला त्रास होतो. मग तुम्ही इतकी त्रोटक विधानं केलीत तर आणखीन गैरसमज होण्याची शक्यता नाही का?
सर्व आशयाशी शतशः सहमत. कारण
सर्व आशयाशी शतशः सहमत.
कारण खरोखरच्या वैज्ञानिकांबद्दल तरी ज्योतिषांशी तुलना करण्याचं कारण दिसत नाही.
याच्याशी विशेष सहमत.
मानवी कल्याणासाठी विज्ञानाचा प्रचंड प्रचार, विस्तार नि स्वीकार झाला पाहिजे असे माझे करारा मत आहे. पण बॅटमॅनला सांगीतल्याप्रमाणे मला सिडो-वि़ज्ञान म्हणायचे आहे. यातही वैज्ञांनिकावर माझा काहीही आक्षेप नाही (किंवा अल्प आहे). अतिशहाणे वैज्ञानिक विचारसरणी म्हणवणारे लोक नि इल माईंडेड- कॉमर्शियल इंटरेस्ट्स हे आहेत. कृपया गैरसमज नसावा.
+१
+१
हे नेमकं लिहिलत.
नाहीतर इतकं व्यवस्थित आम्हाला लिहिता यायचं नाही आणि ते थेट विज्ञानाचीच अक्कल काढू लागले
की चिडचिड व्हायची, त्रागा व्हायचा.
नंतर त्या मुद्द्यांवर प्रतिवाद करणच सोडून दिलं. मनःशांती लाभली.
तुमचा प्रतिवाद नेमका, थोडक्या शब्दांत आणि तरीही चपखल वाटला.
इथे...
इथे फलज्योतीष्यावर विश्वास ठेवणारे किंवा त्याचे समर्थक जवळजवळ नाहीच हो.
त्यामुळे चुकीच्या मंचावर येऊन उगाच तेच तेच मुद्दे वापरुन लेख पाडण्यात काही हशील नाही.
त्यापे़क्षा तुमचे निष्कर्ष बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळाकडे पाठवा. तिथे तुमची खरी गरज आहे.
अवांतर : आणि हे निष्कर्ष काढण्यासाठी ज्योतीषांनी आपल्या आयुष्याची इतकी वर्षे का वाया घालवावी हे कोडे उमगत नाही. त्यापेक्षा पोपटापुढे चिठ्ठ्या टाकून झटपट जवाब मिळविता आला असता की !
या गुन्ह्याला माफी नसावी! :D
ल्याटिनमध्ये '-us', '-a' आणि '-um' हे (अनुक्रमे) पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी प्रत्यय आहेत ना? (चूभूद्याघा.)
थोडक्यात, (बातमीतले) 'वाजपायुम', 'अडवाणुम' आणि 'नरेन्द्रुम मोदुम' हे अनुक्रमे 'Vajpayus', 'Advanus' आणि 'Narendrus Modus' असे असावयास हवेत ना? (घोडचूभू आगाऊ द्याघ्या.)
(अतिअवांतर: नोस्त्रोदामसचे ल्याटिन बहुधा इतकेही कच्चे नसावे, अशी अटकळ आहे.)
केवळ वावडी?
नॉस्ट्रडॅमसची ही तथाकथित भविष्यवाणी हा एकतर खोडसाळपणाचा नमुना असावा किंवा interested गटांकडून retrofitted आणि manufactured असावा असे वाटते.
फ्रानस्वा गॉतिए ह्या फ्रेंच पत्रकाराच्या येथील ब्लॉगवरून ह्या सर्व कथानकाला प्रारम्भ होतो. ब्लॉगमध्ये Bamprelle de la Rochefoucault नावाच्या फ्रेंच विद्वानास एका जुन्या पेटार्यामध्ये नॉस्ट्रडॅमसची ही लॅटिनमध्ये लिहिलेली ही भविष्यवाणी सापडली असे आणि इतकेच लिहिले आहे. ह्या 'भविष्यवाणी'चा उगम नॉस्ट्रडॅमसपर्यंत कसा पोहोचविला ह्याबाबत पूर्ण मुग्धता बाळगली आहे. 'Bamprelle de la Rochefoucault' ह्या नावाचा गूगलमध्ये शोध घेता एकहि धागा मिळाला नाही. अशा नावाचा कोणी फ्रेंच विद्वान खरोखरीच होता अथवा आहे ह्याविषयी सम्भ्रम निर्माण होतो. तोच अस्तित्वात नसला तर लॅटिन उतार्याच्या अस्तित्वाबाबतहि शंका येते.
फ्रानस्वा गॉतिए ह्यांची जी माहिती विकिपीडियावर मिळते त्यावरून त्यांचे हिन्दुत्वधार्जिणेपण कळून येते. हिन्दुत्वाची त्यांनी करियरच केल्यासारखे दिसते. श्री श्री रविशंकर नावाच्या साधु/बुवा ह्यांच्याबाबत फ्रानस्वा गॉतिए ह्यांना विशेष ममत्व वाटते असे दिसते.
एकंदरीने पाहता ही 'भविष्यवाणी' हा हेतुपुरःसर केलेला प्रकार आहे असे मानण्याकडे माझा कल आहे.
खरेतर
या लेखावरून माझा उलट ज्योतिष्यावर विश्वास बसेल. याच कारण म्हणजे वर वर पाहता जरी ज्यास्त भाकिते चुकली आहेत तरी आपण जर याचा रिसिवर ऑपरेटींग कॅरेक्टरिस्टिक कर्व्ह काढला तर आपल्याला असे दिसून येईल की ज्योतिष्याच्या भाकितांचा बिंदू डायागोनल रेषेच्या बर्याच खाली येतो. जर त्याचा मिरर पॉईंट घेतला तर तो खूपच चांगला प्रेडिक्टर असेल.
किंवा साध्या सरळ भाषेत, ज्योतिष्याने जे काहीही भविष्य सांगितले असेल त्याच्या बरोब्बर उलटे होणार असे भाकित आहे असे मानायचे. असे मानता आपल्याला असे दिसून येईल कि हा ज्योतिष्यी खूप सातत्याने बरोबर भकित वर्त् वू शकतो. हा आता जर त्याने ५०% बरोबर भाकिते सांगितली असती तर मग मात्र तो अगदीच कंडम ज्योतिष्यी आहे.
बोले तो बडे मियां जॉर्ज कस्टांझा केह के गये है ना - डू द ऑपोझिट
म्हणूनच एक आकडी लॉटरी खेळणारे
म्हणूनच एक आकडी लॉटरी खेळणारे लोक अपोझिट मारतात. मटका ज्योतिषात त्याचा उल्लेख आम्ही केला आहे पहा या ज्योतिषाचे काय करायचे?
यातलं शास्त्रिय काय हे
यातलं शास्त्रिय काय हे सामान्य माणसानी कसं ठरवायचं?
तत्वतः एखादा प्रश्न सोडवता येत असला तरी तो सोडवण्यासाठी इतकी शक्ती लागते की जवळपास तो सोडवणं व्यावहारिकदृष्ट्या अशक्य ठरू शकतं. मला वाटतं की ओपिनियन पोल्सवरून निवडणुकांच्या आधी निकाल ओळखणं हे या गटात येतं. कारण
- महिनाभर आधी लोक जे सांगतात त्यापेक्षा प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी वेगळं वागू शकतात.
- ८० कोटी लोक काय करतील हे समजून घेण्यासाठी २० हजारचं सॅंपल पुरेसं नसावं.
- मतांची टक्केवारी जास्त अचूकपणे सांगता येते. पण या टक्केवारीवरून जागांचा अंदाज बांधणं कठीण असतं. (पु्न्हा, सॅंपल कमी पडतं)
एक्झिट पोलच्या बाबतीत पहिली अडचण नसते. (दुसरी आणि तिसरी अडचण लागू पडते) कारण काय होईल, यापेक्षा काय झालं याचे अंदाज बांधायचे असतात. त्यामुळे हा प्रश्न 'तत्वतः सोडवण्यासारखा, पण पुरेशी शक्ती न वापरल्यामुळे अंदाधुंद उत्तरं' या गटात येतो. मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की सर्वच ओपिनियन पोल्सपेक्षा जवळपास सर्वच एक्झिट पोल्सची उत्तरं अधिक बरोबर आली. सॅंपल अधिक मोठं वापरलं गेलं हे एक कारण असेल.
तेव्हा शास्त्रीय पद्धत वापरूनही जर ती पुरेशा रिगरसली वापरली नाही तर पुरेसं बरोबर, समाधानकारक उत्तर मिळेलच असं नाही.
एक उदाहरण देतो. एका माणसाने म्हटलं की मी ही जादूची कांडी फिरवली की तुमचं पीक दीडपट होईल. अर्थात ती फिरवून काही उपयोग झाला नाही. दुसऱ्याने म्हटलं 'हे खत टाका, याची शास्त्रीय पद्धतीने चाचणी झालेली आहे, पीक दीडपट होईल.' मात्र शेतकऱ्याने एक एकराला टाकायचं खत दहा एकराला टाकलं. पीक ५-१०%च वाढलं. आता या दोन पद्धतींपैकी शास्त्रीय पद्धत कुठची? जर खरोखरच त्या खताची यथायोग्य चाचणी होऊन त्यामुळे पीक वाढतं हे वेगवेगळ्या पद्धतीने सिद्ध झालेलं असेल तर दुसरी पद्धत अर्थात शास्त्रीय आहे. मात्र त्या खताचा परिणाम होण्यासाठी ते योग्य पद्धतीने वापरलं गेलं पाहिजे हेही तितकंच खरं.
माझा असा अंदाज आहे की पाच वर्षांनी जेव्हा निवडणुका होतील तेव्हा अधिक चांगले अंदाज येण्यासाठी सॅंपल साइझ वाढेल, आणि त्याचा परिणाम दिसून येईल.
सँपल कमी नाही...
वरील प्रतिसादात "सँपल कमी पडते" असे एखाद-दोन मुद्द्यांबाबत लिहिलेले आहे.
८० कोटी लोकांत वीस हजाराचे सँपल बहुधा पुरेसे आहे, पण ते सँपल सुयोग्य असले पाहिजे. म्हणजे योग्य त्या प्रकारे प्रातिनिधिक (रिप्रेझेंटेटिव्ह) किंवा योग्य त्या प्रकारे यादृच्छिक (रँडम).
भारताबाबत नीटसे ठाऊक नाही, आणि एक्झिट पोल कसे करतात तेही तपशीलवार ठाऊक नाही. पण एक वेगळे उदाहरण देतो : अमेरिकेत पूर्वी यादृच्छिक-आकडे-वापरून-टेलिफोन-लावणे पद्धतीने पूर्वी सँपले मिळवत. परंतु येणारा नंबर बघून टेलिफोन न उचलण्याची सुविधा जशी पसरू लागली, वा अमुक-इतका-आकड्यांचा-ब्लॉक मोबाईलकरिता, असे ठरू लागले, तेव्हा फरक पडला. विवक्षित प्रकारचे लोक टेलिफोन उचलेनात. त्यामुळे सँपल प्रातिनिधिक आणि यादृच्छिक राहिले नाही. जर एखाद्या प्रश्नासाठी या प्रकारचा "बायस" महत्त्वाचा असेल, तर काय होईल? निव्वळ संख्या म्हटली तर पूर्वीही पुरेशी होती, आताही आहे; परंतु पूर्वी अन्बायस्ड मध्यवर्ती उत्तर मिळत असे, तर आता मध्यवर्ती उत्तर एका बाजूला झुकलेले असते. संख्या वाढवली तरीही मध्यवर्ती उत्तर एका बाजूला झुकलेलेच राहील. आणि अशी भाकिते उत्तरांची संख्या पुष्कळ वाढली तरीही चुकीची निघतील.
कधीकधी यादृच्छिक/प्रातिनिधिक सँपल वेगळ्या विश्वाचे असते, आणि निवडणूक वेगळ्या विश्वात असते - हे अमेरिकेत दिसते, की काही लोक मते देण्याबाबत अनुत्साही असतात, त्यांना सुटी नसते, वगैरे, वगैरे. अशा लोकांना प्रश्न विचारला, आणि त्यांचे सरासरी मत उत्साही लोकांपेक्षा वेगळे असले, तर सर्वेक्षणाचा निकाल चुकीचा निघतो - कारण सर्वेक्षण संभाव्य मतदारांकरिता प्रातिनिधिक असण्याचे सोडून नागरिकांकरिता प्रातिनिधिक असते - निवडणूकीचा निकाल मात्र मतदार लावतात. (एक्झिट पोल मध्ये हा दोष येत नाही, कारण मत देणारे लोकच सर्वेक्षणात भाग घेतात.)
कधीकधी लोकसंख्येचे सुयोग्य ज्ञान असले, तर यादृच्छिक नसून प्रातिनिधिक सँपल निवडता येते. उदाहरणार्थ ज्या मतदारसंघांमध्ये चुरस अटीकटीची आहे, तिथे अधिक सँपल मिळवावे, आणि ज्या मतदारसंघांत स्पर्धा एककल्ली आहे, तिथून कमी सँपल निवडता येते. ज्याठिकाणी शेजार-शेजारच्या मतदारसंघांत एकसारखे जनमत असते (कोरिलेटेड) अशा ठिकाणी मिळून सँपल निवडता येते : म्हणजे या दोन मतदारसंघांत मिळून सर्व-मतदारसंघ-सरासरी सँपलपेक्षा दुप्पट नव्हे, तर थोडे कमी (जेणे करून वाचलेला पैसा अन्यत्र मतामतांचा गलबला असलेल्या मतदारसंघात अधिक सँपल मिळवण्यात खर्च करता येतो.
भारतात सुयोग्य सँपल ठरवायचे आणि मिळवायचे तंत्र अजून विकसितच होत आहे, असे वाटते. म्हणून भाकिते कधी लागतात, तर कधी हुकतात.
सॅंपल
सँपलविषयी थोडीशी भर :-
लोकसंख्या खूप वाढली तरी सँपल लागलीच तितक्या प्रमाणात वाडह्वावा लागतो असे नाही.
सँपलच्या आकड्याचा वर्ग हा एकूण आकड्याच्या थेट प्रपोर्शन मध्ये असतो.
म्हणून लोकसंख्या चौपट झाली कीम्वा मतदार चौपट झाले तरी सँपलही चौपटच करावे लागतील असे नव्हे;
प्रोव्हायडेड सँपल पुरेसे प्रातिनिधिक असले पाहिजेत.
सॅंपल प्रातनिधिक असावं
सॅंपल प्रातनिधिक असावं याबद्दल वादच नाही. मर्यादित गटांचंच प्रतिनिधित्व करणारं सॅंपलचा आकार वाढवूनही उत्तरं चूकच येणार हेही माहीत आहे. मात्र माझा मुद्दा
८० कोटी लोकांत वीस हजाराचे सँपल बहुधा पुरेसे आहे, पण ते सँपल सुयोग्य असले पाहिजे. म्हणजे योग्य त्या प्रकारे प्रातिनिधिक (रिप्रेझेंटेटिव्ह) किंवा योग्य त्या प्रकारे यादृच्छिक (रँडम).
याबाबत मला खरोखर शंका आहे. कदाचित जिथे केवळ दोनच पर्याय आहेत तिथे पुरेसं होत असेल. म्हणजे अमेरिकन अध्यक्षीय पद्धतीसाठी कदाचित पुरेसं असावं. तिथेही एका विशिष्ट राज्यात बहुमत आहे की नाही एवढंच ठरवायचं असतं. त्यासाठी आख्ख्या राज्यातली मिळून शंभरेक लोकं पुरत असावीत. कारण उत्तर 'हो अथवा नाही' किंवा 'हा उमेदवार वा तो उमेदवार' असं असतं. अशा बायनरीपणामुळे मतांची टक्केवारी ओळखता आली की त्यावरून पुढचा निष्कर्ष काढणं सोपं जातं. भारतातदेखील सर्वसाधारणपणे मतांच्या टक्केवारीचे राज्यनिहाय अंदाज एक्झिट पोल्समधून ठीकठाक येतात. पण काही ठिकाणी दुरंगी, काही ठिकाणी तिरंगी, काही ठिकाणी चतुरंगी निवडणुका असल्यामुळे टक्केवारीवरून जागांच्या संख्येचा अंदाज बांधणं हे महाकठीण असतं.
त्यामुळे भारतात कुठच्या पक्षाला किती जागा मिळणार याचं उत्तर राज्य पातळीवर मिळालेल्या मतांच्या संख्येवरून काढता येत नाही. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये कोण जिंकणार याचा अंदाज बांधणं आवश्यक ठरेल. सरासरी १५ लाखांच्या मतदारसंघाला फक्त ३५ प्रातिनिधिक मतं पुरेशी नाहीत हे उघड आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातला फरक आणखीन असा येतो की मतदारसंघातलं वैविध्य महाप्रचंड आहे. त्यामुळे प्रत्येक डेमोग्राफिकमधली 'काही' मतं घ्यायची झाली तर दर मतदारसंघाला ३५ लोक पुरत नाहीत. त्यामुळे कितीही 'सुयोग्य' सॅंपलिंग असलं तरीही प्रत्येक डेमोग्राफिक अल्पप्रतिनिधत राहतो. या कारणासाठी दर मतदारसंघातून किमान १०० ते २०० लोक निवडावेत जेणेकरून अधिक सुयोग्य सॅंपल साधता येईल.
थोडक्यात नॉनहोमोजेनिटी, मल्टीप्रॉंग्ड रेसेस + फर्स्ट पास्ट द पोस्ट यामुळे सुयोग्य सॅंपलसाठी संख्या वाढवणं आवश्यक आहे, असा माझा दावा आहे.
पुरेलसे वाटते
वरील शंकांवर मनन करूनही असे वाटते, की २०,००० पुरेसे असतील.
> त्यासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये कोण जिंकणार याचा अंदाज बांधणं आवश्यक ठरेल.
"प्रत्येक" अधोरेखन माझे. असे नव्हे. राष्ट्रीय संसदेची गोष्ट करत असू, तर राष्ट्रीय पक्ष आणि आघाड्यांबाबतच्या भकितांचा ताळा जमवू. उदहरणार्थ "क्ष" आघाडीला किती जागा मिळतील? असा प्रश्न असू शकेल. काही मतदरसंघांत स्खलन एका बाजूला असेल, तर काही मतदारसंघांत स्खलन विरुद्ध बाजूला असेल. असे केल्यामुळे "प्रत्येक" मतदारसंघाकरिता भकित बरेच मोघम असले तरी संसदेत "क्ष" आघाडीला मिळणार्या एकूण जागांच्या बाबतीत तितकेसे मोघम राहत नाही.
> अमेरिका आणि भारत यांच्यातला फरक आणखीन असा येतो की मतदारसंघातलं वैविध्य महाप्रचंड आहे.
हे तितकेसे बरोबर वाटत नाही. या वेलचा नकाशा बघितला, तर असे दिसते, की शेजार-शेजारचे मतदारसंघ पुष्कळदा एकसारखे निकाल देतात. त्यामुळे निकाल-नकाशा प्वांतियिस्त बिंदु-चित्रासारखा दिसत नाही, तर जाडजूड ब्रशने फराटे मारलेल्या चित्रासारखा दिसतो.
> त्यामुळे कितीही 'सुयोग्य' सॅंपलिंग असलं तरीही प्रत्येक डेमोग्राफिक अल्पप्रतिनिधत राहतो.
मला वाटते, की हा मुद्दा तितकासा ठीक नाही. कदाचित "प्रत्येक" शब्द वापरायचा नसेल, पण "अनेक-विवक्षित-पण-प्रत्येक-नव्हेत" असे म्हणायचे असेल. पण हा बदल करूनही मुद्दा पटत नाही. जे विवक्षित गट अल्पप्रतिनिधित राहातात, त्यांची मते न-कळल्यामुळे जे गट-निहाय स्खलन असते, ते एकाच बाजूला असते, की कधी एका बाजूला, तर कधी उलट्या बाजूला असते? कारणे स्खलने दोन्हीकडे असली, आणि अन-कोरिलेटेड असली, तर अशी खूप स्खलने झाली, तरी अखेरचा आकडा बर्यापैकी घट्ट असू शकतो.
असे केल्यामुळे "प्रत्येक"
असे केल्यामुळे "प्रत्येक" मतदारसंघाकरिता भकित बरेच मोघम असले तरी संसदेत "क्ष" आघाडीला मिळणार्या एकूण जागांच्या बाबतीत तितकेसे मोघम राहत नाही.
हे तत्वतः बरोबर आहे. पण माझा आक्षेप तो काहीसा तांत्रिक आहे. मोघमता कमी होण्याचा फायदा मिळून मतांची टक्केवारी अधिक विश्वासार्ह होते. मात्र टक्केवारीवरून जागांची संख्या शोधून काढणं हे महाकर्मकठीण काम आहे. त्यामुळे एक्झिट पोल्समध्ये टक्केवारी योग्य पण जागांचे अंदाज चुकलेले असं चित्र दिसलेलं आहे. (एक चाणक्यचा अपवाद वगळता). इथे वेगवेगळ्या एक्झिट पोलनी मोजलेली उत्तर प्रदेशातली आकडेवारी आणि त्यांचे जागांचे अंदाज दिलेले आहेत.
आता उत्तर प्रदेशमध्ये कोण जिंकणार? या प्रश्नाचं उत्तर सर्वच पोलकर्त्यांचं बरोबर आहे, पण कोणाला किती जागा मिळणार याचं उत्तर साफ चुकलेलं आहे. शिवाय मतांची टक्केवारी बरोबर आलेली आहे. याचा अर्थ असा की उत्तर प्रदेशात जे सॅंपल निवडलेलं होतं ते बऱ्यापैकी सुयोग्य होतं. नाहीतर मतांची टक्केवारी चुकली असती. पण प्रत्येक जागेसाठी लोक न निवडता, अनेक जागांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या काही जागाच निवडल्या हे चुकलं असावं. आता याला कोणीतरी 'सुयोग्य सॅंपल नाही' असं म्हणू शकेल. पण ही अयोग्यता पुन्हा संख्यात्मकच आहे.
यातलं शास्त्रिय काय हे
यातलं शास्त्रिय काय हे सामान्य माणसानी कसं ठरवायचं?
एज्झिट पोल्स कसे घेतले जातात, त्यामागचे तर्क, स्टॅटिस्टिकल प्रक्रिया वगैरेंबद्दल माहिती उपलब्ध आहे. ते अचुक असतील असे नाही - नसतातच - ती ने व्यक्त करणार्यांचा तसा दावाही नाही!
भविष्यातील शक्यतेच्या जवळ जाण्याचा ते प्रयत्न करत असतात. चुका झाल्यास त्या मान्य करत आपल्या पद्धतीत बदल घडवत ती अधिक सुयोग्य करण्याचा प्रयत्न हे पोल्सवाले करताना दिसतात.
ज्योतिषांचे तथाकथित शास्त्र गुप्त आहे. जे उघड आहे, ते एकमेकांशी सारखे नाही किंवा प्रसंगी परस्परविरोधी आहे. तिथे चुका झाल्यास त्याची जबाबदारी घेणारे कोणी नाही व त्या मान्यही केल्या जात नाहीत. या क्लृप्तीत (किंवा तथाकथित शास्त्रात) बदल वगैरे करण्याचा प्रश्नच येत नाही.
तेव्हा/तरीही या दोन्हीत अधिक शास्त्रीय काय? हा प्रश्न का पडावा याचे आश्चर्य वाटले!
(एकवेळ ज्योतिष नी होमियोपथीत अधिक शास्त्रीय काय से विचारले असते तर अधिक मजा आली असती ;) )
दुरुस्ती
एज्झिट पोल्स कसे घेतले जातात, त्यामागचे तर्क, स्टॅटिस्टिकल प्रक्रिया वगैरेंबद्दल माहिती उपलब्ध आहे. ते अचुक असतील असे नाही - नसतातच - ती ने व्यक्त करणार्यांचा तसा दावाही नाही!
भविष्यातील शक्यतेच्या जवळ जाण्याचा ते प्रयत्न करत असतात. चुका झाल्यास त्या मान्य करत आपल्या पद्धतीत बदल घडवत ती अधिक सुयोग्य करण्याचा प्रयत्न हे पोल्सवाले करताना दिसतात.
हे सगळं पाश्चात्त्य (सौर पंचागाप्रमाणे चालणार्या ) ज्योतिषातही करता येतं असा त्या पद्धतीच्या पब्लिकचा दावा आहे.
ऐसीकर तर्कतीर्थ व मिपाकर युयुत्सु हे ह्याबाबतीत काही लिहीत असतात.
दरवेळी नवनवीन गोष्टी सांख्यिकीच्या आधारे शास्त्रात कशा सामील करुन घेता येतात हे ते लिहीत असतात.
त्यामुळेच :-
ज्योतिषांचे तथाकथित शास्त्र गुप्त आहे. जे उघड आहे, ते एकमेकांशी सारखे नाही किंवा प्रसंगी परस्परविरोधी आहे. तिथे चुका झाल्यास त्याची जबाबदारी घेणारे कोणी नाही व त्या मान्यही केल्या जात नाहीत. या क्लृप्तीत (किंवा तथाकथित शास्त्रात) बदल वगैरे करण्याचा प्रश्नच येत नाही.
हे तिथे लागू होणार नाही, असे वाटते. त्यांचे शास्त्र गुप्त नाही.
अतिशहाणा ऊर्फ आजानुकर्ण ह्यांनीही कृष्णमूर्ती पद्धतीने कुणीही ज्योतिष पाहू शकतो; (त्यांनी स्वतः पाहिले आहे)
ह्यात गुप्त असे काही नाही असे मागे लिहीले होते.
डिस्ल्केमर १ :-
अर्थात ह्या सगळ्याचा अर्थ ते काहीतरी लै भारी आहे; किंवा ज्योतिसहत फार काही तथ्य आहे; असे
मी म्हणतो आहे असा घेउ नये.
त्यात तथ्य आहे किंवा नाही ह्याबद्दल मी काहीही भाष्य ह्या प्रतिसादात केलेले नाही.
(एकवेळ ज्योतिष नी होमियोपथीत अधिक शास्त्रीय काय से विचारले असते तर अधिक मजा आली असती )
इथेही झोल आहेच. मोठ मोठी लोकं "होमिओपथी नावाचे थोतांड - वैज्ञानिक गोष्ट " असे सांगतात.
पण मागे मीमराठी ह्या सायटीवर अशोक कुलकर्णी ह्या मॉडर्न मेडिसीनच्या डॉक्टरांनीच होमिओपथिकनं
चमत्कार म्हणता यावा असा अनुभव आल्याचे सांगितले. ते स्वतः फुल्ल टैम "अॅलोपथिक " डॉक्टर आहेत.
आम्ही आम पब्लिक संभ्रमित होतो; ते असे परस्परविरोधी दावे पाहिल्यामुळे.
डिस्ल्केमर २ :-
ह्याचा अर्थ मी होमिपथीचा फ्यान आहे असा घेउ नये. पब्लिक डॉ च्या म्हणण्यावर सहज विश्वास ठेवते. असे डॉ काही म्हणत
असतील तर त्यांच्या म्हणण्यात तथ्य असण्याची शक्यता पब्लिक गृहित धरते.
सार्यांनाच सार्याच गोष्टीतले सारेच कळते असे नाही. कुठेतरी काही बाबतीत तरी विसंबून राहणे भाग आहे.
माझा प्रश्न समजला नसावा.
माझा प्रश्न समजला नसावा. एखाद्या म्हातार्या माणसाचं उदाहरण घ्या. त्याचा ज्योतिष वगैरेंवर भरपूर विश्वास आहे. आपल्याला संख्याशास्त्राबद्दल माहिती आहे, पण त्याला सँपल, सीट प्रोजेक्शन वगैरेंचा गंध नाही. त्याला काय दिसणार?
माझा मुद्दा आहे की जोपर्यंत भरपूर अचूकता येणार नाही एक्सिट पोल/ ओपिनिअन पोल्स मध्ये तो पर्यंत हीच मेथड शास्त्रिय आहे आणि ज्योतिष बोगस आहे यावर त्याचा विश्वास बसणं अवघड आहे
माझा मुद्दा आहे की जोपर्यंत
माझा मुद्दा आहे की जोपर्यंत भरपूर अचूकता येणार नाही एक्सिट पोल/ ओपिनिअन पोल्स मध्ये तो पर्यंत हीच मेथड शास्त्रिय आहे आणि ज्योतिष बोगस आहे यावर त्याचा विश्वास बसणं अवघड आहे
तत्वतः मान्य आहे.
या शास्त्रीय लोकांनी आपल्या मनोर्यातून बाहेर पडून लोकांना भेडसावणार्या प्रश्नांवर उत्तरे दिल्याशिवाय, त्यांना मानसिक आधार दिल्याशिवाय (समुपदेशन वगैरे), त्यांचा ज्योतिषावरचा विश्वास उठणे कठिण आहे.
कसे काय?काही शंका, भिती,
कसे काय?
काही शंका, भिती, गंड, प्रॉब्लेम्स वगैरे असताना ज्योतिषाकडे जाणार्या लोकांनी मानसोपचार तज्ज्ञ म्हणा किंवा त्या क्षेत्रातील शास्त्रीय माहिती असणारे तज्ज्ञ म्हणा त्यांच्याकडे जाऊन समुपदेशन करून घेणे हे ज्योतिषाकडे जाण्यापेक्षा भयंकर इलाज कसा?
लोकांना आपल्या रोजच्या प्रश्नांत एका धाराची व समुपदेशनाची गरज असते. ज्योतिषि ती गरज भागवताना, आपले दुकान चालावे म्हणून त्यात कर्मकांडे, भिती यांचा असा बेमालूम वापर करतो की जे 'जातक' त्या प्रश्नांतून सुटण्याऐवजी त्यात अडकत जातात. योग्य तज्ञ्ज्ञाकडून (काही सेसमध्ये तर मानसोपचार तज्ज्ञाकडून) उपाय व समुपदेशन अधिक योग्य मार्ग ठरावा असे मला वाटते.
+१११११११११११११११११११
'बौद्धिक मध्यमवर्ग' एकतर अस्तित्वातच नसणे किंवा अतिशय नगण्य प्रमाणावर असणे हे भारताचे प्रमुख दुखणे आहे. अन हे निव्वळ भारतीय भाषांपुरतेच मर्यादित नाही. भाषा कुठलीही असो, भारतीयांनी भारतात वाचले जावे म्हणून अशा प्रकारचे किती लेखन असते आणि त्याचा यूजरफ्रेंडलिनेस किती असतो हे जर पाहिले तर वरील विधान हे इंग्रजीसाठीही तितकेच खरे ठरावे-अर्थात भारतीयांनी केलेल्या इंग्रजी लिखाणापुरतेच म्हंटोय.
ज्योतिषि ती गरज भागवताना,
ज्योतिषि ती गरज भागवताना, आपले दुकान चालावे म्हणून त्यात कर्मकांडे, भिती यांचा असा बेमालूम वापर करतो की जे 'जातक' त्या प्रश्नांतून सुटण्याऐवजी त्यात अडकत जातात
अंशतः खरे आहे. हा अंश किती हा वादाचा मुद्दा आहे. कुठल्याही व्यवसायात अपप्रवृत्ती असतातच. त्यामुळे हे अन्य व्यवसायात देखील हे घडत असते. पुर्वी डॉक्टरांना देवासमान मानत होते. आता त्यांची प्रतिमा लुटारु वा कसाई अशी झाली आहे.
New research says drunk driving increases life expectancy
संख्याशास्त्रातली गंमत पहायची तर हे फेकिंग न्यूजची बातमी पहावी.
http://www.fakingnews.firstpost.com/2014/05/new-research-says-drunk-dri…
************************बातमी सुरु********************
New research says drunk driving increases life expectancy
New Delhi. According to a recent research carried out by DADI (Drink and Drive Institute), drunk driving can actually increase your life expectancy. Earlier it was thought that drunk driving causes fatal accidents, thus shortening life expectancy.
Persuasive enough.
As per statistics cited in the research, 84.56% of all accident victims were non-drinkers, whereas only 15.44% were drunk. Furthermore, only 2% of 15.44% were found dead while death toll was up to 25% of 84.56% in cases of non-drinkers. All in all, your chances of death are negligible if you drink and drive.
DADI researchers are under severe scrutiny after release of this report. According to the DADI dean, they do not tend to promote drink and drive. They only collected the statistics, and like always, people can draw their own conclusions.
“We carried out this study for the safety of human race. We studied all cases of road accidents, especially those with fatalities, and came up with these numbers. We found that in most cases, people died due to extreme injuries or heart attacks,” explained P K shah, the Dean of Drink and Drive institute.
When this Faking News reporter talked to a youth who was newly addicted to drunk driving, he explained, “That’s why we always say after drinking ‘Gaadi toh mein hi chalunga’ (I will drive no matter what!!). We are always confident of our abilities.”
“We never trust non-drinkers, because they are hypocrites,” he claimed while making the second peg.
Meanwhile, Arvind Kejriwal has accused Salman khan of being behind the report.
************************बातमी समाप्त********************
शास्त्र, शास्त्रापन नि भाकड
१. शास्त्र वा सायन्स वा विज्ञान हा शब्द जरा काळजीपूर्वक वापरला पाहिजे. सार्या शास्त्रीय नियमांचा एक संदर्भ असतो. शिवाय नियमापूर्वीची काही स्पष्टोक्त वा काही अध्याहृत गृहितके असतात. हे सगळे सुस्पष्ट झाले कि नियमाला नियम म्हणायला अजून काही दिव्यांतून जायला लागते, जसे कि तो रिपिट डेमाँस्ट्रेट करता आला पाहिजे, इ. इ.
शास्त्राच्या संदर्भ चौकटीवर, गृहितकांवर तसेच नियमाच्या इतर सर्व निरीक्षणांशी असलेल्या / नसलेल्या सुसंगततेवर वाद घालायच्या फंदात सामान्य माणसाने पडू नये.
२. शास्त्रापन म्हणजे अप्लिकेशन ऑफ सायन्स. शास्त्राचा नियम अगदी १००% खरा आहे असे मानले तरी त्याची प्रायोगिक सिद्धता देताना इरर मार्जिनच्या अडचणी येतात. इथे अगदी शून्य अचूकता नाही म्हणून नियमच खोटा आहे असा आग्रह सामान्य माणसाने करू नये.
उदाहरणे -
अ. पोलिओचे निर्मूलन झाले नाही म्हणून लस बिनकामी आहे म्हणणे.
आ. अणुस्फोटाची यिल्ड नीट न मोजता आली नाही म्हणून E=mC^2 चूक आहे असे म्हणणे.
इ. एक्झीट पोल चूकीचा वा इनॅक्यूरेट आला म्हणून गणित वा सांख्यिकीची 'सूत्रे' चूक आहेत असे म्हणणे.
३. वि़ज्ञानाच्या बाबतीत कॅलिब्रेशन पॅरोडीक्स नावाचा एक प्रकार असावा. परवा तीन मिलियन कि बिलियन वर्षांत एक सेकंद(च) चूक करणारे अॅटॉमिक घड्याळ, क्ष, बनवले आहे म्हणून बातमी आली. आता हे इतके अक्यूरेट आहे हे सांगायला त्यापेक्षा चांगले घड्याळ, य, लागेल. ते, य, जर असलेच, तर मग ३ मिलियनवाल्या क्ष असण्याला अर्थ काय? आणि जगात दुसरे चांगले घड्याळ नसले तर मला तीन मिलियन वर्षांनी कसे कळणार कि क्ष घड्याळ इतका वेळ नीट चालले आहे? कोणत्याही शास्त्रापनाचा इरर हा इनहेरन्ट भाग असावा. आणि तो शास्त्रापन न व्हावे असे म्हणण्याचे कारण नसावे.
४. विज्ञान जरा विथ पिंच ऑफ सॉल्ट घ्यावे. Last year a meteor passed from under the geosyncronous satellites and just above the GPS satellites. It was of size of a sphere like football stadium, and speed more than 10 km/s. नासाचा एक इंडेक्स असतो त्याप्रमाणे ही घटना लै डेंजर होती नि अजून पुढे फोरसीएबल फ्यूचर मधे तरी होणार नाहीय. त्या रात्री लोक सगळे आरामात झोपले, कोणाला काही फरक पडला नाही. सगळे वर्तवल्याप्रमाणे झाले. माझा तर 'आम्ही कॉमेट, इ वर जाणार', 'टक्कर संभव असेल तर तुकडे करणार', 'रॉकेट लावून पाथ डायवर्ट करणार' 'तिथून उर्जा, द्रव्ये आणणार' इ इ वर ही विश्वास बसू लागला.
पण नंतर काहीच महिन्यांनी एक कॉमेट सूर्यावर धडकणार/ सामावणार कि नाही याची चर्चा चालू झाली. आता मला ही अपेक्षित नव्हती. जर तुम्ही जवळजवळ सगळ्या अश्या ऑब्जेक्टसचा अभ्यास केला आहे तर ही "चर्चा" नको. थेट उत्तर हवे. कमाल म्हणजे कोलिजिनच्या नंतरही तो कॉमेट वाचला आहे कि नाही यावर ३-४ दिवस चर्चा चालू होती.
अर्थातच शास्त्रज्ञांच्या मर्यादा आहेत. माझ्याही आहेत. शिवाय त्यांनी काय सांगीतले आहे काय नाही नि त्याच्यावर विसंबून मी काय काय अर्थ काढावेत याला मर्यादा आहेत. म्हणून जे सनातनी विज्ञान आहे त्याच्याशी निष्ठ असावे नि नवे जरा आस्ते आस्ते घ्यावे.
५. एक्झिट पोल हे शुद्ध विज्ञान नाही नि अगदी शास्त्रापन देखिल जवळजवळ नाही. म्हणून त्याला शास्त्र म्हणणे चूक आणि तिसरे एक कंप्लिट भाकड घेऊन शास्त्रांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उठवणे अजूनच चूक. एक्झिट पोल व ज्योतिषी हे 'शास्त्रे' म्हणून चुकली का म्हणताना अनुक्रमे पट्टीचा पोहणारा आणि पोहताच न येणारा फास्ट फ्लो असणार्या नदीत बुडाले म्हणजे लाकडाचा मोठा ओंडका देखिल बुडेल का असे विचारल्यासारखे आहे.
वा!
असे वाचले की अजोंचे भाषिक दौर्बल्य हा त्यांचा कल्पनाविलास आहे असे वाटु लागते. प्रतिसाद अतिशय आवडला.
त्यांच्या एरवी दिसणार्या सैल/बेफाम/गाफिल? प्रतिसादांमागे, भाषिक दौर्बल्यापेक्षा टंकनोत्साहाचा अभाव असावा म्हणावे तर तसेही दिसत नाही. मग बहुदा खूप जास्त गोष्टी अध्याहृत ठेवणे असावे असा तर्क हे असे मुद्देसूद प्रतिसाद पाहिले की बांधावा लागतो
क्रमांक १४ सुद्धा चुक म्हणता
:)
क्रमांक १४ सुद्धा चुक म्हणता यावे (चंदिगड)