मजेशीर नावे

खूप वेळा आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला फार विचित्र नाव असणारे लोक भेटतात.
उदाहरणार्थः मला परवाच एक मुलगी भेटली. तिचा नाव होत 'झेन्डा'. मला फारच मजा वाटली ते ऐकुन.
तुम्हाला भेटली आहेत का अशी काही माणसे? जर भेटली असतील तर पटापट आपले अनुभव सान्गा.
(माझे मराठी मधुन पहिलेच लिखाण आहे. चु भु द्या घ्या )

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

ढगाला कळ लागल्यावर त्या थेंबाचे काय होणार देव जाणे.

तदुपरि अथांग हेही नाव ऐकले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझ्या माहितीतील जुळ्या मुलाची नावे आहेत 'थेंब' आणि 'ठिपका'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या बहिणीच्या सोसायटीत कोणालातरी जुळे झाले, मुलगा आणि मुलगी - नावं काय तर अभंग आणि ओवी. चांगले वाईट माहीत नाही पण ऐकायला फार काय भारी /चांगले वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ऐतिहासिक' किंवा 'पौराणिक' (वैदिक इ. म्हणा हवं तर) ठेवायची फ्याशन आहे सध्या.
पेशंटांच्या मुलांची मी पाहिलेली खरी नावं:

कृतांत.

रौरव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

रौरव नरक असतो Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका काकूंनी विष्णुसहस्रनामात शोधून नातवाचे नाव कृतांत ठेवले होते. सुदैवाने बारशानंतर लौकरच ते बदलून कृतार्थ केले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्य _/\_

पंतांच्या केकावलीमधील 'कृतांतकटकामलध्वजजरा' दाखवली असेल त्यांना ROFL

अतिअवांतरः "कृतान्तो वा कान्त:" ने सुरू होणारी एक चावट्ट शिखरिणी आठवली. जाऊदे ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे सांग ना ती शिखरिणी. अर्धं काय बोलतोस रे? Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिअर गोज़.

कृतान्तो वा कान्तः समजनि न भेद: प्रथमतः
ततो द्वित्रैर्मासैर्मनुज इति जग्राह हृदयम् |
ततोऽसौ मत्प्रेयानहमपि तदीया प्रियतमा
क्रमाद्वर्षे प्राप्ते प्रियतममयं जातमखिलम् ||

अर्थ तेवढा विचारू नका. _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अर्थ व्यनि करा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

व्यनि करा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलापण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

झंतुराsssस्पितोहम् राहतोश्च मिंडका:
तस्मभ्यो: अखिलपु झंटुश्वरोश्चः ||

आता तुम्हीही अर्थ विचारु नका.
लिहिणार्‍यालाच ठौक नै तर वाचणार्‍याला काय समजेल?

ऐसीकरांना सूचना :-
मराठी स्ंस्थळावरील बॅट्याचे प्रतिसाद वाचण्यापूर्वी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृत प्रथमा वगैरे परिक्षा पास होउन याव्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रथमा पुरत नाय ओ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रथमाच काय त्यापुढच्यापण दिल्यात आणि पास झालेय मी (एक शेवटची नापास झाले २४ मार्क ;-)) तरीबी काय कळत नाय. वाचतच नाय तर कळणार कसं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला कळला अर्थ - कृतान्त म्हणजे काळ वय झाले की नेतो तर कान्त म्हणजे पती/प्रियकर वधू वयात आली की नेतो Wink Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजनि की समजानि?
पण "समजानि" म्हणावे तर वृत्त भंग होते.

"समजनि" म्हणावे तर पहिल्या ओळीतील पुंल्लिंगी मी, तिसर्‍या ओळीत स्त्रीलिंगी, अशी गडबड होते.

असले काही बारीकसारीक अन्वय समजले नाहीत, तरी काहीतरी बिगर-चावट अर्थ त्यातल्या त्यात सहज लागतो आहे. चावट अर्थ/द्वर्थ असल्यास माझ्यासाठी निसटतो आहे.

(रचना तशी अलीकडची असावी. वेगवेगळ्या भूतकाळांची सरमिसळ, अनुभूत घटनेचे परोक्ष म्हणून वर्णन वगैरे वृत्त सांभाळण्याकरिता कॉलेजकुमारछाप खटाटोप वाटतात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'नावात काही आहे का?' ह्या जुन्या धाग्यात वैविध्याच्या आणि 'पारंपारिक, तरीहि नवे' असे नाव आपल्या मुलासाठी शोधण्याच्या हव्यासामधून निर्माण झालेल्या चित्रविचित्र, एव्हढेच नव्हे तर अनिष्ट अर्थाची नावे कशी शोधली जातात ह्यावर बरेच काही मनोरंजक पाहण्यास मिळेल. (ह्या हव्यासामधून 'श्लेष्मा' - शेंबूड, 'श्रोणी'- कुल्ला अशीहि नावे दिली जातात असेहि वाचावयास मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेतील आफ्रिकन-अमेरिकन समाजामध्ये एकदम वेगळी दिसणारी नावे शोधण्याची बरीच पद्धत आहे. 'ओप्रा' तर सर्वांच्या परिचयाची आहेच पण एका संस्थळावर मिळालेली क्रीडाविश्वातली ही चित्रविचित्र नावे पहा:

Tayshaun (Prince - बास्केटबॉल), Deron (Williams - बास्केटबॉल), Rau’shee (Warren - मुष्टियुद्ध), Raynell (Williams - मुष्टियुद्ध), Deontay (Wilder - मुष्टियुद्ध), Taraje (Williams-Murray - जूदो), Jozy (Altidore - फुटबॉल), Kerron (Clement - अ‍ॅथलीट), Hyleas (Fountain - अ‍ॅथलीट), Chaunte (Lowe - अ‍ॅथलीट), Bershawn (Jackson - अ‍ॅथलीट), Lashawn (Merritt अ‍ॅथलीट), Trevell (Quinley - अ‍ॅथलीट), Ogonna (Nnamani - व्हॉलीबॉल), Dremiel (Byers - मल्लयुद्ध).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका मैत्रिणीचं नाव डॉना आहे बहुतेक मॅडोना वरुन आलेलं असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोर्तुगीज मध्ये डॉन म्हणजे सभ्य पुरूष किंवा नावाच्या आधी लावतात तसे "मिस्टर", आणि त्याचं स्त्रिलिंगी वचन डॉना. डॉना पॉला म्हणजे काय विचारल्यावर मिळालेले उत्तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय राव लोकंपण ना :-/. आम्हाला वेगळेच उत्तर मिळालेले. डॉना पौला मंजे लैला मजनू, हीर रांझाचे पोर्तुगिज अवतार. त्यांनी ज्या कड्यावरून उडी मारून आत्महत्या केली तो डॉना पौला. आताच www.wikipedia.org/wiki/Dona_Paula हे वाचलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नै हो. तो गोव्यातला कडा म्हणताय ना? त्याचं खरं नाव दोन पावलां (कारण दोन पावले चालले की थेट खाली!)

त्याचे पुर्तुगिजांनी दोना पावला असे केले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गणपतीस जे 'सुखकर्ता' म्हणतात, ते तो (पट्टीचा मत्स्याहारी) 'सुकें करतां?' म्हणून विचारतो, त्याचा (हे न समजणार्‍यांनी केलेला) अपभ्रंश आहे, अशीही एक थियरी ऐकलेली आहे.

------------------------------------------------------------------------------------------------

'कारण शेवटी आम्ही...' इ.इ. - पु.ल.!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin Biggrin
हे पहा http://en.wikipedia.org/wiki/Donna_(given_name)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजकाल विचित्र नावे केवळ वेगळी असावीत म्हणून ठेवण्याकडे विशेषतः उत्तर भारतीयांचा कल आहे.

एक पंजाबी मित्राच्या बायकोचे नाव होते "शिंपी"
बाकीच्या मराठी मित्रांच्या बायका तिच्या मागे टेलर टेलर म्हणून चेष्टा करायच्या.
हे कमी म्हणून तिला मुलगी झाली तिचे नाव ठेवले "पारीशा" ... जाम कोणाला पत्ता लागला नाही अर्थाचा.

इथे काँप्लेक्स मध्ये एका लहान मुलीचे नाव आहे "शिविका" - कारण काय तर मोठ्या बहिणीचे नाव आई वडिलांचे राहुल आणि शिखा याचे "राशिका" असे अर्धे अर्धे नाव एकत्र करून ठेवले आहे त्याच्याशी यमक जुळावे म्हणून शिविका.

एका गुजराती मित्राने दोन देवांना एकत्र आणून मुलाचे नाव ठेवले आहे "क्रिशिव" !!

एका बिहारी सहकार्‍याला त्र्यंबक नाव ठेवायचे होते मुलाचे. ते अवघड जाईल म्हणून नाव ठेवले आहे "त्रयम"

एका मित्राने मुलीचे नाव ठेवले आहे ताशी. हे म्हणे भुतान मध्ये राणीचे नाव आहे.

एका उ. भारतीय सहकार्‍याच्या मुलीचे नाव आहे "केया".. कारण काय तर म्हणे 'नाम सुनने में अच्छा लगता है, मिनिंगसे क्या फर्क पडता है?'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नावाला अर्थ असले तरी कधी कधी पूर्ण संबोधन करणे सोयीस्कर पडत नाही.
श्रीकांत जिचकार ह्यांच्या चिरंजीवाचे नाव याज्ञवल्क्य होते.
त्याला हाक मारणे सोपे नसावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नाव याज्ञवल्क्य होते.
त्याला हाक मारणे सोपे नसावे.

तरीही धृष्टध्युम्न (चुभुदेघे) पेक्षा बरेच सोपे असावे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या एका उत्तर भारतीय मित्राच्या लॅबमध्ये शिविक नावाचा मुलगा होता. त्याच्याबद्दल बोलताना माझा मित्र मला म्हणाला 'हमारे लॅब में सिविक नाम का लड़का है'. मी त्याला गमतीने विचारले, त्याचे आडनाव 'सेन्स' आहे का? तो मित्र माझ्याकडे 'काय बडबडतंय येडं' असे बघत निघून गेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतरकर्मफलानि यदृच्छया
विलिख तानि सहे चतुरानन |
अरसिकेषु कवित्वनिवेदनं
शिरसि मा लिख मा लिख मा लिख ||

चा अण्भव आला असेल. वेल्कम टु द क्लब.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दादा कोंडकेंचा, ध.सुं. शेटे यावरचा विनोद आठवतोय का.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

नाव्या - नाव घेण्याजोगी- नाव ठेवलेले बघितले आहे.
तिच्या आत्याचे नाव पारुल. हे बंगाली नाव आहे असे सांगितले गेले. अर्थ कोणाला माहित आहे का? उच्चारायला गोड वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पारुल एका फुलाचे बंगाली नाव आहे बहुदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मित्राच्या बायकोचे नाव पारुल आहे आणि ते गुजराती आहेत. सध्या सुट्टीमुळे प्रवासात आहे, घरी गेलो की तिला त्या नावाचा अर्थ विचारीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिवित्र नावांमधे अ‍ॅडवता येईल का असा प्रश्न पाडणारी काही नावं -
१. शताब्दी (आई वडिलांची एकुलती एक कन्यका तीसुद्धा बर्‍याच प्रयत्नांती झालेली.. नाव ठेवताना आई - वडील नक्की काय सेलिब्रेट करायच्या मूड मधे होते देव जाणे Wink )
२. मृगया (= शिकार ... कोणी कोणाची केली त्याची अजून कल्पना नाही आम्हाला...)
३. रोहम (अर्थ माहित असल्यास सांगा कुणीतरी)
४. ओवी (विंग्रजीत काय स्पेलिंग करतात असं नाव ठेवायच्या आधी एकाने विचारले होते ..)
५. सखी (ह्या मुलीला कॉलेजात गेल्यावर तीन चार मुलं एकाच वेळी "ए सखी ....." वगैरे म्हणायला लागली तर .... बिच्चारी ...)
६. संजोग (=योगायोग ???)
७. खनीश (म्ह्णजे काय ???)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

बर्‍याच प्रयत्नांती

या प्रयत्नांचे स्वरुप काय ? शिवाय हे सामान्य लेवलच्या मानाने बरेच हे कसे ठरवले गेले असावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वर्गात एकाचे नाव विनोद होते. त्याला सगळे विचारायचे-
काय बे विन्या, 'बा'चं नाव 'चेष्टा' आणी आईचं 'मस्करी' हाय काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"इंदिरागांधी" पवार
"न्हेरु" कदम

एका सरकारी अधिकार्‍यांचे नाव सी. एच. बाबू अंबेडकर पाहिले आहे. अजून एकाचे नाव एम के गांधी असे पाहिले; काय हा योगायोग म्हणून त्यांना विचारले. तर त्यांचे फस्ट नेम हेच मुळात मोहनदासकरमचंदगांधी होते. त्यानंतर त्यांचे दाक्षिणात्य संस्कार.

ओरीसात आढळलेली नावे - "सुपरफाइन", "तहसीलदारमाझी", "बीडीओ".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुकतेच मांगनियार या प्रसिद्ध राजस्थानी लोककलाकारांचा कार्यक्रम पाहण्याचा योग आला.
त्यांच्या मुख्याचे नाव आहे - " भुट्टे खान"
आणि त्यातल्या मुख्य गायकांपैकी एकाचे नाव आहे "नेहरू खान"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कालच वर्तमानपत्रात 'मोका'लावण्यात आलेल्या काही माणसांची नावे वाचनात आली.
एक वाघमारया होता.म्हणजे पहिले नाव होते. उपनाम नव्हे.
एकजण बेंचा होता.
एका जमातीत माणसांना अशी नावे ठेवली जातात.
अगदी पलंग्या,रायफल्या,पिस्तुल्या अशीही नावे पाहिली आहेत.
त्यांच्यातल्या एकाला एका प्रसिद्ध पोलिस अधिकारयाने अटक केली होती.चाणक्याने शेंडीला गाठ मारण्याच्या धर्तीवर,बदल्याची आग धगधगती रहावी म्हणून अटक झालेल्याने आपल्या नावाआधी 'नांगर्या'हां prefix सुद्धा लावला होता.

अजून काही

फौजदार, जयहिंद,पोपट ही नावंही पाहण्यातली आहेत..
साधारणत: well to do घरातली असल्याने'शेठ'हा suffix ही जोडला जायचा.
मग पोपटशेठ सर्वत्र दिमाखात झळकायचे. मालकीच्या गाड्यांच्या काचांवर,बैलगाडे शर्यतीत सर्वत्र ते असत..
मी कल्पना करतो .. हे गृहस्थ फोनवर बोलताहेत
"मी पोपटशेठ बोलतोय"
मज्जा...
बाकी शेठ हे फक्त समोरच्यानेच मला म्हणायचे नसते तर मी सुद्धा तसेच म्हणायचे असते.
उदा. मी अमुकशेठ बोलतोय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐला. राधिकातैंच्या धाग्यावर पदार्पणात शेंचुरी! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नावात काय आहे? या प्रष्णाचे उत्तर मजा म्हणून देणारा धागा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आमच्या ओळखीतल्या एकाने मुलाचं नाव 'स्पर्श' ठेवलंय.
(म्हणजे याच्या मुलाचं कौतुक करताना पण सांभाळून करायला हवं, "तुमचा स्पर्श किती छान आहे हो!")
इतर मित्रमंडळींमधे एकाने मुलींचं नाव 'न्यासा' ठेवलंय (म्हणजे काय ते त्यालाच ठाऊक.. मुलीला तिचं नाव 'नासा' आहे असंच वाटत राहणार काही वर्षं तरी)
दुसर्‍या एकाने मुलाचं नाव 'अजातशत्रु' ठेवलंय (काय मुलानं घोडं मारलेलं याचं? याला आता किती शत्रु होतील त्या नावामुळेच!)
इजिप्तमधल्या क्रांतीनंतर तिथल्या एकाने मुलीचं नाव 'फेसबुक' ठेवलं होतं म्हणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-------------------------------------------

अजातशत्रु नावात काय वाईट/ विनोदी आहे ते कळले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या माहितीप्रमाणे "अजातशत्रु" म्हणजे ज्याला कोणी शत्रू नाहीत असा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

ज्याचा शत्रू जन्मलेला नाही, अर्थात शत्रू नसलेला असा अर्थ माहित होता. म्हणूनच हे नाव विनोदी का गणले असावे असा प्रश्न पडला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. बोलायला सोपे असावे
२. त्याचा वात्रट / विचित्र शॉर्टफॉर्म होऊ नये
३. इंग्रजी स्पेलिंग करताना फेफरे येऊ नये.
४. जरबेने हाक मारता आली पाहिजे. म्हणजे दिवटे बोट झटकून रस्त्यावर सैरावैरा पळत सुटले आहे, अन मातोश्री त्याच्या मागे सोऽहम् सोऽहम् करीत धावत आहेत असं नको.
५. फक्त ऐकायला छान वाटते, अर्थाशी घेणे नाही असे असले, तरी मी वर दिलेत तसे कृतांत, रौरव सारखे अभद्र नको.

अजून काही सुचना असल्यात तर लिष्टीत भर घालावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

उखाण्यात घेताना भारदस्त वाटलं पाहिजे, पोरकट नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अवांतर: तो एक उखाणा माहितीय का कोणाला?

केळीच्या पानावर कैतरी कैतरी (बर्टी वुस्टर झाला माझा ;-))
घास भरवते मरतुकड्या थोबाड कर इकडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो उखाणा आहे

चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

सासूसमोर उखाणा घेताना

चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे
xx चं नाव घेते ऐक भो*डे

असलं काहीतरी टाइमप्लीझ नावाच्या उमेश कामत - प्रिया बापट अभिनित चित्रपटाच्या सुरुवातीलाच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जिलबीचे तुकडे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मुलीचे नाव ठेवताना क्राय्टेरीया असा होता:
१. सोपे (एकही जोडाक्षर नको)
२. लहान (२/३ देवनागरी अक्षरी)
३. मराठी वाटणारे
४. अर्थ नसला तरी चालेल, सहज निगेटिव्ह अर्थ/छटा न वाटणारे

यानंतरही ४ नावे आवडली. मग शेवटी मला मुलींची ईकारान्त नावे आकारान्त नावांपेक्षा अधिक आवडतात म्हणून तसे नाव ठेवले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हेच क्रायटेरिया लावले.
देवनागरी वर्णमालेतली अक्षरे किंवा स्वर फक्तं, छोटेसे आणि दोन अक्षरी.

माझ्या मुलाचे नाव 'यश' आणि मुलीचे नाव 'सई'

पण इकडे कुणालाही ढिम्म कळत नाहीत ही नावे! Sad

ही काय परधर्मियांची नावे म्हणतात. येशू आणि सईदा म्हणे!
किंवा बरेचसे सईला साई म्हणतात.
एकाने विचारले पहिल्याचं नाव येस ठेवलंय तर पुढच्याचं काय 'नो' ठेवणार का?

म्हणजे आपल्यासाठी नॉर्मल नावे त्यांना काहिही वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्याही मुलीचे नाव 'सई'च आहे Smile
ग्रेट पीपल थिंक अलाईक Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एकाने विचारले पहिल्याचं नाव येस ठेवलंय तर पुढच्याचं काय 'नो' ठेवणार का? >> हा हा हा यश चोप्रा माहीत नाही का त्यांना? माझ्या एका मैत्रिणीने मुलाचे नाव लक्ष्य ठेवलेले तर तिला 'याचे नाव लक्स आहे तर पुढच्याचे रेक्सोना ठेवणार का?' विचारलेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही पण अगदी हाच क्रायटेरिया ठेवला होता.
मुलीचे नाव ठेवले 'आर्या'. इकडे उच्चार नीट करतात पण त्याना वाटते कि हे मुलाचे नाव आहे भारतात (आर्यभट्ट वगैरे)
बघावे तेवढे नमुने कमीच आहेत जगात. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

@अनुप ढेरे 'नावे ठेवण्यात' अगदी हातखन्डा दिसतो तुमचा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अश्या नावाचा माझा एक पेशंट आहे.

आंध्रातून येणार्या पेशंटची नावे तर काहिही असतात.
पेंटम्मा, पेंटय्या, पिंटय्या, रुथम्मा, चिंगम्मा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुमारे एक वर्षापूर्वी आमच्या एका परिचिताने एक छोटे कासव भेट म्हणून दिले. (नाहीतरी श्वानाला पाळतातच आहात तर कासव काय जड नाय, असा त्यांचा समज असावा!)

असो.

सर्वप्रथम ते कासव प्रतिबंधित अशा स्टार टर्टल प्रकारातील नाही, याची खातरजमा करून घेतली.

परिचिताने त्याचे नाव (तो नर असे समजून) 'झामोरिन' असे ठेवले होते. आम्ही ते तसेच ठेवले.

पुढे ते कासव थोडे मोठे झाल्यावर, जालावर शोध घेताना जाणवले की, तो नर नसून मादी असावी! अद्याप पशुवैद्याकडे जाऊन खात्री केलेली नाही तरीही जालावरील फोटो आणि वर्णने पाहून, ती मादीच असावी असे वाटते.

सध्या नामांतर करून तिचे नवे नाव 'झमूरी' असे ठेवले आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झामोरिन बोले तो केरळाच्या किनारपट्टी भागातले मध्ययुगीन शासक/राजे.
वास्को द गामा भारतात आला तो पहिल्यांदा ज्यांच्या संपर्कात आला, त्या काही मंडळींपैकी हे एक.
विजयनगरवाल्यांशी ह्यांचे फार पटत नसे.
ह्यांची सत्ता शेवटी टिपुच्या हल्ल्यात संपली असे स्मरते.
असो.
तर तुम्हास कासव देणारा बाय एनी चान्स मल्याळी होता काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

होय. तोच तो झामोरिन.

पण परिचित मल्याळी नाहीत, मराठीच आहेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलयाळम बोलणारा असता तर कदाचित सामुद्रि/सामुदिरि असे नाव ठेवले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने