उस्मानीयाच्या ऑनलाईन डिजीटल ग्रंथालयात १४०० मराठी पुस्तके
नमस्कार, ह्या विषयी आधीच्या धाग्यातून माहिती आली असल्यास कल्पना नाही. उस्मानीया विद्यापीठाच्या संकेतस्थळावर त्यांच्या वाचनालयातील स्कॅन पिडीएफ फॉर्मॅटातली १४०० मराठी पुस्तके आहेत असे लक्षात आले. त्यातील बरीच पुस्तके जुनी आणि दुर्मीळ असण्याची शक्यता आहे असे वाटते. बहुधा जीर्ण होऊ घातलेल्या प्रतींचे स्कॅनींग केले गेले असावे असे काही नोंदींवरून वाटले.
अर्थात शीर्षक शोध रोमन लिपीतील असल्याने देवनागरी मराठीतन नाव टाकल आणि शोधल अस होणार नाही प्रत्येक शोध पानावर दहाच्या आसपास शोध आणि अशी १४० पाने शोधत पुढे जाणे अशी यात्रा आहे. त्यामुळे एकट्या व्यक्तीला १४० पानांची सूची चाळणे अशक्य नसले तरी कंटाळवाणे होईल म्हणून प्रत्येकाने स्वतःला आवडलेली पुस्तकांची नावे येथे शेअर केल्यास इतरांनाही कदाचीत वाचण्यास आवडेल.
माझा प्रमूख हेतू जरासा वेगळा आहे. त्या १४०० मधील पुस्तके दुर्मीळ असलीतरी सर्वच कॉपीराईट फ्री असतील असे नव्हे. त्यातील जी पुस्तके कॉपीराईट फ्री असतील त्यांची रोमन लिपीतली आणि देवनागरी लिपीतील अशी दोन्ही नावे येथे नोंदवल्यास तपासून मराठी विकिस्रोत प्रकल्पात चढवता येतील. मराठी विकिस्रोत प्रकल्पात क्राऊड सोर्सींगने युनिकोड रुपांतरण केले जाते याची आपणास कल्पना असेलच.
आपले या धाग्यावरील प्रतिसाद मराठी विकिप्रकल्पांवर वापरले जाण्याची शक्यता असल्याने कॉपीराईट फ्री समजले जातील.
*उस्मानीया विद्यापीठाच्या संकेतस्थळावर त्यांच्या वाचनालयातील स्कॅन पिडीएफ फॉर्मॅटातली १४०० मराठी पुस्तके
http://oudl.osmania.ac.in हे साईट स्लो आहे का माहित नाही थोड्या वेळा पुर्वी चाळलेला दुवा उघडण्यास मलाही जरासा त्रास होतो आहे.
* राज्य मराठी विकास संस्थेच्या वेबसाईटवरही बरेच जुने दुर्मीळ ग्रंथ दिसताहेत.
प्रतिसादांसाठी धन्यवाद
समीक्षेचा विषय निवडा
एक सुंदर असा खजिना उघडून
एक सुंदर असा खजिना उघडून दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद. मनापासून आभारी आहे.
गंगाधर गाडगीळांच तलावातले चांदणे, शिरुरकराचं कळ्यांचे निश्वास, कोलटकरांचे सुदाम्याचे आणि निवडक असे दोन्हीही पोहे , पवनाकाठचा धोंडी, व्यंकटेश माडगुळकरांच्या गावाकडच्या गोष्टी अशी काही रत्ने त्यात आहेत.
तसेच अनंत काणेकर, श्रीपाद कृष्ण कोलटकर, गोनिदा , हरी नारायण आपटे, साने गुरुजी, वि वा हडप ,भा रा भागवत, प्र के अत्रे, स्वातंत्रवीर सावरकर, वि स खांडेकर , प्रभाकर पाध्ये, पु भा भावे , ग त्र्य. माडखोलकर , नारायण हरी आपटे, चि. वि जोशी आणि श्री मा. माटे या सर्वांची पुस्तके त्यात आहेत.
फक्त एका गोष्टीचं नवल वाटतं कि एवढा खजिना असूनसुद्धा हा धागा वाहता का नाही राहिला?
परत एकदा आभार.
OUDL
OUDL मधील खजिना माझ्या गेली ३ वर्षे माहितीत आहे आणि वेळोवेळी ऐसीवर मी त्याचा उल्लेखहि केला होता. ते सर्व तुम्हाला वरच्या शोधपेटीमध्ये 'OUDL'घातल्यास मिळतील. त्याच संदर्भामध्ये Digitization विषयक भारतातील अनास्था हा धागाहि मी गेल्या वर्षी लिहिला होता त्याला एकूण तीन (अक्षरी तीन) प्रतिक्रिया आल्या आणि त्यातील एकहि माझ्या चिंतेमध्ये सहभागी असल्याचे दर्शविणारी नव्हती. ह्यावरून मी असा तर्क काढतो की येथील वाचकांना ह्या विषयात काही स्वारस्य वाटत नाही आणि तो विषय महत्त्वाचा आहे असेहि त्यांना वाटत नाही. 'एवढा खजिना असूनसुद्धा हा धागा वाहता का नाही राहिला' ह्या प्रश्नाला उत्तर असे आहे.
मधल्या काळात archive.org ह्या अतिशय user-friendly संस्थळावर आजमितीला ८० लाख पुस्तके उपलब्ध झाली आहेत. (अन्य संग्रह - छायाचित्रे, चलच्चित्रे, ऑडिओ इ, वेगळेच) भारताविषयक जुने पुस्तक मिळण्याची तेथील शक्यता DLI हून शेकडो पटींनी अधिक आहे
वरती श्री.कृ. कोल्हटकरांचा उल्लेख 'कोलटकर' असा केलेला आहे आणि तो चुकीचा आहे. त्यांनी आणि अन्य सर्व 'कोल्हटकरां'नी आपले आडनाव अजून बदललेले नाही. अरुण कोलटकरांनी ते का बदलले ते मी सांगू शकत नाही, ते त्यांनाच विचारता आले असते. त्यांचे वडील, आजोबा इत्यादि, तसेच त्यांचे हयात भाऊ वगैरे स्वतःला अद्यापि 'कोल्हटकर' असेच संबोधतात.
मी दोन पुस्तके डाउनलोड केली
मी दोन पुस्तके डाउनलोड केली -१)ज्ञानेश्वरीतील मराठी व्याकरण: वि का राजवाडे आणि २) भिल्लीणीची बोरे एका लेखिकेचं. स्कॅन कॅापी चांगली दिसते आहे.यांचं विकिसाठी काय परिक्षण वगैरे अपेक्षित आहे का?अथवा शोध सोपा व्हावा म्हणून मराठी नाव आणि लिंक,लेखकाचे नाव,किती MB वगैरे तयार करायचे आहे? प्रताधिकारमुक्त हे प्रकाशन दिनांकावरून ठरते का?
थोडा उशीरच झाला आहे धागा पाहायला.याअगोदर मी इ-साहित्य डॅाट कॅामवरची पुस्तके उतरवली आहेत.
प्रतिसादासाठी आभारी आहे.
प्रतिसादासाठी आभारी आहे.
*प्रताधिकारमुक्त हे प्रकाशन दिनांकावरून ठरते का?
::चालू वर्ष २०१५ -(उणे) ६१ वर्षे म्हणजे १९५४ पुर्वी मृत्यू झालेल्या कोणत्याही लेखकाचे लेखन प्रताधिकारमुक्त ठरते.
* अथवा शोध सोपा व्हावा म्हणून मराठी नाव आणि लिंक, लेखकाचे नाव , आणि सहज पुस्तक चाळताना कुठेही लेखकाचे जन्म अथवा मृत्यूवर्षाची तसेच वडीलांच्या नावाची अथवा लेखकाची ओळख पटवणारी नोंद असल्याचे लक्षात आल्यास अशी नोंद. (कारण एकाच नावाच्या अनेक व्यक्ती असू शकतात त्यावरून प्रताधिकार कालावधी आणि श्रेयनामांकना बद्दल गल्लत होऊ नये म्हणून) असे करून मिळाल्यास खरेच खूप फायदा होईल.
* जसे लिंक उपलब्ध झाल्यास वि का राजवाडेंचे ज्ञानेश्वरीतील मराठी व्याकरण हे पुस्तक मराठी विकिस्रोत प्रकल्पात जसेच्या तसे आयात करून घेता येईल. विकिस्रोत प्रकल्पात मजकुर शोधण्यास आणि संदर्भात उधृत करणे सोपे वावे म्हणून टंकन करून युनिकोडीकरण करण्याचा उपयूक्त प्रकल्प आहे.
* उल्लेखनीय पण प्रताधिकारीत (किंवा प्रताधिकारमुक्त झालेल्या) पुस्तकाचे परिक्षण मराठी विकिपीडियावर वापरता येईल. एखाद्या पुस्तकातील लेखकाच्या उल्लेखनीय मताची वाक्याची नोंद घेतली तरीही तेवढी नोंदतरी विकिपीडियातील कुठल्यातरी संदर्भात वापरली जाऊ शकते. जी परिक्षणे दोन एक परिच्छेद भरतील त्यांचे मराठी विकिपीडियावर स्वतंत्र लेख बनवता येऊ शकतील.
प्रताधिकार कसा ठरवतात ते
प्रताधिकार कसा ठरवतात ते कळलं.काहीच पुस्तके दहा एमबीपेक्षा कमी आकाराची आहेत आणि बरीच२५-४० एमबी आहेत.पुस्तक डाउनलोड केल्यावरच आतील प्रकाशनसंदर्भातले पान पाहता येते आणि प्रत कशी आहे ते कळते.
उदाहरणार्थ
.माझा एक प्रयत्न-
हा नमुना पाहा-आणि अपेक्षित बदल सुचवा.
सुरुवातीला यादी करता येईल.
१) भिल्लिणीची बोरें
-परांजपे शकुंतला
Bhillinichi boreyn ,paranjape shakuntala,PDF,7.8MB
इंग्रजी नाव Bhillind-iichiin' boren' असे वेबसाइटवर दिले आहे ते स्पेलिंग मी बदलले आहे.
लिंकमध्ये target = _blank टाकले आहे.
१) भिल्लिणीची बोरें -परांजपे
१) भिल्लिणीची बोरें
-परांजपे शकुंतला
Bhillinichi boreyn ,paranjape shakuntala,PDF,7.8MB - दुव्यासहीत
हे एवढे दिलेत तरी पुरेसे आहे. ज्या पुस्तकांचे लेखकांचे लेखन कॉपीराइट फ्री झालेले आहे. ते स्वतःच्या कॉम्प्युटरवर डाऊनलोडकरण्या पेक्षा विकिस्रोत प्रकल्पात सरळ आयात करवून घेणे अधिक सोईचे (जसे की राजवाड्यांचे पुस्तक) कारण युनिकोडीकरणाचे काम झाल्या नंतर फाइलसाइज कमी होऊ शकतो आणि कमी साइजची फाइल अधिक सहज पणे व्यक्तीगत संगणक सुविधांवर उतरवता येऊ शकतील असे वाटते.
जे ग्रंथ कॉपीराइट फ्री नाहीत ते आवडीनुसार स्वत:च्या व्यक्तीगत संगणकावर उतरवून ठेवण्यास हरकत नसावी. (भारतीय प्रताधिकार कायद्याचे कलम ५२ उपकलम (१) क्लॉज a (i) नुसार खासगी संशोधनात्मक वगैरे उपयोगासाठी असा व्यक्तीगत वापर करता येऊ शकतो. उदाहरणार्थ शकुंतला परांजपे यांचे भिल्लिणीची बोरें कॉपीराइटेड असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरी तुम्ही व्यक्तीगत साठवणूक करण्यात हरकत नसली तरीही उस्मानीया वाचनालयाच्या वेबसाईट प्रमाणे कोणत्याही माध्य्मातून कॉपीराइटचे उल्लंघन होईल अशा पद्धतीने पूर्ण पुस्तक शेयर करणे उचित ठरत नाही. (उस्मानिया विद्यापीठ वाचनालयाने खरेतर त्यांच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांपलिकडे यास अॅक्सेस द्यावयास नको पण अर्थात तो लेखक आणि वाचनालयाच्या दरम्यानचा प्रश्न आहे. चुभूदेघे)
http://oudl.osmania.ac.in हे वेबसाइट पुन्हा एकदा मला आज उघडत नाहीए. कल्पना नाही असे का होते.
खरोखरच वेबसाइट काल उघडलीच
खरोखरच वेबसाइट काल उघडलीच नाही.
१)target= blank लिंकमध्ये टाकू का ?नवीन विंडो/टॅबमध्ये उघडण्यासाठी?
२)कंसात अनुक्रमांक टाकणार नाही-अकारविल्हे/इं इंडेक्स प्रमाणे नंतर करणे योग्य ठरेल.
३)नावात काय बदल करावा जेणेकरून नंतर उलटापालट करण्याचा खटाटोप नको-
"श्री ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचें व्याकरण"
( जसे आहे तसे)
"मराठी भाषेचें व्याकरण -श्री ज्ञानेश्वरीतील "?
माझे मत
१)target= blank लिंकमध्ये टाकू का ? टार्गेट नवीन विंडो/टॅबमध्ये उघडणे व्यक्तीशः मला बरे वाटते. अर्थात मी एकाच वेळी खूप टॅब्सवर काम करण्याच्या माझ्या सवयीमुळे तसे असेल.
२)कंसात अनुक्रमांक टाकणार नाही-अकारविल्हे/इं इंडेक्स प्रमाणे नंतर करणे योग्य ठरेल. - सहमत आहे.
३)नावात काय बदल करावा जेणेकरून नंतर उलटापालट करण्याचा खटाटोप नको-
विकिअंतर्गत शोधयंत्रांना पुर्ननिर्देशनच्या सुविधेसहीत डिफॉल्ट सॉर्ट सुविधा इत्यादी असल्यामुळे "श्री ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचें व्याकरण" हे जसेच्या तसे सहज झेपते (अर्थात ते एखादे पुस्तक विकिवर आयात करताना करता येईल); ऐसी अक्षरेचे शोध यंत्र तपासले असता
"श्री ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचें व्याकरण" हे शोधयंत्रातून शोध जड जाईल, आणि "मराठी भाषेचें व्याकरण -श्री ज्ञानेश्वरीतील "? असा बदल शोधणे सोपे जाइल सध्या ऐसीवर काम करतो आहोत तेव्हा असा बदल स्वागतार्ह असेल असे वाटते.
आपल्या सक्रीय सहकार्यासाठी धन्यवाद
उस्मानियाची वेबसाइट आता
उस्मानियाची वेबसाइट आता दुपारी एका नव्या रुपात आणि ६५५० मराठी पुस्तकांच्या यादीसह
इथे उघडली ="http://oudl.osmania.ac.in/search?query=marathi+books&submit=Go"
जन्म-मृत्यूवर्षांबद्दल माहिती हवी
प्रतिसादांसाठी सर्वांना धन्यवाद. बर्याच साहित्यिक संपादकांची जन्म-मृत्यूवर्षांबद्दलही माहिती लागणार आहे तीही याच धागा लेखात मागेन.
जन्म-मृत्यूवर्षांबद्दल माहिती हवी :
* तुकाराम तात्या ( हे बहुधा म. जोतीराव फुलेंचे समकालीन असावेत, तुकाराम तात्या पडवळ आणि तुकाराम तात्या दोन्ही व्यक्ती एक असण्याची शक्यता अधिक आहे पण वेगवेगळ्या असल्याचे माहित असल्यास कल्पना द्यावी)
तुकाराम तात्या एक रोचक मराठी व्यक्तीमत्व
वेळे अभावी लिहिता येत नाहीए पण तुकाराम तात्या हे थिऑसॉफीकल सोसायटीशी संबधीत एक रोचक व्यक्तीमत्व होते असे दिसते आहे. जिज्ञासूंनी दुवा १ आणि दुवा २ वर माहिती घ्यावी.
तुकाराम तात्या पडवळ आणि नुसते तुकाराम तात्या एकच असावेत वाटते आहे पण सत्यशोधक वाल्यांच्या लेखनात थोऑसॉफी रिलेटेड उल्लेख नाहीत आणि थिऑसॉफी रिलेटेड वाल्यांच्या लेखनात सत्यशोधकचा उल्लेख नाही बुचकळ्यात पडायला होते आहे.
या धागा लेखाच्या माध्यमाने
या धागा लेखाच्या माध्यमाने चालू प्रयत्नातुन अखेर "तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा" हा तुकाराम तात्या संपादीत ग्रंथ मराठी विकिस्रोतवर वाचनासाठी आणि युनिकोडात टंकण्यासाठी उपलब्ध झाला आहे. (युनिकोडात टंकण करून देणारे कार्यकर्ते विकिस्रोतास हवे आहेत हेवेसांनलगे)
संत तुकारामांचे भाऊ कान्होबा आणि शिष्य निळोबांचे अभंग या ग्रंथात संकलीत आहेत. संत निळोबांच्या लेखनात तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे संदर्भ येताना दिसतात तसेच हुतूतू , चेंडू फळी. लघोरी अशा खेळांची वर्णनेही वाचताना रोचक वाटतात.
महेश्वर दरबारची बातमीपत्रे
* महेश्वर दरबारची बातमीपत्रे पेशवाईच्या उत्तरार्धात होळकर दरबारी असलेल्या पेशव्यांच्या वकीलांनी पाठविलेल्या बातमी पत्रांचा संग्रह (मी केवळ प्रस्तावनाच वाचली) उल्लेखनीय वाटतो. बहुतेक काही भाग अहिल्याबाई होळकरांच्या काळातील असावा.