इतिहास मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन कसे करेल ?

I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media, or for that matter, the Opposition parties in Parliament. - Manmohan Singh

नुकतच मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू लिखीत 'The Accidental Prime Minister' पुस्तक वाचून झाल . बारू हे केवळ सिंग यांचे माध्यम सल्लागार नव्हते तर ते सिंग यांच्या अंतर्गत वर्तुळातले एक महत्वपूर्ण अधिकारी होते . २००४ ते २००९ या काळात सिंग यांच्यासोबत त्यांनी खूप जवळून काम केले आहे . UPA-2 च्या काळात जेंव्हा रोज भ्रष्टाचाराचे नवनवीन सुरस कथा कानावर यायच्या तेंव्हा विरोधकांनी सिंग यांची तुलना आपल्या मुलांच्या दुष्कृत्याकडे डोळेझाक करणाऱ्या धृतराष्ट्राशी करायला सुरुवात केली . यापूर्वी एकदा यशवंत सिन्हा यांनी सिंग याना शिखंडी ची उपमा दिली होती . पण बारू यांनी या आपल्या एके काळच्या बॉस ची तुलना भीष्म या व्यक्तिरेखेशी केली आहे . चुकीच्या पक्षात असलेला एक अत्यंत प्रामाणिक , विद्वान माणूस . भीष्माच्या आयुष्याची जरी शोकांतिका झाली असली तरी ते महानायक होते . मनमोहन सिंग यांच्या बद्दल असे म्हणता येईल का? . स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासावर ज्या काही थोड्या लोकांनी आपला न पुसणारा ठसा उमटवला आहे त्यात सिंग यांचे नाव नक्की येईल . १९९१ मध्ये देश आर्थिक गर्तेत सापडला असताना नरसिंह राव यांच्यासोबत सिंग यांनी हा आर्थिक शकट सांभाळला . इतकेच नव्हे तर या देशातल्या लाखो तरुणांना जागतिकीकरणाचे फायदे होतील अशी धोरण राबवली . दुर्दैवाने ज्या लोकाना या चे सर्वाधिक फायदे झाले तेच लोक आज त्यांच्यावर प्रच्छन्न टीका करताना दिसतात . दुसऱ्या महायुद्धात अविस्मरणीय विजय मिळवून दिल्यानंतर चर्चिल यांनी लोकांनी सार्वत्रिक निवडणुकीत घरी बसवलं होत . बर्यापैकी सरकार चालवून पण वाजपेयी यांच्यापेक्षा सोनियांना लोकांनी २००४ मध्ये पसंती दिली होति. लोकशाहीत जन मानसाचा अंदाज येणे कठीणच . आणि त्यात पण भारतासारख्या खंडप्राय , बहुविध , बहुभाषिक देशात तर अजूनच अवघड .

मनमोहन यांच्या कारकीर्दीच्या दोन बाजू आहेत अस मला वाटत . अर्थमंत्री आणि UPA-१ चे पंतप्रधान म्हणून एक दैदिप्यमान बाजू . आणि भ्रष्टाचार , अकार्यक्षमताचे आरोप आणि कळसूत्री बाहूल म्हणून हेटाळणी पदरात पडलेली UPA-2 कारकीर्द . एकदम २ टोक . पण जेंव्हा विरोधक मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन करतात तेंव्हा सरसकट त्यांच्या १० वर्ष पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला मोडीत काढतात . पण हे खरे आहे का ? UPA-१ च्या काळात विकासदर ९ % वर पोहोंचला होता . सरकार साम्यवाद्यांच्या पाठीम्ब्यांवर असताना पण अमेरिकेसोबत अणुकरार करताना सिंग यांनी राजकीय धाडस दाखवून त्याना फाट्यावर मारल .( देशात तो पर्यंत काही भागात का होईना साम्यवाद्यांचे वर्चस्व होते त्याला ओहोटी लागण्याची प्रक्रिया तिथून सुरु झाली असे माझे निरीक्षण . चूभू द्या घ्या . या पतनाची सुरुवात करण्याचेश्रेय सिंग यांना द्यावे का ? )

२००९ मध्ये कॉंग्रेस ने जो विजय मिळवला आणि स्वतःच्या जागा मध्ये भर घातली त्याचे श्रेय बारू पूर्णपणे मनमोहन यांना देतात . यासंबंधी चे एक छान उदाहरण त्यांनी पुस्तकात दिले आहे . 'द हिंदू ' या दैनिकाच्या विद्या सुब्रमन्यम यांनी ग्रामीण तसेच मुस्लिम जनतेला प्रश्न केला होता . तुमच मत कुणाला ? त्यावर त्यांनी एकमुखाने उत्तर दिले होते . ' सरदार को '. ते सर्व जण सिंग याना नेक आदमी संबोधत असतो . सत्तेवर असलेले पंतप्रधान आपली पाच वर्षाची मुदत पूर्ण करतात आणि नंतर बहुमताने निवडून येतात असे १९६२ नंतर पहिल्यांदाच घडले होते . विरोधक कायम सिंग यांच्यावर उत्तम अर्थ तज्ञ पण वाईट राजकारणी म्हणून टीका करायचे . पण नंतर दिग्विजय सिंग म्हणाले तसे सिंग यांच्यातल्या चलाख राजकारण्याकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले . सिंग हे राजकारण करण्यात पारंगत होते हे अमान्य करण्यात काही अर्थ नाही . १० वर्ष पक्षांतर्गत विरोधक , सत्ताबाह्य केंद्र , विरोधक यांना तोंड देऊन सरकार चालवणे काही खायचे काम आहे का ?

बाह्य सत्ताकेंद्र हि भारतीय राजकारणाची खासियत बनत चालली आहे का ? गोविन्दाचार्यानी वाजपेयी यांना 'मुखवटा ' म्हणून संबोधले होते . सिंग यांच्या पंतप्रधान पदाची कारकीर्द सोनिया यांच्या सावली खाली गेली हे नाकारण्यात अर्थ नाही . अनेक धोरण निव्वळ पक्ष संघटनेच्या (पक्षी -सोनिया ) आग्रहामुळे राबवावी लागली . सोनिया वरचा स्वयंसेवी संस्थांचा प्रभाव बहुश्रुत आहे . मंत्री मंडळातले अनेक ज्येष्ठ सदस्य प्रणव मुखर्जी , अर्जुन सिंग हे आपले reporting थेट सोनियांना करायचे . अनेक लोकांच्या मते राहुल गांधी यांनी जेंव्हा राजकारणाच्या गुन्हेगारीचे विधेयक 'nonsense' म्हणून फाडून फेकला होते तेंव्हा तरी आत्म सम्मान दाखवून सिंग यांनी राजीनामा द्याला पाहिजे होता . पण सिंग यांनी त्यावेळेस आपल्या पदाला चिकटून राहणेच पसंद केले

२००९ नंतर आणि नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात मनमोहन सिंग यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर हल्ले झाले . सरकार ची धोरण , भ्रष्टाचार , अकार्यक्षमता यांच्यावर होणारी टीका हि बर्याच अंशी स्वाभाविक असली तरी त्यानिम्मिताने मोठ्या लोकांवर अतिशय घाणेरडी वैयक्तिक टीका करण्याचा ट्रेंड भारतीय राजकारणात रुजला हि खरी घातक बाब . म्हणजे सिंग हे एका 'बाई ' चे ऐकतात म्हणून त्यांच्यावर टीका करणारे लोक मी पाहिले आहेत . त्यांना सत्ताबाह्य केंद्र हा मुद्दा महत्वाचा वाटत नसून एक पुरुषासारखा पुरुष एका बाई चे कसे मुकाटपणे ऐकतो हा मुद्दा महत्वाचा वाटायचा . सर्वात धक्कादायक म्हणजे काही स्त्रिया पण हा मुद्दा हिरीरीने मांडायच्या . मनमोहन सिंग आणि सोनियांची आक्षेपार्ह morphed photograph सगळ्यांनीच पाहिली आहेत . इतिहासातले स्थान वैगेरे राहूच दे पण या देशाच्या अर्थकारणाला कायमचे वेगळे वळण देणाऱ्या सिंग यांचा सरसकट एकेरी आणि मन्नू वैगेरे उल्लेख करणे कितपत योग्य आहे .

देशातील बहुतांश जनसमुदाय हा फारवेळ कुठल्याच लाटेखाली राहत नाही . कदाचित अजून काही वर्षांनी नकारात्मकते चे ढग विरून सिंग यांचे वास्तविक मूल्यमापन हा देश करेल हि अपेक्षा . इतिहास च माझे खरे मूल्यमापन करेल असे विधान करण्यामागे हाच मनमोहन सिंग यांचा उद्देश असेल कदाचित .

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

२००९ नंतर आणि नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात मनमोहन सिंग यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर हल्ले झाले . सरकार ची धोरण , भ्रष्टाचार , अकार्यक्षमता यांच्यावर होणारी टीका हि बर्याच अंशी स्वाभाविक असली तरी त्यानिम्मिताने मोठ्या लोकांवर अतिशय घाणेरडी वैयक्तिक टीका करण्याचा ट्रेंड भारतीय राजकारणात रुजला हि खरी घातक बाब . म्हणजे सिंग हे एका 'बाई ' चे ऐकतात म्हणून त्यांच्यावर टीका करणारे लोक मी पाहिले आहेत . त्यांना सत्ताबाह्य केंद्र हा मुद्दा महत्वाचा वाटत नसून एक पुरुषासारखा पुरुष एका बाई चे कसे मुकाटपणे ऐकतो हा मुद्दा महत्वाचा वाटायचा . सर्वात धक्कादायक म्हणजे काही स्त्रिया पण हा मुद्दा हिरीरीने मांडायच्या . मनमोहन सिंग आणि सोनियांची आक्षेपार्ह morphed photograph सगळ्यांनीच पाहिली आहेत . इतिहासातले स्थान वैगेरे राहूच दे पण या देशाच्या अर्थकारणाला कायमचे वेगळे वळण देणाऱ्या सिंग यांचा सरसकट एकेरी आणि मन्नू वैगेरे उल्लेख करणे कितपत योग्य आहे .

देशातील बहुतांश जनसमुदाय हा फारवेळ कुठल्याच लाटेखाली राहत नाही . कदाचित अजून काही वर्षांनी नकारात्मकते चे ढग विरून सिंग यांचे वास्तविक मूल्यमापन हा देश करेल हि अपेक्षा . इतिहास च माझे खरे मूल्यमापन करेल असे विधान करण्यामागे हाच मनमोहन सिंग यांचा उद्देश असेल कदाचित

उत्तम परामर्श!

लेखन आवडले. श्री सिंग हे एक चांगले पंतप्रधान होते. त्यांची राजकीय समज कमी होती हे अंडरस्टेटमेंट आहे. त्यांच्यात स्टेट्समनशीप कमी होती असे माझे मत आहे. बाकी त्यांनी कित्येक स्तुत्य व धाडसी निर्णय आपल्या १० वर्षांच्या कारकिर्दित घेतले हे नाकारता येणार नाहीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इतिहास च माझे खरे मूल्यमापन करेल असे विधान करण्यामागे हाच मनमोहन सिंग यांचा उद्देश

सायबांनी आमच्या सारख्या पंख्यांना एका फटक्यात कैलासवासी करून टाकले.

---

ऋषिकेश शी एकदम सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0