मयूरपंथाच्या पुर्नजन्मापर्यंत

भारतात दहाव्या का बाराव्या दिवशी गोडाचं जेवण देतात; आफ्रीकन योरुबा जमातीत दहाव्याला जवळपास लग्नाच्या कार्यक्रमा सारख वातवरण असत म्हणजे नातेवाईकांना नवे कपडे देणे जेवण संगीत आणि नृत्य का ? तर, मयत हा फक्त शरीर बदलण्या पुरता वर गेलेला असतो आणि लहान मुलांच्या स्वरुपात त्याच कुटूंबात पुन्हा जन्मणार असतो. आपल्याकडेही आधीच्या पिढीतल्या माणसांचच नाव पुन्हा नवीन जन्मणार्‍या लहान मुलांना देण्याची प्रथा होतीच. पुर्नजन्मावर विश्वास ठेवणे हे भारतीयच करतात असे नव्हे. इराकच्या निनेवेह प्रांतातील (अत्यल्पसंख्यंक) याझिदी जमात सुद्धा शरीर म्हणजे कपडे आणि मृत्यू म्हणजे केवळ कपडे बदलणे असा विचार करते.

भारतीयांप्रमाणेच मृत्यूपथावर असलेल्या अथवा मृताला घोटभर पाणी पाजणे हा प्रकार यांच्यात आहेच पण अजून एक साम्य म्हणजे शनी किंवा गणेशाची विघ्नकर्ते असून सुद्धा आपण आराधना करतो, तशी त्यांच्या श्रद्धेतील विघ्नकर्त्यांची आराधना ते त्यांच्या पद्धतीने करतात. सोबतीला तावूस या नावाने देवदूताचे मुख्य प्रतीक म्हणून मोर या पक्षाची चक्क मुर्ती पुजा केली जाते. त्यांची स्वतःची कालगणना आहे त्यानूसार सहाएक हजारवर्षांपासून तरी त्यांचा हा पंथ पृथ्वी तलावर आहे. मुख्यत्वे इराकच्या कुर्दीस्ताना जवळील निनेवेह प्रांतातील ह्या पंथाचे लोक आर्मेनियासहीत पुर्वाश्रमीच्या सोव्हीएत संघातील अनेक प्रांतातून अत्यल्पसंख्याक म्हणून आपले अस्तीत्व जपून आहेत. पण मुख्य सांस्कृतिक केंद्र म्हणजे ननिनेवेह प्रांतातील मोसूल जवळील शेखान आणि सिंजार च्या ग्रामीण भागात. भारतात अशा प्रकारच्या श्रद्धा सहजपणे समजून घेतल्या जाऊ शकतात; पण इस्लाम पोहोचल्या पासून पुढची सर्व म्ह्णजे आतापर्यंत जवळपास १३ शतके पुर्वीच्या इस्लामी ओटोमन साम्राज्यात असो वा आताच्या इराकात अशा प्रकारच्या श्रद्धा म्हणजे जणू सैतानीच !

या जमातीच दुर्दैव म्हणजे ज्युडायिक धर्मियांप्रमाणे त्यांची जमात आदम आणि इव्ह पासून आल्याचे ते मानत नाहीत यांना देवाने पाठवलेल्या देवदूताने देवाच्याच आज्ञेवरून आदम पुढे झुकण्यास नकार दिला; इस्लाम मधील काही विश्वासांनुसार सैतान सुद्धा बाबाआदमचा सत्कार न करता देवाज्ञा मोडतो त्यामुळे या याझिदी जमाती बद्दल इस्लामी लोकात मोठे गैर समज आहेत. एवढी सगळी शतके इस्लामी राज्यात अशा प्रकारचा विश्वास ठेऊन तग धरणे कोणत्याही जमातीला अशक्य ठरावयास हवे, पण हि मंडळीही स्वतःच्या श्रद्धा अत्यंत अवघड परिस्थितीतही सांभाळण्यात कडवी पण आजू बाजूच्या ज्युडायीक आणि मुख्यत्वे इस्लामी बहुसंख्यकांशी जुळवून तर घेतले पाहीजे, मग स्वतः मूळची सूर्य पुजक असलेली हि जमात अस्तीत्व टिकवण्यासाठी बाकीच्या जगाला पुस्तक पुजक असल्याची लोणकडी देऊ लागली. कुणी इस्लामी संत सुद्धा यांनी आपल्याच देवदुताचा अवतार म्हणून आपलासा करून घेतला. बाकी धार्मीक रिती रिवाजात, जमाती-बाहेरच्यांना मुर्तीपुजा विषयक गोपनीयता राखण्यासाठी म्हणून हे लोक फिरकु देत नाहीत. पण सोबतीला गोपनीयतेमुळे अविश्वास अधीकच वाढतही असावा. अनेक वेळा मानवीसंहार घडवला जाऊन सुद्धा जरासे ग्रामिण भागात आड बाजुला असल्यामुळे असेल आणि आजूबाजुच्या प्रांतातील कुर्द, शिया इत्यादी लोकांना, यांच्या श्रद्धा पटणार्‍या नसल्यातरीही त्यांचे अस्तीत्व मुळा पासून पुसले नाही. सोबतीला सद्दामही कुर्दप्रेमी नसला तरी नावाला तरी सेक्युलर राजवट बाळगून होता त्यामुळे या जमातीचे अस्तीत्व पुर्ण पुसले गेले नव्हते. युरोपीय पर्यटक अभ्यासक मंडळींनी यांच्या श्रद्धांचा मागोवा घेतला नसता तर बाकीच्या जगाला त्या टिकुन असलेल्या आदिम परंपरांची माहितीही फारशी झाली नसती; अभ्यासकांचा अभ्यास झाला पण त्यांनी त्यांच्या सांस्कृतीक अस्तीत्वासाठी बाळगलेली गोपनीयतेचे कवच ढासळले. आमेरिकी महत्वाकांक्षेनी सद्दामची सेक्युलर राजवट संपुष्टात येताना या छोटाश्या समुहाने अमेरीकनांचे स्वागतच केले, पण इराक स्वतःच अस्तीत्व स्वबळावर टिकवण्याच्या आधीच ही आमेरिकन मंडळी मायघरी परतली, ती या याझिदी जमातीला अधीकच संकटात सोडून; एकविसाव्या शतकाच्या १४ व्या वर्षी या जमातीचे एका आदिम संस्कृतीचे अस्तीत्व आणि प्राण कंठाशी येतील अशा स्थितीत.

मरणासन्न माणसाला घोटभर पाणि देणारा याझिदी, इराक मधल्या नव्या मुलतत्ववादा पासून प्राण वाचवण्यासाठी डोंगर आणि गुहां चढू लागला; खाली राहीला तर प्राण राहणार नाही, डोंगर चढला तर मरताना पिण्यासाठी घोटभर पाणीही मिळणार नाही अशा स्थितीत. आमेरीकन दबावा खाली इराकी वायू सेना आकाशातन अन्न पाण्याची पाकीट टाकते आहे, एक वेळ अन्न खाता येईल एवढ्या उंचीवरून टाकलेली पिण्याच पाणी मात्र हाती न लागताच डोंगराच्या मातीत जात असणार.

पु.शि. रेग्यांच्या सावित्री कादंबरीत युद्धकाळात सैरभैर होण्याच वर्णन येत, पण एकदाचं युद्ध संपत आकाशातली युद्ध विमान निघून जातात आणि सावकाशपणे हसरी आनंदी संस्कृती पुन्हा एकदा उदयास येऊ लागते, तसे ह्या मयुरपंथी याझिदी जमातीमागची इडा पिडा टळून पुन्हा एकदा त्यांच्या श्रद्धांना त्यांच्या परीने आनंदा जगू देणारा सांस्कृतीक पुर्नजन्म मिळून मृत्यूचा थयथयाट संपून त्यांच्या जीवनाचं चक्र पुन्हा सुरु होईल, या शुभेच्छा आपण देऊ शकतो आणि मृत्यूचा थयथयाट माजवणार्‍यांना 'गेट वेल सून' या शुभेच्छाच त्या काय आपण देऊ शकतो नाही का ?

संदर्भ :
१) याझिदी (इंग्रजी विकिपीडिया)
२) एकोणिसाव्या शतकात युरोपीयनांनी घेतलेल्या याझिदींच्या सांस्कृतीक नोंदीचे आंतरजालावर मिळालेले टिपण
३) गूगल बातम्यातून वाचलेली विवीध वृत्ते

जॉर्जीया देशातील पारंपारीक वेशभूषा केलेला याझिदी माणूस (चित्र सौजन्य इंग्रजी विकिपीडिया)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
3.25
Your rating: None Average: 3.3 (4 votes)

प्रतिक्रिया

माहितीपूर्ण लेखन
आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१
चांगले लेखन.
आभार.
मणिधर्म,हे याझिदी, मंडेइझम (आणि बहुतेक द्रूझसुद्धा) ह्यांच्याबद्दल पूर्वी ऐकून होतो, मध्यपूर्वेत असूनही ज्यू-ख्रिश्चन्-मुस्लिम तीन्हीपैकी नसलेले लोक म्हणून. लेखात दिलेली दुसरी आणि तिसरी लिंक कामाची वाटते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

एकदम नवीन माहिती. बहुत धन्यवाद!

हे लोक भारतात असते तर त्यांना काही अडचण आली नसती बहुधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इराक मधील याझिदींच्या एका प्रतिनिधीची अलिकडील प्रतिक्रीया र्‍ह्दयद्रावक होती, 'आमच्या जमातीचे आत्ता पर्यंत बहात्तर वेळा नरसंहार केला गेला ही त्रेहात्तरवी वेळ आहे'. इराकी संसदेच अधिवेशन चालू आहे परवा याझिदी स्त्री खासदार काहीतरी करून आमच्या लोकांना वाचवा म्हणताना रडली आणि तिथेच भोवळ येऊन पडल्याचे वृत्त वाचण्यात आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

!!!

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विकिपानास भेट दिली असता त्यांचे प्रार्थनास्थळाचा फोटो दिसला. कळसाचा आकार हिंदू मंदिरांप्रमाणे दिसतोय. आता कुणीतरी कोठून तरी दुवे शोधून याझिदी पंथ हा हिंदू धर्माचीच एक शाखा आहे असे सिद्ध करा बरे !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणीतरी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करेल म्हणून मी स्वतः विषय काढण्याचे टाळले. याझिदींची आणखी दोन-तीन वैशीष्ट्ये लक्षात घेण्या जोगी आहेत, एक म्हणजे मुख्य देवदूता सोबत देवाने सात इतर दूतांची नेमणूक केल्याचा उल्लेख आहे जो सप्तर्षी संकल्पने सोबत कितपत मॅच होतो याची कल्पना नाही. दुसरे यांच्यात चार जाती आहेत अर्थात हे मुळचे चार वर्ण असू शकतील का कल्पना नाही. शिवाय बैल आणि इतर प्राण्यांचा बळी देवाला देणे आहे. (का कोण जाणे इथे मला यजुर्वेदाची आठवण झाली चुभूदेघे) पृथ्वी आणि आकाशा सोबत पाणी आणि अग्नीला पवित्र मानतात म्हणजे पाणी आणि अग्नीवर थुंकणे निशीद्ध मानले जाते. दिप प्रज्वलनाची प्रथा दिसते पण अर्थात अग्नीत आहुती देण्याचा उल्लेख मात्र आढळत नाही. ज्या परंपराते वेगळे आहेत त्यात लेट्यूस आणि पत्ताकोबी खाणे निशीद्ध मानले जाते आणि निळ्या आणि हिरव्या रंगाचे कपडे घालणे निशिद्ध मानले जाते. पण वरच्या जॉर्जीयन माणसाची विजार निळ्या रंगाची दिसते आहे हे कसे माहित नाही. युरोपीयन अभ्यासकांच्या मते हे लोक झोराष्ट्रीयन धर्माशी अधिक मिळते जुळते आहेत. अर्थात सगळ्यात वेगळी बाब म्हणजे मोराची मुर्तीपुजा भारतात होत असल्यास मला कल्पना नाही पण बहुधा होत नसावी. त्यांची देवद्ताची आदमशी झालेल्या मानापमानाची कथा कल्पना सुद्धा भारतीय कल्पनेशी मिळती जुळती नाही.

इंग्रजी विकिपीडियावर मन यांच्या प्रतिसादानंतर ड्रूझ लोकांची माहिती घेत होतो त्यांच्या जेनेटीक अभ्यासात जगभरचे वेगवेगळे गुणसूत्रे आढळली त्यात साऊथ एशियन गुणसूत्रांच्या लोकांचाही समावेश होता असा उल्लेख दिसतो. याझिदींचाही जेनेटीक स्टडी झाला असल्यास कल्पना नाही पण न झाला असण्याची शक्यता अधीक वाटते. इथे मितान्नी संस्कृती तसेच भारतातून युरोपात गेलेल्या रोमानी लोकांचाही विचार करता येऊ शकतो. किंवा लमाणी लोक हे मुळचे आंतरदेशीय व्यापार करणारे त्यांचाही संबंध असू शकत असेल तर सांगता येत नाही. खूप सगळ्या शक्यता असू शकतात आणि सार्‍याच चुकीच्याही असू शकतात. एकतर भारतीय संशोधकांनी त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास तेथे जाऊन केला असता तर त्या लोकांनी तेवढी गोपनीयता भारतीय लोकांसमोर कदाचित बाळगली नसती. खास करून त्यांच्या पारंपारीक कव्वल काव्यांचा अभ्यास करण्याची संधी कदाचित भारतिय संशोधकांनी घ्यावयास हवी होती. अर्थात शांततेच्या काळात भारतीय इतिहासकारानी या देशांमध्ये जेवढा अभ्यास करावयास होता तेवढा केला असे व्यक्तीशः मला वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

बहुधा पारसी धर्माशी संबंधित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शनी किंवा गणेशाची विघ्नकर्ते असून सुद्धा आपण आराधना करतो,

गणेश विघ्न कर्ता???? Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय जिथ पर्यंत माझी माहिती आहे, अभ्यासकांच्या मते गणेश ह्या देवतेची मुळात विघ्नकर्ता म्हणून आराधना होत असावी पण काळाच्या ओघात या देवतेस केव्हातरी विघ्नहर्त्याचे रूप आले. विघ्नकर्त्यांनी विघ्न आणू नये असा शनी आणि गणेशाच्या आराधने मागचा उद्देश असावा. (चु.भू.दे.घे.)
(संदर्भ देण्यासाठी अवधी लागेल तेव्हा मध्यंतरात कुणी संदर्भ दिल्यास आभारी असेन)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

ऐसीवरील हा संदर्भ आठवला.

>>अचानक स रा गाडगीळ यांनी लोकयताचा मराठीतून करून दिलेला परिचय वाचनात आला. त्यात गणपतीच्या शूद्रत्वाचे अधिकृत दाखले त्यांनी दिले आहेत. हे दाखले अनेक धर्माग्रंथांचे आहेत. त्यातले महत्त्वाचे म्हणजे मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य यांच्या स्मृती - हिंदू लॉचे महत्त्वाचे आधारग्रंथ.गणपती हा विघ्नकर्ता आहे हे दोन्ही ग्रंथ अधोरेखित करतात.
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संदर्भांसाठी धन्यवाद.

अनुषंगिक अवांतरः ऐसीवरील आधीच्या धाग्यातील धागा लेखकाची भूमिका पाहून गंमत वाटली. भारतातील एखादी व्यक्ती असा विचार करू शकते तर ज्या धार्मीक समुहांची भूमिकाच कट्टर असेल तर ते याझिदींच्या मागे लागले यांत नवल नाही. पण या प्रकारच्या तर्कातून सुटणारे आणि ऐसीच्या धाग्यातील चर्चेतून सुटलेले मुद्दे म्हणजे निर्गुण निराकार एकेश्वरवादातही बर्‍याचदा इश्वराची स्वतःची संकट आणण्याची क्षमता मान्य केली जात असावी. जन्ममरणाच्या फेर्‍यांच्या संकल्पना असोत नर्क संकल्पना सुद्धा शेवटी एक मानसिक दहशतच आहे. मांजर आडवी गेली तर सारखे विश्वासही मानसिक दहशतच असतात आणि या मानसिक असुरक्षीततेच्या दहशतीच्या भावनेतून मार्ग काढण्यासाठी आराधना स्वाभाविक मानवी स्वभाव असावा. इथे अंधश्रद्धांच समर्थन करावयाच नाही अंधश्रद्धांच निराकरणही करण्यास हरकत नाही पण एका समुह गटाच्या (अंध?)श्रद्धा दुसर्‍या गटावर अंधश्रद्धेचा आरोपकरत दुसर्‍या समुहाच्या जीवावर उठाव्यात हे आदर्श वाटत नाही.

गणेश ही देवता आरंभी विघ्नकर्ता असल्याचे संदर्भ असावेत म्हणून लेखाच्या ओघात उल्लेख केला खरे परंतु शैव आणि वैष्णव अनुयायांच्या सुप्त संघर्षातून अनुयायांनी एकमेकांच्या प्रतीकांवर नकारात्मक आरोप चिटकवले असतील का असे ही काही वेळा वाटून जाते. ऐसीवरील आधीच्या चर्चेतन कदाचीत हाही मुद्दा सुटला असावा असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

माहितीपूर्ण लेख.
----------------
हाय स्पीड जागतिकीकरणाच्या हव्यासामुळं काय काय उलथापालथ होत आहे याचा हिशेब ठेवायलाही कोणाला सवड नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

रोचक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0