बातमी

पुरस्कार

◆ : पुरस्कार ◆

राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार श्रीमती पुष्पा पागधरे यांना घोषित

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली घोषणा

 मुंबई दि.२८ सप्टेंबर - राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात  गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावे दिला जाणारा २०१६-१७ चा पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका श्रीमती पुष्पा पागधरे यांना आज मुंबई येथे घोषित करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

गमभन

विंडोज एक्सपी पासून विंडोज १० पर्यंत कुठेही चालणारे... आणि मिलेनियम फॉन्टसबरोबरच युनिकोड फॉन्टसमध्येही चालणारी “फॉन्टफ्रिडम गमभन २०१७” ही आवृत्ती आता उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे आता आपण मिलेनियम सिरिजचे तब्बल ५० फॉन्टस तर वापरु शकालच पण सर्वच संगणकांवर उपलब्ध असलेल्या कोणत्याही युनिकोड फॉन्टसमध्येही आपल्या परिचयाच्या “इंग्लिश फोनेटिक” या किबोर्डमध्ये टाईप करु शकाल.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

CPEC आणि OBOR

China-Pakistan economic corridor (CPEC) आणि One Belt One Road (OBOR) ह्या चीन‌क‌डून‌ पुढे आण‌ण्यात‌ आलेल्या दोन‌ म‌ह‌त्त्वाकांक्षी योज‌नांव‌र‌ स‌ध्या ब‌रीच‌ साध‌क‍बाध‌क‌ च‌र्चा होत‌ आहे. CPEC चे त‌प‌शील‌ 'डॉन‌' वृत्त‌प‌त्राम‌धील‌ ह्या लेखाम‌ध्ये पाह‌ता येतील‌. OBOR साठी हा विकिपीडिया लेख‌ प‌हा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

चार्वाक‌, च‌क्र‌ध‌र‌ आणि चांडाळ

दै. लोक‌स‌त्ता म‌धील ही बात‌मी वाचलीत का?

http://www.loksatta.com/anvyartha-news/kerala-congress-chief-mm-hassan-w...

या लेखात उधृत केलेला गणंग विशिष्ट धर्माचा असला तरी ही प्रवृत्ती दुर्दैवाने सार्वत्रिक आहे आणि हिंदू धर्मात प्रचंडच. लेखाच्या शेवटी मला यापूर्वी माहिती नसलेले चक्रधरस्वामींचे मासिक पाळीबद्दलचे आठशे वर्षांपूर्वीचे बोल:

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

१५ वे गिरिमित्र संमेलन - ‘गिर्यारोहण आणि महिला’

नमस्कार,

महाराष्ट्रातील तमाम भटक्यांचं हक्काचं व्यासपीठ असणाऱ्या गिरिमित्र संमेलनाचे हे १५ वे वर्ष ! संमेलन दि. ९ व १० जुलै २०१६ या दिवशी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे संपन्न होणार असून ते यंदा एका नव्या स्वरुपात साजरे होणार आहे. यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे - 'गिर्यारोहण आणि महिला'.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश

इथे ही बातमी वाचण्यात आली.

बातमी नुसार २७ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सरकारी कोशाचे प्रकाशन होणार होते.

डॉ. अनुपमा उजगरे यांनी हा कोश संपादित केला आहे. यामध्ये विविध पाककृती देण्यात आल्या आहेत. बातमी उत्सुकता चाळवणारी आहे. परंतु मला काही प्रश्न विचारयचे आहेत ते असे :

१. आपल्यापैकी कुणाला हा कोश प्रकाशित झाला आहे का याविषयी माहिती आहे का?

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

संवादात्मक कार्यशाळा (फक्त पुणे)

खास नवीन आणि उदयोन्मुख लेखकांसाठी , नुक्कड सादर करीत आहे 'संवादात्मक कार्यशाळा !' मराठी साहित्य परिषद , पुणे , यांच्या संयुक्त विद्यमानाने, आपल्यातल्या लेखकासाठी!

नाव नोंदणी - http://goo.gl/forms/sKCHbNZchh

दिनांक - १९ डिसेंबर २०१५, वेळ सायं ६.३० ते ८
महाराष्ट्र साहित्य परिषद हॉल , टिळक रोड , पुणे

(टीप : नाव नोंदणी आवश्यक आहे , हा उपक्रम केवळ पुण्यातील होतकरू लेखकांसाठी मर्यादित आहे. तुमच्या शहरात लवकरच येत आहोत!)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

लवासाचा 'आदर्श' घोटाळा

(लवासाचे 'प्रकरण' बातम्यात व टीव्हीवर झळकत असल्यामुळे या पूर्वी इतरत्र प्रसिद्ध झालेला हा लेख पुनः एकदा वाचकांच्या माहितीसाठी देत आहे.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

जर्मनविंग्ज 4U 9525.. लॉक्ड इन ?!

जर्मनविंग्ज फ्लाईट नंबर फोर-यू-नाईनर फाय टू फाय या उड्डाणाच्या आल्प्समधे झालेल्या क्रॅशला फॉलो करण्यासाठी ही जागा आहे. अपडेट्स वेगाने येताहेत. काही ऑब्सोलीट होताहेत आणि काही वेगळ्याच दिशेला नेताहेत. संकलनाचा हेतू आहे.

लुफ्तांझा कंपनीची चाईल्ड कंपनी असलेली जर्मनविंग्ज १९९७ मधे सुरु झाली होती. आजरोजी कंपनीकडे जवळजवळ ऐंशी विमानं आहेत. त्यापैकी निम्मी एअरबस ए ३१९-१०० सीरीजची आहेत. उर्वरितांमधे निम्मी एअरबस ३२०-२०० सीरीज आणि निम्मी बंबार्डियर जातीची विमानं आहेत.

अपघातग्रस्त विमानाची जात: एअरबस ३२०-२११. रजिस्ट्रेशन नंबर D- A I P X (डेल्टा - अल्फा इंडिया पापा एक्सरे)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - बातमी