महाराष्ट्र विधानसभा निवडणूका २०१४

महाराष्ट्र विधानसभा निवडणूका २०१४ च्या अनुषंगाने मला पडलेले काही प्रश्न. तुम्हाला या प्रश्नांवर काय वाटते आणि तुमचे अंदाज काय असतील हे जाणून घ्यायला आवडेल. सर्वाधिक बरोबर अंदाज वर्तविणार्‍यास माझ्याकडून एक सरप्राईज गिफ्ट Smile

१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ?
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ?
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या.
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ?
५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ?
६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ?
७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ?
८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ?

उत्तरे शक्यतो युती आघाड्यांची घोषणा होण्याअगोदर द्यावी ही विनंती. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्री कोण होईल यावर चर्चा चालू राहू शकते.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? - वैयक्तिक दंभ बाजूला ठेवले तर एकत्र. विनाशकाले विपरितबुद्धी आठवली तर स्वतंत्र
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? - शिवसेना
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या.- नोटा, कारण नाही
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? - उत्तर क्रमांक १ प्रमाणे
५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? - नोटा, कारण राष्ट्रवादी
६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ?- वरीलपै़की कोणीही लढू नये असे वाटते.
७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ?- हर शाखपे उल्लू बैठे है, अंजाम-ए-गुलिस्तां क्या होगा
८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? - उपद्रवमूल्य

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ?- कल्पना नाही. कालच्या पोटनिवडणूक निकालानंतर चित्र बदलले आहे. भाजपला फार बेटकुळ्या दाखवता येणार नाहीत.
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ?- इतर मित्रपक्ष कोण हे ठाऊक नाही. रिपब्लिकन सेनेच्या बाजूने राहतील असे वाटते.
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या.- शिवसेना. आम्ही पूर्वीपण शिवसेनेला मत द्यायचो. भाजपशी युती केली म्हणून साथ सोडली होती.
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ?- एकत्र. पर्यायच नाही.
५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ?- पास
६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ?- माझ्या वाटण्याने काय होणार?
७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ?- पास
८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ?- पास

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

कालच्या पोटनिवडणूक निकालानंतर चित्र बदलले आहे. भाजपला फार बेटकुळ्या दाखवता येणार नाहीत.

\
याच्याशी सहमत. १३० जागा मिळाल्या तरी रग्गड.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

१९९९ आणि २००४ मध्ये याच दळभद्री पणाने युती ने सत्ता गमावली . मी भाजप आणि मोदी भक्त नाही . असलोच तर टीकाकार आहे . पण महाराष्ट्र पुरत बोलायचं झाल्यास आघाडी सरकार ला बदलण्याची नितांत गरज आहे . मग भले युती असो वा तिसरी आघाडी . साली साडेसाती पण साडेसात वर्षात जाते पण हे आघाडी सरकार १५ वर्षापासून डोक्यावर बसले आहेत . सेना भाजप ने हि संधी दवडली तर सलग ४ टर्म मिळवतील हे दरोडेखोर . मोदी , उद्धव , शहा यांना याची जाणीव असेल हि अपेक्षा

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

सेना भाजप ने हि संधी दवडली तर सलग ४ टर्म मिळवतील हे दरोडेखोर
बरोबर आहे. नव्या दरोडेखोरांना संधी मिळाली पाहिजे.
बादवे, सन्जोप रावांचे प्रश्न क्र. ६ चे उत्तर प्रचंड आवडले.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars