Skip to main content

दिवाळी अंकाकडून अपेक्षा.

ऐसी अक्षरेच्या दिवाळी अंकाकडून असलेल्या अपेक्षा आणि त्याची पूर्ती याविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा काढण्यात आला आहे.
या वर्षीचा दिवाळी अंक आतापर्यंत आलेल्या लेखांवरून अपेक्षा वाढवणारा आहे, अंक नुसता चाळलाच आहे पण श्री. फारएण्ड यांची थोर मुलाखत आणि अमुक यांची चित्रे अतिशय उल्लेखनीय आहेत हे लगेचच नमूद करते.
अमुक यांचे मुखपृष्ठ तर या वर्षीच्या विषयाशी अतिशय सुसंगत आणि समर्पक आहे, मुखपृष्ठावर प्रतिक्रिया देता येत नाहीत या गोष्टीने मात्र हिरमोड झाला. इतके सुंदर आणि कल्पक मुखपृष्ठ बनविल्याबद्दल अमुक यांचे आभार आणि अभिनंदन!

वामा१००-वाचनमा… Wed, 15/10/2014 - 02:13

कवितांचा ठळक अभाव जाणवत आहे.
_______
अन्य जे काही प्रकाशित झालेल साहीत्य आहे ते निव्वळ द-र्जे-दा-र आहे!!!
__________
कथावाचनाचा प्रयोग अभिनव वाटला.
__________
रेखाचित्रे सुंदर आहेतच, मुखपृष्ठ फारच देखणे आहे.

ऋषिकेश Thu, 16/10/2014 - 11:49

In reply to by वामा१००-वाचनमा…

कवितांचा ठळक अभाव जाणवत आहे.

या तृटीबद्दल सहमत आहे.
मात्र या तृटीचे वाटेकरी आपण सारे आहोत. ऐसीकरांनी / ऐसीबाहेरूनही इतर उत्तमोत्तम लेखन ज्या प्रमाणात (व ज्या प्रतीचे) आले, त्या तुलनेत त्या दर्जाच्या किंवा नेहमीच्यापेक्षा वेगळ्या मांडणीच्या आणि तितक्या संख्येने कविता आल्या नाहीत.

फक्त कविता हव्यात म्हणून त्याचा मारून मुटकून एक विभाग बनवणे प्रशस्त वाटेना.

=======

तरीही, काही मोजक्या कविता अंकात अजूनही समाविष्ट होण्याची शक्यता आहे. अनुक्रमणिकेत दिलेले लेखन नक्की येणार असले तरी यादी अजून सान्त नाही ;)

==
आणि मोकळ्या अभिप्रायाबद्दल सगळ्यांचेच (आणि धाग्याबद्दल रूची यांचे) आभार!

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 15/10/2014 - 01:51

पूर्ण अंक प्रकाशित होण्याआधीच मी हा प्रतिसाद देणं कदाचित विचित्र वाटेल.

मुलाखतींवर काम करताना एक गोष्ट जाणवली; बोलताना आवाजाचे चढउतार होतात, हालचालींवरून काही गोष्टी टिपल्या जातात, त्या लेखनात दाखवता येतातच असं नाही. आंतरजालाचं माध्यम वापरताना ही सोयही आहे, पण पुरेशी पूर्वतयारी केली नसल्यामुळे या वर्षी हे करता आलं नाही. पुढच्या वर्षी हे करता येईल, अशी आशा आहे.

शिवाय मुद्रितशोधकांचे कष्टही कमी होतील.

मेघना भुस्कुटे Wed, 15/10/2014 - 10:08

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

...मुद्रितशोधकांचे कष्टही कमी होतील

ऑडिओ फाइल्सचा ऑप्शन वापरला पाहिजे, खरंय. पण फक्त ऑडिओ फाइल्सवर थांबू नये, मजकूरही द्यावा. ऐकण्यापेक्षा वाचनाला प्राधान्य देणारे अनेक लोक असतात. (शिवाय माझ्या पोटावर पाय आणणार्‍या गोष्टी मी बर्‍या सहन करीन!)

त्यानं मुद्रितशोधकांचे कष्ट कमी होतील. पण ऑडिओ एडिट करावा लागेलच. शिवाय ज्याची मुलाखत आहे, त्या व्यक्तीकडून तो मंजूर करून घेणं हे मजकुराहून किचकट असणार.

हारुन शेख Wed, 15/10/2014 - 12:17

मुखपृष्ठावरचं चित्र खरोखर अतिशय कल्पक आहे. शिकारीसाठी मागावर असलेली घार आणि तिच्यापासुन आपले रक्षण करू बघणारा छोटया पक्ष्यांचा विशाल थवा. त्या थव्यातली गतिमानता आणि शक्ती थेट जाणवते आहे. ती घार या समूहशक्तीपुढे थबकल्यासारखी वाटते आहे. खाली सुकलेल्या रक्ताच्या लाल रंगातली 'च ळ व ळ' ही अक्षरं दर्शवतात की कुण्या एका किंवा जास्त पक्ष्यांना बलिदान करावे लागेल पण तसे असुनही एकत्र येऊन निर्धाराने संकटाचा सामना करण्याची समूहाची प्रेरणा मृत्युच्या भितीपुढे अजिंक्य आहे. अप्रतिम.

अंक दर्जेदार वाटतोय. कवितांची उणीव मलाही जाणवतेय.

वामा१००-वाचनमा… Wed, 15/10/2014 - 19:13

In reply to by हारुन शेख

हारुन शेख आपण सुंदर अन्वयार्थ लावला आहे चित्राचा. मला जो अर्थ लागला होता तो असा की - या चळवळीत एक एक पक्षी सामील होऊ घातला आहे अन चळवळ (थवा) अधिकाधिक बळकट अन बलाढ्य होत आहे :)

दोन्हीही फिट्ट बसतायत.

मी Wed, 15/10/2014 - 19:28

अंक उत्तम आहे, अपेक्षेप्रमाणे आहे. उल्लेख करण्यासारखे म्हणजे आरटिपी बद्दल माहिती सगळ्यात जास्त आवडली, त्याबद्दल अदितीचे विशेष आभार आणि त्यानंतर करंदिकरांचे भाषण आवडले, त्याबद्दलही आभार.

घनु Thu, 16/10/2014 - 09:24

अमुक यांचे मुखपृष्ठ तर या वर्षीच्या विषयाशी अतिशय सुसंगत आणि समर्पक आहे, मुखपृष्ठावर प्रतिक्रिया देता येत नाहीत या गोष्टीने मात्र हिरमोड झाला. इतके सुंदर आणि कल्पक मुखपृष्ठ बनविल्याबद्दल अमुक यांचे आभार आणि अभिनंदन!

अगदी हेच म्हणायला आलो होतो. बाकी अंक वाचायचा आहे अजून, पण वर वर चाळता उत्सुकता नक्कीच वाढली आहे. दिवाळी अंकावर काम करणार्‍या सर्वांचे आभार आणि धन्यवाद!
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!

ऋषिकेश Thu, 16/10/2014 - 11:52

In reply to by घनु

अमुक यांचे मुखपृष्ठ तर या वर्षीच्या विषयाशी अतिशय सुसंगत आणि समर्पक आहे,

अतिशय सहमत आहे.

त्या थव्यात दिसणारी भारताच्या आकाराची/नकाशाची झलक चित्राला सलाम करायला भाग पाडते!

सलाम अमुक!

मेघना भुस्कुटे Thu, 16/10/2014 - 16:12

अंक आशयाच्या बाबतीत भरगच्चबिरगच्च आहे. पण अमुकरावांची चित्रं - आणि अर्थातच मुखपृष्ठ - विशेष आवडली. शिवाय कुठूनतरी कविता पैदा करून एक आपलं कवितेच्या कुंकवाचं पुसटसं बोट टेकवायचं, असला प्रकार केला नाहीय, तेही आवडलं. (इतक्यात हे बोलायला नको खरं तर. यायची मागाहून एखादी डौलदार कविता आणि माझी गोची व्हायची. असो.)

बादवे, फारेण्डाच्या लेखाची अभिवाचनी आवृत्ती ऐकायला (किंवा खयाली पुलावच पकवायचे, तर का नाही? स्पूफीय आवृत्ती पाहायला) अजूनच धमाल आली असती असं आता वाटतंय. हाही पर्याय चोखाळून बघा बॉ पुढच्या वर्षी.

वामा१००-वाचनमा… Thu, 16/10/2014 - 19:58

पण दिवाळी अंक असा ट्प्प्याट्प्प्याने प्रकाशित करत जाणे प्रचंड अभिनव अन सुंदर कल्पना आहे. रोज - आज फुलबाजी की भुईनळा , भुईचक्र की अ‍ॅटमबॉम्ब अशी वाट पहाण्यास उद्युक्त करणारी कल्पना फार आवडली.

सुवर्णमयी Sat, 18/10/2014 - 19:12

दिवाळी अंक अतिशय देखाणा आणि वाचनीय आहे असे अनुक्रमणिकेवरूनच वाटतय. जे वाचल ते आवडल. अंक पूर्ण वाचणे ही एक मेजवानीच.
ऐसीच्या सर्व टीमचे अभिनंदन!
शुभेच्छा
सोनाली जोशी

अमुक Wed, 22/10/2014 - 10:29

मुखपृष्ठ तर या वर्षीच्या विषयाशी अतिशय सुसंगत आणि समर्पक आहे
...........स्नेहापोटी एक वेगळा धागा काढल्याबद्दल धन्यवाद !

'हारुन शेख' आणि 'अपुली-गपुली' या दोहोंनी दिलेला अर्थान्वय अपेक्षित होता. पक्ष्यांचा थवा भारतासारख्या आकाराचा आहे, हे मात्र ऋषिकेश यांच्या प्रतिक्रियेनंतरच जाणवले. :)
'चळवळ'चा रंग म्हणजे सुकलेले रक्त वगैरे नसून अंकाच्या एकूण रंगसंगतीला पूरक असावा म्हणून निवडला.

दिलेल्या तीन-चार पर्यायांतून हेच चित्र मुखपृष्ठासाठी असावे, हे शेवटी अंकाच्या संपादक/व्यवस्थापक मंडळाने ठरविले. त्याबद्दल त्या सर्वांचेही आभार.