संकेतस्थळ
२०१५च्या दिवाळी अंकासंबधात काही प्रश्न
Taxonomy upgrade extras
पिवळा डांबिस ह्यांच्या 'प्लेबॉय'चे साहित्यिक गोमटेपण' ह्यावर दिलेल्या प्रतिक्रियेमधून पुढील विचारांना चालना मिळाली.
'ऐसी'च्या २०१५ दिवाळी अंकातील आजपर्यंत प्रकाशित झालेले लेखन पाहिले आणि असे लक्षात आले की काही लेखक येथे केवळ दिवाळी अंकापुरतेच आलेले दिसतात. ह्या लेखकांचा 'ऐसी'मध्ये अन्य कसलाहि सहभाग - उदा. अन्य दिवाळी अंकाबाहेर लेखन, प्रतिसाद इत्यादि. एरवी येथे कधीच न दिसलेले हे लेखक अचानक धूमकेतूसारखे आज येथे कसे उगवले? हा दिवाळी अंक 'ऐसी'च्या सदस्यांच्या लेखनासाठी आहे ना?
ह्याची कमीत कमी दोन उत्तरे मला सुचतात. काहींनी (उदा. मन्या जोशी, पंकज भोसले, शाहू पाटोळे) ह्या लेखकांनी एकतर गेल्या एकदोन दिवसांपूर्वीच आपापले लेख संपादकांकडे पाठवले आणि संपादकांना ते गुणवत्तेने इतके उच्च वाटले की त्यांनी तत्काल दिवाळी अंकात त्यांचा समावेश करून 'ऐसी'च्या सदस्यांना उपकृत करायचे ठरविले. दुसरी शक्यता अशी की संपादकांना ह्या गुणवान लेखकांची उपस्थिति 'ऐसी'च्या दिवाळी अंकात असावी असे मनापासून वाटले आणि त्यांनी ह्या लेखकांच्या मागे लागून त्यांच्याकडून लिखाण मिळविले.
ह्या दोन्ही पर्यायांना माझा आक्षेप आहे. दिवाळी अंकासाठी साहित्याची मागणी करणारा लेख येऊन गेल्यास काही महिने होऊन गेले. त्यात एक कालमर्यादा घालून दिली होती. विशेष गुणवत्तेच्या लेखनाच्या बाबतीत संपादकांनी मोडायलाहि माझी हरकत नाही पण मग अशी अपेक्षा निर्माण होते की अशी सवलत दिलेले लेख त्या गुणवत्तेचे असावेत. हे लेख तसे आहेत का?
दुसरा पर्याय म्हणजे संपादकांनीच कोणाच्या मागे लागून त्यांचे लेखन मिळविले. येथेहि तोच आक्षेप. असे लेखक काही अद्वितीय प्रतिभेचे असले तर एकवेळ चालेल पण तसे येथे आहे का? दुसरे असे की 'अमुक लेखन वाचा' असे 'ऐसी'च्या सदस्यांना आपल्या अधिकारात अनाहूतपणे सांगण्याचा अधिकार संपादकांना कधी मिळाला?
'ऐसी'ला धरून असलेले कैक सदस्य येथे नित्याने मूळ लेखन आणि प्रतिसाद देऊन संस्थळ चालू राहण्यास सहभाग देतात. कोणीतरी बाहेरचा अचानक आणून 'त्याचे लिखाण तुम्ही आता वाचा' हे त्या सदस्यांवर लादणे योग्य वाटत नाही. पूर्वी जाहीर करून एका विवक्षित विषयावरचा लेखसंग्रह (Anthology) काढण्यातहि काही वावगे नाही पण तो इरादा पहिल्यापासून सदस्यांच्या पुढे ठेवला पाहिजे.
हे लिहिण्यापूर्वी अशा काही 'नव्या' लेखकांची मी गोळा केलेली माहिती खाली दर्शवीत आहे.
लेखक - मन्या जोशी
लेख - मन्या जोशीच्या कविता
संग्रह अथवा पूर्वप्रकाशन - ’ज्याम मजा’ संग्रह
’ऐसी अक्षरे’ सदस्यत्व - २ दिवस १३ तास
लेखक - पंकज भोसले
लेख - प्लेबॉयचे साहित्यिक गोमटेपण
संग्रह अथवा पूर्वप्रकाशन - लोकसत्ता
’ऐसी अक्षरे’ सदस्यत्व - २० तास ४५ मिनिटे
लेखक - शाहू पाटोळे
लेख - बहात्तरच्या दुष्काळानंतरची ग्रामीण खाद्यसंस्कृती
संग्रह अथवा पूर्वप्रकाशन - ’अन्न हे अपूर्ण ब्रह्म’ हे पुस्तक
’ऐसी अक्षरे’ सदस्यत्व - २१ तास ४ मिनिटे
लेखक - मुकुंद कुळे
लेख - नवी गाणी नवा बाज
संग्रह अथवा पूर्वप्रकाशन - http://aadital.blogspot.com/
’ऐसी अक्षरे’ सदस्यत्व - १ दिवस २१ तास
लेखक - मुग्धा कर्णिक
लेख - चाळ नावाची गचाळ वस्ती
संग्रह अथवा पूर्वप्रकाशन - लोकसत्ता
’ऐसी अक्षरे’ सदस्यत्व - १ वर्ष ३ आठवडे
(येथे थोडे अधिक. ह्या लेखिकेचे ह्यापूर्वीचे एकमेव लिखाण म्हणजे १ वर्षांपूर्वीच्या २०१४ च्या दिवाळी अंकातील ’चळवळ : व्यक्ती आणि समष्टी’ हा १४ ऑक्टोबर २०१४ ला प्रकाशित झालेला लेख. त्या घटनेलाहि आज १ वर्षे ३ आठवडेच झालेले आहेत.)
लेखक - सचिन कुंडलकर
लेख - वॉकमन
संग्रह अथवा पूर्वप्रकाशन - लोकसत्ता २००९
’ऐसी अक्षरे’ सदस्यत्व - २ वर्षे १ आठवडा
(येथे थोडे अधिक. ह्या लेखकाचे ह्यापूर्वीचे एकमेव लिखाण म्हणजे २ वर्षांपूर्वीच्या २०१३ च्या दिवाळी अंकातील ’माझा परिसर, माझा कलाव्यवहार' हा २८ ऑक्टोबर २०१३ ला प्रकाशित झालेला लेख. त्या घटनेलाहि आज २ वर्षे १ आठवडाच झालेला आहे. २०१४च्या दिवाळी अंकात ह्या लेखकाने ड्रॉप घेतलेला दिसतो!)
लेखक - सलील वाघ
लेख - सलील वाघच्या कविता
संग्रह अथवा पूर्वप्रकाशन - 'सध्याच्या कविता, टाईम अँड स्पेस कम्युनिकेशन प्रकाशन, २००५'
’ऐसी अक्षरे’ सदस्यत्व - २ वर्ष २७ आठवडे
- Read more about २०१५च्या दिवाळी अंकासंबधात काही प्रश्न
- 49 comments
- Log in or register to post comments
- 23753 views
संस्थळाबद्दल काही आकडेमोड.
Taxonomy upgrade extras
काही गृहितकं -
१. ऐसी हे एक फोरम आहे. तेव्हा इथे चर्चा होणं किंवा लेखावर प्रतिक्रिया देणं हे सगळ्यात जास्त अपेक्षित आहे. तेव्हा फोरम किती "जिवंत" आहे ते तपासायला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत-
अ) इथे येणारे नवीन लेख
ब) लेखांवर होणार्या चर्चा.
अर्थात, अ) पेक्षा ब) नेहेमीच जास्त असणार आहे, त्यामुळे ब) ची माहिती ह्यासाठी जास्त मोलाची असेल.
अ) नक्कीच महत्त्वाचं आहे, पण इथली बरीचशी अॅक्टिव्हिटी ही प्रतिक्रिया आणि प्रतिसाद-उप-उप-उप प्रतिसाद ह्या स्वरूपाची असल्याने अ) चा अभ्यास आपण थोडा नंतर करू.
.
- Read more about संस्थळाबद्दल काही आकडेमोड.
- 30 comments
- Log in or register to post comments
- 14992 views
अजोंना अनावृत्त पत्र
Taxonomy upgrade extras
व्यवस्थापकः हे लेखन इथे हलवले आहे.
- Read more about अजोंना अनावृत्त पत्र
- 2395 views
मी पाहिलेला ऐसी अक्षरे दिवाळी कट्टा
Taxonomy upgrade extras
व्यवस्थापकः
मी यांनी केलेल्या पुढिल नेमक्या सुचवणीला नव्या धाग्यात बदलत आहोत. एकानेच वृत्तान्त लिहून एकाच नजरेने कट्ट्याकडे बघण्यापेक्षा अशा प्रकारचा वृत्तान्त वाचायला अधिक मजेशीर असेल असे वाटते. तेव्हा येऊ द्यात तुमच्या शैलीत, तुमच्या शब्दात तुम्ही पाहिलेला ऐसी अक्षरे कट्टा.
=======
कट्टा वृत्तांत कसा द्यावा याबाबत काही चिंतन -
१. क्राऊड सोर्सिंगच्या धर्तीवर सगळ्यांनी मिळून वृत्तांत द्यावा, सगळ्यांचे परिप्रेक्ष्य... किमान आणि कमाल एक-एक परिच्छेद आला तरी चालेल.
२. फोटोंना खुमासदार कॅप्शन्स सुचवाव्यात.
-------
- Read more about मी पाहिलेला ऐसी अक्षरे दिवाळी कट्टा
- 94 comments
- Log in or register to post comments
- 38705 views
दिवाळी अंकाकडून अपेक्षा.
Taxonomy upgrade extras
ऐसी अक्षरेच्या दिवाळी अंकाकडून असलेल्या अपेक्षा आणि त्याची पूर्ती याविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा काढण्यात आला आहे.
या वर्षीचा दिवाळी अंक आतापर्यंत आलेल्या लेखांवरून अपेक्षा वाढवणारा आहे, अंक नुसता चाळलाच आहे पण श्री. फारएण्ड यांची थोर मुलाखत आणि अमुक यांची चित्रे अतिशय उल्लेखनीय आहेत हे लगेचच नमूद करते.
अमुक यांचे मुखपृष्ठ तर या वर्षीच्या विषयाशी अतिशय सुसंगत आणि समर्पक आहे, मुखपृष्ठावर प्रतिक्रिया देता येत नाहीत या गोष्टीने मात्र हिरमोड झाला. इतके सुंदर आणि कल्पक मुखपृष्ठ बनविल्याबद्दल अमुक यांचे आभार आणि अभिनंदन!
- Read more about दिवाळी अंकाकडून अपेक्षा.
- 17 comments
- Log in or register to post comments
- 8412 views
ऐसी अक्षरे दिवाळी कट्टा: १ नोव्हेंबर
Taxonomy upgrade extras
.... हां, तर -
कट्ट्याची तारीखः १ नोव्हेंबर
वेळ: सकाळी ९:३० १०:३० वाजल्यापासून लोक कंटाळून पांगेपर्यंत
ठिकाणः वहुमान कॅफे, पुणे स्टेशनजवळवाडेश्वर, फर्ग्युसन रोड
ज्यांना जमत असेल, त्यांनी जरूर या.
जमत नसल्यास, जमवा :)
- Read more about ऐसी अक्षरे दिवाळी कट्टा: १ नोव्हेंबर
- 64 comments
- Log in or register to post comments
- 27336 views
ऐसीअक्षरे दिवाळी कट्टा - प्राथमिक चर्चा
Taxonomy upgrade extras
दिवाळीच्या आधीच्या आठवड्यात (११/१२ किंवा १९/२० ऑक्टोबर) एखादा जंगी कट्टा करायचा झाल्यास कुणी इंट्रेष्टेड आहे का?
पुणे किंवा ठाणे किंवा मुंबई, सोईची तारीख (अनेकांना नोव्हेंबर वा डिसेंबरात सोईचं असल्यास तशी तारीख), वेळ, जागा... सगळंच लोकसहभागानुसार ठरवता येईल.
त्या सुमारास गब्बर, अमुक, अपरिमेय ही मंडळी भारतात येणार असल्याचं ऐकलं आहे. इतरही कुणी असतील, तर सांगा.
- Read more about ऐसीअक्षरे दिवाळी कट्टा - प्राथमिक चर्चा
- 252 comments
- Log in or register to post comments
- 55552 views
आगामी कार्यक्रम/उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - १
ऐसीचे कट्टे हा एक धमाल अनुभव असतो हे आत्तापर्यंत झालेल्या दोन मोठ्या कट्ट्यांमध्ये भाग घेतलेल्यांना आणि वृत्तांत वाचलेल्यांना समजलं असेलच. पण दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.
Taxonomy upgrade extras
- Read more about आगामी कार्यक्रम/उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - १
- 102 comments
- Log in or register to post comments
- 32730 views
कॉपीराइट
Taxonomy upgrade extras
नित्याप्रमाणे विकिप्रकल्पांसाठी धागा असल्यामुळे आपले लेखन प्रताधिकारमुक्त होत असल्याचे गृहीत धरले जाईल.
संदर्भ धागा :देवनागरीत लिपीचिन्हे नसलेली उच्चारणे कोणती ?
या कारणाने माझे इतर प्रतिसाद मी वेगळा धागा बनवून त्यात देण्याची शक्यता आहे.
संदर्भ उपरोक्त धाग्यास आलेला एक प्रतिसाद
- Read more about कॉपीराइट
- 2 comments
- Log in or register to post comments
- 4266 views
ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०१४ - लेखनासाठी आवाहन.
Taxonomy upgrade extras
नमस्कार,
सालाबादप्रमाणे यंदाही ऐसीचा दिवाळी अंक काढण्याचं घाटतं आहे. त्यासाठी ऐसीच्या सर्वच सदस्यांकडून लेखन मागवण्यासाठी हे आवाहन.
- Read more about ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०१४ - लेखनासाठी आवाहन.
- 22 comments
- Log in or register to post comments
- 12417 views