चळवळ : व्यक्ती आणि समष्टी

चळवळ : व्यक्ती आणि समष्टी

लेखिका - मुग्धा कर्णिक

वयाच्या पंचविसाव्या वर्षी मी 'अॅटलस श्रग्ड' ही आयन रँडची कादंबरी वाचली. तोवर आयन रँडच्या वाटेला जायचंच नाही- ती एक खतरनाक भांडवलशाहीवादी लेखिका आहे, किडकी आहे, साम्यवादावर वाट्टेल ती टीका करते; वगैरे ज्ञान इंग्रजी माध्यमांतून शिकलेल्या कॉम्रेड्सनी दिले होते. 'रँड कसली रांडच!' इथपर्यंत टीकेची पातळी गेली होती. 'फाउंटनहेड'चा हीरो कसा समाजविघातक असूनही त्याचं उदात्तीकरण केलंय, वगैरेही सांगितले जात असे.

वय वर्षे १७ ते २१ या चार वर्षांच्या काळात मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट विचार, डायलेक्टिकल मटेरिअलिझम, व्हॉट इझ टु बी डन?, रेड आय़ ओव्हर चायना, गॉर्कीच्या कादंबऱ्या : मदर, चाइल्डहूड ट्रिलॉजी, रशियन लेखकांपैकी तोलस्तोय, दोस्तोवस्की वाचून झालेले. ज्येष्ठ तवारिश्श बंधूंचा आम्ही ऑर्वेल, कोस्लर, रँड वाचायला तसा विरोधच होता. आणि डाव्या विचारसरणीच्या एकतर्फी धुवाँधार चर्चांमध्ये ज्येष्ठांची श्रवणभक्ती करणे, हाच मुख्य भाग होता. त्यांना आडवं गेलेलं तसं चालत नसे. चिमण्या संघटनेतल्या पॉलिटब्युरोत ज्येष्ठ-कनिष्ठ उतरंडीचा देव्हारा व्यवस्थित सांभाळला जात असे. नेते म्हणजे जवळपास हाय अल्टारवरले धर्मगुरुच होते.

पहिला वाद झडला तो मी आस्वली नावाच्या गावात जाऊन आठवड्याचे तीन दिवस रहायला सुरुवात केल्यानंतर. 'ग्रामीण विकास' या नव्या विषयाला विद्यापीठात सुरुवात झालेली. तेव्हा पहिलं शिबिर घोलवडजवळच्या या गावात झालेलं. विद्यापीठाने सुरू केलेली एक योजना होती - 'कॉन्करंट स्टडी सर्विस स्कीम'. या स्कीममधून तिथे काही तरुण तिथे राहत होते. आठ दिवसांच्या शिबिरांतून एवढं कळलं की या गावाबद्दल, वारल्यांबद्दल तसं आपल्याला काहीच कळलेलं नाही. गोदाताई परुळेकरांची ही कर्मभूमी. इथे आपणही रहावं, काही शिकावं, पहावं; त्याबरोबरच कॉलेजचा अभ्यास काय होतच राहील, असा विचार होता. मी निर्णय घेतला होता. आपला प्रत्येक निर्णय कुणालातरी विचारून घ्यावा, कुणाची परवानगी काढावी; ही माझी वृत्तीच नव्हती. आईवडीलही स्वतंत्र मताचेच पुरस्कर्ते होते. पण चिमण्या संघटनेच्या इवल्या पॉलिटब्युरोची मात्र त्यांच्याशी विचारविमर्श (पक्षी: त्यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वांनी वागावे), अशी इच्छा असे. माझ्या हे गावीच नव्हते. मला जे करायचे ते मी करत राहिले. त्यानंतर मी माझा वेळ कसा वाया घालवते, वगैरे अनेकदा ऐकवून झाले होते. पण मी जन्मदत्त स्वातंत्र्य नेहमीच जपत आले होते. म्हटलं, जा रे!

त्यानंतर १९८० साली प्रौढ साक्षरता कार्यक्रमात मी भाग घेतल्यानंतर दुसरा वादाचा टप्पा आला. वीस वर्षांची होते मी तेव्हा. हे सगळे बूर्झ्वा विचारसरणीतून जन्मलेले कार्यक्रम आहेत आणि आपण त्यात भाग घेणं चूक आहे वगैरे. मी सांगितलेलं... मी चाळीत राहिलेय. तिथले लोक काय कसे असतात, ते मला माहीत आहे. आपण सर्वहारांबद्दल बोलतो, लुम्पेनायझेशन झालेल्या वर्गाबद्दल बोलतो, गरिबांबद्दल बोलतो; त्यांच्याबद्दल जवळून जाणून घ्यायची, ही एक संधी आहे मला. त्या प्रक्रियेत त्यातल्या काहींना अक्षरओळख देता आली तर त्यात वाईट काय आहे? कॉलेजपण बूर्झ्वा आहे, कॉलेजच्या इलेक्शन्सपण बूर्झ्वा आहेत- ते सगळं सोडून देताय का तुम्ही? तरीही त्यांनी निकराचा विरोध केला. टोमणेही चालत. शेवटी विद्यापीठ निवडणुकांच्या संदर्भात काहीतरी प्रचंडच वाद झाला. मी आणि धनंजय एकीकडे आणि पॉलिटब्युरो म्हणजे संघटनेची एक्झिक्युटिव कौन्सिल एकीकडे असं कट्टर भांडणच होतं ते. त्यानंतर आम्ही त्या संघटनेवर खाटकन् पूर्णविराम ठेवला.

सुरुवातीला मी यातून बाजूला झाले तेव्हा विचारसरणीपासून दूर गेले नव्हते. एकाच वेळी पोथीनिष्ठ आणि तरीही मूल्यांबाबत खोटेपणा करणाऱ्या माणसांपासून दूर गेले होते. त्यानंतरची पहिली नोकरी लागली तेव्हा अखेर 'अॅटलस श्रग्ड' हातात पडलं. तोवर कॉम्रेड कंपनीचा इतका विरोध का होता, हे जाणून घेण्यासाठी तरी आय़न रँडची पुस्तकं वाचायलाच हवीत, असं मनाने घेतलं होतं. अॅटलस श्रग्ड वाचून पूर्ण केलं आणि जाणवलं की बहुत काळ वाया घालवला आपण. तेव्हा पहिल्यांदा वाटलं की ही कादंबरी मराठीत यायला हवी. मीच करीन. मग रांगेने द फाउंटनहेड, वी द लिव्हिंग, अँथम, रोमॅन्टिक मॅनिफेस्टो, वर्च्यू ऑफ सेल्फिशनेस, कॅपिटॅलिझम - ऍन अननोन आयडियल; फ्लोरा फाउंटनच्या चौकातून सेकंड हॅन्ड पुस्तकांच्या ठेल्यांवरून विकत घेऊन वाचून काढली.

प्रथम वाचलं ते 'अॅटलस श्रग्ड'. त्यातल्या डॅग्नी टॅगार्ट, फ्रान्सिस्को, हेन्ऱी, जॉन गाल्ट, प्रोफेसर अॅक्स्टन यांच्या संवादातून व्यक्त झालेल्या आयन रँडच्या मूल्यविचाराने मनावर कब्जा केला. अर्थकारण-तत्त्वज्ञानापेक्षाही त्यातील वैयक्तिक नीतिमूल्यांच्या विचाराने मनात नकळत जमून असलेली अनेक जळमटे झाडून निघाली.

सगळ्यात महत्त्वाची भूमिका तिच्या लेखनाने माझ्या बाबतीत पार पाडली, ती म्हणजे- ‘लोक’ ही काहीतरी गोंडस, सदासर्वदा शिरसावंद्य म्हणून घ्यावी अशी चीज आहे, हे जे गृहीत धरलं जात होतं; त्याचं निराकरण झालं. प्रौढ साक्षरतेच्या वर्गासाठी झोपडपट्टीत फिरताना असो की आस्वलीला वारल्यांमधे फिरताना असो की गरीब मध्यमवर्गातल्या माझ्या चाळीत असो - लोक म्हणजे काही एकजिनसी प्रेम करण्यासारखी गोष्ट नाही हे कळलं. व्यक्ती म्हणून जे अगदी हिणकस असतात; मूल्यहीन असतात; आळशी, विकृत, मत्सरी, छळवादी, बुरसट वगैरे असतात; ते सगळे लोक लोकसमूहाचा भाग झाल्यानंतर सर्वहारा म्हणून एकदम सत्ता गाजवण्याच्या किंवा सारी साधनसंपत्ती मालकीची करण्याच्या लायकीचे कसे काय होतील; हा एक प्रश्न मनात सतत हलकेच गुरगुरत असायचा. डॉमिनिक फ्रँकनच्या तोंडी एक संवाद आहे - तो त्या काळात मला झटकन् भिडला होता.

“कसंय ना- आपली एकंदर मानवजातीबद्दलची कल्पनासुद्धा फार विचित्र आहे. आपण मानवजातीबद्दल बोलतो तेव्हा आपण एक धूसर, उदात्त चित्र मनात ठेवल्यासारखं बोलतो... काहीतरी गंभीर, भव्य कल्पना असते आपली. पण खरं म्हणजे आपल्याला माहीत असलेली मानवजात म्हणजे आपल्याला रोजच्या रोज भेटणारे लोक असतात. बघा त्यांच्याकडे. त्यांच्यापैकी कुणाबद्दल तरी काहीतरी गंभीर उदात्त भावना वाटते आपल्याला? हातगाडीवरच्या मालासाठी घासाघीस, भांडणं करणाऱ्या बायका; भिंतींवर काहीतरी घाणेरडं चितारून ठेवणारी नादान कार्टी; बेवडेबाजीप्रवीण लब्धप्रतिष्ठित किंवा त्यांचे आध्यात्मिक भाईबंद. हे खरंय की जेव्हा लोक थोडे दुःखात असतात तेव्हा त्यांच्याबद्दल थोडातरी आदर वाटू शकतो. काहीतरी आदर वाटण्यासारखं असतं त्यांच्यात. पण जेव्हा ते आनंदानं मौजमजा करीत असतात, तेव्हा पाहिलं तर?... तेव्हा त्यांचं खरं स्वरूप कळतं आपल्याला. स्वतःचा कष्ट करून कमावलेला पैसाही ते कुठल्यातरी फालतू करमणुकीवर ओततात आणि अतोनात पैसा असलेलेही काय करतात? सारं जग त्यांना खुलं असतं, पण ते जीव रमवण्यासाठी काय निवडतात? जरा बऱ्या दर्जाच्या गुत्त्यात पडतात एवढंच. ही घ्या तुमची मानवजात. मला दुरूनदेखील हात नाही लावायचा असल्या मानवजातीला.”

खरेच होते. समाजात मिसळून समाज पाहण्याच्या त्या दिवसांत लोकांमधल्या बहुतांश व्यक्तींबद्दल घृणाच अधिक उत्पन्न होत होती. झोपडपट्टीत फिरताना स्त्रीबद्दल अतिशय घाणेरडं बोलणारे लोक, आपापसांत गलिच्छ शिव्या देत बोलणारे भांडणारे लोक, दलित साहित्याच्या वाचनातून दिसणारे त्या त्या लेखकांना येणारे त्यांच्या आणि बाहेरच्या समाजातील लोकांचे विषण्ण करणारे अनुभव, अगदी वारली समाजातही गलिच्छ मनोवृत्तीची माणसे होतीच; शिवाय आपण आहे त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी काही प्रयत्न करावा असे वाटणाऱ्या व्यक्तींची तर प्रचंड वानवा होती. जे हलकट नव्हते ते निर्बुद्ध होते. नाहीच! लोकांत मिसळून काही काम करून पाहिलं तेव्हा माझ्या मनातला हा सरसहा पोथीनिष्ठ आदर मावळत गेलेलाच.

आणि हेही पाहत होते की माझे कॉम्रेड्स, विद्यार्थी संघटनेच्या पलीकडचे लोक हे पाहत नव्हते आणि पोथ्यांच्या पलीकडलं वाचतही नव्हते. खरं तर या चळवळींतल्या लोकांच्या वृत्ती-प्रवृत्ती, त्यांच्या नैतिकतेच्या कल्पनाही प्रश्न पाडत होत्या.

जॉन गाल्टच्या सुप्रसिद्ध भाषणाबरोबरच 'अॅटलस श्रग्ड'मधलं फ्रान्सिस्को डँकोनियाचं पैसा हे साऱ्या दुष्प्रवृत्तींचं मूळ आहे का?, यावरचं भाषणही मला खूप प्रभावित करून गेलं. किंबहुना डोक्यात चढलेल्या पैशाच्या धिक्कारावरचा उताराच मिळाला त्यातून. ते भाषण वाचण्यासारखं आहे. हॉवर्ड रॉर्कचा स्वतःच्या निष्ठेसाठी संघर्ष, हेन्री रिअर्डन, डॅग्नी टॅगार्ट यांचा संघर्ष यांची जातकुळी माझ्या मनात उभ्या राहणाऱ्या संघर्षाला फार जवळची वाटू लागली. त्यांच्या मूल्यांची झिरपणं मनात होत गेली. 'तुम्ही हे कशावरून सांगू शकता?, तुम्ही हे कशावरून ठरवता?, तू कोण सांगणारी?', या प्रश्नांना तर प्रत्येक निर्णयक्षम माणसाला सामोरं जावं लागत असेल आणि त्यात उभ्या राहणाऱ्या संघर्षाला साम्यवाद, समाजवाद हे उत्तर निश्चितच नाही; हे तसं झटकन स्पष्ट होत गेलं वाचता वाचता आणि त्याच्याशी ताडून भोवतीचं जग पाहता पाहता.

माझ्या मनातल्या व्यक्तिनिष्ठ मूल्यविचाराला बळ देणारे ते सारे लेखन होते. मार्क्सवादी विचारांना, चळवळीला माझ्या मनातून पूर्णविराम मिळाला. त्या विचारांपासून बाजूला पडल्याचा थोडासा अपराधगंड होता तो बाजूला पडला. मला आठवतंय, त्या दिवसांत एखादी नवीन वस्तू, नवीन कपडे घेतले तरीही अपराधी वाटायला लावणारी संघटनात्मक परिस्थिती होती, पण बंगाली सुती साड्या नवीन घेतल्या तर मात्र त्याचं स्वागत होत असे किंवा सुती कुडते घेतले तर ते युनिफॉर्ममध्ये बसत असे. आयन रँडच्या 'वी द लिविंग'मध्ये तीच परिस्थिती वाचायला मिळाली तेव्हा एकदम जिगसॉ पझल जुळल्यासारखं वाटलं. किरा, आन्द्रेईच्या व्यक्तिमत्त्वांनी मनावर खोल परिणाम केला. अन्यायाविरुद्धचा संताप, सत्याची चाड, स्वत्वाची जाणीव, अहंकार आणि स्वार्थ हे महत्त्वाचे मानवी गुण आहेत याची जाण, अशी मूल्ये तर स्वभावतःच होती. त्या मूल्यांचा पूर्ण जाणिवेनिशी आदर करायला आय़न रँडच्या लेखनातून शिकता आलं.

त्याच पाठोपाठ ऑरवेलचं 1984 आणि अॅनिमल फार्म वाचलं. पण या दोन्हीमधल्या काहीशा अतिशयोक्त किंवा उपहासात्मक शैलीपेक्षाही आर्थर कोस्लरची 'डार्कनेस ऍट नून' डोळे अधिकच उघडून गेली. साम्यवादाचा चष्मा अखेर उतरला. खांद्यावरचा मार्क्स आणि डोक्यावरची रशियन क्रांती, चिनी क्रांती खाली उतरून बासनात बसली.

पण तरीही विद्यार्थीजीवनात चळवळ आयुष्यात आली ते चांगलंच झालं. खूप अनुभव मिळाला. विविधांगी वाचन झालं. कधीच ज्या परिस्थितीशी, अनुभवांशी गाठ पडली नसती अशी परिस्थिती पाहायला मिळाली.

चळवळीत शिरणाऱ्या व्यक्ती आजूबाजूच्या परिस्थितीने अस्वस्थ असतात. काही उत्तरं हवीशी वाटतात, ती शोधावीशी वाटतात. ती चाकोरीतल्या जगण्यातून मिळणार नसतात. चाकोरीबाहेरचं जगण्यासाठी अनेक पर्याय आहेत. आपली आसक्ती, पॅशन काय?, हे शोधून काढून एकट्याने वाटचाल करणे हा एक पर्याय आणि सामूहिक कृतीची वाटचाल करणे हा दुसरा. पहिला पर्याय पहिल्यापासून करता आला तर फारच छान. पण सामूहिक वाटचालीतले व्यक्तित्व गिळून टाकणारे धोके टाळता आले तर तीही खूप काहीतरी शिकवून जातेच.

कोणत्याही प्रकारे व्यक्तिमत्त्व संपन्न होणे, बुद्धीत भर पडणे, विश्लेषक प्रज्ञा घडत जाणे हे मला महत्त्वाचे वाटते. ते चळवळीतल्या दिवसांतही सिद्ध होत राहिले आणि चळवळ सोडतानाही आणि सोडल्यानंतरही. खंत वाटावी असं काही वाईट, चळवळीत पडल्यानेही झालं नाही आणि सोडल्यानेही झालं नाही एवढं खरं.

एक मात्र नक्की. त्या दिवसांत ज्यांच्या-ज्यांच्याशी मैत्री झाली होती त्यांच्याशी पुन्हा कधीच मैत्री राहिली नाही. सारे स्वच्छपणे पुसूनच गेले. कुणाचा द्वेष वाटावा इतकेही संबंध राहिले नाहीत. अशी त्या एकूणच चळवळीतून मी स्वच्छपणे मुक्त झाले. पुन्हा कुणाचाही झेंडा किंवा अजेंडा खांद्यावर न घेण्यासाठीच.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3.714285
Your rating: None Average: 3.7 (7 votes)

प्रतिक्रिया

पहिल्या वाचनानंतर ... एकदम आवडला.

थांबा थांबा. दुसर्‍यांदा वाचतो व मग प्रतिक्रिया लिहितो.

+१

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

छान लेख. जगातल्या सगळ्या प्रश्नांचे मूळ हे अंधश्रद्धांमधे आहे अशा चळ्वळीतल्या सुरुवातीच्या मानसिकतेची आठवण झाली.

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सगळ्यात महत्त्वाची भूमिका तिच्या लेखनाने माझ्या बाबतीत पार पाडली, ती म्हणजे- ‘लोक’ ही काहीतरी गोंडस, सदासर्वदा शिरसावंद्य म्हणून घ्यावी अशी चीज आहे, हे जे गृहीत धरलं जात होतं; त्याचं निराकरण झालं. प्रौढ साक्षरतेच्या वर्गासाठी झोपडपट्टीत फिरताना असो की आस्वलीला वारल्यांमधे फिरताना असो की गरीब मध्यमवर्गातल्या माझ्या चाळीत असो - लोक म्हणजे काही एकजिनसी प्रेम करण्यासारखी गोष्ट नाही हे कळलं. ...डॉमिनिक फ्रँकनच्या तोंडी एक संवाद आहे - तो त्या काळात मला झटकन् भिडला होता.

“कसंय ना- आपली एकंदर मानवजातीबद्दलची कल्पनासुद्धा फार विचित्र आहे. ... जरा बऱ्या दर्जाच्या गुत्त्यात पडतात एवढंच. ही घ्या तुमची मानवजात. मला दुरूनदेखील हात नाही लावायचा असल्या मानवजातीला.”

हा विचार पटला नाही मला. हे म्हणजे जिथे बा भं ना करांविषयी पुढील ओळी सुचतात

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे ||४||

तिथे कोणाला तरी तेच हात नाकही पुसतात असे वाटावे या धर्तीचा मानवजातीबद्दलचा सिनीकल विचार मला वाटला.
_________________

पण चळवळींतून स्वतःची लेखिकेची झालेली व्यवस्थित उमटली आहे. तो हेतू चांगला साध्य झाला आहे.

ते कळलं नाही. चळवळीतला सहभाग आणि नंतर वाचनाने (आयन रँडच्या पुस्तकांनी?) त्यावर झालेला परिणाम किंवा मग अ‍ॅटलास श्र्ग्ड ह्या पुस्तकाने प्रभावित केल्यामु़ळे पटलेली चळवळीची व्यर्थता असं काहीसं स्वरूप वाटलं.
बाकी अपर्णाशी सहमत- लोक ही "गोंडस" गोष्ट म्हणून घेणं जितकं आदर्शवादी तेवढंच त्यांना मूल्यहीन,हिणकस म्हणणं दुसर्या टोकाचं आहे.

लोक ही "गोंडस" गोष्ट म्हणून घेणं जितकं आदर्शवादी तेवढंच त्यांना मूल्यहीन,हिणकस म्हणणं दुसर्या टोकाचं आहे.

हिणकस म्हंजे काय नेमके ते मला माहीती नाही.

पण मूल्यहीन म्हणणे हे अगदीच अयोग्य नाही.

मूल्य = That sum which anyone is voluntarily willing to pay for the "thing" of which you are trying to assess the मूल्य.

जर एखाद्या व्यक्तीस (किंवा तिच्या श्रमासाठी) कोणीही काहीही द्यायला तयार नसेल आणि व्यक्तीकडे कोणतीही संपत्ती नसेल तर ती व्यक्ती मूल्यहीन होते. व अशा अनेक व्यक्ती अस्तित्वात असतात (अपंग, वृद्ध, बालके सोडून देऊन जरी विचार केलात तरी).

(आता लगेच गब्बर फक्त पैशाचा विचार करतो व अर्थशास्त्रीय भाषेतून व एम्बीए च्या मानसिकतेतून बाहेर कधी येणार - असा प्रश्न विचारून टाकाच. )

(आता लगेच गब्बर फक्त पैशाचा विचार करतो व अर्थशास्त्रीय भाषेतून व एम्बीए च्या मानसिकतेतून बाहेर कधी येणार - असा प्रश्न विचारून टाकाच. )

छ्या, तुम्ही मराठी कधी शिकणार? मूल्य निराळं, किंमत निराळी.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ब्रिलियंट. आता तुम्ही - मार्क्स ने केलेली चूक गब्बर पण करतोय असे म्हणताय. ठीकाय. धन्यवाद देऊ का !!! बाय द वे .... हा सुद्धा डिस्क्लेमर लावणार होतो. पण माणसाचे मूल्य नेमके काय असा प्रश्न वाचक स्वतःस विचारेल व उत्तर माहीती नसल्यास प्राईस किती आहे याचा विचार करून मूल्याचा अंदाज बांधेल - असा विचार करून ....

अनेक लोक निगेटिव्ह वेल्थ घेऊन जन्मास येतात व आयुष्यभर तसेच राहतात ... त्यांना माहीतीच नसते त्याबद्दल .... जाऊदे.

>>How much will you pay me for treating you on par with myself ?

I will expect you to pay me . Blum 3

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

मूल्य या शब्दाची व्याख्या करताना "मूल्य" शब्द कसा काय वापरला आहे? व्याख्येत तोच शब्द येऊ नये. टायपो झालेला दिसतोय.
एनीवे त्यामुळे डोक्यावरुन गेले.

या कादंबर्यांचा सारांश तरी वाचायला पाहिजे असे वाटते, मूळ पुस्तकांची पृष्ठसंख्या पाहता धडकी भरते.

मूळ पुस्तकांची पृष्ठसंख्या पाहता धडकी भरते.

धनंजयकडून हे वाक्य आल्याबद्दल वरील प्रतिसादाला एक विनोदी श्रेणी का देऊ नये तेवढे कुणीतरी सांगा.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

छान लेख!
एखाद्या व्यक्तीच्या - त्यातही स्वत:च्याच- विचारसरणीतील प्रवास इतका नेमकेपणाने सांगता येणे कठीण आहे; कारण ती एक निरंतर नी हळूवार प्रक्रिया आहे. त्यातील ठळक माईमस्टोन्स नोंदवता येणे, आपले विचार बदलत आहेत हे स्वतःला जाणवणे फारसे कॉमन नसावे.
मान गये!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इंट्रेष्टिंग आहे. ही अशी स्थित्यंतरं वैचारिक बाबतीत अनुभवणं निश्चितच अधिक मुळापासून हलवणारं, अधिक श्रीमंत, अधिक खोल.

पण माझ्या अ-वैचारिक - उडाणटप्पू अनुभवांतही मला अशी बरीच स्थित्यंतरं आठवून गेली. अमुक एका काळात आपण लोकांच्या एका विशिष्ट गटासोबत असतो. त्या लोकांसोबत हिंडणं-फिरणं-संध्याकाळी फोनवर गप्पा मारणं-स्वप्नंही शेअर करणं-भांडणंतंटणं... सगळंच. दिवस बदलतात आणि आपण होतो की नव्हतो, इतके दूर होतो त्या लोकांपासून. पुन्हा कधी कर्मधर्मसंयोगानं गाठ पडलीच, तर 'काय बरं बोलायचं आता?' अशा लेबलाखालची अवघडलेली शांतता पार करताना तारांबळ उडते. त्याकरता मोठे मतभेद व्हायला लागतात, असंही नाही. लोक बदलतात आणि / किंवा आपण बदलतो आणि / किंवा परिस्थिती बदलते, बस.

अर्थात हे असं सगळ्याच लोकांच्या बाबतीत होत नाही. काही घट्ट मैत्र्या उरतात. राहतात. पण ते अपवादच म्हणायचे.

असले अनुभव आठवून या लेखाशी जोडून घेता आलं. मजा वाटली.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लेख आवडला. सर्वप्रथम आयन रँडच्या प्रसिद्ध कादंबर्‍यांची ओळख मला मुग्धा कर्णिकांनी केलेल्या अनुवादातूनच झाली. माझ्या वाचनाच्या आवडीवर वडिलांच्या ग्रंथसंग्रहाचा प्रभाव आहे. त्यामुळे घरातले गीता साने, गोदावरी परुळेकर, विनोबाजी यांबरोबर जीए, मर्ढेकरही वाचनात आले. इंग्लिश वाचायला सुरूवात केली तेव्हा आर- डॉक्युमेंट पासून "क्राईम अँड पनिशमेंट" ही वाचली . पण आयन रँड ही काही फार गंभीरपणे घेण्यासारखी लेखिका नाही असं वाटे. घरात तर तिची पुस्तकं नव्ह्तीच पण या गैरसमजामुळे लायब्ररीतुनही कधी घेतली नाही. अगदी काही महिन्यांपूर्वीच फाउंटनहेड वाचलं. अक्षरश: तो ठोकळा मी जिथे तिथे बरोबर नेत होते. वेळ मिळाला की काढून वाचत होते. भारावून जाण्याच्य वयात नव्हे तर कोणत्याही तत्वज्ञानापेक्षा जीवन फार गुंतागुंतीचं आणि निरूत्तर करणारं असतं हे सत्य उमजायला लागल्यानंतरच्या काळात मी हे वाचलं पण ते भावलं . माझ्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाल्यासारखी वाटली. शांत वाटलं .
त्यातून अनुवाद कसा करावा याचा एक उत्तम नमुना म्हणून या कादंबर्‍या खरचं वाचाव्यातच.

आता लेखाबद्द्ल,

लोक म्हणजे काही एकजिनसी प्रेम करण्यासारखी गोष्ट नाही हे कळलं. व्यक्ती म्हणून जे अगदी हिणकस असतात; मूल्यहीन असतात; आळशी, विकृत, मत्सरी, छळवादी, बुरसट वगैरे असतात; ते सगळे लोक लोकसमूहाचा भाग झाल्यानंतर सर्वहारा म्हणून एकदम सत्ता गाजवण्याच्या किंवा सारी साधनसंपत्ती मालकीची करण्याच्या लायकीचे कसे काय होतील.

हे अगदी पट्ण्यासारखचं . लोकसमूह हा वाईट गोष्टींच्या पटकन आहारी जातो. तेंडुलकरांच्या "शांतता" मधला समूहाचा अविष्कार आठवा. अगदी बेणारेंबद्द्ल सहानुभूती बाळगणारेही समुहाच्या हिंसकतेला आपापल्या पध्द्तीने व्यक्त करतात. खरंतर लोकसमूह हा अन्याय सहन करतो किंवा हिंसेच्या आहारी जातो.
अर्थात कोणतंही तत्वज्ञान ही दुधारी तलवार असते. त्याप्रमाणेच या तत्वज्ञानातही धोके आहेतच. कारण स्वतंत्र प्रज्ञा ही देणगी काही प्रत्येकाला मिळत नाही. मग समष्टीवाद अपरिहार्य ठरतो कारण त्यातून एक समूहशिस्त तरी पाळली जाते.

तरिही लेख अपूरा वाटला.

कोणत्याही प्रकारे व्यक्तिमत्त्व संपन्न होणे, बुद्धीत भर पडणे, विश्लेषक प्रज्ञा घडत जाणे हे मला महत्त्वाचे वाटते. ते चळवळीतल्या दिवसांतही सिद्ध होत राहिले. सामूहिक वाटचालीतले व्यक्तित्व गिळून टाकणारे धोके टाळता आले तर तीही खूप काहीतरी शिकवून जातेच.

तुम्ही काय शिकलात आणि चळवळीने दिलेले "काहीतरी" तर तुम्ही तुमच्या पुढच्या वेगळ्या मार्गावर वापरलं असेल तर त्याबद्द्ल वाचायला अधिक आवडलं असतं.
आताची पिढी व्यक्तीवादी आहे असं वाटतं पण वॉट्स ऍप, फे्सबु्क सारख्या माध्यमातून वेगळ्या प्रकारे समष्टीचाच प्रभाव वाढतोय याबद्द्लही काही हवं होतं. व्य्क्तीचे यश, समाधान याबद्द्लचे दृष्टीकोण हे त्या व्यक्तीचे राहीलेलेच नाहीत तर त्यावर सोशल साईट्स, जाहीराती, मार्केट्शरण मिडीया यांच्या प्रचंड प्रभाव आहे आणि तो न पडू देणं हे निव्वळ अशक्य आहे. यावरही तुमच्यासारख्या समष्टीच्या चळवळीतून भाडवलवाद, व्यक्तीवादाकडे गेलेल्याचे विचार असते, तर जास्त आवडलं असतं.

मला लेख का आवडला हे एवढ्या चांगल्या शब्दांत मला लिहिता आलं नसतं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रॅड चे उपलब्द्य सर्व साहीत्य वाचल्यानंतर म्हणजे अ‍ॅटलस श्रग्ड फाऊंटन हेड सहीत वुइ द लीव्हिंग रोमॅन्टीक मॅनीफेस्टो इ. धरुन तिच्या वेगळ्या विचारांच गारुड मनावर चढण अत्यंत स्वाभाविक बाब आहे. याच एक मुख्य कारण मुळ रशियन असलेल्या रँड ने डोस्टोव्हस्की आदिंच्या परंपरेत फिलॉसॉफीला किंवा एका आखीव रेखीव विचारसरणी ला अत्यंत तार्कीक अशा विचारसरणी ला मांडतांना घेतलेला कादंबरी हा फॉर्म जो मात्र अत्यंत टीपीकल रशियन मेलोड्रॉमॅटीक स्टाइल ने वापरलेला आहे. त्याचा प्रभाव वाचकावर इमोशनली फार होतो. इम्प्रेशनेबल एज मध्ये वाचल्यावर तर अनेकांना आता काय वाचायचे शिल्लक राहीलेय असा ही गंभीर प्रश्न अगदी प्रामाणीक पणे पडतो. रँड चे भक्त फार लवकर रँड चा तर्क सोडुन भक्ती त लीन होतांना दिसतात.

A Performance artist stood still for 6 hours to let people do what they wanted with her body. What happened next ?
https://www.elitereaders.com/performance-artist-marina-abramovic-social-...

वेळेच्या अभावामुळे थोडक्यात म्हणण मांडतो याने विस्कळीत पणा येण्याची व गोंधळाची शक्यता आहे. मात्र सविस्तर प्रतिसाद नंतर देतो.

अ‍ॅन रँड च्या विचारसरणी चा अभ्यास करतांना लैंगिकता हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. एखाद्याची लैंगिकता काहीही असु शकते त्याचा त्याच्या तात्वीक विचारांशी काय संबंध असे वाटु शकते. पण हा मुद्दा कीती महत्वाचा आहे हे स्वतः रँड च्या खालील कोट मध्ये दिसुन येते.

“Love is blind, they say; sex is impervious to reason and mocks the power of all philosophers. But, in fact, a person's sexual choice is the result and sum of their fundamental convictions. Tell me what a person finds sexually attractive and I will tell you their entire philosophy of life. Show me the person they sleep with and I will tell you their valuation of themselves. No matter what corruption they're taught about the virtue of selflessness, sex is the most profoundly selfish of all acts, an act which they cannot perform for any motive but their own enjoyment - just try to think of performing it in a spirit of selfless charity! - an act which is not possible in self-abasement, only in self-exultation, only on the confidence of being desired and being worthy of desire. It is an act that forces them to stand naked in spirit, as well as in body, and accept their real ego as their standard of value. They will always be attracted to the person who reflects their deepest vision of themselves, the person whose surrender permits them to experience - or to fake - a sense of self-esteem .. Love is our response to our highest values - and can be nothing else.”
― Ayn Rand
आता अ‍ॅन रँड ने तीच्या स्वतःच्या जीवनात खास करुन जो नॅथॅनीयल ब्रँन्डेन चा सेक्श्युअल एपिसोड होता. त्यात तीने कसा स्टॅन्ड घेतला ?
ब्रॅन्डेन ला एकेकाळी रँड आपला वैचारीक वारसदार मानत असे. अ‍ॅटलस श्रग्ड हे रँड ने ब्रॅन्डन ला डेडीकेट केले होते. ब्रॅन्डन ने अनेक वर्षे ओब्जेक्टीव्हीजम चा प्रचार प्रसार रॅंड बरोबर केला. तर जेव्हा रॅंन्ड आणि ब्रॅन्डेन यांनी आपापल्या पती पत्नी अनुक्रमे फ्रॅक ओ कॉनॉर व बार्बरा ब्रॅन्डेन यांच्या बरोबर बसुन जो आठवड्यातुन दोन दिवस पाळावयाचा सेक्स चा करार केला. व तो ज्या पद्दतीने इतर दोघांवर :लादला", त्यात बार्बरा ने विरोध केल्यावर ज्या पद्धतीने रँन्ड ने तिला समज दिली. व तिचे मानसशास्त्रज्ञ असणार्या ( ब्रॅन्डेन एक नामांकीत मानसशास्त्रज्ञ होता रॅंड शी ब्रेक अप झाल्यावर सेल्फ एस्टीम या विषयावर त्याने सखोल संशोधन केले त्यातील त्याचे योगदान महत्वपुर्ण मानले जाते.) तिचे जे कौन्सेलींग केले. यामध्ये इंटेग्रीटी चा उदो उदो करणारया रँड ने ज्या प्रकारे भुमिका बदलल्या. व पुढे ब्रॅन्डेन शी ब्रेकअप झाल्यानंतर त्याच्याशी ज्या प्रकारे संबंध तोडले
या एपिसोड मधील अनेक गोष्टी रँड च्या तत्वज्ञाशी तिने प्रतिपादलेल्या अनेक मुलभुत तत्वांच्या अ‍ॅप्लीकेशन शी संबंधित आहेत, यावर रँड चॅ अंध भक्त जराही चिंतन करत नाहीत. याची तपासणी ते करत नाहीत.
दुसर इथे समलैंगिकता विषयावरील रँड चा दृष्टीकोण काय होता यावर देखील मंथन होणे अतिशय अगत्याचे वाटते. माझ्या मते तिचा द्रुष्टीकोण अतिशय मागास व नकारात्मक असा होता.
तिसर तिचा कर्तुत्ववान पुरुषाला स्त्री ने सेक्शुअली सरेंडर करण्या संदर्भातील विचार हे आजच्या फेमीनीस्ट मुव्हमेंट च्या संदर्भात एक व तिच्या स्वतःच्या सेल्फ एस्टीम इगो च्या तत्वा च्या संदर्भात खरोखरच चर्चा करण्यासारखे आहेत. कीती फेमिनीस्ट तिच्याशी सहमत होतील वा विरोध कुठल्या मुद्दयावर होईल हे बघणे महत्वाचे आहे.
चौथ तिच्या साहीत्य मुल्या वरील भाष्य जे रोमॅटीक मॅनिफेस्टो मध्ये तिने मांडलेले आहेत. त्या अनुसार जर विचार केला तर संस्थळावर होणार लेखन रँड कुठल्या पातळीवर बसवेल हे पाहण ही मोठ रोचक आहे.
अ‍ॅन रँड चा एक कल्ट या दिशेने ही विचार होण महत्वाच आहे. अनेक बाबतीत रँड व तिचे भक्त हे एका कल्ट सारखे वागलेले आहेत. या संदर्भात ही
विचार झालेला आहे.
रँड ची अत्यंत अभ्यासपुर्ण बायोग्राफी अ‍ॅन रँड अ‍ॅन्ड द वर्ल्ड शी मेड अ‍ॅन हेलर लिखीत अतिशय वाचनीय आहेत ( ज्यासाठी ए आर आय ने कुठल्याही प्रकारची कागदपत्रे पुरवण्यास नकार दिला)
जजमेंट डे माय इयर्स वुइथ अ‍ॅन रँड ही अत्यंत वाचनीय असे पुस्तक नॅथनीयल ब्रॅन्डन ने लिहीलेले आहे जे ऑब्जेक्टीव्हीजम संदर्भात अनेक नविन बाबी प्रकाशात आणते.
खालील ब्रॅन्डन चे इंटरव्ह्यु रोचक आहेत अवश्य वाचुन बघावेत यातील रँन्ड च्या ऑब्जेक्टीव्हीजम चा सखोल अभ्यास केलेला स्वतः रॅन्ड ने एकेकाळी ऑब्जेक्टीव्हीजम वरील बेस्ट कॉमेन्टेटेर म्हणुन गौरवलेला व स्वतः अनेक वर्षे त्याच्या प्रचार केल्यानंतर पुर्ण अनुभव घेउन नंतर त्याच्या मर्यादा लक्षात आल्यावर प्रांजलपणे त्या ही मान्य करुन स्वतःचे दोष व चुकलेले तात्वीक विचार मान्य करुन या सर्वांचा निचोड अर्क असा काढणारा नॅथनियल ब्रॅन्डेन चा हा लेख रँड भक्तांनी अवश्य वाचला च पाहीजे असा अत्यंत सुंदर तार्कीक प्रांजल व स्पष्ट मांडणी व रॅड च्या ऑब्जेक्टीव्हीजम चा घेतलेला अत्यट मार्मीक असा हा बेनेफीट्स अ‍ॅन्ड हजार्ड्स ऑफ फिलॉसॉफी ऑफ अ‍ॅन रँड तरी कीमान रॅड भक्तांनी वाचावा अशी विनंती

http://mol.redbarn.org/objectivism/Writing/NathanielBranden/BenefitsAndH...

http://www.booknotes.org/Watch/8219-1/Nathaniel+Branden.aspx

http://mol.redbarn.org/objectivism/Writing/NathanielBranden/FullContextI...

A Performance artist stood still for 6 hours to let people do what they wanted with her body. What happened next ?
https://www.elitereaders.com/performance-artist-marina-abramovic-social-...

लेख प्रचंड आवडला. आणि अंतराआनंदचा प्रतिसाददेखील.
फाउंटनहेडपण ठोकळा आहे? मग मी अब्रिज्ड कॉपी वाचली होती की काय Dirol

===
Amazing Amy (◣_◢)

मानवातील सद्गुण, नीतीमूल्यांचा आदर, प्रतिभा, प्रज्ञा हे व्यक्तिगत असतात. अख्खी मानवजात तशी नसते. त्यामुळे तशा व्यक्तींना सलाम करावा. लोक म्हणून एकगठ्ठा सर्वांना चौथऱ्यावर स्थापित करण्याची गरज नाही असं मी ही मानते आणि आयन रँडही. त्यामुळे अपुली-गपुली, बाभंनी म्हटलेल्याच्या विरोधी काहीच नाही.
मी आयन रँड अख्खीच्या अख्खी स्वीकारलेली नाही. तिच्या मांडणीत बरेच कच्चे दुवे आहेत, चुकीच्या- आता कालबाह्य ठरलेल्या कल्पनाही आहेत. खरं तर तिने जी मूल्ये मांडली त्यानुसार कुणाच्याही भक्तीपंथे जाऊ नये.तिने स्वतःच्या आयुष्यात जे केले त्याची मी चाहतीही नाही, पाईक तर नाहीच. मला त्यात रसच नाही.
चळवळ सोडल्यानंतर मी काय केले- माझी जी क्षमता उत्तम आहे असे वाटले तिला पूर्ण न्याय देऊन काम करत राहिले. या संदर्भात हॉवर्ड रॉर्कचं भाषण वाचण्यासारखं आहे. आपण जे करू ते चांगल्या प्रकारे केलं तर त्यातून समाजाला फायदा होईलच. तो फायदा हा आपला अग्रक्रम असण्याचेही कारण नाही. सामाजिक कार्य, चळवळींचे कार्य आनंदाने करणारांबाबतही मला हेच वाटते. त्यांना त्यात आनंद असेल आणि त्यांची तशी क्षमता असेल तर ते जे करतील ते त्यांनाही आनंद देणारे असेल आणि इतरांचाही आनंद वाढवणारे असेल. पण कुणीतरी दुसरा करतो म्हणून आपण करावे अशा दृष्टीने जे त्यात घुसतील ते ढोंगी ठरतील, नीतीदुष्टही ठरतील.प्रत्येकाने आपापला मार्ग कुठल्यातरी झेंड्यामुळे नव्हे तर स्वतःच्या मनाने ठरवाव्यात एवढेच
अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सगळ्याच लिहिणं कंटाळवाणं होतं मला.

प्रतिसाद आवडला.

http://thefederalist.com/2014/10/16/ayn-rand-captured-the-magic-of-ameri...

चार्ल्स मुर्रे ने लिहिलेला लेख. या लेखा चे बहोत चर्चे है... अर्थशास्त्राबद्दलच्या ब्लॉगोस्फिअर मधे.

--

डिस्क्लेमर - मी स्वतः रँड चे साहित्य १% सुद्धा वाचलेले नाही.

रँड वाचल्यानंतर मी लै भारी असं फीलिंग येतं.
त्यामुळे कदाचित असं होत असेल. रँड फॅनक्लबात असूनही मी मात्र झेंडे अन अजेंडे सोडले नाहीत असे नोंदवितो.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

स्वतःबद्दल लिहीणे कठीण असते मात्र ते सहज आणि चांगले जमून आलय. एक वाक्य फारच आवडले ''त्या दिवसांत ज्यांच्या-ज्यांच्याशी मैत्री झाली होती त्यांच्याशी पुन्हा कधीच मैत्री राहिली नाही. सारे स्वच्छपणे पुसूनच गेले. कुणाचा द्वेष वाटावा इतकेही संबंध राहिले नाहीत. अशी त्या एकूणच चळवळीतून मी स्वच्छपणे मुक्त झाले.''

स्वतःबद्दल लिहीणे कठीण असते मात्र ते सहज आणि चांगले जमून आलय. एक वाक्य फारच आवडले ''त्या दिवसांत ज्यांच्या-ज्यांच्याशी मैत्री झाली होती त्यांच्याशी पुन्हा कधीच मैत्री राहिली नाही. सारे स्वच्छपणे पुसूनच गेले. कुणाचा द्वेष वाटावा इतकेही संबंध राहिले नाहीत. अशी त्या एकूणच चळवळीतून मी स्वच्छपणे मुक्त झाले.''

“कसंय ना- आपली एकंदर मानवजातीबद्दलची कल्पनासुद्धा फार विचित्र आहे. आपण मानवजातीबद्दल बोलतो तेव्हा आपण एक धूसर, उदात्त चित्र मनात ठेवल्यासारखं बोलतो... काहीतरी गंभीर, भव्य कल्पना असते आपली. पण खरं म्हणजे आपल्याला माहीत असलेली मानवजात म्हणजे आपल्याला रोजच्या रोज भेटणारे लोक असतात. बघा त्यांच्याकडे. त्यांच्यापैकी कुणाबद्दल तरी काहीतरी गंभीर उदात्त भावना वाटते आपल्याला? हातगाडीवरच्या मालासाठी घासाघीस, भांडणं करणाऱ्या बायका; भिंतींवर काहीतरी घाणेरडं चितारून ठेवणारी नादान कार्टी; बेवडेबाजीप्रवीण लब्धप्रतिष्ठित किंवा त्यांचे आध्यात्मिक भाईबंद. हे खरंय की जेव्हा लोक थोडे दुःखात असतात तेव्हा त्यांच्याबद्दल थोडातरी आदर वाटू शकतो. काहीतरी आदर वाटण्यासारखं असतं त्यांच्यात. पण जेव्हा ते आनंदानं मौजमजा करीत असतात, तेव्हा पाहिलं तर?... तेव्हा त्यांचं खरं स्वरूप कळतं आपल्याला. स्वतःचा कष्ट करून कमावलेला पैसाही ते कुठल्यातरी फालतू करमणुकीवर ओततात आणि अतोनात पैसा असलेलेही काय करतात? सारं जग त्यांना खुलं असतं, पण ते जीव रमवण्यासाठी काय निवडतात? जरा बऱ्या दर्जाच्या गुत्त्यात पडतात एवढंच. ही घ्या तुमची मानवजात. मला दुरूनदेखील हात नाही लावायचा असल्या मानवजातीला.”

झकास! शिकल्या-सवरलेल्या किती पिढ्या गेल्यावर माणसाला इतरांबद्दल असं वाटायला लागतं कोण जाणे पण मलाही अधून-मधून तसं वाटतं खरं.
पण कोणत्या ना कोणत्या गलिच्छांकडे सत्ता असणारच त्यामुळे ज्यात आपल्याला गलिच्छांचा प्रत्यक्ष कमीतकमी त्रास ते बरं.
इंजिनिअरिंगला असताना कायनेटिकमध्ये समर इंटर्नशिप करायला मोजून दोन दिवस गेलो आणि तिथल्या सीएनसी डिपार्टमेंटमध्ये रीतसर ३०० जॉब्जचं टारगेट पूर्ण केल्यावर आणि तिथल्या सुपरवायझरकडून "मी कोण आहे माहितीय का?" वगैरे भाषा ऐकून घेऊन तिसर्‍या दिवसापासून सोडून दिलं. तेव्हाच इंडस्ट्रीयलाईज्ड उत्पादनाची साधने आहेत तोवर त्यांची मालकी कोणाकडे आहे त्याने काही फरक पडणार नाही हे कळून चुकले होते. सध्या किमान काम करताना खुर्चीवर बसून करता येतंय यात समाधान आहे. दरम्यान मानवजात वाढतेच आहे. असो.

Hope is NOT a plan!

माझा प्रवास नेमका याच्या उलट झाला आहे.

अर्थात मी आधी (उजव्या) चळवळीत वगैरे नव्हतो. पण कॉलेजच्या आणि तरुण वयात बराच हिंदुत्ववादी (+जातीयवादी*), भांडवलवादी** वगैरे होतो. हळूहळू डावीकडे प्रवास होत गेला. आज मध्याच्या किंचित डावीकडे स्थिरावलो आहे. आणखी डावीकडे जाण्याची शक्यता सध्या वाटत नाही.

*आरक्षण विरोधी
**संपूर्ण जग कम्युनिस्ट होणार अशी खरोखर "भीती" मला वाटत असे.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

+१
मी फारसा जातीयवादी( *आरक्षण विरोधी) कधीच नव्हतो - नाही, मात्र कित्येक मते निर्माण होण्याआधी प्रवाहपतीत होतो. नंतर मतांचा प्रवास उजवीकडून डावीकडे झाला. मग आचार उजवे नी विचार बर्‍याच डावीकडे जाऊन स्वतःलाच निराश वाटु लागल्यावर, तो दरम्यान उजवीकडेही सरकला. इतका की मध्याच्या उजवीकडे जाऊन पुन्हा आता मध्याच्या डावीकडे स्थिरावला आहे (असे माझे स्वतःबद्दलचे रिडिंग आहे)

अर्थात घड्याळ्याच्या लंबकासारखी एका मर्यादेतली ही आंदोलने चालुच रहावीत अशी माझी इच्छा आहे Smile

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!