पॉलिटिंगल भाग ५ : जय हरी विठ्ठल

पोलिटिंगल - भाग १, भाग २, भाग ३, भाग ४
एलिझाबेथ एकादशी या चित्रपटावर वारकरी संघटनेने बहिष्कार घातल्याची बातमी वाचून आम्ही भावना दुखावणाऱ्या अन्य टॉप १० गोष्टींची यादी त्यांच्याकडून मागवली ती खालीलप्रमाणे.

  1. एकादशी हा शब्द वापरु नये. त्यामुळे आमच्या भावना दुखावतात. 'एकादशी आणि दुप्पट खाशी' किंवा 'एकादशीच्या घरी शिवरात्र' वगैरे वाक्प्रचार वापरण्याआधी लेखी परवानगी घ्यावी.
  2. एकादशीसोबतच आपोआप येणारे कार्तिकी आणि आषाढी हे शब्द आमचे आहेत. रमा एकादशी वगैरे नॉन-वारकरी एकादष्ण्यांचे शब्द पुढील सूचना मिळेपर्यंतच तात्पुरते वापरता येतील.
  3. परवानगी न घेता होणारी साबुदाणा खिचडीची खादाडी व उत्पादन बंद करावे. त्याचसोबत उपवास या शब्दावरही आमचा हक्क आहे.
  4. उपवास व खिचडी या शब्दांप्रमाणेच साबुदाणावडे, खीर, रताळ्याचा कीस, वरईचा भात व थालीपीठे, चिक्की, राजगिरा वडी, केळी (इतर फळे) व तत्सम उपवासांचे पदार्थ वारकरी संघटनेला विचारल्याशिवाय लिहू, बनवू किंवा खाऊ नये
  5. उपरोक्त पदार्थांसाठी वापरण्यात येणारे घटक जसे की भिजवलेले साबुदाणे, दाण्याचा कूट, शिजवलेली वरई व उपवासाची भाजणी, फोडणी, राजगिरे, गूळ इ. पदार्थांचा वापर केल्यास जबाबदार व्यक्तीला त्याचे फळ भोगावे लागेल.
  6. कच्चे साबुदाणे, शेंगदाणे, वरई, हिरव्या मिरच्या, जिरे, तूप, रताळी, बटाटे, कोथिंबीर, खोबरे, नारळ, ऊस, राजगिरे व उपवासाच्या पदार्थांसाठी वापरण्यात येणारा या स्वरुपाचा कच्चा माल विकण्यापूर्वी तशी रीतसर परवानगी घ्यावी.
  7. विठ्ठल, पांडुरंग, ज्ञानेश्वर, माऊली, तुकाराम, नामदेव, चोखामेळा, जनाबाई, एकनाथ व इतर संतांची नावे वापरण्यापूर्वी तसे प्रमाणपत्र मिळवणे गरजेचे आहे. तुमच्या मित्राचे नाव तुकाराम वगैरे असले तरी त्याला प्रेमाने तुक्या वगैरे म्हटलेले खपवून घेतले जाणार नाही.
  8. पालखी, पायरी, वारी, वीट, मेळा, रिंगण, झेंडा, पादुका वगैरे शब्दांचा परवानगीशिवाय केलेला वापर कारवाईस पात्र आहे. 'सजनादी वारी वारी' गाण्याच्या निर्मात्यांविरोधात आम्ही यापूर्वीच भरपाईची मागणी केली आहे.
  9. पंढरपूर, आळंदी, देहू, पैठण, नेवासे व इतर पवित्र स्थळांचा उल्लेख करताना काळजी घ्यावी. एसटी महामंडळाने गाड्यांच्या फलकांवर अशुद्धलेखन करु नये.
  10. चंद्रभागा, इंद्रायणी व तत्सम नद्यांच्या पाण्याचा वापर गैरकृत्यासाठी(!) करु नये

तळटीपः आम्ही खरेतर टॉप ११ गोष्टी मागवणार होतो पण उगीच ११ या आकड्यामुळे भावना दुखावू नये म्हणून १० वर थांबलो. बोला पुंडलिक वरदे... हरी विठ्ठल!

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

हाहाहा!!! खुसखुशीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वारकर्‍यांवर वार झालेला आम्ही मुळीच खपवून घेणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सजनादी वारीवारी - लोलेश लोलकर!
प्वाईंट नंबर १० Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्र. ८ मध्ये तुम्ही एक शब्द अजून घालायला हवा. 'अश्व' हा शब्द केवळ माउलींच्या अश्वासाठी राखीव आहे. 'अश्वमेध' असे म्हणण्याऐवजी 'घोडामेध' असा काहीतरी प्रयोग केला जावा. अगदी संस्कृतच शब्द हवा असेल तर अमरकोशामध्ये भरपूर निवडस्वातन्त्र्य आहे.

अजून एक सावधानीचा इशारा. 'ज्ञानेश्वर' हा शब्द वापरून तुम्ही माउलींचा अपमान करत आहात. त्यांच्यबाबतीत 'माउली' हा एकच शब्द संमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला हा लेख अपूर्ण वाटला. कारण यातून वारकरी पंथाचे मराठी भाषेवरचे अधिकार पुरेसे स्पष्ट होत नाहीत. म्हणजे एकादशी या शब्दापासून सुरूवात करून निव्वळ शंभरेक मराठी शब्दांवरच वारकरी पंथाचा अधिकार आहे असं यातून ध्वनित होतं. असं दाखवून वारकरी पंथाचा मराठी भाषेवरचा अधिकार मर्यादित करण्याचा हा प्रयत्न वाटला.

उदाहरणार्थ 'आता' हा शब्द घ्या. वरवर पाहता तो कोणीही कसाही वापरावा, त्यातून काही कोणाचा अपमान होणार नाही असं वाटतं. पण ते खरं नाही. ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं पसायदानच पाहा.

'आता' विश्वात्मके देवे...

अशी त्याची सुरूवात आहे. तेव्हा 'आता' हा शब्द जर 'आता मला वाटतं, की साला एक भंकस सिनेमा पाहावा' असं म्हटलं की ती पसायदानाची चेष्टा होते हे सांगायला लेखक विसरला आहे. पसायदानाची चेष्टा म्हणजे ज्ञानेश्वरांची निंदा, आणि पर्यायाने मराठी अस्मितेची, हिंदू धर्माची चेष्टा.

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

या श्लोकामध्ये जो आणि जे हे शब्द आल्यामुळे ते जर चुकीच्या संदर्भात वापरले गेले तरीही तो पसायदानाचा, पर्यायाने ज्ञानेश्वरांचा, आणि पर्यायाने मराठी हिंदू संस्कृतीचा अपमान आहे हे लेखकानेच नव्हे तर सर्व जनतेने लक्षात ठेवायला हवं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खी: खी: खी: खूप मस्त!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तळटीपेच्या शेवटी वारकर्‍यांच्या आरोळीचा* वापर केला आहे. त्यासाठी लेखकाने रीतसर परवानगी घेतली असेल अशी आशा आहे. अन्यथा लेखक आणि पर्यायाने ऐसीचे मालक कारवाईस पात्र ठरतील.

*गजर या शब्दावर वारकर्‍यांचा हक्क असणार म्हणून तो वापरला नाही. नाहीतर माझ्यावर वार करतील.

वारकरी = (तलवारीचे/कुर्‍हाडीचे/चाकूचे) वार करी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लेखाच्या निमित्ताने जुनीच शंका पुनरेकवार मांडतो. एकादष्णी आणि एकादशी यांतील फरक काय? एकादष्णी म्हणजे एखादे रिच्युअल असावेसे दिसते. "एकादष्ण्या करायचे व्यसन" इ.इ. उल्लेख आहिताग्नी राजवाड्यांच्या आत्मवृत्तात आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एकादशी आणि एकादष्णी ह्यात भेद काय?

खाली 'रुद्राध्याय - एक मनन' असा माझा एक - सर्वसाधारणपणे उपेक्षित(!) - असा जो धागा आहे त्यामध्ये ह्याचे उत्तर आहे. रुद्राध्याय हे सूक्त वेदांमध्ये मुळात रुद्र ह्या खालच्या फळीतील देवतेला उद्देशून असले तरी वेदोत्तर कालातील 'शंकर' ह्या देवावर त्याचे आरोपण करून मूळच्या रुद्रापासून बराच वेगळा आणि देवांच्या उतरंडीमध्ये सर्वात वरच्या फळीवरचा असा शंकर पुराणनिर्मितिकाळामध्ये कर्मकाण्ड आणि भक्तिपर अशा आचारधर्मासाठी निर्माण झाला आहे. शंकराच्या पूजनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे रुद्राध्यायाचे पठन.

(रुद्राध्याय ही रचना यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेमध्ये काण्ड ४, प्रपाठक ५ येथे आहे आणि तिला रुद्राध्याय हे नाव अधिक योग्य आहे. तिला रुद्रसूक्त असेहि म्हणतात पण रुद्राध्याय हा यजुर्वेदाचा भाग आहे आणि ऋग्वेदामध्ये मण्डल ७, सूक्त ४६ हे रुद्राला उद्देशून असलेले सूक्त वेगळे उपलब्ध आहे. त्याला रुद्रसूक्त म्हणतात. दोन्हींमध्ये बहुतेक संकल्पना त्याच आहेत. एखादी ऋचाहि साम्यदर्शक आहे.

रुद्राध्यायाचे अकराच्या पटीत पठन करणे ह्याला 'रुद्रैकादशिनी' - रुद्र + एकादशिनी - असे म्हणतात. हा जुना पारंपारिक शब्द आहे. एकादशिनी ह्या शब्दाचे बोलीभाषेतील रूपान्तर म्हणजे 'एकादष्णी'. ह्याच्या 'एकादशी' ह्या तिथीशी तसा काही संबंध नाही पण मूळ अर्थ लोपल्यामुळे कित्येकजण एकादशी आणि एकादष्णी ह्या एकच गोष्टी आहेत असे मानतात आणि 'एकादष्णीचा उपास'असे चुकीने म्हणतात.

राजवाडयांनी उल्लेखिलेले 'एकादष्ण्या करण्याचे व्यसन' हे रुद्रैकादशिनीचे याज्ञिकांकडून पठन करवून घेऊन पुण्य जोडण्याच्या बाजीरावी हौशीला उद्देशून असावे असा तर्क माझाआहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेमक्या माहितीकरिता बहुत धन्यवाद! आता क्लीअर जाहले. Smile

आत्मचरित्रातील उल्लेख हा राजवाड्यांच्या वडिलांबद्दल आहे. त्यांना एकादष्ण्या करायचे व्यसन होते असे राजवाडे म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पदार्थांच्या यादीत 'उपासाची मिसळ' दिसली नाही. तिच्यावरचा बादशाही उपाहारगृहाचा हक्क वारकऱ्यांना मान्य दिसतोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

पण तितकंस नै जम्या! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लॉल ROFL मस्त चालूय हे सदर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0