Skip to main content

बुद्ध व रामदास - द्विधा मनस्थितीतील निर्णय

गौतम बुद्धाने त्याच्या पत्नी यशोधरेस व मुलास राहुल यास त्यागून सन्याशी जीवन स्वीकारले. या घटनेमध्ये अनेक जणांना विशेषतः स्त्रियांना यशोधरेवर अन्याय झाल्यासारखा वाटतो.
मला हा प्रश्न पडला आहे की मध्य वयात्/तरुणपणी म्हणा बुद्धाला त्याचे "कॉलिंग" सापडले. व त्याने निग्रहाने (त्यालाही सांसारीक पाश अन मोह याचा सामना करावाच लागला असणार) अन मनस्वीपणे निर्णय घेतला. यात काही चुकलं असं आपल्याला वाटतं का?
त्याला २ पर्याय (चॉइस) होते - (१) यशोधरेचं मन मोडायच, तिच्यावर अन्याय करायचा किंवा (२) स्वतःच्या पारलौकिक महत्त्वाकांक्षेस मुरड घालून, स्वतःवर अन्याय करायचा.
मग यशोधरेवरचा अन्याय हा अन्याय अन स्वतःवरचा अन्याय मात्र स्वीकारार्ह (अ‍ॅक्सेप्टेबल) असं आपण का समजतो?
__________
तिच गोष्ट रामदास स्वामींची. लग्नात बोहोल्यावरुन पळून जाणे हा आपल्याला त्यांनी त्यांच्या पत्नीवर केलेला अन्याय का वाटतो. अन तिच्यावर अन्याय करण्यापेक्षा त्यांनी स्वतःवर अन्याय केला असता तर बरे असे का वाटते?
हा दुट्टप्पीपणा नाही का?
___________
या विषयावर काही फेमिनिस्ट मते ऐकली आहेत जी बुद्ध व रामदास यांना दुषणे देणारीच आहेत. जर या २ विभूतींनी संसार त्यागला नसता तर ते आपापल्या जोडीदाराला न्याय देऊ शकले असते का?
___________
माझा मुख्य प्रश्न हा आहे स्वतःशी प्रामाणिक रहावं की अन्य लोकांशी? किंबहुना एक पराभूत सांसारीक होणं या २ विभूतींनी विचारानिशी टाळलं अन ते स्वतःशी प्रामाणिक राहीले हा मोठेपणाच नाही का? कोणी म्हणेल की या दोघांना आधी लक्षात आलं नाही का? तर समजा नाही आलं मग पुढे काय? स्वतःच्या महत्त्वाकांक्षेशी, स्वप्नांशी प्रतारणा करायची? अन त्यागास महत्त्व देऊन संसारात अनमनाने रहायचे होते?
___________
याविषयावर आपले विस्तृत मत ऐकायला आवडेल. विशेषतः जर त्यांनी अन्याय केला असे आपले मत असेल तर हे नक्की ऐकायला आवडेल की अन्य व्यक्तीवरचा अन्याय तो दूषण देण्यालायक अन्याय अन स्वतःवरचा अन्याय मात्र त्याला काडीची किंमत नाही - असे का?

विवेक पटाईत Sat, 22/11/2014 - 21:25

समर्थ रामदासांनी लग्ना आधीच पळाले होते. त्या मुळे त्यांनी कुणावर ही अन्याय केला नाही. त्या स्त्रीने दुसऱ्याशी लग्न करून सुखाचा संसार निश्चित केला असेल. (फार पूर्वी वाचनात आले समर्थांच्या नाते संबंधात विवाह केला होता, किती सत्य आहे माहित नाही).

हं, लग्नानंतर, मुल झाल्या नंतर पत्नीच्या त्याग करणे म्हणजे आपल्या जिम्मेदारी पासून पळून जाणे म्हणजे अन्याय.

'न'वी बाजू Sun, 23/11/2014 - 02:07

In reply to by विवेक पटाईत

समर्थ रामदासांनी लग्ना आधीच पळाले होते. त्या मुळे त्यांनी कुणावर ही अन्याय केला नाही.

उलटपक्षी, समर्थांनी बोहल्यावरून पळून जाऊन त्या स्त्रीवर (आणि त्यानंतर कधीही लग्न न करून समस्त स्त्रीजातीवर) परमोपकारच केले, अशीही मांडणी करता यावी.

रेड बुल Sat, 22/11/2014 - 21:51

तांत्रीक द्रुश्ट्या हो. अन्यायच. पण... अशा लोकांच्या त्या घटनेनंतरच्या अचिवमेंट्स वास्तव असतिल तर तो अन्याय उरत नाही(They brought something bigger and better to the table for community at large). तसेच एखाद्या बाबतीत न्याय देता न येणे म्हणजे संपुर्ण अन्याय करणे हा अन्वयार्थही चुक. विशेषतः हे द्विधामनस्थितीचे लोक न्हवेत, तसेच हे त्यांनी संपुर्ण विचारांती घेतेलेले निर्णय व कृती आहेत. विशेषतः बुध्दाने तर परतायचा रस्ता १००% नक्किच मोकळा ठेवला होता जर खरच काही अपेक्षीत गवसले नसते तर.... आणी रामदास स्वामींबाबत तर त्याचीही आवश्यकता न्हवती असे मत आहे.

धर्मराजमुटके Sat, 22/11/2014 - 21:52

आढयाचे पाणी वळचणीलाच जाणार या न्यायाने ही चर्चा वेगवेगळी वळणे घेत हळूच राम-सीता संबंध आणि झालेच तर श्री. आणि श्रीमती मोदी यांपर्यंत येऊन संपन्न होईल असे मत नोंदवितो.
तसे न झाले तर चर्चेस या प्रतिसादामुळे 'बुच' बसले आहे असे समजावे. :)

मग यशोधरेवरचा अन्याय हा अन्याय अन स्वतःवरचा अन्याय मात्र स्वीकारार्ह (अ‍ॅक्सेप्टेबल) असं आपण का समजतो?

स्वतःवरच्या अन्यायाविषयी जागरुक असण्याची परंपरा भारतीय उपखंडात / इतिहासाच ठळकपणे दिसण्याइतकी नाही. ही विचारसरणी अगदी अलीकडेच म्हणजे पाश्चात्त्यांचा संसर्ग झाल्यानंतरच इकडे आली असावी.

वामा१००-वाचनमा… Sat, 22/11/2014 - 22:25

In reply to by धर्मराजमुटके

तसे न झाले तर चर्चेस या प्रतिसादामुळे 'बुच' बसले आहे असे समजावे. (स्माईल)

हाहाहा खरय.

स्वतःवरच्या अन्यायाविरुद्ध जागरुक नसणे हे एक प्रकारचं मॅसोचिस्म आहे. अन तसंही आपल्या पुराणात वगैरे तपश्चर्या/हठयोग आदिंनी मॅसोचिसम ला थोडं वरचच स्थान दिलेलं आहे. होय व्यक्तीस्वातंत्र्य हे पाश्चात्य विचारसरणीतून आलेले आहे हे पटते.

बॅटमॅन Mon, 24/11/2014 - 18:42

In reply to by धर्मराजमुटके

स्वतःवरच्या अन्यायाविषयी जागरुक असण्याची परंपरा भारतीय उपखंडात / इतिहासाच ठळकपणे दिसण्याइतकी नाही. ही विचारसरणी अगदी अलीकडेच म्हणजे पाश्चात्त्यांचा संसर्ग झाल्यानंतरच इकडे आली असावी.

त्याबद्दल माहिती नाही. परंतु पारंपरिक रीत्या तरी बुद्ध काय नि रामदास काय, या दोघांवर आपापल्या होणार्‍या/असलेल्या बायकांवर अन्याय केल्याबद्दल टीका केली जात नव्हती. ती टीकाच पाश्चात्य संसर्गानंतर सुरू झालेली आहे.

नितिन थत्ते Mon, 24/11/2014 - 22:43

In reply to by बॅटमॅन

तसे तर पारंपरिक रीत्या रामाने सीतेला त्यागणे याबद्दलही टीका केली जात नव्हती. उलट कोणीतरी रामाचा आणखी एक सद्गुण दाखवण्यासाठी ती कथा रामायणात घुसडली असं म्हटलं जातं.

हे सगळे पॉइंट पाश्चात्य संसर्गापेक्षाही स्त्रीवाद उदयास आला तेव्हा सुरू झाले.

बॅटमॅन Tue, 25/11/2014 - 00:53

In reply to by नितिन थत्ते

हे सगळे पॉइंट पाश्चात्य संसर्गापेक्षाही स्त्रीवाद उदयास आला तेव्हा सुरू झाले.

अर्थातच. पाश्चात्य संसर्ग आल्यानंतर काही काळाने स्त्रीवाद भारतात पोचला. टर्मिनस पोस्ट क्वोएम म्हणून पाश्चात्य संसर्ग सांगितला, एवढेच.

नितिन थत्ते Tue, 25/11/2014 - 07:55

In reply to by बॅटमॅन

>>पाश्चात्य संसर्ग आल्यानंतर काही काळाने स्त्रीवाद भारतात पोचला.

हे ऐतिहासिकदृष्ट्या खरे आहे पण स्त्रीवाद होमग्रोन असता तरीसुद्धा हीच टार्गेट्स* असती.

*ही टार्गेट्स चुकीची आहेत असे नव्हे. अन्यायाच्या कल्पना अधोरेखित करण्यासाठी असे टार्गेटिंग योग्यच आहे.

बॅटमॅन Sun, 23/11/2014 - 03:24

जुन्या काळातले ते उच्चवर्णीय पुरुष म्हणजे..

पण बुद्धालाही यात धरल्याचे पाहून मौज वाटली. अन्यथा तथाकथित धर्म नसलेल्या हिंदू नामक लेबलाचे पुरस्कर्ते पुरुषच या बहुमानास पात्र आहेत असे आम्ही समजत होतो.

'न'वी बाजू Sun, 23/11/2014 - 10:35

In reply to by बॅटमॅन

पण बुद्धालाही यात धरल्याचे पाहून मौज वाटली. अन्यथा तथाकथित धर्म नसलेल्या हिंदू नामक लेबलाचे पुरस्कर्ते पुरुषच या बहुमानास पात्र आहेत असे आम्ही समजत होतो.

पण, पण, पण... 'आसिंधुसिंधुपर्यन्ता यस्य भारतभूमिका| पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:॥' वगैरे सगळे कोणत्या भावाने जाते मग?

हं, अर्थात, बुद्धाची पितृभू ही भारतात नव्हती (नेपाळात होती), आणि/किंवा ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी मुळात भारतच जेथे नव्हता तेथे 'आसिंधुसिंधुपर्यन्ता'अशी बुद्धाची भारतभूमिका असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, (आणि म्हणून बुद्ध हा 'हिंदू' असू शकत नाही), असे काही लॉजिक जर आपल्या या आर्ग्युमेंटामागे असेल, तर मग मात्र आपल्या या म्हणण्याचा पुनर्विचार करणे भाग पडते.

........................................

शंका: येथे 'भूमिका' या शब्दाचा अर्थ 'पोझिशन' किंवा 'ष्ट्याण्ड' असा घेता यावा (आणि म्हणून 'भारतभूमिका' हा समास 'भारता(बद्दल)ची भूमिका' असा - सम सॉर्ट ऑफ तत्पुरुष, बहुधा षष्ठी (चूभूद्याघ्या) - सोडविता यावा), की 'राधे'ची ज्या नियमाने 'राधिका' होते, त्याच नियमाने 'भूमि'ची 'भूमिका' होणे (आणि म्हणून 'आसिंधुसिंधुपर्यन्ता अशी ज्याची भारतभूमि आहे आणि ती त्याची पितृभू आणि पुण्यभूसुद्धा आहे, तो हिंदू' असा एकंदर अर्थ लागणे) येथे अपेक्षित आहे?

हा डिमिन्युटिवचा प्रकार समजावा काय? बोले तो, 'बॅटमॅन'चा जेणेकरोन 'बॅट्या' होतो (किंवा 'टिंकरबेल'ची 'टिंकू' होते), तद्वत?

बॅटमॅन Mon, 24/11/2014 - 00:20

In reply to by 'न'वी बाजू

पण, पण, पण... 'आसिंधुसिंधुपर्यन्ता यस्य भारतभूमिका| पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:॥' वगैरे सगळे कोणत्या भावाने जाते मग?

ते प्रतिगामी विचार आहेत ना. पुरोगामी फॅशन स्टोअरमध्ये काय चालते याचा अंदाज लावीत होतो, दुसरे काही नाही. तिथे आमची खरेदी विंडो शॉपिंगपर्यंतच मर्यादित असते कैकदा, म्हणून म्हटले की अँटीबुद्धिस्ट क्रीम तिथे मिळते किंवा कसे याची नक्की माहिती नाही. अँटीहिंदू लोशनचे तर कितीतरी प्रकार मिळतात. डायव्हर्सिफिकेशन न करताही स्टोअर चांगले चालले आहे म्हणा, पण अन्य प्रॉडक्ट आहेत की नाही याबद्दलची अपार उत्सुकता, इतकेच कारण यामागे आहे.

'न'वी बाजू Mon, 24/11/2014 - 00:23

In reply to by बॅटमॅन

असो. आमच्या (तळटीपांतील) व्याकरणात्मक कुशंकांचे काय?

बॅटमॅन Mon, 24/11/2014 - 00:31

In reply to by 'न'वी बाजू

डिम्युनिटिव्हचा प्रकार असू शकतो असे सकृद्दर्शनी वाटते खरे. पाहिले पाहिजे.

बॅटमॅन Mon, 24/11/2014 - 00:17

In reply to by नितिन थत्ते

हो, पण प्रचलित फ्याशननुसार बुद्धाला झोडतात की नाही याबद्दल अंमळ कन्फ्यूजन होते, म्हणून. बाकी काही नाही.

yugantar Fri, 28/11/2014 - 23:45

In reply to by नितिन थत्ते

बुद्ध व महावीर दोघेही क्षत्रिय राजपुत्र होते. त्यावेळेस हिन्दु धर्म नसुन वैदिक पद्धती होती व त्यातल्या कर्मकान्डाला कन्टाळून बुद्ध व महावीर यानी आपापले धर्म म्हणजे बौद्ध व जैन धर्म काढले. खरेतर उच्चवर्णीय वैदिक(ब्राम्हण) कर्मकान्डाविरुद्ध त्याच्या धर्माची शिकवण होती.
राज्यकारभार चालवण्याची अपेक्षा असताना कोsहम् असले प्रश्न सन्साराचा अनुभव घेतल्यावरच पडतील ना? तसेही त्यानी सन्साराचा त्याग न करता अनुसरता येणारी शिकवण दिली वैदिक शिकवणीच्या विरुद्ध.

ऋषिकेश Mon, 24/11/2014 - 09:56

एका विशिष्ट काळातील प्रसंगांना समकालीन नितीनियम लावले की असा गोंधळ होणारच.
असो.

बुद्धासारखी कृती एखाद्या समकालीन (थोर किंवा कोणत्याही) स्त्री वा पुरूषाने जोडिदाराला विश्वासात न घेता किंवा जोडिदाराच्या परवानगीशिवाय आताच्या काळात केली तर मला ते जोडीदावर अन्यायकारक वाटेल.

वामा१००-वाचनमा… Mon, 24/11/2014 - 19:27

In reply to by ऋषिकेश

असं का ऋषीकेश? स्वतःवरचा अन्याय नेहमी आपल्याला स्वीकारार्ह का वाटतो? मला खरच प्रश्न पडला आहे. "मी" सगळ्यांच्या वर, माझ्या मनात मला स्वतःला उच्च स्थान हवं. स्वांताय सुखाय असे हवे. ते आपण का मान्य करत नाही? आपली संस्कृती जेव्हा दुसर्‍याला स्वतःपेक्षा काकणभर महत्त्व द्यायला लावते (= त्याग) तेव्हा ती गंडली आहे असे वाटत नाही का?

ऋषिकेश Tue, 25/11/2014 - 13:23

In reply to by वामा१००-वाचनमा…

नै कळ्ळे.
माझा प्रतिसाद आणि तुम्ही विचारलेले प्रश्न यात नेमका काय संबंध आहे?

स्वतःवरचा अन्याय नेहमी आपल्याला स्वीकारार्ह का वाटतो?

नेहमी काही. काही वेळा होय

आपली संस्कृती जेव्हा दुसर्‍याला स्वतःपेक्षा काकणभर महत्त्व द्यायला लावते (= त्याग) तेव्हा ती गंडली आहे असे वाटत नाही का?

त्या त्या त्यागामागचे कार्यकारणभाव जाणून घेऊन विधान करता यावे.
बाकी मला जगातील सर्वच संस्कृती माझ्या सध्याच्या नैतिकतेच्या फुटपट्टीवर गंडलेल्या वाटतात. मात्र ते सध्याच्या फूटपट्टीवर. मी त्या काळात असतो तर अर्थातच मत वेगळे असते.
त्याचबरोबर त्यांचे तसे असणे माझे (आपले) आताच्या असे होण्यातील एक महत्त्वाची पायरी असते इतके लक्षात ठेवले आणि त्याला तितपतच महत्त्व दिले की झाले.

मेघना भुस्कुटे Mon, 24/11/2014 - 10:09

स्त्रीवाद, हिंदुत्व, मोदी, हिटलर, बौद्ध आणि हिंदू संबंध, रामदास, अध्यात्म, लग्नसंस्था - अशा अनेक विषयांना एका फटक्यात स्पर्श केलेला पाहून धागाकर्त्याबद्दल आदर वाटला. धाग्यात त्रिशतकाचे पोटेन्शिअल आहे हे खरेच.

पण टायमिंगमध्ये धागाकर्त्याचा गांगुली झालेला नाही, हेही एक खेदाने नमूद केले पाहिजे. टायमिंग गंडल्यामुळे (आणि अनेक दिग्गज लोकांनी या प्रकारच्या ब्याटिंगमध्ये झळकून टीमची बस भरवल्यामुळे) या धाग्याने साधी हाप्सेंचुरी जरी नोंदली, तरी पावले, असे म्हणावे लागते आहे.

वामा१००-वाचनमा… Mon, 24/11/2014 - 19:25

In reply to by मेघना भुस्कुटे

:) अगं नाही मेघना, फेसबुकवर वाचलेल्या एका पोस्टवरुन सुचले हे. ती व्यक्ती स्त्रीमुक्तीवादी आहे.

राही Tue, 25/11/2014 - 14:08

हे व्यक्तिस्वातंत्र्य आणि अन्यायाचे प्रकरण स्त्रीजोडीदाराव्यतिरिक्त अन्य नात्यांपर्यंतही खेचता येईल. जसे की म. गांधींनी त्यांच्या मुलावर अन्याय केला. किंवा कोणीतरी (स्वतःसाठी नव्हे, पण) समाजासाठी उच्च काहीतरी करायचे आहे म्हणून घरादाराचा त्याग केला किंवा घरादारावर नांगर फिरवून घेतला किंवा स्वतःचे ध्येय गाठायचे आहे म्हणून घरातून पळून जाऊन नातेवाईकांना दु;खात लोटले किंवा कोणी मुलेच होऊ दिली नाहीत किंवा लग्नच केले नाही म्हणजे एका मुलीचे कल्याण झाले असते ते केले नाही वगैरे..

मनीषा Tue, 25/11/2014 - 14:50

स्वतःशी प्रामाणिक राहणे/ राहता येणे चांगलेच आहे.
पण आपाल्यावर अन्याय न व्हावा म्हणून इतरांच्या सुख- दु:खाची पर्वा न बाळगणे अजिबातच योग्यं नाही.

हे म्हणजे , दूस-याच्या घराला आग लावून , त्या धगी मधे स्वतः साठी उब शोधणे असा प्रकार झाला.

तुम्ही उल्लेख केलेल्या व्यक्ती महात्मे होते . त्यांना सर्वसामान्यांचे निकष लावता येत नाही.

स्मर्थ रामदास हे विवाहापूर्वीच निघून गेले. त्यामूळे त्यांच्या वाग्दत्त वधूचा अन्यस्त्र विवाह झाला असावा.
आणि गौतम बुद्द्ध, यशोधरेला पूर्वकल्पना देऊन घराबाहेर गेले / किंवा बुद्धत्व प्राप्तं झाल्यावर तिची क्षमा मागितली असे काहीसे वाचनात आले होते

नितिन थत्ते Tue, 25/11/2014 - 15:09

In reply to by मनीषा

>>गौतम बुद्द्ध, यशोधरेला पूर्वकल्पना देऊन घराबाहेर गेले

मी वाचले आहे ते नक्कीच असे नाही. रात्री पत्नी झोपलेली असताना बुद्ध निघून गेले.

बॅटमॅन Tue, 25/11/2014 - 15:11

In reply to by नितिन थत्ते

यशोधरेला सोडून जाणारा सिद्धार्थ होता तर सुजातेच्या हातची खीर खाणारा बुद्ध होता.

मनीषा Tue, 25/11/2014 - 17:48

In reply to by नितिन थत्ते

तुमचं बरोबर असणार... कारण मलाही ते खात्रीपूर्वक आठवत नव्हतच.
मी कुठल्या तरी वेगळ्या संदर्भात ऐकलेला/ वाचलेला प्रसंग इथे चिकटवला बहुदा ...

वामा१००-वाचनमा… Tue, 25/11/2014 - 19:52

In reply to by मनीषा

मला वाटतं आदि शंकराचार्यांनी नंतर त्यांच्या मातेस भेट दिली होती. ते आठवत असेल तुम्हाला.

बॅटमॅन Tue, 25/11/2014 - 15:23

In reply to by अनुप ढेरे

निघून नै गेले ते. पण संसाराची जबाबदारीही उचलल्याचे दिसत नाही.

ओह यू मीन वैकुंठगमन? तो तर ब्राह्मणांनी केलेला खून होता असं ब्रिगेडी इतिहासकार सांगतात. ते सांगतात म्हणजे खरंच असणार.

मनीषा Tue, 25/11/2014 - 17:44

In reply to by अनुप ढेरे

तुकाराम संसारातच राहिले पण विठ्ठल भक्ती मूळे संसार आणि व्यवसायाकडे दुर्लक्ष्यं केले.

अतिशहाणा Tue, 25/11/2014 - 17:47

In reply to by मनीषा

पहिली बायको आणि मुले दुष्काळात गेल्यानंतर तुकारामांना विरक्ती आली आणि ते विठ्ठलभक्तीकडे वळले. खरं तर त्यांच्या दुसऱ्या बायकोवर अन्याय झाला असे आजच्या स्टँडर्ड्सनुसार वाटू शकते.

अनुप ढेरे Tue, 25/11/2014 - 18:24

In reply to by अतिशहाणा

तुकारामांचे आयुष्य मिस्टिरिअसली संपले आहे. काही जाणकार तुकाराम संन्यास टाइप घेऊन कायमचे निघून गेले असे मानतात. काही लोक आत्महत्या केली असेही मानतात.

http://tukaram.com/english/introduction/introduction2.htm
दिलीप चित्रे यांच्या पुस्तकातून आहे हे.

Tukaram disappeared at the age of forty-one. Varkaris believe that Vitthal Himself carried Tukaram away to heaven in a "chariot of light". Some people believe that Tukaram just vanished into thin air while singing his poetry in front of an ecstatic audience on the bank of the river Indrayani in Dehu. Some others as I have said, speculate that he was murdered by his enemies. Still others think that he ended his own life by drowning himself into the very river where his poems had been sunk earlier. Reading his farewell poems, however, one is inclined to imagine that Tukaram bade a proper farewell to his close friends and fellow-devotees and left his native village for some unknown destination with no intention of returning. He asked them to return home after their having walked a certain distance with him. He told them that they would never see him again as he was "going home for good". He told them that from then on only "talk about Tuka" would remain in "this world".

वामा१००-वाचनमा… Fri, 28/11/2014 - 23:21

या धाग्यास, कसली "अ‍ॅप्ट" (पोषक?) कविता आहे -

साभार - http://www.ancientworlds.net/aw/Journals/Journal/1011724

The Journey

One day you finally knew

what you had to do, and began,

though the voices around you

kept shouting

their bad advice

though the whole house

began to tremble

and you felt the old tug

at your ankles

"Mend my life!"

each voice cried.

But you didn't stop.

You knew what you had to do,

though the wind pried

with its stiff fingers

at the very foundations

though their melancholy

was terrible.

It was already late

enough and a wild night

and the road full of fallen

branches and stones

But little by little,

As you left the voices behind,

the stars began to burn

through the sheets of clouds,

and there was a new voice

which you slowly

recognized as your own

that kept you company

as you strode deeper and deeper

into the world,

determined to do

the only thing you could do---

determined to save

the only life you could save.