राष्ट्रवादळ
दिनवैशिष्ट्य
६ डिसेंबर
जन्मदिवस : प्राच्यविद्या संशोधक मॅक्स म्युल्लर (१८२३), कवी (रेव्हरंड) ना. वा. टिळक (१८६१), गीतकार इरा गर्श्विन (१८९६), नाट्यअभिनेता व गायक जयराम शिलेदार (१९१६), लेखक वसंत सबनीस (१९२३), लेखक कमलेश्वर (१९३२), नाटककार पीटर हांडके (१९४२), सिनेदिग्दर्शक शेखर कपूर (१९४५), टेनिसपटू रिचर्ड क्रायचेक (१९७१)
मृत्यूदिवस : चित्रकार जाँ-बातिस्त-सिमेआँ शार्दँ (१७७९), लेखक अँथनी ट्रॉलॉप (१८८२), गायक व गिटारिस्ट लेड बेली (१९४९), भारतीय घटनेचे शिल्पकार व विचारवंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९५६), मानसशास्त्रज्ञ व विचारवंत फ्रँझ फॅनन (१९६१), क्रांतिसिंह नाना पाटील (१९७६), लेखक अनिल बर्वे (१९८४), गायक व गिटारिस्ट रॉय ऑर्बिसन (१९८८), चित्रकार प्रभाकर बरवे (१९९५), शिल्पकार सेझार (१९९८)
---
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - फिनलंड
आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (भारत)
१७६८ : 'एन्सायक्लोपीडिआ ब्रिटानिका'ची पहिली आवृत्ती प्रकाशित.
१८६५ : अमेरिकन संविधानात केलेल्या बदलानुसार गुलामगिरी बेकायदेशीर ठरली.
१८९७ : परवानाधारक टॅक्सी उपलब्ध असणारे लंडन हे जगातले पहिले शहर बनले.
१९३३ : जेम्स जॉइसची कादंबरी 'युलिसिस' अश्लीलतेच्या आरोपांत निर्दोष सिद्ध (अमेरिका).
१९५३ : व्लादिमिर नाबोकॉव्ह यांनी आपली प्रख्यात कादंबरी 'लोलिता' लिहून पूर्ण केली.
१९९२ : हिंदुत्ववाद्यांनी अयोध्येतली बाबरी मशीद उध्वस्त केली. देशभर झालेल्या दंगलींत हजारो ठार. फाळणीनंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात देशभर हिंदू-मुस्लिम दंगली उफाळल्या. दंगलींसाठी कोण जबाबदार हे ठरवणारा खटला अद्याप न्यायालयात प्रलंबित.
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- आचरटबाबा
- 'न'वी बाजू