आइसलंडमध्ये तीन दिवस - भाग २.

भाग २.
(भाग १.)

आमच्या आइसलंडच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी चारचाकी भाडयाने घेऊन तिच्यातून हिंडायचे असे आधीच ठरवून येण्यापूर्वीच ती सोय केली होती. (आइसलंडमध्ये रेकयाविकची शहराची आणि बाहेरगावांसाठी अशी काही सार्वजनिक बसव्यवस्था आहे. आइसलंडमध्ये रेलगाडया अजिबात नाहीत. वस्ती कमी आणि खाजगी गाडी ठेवण्याचे प्रमाण बरेच मोठे असल्याने सार्वजनिक बसव्यवस्था मर्यादित वेळात आइसलंडला भेट देणार्‍यांसाठी सोयीस्कर नाही असा सल्ला आम्हास निघण्याआधीच मिळाला होत आणि अनुभवान्ती तो योग्यच असल्याचे पटले.)

दोन दिवसांपैकी दुसरा दिवस रेकयाविक शहरामध्ये हिंडण्यासाठी वापरायचा असे वेळापत्रक होते.

रेकयाविक शहरामध्ये आइसलंड देशाचे राष्ट्रीय संग्रहालय आहे. त्याला भेट द्यायला निघालो. देश छोटा, त्यात राजे-सरदार-लढाया असे काही फारसे न घडल्यामुळे संग्रहालयहि अगदी छोटे आहे. तेथे घेतलेल्या छायाचित्रांपैकी सहा येथे दाखवीत आहे. ती अनुक्रमे वायकिंग नौकेची प्रतिकृति, वायकिंग शस्त्रे, वायकिंग Drinking Horn ची १६व्या शतकातील कॉपी, तिचे वर्णन, आइसलंडमध्ये वसाहत करायला आलेल्यांची झोपडी आणि वापराच्या वस्तु ह्यांची प्रतिकृति आणि १९७२च्या फिशर-स्पास्की ह्या गाजलेल्या बुद्धिबळ सामन्यामध्ये वापरलेले टेबल ह्यांची आहेत. शीत युद्धाच्या ऐन कळसाच्या वेळी ह्या दोन तुल्यबल प्रतिस्पर्ध्यांमधील रेकयाविकमध्ये अनेक दिवस चाललेल्या ह्या सामन्याने तेव्हा सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते असे स्मरते.


संग्रहालयामधून बाहेर पडलो आणि जवळच असलेल्या ’आथक्रिम्सकिर्क्या’ (Hallgrímskirkja आथक्रिमचे चर्च) बघण्यास गेलो. ह्याची आधुनिक ढंगाची इमारत ही रेकयाविकमधील सर्वात उंच इमारत आहे. आथक्रिमुर (१६१४-७४) (Hallgrímur Pétursson) हा आइसलंडचा सर्वात प्रख्यात धर्मगुरु कवि आपल्या Passion Hymns नावाच्या ह्या ५० कवितांसाठी ओळखला जातो . ह्या कवितांमधून जीजसच्या क्रूसावर जाण्याचे वर्णन करण्यात आले आहे आणि लेंटच्या उपासाच्या दिवसांमध्ये रोज एक असे त्यांचे वाचन करण्याची प्रथा आहे. त्या धर्मगुरूचे नाव ह्या चर्चला देण्यात आले आहे. चर्चच्या मनोर्‍याच्या खिडक्यांमधून रेकयाविकच्या चारी बाजू स्वच्छ पाहता येतात.

पुढील छायाचित्रांमध्ये चर्च आणि त्यामधील मधील जीजसचा आधुनिक शैलीतील पुतळा, चर्चचा मुख्य हॉल आणि ऑर्गन, चर्चच्या आवारातील लेइफ एरिकसन ह्या वायकिंग प्रवाशाचे स्मारक आणि मनोर्‍यावरून दिसणारे रेकयाविकचे दृश्य ह्यांची छायाचित्रे आहेत. कोलंबसच्या पूर्वी ५०० वर्षे हा आइसलंडमधून निघून सध्याच्या कॅनडाच्या न्यू फिण्डलंड आणि लॅब्राडोर प्रान्ताच्या उत्तरेस विनलंड येथे उतरला आणि अमेरिकेतील पहिली युरोपीय वसाहत त्याने तेथे बांधली असा इतिहास आता बहुमान्य झाला आहे. १९३० साली आइसलंडचे पहिले ’पार्लमेंट’, अल्थिंग, स्थापन झाल्याला १००० वर्षे झाली ह्या घटनेच्या स्मृतिपीत्यर्थ अमेरिकन नागरिकांकडून हे स्मारक आइसलंडला भेट म्हणून पाठविण्यात आले.

रेकयाविकच्या दृश्यामध्ये जो रस्ता खाली दिसत आहे त्याच्या डाव्या कोपर्‍यावरील रेस्टॉरंटमध्ये जाऊन आइसलंडचे ’गोट सूप’ अवश्य चाखा असा सल्ला येण्यापूर्वी मिळाला होता. त्याप्रमाणे चर्चमधून बाहेर पडून तिकडे मोर्चा वळविला.

Kjötsúpa म्हणजे बकरीच्या मांसाचे आइसलंडचे सूप ही तेथील पारंपारिक पाककृति आहे आणि ते बनविण्याच्या अनेक कृति जालावर उपलब्ध आहेत. रेस्टॉरंटमध्ये आम्ही पोहोचेपर्यंत लंचची वेळ संपून गेली होती आणि त्यामुळे आमच्या वाटयाला आले ते बहुतेक पाणीच! (अशी तक्रार आम्ही आमच्या वेट्रेसकडे केल्यावर आमचे सर्व बिल माफ करण्यात आले हा त्यातील आनंदाचा भाग. आमच्या शेवटच्या दिवशी मात्र आम्हाला एका ठिकाणी हे व्यवस्थित मिळाले आणि त्याची कीर्ति अनाठायी नाही हे आम्हांस पटले. घरी परतल्यावर एकदोनदा ते करण्यातहि आले आणि तशीच चव त्याला आली.)

नंतर दोनतीन तास गावातून पायी हिंडून थोडे विंडोशॉपिंग, थोडे पुस्तकांच्या आणि पारंपारिक कलाकृतींच्या दुकानांमधून डोकावल्यानंतर हॉटेलात परतण्यापूर्वी शिफारस केली गेलेली अजून एक चीज खाऊन पाहण्याचे ठरविले. ती म्हणजे देवमाशाचा स्ट्यू. एका ठिकाणी तो मिळालाही पण तो मात्र विशेष पसंतीला आला नाही कारण तो फारच सपक आणि चिवट होता. कधी आइसलंडला जाणे झाले तर त्याला पास द्या असे सुचवेन.

(ह्यानंतर अखेरचा भाग ३.)

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

क्या बात! जाताजाता खाद्यसंस्कृतीचे फोटोही टाकले असते तर अजून मजा आली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

राजे-सरदार-लढाया असे काही फारसे न घडल्यामुळे संग्रहालयहि अगदी छोटे आहे.

Biggrin

शेवटचा फोटो मस्त आहे. रंगीबेरंगी घरं मस्त दिसत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छायाचित्र घरी जाऊन बघेन (हाफिसातून नै दिसते)
मात्र वर्णन जरा कमी वाटले तरी लेखमालेचा उद्देश छायाचित्रे दाखवणेही असल्याचे पहिल्याच भागात सांगितल्याने ती तक्रार करता येणार नाही Smile

तिसर्‍या भागाच्या प्रतिक्षेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या ब्लॉगवर आईसलँडच्या फोटोंचं सेक्षन आहे एक. अप्रतिम फोटो आहेत. जरूर बघावा असा ब्लॉग.

http://www.parrikar.com/blog/category/iceland/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मस्त! शेवटचा फोटो खासच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0