'शोले'चा पर्यायी शेवट

शोले हा चित्रपट १९७५ साली आला. तेव्हापासून आजपर्यंत चित्रपटगृहात, दूरचित्रवाणीवर, कॅसेटवर, डिस्कवर हा चित्रपट कितीदा पाहिला ह्याची मोजदाद नाही. ह्यापूर्वी जेव्हा जेव्हा पाहिला तेव्हा शेवटी ठाकूरने गब्बरला मारून टाकण्याआधी पोलीस येतात व ठाकूरला (चित्रपटांतील नेहमीचे) भावनिक आवाहन करून गब्बरला पकडून घेऊन जातात. आज मात्र सिने मस्तीनामक वाहिनीवर शोले पाहिला तेव्हा वेगळा शेवट दिसला. ठाकूर व गब्बरची शेवटची हाणामारी चालू असताना व गब्बर गलितगात्र झाला असताना ठाकूरला गब्बर ज्या दगडी खांबापुढे उभा असतो त्यातून बाहेर आलेली आडवी तीक्ष्ण सळी दिसते. तो लाथ मारून गब्बरला त्या सळीवर धकलतो, सळी गब्बरच्या पाठीतून घुसून छातीतून निघते व गब्बर गतप्राण होतो.

हा दुसरा शेवट माझ्यासाठी नवीन होता. ह्याविषयी कोणाला काही माहिती आहे का? ह्याव्यतिरिक्त आणखी एखादा तिसरा शेवटही अस्तित्वात आहे का?

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आहे ना, "टारएन्ड मिस्ट्रिब्युटर्स"ने एक प्रिंट काढली होती. त्यात गब्बर आणि ठाकूर मारामारी करत असताना एक नाग येतो नी गब्बरच्या डोळ्यात खोलवर पाहातो आणि गब्बर ओक्साबोक्षी रडायला लागतो नी हृदय पिळवटून टाकणार्‍या आवाजात आपली कहाणी ठाकूरला सांगतो. ओक्साबोक्षी रडणार्‍या माणसाचं बोलणं कधी ऐकलंय का तुम्ही? काSSSSहि कळत नाही. पण साधारण अर्धवट ऐकू येणार्‍या शब्दावरून आपल्याला अंदाज बांधता येतो की तो वास्तविक चांगल्या घरातला मुलगा होता, पण त्याला जत्रेतनं डाकूनी पळवला आणि डाकू म्हणून वाढवला, आत्ता नागाने त्याला त्याच्या कुकर्मांचा पश्चाताप करवला आणि तो सैरभैर झालाय. सुदैवाने आपल्याला कळलेलं हे सगळं, ओक्साबोक्षी रडण्यातलं आहे लक्षात आहे ना?, हे ठाकूरला पण कळतं. त्यालाही एकदम आठवतं की त्याला एक लहान भाउ होता आणि एकदा जत्रेत तो झोपल्यावर (तो म्हणजे ठाकूर बरं का) परत आला पण दुसर्‍या दिवशी परत आल्यावर भाउ नव्हता आणि कोणी त्यानंतर काहिहि त्याबद्दल बोललं नाही. "लेकीन उसे मेरे मन से कैसे निकाल पाते वो" असं तो विद्ध स्वरात म्हणतो, गब्बरला मिठी मारतो आणि पुढचा शॉट आहे की ठाकूर बिलियर्ड टेबलवर वाकून अँगलचा अंदाज घेतोय, पाठीमागे गब्बर, ठाकूरच्या बगलेतनं हात पुढे आणून क्यू धरलाय, ठाकूर अतिशय समाधानाने मागे वळून कृतज्ञतेने गब्बर कडे पहातो आणि मायेने माखलेल्या स्वरात म्हणतो, "इतना अँगल तेरे लिये काफि है गब्बर?" आणि गब्बर आवेशाने म्हणतो, "आदमी दो, हात भी दो. पूरे दो. ये शॉट मुझे दे दे ठाकूर...........". जरूर मिळवून बघा - "टारएन्ड मिस्ट्रिब्युटर्स" ची आहे हि प्रिंट Biggrin Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

गब्बरला मिठी मारतो

ठाकूर गब्बरला मिठी कशी मारू शकेल?

(व्हाइसे व्हर्सा शक्य आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा खरय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रॉक्सी (रामलाल) वापरून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Smile हा व्हिडीओ पाहिलायस का? - https://www.youtube.com/watch?v=IGQmdoK_ZfY

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

काय्की. पहिल्यांदाच ऐकतेय.
पण असे एकापेक्षा जास्त शेवट असलेले अजून कोणते चित्रपट आहेत? अमिताभ, अक्षय, अर्जुन यांचा आँखे; त्याचा शेवट थिएटरमधे आणि सिडीवर वेगळा होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो शोलेला दोन शेवट होते.
सेन्सॉर च्या आणि चित्रपटाच्या लांबीच्या कारणाने मूळ शेवट बदलण्यात आला.
Alternate version

The director's original cut of Sholay has a different ending in which Thakur kills Gabbar, along with some additional violent scenes. Gabbar's death scene, and the scene in which the imam's son is killed, were cut from the film by India's Censor Board, as was the scene in which Thakur's family is massacred.[28] The Censor Board was concerned about the violence, and that viewers may be influenced to take the law into their own hands.[34] Although Sippy fought to keep the scenes, eventually he had to re-shoot the ending of the film, and as directed by the Censor Board, have the police arrive just before Thakur can kill Gabbar.[35] The censored theatrical version was the only one seen by audiences for fifteen years. The original, unedited cut of the film finally came out in a British release on VHS in 1990.[31] Since then, Eros International has released two versions on DVD. The director's cut of the film preserves the original full frame and is 204 minutes in length; the censored widescreen version is 198 minutes long.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0