अयशस्वी ठरलेले काही तंत्रज्ञान सुविधा (पूर्वार्ध)

एखादे तंत्रज्ञान योग्य त्या चाचण्या केल्यानंतर व त्याची आर्थिक बाजू तपासून यशाच्या पायरीवर चढण्यापूर्वी अनेक प्रकारचे, चित्र विचित्र कल्पना त्या तंत्रज्ञानाच्या संबंधात लढवल्या जात असतात. काही कल्पना कचर्‍याच्या डब्यात फेकल्या जातात व काही मोजक्या कल्पना तगून राहतात व त्यांचा पाठपुरावा केला जातो. अनेक डिझाइन कल्पनामधून एखादी कल्पना यशस्वी ठरते व त्या कल्पनेच्या जोरावर डिझाइनर वा डिझाइन टीम/कंपनी भरपूर पैसे कमावू लागते. हे यशस्वी तंत्रज्ञान बघता बघता गरजेची होऊन जाते. कार्स, मोबाईल्स, टीव्ही, संगणक, इत्यादी सारख्या तंत्रज्ञान सुविधा एकाच क्षणी सुचल्या व यशस्वी झाल्या असे कधीच झाले नाही. हजारो डिझायन्सच्या कल्पना लढवल्या व त्यात एखादे यशस्वी झाले. याचा अर्थ अयशस्वी डिझाइन्स अगदीच वाईट वा घातक होत्या असे नाही. परंतु लोकांच्या पसंतीस न उतरल्यामुळे त्या अयशस्वी ठरल्या. नवीन गोष्टी आल्या की जुनी विसरण्याची सवय समाजाला आहे. लँडलाइन्सचा अंत जवळ आला आहे. पेजर विस्मृतीत गेल्या. फौंटन पेन्स गेल्या. पाटी – पेन्सिल जाण्याच्या मार्गावर आहेत. स्टीम इंजिन्स गेल्या. ही यादी आणखी वाढविता येईल. काही जुने तंत्रज्ञान नष्ट व्हायला हवे होते पंरतु त्या काही जायला तयार नाहीत; उदा Qwerty कीबोर्ड - हा कीबोर्ड कितीही अकार्यक्षम असला तरी ग्राहकांना अजूनही तो आहे तसाच हवा आहे. ट्राम्स अजून टिकून आहेत.

यश न मिळालेल्या पंरतु यशाच्या शेवटच्या पायरीपर्यंत पोचलेल्या काही तंत्रज्ञान सुविधांच्याबद्दलची माहिती उद्-बोधक ठरेल..

माणसाच्या उंचीएवढा धनुष्य

प्रभू रामचंद्राच्या फोटोतील धनुष्याची उंची डोक्यापासून गुडघ्यापर्यंत दाखवले जाते, हे बारकाईने पहिल्यास लक्षात येईल. मध्ययुगात 6 फूट उंचीच्या धनुष्याचा चांगल्या प्रकारे प्रभाव होता. 1356 सालच्या पॉइटिक्स युध्दात इंग्लिश सैनिकांच्याकडे असलेल्या या 6 फूट धनुष्यानी 2000 फ्रेंच लढवय्यांचा बळी घेतला होता. 14व्या शतकाच्या शेवटपर्यंत या धनुष्याला चांगलाच भाव होता. तीरंदाजी प्रकारामध्ये या प्रकारच्या धनुष्याच्या वापरातून अनेकाचे बळी गेले. म्हणूनच या धनुष्याचा वापर फक्त रविवारी व्हावे असे फर्मान निघाले. अशा प्रकारचे धनुष्य वापरण्यासाठी फार कौशल्य लागते. प्रशिक्षणातच अनेक वर्षे घालवावे लागतात व तज्ञ होण्यासाठी अनेक दशकांचा काळ जातो. म्हणूनच नंतर हे तंत्रज्ञान अयशस्वी ठरले. कारण कमी उंचीच्या धनुष्याचे प्रशिक्षण एक दोन आठवड्यात देता येते हे लक्षात आले. व यासाठी फार कौशल्याची गरजही नव्हती. स्काउट मधल्या मुलीसुध्दा शाळेच्या पटांगणात सराव करून प्रशिक्षित होत होत्या.

व्हायोल


अमेरिकन वा युरोपियन चित्रपटात ऑपेरा संगीत दाखवत असताना मनुष्य भर उचींचे व्हायोलिनसदृश व्हायोल हे वाद्य पाहिलेले आपल्याला आठवत असेल. सहा तारा असलेले हे वाद्य वाजवण्यासाठी व्हायोलिन प्रमाणे बो फिरवावे लागते व हवे असल्यास सतारीप्रमाणे Pluck करूनही वाजवता येते. यातून फारच सौम्य ध्वनी निघत असल्यामुळे हे एकेकाळी संगीतकारांचे आवडते वाद्य होते.
परंतु 18 व्या शतकात – अजूनही मायक्रोफोनचा शोध लागलेला नव्हता तेव्हा – ऑर्केस्ट्रासाठी जागा कमी पडू लागली व संगीतात रुची असणार्‍यांना Loud संगीत आवडू लागले. त्यामुळे हे संगीत वाद्य काळाच्या पडद्यामागे अस्तंगत झाले. अशाच प्रकारे अनेक वाद्य काही काळापुरते आले व गेले सुध्दा.

न्यूमॅटिक रेल

रस्त्याच्या खाली केबल घालण्यासाठी वा खड्डा खोदण्यासाठी न्यूमॅटिक ड्रिलच्या, वा वर्कशॉपमध्ये किंवा कारखान्यात काम केलेल्यांना न्यूमॅटिक टूल्सच्या, वापराबद्दल माहित असण्याची शक्यता आहे. परंतु 1814 साली जॉन व्हलन्स याने इंग्लडच्या ब्रिटन या गावी न्यूमॅटिक शक्ती वापरून ताशी 2 मैल वेगाने दोघांना घेऊन जाणार्‍या रेलचे प्रदर्शन केले होते. खरे पाहता त्याला न्यूमॅटिक पेक्षा वातावरणीय दाबांचा वापर करून चालणारी रेल असे म्हणणे योग्य ठरेल. त्यासाठी 50 फूट लांबीच्या पाइपमधून वातावरणातील हवेचा झोत सोडून गाडीला वेग दिला होता. यानंतर 1844 मध्ये याच तत्वाचा वापर करून लंडन-क्रॉयडन या रेल्वे कंपनीने साडेसात मैलाची रेल्वे लाइन टाकली. चाचणीच्या वेळी ही रेल्वे ताशी 70 मैल या वेगाने धावली. न्यूमॅटिक पाइप रेलबोगीच्या खाली व दोन्ही रेलच्या मधोमध जाण्यासारखी जोडलेली होती. परंतु 1847 मध्ये पारंपरिक रेल्वे रूळावर याची जोडणी करणे शक्य न झाल्यामुळे प्रकल्पाचे काम थांबवण्यात आले. नंतरच्या काही वर्षांनी हाच प्रयोग अमेरिकेतील मॅनहटन शहरात करण्यात आला. सायंटिफिक अमेरिकन या विज्ञानविषयक मासिकाचे संपादक आल्फ्रेड एली बीच यानी पुढाकार घेऊन 294 फूट रेल्वेचे रूळ टाकले. व न्यूमॅटिक रेल त्यावर धावू लागली. पहिल्या दोन आठवड्यात सुमारे 3000 डॉलर्स उत्पन्न मिळाले. परंतु भ्रष्ट राजकीय नेते, वायदा बाजारातील मंदी आणि एलिव्हेटेड रेल्सच्या आकर्षणामुळे बीचचे स्वप्न धुळीस मिळाले.

स्टर्लिंग इंजिन

1816च्या सुमारास स्कॉटलंड चर्च य़ेथील रॉबर्ट स्टर्लिंग या पाद्रीने heat economizer चे पेटंट घेतले. या पेटंटच्या आधारे बनवलेले इंजिन कुठल्याही – पेटलेल्या आगीपासून हाताचे तळवे घासल्यानंतर मिळणारे – उष्णतेचे स्रोत व दोन पिस्टन्सच्या सहाय्याने औष्णिक बलाचे गतिकी बलात रूपांतरित करता येते असा त्याचा दावा होता. स्टर्लिंग व त्याचा भाऊ, जॉन स्टर्लिंग, या दोघानी पुढील कित्येक वर्षे काम करून इंजिनमध्ये सुधारणा केल्या. व त्यातून मिळणार्‍या उर्जेतून डंडी या शहरातील एक फाउंड्री चालवून दाखवली. वाफेवर चालणारे इंजिन अकार्यक्षम व धोकादायी असू शकते. पंरतु स्टर्लिंग बंधूनी त्यांच्या इंजिनमध्ये भरपूर सुधारणा करून औद्योगिक क्रांतीला हातभार लावला. स्टर्लिंगच्या कल्पनेतील हे इंजिन पुढील 100 वर्षे वीज गेल्यानंतर वापरण्यात येणार्‍या (जनरेटर) जनित्रासारखे वापरण्यात आले. परंतु अलीकडेच इंधनाची बचत करणाऱी वाहनं बनवणार्‍या Segway या कंपनीच्या डीन कॉमन या संशोधकाने स्टर्लिंग तत्व वापरून बीकॉन जनरेटर तयार केले. वॉशिंग मशीनच्या आकाराचे हे जनरेटर सौर उर्जेचा वापर करून लहान उद्योगासाठी, एखाद्या गावासाठी किंवा इको फ्रेंडली घरासाठी विद्युत पुरवठा करू शकते.

डायरेक्ट कंरट

2012 सालापासून पश्चिम रेल्वे DC Traction वर चालणार्‍या लोकल्सला कायमचे रामराम ठोकून AC चा वापर करत आहे. शेवटच्या दिवशी बांद्रा ते चर्चगेट दरम्यान DC Traction वर धावणार्‍या लोकलला हार घालून शेवटचा निरोप घेतला. 1928 पासून कुर्ला ते बोरीवली पर्यंतचे लोकल्स DC Traction वर धावत होते.
थॉमस अल्वा एडिसनच्या डोक्यातून डायरेक्ट कंरटची सुपीक कल्पना निघाली होती, याचे आता विसर पडला असावा. आपण आता वापरत असलेल्या अल्टर्नेट करंटमुळे कुत्री मांजरी मरू शकतात, हत्ती मरू शकतात, हे एडिसनने सप्रयोग सिध्द करून दाखवले होते. अल्टर्नेट करंटला त्याचा विरोध होता. परंतु एडिसनला नंतरच्या तंत्रज्ञानामुळे हार मानावी लागली 1892 मध्ये जनरल इलेक्ट्रिक कंपनीने रोहित्रांचा (transformers) वापर करून अल्टर्नेट करंटवरील वीजप्रवाह दूरदूरपर्यंत अगदी कमी जाडीच्या तारामधून नेता येते, हे दाखवून दिले. त्यातून सुमारे 33 टक्के वीजबचत होत होती. विद्युत शॉकचा धोका टळला नसला तरी वीज उत्पादन कंपन्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही.
आता पर्यायी वीज उत्पादन करणारी साधनं पुन्हा एकदा डायरेक्ट कंरटकडे वळत आहेत. सौरशक्तीवरील ऊर्जेच्या साठवणुकीसाठी डायरेक्ट कंरटला पर्याय नाही.

स्टीम कार्स

कार्ससारख्या स्वयंचलित वाहनांच्या सुरुवातीच्या काळात आता वापरत असलेल्या आयसी (internal combustion) इंजिन्स ऐवजी external combustion steam इंजिन्सचे आधिपत्य होते, असे सांगूनही खरे वाटणार नाही. वाफेवर चालणारे स्टॅन्ली स्टीमर्स कार्समध्ये दोन सिलिंडर्स व ट्रान्समिशन रहित इंजिन बसवलेले होते. स्टीमकार्सचा वेगही भरपूर होता. हे कार्स ताशी 200 किमी वेगाने धावत होत्या. आयसी इंजिन्सच्या तुलनेने या इंजिन्सचा आकारही लहान होता आणि यांच्यामुळे ध्वनीप्रदूषणाची भीती नव्हती. परंतु हेन्री फोर्डच्या महत्वाकांक्षी असेंब्ली लाइन्सवर उत्पादित होत असलेल्या कार्सपुढे या स्टीम कार्सचा निभाव लागला नाही. व स्टॅन्ली कार्सचे उत्पादन थांबले. फोर्डच्या मॉडेल T कारपेक्षा स्टीमकारचा उत्पादन खर्च आठ पट जास्त होता.
आता इंधनाचा तुटवडा जास्तच जाणवू लागल्यामुळे व पर्यावरण रक्षणाची जाण आल्यामुळे वाफेवर चालणार्‍या इंजिन्सना चांगले दिवस येतील अशी अपेक्षा करायला हरकत नसावी. कॅलिफोर्नियाच्या हायवेवरील पॅट्रोलिंगसाठी वाफेवर चालणार्‍या डेल्माँट 88 चा वापर होत आहे.

टाइम मशीन


टाइम मशीन या कल्पनेचा वापर करून आतापर्यंत शेकडो कथा, कादंबर्‍या, व चित्रपट प्रसिद्धीच्या झोतात आले असतील. परंतु टाइम मशीनच्या अगदी जवळ पास जाणार्‍या इंजिनचे डिझाइन करणारा गॉर्डन अर्ल ऍडम्स हा लंडनस्थित एक इंजिनीयर होता. 1920 साली त्यानी 15 -20 फ्लायव्हील्स वापरून एक गंमतीशीर मशीन तयार केले. त्यातील काही फ्लायव्हील्स कित्येक टन वजनाच्या होत्या. ज्या वेगाने त्या फिरत होत्या त्यावरून भरपूर शक्ती असलेला विद्युत प्रवाह वातावरणात फेकला जात असावा असे वाटत होते. वयाच्या 68व्या वर्षी 1933 साली त्याचा मृत्यु झाला. आताच्या इजिनियर्सनी जेव्हा त्याच्या डिझाइनचा आढावा घेतला तेव्हा त्याच्या इंजिनियरिंग संकल्पना अफलातून होत्या, हे त्यांना मान्य करावे लागले. तो काळाच्या पुढे फार फार पुढे होता हे जाणवते.
अधिक माहितीसाठी

सजवलेले हेल्मेट


पुराणकालातील राजा महाराजांना टीव्हीवर दाखवत असताना त्यांच्या डोक्यावर किरीट हमखास दिसते. खरे पाहता किरीट हे एक सजवलेले हेल्मेट असेच म्हणायला हवे. पंरतु या किरीटांचा (व या किरीटधार्‍यांचा) युध्द काळात काही उपयोग होत नव्हता. ही परिस्थिती पहिल्या महायुध्दापर्यंत होती. डोक्याला मार लागूनच योध्दे मरत होते. बंदुकीच्या वापरामुळे बंदुकीच्या गोळ्यांचे तुकडे शरीरात व विशेषकरून डोक्यात घुसल्यामुळे मरणार्‍यांची संख्या वाढत होती. यावर उपाय शोधण्यात आले व स्टील हेल्मेटचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला. अशा प्रकारच्या हेल्मेट्सचे अनेक डिझाइन वापरात होते. त्यापैकी जर्मन सैनिकांसाठीचे स्टीलहेल्म हे डिझाइन यशस्वी ठरले. डोक्यापासून मानेपर्यंतचे रक्षण करणार्‍या या डिझाइनचा वापर अनेक देशात होऊ लागला व आजही त्या वापरात आहेत.

.......अपूर्ण

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

लेख माहितीपूर्ण आहे.
सहज कुतूहल आणि अवांतर : भारतातील कृत्रिम-धागानिर्मिती व्यवसायात सुरुवातीच्या काळात वाडियांचे वर्चस्व असताना काही सरकारी सवलती खुबीने (आणि अन्य मार्गाने) मिळवून रिलायन्सने मात केली आणि पॉली-एस्टर धागानिर्मितीचे आपले तंत्रज्ञान अथवा पद्धत अधिक गुंतागुंतीची असूनही रूढ करवली असे काहीतरी वाचले होते. त्या लेखात पॅराझाय्लीन आणि डीएम्टी/पीटीए या नावांचा वारंवार उल्लेख होता. आज तर पॅराझाय्लीनच पाया म्हणून वापरले जाते. पण चाळीसपन्नास वर्षांपूर्वी काही दुसरी पद्धत अथवा रॉ-मटीरियल होती/होते का, की जी/जे आज कालबाह्य झाली/झाले आहे?
त्या लेखातले प्रतिपादन असे होते की वाडिया वापरत असलेल्या रॉ-मटीरिअलवर जास्त कर किंवा आयातशुल्क लाववण्यात रिलायन्स यशस्वी झाली. आणि अर्थात त्यामुळे वाडियांच्या धाग्याचा उत्पादनखर्च आणि विक्रीची किंमत वाढली.
कोणी अधिक काही सांगू शकेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हवेहून हलकी अशी Airships ही अशीच एक कल्पना आहे जी १९३७ च्या न्यूयॉर्कमधील 'हिंडेनबुर्ग'अपघातामुळे मागे पडली. (ह्याचे news footage येथे पाहता येईल. आता पुनः जड समानाची वाहतूक, आकाशात स्थिर राहून खालचे निरीक्षण, दुर्गम आणि फार सुविधा नसलेल्या जागी प्रवास इत्यादि वापरांसाठी Airships वापरता येतील अशी आशा काहीजण करतात आणि त्या दिशेने त्यांचे प्रयत्नहि चालू असतात. कोण जाणे, त्यांना यश येईलहि आणि ऊर्जेचा काटकसरीने वापर करणारे नेवे वाहतूक साधन उपलब्ध होईल. (मी स्वतः त्रिनिदादमध्ये पोर्ट ओफ स्पेन ह्या राजधानीच्या गावी खाली लक्ष ठेवण्यासाठी पोलिस ह्यांचा वापर करतात हे पाहिले आहे. मी काढलेले त्याचे छायाचित्र खाली पहा.)


रिलायन्सची अल्प काळात भरभराट का झाली ह्याचे मी पूर्वी वाचलेले विश्लेषण असे होते. १९७४-७५ सालापर्यंत आणि त्याच्या पूर्वी सुमारे १५ वर्षे मशिनरीमधील नव्या गुंतवणुकीमुळे गुंतवणुकीच्या २५ ते ३५ टक्के इतकी Development Rebate (S.33 of the IT Act, 1961) नावाची वजावट गुंतवणुकदाराला आयकरासाठी पात्र उत्पन्नातून मिळत असे. अशी वजावट उत्पन्नाहून अधिक असेल तर तिला कॅरी-फॉरवर्डहि मिळत असे. (हे अत्यंत सोपे वर्णन आहे, प्रत्यक्षात ह्यामध्ये बरीच गुंतागुंत होती.) धिरुभाईंनी ह्या आणि अशा अन्य सवलतींचा भरपूर वापर करून भरपूर भांडवल खाणार्‍या पेट्रो-केमिकल उद्योगाची बांधणी केली आणि तरीहि कित्येक वर्षे त्यांना आयकर भरावा लागला नाही किंवा अत्यल्प भरावा लागला. असल्या भंडवलखाऊ उद्योगांना लागणारे भांडवल उभे करण्याचा आगळा मार्ग त्यांनी शोधला. ICICI, IDBI, बँक्स अशा सरकारी छत्राखालील भांडवल पुरविणार्‍या संस्थाकडे न पाहता ते आपल्या भागधारकांकडे वळले. धिरूभाईंच्या पूर्वी कंपन्या चालवणार्‍यांची भागधारकांकडे पाहण्याची दृष्टि म्हणजे डिविडंडसाठी चालकांकडे आशेने पाहणारे लोक इतकीच होती आणि कमीतकमी डिविडंडात त्यांची बोळवण कशी करता येईल ह्यावर चालकांची नजर असे. ह्याच्या उलट धिरूभाईंनी आयकर वाचवून उरलेली कॅश आपल्या भागधारकांना डिविडंड आणि वर वेळोवेळी बोनस शेअर्स देऊन आणि त्यांनाहि श्रीमंत करून अशा भागधारकांचा एक फॅनक्लबच तयार केला होता. त्यांची नव्या भांडवलाची मागणी आली की हाच फॅनक्लब त्यांना भांडवल पुरवत असे आणि बिनव्याजी भांडवल त्यांच्याकडून धिरुभाईंना आपसूक मिळत असे.

शेअरबाजारात आपल्या गटातील ब्रोकर्सना कामाला लावून आपल्या शेअरच्या किंमती वरखाली करणे असले उद्योगहि ते करत असत अशी बोलवा आहे. तरीहि भागधारकांची नस ओळखणे आणि भागधारक हा एक 'क्लास' निर्माण करणे ही दूरदृष्टि त्यांच्या यशाचे मुख्य गमक होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धिरुभाईंनी ह्या आणि अशा अन्य सवलतींचा भरपूर वापर करून भरपूर भांडवल खाणार्‍या पेट्रो-केमिकल उद्योगाची बांधणी केली आणि तरीहि कित्येक वर्षे त्यांना आयकर भरावा लागला नाही किंवा अत्यल्प भरावा लागला.

याचसाठी - "बुक प्रॉफिट" असूनही करपात्र नफा नसणे - Minimum Alternate Tax अस्तित्त्वात आणला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

रोचक माहिती!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रवासी वाहतुकीसाठी स्वनातीत वेगाचे काँकर्ड हेही असेच एक फीजिबल न ठरलेले उदाहरण.

बाकी:

स्टीम कार्स

कार्ससारख्या स्वयंचलित वाहनांच्या सुरुवातीच्या काळात आता वापरत असलेल्या आयसी (internal combustion) इंजिन्स ऐवजी external combustion steam इंजिन्सचे आधिपत्य होते, असे सांगूनही खरे वाटणार नाही. वाफेवर चालणारे स्टॅन्ली स्टीमर्स कार्समध्ये दोन सिलिंडर्स व ट्रान्समिशन रहित इंजिन बसवलेले होते. स्टीमकार्सचा वेगही भरपूर होता. हे कार्स ताशी 200 किमी वेगाने धावत होत्या. आयसी इंजिन्सच्या तुलनेने या इंजिन्सचा आकारही लहान होता आणि यांच्यामुळे ध्वनीप्रदूषणाची भीती नव्हती. परंतु हेन्री फोर्डच्या महत्वाकांक्षी असेंब्ली लाइन्सवर उत्पादित होत असलेल्या कार्सपुढे या स्टीम कार्सचा निभाव लागला नाही. व स्टॅन्ली कार्सचे उत्पादन थांबले. फोर्डच्या मॉडेल T कारपेक्षा स्टीमकारचा उत्पादन खर्च आठ पट जास्त होता.

भाषांतरामुळे म्हणा किंवा अन्य कशामुळे म्हणा, पण वरील मजकुरातली बरीच वाक्ये वाचून "आँ??" झाले. २०० किमी ताशी वेगाने रस्त्यावर धावणारी "स्टीम इंजिनची" मोटार..?!

त्याच्या एक्स्टर्नल कंबशन स्टीम इंजिनचा आकार आधुनिकसम "इंटर्नल कंबशन" इंजिनपेक्षाही लहान होता?! जरा पटलं नाही.

आता इंधनाचा तुटवडा जास्तच जाणवू लागल्यामुळे व पर्यावरण रक्षणाची जाण आल्यामुळे वाफेवर चालणार्‍या इंजिन्सना चांगले दिवस येतील अशी अपेक्षा करायला हरकत नसावी. कॅलिफोर्नियाच्या हायवेवरील पॅट्रोलिंगसाठी वाफेवर चालणार्‍या डेल्माँट 88 चा वापर होत आहे.

इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्याने वाफेच्या इंजिन्सना चांगले दिवस? आणि वाफेची इंजिने कमी प्रदूषणकारी ? पुन्हा एकदा "आँ?" झाले, कारण मुदलात पाण्याची वाफ करण्यासाठी इंधन नाही तर इतर काय जाळायचे त्या वाफेच्या इंजिनात ? कोळसा किंवा अन्य इंधनाचीच भट्टी करावी लागेल ना? जितके इतर कमी प्रतीचे इंधन (भुसा, पालापाचोळा, कचरा) वापरावे तितके प्रदूषण आणखी जास्त आणि इंजिनचा आकारही. तेव्हा इंधनटंचाईला पर्याय म्हणून वाफ इंजिन हे काही समजले नाही बुवा.

बाकीची माहिती रोचक...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाषांतरामुळे म्हणा किंवा अन्य कशामुळे म्हणा, पण वरील मजकुरातली बरीच वाक्ये वाचून "आँ??" झाले. २०० किमी ताशी वेगाने रस्त्यावर धावणारी "स्टीम इंजिनची" मोटार..?!
त्याच्या एक्स्टर्नल कंबशन स्टीम इंजिनचा आकार आधुनिकसम "इंटर्नल कंबशन" इंजिनपेक्षाही लहान होता?! जरा पटलं नाही

माझ्याही मनात या शंका होत्या. परंतु हा लेख वाचल्यानंतर याबद्दल थोडीशी कल्पना आली.

(भाषांतरातील चुका मी मान्य करतो. क्षमस्व!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीपूर्ण लेखन
आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेखाचा विषय आणि माहिती रोचक आहे. प्रतिसादकर्त्यांचेही आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.