इतिहास

इतिहासाच्या पुस्तकांचे नवीकरण

महाराष्ट्राच्या ९ आणि १० इयत्तांच्या इतिहासाच्या पुस्तकांचे नवीकरण झाले आणि नव्या इतिहासातून मुघल साम्राज्य, तत्पूर्वीचे रझिया सुलताना, तुघलक, इत्यादि सुलतान, 'रुपये आणे' सुरू करणारा शेरशहा सूर, तसेच राजपूत इतिहास इत्यादि वगळण्यात आले आणि सर्व भर केवळ मराठी राज्यावर देण्यात आला आहे अशा बातम्या आल्याला आता जवळजवळ महिना झाला. (मुस्लिमपूर्व इतिहासाचे काय झाले आहे हे कळले नाही.)

असे असूनहि पुरोगामी विचाराच्या 'ऐसी अक्षरे' नावाच्या बालेकिल्ल्यात त्याच्याविषयी एक शब्दहि उमटलेला नसावा असे वाटते. हे आश्चर्य व्यक्त करावे असे वाटले म्हणून हा धागा उघडला आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आत्माराम, राधाबाई आणि रखमाबाई सगुण.

गूगलच्या मदतीने मी दुसरेच काही शोधत असता Radhabai Atmaram Sagun/Sagoon, Book publisher अशा एका नावावर माझी दृष्टि पडली. ह्यापूर्वी १८६०च्या दशकात स्थापन झालेल्या निर्णयसागर ह्या प्रकाशनव्यवसायाचे मूळ संस्थापक जावजी दादाजी आणि तदनंतर त्यांचे चिरंजीव तुकाराम आणि पांडुरंग ह्यांनी हा व्यवसाय सांभाळला होता. पांडुरंग जावजी ह्यांचा १९४० साली मृत्यु झाल्यानंतर जिजाबाई, सत्यभामाबाई आणि लक्ष्मीबाई ह्या चौधरी कुटुंबातील तीन विधवांनी आपल्या परीने काही वर्षे त्या व्यवसायाची ढासळती इमारत सावरून धरली होती.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

"आहिताग्नि राजवाडे : आत्मवृत्त"

आहिताग्नि शंकर रामचंद्र राजवाडे (१८७९- १९५२) यांचं आत्मचरित्र नुकतंच वाचायचा योग आला. त्यांच्या बद्दल, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती असणारी वेबसाईट नंतर वाचली. (http://www.ahitagni-rajwade.com/rajwade.html) वेब्साईटवरून एकंदर कामाची आणि आयुष्याची, विद्वत्तेची कल्पना येईल.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

माहीत‌ अस‌लेले ज‌गात‌ले प‌हिले 'शून्य‌'.

प्रचलित गणनापद्धति, १ ते ९ हे अंक, ० हा अंक आणि स्थानाप्रमाणे अंकाने दर्शविलेले मूल्य असणे ह्या सर्व बाबी अज्ञात अशा प्राचीन हिंदु गणितज्ञांची विश्वाला देणगी आहे हे आता सर्वमान्य झाल्यामध्ये जमा आहे. रोमन, ग्रीक किंवा तत्पूर्वीच्या बाबिलोनियन इत्यादि पद्धतींमध्ये नसलेले गणनाकौशल्य ह्या पद्धतीने जगाला दिले आणि भौतिक शास्त्रांची पुढील सर्व प्रगति ह्या गणनापद्धतीच्या पायावर उभी आहे ह्याविषयी दुमत नाही. आकडा कितीहि मोठा असू दे, ह्या पद्धतीमुळे तो सुतासारखा सरळ होते आणि बेरीज-वजाबाकी-गुणाकार-भागाकर असे संस्कार स्वत:वर निमूटपणे करून घेतो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

स्पेन महासत्ता का नाही ?

खफवर २० तारखेच्या आसपास ज्या गप्पा झाल्या, त्याबद्दल अधिक बोलण्यासाठी चिंजंनी धागा काढायला सांगितलं. तो हा धागा.
.

खफवरच्या माझ्या शंका --
शंका क्र१
भारतात समुद्री व्यापार- वसाहतीसाठी पोर्तुगीज डच इंग्रज फ्रेंच असे सगळे लोक आले (अगदि व्हेनिशिअन व्यापारीही येउन गेले चौलच्या युद्धाच्या वेळी.) पण मग स्पेन ह्या बर्‍यापैकी मजबूत मध्ययुगीन सत्तेला भारतात का येता अलं नाही ? ते येण्यात इंट्रेस्टेड नव्हते का ?
.
शंका क्र२
दक्षिण अमेरिकी देशच्या देश बेचिराख झाले; उजाड झाले म्हणे, युरोपिअन तिथे पोचल्यावर.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आइशमन इन जेरुसलेम : सामान्यांचा दुष्टपणा


एडॉल्फ आइशमन/आईशमन (जर्मन) एस.एस.चा सदस्य होता. त्याचं काम होतं, ज्यू आणि समलैंगिक, जिप्सी लोकांच्या 'प्रवासा'ची तजवीज करायची. हा प्रवास म्हणजे त्यांच्या राहत्या शहर/गावांतून परदेशात हकालपट्टी किंवा कोणत्याशा यातनातळाकडे रवानगी. यातनातळात नक्की काय होत असे, ह्याच्याशी त्याच्या कामाचा संबंध नव्हता.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

भारतीय गणितातील संकल्पनांचा इतिहास

नुकतीच फेसबुकावर एक चर्चा झाली त्यात कोणीतरी एक लेख सादर केला होता - त्यात लेखकाने 'भारतात अतिशय पुरातन काळापासून कोटी, शंकू इतकंच काय तर १ वर ५० शून्य असलेल्या संख्येलाही नाव होतं. यावरून गणित किती पुढारलेलं होतं पाहा.' असं काहीसं म्हटलं होतं. संख्येला नाव आहे म्हणजे ती संख्या वापरात होती असं नाही; आणि मोठ्ठ्या संख्यांना नावं असणं म्हणजे गणिताची प्रगती असंही नाही.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

सोम (Somme) लढाईच्या शताब्दी निमित्ताने : पहिले महायुद्ध आणि मराठी साहित्य

शंभर वर्षांपूर्वी आजच्या दिवशी, जुलै १ १९१६, पहिल्या महायुद्धातील सोमच्या (Somme) लढाईला सुरवात झाली. ही लढाई म्हणजे मानवी इतिहासातील एक काळाकुट्ट दिवस आहे.

ही लढाई आपल्याला वाटते त्यापेक्षा फार जवळची आहे कारण त्यात कित्येक मराठी बोलणाऱ्या माणसांनी जीव गमावला आहे. १२ लाख भारतीय जवानांनी पहिल्या महायुद्धात भाग घेतला आणि त्यातील ७४,००० जणांनी प्राणांची आहुती दिली. (दुसर्या महायुद्धात ८७,०००; १९७१च्या युद्धात ३,९००; १९६२च्या ३,०००; १९६५च्या ५,३०० जवान शहीद झाले होते. सर्व आकडे विकिपेडिया वर आधारित.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

मायकेल हेर- 'डिसप्याचेस' आणि 'अपोकलिप्स नाउ' वाले- वारले

'डिसप्याचेस', १९७७ या व्हिएतनाम युद्धावरील प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक मायकेल हेर जुन २३ २०१६ ला वारले. 'अपोकलिप्स नाउ', १९७९ या अत्यन्त गाजलेल्या सिनेमाच्या जडणघडणीत सुद्धा त्यान्चा हात होता.

'डिसप्याचेस' मधील माझ्या अन्गावर आलेली काही वाक्ये:

“ I went to cover the war and the war covered me; an old story, unless of course you’ve never heard of it.”

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

गोव्यातील इन्क्विझिशन

’इन्क्विझिशन’ ही रोमन चर्चमधील एक संस्था कॅथलिक चर्चचे पावित्र्य अबाधित ठेवण्याच्या हेतूने ९व्या ग्रेगरी - पोप असण्याचा काल १२२७ ते १२४१ - ह्या पोपने सुरू केली. पाखंड शोधून त्याचा नाश करणे हा त्याचा हेतु होता. त्या काळामध्ये युरोपात बहुतेक सर्व देशांमध्ये कॅथलिक चर्चचेच आदेश पाळले जात. प्रत्येक राजाने आपापल्या सत्तेच्या भागात इन्क्विझिटर नावाचे खास अधिकारी नेमून चौकशी करून शिक्षा देण्याचे विशेष अधिकार त्यांना द्यावेत आणि त्यांच्यासाठी विशेष सोयी निर्माण कराव्यात असा पोपचा आदेश होत. तदनुसार ’होली रोमन एम्परर’ दुसरा फ़्रेडेरिक आणि फ्रान्सचा राजा ९वा लुई ह्यांनी इन्क्विझिटर्स नेमले आणि संशयित पाखंडी व्यक्तींना पकडून अमर्याद काळापर्यंत तुरुंगात डांबून, तसेच त्यांना शारीरिक यातना देऊन त्यांच्याकडून पाखंड कबूल करवून घेण्याची अमर्याद सत्ता अशा इन्क्विझिटर्स कोर्टांना बहाल केली. पाखंड सिद्ध झाल्यास मृत्युदंड द्यायचे अधिकारहि त्यांना होते आणि राजसत्ता त्यांच्या कारभारात कसलाहि हस्तक्षेप न करण्यास बांधलेली होती.

लवकरच इन्क्विझिटर्स कोर्टांची ’न भूतो न भविष्यति’ अशी दहशत सर्व युरोपात पसरली. कबुली मिळेपर्यंत संशयिताचा छळ करणे, सांगोवांगीवरून किंवा कोणाच्या तक्रारीवरून संशयिताला ताब्यात घेणे असे प्रकार फैलावले. कोणाच्या पाखंडाची माहिती असतांनाहि ती कोर्टापुढे न आणणे हाहि गुन्हा ठरला आणि त्यामुळे स्वत:च्या सुरक्षिततेच्या भीतीमधून दुसर्‍यावर आरोप करणे असले प्रकार बळावले आणि इन्क्विझिटर्स कोर्टांची सत्ता आणि दहशत अमर्याद झाली.

ज्यू धर्म हा येशूच्या मारेकर्‍यांचा धर्म म्हणून आणि मुस्लिम धर्म ख्रिश्चनांची पवित्र स्थाने ताब्यात ठेवणारा प्रतिस्पर्धी धर्म म्हणून इन्क्विझिशनचे विशेष लक्ष्य ठरले. तसेच ख्रिश्चन धर्मविरोधी वर्तन, समलिंगी आणि अनैसर्गिक प्रकारचे लैंगिक वर्तन, एकाहून अधिक बायका असणे अशी गुन्ह्यांची संख्या वाढू लागली.

पश्चिम युरोपात, विशेषत: स्पेनमध्ये, मूरिश अरबांची सत्ता सुमारे ४०० वर्षे टिकून होती. फ्रान्सच्या सीमेपर्यंत त्यांचा प्रसार झाला होता. चार्ल्स मार्टेलने ७३२ मध्ये तूरच्या लढाईत अरबांचा फ्रान्समधील प्रसार थोपवला होता पण सर्व स्पेन अरबांच्या कमीअधिक ताब्यात होते. कास्तिलची राणी इझाबेला आणि आरगॉनचा राजा फर्डिनंड ह्याच्या विवाहानंतर स्पेनमधील ख्रिश्चन पक्षातील दुफळी मिटून आधुनिक स्पेनचा उदय होण्यास सुरुवात झाली - १५व्या शतकाचा दुसरा अर्धभाग - आणि त्यांच्या सत्तेच्या काळात इन्क्विझिशनला आणखीनच बळ मिळाले. अरब सत्तेचा शेवट करायला प्रारम्भ तर त्यांनी केलाच पण त्या बरोबरच सर्व ज्यू- धर्मियांची आपल्या देशातून त्यांनी हकालपट्टी केली. त्यांच्या ह्या कॅथलिक निष्ठेमुळे Their Most Catholic Majesties असे स्वत:ला म्हणवून घ्यायची मुभा पोपने त्यांना दिली होती.

वर वर्णिलेल्या पाखंडाला आणखी एक जोड ज्यू हकालपट्टीबरोबर मिळाली. ती म्हणजे relapsed christians असण्याचा आरोप. पुष्कळ ज्यू लोकांनी देश सोडण्याऐवजी धर्म बदलून कॅथलिक होणे पसंत केले होते. असे बाटगे हे धर्माशी खरेखुरे एकनिष्ठ नाहीत अशी शंका उपस्थित करून ज्यू लोकांना relapsed christians म्हणून त्रास देण्याचा नवा प्रकार सुरू झाला. कोणी असा ख्रिश्चन डुकराचे मांस खात नाही अशी शंका घेऊन त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची प्रथा पडली. (Goya's Ghosts नावाचा चित्रपट यूट्यूबर उपलब्ध आहे. गोया ह्या प्रख्यात स्पॅनिश चित्रकाराची मैत्रीण इनेस ही डुकराचे मांस खात नाही ह्या आरोपावरून इन्क्विझिशनने तिल्या ताब्यात घेतले. दरबारामध्ये आणि चर्चमध्ये असलेले आपले वजन वापरून तिची सुटका घडवण्याचे गोयाचे प्रयत्न हा ह्या चित्रपटाचा विषय आहे.

इन्क्विझिशनचे काम मोठ्या गंभीरपणे चालत असे. आरोपींची शारीरिक छळ, बनावट साक्षी असे सर्व मार्ग वापरून चौकशी झाल्यावर काही सुदैवी सुटून बाहेर येत पण गुन्हा सिद्ध झालेल्यांना मालमत्ता जप्तीपासून जळून मारण्यापर्यंत अनेक शिक्षा होऊ शकत. वर्षामधून एक किंवा दोन वेळा अशा शिक्षांची सार्वजनिक अमलबजावणी होत असे. माद्रिद शहरामध्ये Plaza Mayor हा शहरातील प्रमुख चौक ही तेथील इन्क्विझिशनची जागा आजचे महत्त्वाचे टूरिस्ट डेस्टिनेशन झाले आहे. गावातील प्रमुख चौकामध्ये चारी बाजूंनी प्रेक्षकांची बसायची सोय करून उच्चासनावर इन्क्विझिटर न्यायालय बसत असे आणि दंडित आरोपी तेथे समारंभाने आणले जात. त्यांच्या शिक्षा येथे त्यांना वाचून दाखवल्या जात पण आपापल्या शिक्षा दुर्दैवी दंडितांना आधीच ठाऊक असत कारण शिक्षेच्या वेळी त्यांनी वापरायचे कपडे त्या त्या शिक्षेनुसार ठरलेले असत. जाळून मारण्याची - burning at stake - san benito नावाची पिवळी उंच निमुळती टोपी घातलेली असे आणि त्यांच्या अंगावरच्या पिवळ्या लांब कपड्यावर क्रूस, विस्तवाच्या ज्वाला आणि सैतानाच्या दूतांच्या चित्रांनी वेढलेले त्याचे स्वत:चे चित्र असे. हाच वेष पण क्रूसाशिवाय असा वेष केलेले म्हणजे गुन्हा सिद्ध झालेले आणि तरीहि माफी मिळालेले. स्वत:च्याच कपड्यात आलेले म्हणजे दंड भरून सुटका करण्यायोग्य गुन्हेगार अशा त्यांच्या दर्जाप्रमाणे शिक्षा असत. शिक्षा वाचून दाखविल्यानंतर धार्मिक अधिकारी दंडिताचा आत्मा जीजसच्या काळजीवर सोपवला आहे असे जाहीर करून दंडितांना राजाच्या हवाली करत आणि राजाचे यमदूत तेथेच आधी उभ्या केलेल्या शेकोट्यांवर दंडितांना बांधून जागीच शिक्षेची अंमलबजावणी करत असत. अशा ह्या मोठया नाटकी आणि गंभीर देखाव्याला auto da fe - act of faith असे नाव होते. (किंचित् अवान्तर. औरंगजेबाने संभाजीराजाला हालहाल करून ठार मारण्याची शिक्षा सुनावली. तेव्हाचे जे वर्णन आहे त्यामध्ये उंटावर बसवून आणि दोक्यावर विदूषकाची उंच टोपी घालून त्यांची मुघल छावणीभर मिरवणूक काढण्यात आली असे वाचले आहे. तशीच ही उंच टोपी दिसते.)

पोर्च्युगाल आणि स्पेनने अशिया-अमेरिकेमध्ये पाय पसरायला सुरुवात केल्यावर इन्क्विझिशन राजसत्तेपाठोपाठ ह्या नव्या प्रदेशांमध्येहि पोहोचले

नव्याने ताब्यात आलेल्या मेक्सिकोमध्ये असे auto da fe होत असत. मेक्सिको शहरातील नॅशनल पॅलेसमध्ये दिएगो गार्सिया ह्या प्रख्यात म्यूरलिस्टने रंगविलेली आणि मेक्सिकोचा सर्व इतिहास चित्ररूपाने दाखविणारी एक म्यूरल चित्रांची मालिका उंच जिन्याच्या दोहो बाजूस रंगविलेली आहेत. त्यातील auto da fe चे चित्र येथे खाली पहा. उंच टोपीतील दंडित आगीत जळण्याची वाट पाहात तेथे दिसतात.

Inquisition in Mexico

असेच इन्क्विझिशन गोव्यातहि येऊन पोहोचले आणि जुन्या गोव्यात आदिलशहाच्या पूर्वकालीन वाड्यामध्ये त्याची जागा होती. डेलॉन - M Dellon - नावाचा एक फ्रेंच डॉक्टर दमणमध्ये असतांना इन्क्विझिशनमध्ये सापडला. पवित्र कुमारी मेरीच्या चित्राला त्याने पुरेसा आदर दाखविला नाही अशा आरोपावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. दमणमधील एका ख्रिश्चन बाईबरोबर त्याचे मैत्रीचे संबंध स्थापन होत होते ते दुसर्‍या एका प्रतिष्ठिताला आवडले नाही आणि त्याने डेलॉनला खोट्या आरोपात गोवले होते. आधी दमणमध्ये काही दिवस आणि नंतर सुमारे दोन वर्षे गोव्यामध्ये इन्क्विझिशनच्या कैदेत कष्टात काढल्यानंतर मोठ्या मुष्किलीने त्याची सुटका झाली आणि मोझांबिक-ब्राझील-पोर्च्युगालमार्गे तो अखेर मायदेशी म्हणजे फ्रान्सला पोहोचला. तेथे आपल्या गोव्यातील अनुभवावर एक पुस्तक लिहून १६८० साली प्रसिद्ध केले. ते आता भाषान्तररूपात उपलब्ध आहे. अनंत काकबा प्रियोळकरांनी गोवा इन्क्विझिशनच्या विषयावर जे पुस्तक लिहिले आहे त्यात डेलॉनचे अनेक संदर्भ मिळतात असे वाटते. (प्रियोळकरांचे पुस्तक मी पाहिलेले नाही.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - इतिहास