विशेषज्ञांची भाकितं: राशीफलासारखीच!

कुठल्याही दिवसाच्या कुठल्याही वृत्तपत्रावर ओझरती नजर फिरवा, राशीफलांच्या नेहमीच्या रतीबाबरोबरच कुठल्याना कुठल्यातरी विशेषज्ञांच्या भाकितांचा उल्लेख ठळक मथळ्याखाली वाचायला हमखास मिळतोच. पेट्रोलचे भाव वाढणार (वा आण़खी क्मी होणार), कांद्याचे भाव कोसळणार, भाजीपाला, दूध महागणार, अमुक दिवशी मन्सून अंदमानला पोचणार, अमुक तारखेला वादळी पाऊस पडणार, बंगाल उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पाऊस कोसळणार, पाऊस पाण्याच्या अभावी अमुक पीक जळणार, अर्थव्यवस्था कोसळणार, शेर मार्केट आपटी खाणार, अमुक कंपनीचे शेर वधारणार, जीडीपीची घसरगुंडी रोखणार, निवडणुकीत अमुक पक्षाचा विजय नक्की, अमुक उमेदवार हरणार, फ्लॅट्स आणखी महागणार, दहशती हल्ले होणार, 2020 साली भारत देश जगातील प्रथम क्रमांकाचा देश होणार, ..... अशा कितीतरी भाकितांची वाचून (ऐकून) आपल्याला सवय झालेली आहे. वृत्तपत्राचे रकाने भरण्यासाठी (वा टीव्हीची टीआरपी वाढवण्यासाठी) अशा प्रकारची सणसणाटी भाकितं वृत्तसंपादकांना लागतात असे गृहित धरले तरी वाचक (वा प्रेक्षक) सहजासहजी ही भाकितं दुर्लक्ष करत नाही, हेही तितकेच खरे आहे. मागणी तसा पुरवठा या मार्केटिंगच्या तत्वाप्रमाणे भाकितांचा रतीब लक्ष वेधतो. हे भाकितांचे लोण फक्त महाराष्ट्र वा भारत या पुरतेच मर्यादित नसून हे जगभर पसरलेले आहे. अमेरिकेच्या टाइम या साप्ताहिकाने 21व्या शतकातील पहिले दशक काळेकुट्ट असेल व नंतरचे दशक तुलनेने चांगले असेल असा उल्लेख केला होता. अमेरिकेवरील 2001साली झालेले दहशती हल्ले, इराक युद्ध, कट्रिना वादळाचा तडाखा, 2008 सालची आर्थिक मंदी इत्यादी कारण त्या दशकाला काळेकुट्ट म्हणण्यास समर्पक ठरतील. परंतु यानंतरचे दशक चांगले असेल याबद्दलच्या भाकिताला आधार काय? त्यासाठीचे पुरावे कुठे आहेत? परंतु असले अडचणीचे प्रश्न कुणी विचारतही नाहीत व विचारले तरी उत्तर देण्याच्या भानगडीत कुणी पडतही नाहीत. एखाद्या कारखान्यात तयार होत असलेल्या उत्पादनासारखे रोज रोज काहीना काही भाकितांची भर पडत असते. 2040मध्ये चीनची अर्थव्यवस्था अत्युच्च शिखरावर असेल; अमेरिकेतील उपनगरामध्ये 2050 नंतर चणचण भासणार नाही; 21व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोप अमेरिकेला मागे टाकेल... अशा प्रकारच्या तज्ञांच्या विधानांना कुठलेही बंधन नाहीत. आपल्या मुलांच्याबद्दल, आपल्या नातवांच्याबद्दल त्यांनी सांगावे व आपण मुकाट्याने ऐकत रहावे अशा स्थितीला आपण पोचलो आहोत. त्यातल्या त्यात अर्थतज्ञांची भाकितं आजकाल हवामान खात्याच्या भाकितांसारखे वाटू लागले आहेत. अतिरथी - महारथी अर्थतज्ञांची फौज पंतप्रधानांच्या दिमतीला असली तरी आपल्या देशाच्या आर्थिक नाडीचा थांगपत्ता अजूनही या तज्ञांना नाही. भाकितांची नेमकी प्रक्रिया कशी असते याचीसुद्धा जाण नसल्यासारखी त्यांची विधानं असतात. एके दिवशी आर्थिक मंदी नाही असे विधान केलेले असते व त्याच्या दुसऱ्याच दिवशी रिझर्व बँक मंदी रोखण्यासाठी पाऊल उचलल्याची घोषणा करते. अशा प्रकारची परस्पर विरोधी भाकितं व कृतीबद्दलच्या बातम्या वाचकांना गोधळात टाकतात. व तज्ञांच्या विधांनावरील विश्वास कमी कमी होत जातो. 2008 मधील जागतिक आर्थिक मंदीची चाहूल कुणालाही कशी काय लागली नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते. त्या कालखंडातील पत्रकारितेतील विशेषज्ञ मंदगतीने जाणारी अर्थव्यवस्था हे शीर्षक देऊन जागतिक अर्थव्यवस्थेला धोका नाही असेच सांगण्याचे प्रयत्न करत होते. परंतु बघता बघता हा डोलारा कोसळला व अजूनही आपण त्या ढिगाऱ्याखालून बाहेर पडू शकत नाही.

विशेषज्ञ या व्याख्येतच त्या त्या क्षेत्रातील अद्यावत ज्ञान, त्याचे चहू अंगाने केलेले विश्लेषण, व त्यातून पुढची दिशा देणारा हे अभिप्रेत असते. अर्थतज्ञ आर्थिक क्षेत्रातील घडामोडीवरून, राजकीय तज्ञ राजकीय परिस्थितीतील चढ उतारावरून , पर्यावरण तज्ञ पर्यावरणाच्या स्थित्यंतरावरून व प्रदूषणाच्या पातळीवरून काही आडाखे बांधू शकतात व जनसामान्यांना मार्गदर्शन करू शकतात, धोक्याची सूचना देऊ शकतात. परंतु आजकालच्या विशेषज्ञांच्या वक्तव्यावरून फलज्योतिषी, हस्तसामुद्रिक वा धर्मप्रचारकांच्या अंदाजे - पंचे विधानाप्रमाणे यांची भाकितं आहेत की काय असे वाटत आहेत. बुद्धी प्रामाण्यवादी फलजोतिष, हस्तसामुद्रिक इत्यादींच्या कुठल्याही दाव्यावर विश्वास ठेवत नाहीत. आता विशेषज्ञांचेही नाव या यादीत समाविष्ट करावे की काय असे वाटत आहे. परंतु आपली मानसिकता या विशेषज्ञांना नाकारण्यास अजूनही तयार होत नाही. फलजोतिषींचा धंदा तेजीत आहे. त्याचप्रमाणे तथाकथित विशेषज्ञांचाही धंदा जोरात चालू आहे. कारण त्याच्या विधानांचे चर्वितचरण करण्यात जनसामान्यांना आवडते. त्यामुळे त्यांचे कितीही अंदाज साफ चुकले तरीही भाकितं ऐकण्यात लोकांचा कल असतो.

मुळात या जगातील व्यवहार फारच गुंतागुंतीचे असतात. आणि ही गुंतागुंत सहजपणे, एकट्याने सोडवण्याइतकी आकलन शक्ती मानवी मेंदूत नाही, हे मान्य करायला हवे. मानवी मेंदू परिपूर्ण नाही. अनेक वेळा तीच तीच चूक करण्यात व केलेल्या चुकांचे समर्थन करण्यात त्याला अपराधीपणा वाटत नाही. काही वेळा पद्धतशीरपणे जाणून बुजून चुका करण्यापासून मेंदूला थांबवू शकत नाही. जगातील घडामोडींची अनिश्चितता, घडत असलेल्या घटनांचा वेग व चुका करणारा मेंदू यामुळे गोंधळात भर पडते. भविष्यातील घटनाबद्दलची उत्सुकता व भाकितांवर विश्वास ठेवण्याची मानसिकता कदाचित हार्डवायरिंग केल्यासारखे मेंदूत अंतर्भूत झालेले असतील. भविष्यात काय घडणार याचे उपजतच असलेले कुतूहल व यानंतर नेमके काय घडणार याबद्दलची अनिश्चितता या कोंडीत सापडल्यामुळे आपण कुठेतरी पॅटर्न मिळतो का याचा शोध घेतो. सर्व गोष्टी साच्यात बसवण्याच्या या वृत्तीमुळे नको तेथे पॅटर्नची कल्पना करत आपण आपल्या मनाचे समाधान करून घेत असतो. योगायोगाने घडलेल्या गोष्टीतसुद्धा आपल्याला पॅटर्न दिसतो. कावळा बसल्या बसल्या फांदी तुटणे यातही आपण पॅटर्न शोधतो. अपवादात्मकरित्या घडलेल्या घटनांच्या भोवती आख्यायिकांचे जाळे पसरले जाते. काही काळानंतर या अफवासदृश आख्यायिका, प्रत्यक्ष अनुभव व चक्षुर्वैसत्यम घटना म्हणून आपल्या मनावर नोंदल्या जातात. आणि या आख्यायिकावर विश्वास ठेवत आपण भ्रमावस्थेत असल्यासारखे वागत असतो. इतरांना फसवल्याप्रमाणे आपण स्वत:ला फार काळ फसवू शकत नाही, हे जरी खरे असले तरी वेळोवेळी आपली उत्सुकता जागृत होत असल्यामुळे शेरबाजार, पाऊस-पाणी, हवामान, पेट्रोलचा साठा, राजकीय - सामाजिक - आर्थिक घडामोडी, इत्यादीविषयी पुढे काय होणार याबद्दल कळून घ्यावेसे वाटत असते. त्यासाठी आपण विशेषज्ञांच्या भाकितांकडे आशाळभूत नजरेने पाहत असतो. कारण आपल्या मनाच्या कोपऱ्यात त्यांच्याबद्दल एक वेगळे स्थान असते. या विशेषज्ञांकडे विशेष ज्ञान आहे, त्यांना त्यांच्या विषयात डॉक्टरेट ही पदवी मिळालेली आहे यावरून आपण त्यांची पारख केलेली असते. शिवाय हे तज्ञ कायम प्रसार माध्यमांवर चमकत असतात, पेपरमध्ये मोठमोठे मथळे देऊन त्यांच्या विधानांना प्रसिद्धी दिलेली असते. त्यामुळे त्यांनी केलेल्या दाव्यावर आपण विश्वास ठेवू लागतो. नाट्यमय रीतीने केलेली त्यांची भाकितं आपल्याला खरे खुरे वाटू लागतात. मुळात फलजोतिषीप्रमाणे आपल्याला जे ऐकल्यामुळे समाधान मिळत असते तेच वेगळ्या शब्दात विशेषज्ञ सांगत असल्यामुळे आपण खुश होतो. त्यात मानसिक समाधान मिळते. काहीही झाले तरी आपल्याला विश्वास ठेवायचाच या मानसिकतेमुळे या तथाकथित भविष्यवेत्त्यांची चलती आहे. खरे पाहता या भाकितांचे चिकित्सकरित्या विश्लेषण करणे सहज शक्य आहे. प्रत्येक भाकितांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. विशेषज्ञाचा काही अंतस्थ हेतू आहे का याचाही शोध घेता येईल. थोडेसे प्रयत्न केल्यास वास्तव काय आहे व विशेषज्ञाचा अंतस्थ हेतू काय होता हे नक्कीच कळू शकेल. परंतु आपण त्या खोलात जात नाही. अंदाज खोटा ठरला तरी आपण त्याला माफ करतो. अजून एक संधी देतो. कारण आपल्यालाच त्यांच्या भाकिताची गरज असते. आपल्या जीवनात, उद्योगधंद्यात, भविष्यात काय होणार, हे समजून घेणे आपल्याला गरजेचे वाटत आले आहे. यांच्या भाकितांच्या आधारे आपण आपल्या योजना आखतो. गुंतवणूक करत असतो. लहान मोठे निर्णय घेतो. पैशाची तरतूद करतो. भविष्याबद्दल थोडीशीसुद्धा माहिती नसल्यास आपल्या योजनांचे भवितव्य काय याच काळजीने आपण अर्धमेले होऊ याची धास्ती वाटू लागते. भाकितं चुकलेली असली तरी चालतील, परंतु भाकितं पाहिजेच अशी मनस्थिती असते. आपल्या नियोजनांसाठी विशेषज्ञांची भाकितं कितपत उपयोगी पडतात याबद्दल शंका घेण्यास भरपूर वाव आहे.

चिकित्सकरित्या विचार केल्यास, संभाव्य धोक्यांचा आढावा घेत आपल्या व्यवहारांचे नियोजन करत असल्यास भाकितांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. एक मात्र खरे की भविष्य हे अनिश्चित असते, याची जाणीव आपल्याला असायला हवे. व ही अनिश्चितता, कुंडली मांडून वा सदृशीकरणातून वा प्रारूपावरून वा विशेषज्ञांच्या भाकितावरून पूर्णपणे दूर करता येणार नाही, याची आपल्याला जाणीव असल्यास भविष्यात काही अघटित घडले तरी आपल्याला धक्का बसणार नाही. व हीच जाणीव समस्यांवर उपाय शोधण्याइतपत आपल्यात मानसिक कणखरपणा आणू शकेल. जगभरातील विशेषज्ञांचे यापूर्वीच्या भाकितांचे रेकॉर्ड्स तपासल्यास हे विशेषज्ञ काही तरी फेकत असतात, असे वाटण्याची शक्यता आहे. त्याकाळातील मर्यादित ज्ञानाच्या आधारावरुन केलेल्या भाकितांच्यात काही चुका राहून गेल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. परंतु ज्ञानाच्या कक्षा रुंदावलेल्या या काळातील भाकितांच्यात फरक जाणवतो का, ते अचूक आहेत का हेही तपासणे आवश्यक आहे. मात्र अलिकडील काही उदाहरणावरून यात फार मोठा फरक पडला आहे हे जाणवत नाही. लोकसंख्येचा स्फोट, शीतयुद्धाचे दुष्परिणाम, तिसऱ्या महायुद्धाची शक्यता, अण्वस्त्र संग्रहाचे धोके, हवामान बदलामुळे अतीवृष्टी - अनावृष्टीची टांगती तलवार, अन्नधान्याचा तुटवडा, अविकसित देशातील कुपोषण व उपासमार, एड्समुळे मरणाऱ्यांची संख्या, इत्यादी प्रकारच्या विषयावरील तज्ञांचे अंदाज 60 - 70 टक्के चुकीचे ठरले आहेत. छाप काटा टाकूनही या प्रकारचे बिनबुडाचे अंदाज आपणही सांगू शकतो. तर्क व पुरावे यांच्या आधारावरून या तथाकथित भाकितांचा पुरेपूर समाचार घेण्यास भरपूर वाव आहे.

या संबंधात दि इकॉनॉमिस्ट या अर्थविषयक इंग्रजी साप्ताहिकाने भाकितांच्या खरे - खोटेपणाविषयी, त्यांच्या विश्वासार्हतेविषयी एक चाचणी घेतली. जगभरातील 16 विशेषज्ञांना, आर्थिक वाढ, महागाई दर, तेलांच्या किंमती, व काही इतर अर्थविषयक निकष लावता येऊ शकणाऱ्या समस्यांच्याबद्दल या पुढील 10 वर्षाचे भाकितं करण्यास विनंती केली. या विशेषज्ञात चार अर्थ मंत्री, चार बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्याधिकारी, चार ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकत असलेले अर्थशास्त्राचे विद्यार्थी व चार जण इंग्रजीत बऱ्यापैकी वाचन करणारे कार्मिक होते. दहा वर्षानंतर या सर्वांच्या भाकितांचा आढावा घेण्यात आला. जे निष्कर्ष निघाले ते सर्व परस्पर विरोधी व वास्तवाशी संबंध नसलेले असेच निघाले. काही भाकितं तर एकदम रद्दड निघाल्या. कार्मिकांची भाकितं व कंपन्यांच्या सीईओंच्या भाकितं यात फरक नव्हता. अर्थमंत्र्यांच्या भाकितांचा शेवटचा क्रमांक होता. अशाप्रकारच्या चाचण्या वेळोवेळी ठिकठिकाणी घेतले जात असतात. परंतु बहुतेक चाचण्यांचे परिणाम शून्य! एका नियतकालिकेने विशेषज्ञाचे भाकित व चिंपांझीने बोट ठेऊन केलेले भाकित अशी तुलना केली. व या तुलनेत चिंपांझी सरस ठरली. यातील विनोदाचा भाग सोडून दिला तरी अंदाज करणे सोपे नसते हे लक्षात येईल.

अचूक अंदाजासाठी भरपूर इनपुट्स, भरपूर प्रयोग व विश्लेषण करण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या प्रयोगांसाठी विशेषज्ञांचा गट असावा लागतो. हे विशेषज्ञ वेगवेगळ्या क्षेत्रामधून निवडलेले हवेत. वेगवेगळ्या राजकीय निष्ठेचे संस्थेचे, पार्श्वभूमीचे व वयोगटाचे हवेत. त्यांना प्रश्न विचारताना त्यात संशयाला जागा असू नये. होय किंवा नाही हे स्पष्टपणे सांगता आले पाहिजे. तरच पुढील अमुक अमुक वर्षभरात भारत - पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारतील की नाही? या प्रश्नाला ठाम उत्तर देणे शक्य होईल. केवळ जुजबी, कामचलावू, बाइट्सची भर असलेली जर तरची भाषा यात नसावी. खरे पाहता भाकितांची टक्केवारीत विधान करता आले पाहिजे. संपूर्ण गटाची एखाद्या विषयी पूर्ण खात्री असल्यास 100 टक्के, थोडे फार फरक असल्यास अमुक अमुक टक्के असे सांगता आले पाहिजे. या सर्व गोष्टींचा अर्थ विशेषज्ञांची हकालपट्टी करून छाप काटा टाकून निर्णय घ्यावे असे नसून विशेषज्ञांकडून जास्त जबाबदारीयुक्त विधानाची अपेक्षा आहे. कारण विधानांची चिकित्सकपणे विचार करण्याची मानसिकता सामान्यांच्यात अजूनही नाही. त्यामुळे भाकितांचे उत्तरदायित्व विशेषज्ञांनी स्वीकारले पाहिजे. उगीच सरधोपट विधान करणे व विधान खोटे ठरल्यास त्याच्या समर्थनार्थ पळवाटा शोधणे हे कुणाच्याही हिताचे नाही.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (4 votes)

प्रतिक्रिया

लेख आवडलेला आहे.

एका नियतकालिकेने विशेषज्ञाचे भाकित व चिंपांझीने बोट ठेऊन केलेले भाकित अशी तुलना केली. व या तुलनेत चिंपांझी सरस ठरली. यातील विनोदाचा भाग सोडून दिला तरी अंदाज करणे सोपे नसते हे लक्षात येईल.

हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आरोग्यविषयक सल्ल्यांचेहि असेच हसे होऊ लागले आहे. एक तज्ञ सांगतो मद्यप्राशन हानिकारक आहे, तर दुसरा सांगतो की मर्यादित मद्यपान अवश्य करावे कारण त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचित होण्याला प्रतिबंध होतो. एकजण म्हणतो वजन ताब्यात ठेवा तर नुकत्याच झालेल्या '60 Minutes' मध्ये ऐकले की वृद्ध वयामध्ये थोडे स्थूल असणेच चांगले!

आपल्याला जो सल्ला ऐकायला आवडेल तो चांगला असे मी आता ठरविले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉफी अन चॉकलेट चांगले की वाईट हे नेहमी छापा-काटा प्रमाणे होय-नाय चाललेले असते त्यामुळे आमच्यासारखे संधीसाधू लोक नीट ढोसत-चापत असतात. Wink
तेच exercise machines चे , गुगलवर अक्षरक्षः दोन्ही मते ठाम इन्टेन्सिटीने मिळू शकतात.
पण ब्लुबेरी, स्ट्रॉबेरी, रेड बेरी, ब्लॅक बेरीज = तुती , मासे अन बदाम यांच्याबद्दल नेहमी चांगलेच (मेंदूच्या स्वास्थ्याकरत) वाचले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

exercise machines चांगली असतात ग...मला पहा.. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय सांगतेस. अगं पोस्ट कर ना मग तुझा फोटो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्याला जो सल्ला ऐकायला आवडेल तो चांगला असे मी आता ठरविले आहे.

हे खूप आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळ लेखाच्या विषयाशी तोंडओळख देखिल नसल्याने त्यावर कुठलीहि टिप्पणि करण्यास असमर्थ आहे पण तुमच्या प्रतिक्रियेसंबंधात मत व्यक्त करावस वाटल.

<<<<आरोग्यविषयक सल्ल्यांचेहि असेच हसे होऊ लागले आहे. एक तज्ञ सांगतो मद्यप्राशन हानिकारक आहे, तर दुसरा सांगतो की मर्यादित मद्यपान अवश्य करावे कारण त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचित होण्याला प्रतिबंध होतो. एकजण म्हणतो वजन ताब्यात ठेवा तर नुकत्याच झालेल्या '60 Minutes' मध्ये ऐकले की वृद्ध वयामध्ये थोडे स्थूल असणेच चांगले!>>>>>

वाटतात तितकी परस्पर विरोधी नाहियेत ही विधान. मर्यादित प्रमाणात अल्कोहोल सेवनाने रक्तवाहिन्यांच आकुंचन मंदावत हे संशोधनातुन सिध्ध झालय पण त्याचबरोबर नियमीतपणे अल्कोहल सेवनाने काहि प्रकारच्या कँसरहोण्याची शक्यता वाढते कारण अल्कोहोल हे पेशींच्या दृष्टिने टॉक्सिन (मराठी प्रतिशब्द?) आहे. त्यामुळे दोन्ही विधाने एकाच वेळी बरोबर आहेत. तेच दुसर्‍या विधानाच्या बाबतीतहि म्हणता येइल. वजन ताब्यात ठेवा ह्या सस्ल्ल्यामागची कारण मिमांसा अशी कि अतिरिक्त वजन हा मधुमेह आणि हृदय्रोग अश्या चयापचाशी संबंधीत विकारांसाठी एक महत्वाचा रिस्क फॅक्टर आहे. म्हणजे अतिरिक्त वजन असलेल्या व्यक्तिस हे दोन्हि विकार योग्य वजन असलेल्या (आणि बाकि सर्व बाबी सारख्या असणार्या) व्यक्तिपेक्षा कमी वयात आणि जास्त तीव्रतेने होण्याची शक्यता बर्‍याच पटिने ज्यास्त असते. म्हणुन मध्यमवयापर्यंत वजन आटोक्यात ठेवणे म्हणजे आरोग्य चआंगले राखणे. पण वृधापकाळात जेन्वहा हा वरचा टप्पा पार पडलाय आणि अतिरिक्त वजनाने आरोग्यावर झालेले (वाईट) परिणाम शरीराने यशस्वी रित्या पचवले आहेत, अश्या वेळेस शरीरासमोरची मुख्य समस्या आहे र्‍हास (डिजनरेशन) रोखण्याची. ह्यावेळि अतिरिक्त चरबीचा साठा म्हणजे ज्यास्त उर्जा/रसद उपलब्ध असणे जे अश्या लढाईत आवश्यक आहे. त्याचबरोबर काहि बाह्य घटक पण ह्यआ काळात महत्वाचे ठरतात जसे की टेस्ट बड्स ची संख्या कमी झाल्यामुळे अन्नाला पुर्वीसारखी चव न लागणे आणि त्यामुळे खाण्यावरची वासना उडणे, प्रियजनांच्या (पक्षी जोडीदार) मृत्यु मुळे जीवनात आणि पर्यायाने खाण्यात रस न वाटणे, वयोमानामुळे मेंदु अणि पचनसंस्था ह्यांच्यातील ताळमेळ कमकुवत होवुन भुक आणि तहान ह्यांच्या जाणिवा पुर्वी इतक्या तीव्र स्वरुपात न जाणवणे इत्यादी. ह्या सगळ्या परिस्थीतित वर उल्लेख केलेला अतिरिक्त चरबीचा साठा वरदान ठरतो म्हणुन तज्ञआंनि तस मत व्यक्त केलय.

तुम्हि घेतलेला आक्शेप (आहार्/आरोग्याविषयीची परस्पर विरोधी विधान) हा नेहमी ऐकु येतो. मला वाटत हयाची प्रामुख्याने दोन कारण आहेत, एक म्हणजे आहारशास्त्र हे तुलनेने नवीन आहे त्यामुळे काहि अंशी अशी गोंधळात टाकणारी माहिती सतत प्रसिध्ध होत असते. पण दुसर त्यापेक्षा महत्वाच कारण म्हणजे ह्या क्षेत्रात ही माहिती समजावुन घेवुन इतरांना समजावुन सांगु शकणार्ञा लोकांची (सायंटिफिक रायटर्स) कमतरता आहे. सामान्य पणे माझ निरिक्षण अस आहे की न्युयऑर्क टाईम्स किंवा तत्स्तम मोठ्या प्लॅटफॉर्म वरुन ह्या विषयी लेखन करणारे लोक ह्या क्षेत्राततले (पदवीधर) नसतात त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या आकलनावर आणि म्हणुन लेखनावर काहि मर्यादा येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रमा, मी चुकून काहितरी श्रेणी दिलीय. आधी श्रेणी निवडून मग 'श्रेणी द्या' वर टिचकी मारायला हवी, ते मी उलट केल. माहितीपूर्ण अशी श्रेणी द्यायची होती. तुझा प्रतिसाद आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद स्वरा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजेदार लेख,
(पण हेच आमचे अरूण राव, थोड्या वेगळ्या शब्दात म्हणाले की त्यांना शेलक्या श्रेण्या! Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

घासकडवी नेहमी म्हणतात कि शिक्षणामुळे माणसाची देवावरची श्रद्धा कमी झाली आहे. माणूस सुरक्षित आणि बोल्ड झाला आहे म्हणून त्याला तशी वैचारिक वा मानसिक गरज उरलेली नाही. पण मला तरी माणसे शिक्षणामुळे जास्त गाढव झालेली दिसतात. विज्ञान नावाचा नवा देव त्यांना मिळाला आहे. भाकित असो कि काही, " आधुनिक आणि वैज्ञानिक" म्हणून लेबल लावले कि झाले. ऐकणाराला जास्त चिकित्सा करायची गरज उरत नाही.
कोणतीही व्यवस्था (जसे अर्थव्यवस्था) कशी चालते त्याचे नियम असतात. आतले नियम किती का क्लिष्ट असेनात, जनरली काय झाले कि काय होते याचा एक आडाखा बांधता येतो. या व्यवस्थेच्या पूर्णतः बाहेरचे ट्रिगर काय आहेत हे नीट जाणले तर प्रेडिक्शन नीट करता यावे. ज्या क्षेत्रात बाहेरचे मानवी ट्रिगर कमी आहेत तिथे प्रेडिक्शन खूप अ‍ॅक्यूरेट होत चालले आहे. उदा. मौसम का हाल. जिथे बाहेरचे ट्रिगर मानवी वर्तने आहेत तिथे मात्र नक्की काय होईल हे मासिव सर्वे केल्याशिवाय कळणार नाही.
धर्माच्या क्षेत्रात जितके बाबामहाराज आहेत त्याच्या कित्येक पटीने टाय सूट घातलेले आणि सफाईदार इंग्रजी बोलणारे आणि एखाद्या तत्त्वज्ञानाला वाहून घेतलेले (जसे, कॅपिटलिझम, पर्यावरण, सेक्यूलरीझम) तथाकथित सेक्टर एक्सपर्ट बाबामहाराज आहेत. हे सगळे लोक भूईला भार आहेत.
पण फॅशन पारंपारिक मूर्खपणावर टिका करायची आहे, कारण आधुनिक परंपरांवर टिका करायला प्रचंड अभ्यास आणि डाटा लागतो, शिवाय शिकलेल्या प्रत्येक माणसाचा स्वार्थ आधुनिक परंपरा पाळण्यात निहित असतो आणि ते फॅशन मधे मसल्यामुळे मागास मागास म्हणून ऐकून घ्यावे लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कोणतीही व्यवस्था (जसे अर्थव्यवस्था) कशी चालते त्याचे नियम असतात. आतले नियम किती का क्लिष्ट असेनात, जनरली काय झाले कि काय होते याचा एक आडाखा बांधता येतो. या व्यवस्थेच्या पूर्णतः बाहेरचे ट्रिगर काय आहेत हे नीट जाणले तर प्रेडिक्शन नीट करता यावे.

इकॉनॉमिस्ट्स प्रेडिक्शनच्या बाबतीत इतके ढिसाळ असतात की इकॉनॉमिक्स (किमान मॅक्रोइकॉनॉमिक्स) is not a science असे म्हणणारे बरेच लोक आहेत.
भौतिकशास्त्र, जीवशास्त्र वगैरे खऱ्या शास्त्रांमध्ये अमुक एक स्थिती असेल तर काय होईल हे अचूकपणे सांगता येत असले तरी अनेक रॅंडम घटक असलेल्या काॅम्प्लेक्स व्यवस्थेबाबत भाकिते करण्यात ती कमी पडतात.
असो.

लेख फार आवडला. काहीच गृहीत धरू नये याची पुन्हा एकदा जाणिव झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या व इतर प्रतिसादांतही अरुणजोशी जी बाजू मांडताहेत मी तिच्याशी बऱ्यापैकी सहमत आहे. अगदी पूर्वापार काळापासून सध्याच्या पिढीतले तज्ज्ञ हे मूर्ख असल्याचे पुढच्या वा त्यापुढच्या पिढीने सिद्ध केले आहे. गॅलिलिओचे मत मूर्ख असल्याचे सिद्ध करणारे तज्ज्ञ हेच मूर्ख असल्याचे नंतर सिद्ध झाले. तीच गोष्ट टॉलेमी, कोपर्निकस पासून अगदी हॉकिंगपर्यंत सिद्ध झाली आहे.

सध्या जी गोष्ट खरी आहे असे मानून (ऐसीवर) अकांडतांडव चालू आहे ती मूर्खपणाची असल्याचे पुढच्या पिढीत सिद्ध होण्याची बरीच शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सध्या जी गोष्ट खरी आहे असे मानून (ऐसीवर) अकांडतांडव चालू आहे ती मूर्खपणाची असल्याचे पुढच्या पिढीत सिद्ध होण्याची बरीच शक्यता आहे.

तात्पर्य/इशारा: आपण ऐसीवर कोणत्या आयडीने लिहीत होतो हे आपल्या मुलाबाळांना कळू देऊ नका. "इथे बाऊ असतो" असं सांगून त्यांना वेळीच कटवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मराठीचा कंडु अतिशय झाल्याशिवाय कोणी ऐसी वा मिपा वा तत्सम सायटीवर येणारच नाही. त्यामुळे बाऊबाजीचीही तितकी गरज नसावी. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile
मराठीचा कंडु हाच बाऊ आहे ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आयला मी प्रामाणिकपणाने जे वाटले ते लिहीले होते. आज आपल्याला जे खरे वाटते ते उद्या खोटे वाटण्याची बरीच शक्यता आहे. माझी प्रतिक्रिया खवचट नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विशेषज्ञांविषयीच्या निरीक्षणांशी सहमत आहे. मागच्याच आठवड्यात धीरेन्द्र कुमार यांनी ष्टॉक मार्केट/ अर्थशास्त्रांच्या तथाकथित तज्ञांच्या खालील सल्ल्यांची छान टर उडवली होती

There's a x per cent probability of the markets rising: Generally, x is equal to 50 per cent. This is an extremely useful phrase for analysts who have no clue about what the markets are going to do (which is generally all of them, all the time) because it is guaranteed to be correct under all possible circumstances. If it does rise, then your 50 per cent prediction is right. But if it falls or stays flat, then the other 50 per cent comes into play and you are still right. You can actually set the percentage at 99 and still be always right.

The easy money has been made: This can be used to sound intelligent and knowledgeable whenever the markets have gone up. However, it doesn't mean much because it's just a different way of saying that the markets have gone up. Your audience may think it implies that making money will be more difficult from now on. However, since you haven't actually said anything about what is likely to happen in the future, you're in the clear no matter what happens.

I'm a bottom up investor / I'm a stock picker: Since investing is finally being about buying stocks, it's hard to figure out why any investor would be anything but a stock picker. The truth is that finally, everyone is a stock picker. However, this sounds like a fine principle when you have to explain why your earlier predictions didn't work out.

Markets are down because of profit taking: This is the opposite of 'easy money' and can be used to explain any fall in the markets after a period when it has been rising. Again, it sounds intelligent and knowledgeable while holding no actual information and having no sense of what is going to happen. I always wonder about those on the other side of these transactions, the ones who are buying. Why aren't they listening to the expert who is talking about profit-taking on TV? Don't they care? Perhaps not, perhaps they are too busy buying stocks that are now good value.

More buyers than sellers
: Or the opposite, when stocks are falling. This one is so obviously ridiculous that when an expert says it on TV, it's always a surprise that no one starts laughing out loudly. Saying this is a pure confidence trick--it works because the audience is so in awe of the experts' expertise that they have suspended their own power of thinking.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशहाणाजी, आपल्याला खूप मंजे खूप आवडला हा लेख. लोक रोज इतकी जास्त आणि इतकी किचकट वाक्ये ऐकतात कि बोलणारा कोणत्या डायसवर आहे इतकेच ते पाहतात. डायस चांगला असला कि तो काही का बोलेना आपण अक्कल लावायची नाही हे लोकांचे सूत्र असते.

स्टॉक मार्केटात -
१. आपण कुठे एंट्री मारतो आणि कोणत्या वेळी एक्झिट मारतो आणि किती शेअर घेतो यावरून (कर, कमिशन, अकाउंट चार्जेस, इ धरून) आपला फायदा किती होणार हे ठरते.
२. आदर्शतः या दोन कालबिंदूच्या मधे शेअर प्राइस किती बदलेल हे ती कंपनी किती व्हॅल्यू अ‍ॅड वा कमी करते यावर आहे.
३. हे इन टर्न आदर्शतः या प्रत्येक वेळी कंपनीच्या भविष्यातल्या सगळ्या इंकमची त्यावेळी नेट व्हॅल्यू काय आहे यावर अवलंबून आहे.
४. हे पुन्हा आदर्शतः कंपनीच्या आणि आर्थिक जगताच्या पर्फॉर्मन्सवर अवलंबून आहे.
५. पण शेअर विकत घेताना नि विकताना वास्तवात नेट व्हॅल्यू काय आहे यापेक्षा लोकांचे नेट व्हॅल्यू बद्दलचे पर्सेप्शन काय आहे हेच सगळे नफा ठरवून जाते. आणि वर व्हॅल्यूशी संबंध नसताना व्यवहार करायची सवय असणार्‍या लोकांनी डिमांड सप्प्लाय भलत्याच दिशेने नेला तर त्या त्या दिवशी बरेच टक्के परिणाम होतो.
६. हे सगळं अभ्यासून रिस्क-रिटर्न पॅटर्न बसतोय म्हटलं तर स्पीड ऑफ इंफोर्मेशन फ्लो मातेरं करून जाते. आपण कुर्‍हाड हाती घेईपर्यंत झाड तुटलेलं.

हे सगळं डिटेलात सांगायला कोणाला वेळ आहे?
----------------------------------
जीवनसंगीनी बनवायची तर दोन मार्ग आहेत - दोन्-तीन किंवा जास्त वर्षे प्रेम करून बर्‍याच मुद्द्यांवर किती जमतंय ते पाहणं. किंवा सरळ गोरी आहे आणि मजबूत आहे बाकीचं नंतर पाहू म्हणणं. दोन्ही प्रकारचे सल्ले देणारे असतात. नंतर हात वर करणारे उथळ असतात.

आपापल्या क्षेत्रात आपल्याला कोणी किती सखोल अभ्यासिलेला सल्ला देत असते याची कल्पना करून घेतलेले बरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अवांतरः

रायफलच्या बॉयोनेटला "संगीन" असा शब्द आहे. "जीवनसंगीनी" या शब्दप्रयोगाची गंमत वाटली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मित्रांनो,
लेखकाचे,

अचूक अंदाजासाठी भरपूर इनपुट्स, भरपूर प्रयोग व विश्लेषण करण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या प्रयोगांसाठी विशेषज्ञांचा गट असावा लागतो. हे विशेषज्ञ वेगवेगळ्या क्षेत्रामधून निवडलेले हवेत. वेगवेगळ्या राजकीय निष्ठेचे संस्थेचे, पार्श्वभूमीचे व वयोगटाचे हवेत. त्यांना प्रश्न विचारताना त्यात संशयाला जागा असू नये. होय किंवा नाही हे स्पष्टपणे सांगता आले पाहिजे. तरच पुढील अमुक अमुक वर्षभरात भारत - पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारतील की नाही? या प्रश्नाला ठाम उत्तर देणे शक्य होईल.

पाकिस्तान संबंधी केलेले विधान मात्र वाचनीय वाटले. पाकिस्तानशीसंबंध सुधारायचे म्हणजे त्यांच्या वागणुकीचा अभ्यास करायला भरपूर (अजून किती) प्रयोग करायचे म्हणजे कधी व कसे याचे विवेचन वाचायला आवडेल....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करता येईल की असं काही करूच नये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मित्रा, तुम्हाला व मला काय वाटते या पेक्षा धागाकर्त्याला काय वाटते महत्वाचे....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं तर पाकीस्तानला काय वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं असेल.
उ.दा. तुम्हाला तुमच्या शेजार्याशी सौहार्दपूर्ण वगैरे संबंध प्रस्थापित करायचे आहेत. तुमचा हेतू शुद्ध आहे. तुम्ही त्यासाठी प्रयोग करा, निरि़क्षणं करा किंवा फुगड्या खेळा.
पण शेजार्याला जर अशा सौहार्दपूर्ण वगैरे संबंधात काही रूचीच नसेल तर तुमच्या इच्छेने काय ढीग फरक पडतो?
तेव्हा पाकिस्तानला एकदा विचारून घेऊया असं मला वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंवा फुगड्या खेळा

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लेख आणि प्रतिसाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0