पुणे फिल्म फेस्टिवल २०१५ : नोंदी, समीक्षा, गमतीजमती...

८ जानेवारीपासून पुणे फिल्म फेस्टिव्हलची सुरूवात झाली. अनेक ऐसीकर चित्रपट पहायला जात आहेत. अनेक जण अर्थातच जात नाहीयेत. जे जात आहेत, त्यांनाही सगळे चित्रपट बघणं शक्य नाही. तेव्हा सगळ्यांसाठीच सामुदायिकपणे फिल्म फेस्टिवलच्या गमतीजमती नोंदवण्यासाठी हा धागा.

यात मुख्यत्वे दोन प्रकारचे प्रतिसाद येतील. एक म्हणजे सिनेमाची परीक्षणं/समीक्षा. यासाठी 'मी अमुकतमुक तीन सिनेमे पाहिले त्यातला हा असा वाटला, तो तितका आवडला नाही' असा प्रतिसाद देण्याऐवजी, त्या सिनेमाच्या नावाचा प्रतिसाद काढावा आणि तिथे सिनेमाविषयी लिहावं. आधीच जर त्या सिनेमाविषयी लिहिलं असेल तर त्याखाली आपलं मत लिहावं. म्हणजे एका सिनेमाविषयीची चर्चा एकत्र दिसेल.

दुसऱ्या प्रकारचे प्रतिसाद हे एकंदरीत व्यवस्थापन, सर्वसाधारण दर्जा, तिथे घडलेल्या गमती वगैरे. ते कसे हवे तसे लिहावेत.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

नावाचा सिनेमा बघायची फार इच्छा होती. पण गर्दीमुळे जागा संपली आणि अस्मादिकांना हाकलून देण्यात आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Sad काय विशेष ऐकलं होतत म्हणून इच्छा होती अनुप? प्लीज जरा सविस्तर सांगाल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आंजावर वाचल होतं त्या बद्दल. एका सफाई कामगाराच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर चालणार्‍या खटल्यावर आहे बहुदा. हे प्रेमिस आवल्डं म्हणून बघायचा होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ह्यातले पोवाडे एकद्म मस्त आहेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेची शॉर्ट फिल्म इथे बघता येईल.
Synopsis -
[ A lonely, mysterious woman in the hills of an unknown town produces the most elusive and expensive tea in the world. Plucked under mysterious conditions, the 'Moonlight Thurston' tea triggers layered sensations encompassing taste, memory, love and pleasure. Partially based on true stories, 'Six Strands' is a character study inspired by the world famous Darjeeling tea industry and its undisclosed secrets.]

Six Strands from Chaitanya Tamhane on Vimeo.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावेळचा पिफ खुप अपेक्षाभंग करणारा ठरला.
चित्रपट आवडणे नावडणे नंतर मुळातच चित्रपट दाखवलेच गेले नाहीत तर काय ?

मला आलेले अनुभव :
१) शनिवार १० जाने सकाळी ११ मंगला : शेड्युलनुसार झिरो फॉर कंडक्ट दाखवला पण पुढचा गोल्डन मारी दाखवलाच नाही. प्रोजेक्शनिस्टने थेटर मधे येउन सांगितले कि पुढ्चा चित्रपट त्यांच्यापर्यंत पोचलेला नाही. मंगला मधिल पिफ व्हॉलेंटीअर कडे तक्रार केली त्यांना काही देणे घेणे नव्हते.

२) रविवार ११ जाने सकाळी ९.१५ मंगला : पिकपॉकेट हा चित्रपट दाखवणार होते. पण डिसीपीची कि(चावी?) नसल्यामुळे दाखवला नाही. तक्रार करण्याचा फायदा झाला नाही.

३) रविवार ११ जाने संध्याकाळी ४ एनएफएआय : गणशत्रू बघायला गेलो तर त्याची वेळ बदलण्यात आल्याचे सांगितले. वेळेतील बद्ल कळण्याचा एकमेव मार्ग त्यांचा रोज छापला जाणारा पेपर विकत घेणे किंवा त्या त्या ठिकाणी जाउन चौकशी करणे.

खरतर सुट्टी घेउन चित्रपट बघायचा बेत होता पण सुट्टी घेण्याची हिम्मत झाली नाही.

यावरच इंडियन एक्स्प्रेस मधे आलेला लेख :
http://indianexpress.com/article/cities/pune/missing-from-piff-platter-p...
(यातील लोकांना वेगळ्या चित्रपटांच्या संदर्भात हाच अनुभव आला)

या लेखातील जब्बार पटेलांची प्रतिक्रिया बोलकी आहे:
“Such problems happen due to technical errors, which are rare. We will look into it and rectify it. Films run without subtitles will be run again for PIFF lovers,” said Jabbar Patel, Director, PIFF.

म्हणजे थोडक्यात आम्ही प्रेक्षक रिकामटेकडे बसलेलो आहोत. पिफवाल्यांच्या सोईने आणि मर्जीने चित्रपट दाखवले जातील ते गोड मानुन घ्यावेत.

जसे सरकारी कार्यालयात माझे काम नक्की कोण करेल हे माहिती नसते तसे पिफ मधे 'चित्रपट दाखवणे' हि नक्की कोणाची जवाबदारी आहे हे शेवटपर्यंत कळले नाही.

आधीच्या वर्षी पण थोड्याबहुत प्रमाणात असे अनुभव होते पण यावर्षी मला बघायचे असलेले सलग ३ चित्रपट बुडल्याने विशेष चिड्चिड झाली.

पुढील वर्षी पिफला जाईन असे वाटत नाही Sad Sad Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घालावा आवर कसा वेगळाच सूर माझा
माझ्या तहानेच्यासाठी वेगळा पाऊस माझा.

Sad सॅड!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावेळचा पिफ खुप अपेक्षाभंग करणारा ठरला.

हे वाचून एक अघोरी आनंद झाला, मनापासून Smile कारण ह्या वर्षीच्या पिफला काही वैयक्तिक/कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे हजेरी लावू शकलो नाही.

बाकी मागच्या पिफ ला माझ्या आवडत्या दोन सिनेमांना असाच अनुभव आला. 'लॉस्ट इन लेऑस' ची प्रिंट अशक्य वाईट होती, आवाज ही व्यवस्थीत नव्हता. विशेष म्हणजे ह्या सिनेमाचे दिग्दर्शक स्वतः थेटरात होते आणि त्यांची अस्वस्थता/चिडचिड/हेल्पलेसनेस पाहून जास्त वाईट वाटलं. दुसरा अनुभव म्हणजे, ऑफिस चं काम लवकर आटोपून धावपळ करत आयनॉक्स ला पोहचलो 'र्‍हायनो सिझन' हा बहुचर्चित सिनेमा पहाण्यासाठी पण तिथे ऐनवेळेस 'लव-स्टीक्स' हा सेमी-अडल्ट मुवी लावला होता. बरं त्या सिनेमातलं अडल्ट कंटेंट पण धड नव्हतं ना कलाकार आकर्षक होते, नाहीतर ते ही आनंदाने चालवून घेतलं असतं. आणि ह्याशिवाय मराठी सिनेमे असतील तर वेड्यासारखी रांग आणि गर्दी असते आणि हे मराठी सिनेमांच्या बाबतीत दरवर्षीच होतं पण तरीही व्यवस्थापन मात्र काहीच करतांना दिसत नाही.

एवढं असूनही पुढच्या वर्षी पिफला जाण्याची इच्छा आहे, एक मस्त माहोल असतो पिफ चा, मजा येते (अर्थात मराठी सिनेमे पहाण्यासाठी शक्ती वाया घालवायची नाही आणि स्वतःचं मानसिक संतुलन बिघडू द्यायचं नाही हा एक धडा )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिफला खूपच मजा आली. बरेच चित्रपट पाहिले पैकी ३ सर्वाधिक आवडले:
टिम्बकटू: माली मधील टिम्बकटूमध्ये जेव्हा मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांनी कब्जा केला होता तेव्हा त्यांच्या जीवनमानात झालेले बदल आणि या धार्मिक राजवटीत व्यक्तीस्वातंत्र्याचे हरपत चाललेले रंग अतिशय मार्मिक पद्धतीने टिपले आहे. कथेसोबतच संगीत, संवाद उजवे आहेतच, क्यामेरा आणि दिग्दर्शन यांच्या मिलाफाला तोड नाही!

पालो मेलो: आपल्या मुलाचे कुरळे केस त्याला सरळ करायचे आहेत म्हणजे तो नक्कीच समलैंगिक आहे अशी "भिती" बाळगून असलेल्या आई-मुलाच्या जोडगोळीची कथा अतिशय ताकदीने सादर केली आहे. चित्रपटातील पार्श्वभूमी अतिशय रोचक आणि वास्तवदर्शी आहे.

कार पार्कः जंतूंच्या सुचवणीनुसार या हंगेरीयन चित्रपटाला गेलो आणि महोत्सव वसूल झाला. नुसती चांगली कथा असणं आणि ती इतक्या नेमक्या वेगात, तंत्राने आणि पदर दर पदर उलगडवत सादर करताना बघायला मिळण्याचा योग अपूर्व होता. चित्रपट अतिशयच आवडला

===

बाकी सबटायटल्स नसणे, फिल्म खराब क्वालिटीची असणे वगैरे तांत्रिक बिघाडाला १-२ दा सामोरे जावे लागले पण ते चित्रपट फार्फार थोर न वाटल्याने त्याची खूप खंत जाणवली नाही.

विकांताला या निमित्ताने जमलेल्या ७-८ ऐसीकरांसोबत गप्पा, खादाडी व इतर टाईमपासमुळेसुद्धा अतिशयच मजा आली

एकुणाच हा महोत्सव आनंददायी अनुभव होता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आवडलेले चित्रपट अनेक मिळाले. पण झपाटून टाकतील असे दुर्दैवाने मिळाले नाहीत. गेल्या पिफला ऱ्हायनो सीझन आणि पापुष्झा बघून जे झालं होतं तसा हेलावलो गेलो नाही. (कार पार्क आणि टिंबक्टू बघणं जमलं नाही, त्यामुळे कदाचित माझं नशीब फुटकंं असेल. )

मला आवडलेले काही चित्रपट - पेलो मालो (बॅड हेअर), द ट्री, अॅडव्हेंचर, आउटसाइड द लॉ, किंडरगार्टन टीचर, वन फॉर द रोड, झीरो मोटिव्हेशन. सिलसिलेही आवडला, पण तेवढा प्रचंड नाही. द ग्रॅंड डिल्युजन आवडला नाही.
जर उत्तम विनोदी चित्रपट पाहायची इच्छा असेल तर वन फॉर द रोड आणि झीरो मोटिव्हेशन जरूर बघा असं सांगेन.

ही जंत्री दिली आहे, पण काही विशेष आवडलेल्या सिनेमांबद्दल स्वतंत्र लिहीनच.

बाकी प्रिंट खराब असणं, सबटायटल्स नसणं हे दोन सिनेमांबाबत झालं. गेल्यावेळी हे अनुभव आले नव्हते.

नुसते सिनेमे बघण्यापलिकडे ऐसीकरांच्या कंपूबरोबर ते बघणं, कट्टे करणं, कॉफी पीत भंकस करणं, आणि नॉट टु फरगेट - एकत्र झोपणं; यामुळे प्रचंड धमाल आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज शेवटच्या दिवशी पाहिला हा इस्राइली सिनेमा. प्रचंड आवडला!
एक मतिमंद मुलगी आणि तीची बहिण यांची गोष्ट. त्यांची आई देखील त्या मतिमंद मुलीला इस्पितळात ठेऊ अशी आग्रही असते पण बहीण नकार देत स्वतः तीची काळजी घेत असते. त्या दोघींचं नातं निव्वळ बहिणींसारखं नाही. थोडं शारिरिकही आहे असं दिसतं.(पण लेसबिअन्स अजिबात नाही.) बहिणीच्या आयुष्यात एक पुरुष येतो आणि दोघींचं आयुष्य बदलतं. त्याची गोष्ट.

जनरली असले आजारपण मेन थीम असलेले चित्रपट मला आवडत नाहीत. (ब्लॅक, पा टाईप्स) पण या चित्रपटात आजारपण हे मेन पात्र अजिबात नाही. दोघींच नातं, दोघींच्या लैंगिक आणि भावनिक गरजा ही मेन थीम आहे चित्रपटाची. नेटवर मिळाल्यास आवर्जून बघावा असा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0