Skip to main content

पॉझिटीव्ह दृष्टीकोन ठेवण्यासाठी मदत

** हा लेख म्हणा, किंवा मदतीचा हात मी मागितला नोव्हेंबरमध्ये. प्रथम मायबोलीवर लिहीला होता, तिथे भरपूर चांगले सल्ले मिळाले.इच्छुकांनी जरूर वाचावेत. मला खूपच आधार व उभारी मिळाली. नोव्हेंबरमध्ये हा लेख लिहीण्याअगोदर ३-४ महिने अजिबातच पॉझिटीव्ह राहायला जमत नव्हते. खूप काळजी, स्ट्रेस सतत. कोणाशी हसून खेळून बोलणं अगदीच बंद झाले होते. मात्र ही मदत मागितली, खुलेपणाने जवळच्या मैत्रिणी व नातेवाईक यांच्याशी चर्चा करून त्यासर्वांवर विचार करून, मी गेले दोन-तीन महिने सातत्याने पॉझिटीव्हच विचार करण्याचा प्रयत्न करत आहे. थोडक्यात सार हेच, आपण आपल्या हातात जे आहे ते करत राहायचे. भविष्याच्या काळजीने हातपाय गाळले तर मुलाचेच नुकसान आहे. आता हा लेख तितका रिलेव्हंट वाटत नाही कारण मनाची तितकी वाईट अवस्था नाही. परंतू जितके वेगळे सल्ले व वेगळा पर्स्पेक्टीव्ह मिळेल तितकं माझ्यासाठी व मुख्यत्वेकरून मुलासाठी फायद्याचे असल्याने येथेही मदत मागते. :) **
_________________________________________________________________________________

मी आज कुठलेही ऑटीझमसंबंधित उपदेश करणार नाही तर मलाच थोडी मदत हवी आहे. आशादायी दृष्टीकोन ठेवण्यासाठी. कराल का?

झालंय असं, की मुलाच्या वय वर्षे २ पासून ऑटीझमशी झुंज देऊन जरा थकायला झाले आहे आता. हे सर्व किती दिवस चालणार, मुलगा कधी बोलणार अशा प्रश्नांनी आता २ वर्षं भंडावून सोडले आहे. आत्ता लिहीताना मला जाणवलं, २च वर्षं झाली या सगळ्याला? पण ७३० दिवस गुणीले २४ तास असं म्हटलं की जाणवते थकण्याची इंटेसिंटी.
दिवसाची सर्व कामे सुरळीत पार पडतातच, मुलाबरोबर हसतमुखाने दंगा केला जातोच, त्याचे जेवण-खाण आजारपण त्यात मी कुठेही कसूर होऊ देणार नाही. (बिलिव्ह मी, ऑटीझम आणि आजारपण = वर्स्ट काँबिनेशन! एरवी मुलं गृहीत धरतातच पालकांना परंतू माझा मुलगा आजारी पडला की माझी शब्दशः कसोटी असते. त्याची चिडचिड कमालीची वाढते व आपण शांत राहून त्याला काय होत असेल हे गेस करत राहणं = बॅटल.)

डोक्यात, मनात एकप्रकारची पोकळी येत चालली आहे. आयुष्य हे एक आनंददायी प्रकरण आहे हे विसरत चालले आहे. आयुष्य म्हणजे कर्तव्यांची रांग. मला ना काही वाचण्यात इंटरेस्ट राहीला आहे ना कुठला मुव्ही पाहण्यात. इतकंच काय, मी ऑटीझम बद्दलही वाचत नाही सध्या. याचा अर्थ असा नाही मी डिप्रेस्ड आहे. तो ऑप्शनच नाही उपलब्ध मला. परंतू बंद पडलेल्या गाडीला किकस्टार्ट देऊन जोमाने पळवायचे आहे. त्यासाठीच मदतीचे आवाहन.

आपण या पानावर आशादायी, ऑप्टीमिस्टीक, पेशन्स, जिद्द, हार्डवर्क इत्यादींबद्दल पोस्ट्स एकत्र करायच्या का? असं काहीतरी जे वाचून आमच्यासारख्या स्पेशल नीड्स मुलं असलेल्या पालकांना उभारी येईल. कारण पॉझिटीव्ह अ‍ॅटीट्युड हा एकच लाकडाचा ओंडका आम्हाला ऑटीझमच्या समुद्रात जरा तरंगत ठेऊ शकतो..आमचा तो ओंडका जरा तात्पुरता झिजत चालला आहे. जमल्यास आपण सर्वांनी मिळून तराफा बनवायचा का?

अस्वल Sat, 17/01/2015 - 00:52

विनोद (कांबळी किंवा मेहरा नव्हे. मी आता केलाय तसा पाणचटही नव्हे!) हे एक खूप positive tool आहे, असं माझं एकंदर निरिक्षण आहे.
वैयक्तिक आयुष्यातही समजा एखाद्यावेळी त्रासिक मनस्थिती असेल किंवा भांडण तंटा झाला असेल, तर एखादया विनोदी कमेंटमुळे पट्कन परिस्थिती बदलते.
असं उत्तम विनोदी लेखन, चित्रपट किंवा छोटे प्रसंग (स्किट्स) मला तरी अशा वेळी पटकन रिलॅक्स करतात. मग त्यानंतर आपल्या आवडीच्या गोष्टी कराव्यात.
===============
कधी कधी जुनी पत्रं (आजकाल ईमेल्स) आणि मुख्य म्हणजे फोटो बघितले की एकदम मस्त वाटतं! Nostalgia नव्हे, तर चांगल्या आठवणी आणि भन्नाट किश्शांची उजळणी होते.
==============
बाकी मग फील गुड/ अपलिफ्टिंग चित्रपट सुद्धा जमून जातात. कुठल्या तरी एका परीक्षेच्यावेळी 'चक दे' किंवा 'लक्ष्य'च्या गाण्यांची पारायणं करून उभारी मिळवलीये. हे सगळं आता बघितलं तर एकदम फिल्मी वाटतं, पण तेव्हा खूप मस्त वाटायचं!
===============
आणि इथे लिहित रहा की- चर्चेत भाग घ्या वाटलं तर ;)

उपाशी बोका Sat, 17/01/2015 - 01:36

पटकन मनात आलेली कल्पना म्हणजे संगीत. तुम्हाला आणि मुलाला, मंद असे संगीत ऐकल्याने काही फायदा होतो का ते बघा.
आपण आठवणींवर जगतो, त्यामुळे पॉझिटिव आठवणी राहातील, असा प्रयत्न करा.
रोज थोडा वेळ केवळ स्वतःसाठी ठेवा.
नुसता ऑटीझमबद्दलच विचार करू नका, त्यामुळे नैराश्य येण्याची शक्यता आहे.
मी जरा जास्तच प्रॅक्टिकल विचार करतो त्यामुळे माझे विचार कोरडे वाटायची शक्यता आहे, त्यामुळे पटले नाही तर सोडून द्या.

स्वमग्नता एकलकोंडेकर Sat, 17/01/2015 - 07:17

In reply to by उपाशी बोका

येस, म्युझिक वर्क्स फॉर मी अ‍ॅज वेल अ‍ॅज माय सन! गाणी ऐकणे हा आम्हा दोघांचा आवडीचा पासटाईम तसेच एकमेकांबरोबर कनेक्ट होण्याचा तरीका आहे.
पॉझिटीव्ह आठवणी तर उपयोगी पडतातच , त्याचबरोबर मी नव्याने चालू केलेला उपाय म्हणजे पॉझिटीव्ह रिझल्ट्सचे स्वप्न पाहणे. हा ऑटीझम रिकव्हरी प्रवास इतका हळू आहे की ती स्वप्नं पाहणं देखील हळूहळू बंद झाले होते. ते नव्याने चालू केले. रोज मी डोळे मिटून दृश्य डोळ्यापुढे आणते की माझा मुलगा माझ्याकडे बघून, आई, आय लव्ह यु म्हणतोय. किंवा आई भूक लागली म्हणत आहे. :) पूर्वी ह्याच स्वप्नांनी डोळ्यात पाणी यायचे - हे कधी होणार म्हणून. आता जिद्द निर्माण होते. :)
मात्र, ऑटीझमवर विचार न करणे जमणं अवघड आहे.इट्स पार्ट ऑफ माय डेली रुटीन. :)

गवि Sat, 17/01/2015 - 04:55

. याचा अर्थ असा नाही मी डिप्रेस्ड आहे. तो ऑप्शनच नाही उपलब्ध मला.

..हे चुकतंय. डिनायल नकोच. ऑप्शन नाही असं म्हणून चालणार नाही. प्रोफेशनल मदत आणि उपचार आवश्यक असल्यास गिव्ह युअरसेल्फ दॅट चान्स.

स्वमग्नता एकलकोंडेकर Sat, 17/01/2015 - 07:12

In reply to by गवि

हो अर्थातच. डॉक्टरांशी बोललेही आहे. सध्यातरी निरनिराळ्या डॅफिशियन्सीजमुळे देखील असं होऊ शकते - त्यामुळे ते पॅरॅमीटर्स नीट करणं चालू आहे. आता तेव्हढं ओव्हरव्हेल्मिंग फिलिंग येत नसल्याने काउन्सेलरकडे जाण्याचं सध्या रहीत केले आहे. पण निरनिराळे ऑटीझम सपोर्ट ग्रुप्सची माहीती काढून ठेवली आहे. जितकं इतर ऑटीझम पेरंट्सशी बोलू तितकं अधिक मोकळं वाटू लागेल याची खात्री व अनुभव आहे.

शहराजाद Sat, 17/01/2015 - 21:01

In reply to by गवि

पहिली गोष्ट म्हणजे, फक्त असा ऑप्शन असू शकणारेच लोक डिप्रेस्स्ड असतात ही गोष्ट खरी नाही. ऑप्शन नसणारे लोकही डिप्रेस्ड होतात. डिप्रेशनची कारणे शरीरांतर्गत तसेच बाह्य परीस्थितीजन्य असू शकतात. काही डिप्रेस्ड लोक 'आपल्याला ऑप्शन नाही' या दडपणाखाली दैनंदिन कामे रेटत राहतात. पुढेपुढे हे रेटणे अगदी 'कसेबसे' होते. फक्त, आपल्याला डिप्रेशन चा ऑप्शन नाही या भावनेखाली याचे पूर्ण निदान होत नाही.
दुसरे म्हणजे डिप्रेशनचे प्रकार असतात. काही वेळा, स्व्तः ती व्यक्ती किंवा आजूबाजूचे लोक यांना हे डिप्रेशन आहे हे जाणवेलच असे नाही. या विषयातील तज्ञ व्यक्तींकडून निदान करवून घेणे इष्ट असते.
बर्‍याचदा लोक या बाबतीत आपल्या फॅमिली डॉक्टर / स्त्रीरोग डॉक्टर इ. चाच उपचार घेतात. प्राथमिक सल्ला अवश्य घ्यावा. पण या क्षेत्रातील विशेषज्ञ डॉक्टर - सायकिआट्रिस्त, आपल्याला जास्त अचूक मदत करू शकतात.

(अजून लवकरच)

सानिया Sat, 17/01/2015 - 08:18

व्यायामाने शरीराला थकवा आला तरी मनाला उभारी येते. व्यायाम एकट्याने करण्यापेक्षा व्यायामवर्गात केलात तर हेल्दी काँपिटीशनने अधिक उत्साह येतो. अ‍ॅडल्ट इंटरॅक्शनही होईल. हा वेळ स्वतःकरता खास राखून ठेवा. कुठल्याही परिस्थितीत हा वेळ कॉम्प्रमाईज करू नका. किक-बॉक्सिंगसारख्या व्यायामात परिस्थिती, माणसं, स्वतःवरच्या रागाचा उत्तमप्रकारे निचरा करता येतो, व मोकळं वाटतं. अर्थातच अजिबात व्यायामाची सवय नसेल, तर लगेचच किक-बॉक्सिंगला सुरूवात करू नका :)

स्वमग्नता एकलकोंडेकर Sat, 17/01/2015 - 23:44

In reply to by सानिया

किकबॉक्सिंग व रागाचा निचरा हे कनेक्शन लक्षात आले नव्हते. :)
रेग्युलर व्यायामाची सवय पूर्वी होती. गेले २ वर्षात व्यायाम कमी झाला हे ही खरे. परत सुरवात केली आहे. :)

रुची Sat, 17/01/2015 - 12:23

इतरांनी सुचविलेले सर्व पर्याय उत्तम आहेतच पण एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःसाठी थोडा अधिक वेळ देणे. इतर कर्तव्ये, जबाबदार्या यापुढे स्वतःला सर्वात कमी वेळ दिल्याने निराशा वाढते आणि जबाबदार्या पार पाडायला लागणारा जोमही रहात नाही असा अनुभव आहे.
तुमचे लेख वाचत असते, तुमच्या प्रयत्नांचं कौतुक वाटतं आणि ज्या गोष्टींचा आपल्याला रोज सामना करायला लागत नाही त्याबद्दल आपण किती अनभिज्ञ असतो हेही जाणवतं. पण मी निराशेचा सामना केला आहे त्यामुळे त्या अनुभवाच्या जोरावर इतकं सांगू शकेन की तुम्ही स्वतःला थोडा जास्त वेळ द्या, तुमच्या समस्यांशी संबंध नसलेल्या किंवा पूर्ण वेगळ्या वर्तुळातल्या व्यक्तींशी मैत्री करा, छंद जोपासा. तुम्ही आनंदी असलात तर त्याचा फायदा अर्थातच मुलालाही होईल.

गवि Sat, 17/01/2015 - 13:43

ड्रायव्हिंग आवडतं का तुम्हाला ?

..अत्युत्कृष्ट म्युझिक सिस्टीमवर खर्च करा .. एकदम मिश्र प्रकारच्या गाण्यांची प्ले लिस्ट रँडम मोडमध्ये लावा.

पूर्ण एकट्याने निरुद्देश लाँग ड्राईव्हला जा. कोणाला हे गाणं आवडतंय की नाही.. व्होल्यूम लेव्हलचे डेसिबल्स किती या कशाचंही दडपण न ठेवता तासभर कार हाणा.

.काचा निथळतात सुरांनी.. ..तोपर्यंत आपणही त्यात सोक होतो.

..ग्यारंटीड आयसोलेशन आणि शांत फीलिंग..

एकटं जाणं. उत्तम साउंड सिस्टीम खणखणीत मोठा आवाज आणि कोणत्याही कामासाठी नाही (शॉपिंग इ इ) या तीन मुख्य आवश्यक बाबी.

वामा१००-वाचनमा… Sat, 17/01/2015 - 19:52

In reply to by गवि

ही सूचनाही उत्तम आहे. गाणी ऐकत ड्रायव्हिंग इज सो मच फन. अक्षरक्षः मेडिसिनल+मेडिटेटिव्ह असतं.

स्वमग्नता एकलकोंडेकर Sat, 17/01/2015 - 23:42

In reply to by गवि

हो! ड्रायव्हिंग व म्युझिक या दोन्ही आवडीच्या गोष्टी आहेत. विकेंडला लाँग ड्राईव्ह्ज करणे ही आमची आवडती गोष्ट आहे.
विकडेजला मात्र मुलाला शाळेत पिकअप करणे, स्पीच थेरपीला नेणे अशी कामं असतात, तेव्हाही आम्ही गाणी ऐकतच जातो. :)

गवि Sun, 18/01/2015 - 08:11

In reply to by स्वमग्नता एकलकोंडेकर

विकेंडला लाँग ड्राईव्ह्ज करणे ही आमची आवडती गोष्ट आहे.
विकडेजला मात्र मुलाला शाळेत पिकअप करणे, स्पीच थेरपीला नेणे अशी कामं असतात, तेव्हाही आम्ही गाणी ऐकतच जातो

..एकटीने करणे जमवणे शक्य असल्यास तसे अधुनमधून करा. आय डोंट मीन मुलाला टाळणे.. आय मीन जगातल्या अन्य कोणालाही सोबत न घेता हे केलेत तरच उपरोक्त अवस्था आणि फायदा लाभेल.

प्रकाश घाटपांडे Sat, 17/01/2015 - 14:58

स्वत:च्याच प्रतिमेत कधी कधी आपण गुरफटून जातो. त्यामुळे जीव गुदमरतो. रॅशनल इमोटिव्ह थेरपी किंवा कॉग्निटिव बिहेवियर थेरपी चा आधार घ्या. अतिचिकित्सा वा संशयवाद यामुळे देखील मानसिक आरोग्य बिघडते. शरीर व मन याचे अतुट नाते आहे. शरीर आजारी पडल तर आपण डॉक्टर कडे जातो तसे मन आजारी पडले तर सायकोथेरपीस्ट चा आधार घ्या. त्यात कमीपणा वा दुर्बलता मानू नका.

स्वमग्नता एकलकोंडेकर Sat, 17/01/2015 - 23:39

In reply to by प्रकाश घाटपांडे

कॉग्निटिव बिहेवियर थेरपी - ह्याबद्दल मी थोडे वाचले आहे. चांगले वाटले होते.

अतिशहाणा Sat, 17/01/2015 - 18:19

सर्वांनीच चांगले सल्ले दिलेत.
प्रॅक्टिकल विचारः
तुम्ही स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं अत्यंत आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत (आणि पुढच्या दीर्घ काळासाठी) तुमच्या मुलासाठी तुम्ही ही खूप मोठी सपोर्ट सिस्टम आहे. त्यामुळं तुम्हाला स्वतःची शारीरिक आणि मानसिक काळजी घेणं महत्त्वाचं आहे. शारीरिक आरोग्यासाठी चांगला आहार, व्यायाम आणि मानसिक आरोग्यासाठी ध्यान-संगीत-छंद अशा काही गोष्टी फार उपयुक्त आहेत. चांगला न्यूट्रिशियस आहार घेतला तर आपली शारीरिक ऊर्जा टिकून राहते. ध्यानासारख्या गोष्टींमध्ये प्रचंड ताकद आहे. (करोगे तो जानोगे!) गरज पडली तर मानसोपचाराची मदत घ्या. त्यात काही टॅबू नाही. मी मदत घेतली आहे आणि बराच फायदा झालाय!

फिलॉसॉफिकल विचारः :)
माझा विचार थोडा सीनिकल वाटेल पण आपण आपले आयुष्य फार गांभीर्याने घेतो. तेवढे घेण्याची गरज नाही. एकंदर मोठ्या पटलावर (७०-८० वर्षाच्या आयुष्याचा) विचार केला तर अगदी 'नॉर्मल' मुलासारखा मुलगा असता तर 'तुम्हाला' नक्की काय फरक पडला असता असे वाटते? 'तो' फारतर इतर ९५ टक्के जनतेसारखा शिकून रॅट-रेसमध्येच पडला असता. How should it matter to 'You'? आणि विश्वास ठेवा, तुम्ही दुसऱ्या चिंता नक्कीच शोधून आणल्या असत्या आणि त्याने मन कुरतडत बसलेच असते. तुम्हाला व तुमच्या मुलाला आयुष्यातल्या साध्या-साध्या गोष्टींचा आनंद लुटायची संधी आहे.

You are answerable only to your god. देव प्रत्येकालाच संधी आणि अडचणी यांचा वाटा देतो. कुणाला जास्त अडचणी तर कुणाला कमी. त्यानुसार तुमचं इव्हॅल्युएशन होणार. तुम्हाला जास्त अडचणी असल्या तरी देवाने एका व्यक्तीची निरपेक्ष भावनेने सेवा करण्याचीही संधी दिली आहे. जेव्हा तुम्हाला देव विचारील तुम्ही काय केले तेव्हा तुमचे उत्तर चांगले असावे याची फक्त काळजी घ्या.

रुची Sat, 17/01/2015 - 21:36

In reply to by अतिशहाणा

आपण आपले आयुष्य फार गांभीर्याने घेतो. तेवढे घेण्याची गरज नाही. एकंदर मोठ्या पटलावर (७०-८० वर्षाच्या आयुष्याचा) विचार केला तर अगदी 'नॉर्मल' मुलासारखा मुलगा असता तर 'तुम्हाला' नक्की काय फरक पडला असता असे वाटते? 'तो' फारतर इतर ९५ टक्के जनतेसारखा शिकून रॅट-रेसमध्येच पडला असता. How should it matter to 'You'? आणि विश्वास ठेवा, तुम्ही दुसऱ्या चिंता नक्कीच शोधून आणल्या असत्या आणि त्याने मन कुरतडत बसलेच असते.

हे फार छान लिहिलेत, अतिशय सहमत आहे. आपण निराशेत असलो (मुख्यतः एखाद्या गोष्टीला अत्यंत परिश्रमांनंतरही अपेक्षित यश मिळत नसल्याने) की आपल्या समोरचे प्रश्न अवाढव्य दिसायला लागतात आणि आपण त्याबद्दलचे पर्स्पेक्टिव्ह गमावून बसतो असे वाटते.

स्वमग्नता एकलकोंडेकर Sat, 17/01/2015 - 23:12

In reply to by गवि

गवि म्हणतात ते बरोबर आहे..
ती काळजी कधीच गायब होणार नाही. फक्त ती फार ओव्हरव्हेल्मिंग होत नाही ना, आमचं दैनंदिन आयुष्यात पदोपदी तिचं अस्तित्व दिसत नाही ना हे मात्र मी आता बघते. काही महिन्यांपूर्वी मात्र हातपाय गाळुन गेले होते अगदी.

स्वमग्नता एकलकोंडेकर Sat, 17/01/2015 - 23:22

In reply to by अतिशहाणा

तुम्ही म्हणता ते खरे आहे. इतका सगळा विचार करण्याइतकं मन जेव्हा शांत असते तेव्हा ते सगळं पटतं. इन्फॅक्ट मी मागे एका लेखात लिहीले ते मुलामध्ये बर्याच स्किल्स त्याला ऑटीझम आहे म्हणूनच आहेत. ती स्किल्स नॉर्मल मुलांमध्ये नसतात इतकी.
परंतू मुलाबरोबर बाहेर दुकानात जाणे, रेस्टोरंटमध्ये जेवणे, थीम पार्क्समध्ये मनसोक्त मजा करून येणे, थिएटरमध्ये मुव्ही पाहणे या साध्या गोष्टी जेव्हा स्ट्रेसफुल बनत जातात तेव्हा वाटतंच की हा नॉर्मल मुलासारखा कधी वागेल. रस्त्याने जाताना एखाद्या ४ =५ वर्षाच्या मुलाची बडबड ऐकली की वाटतंच हे कधी होईल.. :)
रोजच्या दिवसाला येणार्‍या अडचणी व मन शांत ठेऊन सारासार विचार करणे याचे प्रमाण फार व्यस्त आहे. :) बट, वर्कींग ऑन इट! ध्यानधारणा जमत नाही अजुन. मन खूपच अस्वस्थ आहे. ध्यान करून मन शांत होईल पण ध्यान करण्यासाठी देखील एक बेसलाईन शांतता हवी. :)

सानिया Sat, 17/01/2015 - 18:47

सर्वांनी सांगितल्याप्रमाणॅ मलाही वाटते आहे. तुमच्या दिनक्रमातल्या प्रत्येक क्षणात मुलगा सहभागी असलाच पाहिजे असा अट्टाहास सोडा. अर्धातासही चालेल, पण स्वार्थीपणाची टोचणी न लावता स्वतःसाठी राखीव ठेवा.

स्वमग्नता एकलकोंडेकर Sat, 17/01/2015 - 22:46

In reply to by सानिया

अट्टाहास नाही आहे. तसं वागतही नाही मी. गेल्या वर्षापासून मुलाची शाळा सुरू झाल्याने मला बराच वेळ मिळतो. मला खूप आवडीच्या गोष्टी करायला मिळतात. (आवडीच्या गोष्टींपैकी एक गोष्ट आहे ऑटीझमचा ब्लॉग मेन्टेन करणे. :) )
व्यायाम जरा होत नव्हता. चालू करत आहे हळूहळू.

नितिन थत्ते Sat, 17/01/2015 - 23:07

In reply to by स्वमग्नता एकलकोंडेकर

ब्लॉगवर ऑटीझमशिवाय इतरही विषयांवर लिहीत चला. तुमचं विश्व ऑटीझमने व्यापून टाकू नका !

स्वमग्नता एकलकोंडेकर Sat, 17/01/2015 - 23:33

In reply to by नितिन थत्ते

ब्लॉगिंग करताना तुम्ही जितकं तुमच्या niche संबंधित लिखाण कराल तितकं चांगले असते. माझ्या वेबसाईटचे नाव जर्नीविथऑटीझम आहे, त्यामुळे तेथे मी ऑटीझम रिलेटेडच लिहीणार हे ठरलेले आहे. त्यात ऑटीझमची माहीती, मुलाला उपयोगी पडणारी खेळणी, अ‍ॅप्स इत्यादीची माहीती असेल. मला स्वमग्नता एकलकोंडेकर्/मदर वॉरिअर/जर्नीविथॉटीझम वेबसाईट या आयडेंटीटी मध्ये स्ट्रिक्टली ऑटीझम रिलेटेडच जग स्तिमित करायचे आहे. माझी स्वतःची पर्सनालिटी/आवडनिवड याची सरमिसळ मी यात करणार नाही हे ठरवलेले आहे. :)