"Intimate kisses" पुस्तकातील काही erotic कविता - भाग ३ - शेवट

भाग १
भाग २
बर्‍याच कवितांमध्ये तोच तोच "ecstatic pleasure" गोडपणाही नंतर नंतर जाणवू लागतो. अन मग त्या पार्श्वभूमीवर Afterglow & Rememberance विभागातील, "Listener" ही "Joseph miller" यांची कविता एकदम उठून दिसते. मला ही कविता खूप आवडली. बरीच करड्या रंगाची - depressing, एकटेपणाची छटा असली तरी संभोग या क्रियेचा, intimacy चा (जवळीके) वेगळा पैलू ती समोर आणते. मला हे कविता संपूर्ण पण तुकड्यातुकड्यात वाचकांसमोर मांडायची आहे.


the woman with her face pressed
against my chest & both legs
locked around my knee breathing deeply,
has floated into some quiet stream,
swaying past it's wooded banks without me

वरील वर्णनावरुन व विभागाच्या नावावरुन हे लक्षात येते की - they have made love आणि आता ती स्त्री (बायको? प्रेयसी? मैत्रिण की आणखी कोणी?) ही रतीक्लांत अन शांत झोपी गेलेली आहे. "without me" या वाक्यरचनेवरुन हे देखील जाणवते की नायकाला एकटे वाटते आहे. मग साहजिकच वाचकाच्या मनात प्रश्न उद्भवतो- काय नातं आहे त्यांचं? कोणत्या प्रकारचा मीलन-क्षण त्यांनी अनुभवला? अन नायकाला एकटे का वाटते? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील कडव्यात मिळतात.


somehow I have told her everything, whispered it
through my cracked voice
into the stillness around her
as we sat in the gloom
waiting for the movie to begin
and later by the bridge,
watching dim surf ignite offshore

अर्थातच हे दोघं सिनेमाला गेले आहेत नंतर पुलावरुन त्यांनी चालत चालत, रपेट घेतली आहे, अन त्याने तिला काही सुख-दु:खं सांगीतली आहेत. काय असावीत ती? अन कवितेच्या शीर्षकातील "Listener" ही ती स्त्री असावी असे आता तरी वाटते. म्हणजे तीच शीर्षकातील "listener" आहे


in this bed, I have exploded each grief into her body,
one by one until they come loose:
the drinking, the failed marriages & jobs,
the weight of my children pressing me down

या कडव्यात, कविता अतिशय gloomy होऊन जाते. त्या माणसाचे वय - तो साधारण मध्यमवयीन असावा हे कळून येते. तो समस्यांनी गांजलेला आहे हे कळून येते. अन त्यांच्या संभोगाकडे त्याने त्या तणावापासून मुक्ती, दु:खाचा निचरा म्हणून पाहीले आहे हे सुद्धा जाणवते. कदाचित ती वेश्या असेल, परत भेटणार नाही या कल्पनेतून कदाचित त्याने सर्व दु:खे confide केलेली आहेत.

पुढील कडवे अतिशय touching आहे. त्या माणसाला त्यांच्या intimacy (जवळीक) नंतर आता हलके व तिच्याबद्दल, "Listener" बद्दल कृतज्ञ वाटते आहे हे आपल्या लक्षात येते.


There must be some kindness I could bring
to her dream now listening to her breath
unwind in the small room
and wishing I had never hurt anyone

म्हणजे आता भूमिकांची अदलाबदल झालेली आहे. तिला शांत झोप लागावी, तिच्या स्वप्नात, शांतीत व्यत्यय नको म्हणून आता तो listener झाला आहे/होतो आहे. अन त्याच्या तणावाचा निचरा झाल्याने, त्याला अपरिमीत शांत वाटत आहे. अन इतक्या वेळाने पहील्यांदा तो तिला निरखून बघत आहे, त्याला ती सुंदर वाटते आहे.


what still country I have come to
where the long grass bends under the animals
when they lie down emptied of suffering?
what slow river flows beneath her forehead,
the petals of her ear adrift in her auburn hair
gathering darkness?

sex चा, दोन जीवांमधील संवाद, दु:ख शेअर करुन हलके होणे हा नितांत सुंदर psychological पैलू ही कविता सामर्थ्यानिशी सामोरी आणते.

-समाप्त-

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

छान आहेत तिन्ही भागातील कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता छानच आहेत. सर्व भाग अत्युत्तम. हे पुस्तक वाचायला लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"Robert Hass" यांची "Privilege of Being" (http://articles.latimes.com/1999/feb/14/books/bk-7893) ही देखील एक अप्रतिम, अप्रतिम, अतिशय देखणी कविता आहे.
कवितेमधील प्रसंग असा आहे की, दोन प्रेमिक, एक उत्कट मीलनक्षण अनुभवत आहेत, खरं तर धडपडून, प्रयत्नपूर्वक, एकतानता अन पूर्णत्व साधायचा यत्न करत आहेत. अन त्या दोघांच्या वरती "ether" मध्ये काही देवदूत, एकमेकांच्या स्ट्रॉबेरी ब्लाँड केसाच्या वेण्या घालत मधेमधे, त्या प्रेमिकांचा हा सर्व प्रयास पहात आहेत.

Many are making love. Up above, the angels
in the unshaken ether and crystal
of human longing
are braiding one another's hair, which is
strawberry blond
and the texture of cold rivers.

अन या देवदूतांना कळत नाहीये की एवढी नाट्यमयता, इतकं "ado about nothing" कशासाठी. कशाकरता एवढी awkward धडपड?

They glance
down from time to time at the awkward ecstasy--
it must look to them like featherless birds
splashing in the spring puddle of a bed--

स्वतः देवदूत हे मृत्यूच्या पलीकडील जगात, अमर्त्य लोकात रहात असल्याने त्यांना हे कळू शकत नाही की, या एकरुपतेच्या क्षणात माणसाला तात्पुरता का होईना, अमृतक्षण, स्वर्गीय सुख लाभते, मृत्यूचा खरं तर विसर पडतो. माणसाचे मीलनाकरता असणारे उत्कट longing त्यांना ना कळू शकते, ना लक्षात येते.

मीलनाच्या त्या ecstasy नंतर दुप्पट वेगाने येणारे, कोसळणारे "एकटेपण" "Hass" यांनी शेवटच्या कडव्यात, या कवितेते साध्या प्रसंगातून, समर्थपणे रंगविले आहे, हा एकटेपणाही, या देवदूतांना कळू शकत नाही.

I woke up feeling so sad this morning
because I realized
that you could not, as much as I love you,
dear heart, cure my loneliness,

निरक्षर असल्याने या देवदूतांना ना वाचता येते ना त्यातून येणारी उत्क्रांती आहे, याउलट माणसे वाचू शकतात, उत्तरोत्तर प्रगतीची आस बाळगतात.
या उत्क्रांतीच्या शक्यतेकरता, कुठेतरी Hass हे माणसाला उपलब्ध असणारा कितीही का तात्पुरते पूर्णत्व असो, नंतर अचूक येणारे कितीही एकाकीपण असो, पण अज्ञानी, निरक्षर, अगदी आदर्श सुंदरता ल्यालेल्या देवदूतांच्या जगापेक्षा, मर्त्य जग अधिक prefer करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

धागा वर काढते आहे. साखळीतील अन्य धाग्यांची लि़क खालीलप्रमाणे

http://aisiakshare.com/node/3691 "Intimate kisses" - पुस्तकातील काही erotic कविता - भाग १
http://aisiakshare.com/node/3692 "Intimate kisses" - पुस्तकातील काही erotic कविता - भाग २

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0