मुंबई - चाकोरीबाह्य लैंगिकतेसाठी गौरवफेरी (उर्फ मुंबई एलजीबीटीक्यू प्राईड मार्च)

*’चौकटीबाहेरच्या’ या शब्दामधून नकारात्मक छटा सुचवली जात असल्याचे अमुक यांनी लक्षात आणून दिल्यावर त्याऐवजी ’चाकोरीबाह्य’ हा शब्द वापरला आहे.

मुंबईतल्या 'एलजीबीटीक्यू प्राइड मार्च'मध्ये सहभागी झाल्याबद्दल काहीतरी लिहिलं पाहिजे, हे एकदा मान्य केल्यावर पहिली अडचण आली ती नावाची. जी संकल्पना आपल्या समाजात सहजी स्वीकारली जावी असं वाटतं, तिच्याकरता एखादाही साधासरळ अर्थवाही शब्द नसावा? छ्या. 'शब्द घडवण्यात वेळ घालवण्याहून आहे तो शब्द स्वीकारा नि मोकळे व्हा' ही भूमिका भाषेच्या सामर्थ्याला कमी लेखत असल्यामुळे तिच्या आसर्‍याला शक्यतोवर जायचं नव्हतं. त्यामुळे नमनालाच जाम डोकेफोड झाली. संस्कृतप्रचुर शब्दांचे बाण सुटले. नाकं मुरडली गेली. वाद झडले. शेवटी एकदाचं 'चाकोरीबाह्य लैंगिकतेसाठी गौरवफेरी' यावर एकमत झालं. (हे नाव गैरसोईचं आहे, मान्य. पण शेवटी प्रश्न तत्त्वाचा होता.)

तर - या फेरीत मी सामील होणार असल्याची जाहिरात मी आठवड्याभरापासून करत होते. त्यावर मिळालेल्या या काही प्रतिक्रिया:

- "एलजीबीटी- क्या? क्या होता है ये?" आयटीमध्ये नोकरी करणारी सुशिक्षित तरुणी.
- "म्हणजे कसली परेड? तू परेडला जाणारेस?" माझ्या आळशी स्वभावाशी जवळून परिचित असणारे कुटुंबीय.
- "ते बीभत्स चाळे करतात ते लोक? पण इल्लीगल आहे ना ते आता?" म.म.व. सुशिक्षित शेजारी.

एक वेगळी प्रतिक्रिया म्हणजे - "अच्छा..." पाठोपाठ सूचक आणि अवघडलेलं मौन. "तू येणार का?" अशी विचारणा धडकून केल्यावर चेहर्‍यावर भीतियुक्त धक्का. तरीही चिकाटीनं विचारल्यावरचं उत्तर, "नाही, तशी हरकत नाही. तत्त्वतः मान्य आहे मला. पण मला 'तसं' समजलं कुणी तर? मला लग्न करायचंय यार..." यावर वाद घालता आला असता, पण प्रामाणिकपणाला दाद देऊन मी गप्प बसले. किमान "म्हणजे काय?" इथपासून तरी सुरुवात नव्हती. शिवाय प्रामाणिक भीती होती, ते ठीकच. बाकी 'वेळ नाही', 'आवडलं असतं', 'दुसरं काम आहे' अशा प्रतिक्रियाही मिळाल्या.

वरच्या सगळ्या प्रतिक्रियांनी मला दिलेली लोकशिक्षणाची नामी संधी मी तत्काळ साधली हे सांगायला नकोच. २००८ पासून मुंबईत ही फेरी होते. त्याआधी महिनाभर चित्रपट, नाटकं, पथनाट्य, मेळे यांसारख्या माध्यमातून या विषयावर जनजागृती करणारी कार्यक्रम होतात आणि अखेरीस ऑगस्ट क्रांती मैदानापासून निघणार्‍या या फेरीच्या शेवटी रंगीत फुगे आकाशात सोडून त्याची सांगता होते.


(मॅचिंग ट्याटूसह आदित्य)

आदित्यला भेटून मी आणि मस्त कलंदर त्याच्याबरोबर फेरीत सामील होणार होतो.


(आदित्य आणि मकी)

माहौल उत्सवी होता. गालांवर रंगीबेरंगी ट्याटू काढून देणारे लोक, कलम ३७७चा निषेध करणारी अनेक कल्पक पोस्टर्स, चित्रविचित्र वेशभूषेनं लक्ष वेधून घेणारे लोक, लोकांमध्ये सहज मिसळणार्‍या सेलिब्रिटीज, "हॅपी प्राइड" असं म्हणत प्रेमभरानं एकमेकांना मारल्या जाणार्‍या मिठ्या, गालाच्या आसपास केले जाणारे चुंबनसूचक आवाज (श्रेयाव्हेरः गौरी देशपांडे), मोकळेपणानं केले जाणारे जोक्स. चाकोरीबाह्य लैंगिकतेचं प्रतीक असणारे सप्तरंगी झेंडे. आजूबाजूला तुंबलेली रहदारी. अचंबित + कुतूहलमिश्रित नजरांनी या मेळाव्याकडे बघणारे बघ्ये. (हे बघ्ये पुढे फेरी पूर्ण होईस्तोवर अनेकवार भेटले.)

आम्हीही उत्साहानं चेहरे रंगवून घेतले. ३७७ चा निषेध करणारे बिल्ले लावून घेतले. फोटो काढले.

मकीच्या गालांवर फुलपाखरू रंगवून झाल्यावर चित्रकार मुलीनं माझ्या गालावर "तुझ्या गालावर फूल काढते!" म्हटलं, तेव्हा मला थोडा अंदाज आला. रंगवून झाल्यावर शेजारी उभ्या असलेल्या मुलानं हौसेनं "आता तुम्हा दोघींचा फोटो मी काढतो..." अशी कौतुकयुक्त ऑफर दिली, तेव्हा त्यावर शिक्कामोर्तब झालं. आम्ही मिश्कील हसत फोटो मात्र काढून घेतलेच!


(तर हे आमचं नवं झ्येंगाट!)

व्यासपीठावरून आपल्या हक्कांसाठी जागृत होण्याचं आवाहन चालू होतं. घागरा घातलेला, नखशिखान्त नटलेला एक माणूस उत्साहानं लोकांना व्यासपीठावर येऊन बोलण्याची संधी देत होता. लोक येतही होते.


(नटमोगरा माणूस)


(मोना आंबेगावकर)

जेमतेम १८ वर्षांचे असतीलसे वाटणारे दोन युवक लग्नाच्या पोशाखात आले होते. त्यांचं एकमेकांवरचं प्रेम स्वीकारल्याची खुली पावती देणारी (आणि हातात करा धरलेली) एक प्रौढाही सोबत होती. मिरवणूकभर ते त्याच पोशाखात होते. त्यांच्यासोबत ढोलताशेही होते. अगदी लग्नाची वरात असल्यासारखं नाचणारी मंडळीही होती. सप्तरंगी झेंड्यांना तोटा नव्हताच. मोरासारखे पंख, उंच टाचांचे बूट, "प्यार किया तो डरना क्या" असं विचारणार्‍या मधुबालाचं पोस्टर, पुरुषी आणि स्त्रैण वेशभूषांची (आता या विशेषणांबद्दल सजग असल्यामुळे त्यातली साचेबद्ध कुंपणं खटकताहेत. पण शब्द संदर्भानं समजून घ्यायचे असतात. त्यामुळे मी याहून 'पॉलिटिकली करेक्ट' संज्ञा शोधणार नाहीय.) अनोखी आणि कल्पक मिश्रणं. काही सोज्ज्वळ नऊवारी साड्या. तुर्रेबाज फेटे. काही लक्षवेधी काऊबॉईज. बरीच झेंड्या-बिल्ल्यासह पाठिंबा देणारी पण अगदी साध्या पोशाखातली मंडळी.


(फिक्र आणि फक्र)


(मोर झालेला माणूस)


(फ्री बर्ड!)

मिरवणूक सुरू झाल्यावर आमचं लक्ष आजूबाजूच्या बघ्या मंडळींनी वेधून घेतलं.


(बघ्ये!)

रस्त्याच्या दुतर्फा तर ते थांबलेले होतेच. पण इमारतींच्या बाल्कन्यांतून आणि खिडक्यांतूनही फेरीकडे बघत होते. मुद्दाम शोधकपणे निरखून बघूनसुद्धा कुणाच्याही चेहर्‍यावर तिरस्कार वा घृणा मात्र दिसली नाही. हे फेरी सवयीची झाल्याचं द्योतक की केवळ मुंबईकरांची सहनशीलता? कुणास ठाऊक.

"यू आर गे -" कुणीतरी आरोळी दिली. "इट्स ओके!" उत्साही पुकारा.
"यू आर लेस्बियन - इट्स ओके!"
"यू आर हिजडा - इट्स ओके!"
"यू आर स्ट्रेट - इट्स ओके!" वर मात्र मनापासून हसू आलं!


(जल्लोष...)

"तारो मारो सेम छे, प्रेम छे प्रेम छे" ऐकली, आणि पाडगांवकरांची आठवण झाली. पाठोपाठ "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं" आलीच. आपली कविता इथवर पोचल्याचं कळल्यानंतर पाडगावकरांची भूमिका काय असेल, असं एक खवचट कुतूहलही वाटून गेलं.

एकूण गर्दीच्या मानानं मुली मात्र कमी होत्या. अगदी नव्हत्याच, असं नव्हे. पण कमी होत्या.


(’उमंग’चा सणसणीत अपवाद)

त्याबद्दल विचारणा केल्यावर कळलं, की एकूणच लोकांना रस्त्यावर उतरणं फार अवघड वाटतं. बरेच लोक काही ना काही कारणानं आपली लैंगिकता अशी जाहीर करायला बिचकतात. मुलींच्या बाबतीत तर ते अजूनच अवघड. आम्ही ज्या गटासोबत जात होतो, त्यात आमच्याखेरीज दुसरी कुणीही मुलगी नव्हती. पुढे बघ्यांमध्येही काही चाकोरीबाह्य लैंगिकतेचे क्लोजेटेड नसलेले लोक असल्याचं कळलं. त्यांनी खिडकीआड दडून नुसतं चोरटं अभिवादन केल्याबद्दल थोडी नाराजी + खिन्नता व्यक्त केली गेली, तितकीच.

फोटो काढणं हा जणू या उत्सवाचा भाग असल्यासारखंच होतं. अनेक प्रेस फोटोग्राफर्स होते. शिवाय मोबाईल क्रांती. सुरुवातीला मी भीत भीत 'फोटो काढू का?' अशी विचारणा केली. पण कुणाची काही हरकत नव्हतीच. लोक उत्साहानं पोज देत होते, फोटो काढण्याची ऑफर देत होते, लोकांच्या फोटोंच्या चौकटीतून समजूतदारपणे बाहेर पडत होते. शिवाय जाहीर मिरवणुकीत आलेले लोक - त्यांना आता नव्यानं काय विचारायचं, असं म्हणत नंतर नंतर मी परवानगी विचारण्याचा उपचार थांबवून टाकला. "तुमचा कुणी फोटो काढला नि उद्या तो पेपरात छापून आला तर?" हा एकानं मकीला विचारलेला प्रश्न. त्यात थोडी काळजी होती, पण थोडी तिच्या उत्तराबद्दलची उत्सुकताही. मी ऐकत होते. मगाचचा फूल-फुलपाखरू अनुभव आठवून मला येणारं हसू मी दाबलं. "काढला तर काढला. घरी थोडी चर्चा होईल, अजून काय?" या उत्तरानं प्रश्नकर्त्याचं समाधान झालं असावं.

अशा प्रकारच्या मिरवणुकींमध्ये आढळते, तशी बीभत्सता जवळ जवळ नव्हतीच. मिरवणुकीच्या दो बाजूंनी दोरी धरून मिरवणुकीला दिशा देणारे स्वयंसेवक होते, तसे कुणी कचरा टाकलाच, तर तो उचलून गोळा करणारेही काही स्वयंसेवक होते.


(कचरा गोळा करणारे स्वयंसेवक)

सोबतच्या पोलिसांनाही फारसं काम नव्हतं. (मधे तर एक पोलीसकाका मिरवणुकीत नाचायलाही उतरलेले आम्ही पाहिले!) पांढरीशुभ्र कंचुकीसदृश वस्त्रं नेसलेले आणि तंग सुरवारी घालून मुरकत चालणारे दोन तरुण बघून आम्हांला जरा कसंसंच झालं. पण कुठल्याही प्रकारच्या दाबल्या गेलेल्या गोष्टी बाहेर पडताना असा किंचित चढा, आक्रमक, आक्रस्ताळा सूर घेऊनच बाहेर पडणार, यावरही आमचं एकमत होतंच.


(शेवटी फुगे सोडून मिरवणुकीचं विसर्जन झालं.)

ज्यांची लैंगिकता कधीही दडपली गेलेली नाही अशा आमच्यासारख्या बिनधास्त मुलींना अशा प्रकारे रस्त्यावर उतरणं सोपं होतं-आहे. पण ज्यांना कुटुंबीयांचं, आप्तांचं, समाजाचं दडपण असेल - त्यांच्यासाठी हे किती अवघड असेल? आजूबाजूच्या बघ्या चेहर्‍यांमधे किती जण असतील या बाजूला येऊ इच्छिणारे? निदान या गटाबद्दल मोकळे - स्वीकारशील असणारे? पुन्हा एकदा - कुणास ठाऊक.

मिरवणूक संपल्यावरचे दोन किस्से मात्र अनपेक्षितरीत्या आश्वासक होते.

परेड संपता संपता एका छोटेखानी रेस्तराँमध्ये पाण्याची बाटली खरेदी करायला गेलो. आम्हांला अगदी थंड किंवा अगदीच साधं असे दोन्ही पर्याय नको होते. "बीच का कुछ नहीं है क्या?" असं विचारून गेल्यावर आपण त्यांच्या हाती फुलटॉस दिलाय हे लक्षात आलं नि जीभ चावली. वाटलं, आता ऐकवतायत काका समोरच्या गर्दीबद्दल काहीतरी अनुदार. पण काकांची कमाल. त्यांनी त्या वाक्यातल्या द्वर्थाकडे दुर्लक्ष करून "आहे हे असं आहे, घ्यायचं तर घ्या..." असं म्हणून आम्हांला फुटवलं.

मग बससाठी समोरच थांबलो होतो. लोकांचा जल्लोष ओसरला होता, पण अजून पुरा थांबला नव्हता. गटागटांनी रेंगाळत गप्पा मारणं सुरूच होतं. तेवढ्यात बसस्टॉपवरच्या एका काकूंनी "हे काय चाललंय?" असं मकीला विचारलं. काय सांगावं हे तिला पटकन कळेना. त्यांचं वय-वर्ग पाहता त्यांना या गोष्टींबद्दल माहीत असण्याची सुतराम शक्यता वाटत नव्हती. मकीनं कशीबशी सुरुवात केली. "हा गे लोकांचा मोर्चा आहे. त्यांचं अस्तित्व मान्य करावं, त्यांना सगळ्यांनी समजून घ्यावं म्हणून..."

त्यावर फाटकन "हां, म्हणजे हे सगळे गे आहेत!" असं काकूंचं उत्तर. प्रश्नार्थक कमी आणि विधानाकडे झुकणारं जास्त. त्यांच्या चेहर्‍यावरचे भावही पालटले नाहीत. निर्विकारपणे समोरच्या बसमध्ये बसून काकू चालत्या झाल्या. आम्ही चकित!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (5 votes)

मेघना आणि मकी यांदोघींचे कौतुक वाटले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

+१
कौतुक + अश्या व्यक्तींशी मैत्री असल्याचा अभिमानही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पण ऋची परेड चुकलीच! टुकटु़क! मुंबईत असूनही त्याला नंतर आम्ही केलेल्या सट्याटू अनुभवकथनावर समाधान मानावं लागलं. Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धन्यवाद मेघना :
१) हा लेख लिहिल्याबद्दल
२) ह्या प्राइड्ला आल्याबद्दल
३) ह्या वेळेस माझा फोटो जरा बरा काढल्याबद्द्ल.

गे म्हणून "पब्लिकली" मान्य करणे जितके कठीण... तितकेच कठीण आपण गे लोकांच्या पाठिशी उभे आहोत, हे जाहिरपणे साम्गणे. ह्यासाठी तुम्हा दोघिंचे अभिनन्दन.

-आदित्य जोशी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..आदित्यजी..तुम्हाला पूर्ण पाठिंबाच आहे.

.इनफॅक्ट तुम्ही समाजाबिमाजाची मान्यता स्वीकार वगैरे मागण्याची गरजच नाहीये.

फक्त कायद्याने मान्यता हेच आवश्यक.

समाजाचे कशाला हवेय सर्टिफिकेट?!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आदित्य जी??? Tongue नको नको.. आदित्य इस ओलरेडी "जी". "जी" माने जिनियस. गे.

- आदित्य जे (जे माने जोशी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कसचं कसचं!

बादवे, तुझा ट्याटू भला हम दोनों से भारी कैसे, अशी असूयायुक्त कुजबुज आम्ही केली हे इथे कबूल करायला हरकत नाही. पण तू लवकर गेल्यामुळे चित्रकाराला उत्साह असेल, वेळ असेल नि शिवाय तुझ्या टकलामुळे तिला सरफेस एरियाही भरपूर मिळाला असेल.. म्हणून हा भेदभाव, असं म्हणून आम्ही आमची समजूत काढून घेतली. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कुजबुज कसली. मोठमोठ्याने मी तर तुम्हाला म्हटलंही तुमच्यापेक्षा आदित्यचाच टॅटु कस्ला भारीये!
मलाही टॅटु खूप आवल्डा रे! तुझ्या पेहरावाच्या रंगाला अधिकच शोभून दिसत होता.
+
(तुम्ही परेड वेळेच्या आधी संपवलीत याची तक्रार मात्र करतो Sad )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आदित्य,
तू काय काय कठिण असतं ते लिस्ट केलं आहेस. काही सल्ले जाहिरपणे (म्हणजे इतक्या पुरोगाम्यांच्या दाटीवाटीत)देणं देखिल कठिण असावं.
1. Have you seen a doctor of reproductive system?
2. Have you seen a doctor of nervous system?
जे डॉक्टर प्रो-गे किंवा अँटी-गे अशा लफड्यात नाहीत त्यांचं एकवार ऐकून घ्यायला काय हरकत आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम किंवा न्युरॉलिजिस्टकडे काय दाखवायचे?

कोणत्याही मेडिकल डॉकटरकडे (मेडिसिन अथवा सर्जरी स्पेशालिस्ट) आपण रोग असल्यावर जातो.

रोग असो अथवा सिंड्रोम (लक्षणसमूह),शारिरीक असो अथवा मानसिक, त्याला पॅथॉलॉजिकल "रोग" कधी म्हणायचे तर त्याने शारिरीक अथवा मानसिक अपाय होत असेल तर.

"सर्वसामान्यां"प्रमाणे म्हणजे बहुसंख्यांप्रमाणे विरुद्धलिंगी संबंध ठेवावेसे तर वाटताहेत पण शरीर साथ देत नाही. किंवा शारिरीक शक्यता आहे पण मनाच्या अतीव डिप्रेस्ड कंडिशनमुळे कोणतेच संबंध ठेवायला मन करत नाही आणि त्यामुळे आणखी अस्वस्थता येते आहे... किंवा समलिंगी संबंध ठेवताना चांगले वाटते आणि नंतर मात्र हे घातक आहे असे वाटते.. किंवा खरं तर हे सोडायचं आहे पण सुटत नाही .. अशा प्रकारची कोणतीही गोष्ट ही उपचारयोग्य ठरते.

पण विरुद्धलिंगीयांशी संबंध ठेवू नयेत असं वाटतं आणि तसे ठेवणं हीच ज्यांना /जिथे कुचंबणा ठरु शकते, उलट समान लिंगीयांशी संबंध ठेवण्याच्या विचाराने, कृतीने आणि कृतीनंतरही आनंद, समाधान मिळते, आणि शारिरीक हानी (प्रिझ्युमेबली) होत नाही आणि नंतर त्याचा पश्चात्ताप होऊन मानसिक हानीही होत नाही.. या सर्वात जी काही कुचंबणा आणि मनस्ताप आहे तो फक्त इतरांनी हे न स्वीकारण्यातून आलेला (एक्स्टर्नल) आहे अशा वेळी डॉक्टरकडे जाण्याचे प्रयोजन काय?

ज्याला इतरांचं समलिंगी असणं स्वीकारता येत नाही त्याला त्रास होतो आणि त्याने कदाचित डॉ. कडे जाणं समजून घेता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्याला इतरांचं समलिंगी असणं स्वीकारता येत नाही त्याला त्रास होतो आणि त्याने कदाचित डॉ. कडे जाणं समजून घेता येईल

उग्गाच नै गविंचे इतके फ्यान फोलोइंग है!
पुन्हा एकवार आदाब!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या सर्वात जी काही कुचंबणा आणि मनस्ताप आहे तो फक्त इतरांनी हे न स्वीकारण्यातून आलेला (एक्स्टर्नल) आहे अशा वेळी डॉक्टरकडे जाण्याचे प्रयोजन काय?

मनस्ताप किंवा कुचंबणा बाजूला ठेऊ. इतर सगळे मूर्ख आहेत नि सबब इसम हा इतरांच्या वागण्याबोलण्याला १००% इम्म्यून आहे असे मानू. (समलैंगिकाची किंवा कोणाचीही कुंचबणा करणे अयोग्य आहे.)
------------------
तुम्ही ज्या दोन स्थिती दिल्या आहेत तिथे "वाटणे" हा शब्द वापरला आहे. वाटणे हा शब्द वापरूनच मी दुसरे उदाहरण देतो -
१. "सर्वसामान्यां"प्रमाणे म्हणजे बहुसंख्यांप्रमाणे गोड खावे पदार्थ खावावेसे तर वाटताहेत पण शरीर साथ देत नाही. किंवा शारिरीक शक्यता आहे पण मनाच्या अतीव डिप्रेस्ड कंडिशनमुळे कोणताच गोड पदार्थ खायला ठेवायला मन करत नाही आणि त्यामुळे आणखी अस्वस्थता येते आहे... इ इ इ
२. पण गोड पदार्थ खाऊ नयेत असं वाटतं आणि तसे खाणे हीच ज्यांना /जिथे कुचंबणा ठरु शकते, उलट गोड पदार्थ न खाण्याच्या विचाराने, कृतीने आणि कृतीनंतरही आनंद, समाधान मिळते, आणि शारिरीक हानी (प्रिझ्युमेबली) होत नाही आणि नंतर त्याचा पश्चात्ताप होऊन मानसिक हानीही होत नाही...

स्थिती १ हाच आजार आणि २ नाही हे कशावरून? डॉक्टरला "सर्वसामान्य" म्हणजे काय ते जास्त चांगलं माहित असेल ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वृत्तांत, फोटो आणि टॅटूज् आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतरः फक्त कमळावर फुलपाखराच्या ऐवजी भुंगा अधिक शोभून दिसला असता Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आय हॅव नॉट रिअली अंडरस्टूड द सब्जेक्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्राणी जगतात ( मनुष्य प्राणी सोडुन )समलैंगिकता असते का? खराखुरा प्रश्न आहे. ह्या धाग्यावर नको असला तर प्रश्नांच्या धाग्यावर हलवावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्राण्यांमधे (मनुष्या शिवाय देखील) समलैंगिकता असते.
http://en.wikipedia.org/wiki/Homosexual_behavior_in_animals

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बर्‍याच गदारोळाच्या वरातीमागून माझे प्रतिसादाचे घोडे-

पूर्वी आडनांवं विचारली जायची आणि त्यावरून समोरच्या माणसाला मिळणारी वागणूक ठरायची, कधी-कधी संभाषण चालू असतानाच आडनांव कळलं की आधी आणि नंतरच्या वागण्यात बदल घडायचा. काही ठिकाणी अजूनही होतं. मग हे कसं अमानुष आहे वगैरे पटायला कित्येक वर्षे गेली, आणि अर्थातच सर्वांना एकाच वेळी पटलं असं नाही. आधी म्हटल्याप्रमाणे अजूनही जातीव्यवस्थेप्रमाणे लोकांना वागवणं वाईट आहे हे कित्येकांच्या गळी उतरलेलं नाहीय. इथंही तेच आहे. फक्त काही 'एलजीबीटी' आपण 'एलजीबीटी' आहोत हे सांगतात आणि काही सांगत नाहीत. सांगितल्या न सांगितल्याने काही फरक पडायला नको अशी परिस्थिती जन्माला यावी यासाठी काही लोकांचा लैंगिक कल वेगळा असू शकतो हा मुद्दा मान्य व्हायला हवा. ते तसं होत नाही आणि उलट तिरस्काराने आणि तुच्छतेने उल्लेख होतो हेच दुर्दैव आहे.

नैसर्गिक-अनैसर्गिकाच्या व्याख्या ठरवणार कोण तर आपण मनुष्यप्राणी. कोणत्या बळावर हा अधिकार मिळाला त्यांना? त्यांना सोयीस्कर असं वेगळं काही घडलं की दैवी चमत्कार, नाही घडलं की अनैसर्गिक विकृती. थोडक्यात दांभिकपणा. असो.

गवि, तिथे एलजीबीटींच्या शिवाय इतरही लोक होते. पण आपण नाही त्यातले, असं कुणी दाखवायचा प्रयत्न केल्याचं मला जाणवलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

वरातीमागून अजून एक घोडं. Smile

लेख वाचून काही विचार मनात आले आणि काही प्रश्नही.

प्राईड मार्चला जाण्याची 'जाहिरात' करायला सुरुवात केल्यावर जे तीन अनुभव तुला आले ते सांगण्याचा टोन मलाही - 'किती मूर्ख/अजाण/असंवेदनशील/बेफिकीर लोक असतात. आणि बघा... मी कशी शहाणी/जाणकार/संवेदनशील' छापाचा वाटला. माझं हे वाटणं मी चूक समजीन जर -
> त्या तरुणीला फक्त 'LGBT' हा शॉर्टफॉर्म माहित नव्हता असे नाही, पण तो तू एक्सप्लेन केल्यावरदेखील (केला असशील असं गृहितक) तिने होमोफोबीक प्रतिक्रिया दिलीन?
तिची मतं टोकाची प्रतिकूल होती ह्याबद्दल तुझी खात्री असेल तर ठिक, अन्यथा आपल्याला जगातलं सगळंच काही माहित असतं असं नाही, बरोबर?! कधी ना कधी ते नव्यानीच कळलेलं असतं. प्रत्येकाचं वाचन, पार्श्वभूमी, आवडीनिवडी, स्वभावधर्म, आजूबाजूची माणसं इ. भिन्न, त्या त्यानुसार माहित्या मिळतात अगर मिळत माहीत. त्यात कमी लेखण्यासारखं काही नाही.

> शेजारच्या काकांचे काही गैरसमज दूर करण्याचा तू कसा प्रयत्न केलास? केलास ना?

धाग्यात कुठेतरी, तुलनेकरता, तू गांधींना ओढलंयस, म्हणून - त्यांचा 'हृदयपरिवर्तना'वर विश्वास होता म्हणे. मग आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये, 'मतपरिवर्तनाची' अशी काय जबाबदारी तू घेतलीस/काय प्रयत्न केलेस तेही कळू शकेल काय? नुसतं मार्चमध्ये सहभागी व्हायचं आणि प्रत्यक्षात 'असो. तुमचं मत वेगळं. माझं वेगळं'छापाचं विषय बंदपाडू तू काही म्हटलं नसशील असं वाटत असल्याने म्हणतोय, तेपण अनुभव शेअर कर ना! दॅट विल ऑल्सो बी इंटरेस्टिंग.

लोकांच्या प्रतिकियांच्या पार्श्वभूभीपेक्षा; मार्चमध्ये सहभागी होण्याआगोदर प्राईड मार्चसंबंधी तुझी काय कल्पना होती? तुला एकंदरित काय काय वाटत होतं? हे सगळं येऊन लेखाला सुरुवात झाली असती, तर लेख आणि पर्यायानी तुझा सहभाग अधिक कौतुकास्पद, अभिमानास्पद वाटला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्राइड मार्चमधे भाग घेण्यामागे फार मोठी निर्णयप्रक्रिया नव्हती. एलजीबीटीक्यू वर्तुळाबद्दलचं माझं कसनुसेपण, अवघडलेपण, भीती, अपरिचय - ’शरलॉक’ आणि शरलॉकच्या फॅनडममुळे याआधीच गळून पडले होते. त्यामुळे तुला (आणि ऋला) अभिप्रेत आहे, तशी निर्णयप्रक्रिया सांगण्यासाठी माझ्याकडे नाही. स्वारी. माझ्याकरता हा फक्त एक नवा अनुभव होता. त्याबद्दल पुरेसं वाचलं ऐकलं होतं. ते अनुभवलं. त्याचं वार्तांकन केलं, इतकंच. त्याहून जास्त तरंग उठले नाहीत. त्यामुळे त्याबद्दल लिहिण्याजोगं काही नाही.

लोकशिक्षणाबद्दल: -

वर कुठेतरी आढ्यताखोरपणे म्हटलं आहे, तेच पुन्हा उद्धृत करते - मी सगळ्यांना मदत करायला धावून जात नाही. आदित्यसारख्या सौम्य, समजून घेऊ-देऊ पाहणार्‍या प्रतिक्रिया देण्याइतकं संतपण, संयम, मनाचं मोठेपण माझ्याकडे नाही. ज्या लोकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे, ज्यांचं डोकं पुरेसं खुलं आहे असं मला वाटतं, अशा लोकांशीच मी संवाद करू पाहते, करू शकते. माझी शक्ती मर्यादित आहे. ती बंद डोक्याच्या माणसांवर फुकट घालवावी आणि त्यांचं ’हृदयपरिवर्तन’ करू पाहावं हे माझं जीवितध्येय नाही.

सगळ्यांना सगळं माहीत असणं शक्य नाही, खरंच आहे. पण काय करणार! काही लोक तुम्हांला साध्या चार चाकी गाड्यांमधले प्रकारही ओळखू येत नाहीत म्हणून तुम्हांला जज करतात. काही लोक तुम्हांला एलजीबीटीक्यू हा मोठा सप्रेस्ड गट माहीत नसल्याबद्दल तुम्हांला जज करतात. कोरी पाटी न ठेवता येण्याचा शाप आहे खरा. आपण पुरेसे खुले असलो, तर त्यावर मात करता येते मात्र. मी ज्यांना पूर्वी असं बावळट समजत असे (आणि व्हायसा वर्सा) अशा अनेक लोकांशी माझी खूप घट्ट मैत्री झाली आहे इतकाच माझ्यापाशी असलेला पुरावा. बघ, पुरतो का.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

योगायोगानं होमोफोबियाबद्दलचं हे पोस्ट आत्ताच वाचण्यात आलं. यंजॉय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

फोटो पाहून पडलेले प्रश्न....

१. हा मार्च LGBT चा असला तरी त्यातला जास्त भाग गे(?)* लोकांनी व्यापलेला दिसतो. ऑपोझिट प्रकाराचं प्रकटीकरण दिसत नाहीये.
२. मोर झालेल्या माणसाने जो कपडा घातला आहे तसा कपडा घालून सामान्यत: स्ट्रेट स्त्री असलेल्यांपैकीसुद्धा कोणी रस्त्याने फिरत नाही. त्या माणसाला तो कपडा घालण्याची निकड का भासली असावी?

मी हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे पण मला समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. मी आधार कार्ड काढण्यासाठी गेलो असता तिथे आणखी एक माणूस आला होता. त्याने एक रंगीबेरंगी फ्रॉक घातला होता. लिप्स्टिक लावली होती. म्हणजे तो डिफरंट ओरिएण्टेशनवाला (LGBT पैकी) माणूस होता असे मी समजतो (हे समजण्यात माझी चूक असू शकेल). या माणसाला लोक त्रास देत असतील/तिरस्कार किंवा इतर काही होत असेल. माझा प्रश्न असा आहे... त्याने फ्रॉक घातला नाही, लिपस्टिक लावली नाही तर त्याला लोकांकडून कसलाच त्रास बहुधा होणार नाही. तो खाजगीत त्याला हवे ते ओरिएण्टेशन ठेवू शकतो, संबंध ठेवू शकतो. असे असताना फ्रॉक घालून फिरण्याची इतकी निकड त्या माणसाला का भासते?

समजा दोन पुरुष एकत्र रहात असतील आणि लैंगिक संबंध ठेवत असतील तर तसे त्यांनी ठेवायला हरकत नाही. पब्लिक फिजिकल डिस्प्ले ऑफ रिलेशनशिप करण्याची गरज काय असते? मी माझ्या पत्नीबरोबर फिरायला जातो तेव्हा तिचा हात हातात घेत नाही. तिच्या कमरेभोवती हात टाकून जात नाही. (नुकतेच लग्न झाले होते तेव्हाही नाही). दोन पुरुषांना तसे करण्याची अशी कोणती गरज भासते?

मला अजून प्रश्नच नीट कळला नाहीये हेच खरं.....

*पुरुष म्हणून क्लासिफाय झालेल्या पण स्त्री म्हणून वागण्याची इच्छा असलेल्या लोकांनी.... (डिसक्लेमर: गे लोकांना स्त्री म्हणून वागण्याची इच्छा असते का? याबद्दल साशंक आहे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

इथे हे कदाचित अवांतर किंवा समांतर ठरेल, पण माझ्या वकूबाने उत्तरे देण्याचा प्रयत्न करतोय कारण एक तर प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि दुसरे असे की ते प्रश्न अनेकांना पडतात हे माहित आहे.

१. हा मार्च LGBT चा असला तरी त्यातला जास्त भाग गे(?)* लोकांनी व्यापलेला दिसतो. ऑपोझिट प्रकाराचं प्रकटीकरण दिसत नाहीये.

इथे पुन्हा पुरूषप्रधानता आपले रंग दाखवते म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपल्याकडे (आणि एकुणच अनेक समाजांत) संस्कृतीरक्षणापासून "खानदान की इज्जत" वगैरे प्रकरणे सांभाळाण्याचा जिम्मा स्त्रियांवर टाकल्याने त्यांनी असे खुलेपणाने बाहेर येणे हा त्यांच्या एकट्याचा निर्णय न ठरता त्यात कुटुंबाची बदनामी होणे, आपल्या इतर भावंडांची लग्ने न होणे, इतर प्रकारची असुरक्षितता यांचा बोजा टाकला जातो / असतो. त्यामुळे पुरूष जोडिदार जितके खुलेपणाने (त्यांनाही स्वतः हे स्वीकारल्यावर असे प्रकट बाहेर यायला बराच वेळ लागतो पण निदान ते अधिक लवकर येतात) घोषित करतील, स्त्रियांवरच्या समाजाने लादलेल्या कंडिशनिंगमुळे त्यांना वेळ लागत असावा. इतरही कारणे असतील पण मला वाटलेले हे एक प्रमुख कारण

बाकी Bisexuals पुरूष आणि स्त्रिया दोघेही असु शकतात. ते सहभागी असतील तरी वेगळी ओळख अशी दिसणार नाही. ट्रान्सजेंडर म्हणजे तरललिंगी. हे सुद्धा पुरूष अथवा स्त्री असुच शकतात. त्यात जे क्रॉसड्रेसर्स असतात ते वगळता अन्यांना तुम्ही या परेडमध्ये वेगळे ओळखु शकणार नाहीत

२. मोर झालेल्या माणसाने जो कपडा घातला आहे तसा कपडा घालून सामान्यत: स्ट्रेट स्त्री असलेल्यांपैकीसुद्धा कोणी रस्त्याने फिरत नाही. त्या माणसाला तो कपडा घालण्याची निकड का भासली असावी?

तो कपडा तो दररोज घालत असेल असे वाटत नाही. ही एक परेड होती. इथे मुळातच तुमच्या स्वातंत्र्याचे "प्रदर्शन" होते. ब्राझीलच्या रिओ फेस्टिव्हलच्या परेडलाही जे कपडे घालून फिरतात ते सामान्यतः रस्त्यावर घालुन फारसे कोणी फिरत नाही. परेडमध्ये अनेकदा भडक कपडे घालावेसे काहिंना वाटु शकते.

शिवाय बराच काळ दबलेल्या व्यक्ती बाहेर येताना असे काही करत असतील तर ते योग्य/आरोग्यदायी (हेल्दी) वाटले नाही तरी समजू शकतो.

त्याने फ्रॉक घातला नाही, लिपस्टिक लावली नाही तर त्याला लोकांकडून कसलाच त्रास बहुधा होणार नाही. तो खाजगीत त्याला हवे ते ओरिएण्टेशन ठेवू शकतो, संबंध ठेवू शकतो. असे असताना फ्रॉक घालून फिरण्याची इतकी निकड त्या माणसाला का भासते?

तुम्हाला (अ‍ॅज इन थत्तेंना असे नाही, इन जनरल भिन्नलिंगी पुरूष वाचकाला) साडी नेसायची उबळ कधी येते का? तर नाही कारण तुम्ही पुरूष आहात हे तुमच्या मेंदुला पटलेले असते. काही व्यक्तींना विरुद्ध लिंगी व्यक्ती सहसा करतात त्या करायची उबळ येते - सतत येते - तेच नैसर्गिक वाटते. त्याने काय करावे? अशा स्त्रियांनी पुरुषांचे कपडे घातले तर हल्ली अनेकदा दुर्लक्षिले जाते. मात्र त्या स्त्रियांना पाळी आल्याचेही दु:ख होते - कारण त्या स्वतःला स्त्री समजत नसतात. असो बरेच कंगोरे आहेत.
थोडक्यात इथे प्रदर्शन हा हेतु असेलच असे नाही. कदाचित ती त्याची नैसर्गिक उबळ असेल.

समजा दोन पुरुष एकत्र रहात असतील आणि लैंगिक संबंध ठेवत असतील तर तसे त्यांनी ठेवायला हरकत नाही. पब्लिक फिजिकल डिस्प्ले ऑफ रिलेशनशिप करण्याची गरज काय असते? मी माझ्या पत्नीबरोबर फिरायला जातो तेव्हा तिचा हात हातात घेत नाही. तिच्या कमरेभोवती हात टाकून जात नाही. (नुकतेच लग्न झाले होते तेव्हाही नाही). दोन पुरुषांना तसे करण्याची अशी कोणती गरज भासते?

पीडीए - पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन - नेमका किती योग्य किती अयोग्य हे खूपच स्थळ-काळ-व्यक्ती सापेक्ष आहे. भारतापुरते बोलायचे तर एकुणच दक्षिणेत इन्क्लुडिंग मराठी व्यक्ती सहसा कमी पीडीए ठेवतात तर उत्तरेकडे सरकाल तसा तो वाढत जातो. मराठी/दक्षिणेतील समलैंगिक जोडपीसुद्धा याला अपवाद असतील असे वाटत नाही. (किमान माझ्या परिचयातील जोडपी सार्वजनिक ठिकाणी असे काही करताना दिसत नाहीत)
शिवाय मरीन ड्राईव्हपासून बँड स्टँडपर्यंत अनेक ठिकाणी अनेक भिन्नलिंगी जोडपी गळ्यात गळे - ओठात ओठ अडकवून बसलेली दिसतातच की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शंका आहे.
तर नाही कारण तुम्ही पुरूष आहात हे तुमच्या मेंदुला पटलेले असते. काही व्यक्तींना विरुद्ध लिंगी व्यक्ती सहसा करतात त्या करायची उबळ येते - सतत येते - तेच नैसर्गिक वाटते. त्याने काय करावे? अशा स्त्रियांनी पुरुषांचे कपडे घातले तर हल्ली अनेकदा दुर्लक्षिले जाते. मात्र त्या स्त्रियांना पाळी आल्याचेही दु:ख होते - कारण त्या स्वतःला स्त्री समजत नसतात.
बाकी क्याटेगरींचे ठीक आहे, ह्या क्याटेगरीबद्दल मात्र शंका आहे.
स्त्री चे शरीर असताना मन मात्र स्त्रीचे नसणे हे असंतुलन,imbalance नाही का ?
त्यांच्या मनाला जे हवय, ते करायला त्यांचे शरीर समर्थ नाही.
ही शारीरिक असमर्थता नव्हे का ?
त्याबद्दल त्यांना तुच्छ लेखणे किंवा हीन समजणे १०००% चूकच. पण सहृदयतापूर्वक चिंता/काळजीसुद्धा वाटू नये का ?
.
.
माझा गोंधळ होतो आहे.
बाकी, गे वगैरे मंडळी सोडाच, कुणालाही असं वेगळं करणं चूकच.
(म्हंजे डावखुरे, चष्मिश, टकले.... रूढ प्रतिमेहून वेगळे असणारे कुणीही...
त्यांना उगाच धरुन बडवू नये असे वाटते. )
.
.
पण एखाद्याला डोक्यावर स्वतःचे चांगले भरगच्च केस असावेत असे वाटले पण त्याला टक्कल पडत असेल,
तर त्याच्याबद्दल वाईट वाटणारच ना. शक्य असल्यास त्याला उपचार करुन घेउन त्याच्या मनासारखेही घडवता आले तर उत्तम.
(परवापरवापर्यंत हे करणे फारच अवघड होते. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

केसांच्या आरोपणाप्रमाणे ज्यांना या असंतुलनाचे वैषम्य वाटते त्यांना लिंगबदल करून घेण्याची सोयही आहे. ज्यांना जमते परवडते ते करतातही.
पण ज्यांना त्याचे वैषम्य वाटत नाही, उलट तसेच असणे (टकले, काणे किंवा विरूद्ध लिंगीयांसारखे) ठिक व आनंददायी वाटते त्यांचे काय? त्यांनीही मुद्दाम सामान्य दिसण्यासाठी विग लावावा असा हट्ट तर कोणी करत नाही ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सविस्तर लिहिण्याचा प्रयत्न करते.

अगदी सुरुवातीच्या काळात या विषयावरचे काही सिनेमे बघून मलाही हे प्रश्न पडले होते. माझ्या स्त्री असण्याबद्दल मला कधीही कोणतीही शंका आलेली नाही. पण मला नाही मेकप करावासा वाटत. लिपस्टिक घासून फिरणं कंटाळवाणं नि जरा अंगावर येणारंच वाटतं. मग मेकप करणं वा साडी नेसणं वा स्त्रैण कपडे घालणं आणि ते लोकांना दाखवणं याची इतकी निकड या लोकांना का बरं वाटावी? ही निकड नैसर्गिक की केवळ शोबाजी - असा प्रश्न मी विचारल्याचं मला आठवतं. त्यावर मला लोकांनी संयमानं उत्तर दिलं होतं, ते कायम लक्षात राहिलं.

स्त्री लिपस्टिक लावते म्हणजे नक्की काय करते? बिनबाह्यांचे कपडे, तंग किंवा आपल्या शरीराच्या आकारउकारांना उठाव देणारे कपडे म्हणजे काय असतं? अनाठायी आक्रमकतेचं प्रदर्शन म्हणजे काय असतं? एका प्रकारे, कुठल्या तरी अंतर्मनाच्या पातळीवर, कळत नकळत दिलेलं ते आमंत्रण असतं. हे आमंत्रण देण्याकरता काही जणांना काही विशिष्ट अवयव अधोरेखित करून दाखवण्याची उर्मी असते, काही जणांना नसते. कमीजास्त असते. आपापल्या भुका आणि त्या भागवण्याचे आपल्याला पटणारे रस्ते यांचं मिश्रण. बस. त्यावरून आपलं स्त्रीत्व वा पौरुष का बरं ठरावं? त्यात बीभत्स ते काय? शिवाय हे सगळं कालसापेक्ष नाही का? आज मी जीन्स आणि टीशर्ट घालून, केस डोक्यासरशी कापून जितकी राजरोसपणे फिरू शकते; तितकी अजून ७० वर्षांपूर्वी फिरू शकले असते का? नाही. अजून १०० वर्षांमागे भारतात पुरुषानं उघड्या डोक्यानं फिरणं किंवा बाप वारलेला नसताना मुद्दामहून टक्कल करून फिरणं अब्रह्मण्यम मानलं गेलं असतं. आज त्यात कुणालाही काहीही वावगं वाटत नाही. म्हणजे या गोष्टींबाबतचे संकेत बदलते असतात. त्यांना बीभत्स - हिडीस - भावनादुखाऊ अशी लेबलं का लावावीत?

अशी लेबलं लावली जातात, विशिष्ट कपडे घालण्याबाबत सामाजिक घृणा व्यक्त केली जाते, तेव्हा बंड म्हणून या गोष्टी करण्याची उर्मी अधिकच जोरानं उफाळून येत असणार, हा साधा तर्क. त्यामुळे या मिरवणुकीत हे असे लक्ष वेधून घेणारे कपडे दिसत असावेत.

फिजिकल अफेक्शनच्या डिस्प्लेबद्दल ऋशी तंतोतंत सहमत. हे व्यक्तिसापेक्ष, समाजसापेक्ष, स्थलकालसापेक्ष असणार. त्यात समलिंगी की भिन्नलिंगी त्यानं काही फार फरक पडत नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ऋषिकेश आणि मेघनाने यावर उत्तम प्रतिसाद दिलेले आहेत त्यामुळे फक्त मर्यादित मुद्द्यावर माझे दोन पैसे टाकतो.

समजा दोन पुरुष एकत्र रहात असतील आणि लैंगिक संबंध ठेवत असतील तर तसे त्यांनी ठेवायला हरकत नाही. पब्लिक फिजिकल डिस्प्ले ऑफ रिलेशनशिप करण्याची गरज काय असते?

यात मुद्दा खरं तर पब्लिक डिस्प्लेचा नाही, आपल्याला काय आवडतं आणि ते करायला समाज कितपत परवानगी देतो याचा आहे. कंबरेभोवती हात टाकून फिरायला छान वाटतं म्हणून फिरावं, 'बघा आमचं कसं प्रेम आहे' हे दाखवण्यासाठी नाही. समाजात लोक वावरत असल्यामुळे तो अपरिहार्यपणे 'डिस्प्ले' बनतो.

प्रत्येकच समाज या बाबतीत लिखित/अलिखित बंधनं घालतो. जेव्हा ही बंधनं अतिरेकी जाचक होतात, तेव्हा कधीतरी त्या मर्यादांचा विस्तार करण्यासाठी, आपला हक्क बजावण्यासाठी, किंवा बंड म्हणून डिस्प्ले केला जातो. प्राइड परेडचा हेतू तोच आहे. 'गर्व से कहो हम .... है' अशी घोषणा त्या त्या समाजाच्या एकजुटीसाठी आवश्यक असते. अशा डिस्प्लेतून बाकी जगाला आपल्या अस्तित्वाचा संदेश जातो, तसाच त्या समाजातल्या घटकांनाही, 'अरे, आपल्याबरोबर इतके लोक आहेत' असा दिलासाही मिळतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>शिवाय मरीन ड्राईव्हपासून बँड स्टँडपर्यंत अनेक ठिकाणी अनेक भिन्नलिंगी जोडपी गळ्यात गळे - ओठात ओठ अडकवून बसलेली दिसतातच की!

या ठिकाणी 'डीम्ड प्रायव्हसी' असते. पक्षी-आपल्याला कोणी ओळखत नाही असे समजण्याचे ठिकाण. ती जोडपी आपल्या सोसायटीच्या आवारात पोचल्यावर तसे करत नाहीत. ज्या ठिकाणी भिन्नलिंगी जोडपी ओपनली तसे करतात त्याठिकाणी समलिंगी जोडप्यांनाही त्रास होत नसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ज्या ठिकाणी भिन्नलिंगी जोडपी ओपनली तसे करतात त्याठिकाणी समलिंगी जोडप्यांनाही त्रास होत नसेल.

वस्तुस्थिती अशी असेल तर चांगलंच आहे. बेश्ट.
पण बहुधा असं नसावं, असं मानायला जागा आहे. (आदित्य ह्यावर टिप्पणी करू शकेल.)
अजून एक-
एखादं भिन्नलिंगी जोडपं जेवढ्या सहजतेनं स्वीकारलं जातं, तितक्याच सहजतेने आपण समलिंगी जोडपी स्वीकारू शकू का?
म्हणजे आपल्या घरी एखाद्या पार्टीला आलेल्यांची ओळख -" हा क्ष आणि हा ज्ञ. ह्यांचं नुकतंच लग्न झालंय." अशी सहजतेने आपण करून देऊ शकू का?

सामाजिकदृष्ट्या समलि़ंगी लोकांना स्वीकारणं तिथपर्यंत पोचल्याशिवाय होणार नाही असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वृत्तांत आवडला. LGBT बंधुभगिनींच्या प्रश्नांबद्दल मला जिव्हाळा वाटतो. त्यांच्या प्रश्नांना सोडविण्याचे लोण प्रगत देशातून आपल्यासारख्या संक्रमणशील समाजात येऊन पोचले असले तरी बराच पल्ला गाठायचा आहे याची पुन्हा एकदा जाणीव झाली.

अवांतर : माझ्या मनात आलेला एक गमतीदार विचार. आज जी गे प्राईड परेड दक्षिण मुंबईतच होते ती माझ्या ठाणे डोंबिवलीसारख्या परिसरात कधी होईल ? कारण तिथे कदाचित त्याबद्दलचा सजगपणा वाढवण्याची गरज दक्षिण मुंबईपेक्षा जास्त आहे. कदाचित काही दशके जावी लागतील. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

याची कारणे प्रशासनिक असावीत असा कयास.
कोणताही मोर्चा/फेरी साधारणतः आझाद मैदानातून निघावा व पुन्हा तिथेच सांगता व्हावी अशी अपेक्षा पोलिस दलाकडून केली जाते. (अर्थातच हे कम्प्लसरी नाही, पण तसे केल्यास परवानगी लगेच मिळते)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खेरीज, दक्षिण मुंबईत* केलेल्या कार्यक्रमास माध्यमांतून अधिक प्रसिद्धी मिळते, असे दिसून येते.

* ह्या विभागाला SoBo असे म्हणायची प्रथा आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेघना आणि मस्त कलंदर यांचं खरंच कौतुक वाटतं. मुक्तपणे व्यक्त होणार्या लोकांच्या या मेळाव्यात सामील होणे एक खरोखर नवे अंतर्भान देणारा अनुभव असला पाहिजे. धाग्यावरचे काही प्रतिसाद विचित्र आहेत (चालायचंच) आणि चर्चा उद्बोधक. माझ्याकडून धाग्याला ५ तारका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रतिसादाच्या निमित्ताने एक प्रश्न मनात आला. काहीजणांना तरी तो रोचक वाटावा.

या परेडमधे भाग घेण्याच्या पूर्ण प्रोसेसमधे आपण त्यातले नाही आणि फक्त तात्विक पाठिंब्यासाठी आलो आहोत असं आवर्जून कोणीही कोणाला सांगत नसल्याचा उल्लेख मकताईने अन्यत्र केला आहे. असं असेल तर समजा यांनाही (म्हणजे असे केवळ पाठिंब्याला गेलेल्या मुलगे किंवा मुलींना) आपल्यातले समजून कोणी त्या अर्थाने प्रपोज केले अथवा संपर्क करण्याचे प्रयत्न केले तर ते कितपत सहजपणे घेता येईल ?

L G इत्यादि मित्रांमधेही प्रपोजल करुन नकार आल्यास स्वच्छपणे दूर होणे इथपासून मागे लागणे, पुन्हापुन्हा विचारणे, दु:खी होऊन गिल्ट देणे अशी जनरल ह्युमन स्वभावाची रेंज असणार हे गृहीत धरुन उदा. प्रपोज करुन गळ्यात पडू पाहणार्‍या कॉलेजवयीन मुलग्यापेक्षा तसं करणार्‍या मुलगीला नकार देऊन दूर ठेवणं जास्त विचलित करणारं ठरेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रश्नांना तुम्ही जेनेरिक उत्तर शोधताय का? तसे उत्तर नसावे.
हे अगदीच व्यक्तीसापेक्ष आहे.

मी सहभागी झालो असतो आणि मला कोणी मुलग्याने प्रपोज केले असते (पहिल्या भेटीत प्रपोज हे कोणत्याही दोन व्यक्तींत जरा जास्तच झाले, पण समजा) तर मी माझे ओरिएंटेशन स्पष्ट करून सांगितले असते. धक्का वगैरे बसला नसता किंवा त्याने तसे विचारण्यात गैरही वाटले नसते.

प्रपोज ऐवजी कॉफीपानाला येतोस का? किंवा डिनरला येतोस का? विचारले असते आणि खर्च तो करणार असता + मला वेळ असता + मूड असता तर न जाणो गेलोही असतो Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काहीही फरक नसतो. दोन्हीही प्रकार तितकेच दु:खदायक ठरतात. विशेष करून मैत्री राखण्यात आणि प्रस्तावकाला होता होईतो न दुखावण्यात रस असेल तर. (होय, वैयक्तिक माहिती आहे. पण मला दोन्ही बाबींचा अनुभव आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आपल्यातले समजून कोणी त्या अर्थाने प्रपोज केले अथवा संपर्क करण्याचे प्रयत्न केले तर ते कितपत सहजपणे घेता येईल ?

गवि, मी अनेक 'हेटरो' मेळावे व संमेलने अटेंड केली आहेत. मला 'आपल्यातला' समजून एकाही मुलीने प्रपोज किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला नाही. थोडक्यात, असं व्हायची शक्यता नगण्य वाटते. समजून घ्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला हा प्रतिसाद कळला नाही. आपल्याला व्यनि करते आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

कालच्यापेक्षा आज या धाग्यावर बरं वाटतं आहे.

माझ्यापुरतं सांगायचं तर मला अशा परेड्स बद्दल कुतूहल होतं पण माझ्या आळशी स्वभावाला अनुसरून एवढ्या दूर गेलेही नसते. परंतु नुकतंच अशा विषयाशी संबंधित नाटक पाहिलं आणि आदित्यसोबत चर्चा सुरू झाली अन् जायचं नक्की झालं. आदित्यबद्दल एका कलीगला पूर्वी जेव्हा सांगितलं तेव्हा तिचे,"बाई गं, असं कसं झालं इतक्या चांगल्या मुलाचं? डॉक्टरला दाखवलं की नाही त्याने?" अशी प्रतिक्रिया दिली होती. अर्थातच यावर मी आणि आदित्यने भरपूर हसून घेतलं होतं. यावेळेस माझ्या दुसर्‍या एका कलीगला मी अशा नाटकाला गेले होते असं सांगितलं, तेव्हा तिने तिच्या ग्रुपमध्येही अशी चर्चा झाल्याचं सांगितलं. पण मग त्यांच्या एल्जीबीटीक्यू या गोष्टींबद्दल संभ्रम होते. "गे लोकांना मुल्ं होतात का?" ही पण त्यांना शंका होती. आमच्या या सगळ्याबद्दल छान गप्पा झाल्या. नंतर मी तिला प्राईड परेडला जाऊन आल्याचं सांगितलं तेव्हाही तिची काही प्रतिक्रिया काही वाईट नव्हती. म्हणजे काही लोक इग्नरंट असले तरी डिनायल मोडमध्ये असतातच असं नाही. पण घडा पालथा असेल किती पाणी वाया जाऊपर्यंत संयम राखायचा हेही आहेच.

आदित्यने त्याच्या लैंगिकतेबद्दल सांगण्याच्या आधी आणि नंतरही मला त्याच्याबद्दल काय वाटतं यात बदल झाला नाही. उलट आता आदर दुणावला आहे.

समलैंगिक असणं हे वेगळं आहे असं माझं मत नाही. जगात बरंच काही वेगवेगळं असतं आणि तसंच हे असं माझं वैयक्तिक मत आहे. माझी एक जवळची व्यक्ती क्लोजेटेड आहे. मला अपघाताने कळाल्याची त्या व्यक्तीला कल्पना असावी असं मला वाटतं. पण हे सगळं कुणाला कळू न देण्याची धडपड, त्यातून होणारी मानसिक कुचंबणा मला पाहावत नाही. त्या व्यक्तीच्या एकटं राहाण्याची विनाकारण चर्चा होते, उगाचच कुणाशी नांव जोडलं जातं आणि जिच्याशी नांव जोडलं जातं त्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून आटापिटा केला जातो हे ही मी पाहाते. फक्त सर्वसामान्यांसारखं लग्न करून मूल कसं सतत कार्टून पाहात नाही सारख्या तक्रारी केल्या जात नाहीत म्हणून ती व्यक्ती चर्चेचं कारण बनते. मी धनंजयचे लेख वाचायला देणं, किंवा जवळच्या लोकांना लैंगिकतेमुळे फरक पडणार नाही असं आडून-आडून सुचवणं हे प्रकार केले आहेत. मैत्रीखातर आणि काळजीपोटी, दोन्हीही, त्या व्यक्तीने कम आऊट केलं तर तिला होणारा मानसिक त्रास कमी असेल असं मला वाटतं. थोडक्यात, कुणाच्या समलिंगी किंवा भिन्नलिंगी असल्याने मला फरक पडत नाही.

जर मला तिथे पाहून कुणी प्रपोज केलं तर मला काही वाटणार नाही. समजाऊन सांगण्याचा प्रयत्न करेन. होकार मिळेपर्यंत रात्रंदिन कुणाच्या घरासमोर उभं राहाणं वगैरे प्रकार फक्त सिनेमांमध्ये घडतात अशी माझी समजूत आहे. जर कुणी सतत स्टॉक करू लागलं तर आपले चहा-कॉफीचे कप वेगळे आहेत आणि मीच कुणी एकमेव नाही, माझ्यापेक्षा खूप बरे लोक तुला भेटतील असं सांगेन. (प्रत्यक्ष आयुष्यात लोकांनी माझं असलं म्हणणं ऐकलंय आणि आमच्या मैत्र्याही तुटलेल्या नाहीत. त्यामुळे हा tried & tested उपाय आहे)

काही लोकांचे विचार वाचून आणि ऐकून मला वाटतं की आजच्या जमान्यात जर कुणी खजुराहोची शिल्पं कोरली असती आणि तीही मंदिरांवर, तर काय गदारोळ झाला असता!! ती शिल्पं केव्हाच फोडली गेली असती याची मात्र खात्री आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

धन्यवाद वृतांत आवडला.
मकी, मेघना आणि आदीत्य ह्यांना लै लै लौ!!!

गेमाडपंथ्यांचा विजय होवो!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समलिंगी संबंध हा जेनेटिक (किंवा) कोणताही दोष आहे असं मानणारे, आणि तो तसा नाही हे मानणारे यात कायम वरील काही प्रकारचे वादविवाद होत आलेले आहेत. मूळ गृहितकामधेच मतभिन्नता असेल तर मला वाटतं की "Let's agree to disagree" नुसार तेच तेच वाद घालणं थांबायला हवं.

बाकी धागा आणि इतर चर्चा अतिशय आवडल्या! मकी, मेघना आणि आदित्यचं कौतुक! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ गृहितकामधेच मतभिन्नता असेल तर मला वाटतं की "Let's agree to disagree" नुसार तेच तेच वाद घालणं थांबायला हवं.

याबद्दल एक तत्त्व म्हणून वाद नाहीच.

मात्र शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेल्या गोष्टी केवळ आपल्या धारणेविरूद्ध आहेत, म्हणून वाद घालणार्‍यांना पाहून 'You are entitled to your own opinion, but you are not entitled to your own facts.' हे वाक्य आठवतं.

१. आता 'तुमचे ते फॅक्ट्स, आमची ती ओपिनियन्स' अशा प्रतिवादाची वाट पाहतो आहे.

२. ही अशी ग्यानबाची मेख मारून ठेवण्याचं प्रमाण अलीकडे बर्‍याच प्रमाणात दिसतं आहे. (उदा. 'शंभरातल्या पाच हजार जणांना माझं म्हणणं पटणार नाही, तरीही....' किंवा 'येऊ द्या निगेटिव्ह श्रेण्या' किंवा 'आता हीच गोष्ट प्रतिगाम्यांना/स्युडोप्रतिगाम्यांना/पुरोगाम्यांना/स्युडोपुरोगाम्यांना तुम्ही का सांगत नाही म्हणून स्युडोपुरोगामी/पुरोगामी/प्रतिगामी/स्युडोप्रतिगामी लोक धावत येतील. पहा गंमत!' या छापाचे निष्कारणहौतात्म्य).

खुंटी हलवून बळकट करण्याचे हे प्रोव्हर्बियल जालविवादी टेक्निक असावे :)

३. क्रमांक १ आणि क्रमांक २ हे उद्मेखून-सर्क्युलर-लॉजिक सदरात मोडावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बर हे याचे आद्य ग्यानबा आहेत.. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेल्या गोष्टी केवळ आपल्या धारणेविरूद्ध१ आहेत,

शास्त्रीय दृष्ट्या काय काय सिद्ध झाले आहे?

समलैंगिक असणे हा मानसिक रोग नाही इतकेच सिद्ध झाले आहे. आमचा संवाद मानसिक रोगी नसलेल्या लोकांशी चालू आहे. त्यापुढच्या मुद्द्यांवर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'आता हीच गोष्ट प्रतिगाम्यांना/स्युडोप्रतिगाम्यांना/पुरोगाम्यांना/स्युडोपुरोगाम्यांना तुम्ही का सांगत नाही म्हणून स्युडोपुरोगामी/पुरोगामी/प्रतिगामी/स्युडोप्रतिगामी लोक धावत येतील. पहा गंमत!

बाकी काही म्हणा, पण पहिले चार ग्रूप आणि नंतरचे चार ग्रूप यांचं परस्पर ऑर्डरिंग कसं आहे ते चेकवलं ते परफेक्ट आहे. नैतर इतके मोठे ग्रूप असले तर तो विवेक रहात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाने