विविध प्रतले
मनात काही प्रश्न उद्भवले, मोठे अन चर्चात्मक शक्यता (पोटेन्शिअल) असल्याने वेगळ्या धाग्यात देत आहे. व्यक्तीस ऑब्जेक्टीफाय(वस्तूकरण) कसे करता येत नाही याबद्दल हे विचार मनात आलेले आहेत.
___
एखादा स्वेटर, पेंटींग, पुस्तक, भाषण, स्तोत्र अन व्यक्ती यांच्यात दर्जात्मक फरक काय असतो? ही सारी चिन्हेच नाहीत का? चिन्हे का म्हणते आहे ते विषद करते. या सर्व एनटिटीज कशाकडे तरी निर्देश करतात अन तसा निर्देश जोवर होत नाही तोवर त्या अर्थहीन असतात. पण निर्देश करताच त्यांना अर्थ प्राप्त होतो.
____
उदा - सुंदर साखळीचे नक्षीकाम असलेला स्वेटर याला अर्थ काय आहे जोवर मी तो स्नगली अंगावर चढवत नाही? तसे पाहीले तर काहीच नाही. म्हणजे स्वेटर जोवर "शारीरीक" प्रतलावर माझ्याशी संवाद साधत नाही तोवर त्याला अर्थ नसतो.
.
तसेच एखाद्या पेंटींगला अध्याहृत अर्थ काय असतो जोपर्यंत ते पेंटींग आपल्या मनात कुतूहल चाळवत नाही? सौंदर्यासक्ती, आनंद,भय, घृणा चाळवत नाही तोवर ते अर्थहीनच नसते काय? म्हणजे पेंटींग माझ्याशी "मानसिक" पातळीवर बोलते, कार्यरत होते.
.
याउलट एखादे पुस्तक अथवा भाषण हे "बौद्धिक" पातळीवर काम करते, यात स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता भासत नाही. पण फक्त बौद्धिकच नाही तर "आत्मिक" प्रतलावरही संवाद साधू शकते. उदा - auric बदलही ते घडवू शकते. एखाद्या पाषाणहृदयात, करुणेचा झरा फोडणे, वैफल्यग्रस्त जीवास पुस्तक वाचून विसावा मिळणे हे auric बदलच आहेत. अर्थात "आत्मिक" पातळीवरचे बदल आहेत. पण परत पुस्तक व भाषण ही चिन्हेच आहेत.
.
आता एखादे स्तोत्र घ्या. स्तोत्र हे "अधि-आत्मिक" पातळीवर कार्यरत होते. म्हणजे उच्च्तर पातळी.
पण मग व्यक्ती तर या सर्व प्रतलांवर संवाद साधू शकते. म्हणजे व्यक्ती ही सर्वोत्तम चिन्ह आहे. शारीरीक् (रेसेप्शनिस्ट्/डॉक्टर्/बॅन्कर)/मानसिक्(नात्यातील व्यक्ती)/बौद्धिक्(शिक्षक, मित्र)/आत्मिक्(प्रभावशाली व्यक्ती)/अध्यात्मिक(आपण जिच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती). ....... यातील प्रेम हे अध्यात्मिक पातळीवर काम करते म्हणजे नक्की काय होते ते नीट मलाही कळले नाही आहे. पण इन्टुइटीव्हली तसे वाटते.
मग व्यक्ती ही स्तोत्राएवढीच शक्तीशाली (पॉवरफुल) असते का? की जास्त असते? इन्ट्युइटिव्हली तर असे वाटते की स्तोत्राहून व्यक्ती श्रेष्ठच असावी.
मग ती कशी?
.
की अध्यात्मिक पातळीच्या पलिकडेही एखादे प्रतल आहे? अन मग विचार येतो - ते प्रतल म्हणजेच "सत-चित-आनंद" प्रतल का? अन जिथे स्तोत्रदेखील पोचण्यास विफल ठरते तिथे व्यक्ती पोचू शकते का? अन त्या व्यक्तीलाच "गुरु" म्हणतात का?
1. अन्नमय, 2. प्राणमय, 3.
1. अन्नमय, 2. प्राणमय, 3. मनोमय, 4. विज्ञानमय और 5. आनंदमय कोष यांच्या संदर्भात कोणती कलाकृती (इथे व्यक्तीलादेखील एक कलाकृती मानलेले आहे) कुठवर पोचू शकते त्याचा केलेला विचार आहे हा.
http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B7
फारसं कळलेलं नाही. पण वाचून
फारसं कळलेलं नाही. पण वाचून काय वाटलं ते लिहीते.
शारिरिक प्रतलावर जाणवणार्^या गोष्टी म्हणजे स्वेटर : मला सुती कापड रुचते एखाद्याला रेशमी कापडाचाच स्पर्श आवडेल.
मानसिक पातळीवर जाणवणारे पेंटींगः एखादा रंग मला सुंदर वाटत असेल तर किंवा त्या रंगाशी जोडणार्या सुखद /दु:खद आठवणी असतील तर ते खुप आपडेल किंवा अजिबात आवडणार नाही.
माझी बौद्धिक पातळी नसेल तर पुस्तक मला कळणारच नाही.
स्तोत्र हे स्वरांच्या आधारे संवाद साधते की शब्दांच्या ते मला समजत नाही, मी नंतर शिकलेल्या अथर्वशीर्षापेक्षा लहानपणी शिकलेली रामरक्षा आवडते त्याहूनही आजी पहाटे गुणगुणत असायची ती "उठी बा गोपाळजी जाई धेनुकडे " ही भूपाळी किंवा शिवलीलामृतातले "कैलासराणा शिवचंद्रमौळी" जास्त आवडते.
सगळ्या गोष्टींच्या अनुभूतीची तीव्रता / आवडनिवड माझ्यावरच अवलंबून असेल तर ....
मी मला सुधारत जाणे हेच ईष्ट नाही का? म्हणजेच मी माझाच गुरु बनणे का?
समजा माझ्याकडे एकूण क्ष विचार
समजा माझ्याकडे एकूण क्ष विचार आहेत. त्यातले य मला संपूर्ण समोरच्याकडे पोचवायचे आहेत. मग माझे बोलणे, लिहिणे, देहभाषा, कृती, वर्तने इ इ त्यातले मी झ इतके पुढे पोचवतो. उरले य-झ. अपेक्षा अशी आहे कि आयुष्यभर भाषा शिकण्याचे कष्ट घेतल्याने, बरेच संकेत प्रस्थापित केल्याने, शिवाय मनुष्यांकडे असणार्या विचारांत चिक्कार कॉमनॅलिटी असल्याने य-झ कमित कमी असायला पाहिजे. तसे न होता य-झ जास्त असते. शिवाय अपेक्षित नसलेला नॉइझ न देखिल खूप पोचतो.
विचारांना इथे नंबर दिलेले
विचारांना इथे नंबर दिलेले दिसतात. मनात इतके आले आणि त्यातले इतके (टक्के, भाग इ) पोचवले असे विचारांबाबत पटत नाही.
विचार हा स्वतःच एक अॅब्स्ट्रॅक्ट मामला आहे. तुम्ही एक मुद्दा = एक विचार असं सुलभीकरण केलं आहे.
अर्थात यात वादाचा काही मुद्दा नाही, फक्त निरीक्षण नोंदवले.
विचाराला पूर्णत्व नाही आणि
विचाराला पूर्णत्व नाही आणि त्याचं एकक नाही. विचार मूळ किती होता आणि दुसर्याला किती युनिट्स पोहोचला याची कोणतीही टेस्ट नाही. फक्त बायनरी हो किंवा नाही असे तपासता येते. त्यात मुद्दे पाडल्यास दोन पोचले, तीन पोचली नाहीत असं करता येतं. पण मुद्दे हे विचार नसतात. मुद्दे इज नॉट व्हॉट यू फील ऑर हाउ यू फील. शेवटी भाषेच्या रुपात बाहेर आलेले असतात ते केवळ आणि केवळ स्वभाषांतरित मुद्दे. विचार कधीच सांगता किंवा पोचवता येणार नाहीत.
ट्रॅप्ड इन बॉडी, ट्रॅप्ड इन सोल..!! :)
मान्य आहे. विचारही पूर्णपणे
मान्य आहे. विचारही पूर्णपणे समोरच्याला कळला असं होऊ शकतं. पण पार्शली कळला किंवा तिनातले दोन कळले असे अनेकवचनात मांडता येत नाही इतकाच मुद्दा माझा आहे. तपशिलातला मुद्दा आहे फक्त.
आणि समोरच्याला पूर्ण कळला असं व्यवहारात मानण्याचे आडाखे असतात. पण यू नेव्हर अॅक्च्युअली नो. या धागाकर्त्याच्या मनात काहीतरी विचार आले आहेत आणि ती त्या सोलच्या ट्रॅपच्या भिंतीवर धडका देते आहे. इतकं कळलं तरी आपण खूप समजलो असं म्हणता येईल.
प्वाइंट टेकन- सम फर्दर निटपिकिंग.
नसेना का. अजोंचा मुद्दा इतकाच आहे, की तिनातले २ कळाले वगैरे जर मान्य केलं तरी जी डिझायर्ड - कम्युनिकेटेड मधली ग्याप राहतेय ती काहींबाबतीत कमी तर काहींबाबतीत जास्त असते.
अवांतर: त्यांनी विचार हे काउंटेबली इन्फिनिट तर तुम्ही अनकाउंटेबली इन्फिनिट असतात असे गृहीत धरल्यासारखे वाटतेय.
अपेक्षित प्रतिसाद. काउंटेबल
अपेक्षित प्रतिसाद.
काउंटेबल या शब्दाचा अर्थ 'मोजून संपणारे' अर्थात 'फायनाईट' असा नाही, तर 'डिस्क्रीट' असा आहे. डिक्शनरी मीनिंगवर जाऊ नका. या गणितातल्या वेलनोन संज्ञा आहेत.
म्हणजे [१,२,३,४,......] या सेटमध्ये इन्फायनाईट आकडे आहेत तरी यांच्यातला लीस्ट नॉनझीरो ग्याप साईझ ठरलेला आहे. दोन इंटिजरमध्ये लीस्ट नॉनझीरो डिफरन्स आहे १. (मायनसमध्ये जात नाही- मॉड्युलस पहा फक्त.)
तर (०, ...] हा सेट पहा. यात ०.००१ हाही आकडा आहे आणि ०.०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००१ हाही आकडा आहे. असे अजून अनेक आकडे आहेत. यातला लहानात लहान आकडा कुठला आहे हेच सांगता येत नाही. त्यामुळे दोन्ही सेटमध्ये इन्फायनाईट पहिल्या सेटपेक्षा दुसर्या सेटमध्ये अजून अनेक जास्त आकडे आहेत.
गणितात यांपैकी पहिल्या प्रकारच्या इन्फिनिटीला काउंटेबल तर दुसर्या प्रकारच्या इन्फिनिटीला अनकाउंटेबल इन्फिनिटी असे म्हणतात. काउंटेबल या शब्दाचा डिक्षनरी अर्थ पाहिलात तर त्यातच अडकून बसायला होईल. तसं होऊ नये म्हणून हे विवेचन.
बाकी, अनकाउंटेबल इन्फिनिट्याही अनेक साईझेसमध्ये असतात.
अधिक माहितीकरिता खालील लिंक पहावी. त्यात वरील संकल्पना उत्तमरीत्या विशद करून सांगितलेली आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Countable_set
थोडक्यात, इन्फिनिटी ऊर्फ अनंत हेही एकच एक नसून त्यांतही साईझेस वेगवेगळे असतात.
आपण विचार ट्रान्समिट करु शकत
आपण विचार ट्रान्समिट करु शकत नाही. आपण अनेक मार्गांनी (मुख्य मार्ग शब्द) असे काही संकेत, पॉईंटर्स सोडतो की ज्यांना ऐकून आपल्या मनाची विचारांनी जी अवस्था झाली आहे ती अवस्था त्या समोरच्या व्यक्तीकडेही प्रकटावी. जर बरोबर दगड लागला तर पूर्ण विचार जसा आहे तसा पोचला असं म्हणता येईलच. पण त्यासाठी दगड किंवा टार्गेट यापैकी एक अथवा दोन्ही ढोबळ असले पाहिजेत.
आता ढोबळ म्हणजे काय हेही माझ्या मनात हे आहे ते मला तुम्हाला सांगता येत नाहीये.
तुम्ही डिल्वर्थचं "करेज" द कॉवर्डली डॉग ऊर्फ शेरदिल पाहता का?
तो त्याच्या मनातले बरेच विचार सांगण्यासाठी भरपूर धडपड करतो. सैतान, दुष्ट भूत यांविषयी ते असतात. मनापासून वॉर्निंगरुपात ते पोचवण्याची शेरदिलची निकड असते. तो कळवळून अंगाचे बरेच आकारउकार करुन दाखवतो. म्युरिएल त्याला प्रेमाने जवळ घेऊन त्याच्या डोक्यावर हात फिरवते, आणि ह्यूस्टस त्याच्याकडे बघून नासमझ डॉगी..असं हिणवत लाथ घालतो.
आपल्याला भाषा येते, पण विचार हा प्रकार क्लिष्ट असतो. तो कन्व्हे करण्याबाबत आपला शेरदिल होतो. कारण विचाराला भाषा नसते. तो भाषेत येत नाही. तो असतो, आणि स्वतःशीच स्वतःला समजून घेण्याची गरज पडणार नाही असा थेट असतो.
अशी कोणतीही गोष्ट् जी "अनुभव"
अशी कोणतीही गोष्ट् जी "अनुभव" आहे जशीच्या तशी पुनर्नीमीत करता येत नाही (विज्ञानालासुधा). कारण अनुभवाचा अनुभव हा एक वेगळा अनुभव ठरतो आणी ते मुळ अनुभव नश्ट केल्या खेरीज अनुभव बनु शकत नाही. जसे स्मृती ची स्मृती ही पुन्हा एक नवीन स्मृती बनते मुळ स्मृतीला ती धक्का पोचवत नाही...
....खरे तर बोअर होतं या विषयांवरच बोलायलाच... कारण यावर आत्मचिंतन इतक झालय की पटापट हजारो रेफरंन्स माझ्या माइंड प्यालेस मधे इतके झटकन तरळुन जातात व जाता जाता आपोआप निष्कर्शही हाती सोडुन जातात.. ते असे काही असतात की बोलणेच खुंटते कधी स्वतःशी तर कधी इतरांशी कारण आपला माइंड प्यालेस ओपन करुन त्यातले रिजनींग एक्सप्लेन करायला... ही जागा आणी माध्यम पुरेसे ताकतवान नाही.
बघा कुठं नेउन ठेवला मी प्रतिसाद माझा
अशी कोणतीही गोष्ट् जी "अनुभव"
अशी कोणतीही गोष्ट् जी "अनुभव" आहे जशीच्या तशी पुनर्नीमीत करता येत नाही (विज्ञानालासुधा).
पुनर्निर्माणासाठी भौतिक स्वरुप १००% माहित असणे गरजेचे आहे जे आज विज्ञानाला माहित नाही. पण "आज नाही" म्हणजे हे असंभव आहे असे होत नाही. डिजिटली स्टोअर्ड साउंड आणि खरा आवाज यात साठवून ठेवायच्या आज फार कमी मिती उरल्या आहेत.
अनुभव काय आहे ? फक्त पॅटर्न ट्रेसिंगमधुन भावना निर्मीती.
IMHO, जसे आपण ६० वर्शे जगत नाही एकच वर्ष साठ वेळा जगतो, अथवा समजा एकच गाणे १० वेळा ऐकले तरी त्या अनुभवात (नकळत), १० किमान वेळा वेरीएशन येते कारण अनुभव फक्त एकदाच असतो उरलेल्या ९ वेळा आपण आधीच्या अनुभवाशी आत्ताच्या अनुभवाचा पॅटर्नही मॅच करायचा प्रयत्न करतो आणी एक काहीसा नवीन अनुभव आपोआप तयार करुन बसतो आणी विवीध भावना निर्मीतीचा अनुभव घेतो.
संपुर्ण अनुभव हा जसाच्या तसा फक्त एकदाच येतो (ज्याला नवीन पॅटर्न समजावुन घेणे म्हणूया.) नेक्स्ट टाइअम आपण तो पॅटर्न मॅच करणे अथवा जास्त व्यवस्थीत ओळखायचा प्रयत्न करणे हे कार्यही (सबकाँशस लेवलवर) करतोच म्हणूनच मुळ अनुभव कधीच निर्माण होत नाही. एखादा पॅटर्न नवीन सापडला तर आपल्याला आनंद होतो व तो नक्कि तसाच आहे का हे ट्रेस करण्यात आपल्याला मनोरंजन मिळु शकते, उत्साह येतो पण एकदा पॅटर्न ट्रेस करुन व्यवस्थीत ओळखीचा झाला की आपण त्याला आय्कॉनीफाय करतो (उदा. त वरुन ताकभात ओळखणे) व नंतर कंटाळु लागतो, म्हणूनच एखादे गाणे प्रथम ऐकताना जसे आवड्ते नावडते तसेच त्याच्या इटरेशन मधे वाटेलच असे नाही आणी ईटरेशन बरेच झाले तर गाण्याचा वैताग येउ लागतो... अशा स्थितीत आपण अनुभवाच्या पुनर्निर्माणासाठीचे भौतिक स्वरुप पुन्हा रिअॅरेंज केलेत तर मुळ अनुभव हा नश्ट असणे हा एकमेव क्रायटेरीआ उरतो म्हणुन आपण तो अनुभव काही प्रगत तंत्रज्ञानाने जसाच्या तसा निर्माण करालही परंतु तो मिळताना जसाच्या तसा मिळणार नाही अथवा तो प्रथमानुभवच असेल.
अॅज अ ह्युमन बिइंग आवर माइंड इज ट्रेन फॉर नथिंग बट पॅट्र्न ट्रेसिंग.
मी म्हटले if ABCDEF then A*CDEF what is value of * ? आपण पॅटर्न ट्रेस केला अन उत्तर दिले B हा पॅट्र्न ट्रेस करतानाची प्रोसेस हा एक नवीन अनुभव आहे म्हणून हाच प्रश्न १० वेळा दिला तर हा प्रोसेस पॅट्र्न मनात जास्त ठळक ब्सतो व सर्व प्रथम वर येतो मग प्रश्न दुसरा असेल तरीही कारण आयकॉनीफाय केलेले पॅटर्न ओळखणे सोपे असते आणी ठऴ झालेले पॅटर्न उपजतच वर येतात म्हणून तिव्र भावना झाली की अन आपणास पॅटर्न ओळखणे कठीन होत असेल तर आपण चटकन अतिठळक झालेले पॅटर्न ट्राय करतो जसे आइंग, अथवा गाढवाच्या गाडीत वगैरे वगैरे :)
वस्तुकरणावर सुरु होऊन
वस्तुकरणावर सुरु होऊन गुरुकरणावर कशा काय पोहोचलात ते कळले नाही, पण वस्तुकरण ही प्रकृती नाही असे म्हणायचे असल्यास सहमत आहे.
बरीच माणसे माणसांचं वस्तुकरण करण्याऐवजी वस्तुंचे मानवीकरण करतात. उदा. गोधडी ही एक वस्तू असली तरी आजीच्या जुन्या, वापरुन मऊ झालेल्या पातळांची गोधडी प्रिय असते. ती गोधडी आजीसारखीच माया करते असे वाटते.
चित्र पाहताना ते काढताना चित्रकाराला मिळालेल्या आनंदाची, त्याच्या मनस्थितीची कल्पना करतो; पोर्ट्रेट असेल तर मॉडेलच्या चेहर्यावरचे, डोळ्यातले भाव निरखून बघतो, तिच्या मन:स्थितीचा विचार करतो; चित्रकार व तिच्या नात्याची कल्पना करतो, इत्यादी.
स्तोत्र म्हणताना त्याच्या उच्चाराने नव्हे तर अर्थाने रोमांच उभे राहतात. आपण कल्पना केलेल्या शक्तिमान देवाशी संवाद झाल्याच्या भासाने माणसे भारावून जातात.
प्रत्यक्ष माणसाकडे वस्तू म्हणून बघून त्याचा वापर करणे खूपच अवघड असते, त्यामुळे बरेच लोक रुढार्थाने यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी माणसांमध्ये एकप्रकारचा रुथलेसनेस दिसून येतो.
स्तोत्र म्हणताना त्याच्या
स्तोत्र म्हणताना त्याच्या उच्चाराने नव्हे तर अर्थाने रोमांच उभे राहतात. आपण कल्पना केलेल्या शक्तिमान देवाशी संवाद झाल्याच्या भासाने माणसे भारावून जातात.
स्तोत्र असो किंवा मंत्र..अर्थाने रोमांच काहीजणांना होत असतीलच, त्याविषयी म्हणणं नाहीच, पण बहुतांश वेळा अर्थ अजिबात माहीत नसतो किंवा अर्धवट माहीत असतो किंवा चुकीचा माहीत असतो.. पण हा मंत्र भारी आहे, अमुक इतक्या जुन्या काळातला, फार म्हटला न जाणारा, फार लोकांना माहीत नसलेला, खास मलाच गुरुने दिलेला, खास मलाच कॉम्पॅटिबल असलेला, त्यात पॉझिटिव्ह एनर्जी आहे, वेव्ह्ज आहेत, त्याने छातीत कंपने निर्माण होतात, किंवा यासम काहीतरी पसरलेल्या महतीने मंत्र किंवा स्तोत्र रोमांचक वाटते.
परत परत वाचल्यावरचे
परत परत वाचल्यावरचे विचार....
स्वेटर हा स्वेटर असतो. पण तो सुंदर विणलेला असेल आणि आपल्या आवडत्या वगैरे कोणी विणला असेल तर तो स्वेटर काहीतरी विशेष कम्युनिकेट करतो. [तो अंगाला कसा बसतो हे कदाचित गौण असते]. म्हणून त्याला स्वेटरपेक्षा काहीतरी विशेष अर्थ प्राप्त होतो.
तसेच पेंटिंग आणि रंगाचे धब्बे मारलेला कागद यात फरक पडत असावा.
याहून जास्त कै डोक्यात शिरलं नाही.
मग व्यक्ती ही स्तोत्राएवढीच
मग व्यक्ती ही स्तोत्राएवढीच शक्तीशाली (पॉवरफुल) असते का? की जास्त असते? इन्ट्युइटिव्हली तर असे वाटते की स्तोत्राहून व्यक्ती श्रेष्ठच असावी.
मग ती कशी?
या लेखात स्तोत्र ऐवजी ईश्वर शब्द टाकला तर थोडा विचार करता येतो. कोणत्या गोष्टीला आपण कोणत्या प्रतलावर घेतो हे आणि मधली माध्यमे यांत घोळ नको व्हायला.
---------
अॅनि वे, प्रत्येक माणसाच्या मनात प्रत्येक प्रकारच्या संकल्पनांचं एक रॅकिंग असतं. त्यात कोणता मॉस्लोचा पिरॅमिड पाहता येत नाही. परंतु उच्चतम भावना जिथे पावित्र्य, मांगल्य, शुद्धता, प्रेम, आदर, इ इ आहे तिथे सृजित होतात. या भावना, आपल्या वर्तनाने, एखाद्याच्या मनात, वस्तू, ईश्वर, इ इ पेक्षा, व्यक्ति अधिक परिणामकारकपणे उत्पन्न करू शकते. म्हणून कदाचित तुमचे इंट्यूशन बरोबर असावे.
========================
की अध्यात्मिक पातळीच्या पलिकडेही एखादे प्रतल आहे? अन मग विचार येतो - ते प्रतल म्हणजेच "सत-चित-आनंद" प्रतल का? अन जिथे स्तोत्रदेखील पोचण्यास विफल ठरते तिथे व्यक्ती पोचू शकते का? अन त्या व्यक्तीलाच "गुरु" म्हणतात का?
अध्यात्मिक मार्गाने गुरुच्या सहायाने आत्मसाक्षात्कार किंवा ईश्वरप्राप्ती होते असे म्हणणारे म्हणतात. तेव्हा बाकी प्रश्न कंफ्यूज्ड आहेत. एकच व्हॅलिड प्रश्न आहे - अध्यात्मिक पातळीच्या पलिकडे काही आहे का? पण अध्यात्मिक आणि भौतिक असे "सर्वसमावेशक" दोन गट आहेत. (ते ओवरलॅपिंग पण असतील. ) तेव्हा हा देखिल प्रश्न इनव्हॅलिड आहे.
सर्वात प्रथम गुरू वगैरे हे एक
सर्वात प्रथम गुरू वगैरे हे एक थोतांड आहे उगाच प्रतलांशी संबंध जोडू नये. जिवाच्या नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजेच तुमचे ते प्रतल वगैरे. हा प्रश्न( प्रश्न /गुंता वाटला तर) सोडवण्यासाठी दहा हजार वर्षे मागे जावं लागेल जेव्हा आपणही एक प्राणी होतो. भीमबेटकाची चित्रे पाहा. शिकाऱ्यावर रानडुकर चाल करून येतोय हे चित्र आहे. चित्रकाराने रानडुकराच्या प्रतलाचाही विचार केला आहे. भूक विरुद्ध संरक्षण ही दोन प्रतले एकाचवेळी काम करताहेत. बघा पटतंय का?
काहीही कळ्ळं नाही.
काहीही कळ्ळं नाही.