Skip to main content

श्रद्धा

तद्दन अनैतिक व भंपक पौराणिक कथा व तथाकथित आस्तिकांच्या भावना

Taxonomy upgrade extras

तद्दन अनैतिक व भंपक पौराणिक कथा व तथाकथित आस्तिकांच्या भावना
.

मंगेश सपकाळ हे अश्लील लिहितात असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या 'तशा' पोस्ट्स या सर्वांसाठी नसतात असे त्यांनी याआधी अनेकदा सांगितले आहे. पण त्यांच्यावर तो शिक्का बसतो तो बसतोच. त्यांची लिहिण्याची शैली अगदी वेगळी आहे.

माहिती हवी आहे- मदर तेरेसा यांचे संतपद

Taxonomy upgrade extras

मदर तेरेसा यांचे चमत्कार पोप यांनी 'अप्रूव्ह'केल्यामुळे आता त्यांना येत्या सप्टेंबरमध्ये 'संतपद' बहाल करण्यात येणार आहे अशी बातमी आहे.

http://www.ndtv.com/india-news/mother-teresa-to-be-made-catholic-saint-in-september-report-1256308

मला या गोष्टींच्या मेरीट्समध्ये शिरायचे नाही आहे.

आस्तिकता वि नास्तिकता

Taxonomy upgrade extras

आस्तिक्य श्रेष्ठ की नास्तिक्य? या विषयाचा आवाका खूप मोठा आहे आणि प्रचंड सखोल चर्चा होऊ शकते. च-र्चा! वाद नाही. वादाकरीता तर मग धरणीचा कागद केला, समुद्राची शाई आणि प्रत्यक्ष सरस्वती लिहावयास बसली तरी ; )......... तुमच्या लक्षात आतापावेतो २ गोष्टी आल्याच असतील - (१) विषयाचा आवाका (२) सरस्वती चा आदरपूर्वक उल्लेख केला आहे म्हणजे मी आस्तिक आहे. मला आस्तिकतेची बाजू तर घ्यायची आहे परंतु आस्तिकतेच्या काही ढोबळ, अंगभूत मर्यादा स्वीकारुन हा डायलॉग पुढे न्यायचा आहे. तसेच फक्त थिअरी हून मला उदाहरणांची चर्चा आवडेल कारण तसाच माझा पिंड आहे. उदाहरण, दाखला दिला की लवकर समजते.
.

Inception , स्वर्ग आणि अध्यात्म

Taxonomy upgrade extras

सुमारे दोन वर्षापूर्वी ख्रिस्तोफर नोलान कृत "Inception" पाहिला होता. पाहून झाल्यावर अनेक दिवस मनात घोळत राहिला . त्यातच पूर्वी भारतीय अध्यात्मावर काही पुस्तके वाचले होती . आणि अलीकडेच युट्यूब वर Spirit Science ची व्हिडिओ सिरीज पाहिली . आणि मग विचारमंथनातून काही ठोस मुद्दे हाती लागले ते असे -

१ . "परलोक" अथवा spirit world हे प्रत्यक्षात अस्तीत्वात असावे .

२. मनुष्याच्या सुप्त मन /अंतर्मना च्या सात पातळ्या असून त्यांनाच भारतीय अध्यात्मात सप्तलोक अथवा सप्तस्वर्ग म्हणत असावेत .

लोक कायदा हातात का घेतात ? हा वेगळा दृष्टीकोण आपण कसा वाचाल ?

Taxonomy upgrade extras

".....जी जनता सरकारी न्यायव्यवस्थेवर विश्र्वास ठेवत नाही ती स्वतःची न्यायव्यवस्था स्थापन करण्याचा प्रयत्न करते. त्यातून नक्षलवादी निर्माण होतात किंवा गॉडफादर मधले डॉन किंवा अंडरवर्ल्डचा दादा आणि भाई निर्माण होतात. क्वचित प्रसंगी अशा समाजातून नागपूरला ... बलात्काराच्या आरोपीला स्त्रियांनीचेचून मारले किंवा कोल्हापूरच्या वातावरण प्रदूषित करणाऱ्या फॅक्टरीची लोकांनी नासधूस केली अशा घटनाही घडतात. मात्र सरकारी यंत्रणा काम करेनाशी झाली की समाजातले कुणीतरी सरकारी व्यवस्थेला पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करतात किंवा ताबा घेतात हे नक्की.

सूर्याचे कारकत्व आणि कुंडलीतील त्याचे "स्थान" आणि महत्व!

Taxonomy upgrade extras

सूर्य कोणत्या गोष्टींचा कारक असतो? तो उच्चीचा आणि निचीचा तसेच कुंडलीतल्या स्थानानुसार आणि इतर ग्रहांच्या युतीनुसार काय फळ देतो? सूर्यांच्या राशी ज्या स्थानात आहेत त्याचे फल काय?

सूर्य कुंभ राशीत बाराव्या स्थानी असेल तर काय फळ मिळेल?
सूर्य मेष राशीत चौथ्या स्थानी राहू आणि बुधा बरोबर असेल तर काय फळ मिळते?
सूर्य वृषभ राशीत मंगळ बुधासोबत अष्टम स्थानी असेल तर काय फळ मिळते?
सूर्य मकर राशीत बुधासोबत द्वितीय स्थानी असेल तर काय फळ मिळते?

शनी महादशा- दशा की दुर्दशा? महाशंका आणि कुशंका!

Taxonomy upgrade extras

तमाम ज्योतिष जाणकार आणि प्रवीण मंडळींना मी काही प्रश्न, शंका आणि कुशंका विचारू इच्छितो. ते सगळे प्रश्न शनीच्या महादशेसंदर्भात आहेत.

१. शनीची महादशा नेहेमी दुर्दशाच करते का?

२. राशीनुसार आणि जन्मलग्नानुसार शनीच्या महादशेचे फळ कमी जास्त तीव्र किंवा कमी जास्त चांगले आणि वाईट असते का? करिअर आणि कुटुंबावर वर काय परिणाम होतो?

३. मित्र ग्रहांच्या राशींना शनी हा त्याच्या महादशेत त्रास देत नाही असे आहे का?

४. शनी महादशेत शनीची साडेसाती आली तर दुप्पट त्रास होतो का? शनी महादशेच्या दरम्यान शनीची अंतर्दशा आली तर काय होते? आणि त्यात शनीची साडेसाती सुरु असेल तर काय होते?

पिढ्यामधल्या धार्मिकतेतील बदल - कौलाचं विश्लेषण

Taxonomy upgrade extras

भारतीय समाजाची मनोवृत्ती ही कायमच धार्मिक राहिलेली आहे. निरनिराळ्या रुढी, परंपरा आजही अत्यंत प्रेमाने आणि जिव्हाळ्याने पार पाडल्या जातात. त्यात अनेक कर्मकांडांचा समावेश आहे. सण साजरे करणं, दिवाळीसारख्या उत्सवात जल्लोष करणं, गणपती बसवणं, दुर्गापूजा करणं या अनेक सामाजिक सांस्कृतिक गोष्टींना धार्मिक, पौराणिक कथांचा आधार आहे. वैयक्तिक पातळीवरदेखील बारसं, मुंज, लग्न, मरण, तेरावं, श्राद्ध यासारख्या महत्त्वाच्या प्रसंगीदेखील धार्मिक संस्कार करून त्यांचं पावित्र्य जपण्याचा प्रयत्न होतो.

हलाल पावभाजी, कांदा आले लसुण रहीत चिकन आणि कोशर वरणभात

Taxonomy upgrade extras

पर्वणी काळात साधु आणि जनतेची पापं, अंग, हात आणि पाय, काहींचे फक्त डोळे आणि बोटांनी डोक्यावर पाणी शिंपडण्यासाठी धरणात साठवलेले पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी नाशिककरांना ४० दिवस पुरेल एवढे होते. सध्याच्या अवर्षण स्थितीत पाणी येत नाही म्हणुन ओरड करणारे नाशिककर आणि सर्व भोळेभामटे आणि भाबडे पुण्यसंकलन सोहळ्याचा आनंद डुबकी मारून, नदीवर नुसताच फेरफटका मारून, आंघोळ करणार्यांना बघुन नेत्रसुख घेत, गर्दी मधे कोपराने धक्काबुक्की करत, हाथ कि सफाई दाखवत घेत आहेत.