शाळा: पर्यायी आणि पारंपारिक

ह्या धाग्याच्या निमित्त्याने माझे अनुभव. लेख छोटा करायचा प्रयत्न केलाय पण जमलेलं नाही परंतु मनने माझ्याशी बोलुन इथे लिहीलय त्याची पुनरावृत्ती टाळलीय.

काल परवा चक्क पाउस पडला. पाउस आला की मला शाळा आठवते. ते नविन दप्तर, नव्या वह्या पुस्तकांचा वास आणि हो "यावर्षी मी पहिल्या दिवसापासून अभ्यास करणार" हा पावसाळी अळंब्यांसारखा चारच दिवस टिकणारा निर्धार.

त्यावेळी शाळेत घालणं हे यावर फार खास उहापोह होत असे असं नाही. मात्र आता शाळा ठरवणॆ हे त्याआधीचे कामच जास्त किचकट झालेय. कारण शाळाचे प्रकार. खास करुन पारंपारिक आणि अपारंपारीक किंवा पर्यायी.

सकाळमधे लीला पाटील यांचे नाशकातल्या कोल्हापुरातील सृजन-आनंद बद्द्ल वाचून माहिती होते तश्या शाळा आपल्याकडे नाहीत म्हणून तो विचार नव्हत्ताच. माझी मुलीला नर्सरीत घालताना आम्हाला एका पर्यायी शाळेचा रेफरन्स मिळाला. तीन वर्षांपूर्वीच सुरू झाली होती. (म्हणजे शाळेचं वय सुद्धा माझ्या मुलीएवढंच).

आम्ही ज्या कारणांसाठी शाळा ठरवली ती कारणे..
(१) २० ते ३० मुलं आणि दोन शिक्षक एका वर्गात
(२) गृहपाठ नाही, वह्या-पुस्तकं शाळेत ठेवायची
(३) मुलांच्या आवडीला महत्व देणार. एखादं मुलं एखाद्या विषयात जास्त पुढे जाउ शकत असेल तर त्याला त्या विषयाच्या पुढच्या वर्गात बसू देणार. त्या विषयात त्याला अजून मटेरिअल उपलब्ध अरुन देणार.
(४) ठराविक मिनीटांचे बंधन असणार्‍या तासिका नाहीत
(५) शाळेत स्वीमिंग, जीम्नॅस्टीक्स वैगेरे असणार.
(६) प्रत्येक विद्यार्थ्याला कश्यात गती आहे त्याचा अभ्यास करून त्याचा चार्ट बनवणार. त्यानुसार त्या विद्यार्थ्यावर त्या विषयावर जास्त मेहनत घेणार इत्यादी
या गोष्टीं ऐकून आम्ही प्रभावित झालो. फीही अवास्तव नव्हती. ज्यांनी त्या शाळेबद्द्ल सांगीतलं त्यांचाही मुलगा त्याच शाळेत होता. फक्त शाळा इंग्लीश माध्यमाची होती ही एकच अडचण होती कारण आम्ही मुलीसाठी मराठी माध्यम ठरवलं होतं. मग एवढे फायदे सोडून माध्यमाचा हट्ट धरण्यापेक्षा तो हट्ट सोडूया असं ठरलं.

मुलगी शाळेत जाउ लागली. पहिलीपर्यंत तक्रार नव्हतीच पण नंतर काही गोष्टी खटकल्या.
(१) ती मराठी उत्तम वाचायची पण मराठीतून काही वाचायचं नाही अशी ताकीद तिला दिली गेली. तिच्या वाचनाचं कौतुक करुन ते झालं असतं तर "अपारंपारिक" या शब्दाला काही अर्थ होता.
(२) शाळा छोटी आणि वर्गात फक्त २० पर्यंत मुले यामुळे संचालकांच्या ओळखीचे बरेच जण होते आणि त्यांना पुढे केलं जायचं.
(३) स्वीमिंग, जिमनॅस्टीक या कल्पना कल्पनेतच राहिल्या. नेट क्रिकेट, आर्चरी आणि असे कुठले-कुठले वेगळेच खेळ दिले जायचे. कित्येक पालक कोच म्हणून आपला सहभागाचा हात द्यायला तयार होते पण तेही शाळॆनं नाकारलं.
(४) चौथीत शाळेनं स्कॉलरशीपला बसवलं. त्यासाठी रोजच्या आठ तासांव्यतिरिक्तचे वर्ग घ्यायचे. जो निव्व्ळ फार्स होता. याच वेळी आम्हा साताठ पालकांच्या लक्षात आलं की या मुलांना गणितात अजिबात गती नाही कारण शिकवणं व्यवस्थित नाही ,मुलांना लिखाणाची सवय नाही.
(५) ५ वी नंतर अभ्यास वाढलाय या नावाखाली मुलं आठही तास अभ्यासालाच जुंपली होती. फक्त निवडक मुलांनाच खेळायला जाता यायचं. पीटीचा तास हा बरेचदा वह्या पुर्ण करणं यासाठी वापरला जायचा. (शाळा अधिकृतपणे स्टेट बोर्डचाच अभ्यासक्रम शिकवत होती. पण ईतर बोर्ड्ची पुस्तकं वापरली जात.)
(६) शिक्षक सतत बदलत असायचे.
(७) लहान वर्ग, शाळेतच जेवण यामुळे दिवस एकसूरी होत.
(८) यामुळे मुलं घरी आल्यावर अतिशय उद्धट्पणे , चिडचिड करत असायची. आणि फक्त स्ट्रीट स्मार्ट झालीयत असं आम्हाला तरी वाटत होतं. मुलांमध्ये एकमेकांच्या घरी रहायला जाणं वैगेरे प्रकारामुळे छान मैत्री होती पण इतर शाळेतल्या मुलांप्रती एक तुच्छ्तेची भावना असायची जिला शाळेतून थोडा बढावा दिला जायचा हे नंतर नंतर लक्षात येउ लागले. ( "मुलं कुणाची --शाळेची" . अर्थात अशी भावना सगळ्यांची असते पण ह्या शाळेचा वेगळा परिसर, चौथीपर्यंत गणवेश नाही, दप्तर घरी नाही वैगेरे मुळे हे सिरियसली वाटायचं या मुलांना. त्यामुळे शालांतर्गत स्पर्धांमध्ये ही मुलं ईतर शाळांमधल्या मुलांशी बोलत नसतं. )
(९) पण लहान वर्ग, गृहपाठ नाही, आपली शाळा किती छान याचा सततचा मारा, शाळॆचं लोकेशन यामुळे मुलं शाळा सोडायला तयार नव्ह्ती.
(१०) मुलांना स्वत:ची अभ्यासाची पद्धत ठरवणॆ, स्वत:चा वेळ देणं या प्रकाराला जराही वाव नव्हता. सतत टीचर बरोबर.

पण चांगल्या गोष्टीही होत्या.
उदा.
(१) मुलांना रोजच्या बातम्या सांगायला सांगायचे.
(२) वेगवेगळ्या शब्दांची ओळख करुन द्यायचे. चौथीनंतर अश्या पाठ्येतर शब्दांची, कवितांची लिस्ट द्यायचे त्याच्या पाठांतराची वेगळी परिक्षा घ्यायचे.
(२) मुलांना परिक्षेचं वेळापत्रक दिलं जायचं नाही. आम्हालाही ते माहीत नसायचं त्यामुळे परिक्षेचा ताण असा नसायचा. ज्यादिवशी जो पेपर असेल त्याची वर्गात आधी उजळणी व्हायची. (यावर एकाने "नेमके तेच प्रश्न हे पेपर मध्ये विचारत असतील आणि पोरं लिहीत असतील मात्र रिझल्टवरून आपण समजतोय आपलं मूल हुशार म्हणून." अशी संभावना केली होती. कारण पेपर आम्हाला दाखवले जायचे नाही. तुम्ही मुलांना त्यावरुन बोलणार हे कारण दिलं जायचं. ) बरेचदा पालक सभेच्या आधी मुलांच्या मागे लागून वह्या पूर्ण करायला लावल्या जायच्या.
(३) रोज डायरी लिहीणं. पण हा प्रकार नंतर मुलांना कंटाळवाणा होउ लागला त्यावर मी एका पालक सभेत सुचवलं की सुचवलं होतं की "दररोजच्या सक्तीपेक्षा शनिवार-रविवार किंवा सुटी लिहायला सांगा. जी शब्दांची यादी देता त्यातले शब्द वापरण्यासाठी प्रोत्साहन द्या. " वैगेरे पण हे काही ऐकलं गेलं नाही. मुलांनी रोज वैतागून डायरी लिहायची आणि टीचरने ती ( चुकीच्या वाक्यरचनेलाही) बरोबरच्या खुणा करून तपासायची. एका अतिशय चांगल्या कल्पनेचं प्राणहीन नैमित्तिक कर्म करुन सोडलेलं.
(४) सरांवर झालेल्या शस्त्रक्रियेबद्द्ल शाळेत त्यांचे एक्सरे वैगेरे दाखवून अतीशय सुरेख माहिती सोप्या भाषेत मुलांना दिली या सारख्या नाविन्यपुर्ण गोष्टी असायच्या पण त्या क्वचित.
(५) तिला प्रत्येक विषया़च्या प्राथमिक कल्पना कळल्या पाहिजेत त्यातली मजा कळली पाहिजे तिला त्या "विषयात गती नाही तर पुढचा अभ्यासक्रम का लादता?" असं (गणिताच्या बाबतीत) विचारल्यावर
"नाही हो ती सगळ्यात हुशार आहे तिचा काहीच प्रॉब्लेम नाही." असं उत्तर कायम ऐकवलं जायचं.

ण तरिही तोटे जास्त आहेत आणि मुख्य म्हणजे शाळा फक्त आश्वासनावर बोळवण करतेय असं वाटायला लागलं. पाचवीपासून खेळासाठी वेळ द्यावा आणि वह्या आठवड्या - पंधरवड्यातून एकदा घरी द्याव्यात, मुलांच्या उत्तरपत्रिका मिळाव्यात यासाठी आम्ही अथक आणि शांतपणे प्रयत्न केले पण शाळेने दाद दिली नाही.

शेवटी सातवीत आम्ही काही जणानी ठरवून शाळेला रामराम ठोकला. त्यात ’जॅक ऑफ ऑल..’ असणारी माझी मुलगी होती तसंच एका खेळात राज्य पातळीवर खेळणारा मुलगा होता. त्याचे आई-वडील त्या खेळाचे कोच. त्यांची शाळेत अभ्यासही होत नाही आणि वेळेअभावी त्याला खेळालाही वेळ देता येत नाही अशी तक्रार होती. दुसरा स्क्कॉलरशीप, आयपीएम सारख्या परिक्षेत मेरिट मध्ये येणारा मुलगा होता. त्याची सगळी तयारी आईच करुन घेत होती मग शाळेत एवढा वेळ, पैसा का घालवायचा असा तिचा प्रश्न होता. या दोन्ही मुलांचे पालक त्यांची मेहनत पुर्ण वर्गाला उपलब्ध करुन द्यायला तयार होते पण शाळेने त्यांचा योग्य उपयोग करुन घेतला नाही.

सर्वांच्याबरोबर मी ही तिला आयसीएस्सी बोर्ड च्या शाळेत प्रवेश परिक्षेला नेलं. ज्या परिक्षेला काहीही अर्थ नव्हता. सातवीच्या प्रवेशासाठी दोन चार बेरजा वजाबाक्या आणि चार वाक्य लिहीण्याची परिक्षा घेउन ही मुलं आयसीएस्सी अभ्यासक्रमाला लायक आहेत का बघणं म्हणजे फार्स होता. हे बघून मी वैतागले. सरळ पारंपारिक पण चांगल्या शाळेत प्रवेश घेतला. त्यासाठी मला नेटाने प्रयत्न करावे लागले. आयसीएस्सी बोर्डांच्या शाळांत जे गेले त्यांच्यासाठी पायघड्या घातलेल्या होत्या.

या शाळेत मुलगी रमली. सातवीत म्हणजे बारा वर्षाच्या अडनिड्या वयात शाळा बदलण्याच्या निर्णयाबद्द्ल मी थोडी साशंक होतेच. सुरुवातीला ओळखी होताना तिला जड गेलं पण आता ती रुळलीय. शाळेतला फरक सांगणारी तिची काही वाक्य.
(१) तिथे कसं सारखं टीचर लक्ष ठेवून असायच्या. तेच तेच शाळेतलं जेवणं. इथे प्रत्येकाच्या डब्यात वेगळं वेगळं असतं त्यामुळे मजा येते आणि रिसेसमध्ये कोणी टीचर नसते वर्गात, वॉव?
(२) ईथे मुलं परिक्षेला एवढं का घाबरतात? शिकवलेलं नाही लिहीत गाईड मधलं पाठ करून लिहीतात.
(३) इकडे कॉम्प्रीहेन्शन आणि अल्जिब्रा काय पाठ करतात?
या शाळेत जरा जास्तच शिस्त आहे ना ? असं एकदा मी म्हटलं तेव्हा ती म्हणाली "अशीच पाहीजे गं शाळा. तेवढ्याला तेवढी शिस्त पाळली की बाकी मज्जा."

शाळा का बदलली?
(१) वर्गातील वीस ते तीस (ती सहावीत असताना तिच्या वर्गात ३७ मुलं होती शिक्षिका एक.) संपुर्ण शाळॆत काहीशे मुलं या वातावरणातून मुलगी ११वीत वर्गातच १०० - २०० मुलं या प्रकाराला कसं काय सामोरं जाईल असं वाटलं.
(२) लहान पणी एकवेळ ठिक आहे पण ११ /१२व्या वर्षींही मुलांना स्वत:चा असा वेळ मिळू नये हे मला चुकीचं वाटलं. तिला ना स्वत:चा अभ्यास कसा करायचा ते ठरवायचं स्वातंत्र्य की ड्बा न खायचं स्वातंत्र्य. सकाळी बसमध्ये बसल्यापासून संध्याकाळपर्यंत सतत टीचरच्या नजरेखाली. दुपारी जेवायच्या वेळेला रांगेत आपापली ताटं घेउन जेवायचं ती धुवून ठेवायची.
(३) मुलांना बास्केटबॉल,हॉलीबॉल सारखे सांघिक आणि व्यायाम होतील असे खेळ घ्या या वारंवार सांगण्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या. मुले सकाळी योगा करतात हे एकच कौतुक आम्हाला ऐकवलं जायचं. (या वयातल्या मुलांना मोकळ्या हवेत खेळू न देता तासभर प्रार्थना+योगा करायला लावण हा "अपारंपारिकतेचा" कळस होता.)
माझी मुलगी आधी वेगळ्या ठिकाणी बास्केटबॉल खेळायची पण नंतर शाळॆची वेळ, शहरात सततची रस्त्यांची कामं यामुळे ते जमेनासं झालं. मार्क कमी मिळाले तरी चालतील पण तिने कोणतातरी मैदानी खेळ खेळलाच पाहिजेच हा माझा आग्रह होता जो घरच्यांच्या पचनी पडत नसल्याने तिला शाळेनंतर त्या मैदानावर पोचवण्यात बरेचदा टाळाटाळ केली जायची. अर्थात आठ तासांची शाळा आणि दोन तासांचं मैदान हे शेड्युल तिलाही हेक्टीक होतंच. ( मैदानी खेळांच्या दुरावस्थेची एक वेगळीच कहाणी.)
(४) सायन्स प्रोजेक्टला जे मुलांनी केलेलं नाही हे सरळ दिसतय त्याला बक्षीस. लॅपटॉपवर प्रेझेंटेशन नको हे सांगूनही जे आणायचे त्यांना हे बाजूला ठेवा असं सांगण्याची ताकद व्यवस्थापनात नव्ह्ती. आमच्यासारख्या नियम पाळणार्‍यांना स्वत:च्या मुलांना काय उत्तरं दयावीत हे कळायचं नाही.
(५) शाळा ट्यूशन लावू नका असं सांगायची पण क्लासला जाणारी मुलं स्कॉलरशीप, प्रज्ञाशोध सारख्या परिक्षात चमकली की श्रेय घ्यायची.
(६) शाळॆच्या वेगळेपणामुळे धनदांडगे आणि सतरा उद्योगांमुळॆ मुलांकडे लक्ष द्यायला सवड नसणारे नेते अश्यांच्या मुलांची संख्या वाढू लागली. शाळॆचा फंड हा या लोकांकडून प्रामुख्याने येत असल्याने त्याच्याशी कुठल्याही स्तरावर वाकडं घेणं शाळेला परवडत नव्हतं. यामुळे होणारे प्रॉब्लेम्स वेगळेच.
(७) शाळेच्या व्यवस्थापकांच्या आधीच्या ओळखीचे पालक, आपले मूल म्हणजे कोणीतरी स्पेशल असं मानणारे पालक हे अजून काही वेगळ्या खास नमुने. मोठ्या शाळेतही ते असतात पण त्यांचा थेट उपद्रव होत नाही. छोट्या आणि अश्या शाळांना त्यांना कुशलतेने हाताळता आलं नाही तर त्याचा थेट परिणाम तुमच्या मुला/मुलीवर होतो.
(८) काही तक्रारींना ज्या प्रकारची सारवासारवीची उत्तरं दिली गेली त्यावरुन वाटायला लागलं की शाळेला मुलांचं नुकसान काय होतय यापेक्षा स्वत:चा हेकेखोरपणा पुढे रेटण्यात जास्त रस आहे.

शाळा बदलल्यावर काय फरक पडला?
(१) गैरहजर असलो तर स्वत: कोणाकडून तरी घेउन वह्या पूर्ण करा, शिक्षकाकडून काही कारणांनी तपासल्या गेल्या नाहीत तर स्वत: लक्षात ठेवून परत चेकींगला द्या वैगेरेची सवय नसल्याने पहील्यांदा फट्का बसला तरी लवकरच ती त्यात तरबेज झाली.
(२) ईथेही काहींना स्पेशल ट्रीट्मेंट मिळते पण ते न मिळणार्‍यांचीही संख्या जास्त असल्यानं त्याचा विचार करणं, त्यामुळे आपल्यावर अन्याय होतोय वैगेरे भावनेचा परिपोष आपोआप टाळला गेला.
(३) मार्कांचं महत्व परस्पर कळलं. (शेवटी कोणत्याही डिग्रीचा मार्ग प्रचलीत शिक्षणपद्धतीतूनच जातो. ) जे आहे ते नाकारण्यात अर्थ नसतो हां ते स्वत: स्वीकारायचं की नाही हा पर्याय असतो.
(४) वेगवेगळ्या आर्थिक, मानसिक पातळीवरचे अनेक मित्र मैत्रिणी मिळाले. त्यांच्याशी जुळवून घेणं,वेळप्रसंगी भांडणं आणि हे सगळं स्वत:च्या जबाबदारीवर निभावणं हे सगळं तिला अनुभवायला मिळालं.
(५) आधीच्या शाळेत सगळं शिस्तशीर आखीव असायचं या शाळेत अव्यवस्थेमधली व्यवस्था अनुभवायला मिळाली .
(६) तिला गणित आवडायचं नाही म्हणून सातवीत ट्यूशन लावली. दोन वर्ष त्या बाईंकडे ती जातेय त्यांनी तिचं गणित तर सुधारलच पण आर्टसला गेले तरी गणित घेईन असं ती म्हण्ण्यापर्यंत तिला ए आवडायला लागलं. तिला गणित आवडायलाच हवं असा आग्रह नव्ह्ता पण ज्या शाळेने हुशारी ही वेगवेगळ्या प्रकारात असते हे म्हणत कोणत्याच प्रकाराकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही. बरेचदा मुलांच्या आवडी निवडी ह्या सापेक्ष असतात त्यावर आधीच लेबलं लावून त्यांचं मत पक्कं करण्यापेक्षा स्कील वापरलं तर कुठलाही विषय ठराविक मर्यादेपर्यंत आवडू शकतो. तिला भाषा आवडतात असं शाळेचं म्हणणं होतं पण तिचीच काय बर्‍याच जणांची मुलं आधी वाचायची आता वाचत नाहीत ही तक्रार होती.
(७) मुलीची आताच्या शाळेत तिची एक बंगाली मैत्रिण आहे तिच्या कडून जुजबी बंगाली ती शिकते . बंगाली गाणी डाउनलोड करुन ऐकते. दुसर्‍या एका जपानी शिकणार्‍या मैत्रिणी कडून ती जपानी लिपी शिकली. रिसेस किंवा ऑफ पिरेड्मध्ये मुलांना आपापसात मिळणारा हा वेळ आधीच्या शाळॆत मिळत नव्हता त्यामुळॆ मुलांमध्ये असा काही परस्पर-संवाद नव्ह्ताच.

या पारंपारिक शाळेत पहिल्यापासून असायला हवी होती असं वाटतय का?
नाही. कारण.......
मुख्य म्हणजे पारंपारिक शाळा अभ्यास आणि परिक्षा यांचा जो बागुलबुवा निर्माण करतात त्यापासून संवेदनक्षम वयात ती दूर राहिली.
आम्हाला अभ्यास घेणं, गृहपाठ पूर्ण करुन घेणं याचं ओझं नसल्याने जो काही मर्यादित वेळ मिळायचा त्याचा चांगला उपयोग करुन घेता आला. तिच्याशी त्या वयात खेळणं, गप्पा मारणं, फिरणं याचा उपयोग तिच्या टीन-एजला सामोरं जाताना होतो.

तात्पर्य किंवा सल्ला:
असं मर्यादित अनुभवावरुन सल्ला देणं चुकीचं आहे. हा अनुभव आहे. पण सांगायचं झालं तर

गरज नसताना सीबीएस्सी वा आयसीएस्सी शाळेत घालण्यापेक्षा अपारंपारिक शाळेत घालू शकत असाल म्हणजे जवळ आणि परवडणारी असेल तर सुरुवातीला तरी घालायला हरकत नाही असं मी म्हणेन.
अर्थात तुमच्या मनातली अपारंपारिकतेची व्याख्याच शाळॆच्या व्याख्येशी जुळेलच अश्या भ्रमात राहू नका.
जर मूल घूसमटत असेल तर कालांतराने पारंपारिक शाळेला शरण जाण्यात कमीपणा मानू नका.
आपली रुढ शिक्षण पद्धत, पालकांच्या अपेक्षा या सर्व निकषांवर उतरण्यासाठी अपारंपारिक पध्द्तीला नंतर तरी काही मर्यादा येतात त्या स्वीकारू शकत असाल तर तिथे रहायलाही हरकत नाही.

पारंपारिक शाळेत तुम्ही भले मुलाला म्हणाल की मार्क वैगेरे महत्वाचे नाहीत पण "मार्किस्ट" शिक्षक , ईतर विद्यार्थी यांच्यामध्ये स्वत:च्या विचारसरणीवर ठाम विश्वास ठेवून राहू शकत असाल मुलाला वेळ देउ शकत असाल आणि मूलही इतर काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करु शकत असेल तर मस्तय. पण त्याला मग नंतर मार्कांच्या शर्यतीत ओढून सामिल करणं कसं जमवायचं ते नाही सांगता येणार. कदाचित आजूबाजूच्यांकडे बघून ते मूल ठरवत असेल मार्क महत्वाचे म्हणून.

शाळा नविन असेल तर बर्‍याच गोष्टींची केवळ आश्वासनं दिली जातात. आणि नेमकी तीच वर्षं आपल्या नोकरी वैगेरेच्या दृष्टीनेही महत्वाची असल्याने आपणंही पाठपुरावा करण्यात कमी पडतो. केल्यास त्याचा परिणाम मुलावर होउ शकतो कारण शाळा अपारंपारिक असली तरी पालकांचा राग विद्यार्थ्यावर काढण्याचे पारंपारिक नुख्से वापरले जातात.

शिक्षक टिकण्याचं प्रमाण शाळॆत काय आहे हे जरा आजू बाजूच्यांकडून जरुर माहिती करुन घ्या.

शाळेत शिक्षकांना जास्त राबवून घेत असतील आणि पगार कमी देत असतील अशी अवस्था पर्यायी शाळेत असू शकते. कारण या शाळांना अनुदान नसतेच आणि बरेचदा कोणतीही संस्थाही नसते पाठीशी.

शाळा जास्त वेळाची असणं आणि खाणं वैगेरे शाळेत असणं या गोष्टी आपल्याला सोईस्कर असल्या तरी आपल्या मुलाला नाहीत हे शक्य आहे.

आणि सर्वात महत्वाचं फार सुरुवातीपासूनच मुलांशी संवाद असणं. त्यावरुनच सोयीचे असोत नसोत पण ओझं न बनणारे निर्णय घेता येतात.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

माझ्या माहितीतल्या पर्यायी मराठी शाळांची फी पारंपरिक शाळांएवढीच वा आसपास आहे

शहर - मुंबई
माध्यम - मराठी
---------------------------
मी दिल्लीबद्दल आणि इंग्रजीमाध्यमाबद्दल माझे निरीक्षण नोंदवले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शहर मुंबई, पुणे, कोल्हापूर इत्यादी महाराष्ट्रातील शाळा.
माझ्या माहितीतल्या बहुतांश इंग्रजी पर्यायी शाळांची फी सुद्धा पारंपरिक शाळांच्या पुढेमागेच आहेत (आजवर ऐकलेल्यांपैकी १ लाख वर्षाचेहून अधिक कोणती पर्यायी शाळा ऐकली नाही. ते ही टोकाचे उदाहरण)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

(ज्या गप्पांत आया आपल्या लेकरांच्या शाळांबद्दल फुशारीक्या मारतात त्या गप्पांच्या पण ३०-४० मोस्ट रेप्यूटेड शाळा कवर करणार्‍या गप्पांत) १ लाख पेक्षा कमी फीस असलेल्या शाळा अत्यंत फडतूस मानल्या जातात.
जे अपवाद आहेत (प्रतिष्ठित आणि स्वस्त) तिथे आम्हाला सीट मिळणे असंभव आहे. उदा. सेंट झेवियर्स मधे खर्च फार नाही. पण
१. स्क्रिश्चन असणे
२. शाळेच्या ५ किमी मधे असणे
३. बाप मेलेला असणे, वेगळा झालेला असणे किंवा सुनिश्चित नसणे
४. गरीब (सरकारच्या व्याख्येप्रमाणे) असणे
५ दलित इ इ असणे
७. मँनेजमेंटची माणसे ओळखीची असणे
८. पाल्य पोरगी असणे
इ इ इ पैकी कोणतीही अट आम्ही पूर्ण करू शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

संत झेवियर शाळेची अट क्र. ३ हा नक्की काय प्रकार आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

यातली कोणतीही अट नाही. पण याला मार्क्स आहेत. ज्याला जास्त मार्क्स तो निवडला जातो.
================================================================================
३ नंबरची अट - पालक सिंगल मदर असणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धन्यवाद. ही अट अंमळ वायझेड आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाकीच्याही अटी अंमळ वायझेड आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रश्नच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खरय. जास्त फी असायची गरज नाही. पण मी म्हटल्या प्रमाणे मुलांमागे शिक्षकांचं प्रमाण आणि काही ईतर उद्योग यासाठी असं सांगितलं जातं. अर्थात आमच्या शाळेतही फी अगदीच खुप होती असं नाही. नर्सरीला आम्ही फक्त आठ हजार (२००३ मध्ये) भरली होती ती ६ वी पर्यंत ५५ हजार झाली होती. त्यात शळेपर्यंतचे ट्रान्स्पोर्ट एकावेळचं खाणं आणि दुपारचं जेवणंही अंतर्भूत होतं. म्हणजे खरोखरच फी माफक होती असंच म्हणता येईल. हो वह्या,पुस्तकं आणि गणवेश ही (तिसरीनंतर) होता म्हणजेच खरोखर स्वस्त होती म्हणायला हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी पारंपरिक शाळेत पहिली ते दहावीपर्यंत जे शिकलो त्यातलं कामास आलं नाही असं मला काहीच आठवत नाही. [फारतर मराठीतली वृत्ते आणि अलंकार असतील].

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

इंच का पिंच?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

[फारतर मराठीतली वृत्ते आणि अलंकार असतील].

आंजावरती जिलब्या पाडताना यांचाही बक्कळ उपयोग झालाय खरेतर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१

पण त्याचा इथे संबंध काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मराठी, इतिहास वगैरे कशाला शिकायचं असा प्रश्न कुणालातरी पडला होता म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Finland schools: Subjects scrapped and replaced with 'topics' as country reforms its education system

ही बातमी रोचक आहे. "सब्जेक्ट" ही संकल्पना काढून टाकून "टॉपिक" असा शिकवण्याचा बेस करण्याचा धाडसी प्रयोग फिनलंड शिक्षणव्यवस्थेत होतोय. मराठीत लिहायचं होतं पण सब्जेक्ट आणि टॉपिक या दोन्हींना मराठीत विषय हा एकच शब्द आठवला. वेगवेगळ्या ठिकाणी ही बातमी वाचून नेमका काय फरक होणार आहे हे कळलं. रोचक.

उदा. "युरोपियन युनियन" हा टॉपिक शिकताना इकॉनॉमिक्स, हिस्टरी, सोशल सायन्स, हवामानशास्त्र वगैरे सर्वच त्या अनुषंगाने एकत्रित शिकलं जाणं असं काहीसं.

कसं आणि काय साध्य होणार हे कळण्यासाठी शिक्षण या विषयातला तज्ञच पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगळ्या प्रकारचं वर्गीकरण. त्यावरून राजची 'बोले तो तू करता क्या है मामू' ही जुनी पोस्ट आठवली. स्पेशलायझेशनच्या अतिरेकाबद्दल आणि एकसमयावच्छेदेकरून निरनिराळ्या शाखांमध्ये असलेल्या रसाबद्दल त्यानं त्यात लिहिलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पुण्यातील ग्राममंगलमध्येही अशा प्रकारचं वर्गीकरण असतं असे कळते.
उदा प्राथमिक यत्तेला प्रोजेक्टचा विषय "चाक" घेतलं की चाकांची संख्या, फिरणे, गती, चाकाचा इतिहास, कुंभकलेपासून वाहानांपर्यंत त्याचे वापर वगैरे शिकवलं जातं असं सांगण्यात आलं होतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अच्छा.. असं आहे होय?..

फिनलँड किंवा ग्राममंगल शाळांमधून पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांना विकीबॉईज / विकीगर्ल्स म्हणावे काय ? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आय अ‍ॅम अ विकी बॉय/गर्ल अशा जाहिराती येतील का आता मग?

विकीतले ज्ञान भरलेले विकीपूरित, त्या ज्ञानाच्या आधारे सर्वांना "प्राण्या, विकीज्ञानरस पी" करत ज्ञान वाटणारे विकी डोनर आणि ही माहिती पाहून/वाचून/ऐकून डोक्यात गेलेले ते विकीपीडित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे छान आहे. आवडलं.

अवांतरः एका सीए क्लासमध्ये शिकवणारे वृद्ध शिक्षक हा प्रयोग करत. उदा. पेन्शन हा टॉपिक घेऊन त्याचं अर्थशास्त्र, पेन्शन फंडांसाठीचे कायदे, अकाउंटिंग / फायनान्शियल रिपोर्टिंग कसं करायचं, इन्कम ट्याक्समध्ये कशा प्रकारे पेन्शन हाताळली जातात, अप्रत्यक्ष कर वगैरे सगळे टप्पे घेत घेत शेवटी पेन्शनचं ऑडिट कसं करायचं इथपर्यंत येत. ऑडिटरची विचारप्रक्रिया कशी असावी याचं प्रात्यक्षिकच ते समोर उभं करत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

"टॉपिक" vs "सब्जेक्ट" == धडा vs विषय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

ही इतकी चर्चा वाचून रॉबर्ट फ्रॉस्टची एक कविता देण्याचा मोह आवरत नाही.
The Road Not Taken
By Robert Frost

Two roads diverged in a yellow wood,
And sorry I could not travel both
And be one traveler, long I stood
And looked down one as far as I could
To where it bent in the undergrowth;

Then took the other, as just as fair,
And having perhaps the better claim,
Because it was grassy and wanted wear;
Though as for that the passing there
Had worn them really about the same,

And both that morning equally lay
In leaves no step had trodden black.
Oh, I kept the first for another day!
Yet knowing how way leads on to way,
I doubted if I should ever come back.

I shall be telling this with a sigh
Somewhere ages and ages hence:
Two roads diverged in a wood, and I—
I took the one less traveled by,
And that has made all the difference.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Don't let schooling interfere with your education.

Mark Twain

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या चर्चेवरून मागे कधीतरी बघितलेलं या लिंकवर उपलब्ध असलेलं अगदी समर्पक कार्टून आठवलं. मी मुळात कुठे बघितलं आता आठवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

चांगली चर्चा चालूय. अनु राव यांचे प्रतिसाद आवडले.
कदाचीत अवांतर: अवचटांनी आदर करण्यासारखं कार्य केलं आहे हे मान्य आहे. पण बाकीचे सर्वसामान्य लोक आपलीच छोटीमोठी नोकरी करत/सोडून आपल्याच पोराबाळांना सांभाळत असतील किंवा आपलेच छंद/आवड जोपासत असतील आणि वर आपण काहीतरी फार महान &/ हटके केल्याची टिमकी वाजवत फिरत असतील तर मात्र सॉरीच!
प्लीज नोट: आक्षेप टिमकी वाजवण्यावर आणि दुसर्यांनी चानचान म्हणावं या अपेक्षेवर आहे. बाकी तुम्ही काय करता किंवा करत नाही याच्याशी इतरांना काहीच देणंघेणं असू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण बाकीचे सर्वसामान्य लोक आपलीच छोटीमोठी नोकरी करत/सोडून आपल्याच पोराबाळांना सांभाळत असतील किंवा आपलेच छंद/आवड जोपासत असतील आणि वर आपण काहीतरी फार महान &/ हटके केल्याची टिमकी वाजवत फिरत असतील तर मात्र सॉरीच!
प्लीज नोट: आक्षेप टिमकी वाजवण्यावर आणि दुसर्यांनी चानचान म्हणावं या अपेक्षेवर आहे. बाकी तुम्ही काय करता किंवा करत नाही याच्याशी इतरांना काहीच देणंघेणं असू नये.

ए बाई गप्प बस की जरा. काय घेशील गप्प बसायला? Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

हल्ली शाळांमध्ये मुलांना प्रोजेक्ट करायला लावायची पद्धत/फ्याड आहे. याचा आयटी इंडस्ट्रीशी काही संबंध आहे का? म्हणजे मुलांना प्रोजेक्ट डिलीव्हरीच्या टेन्शनची लहानपणापासूनच सवय लावणे वगैरे?? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याचा संबंध सीबीएस्सी, आय्सीएस्सी वैगेरे शाळा टाईप पोरांना स्मार्ट बनवण्याशी आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलांना कुठे प्रोजेक्टचे टेन्शन असते? पालकांना असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अत्यंत फालतूपणा आहे तो. आई-आज्ज्या-आत्या मर मर मरतायत ते प्रोजेक्ट पूर्ण करायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

देर दुरूस्त वगैरे.

आमची प्राथमिक शाळा पारंपारिक होती की नाही ते माहिती नाही- माध्यमिक शाळा नक्कीच पारंपारिक होती Biggrin

प्राथमिक शाळा बहुतेक पारंपारिक नसावी. काही गोष्टी आठवतात त्या -
.
१. वाढदिवस सेलिब्रेट करायची वेगळी पद्धत होती. म्हणजे आपापल्या वाढदिवसाला पोरं काही देत नसत वर्गात. पण महिना अखेरीस सगळ्यांचे वाढदिवस एकत्र साजरे होत आणि शाळेतल्या बाईच त्यासाठी काहीतरी देत- सगळ्या पोरांना.
.
२. ३री/४थी च्या (मोठ्या!) विद्यार्थ्यांसाठी डिबेट असायचे. वर्गातल्या २ रांगा एक बाजू आणि उरलेल्या रांगा दुसरी बाजू. एखाद्याला न रहावून भलताच मुद्दा मांडायचा असेल तर ते पण चालून जायचं.
.
३. वर्गात महिन्यातून एकदा वगैरे भाषणांसाठी वेळ होता. एकदा "माझा आवडता टी.व्ही. कार्यक्रम" विषय होता. पोरांनी नेहेमीप्रमाणे सुरूवातीला "बालचित्रवाणी" आणि काय काय सांगितलं.
मग बाई म्हणाल्या "अरे खोटं कशाला बोलता? मला माहितीये तुम्ही काय काय बघता ते. बिन्धास्त सांगा", मग पोरं खरंखरं काय ते वदली Biggrin
.
४. परीक्षा वगैरे नियमित होतं. पण शिकताना जरा मजा यायची. म्हणजे चौथीच्या इतिहासात बाई आम्हाला औट ऑफ द वे जाऊन शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगायच्या.
एक दुसर्‍या बाई "गोष्ट सांगणार्‍या बाई" म्हणूनच फेमस होत्या! मग एखाद दिवशी सगळ्या पोरांना असेंब्लीत गोळा करून तासभर गोष्ट ऐकायला मिळायची (पाचूचं बेट.. अजून आठवतेय.)
५. आषाढी एकादशीला जवळच्यास एका विठ्ठल मंदिरात आम्हा विद्यार्थ्यांची वारी जायची- फुल टाळबिळ घेऊन. मग तिथे भजन आणि परत शाळेत.

मला माझी प्राथमिक शाळा जेवढी आवडते तेवढीच माध्यमिक शाळा नावडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाळा तरी कुठल्या गावातली म्हणे? हेवा वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नशीबवान आहात अशी शाळा मिळाली तुम्हाला. माझ्या दुर्दैवाने नशीबात चांगली शाळा नव्हती त्यामुळे दुसर्‍यांच्या अश्या छान छान शाळांबद्दल वाचलं/ऐकलं की खूप हेवा वाटतो आणि वाईटही वाटतं की तो गेलेला शालेय जीवनातला काळ सुधारण्यासाठी पुन्हा आणू शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२ आणि ३ भारीच आहे. आमच्या कडे नव्ह्तं असलं काहीही. Sad
आधी शिक्षक होणे हा नाईलाजाचा भाग नव्हता म्हणून अश्या शिक्षिका असतं. आम्हाला तर पाचवीत अश्या कुलकर्णीबाई होत्या ज्यांनी हडप्पा संस्कृती वैगेरे फार सुंदर शिकवलेलं. राजाध्यक्ष या मराठीच्या बाई सातवीत होत्या त्या धडा शिकवण्याआधी लेखक आणि त्याचं लिखाण याबद्द्ल फार छान सांगत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्याहीकडे असलं काही नव्हतं.
अवंतर :-
उलट कैकदा प्रश्न विचारले की शिक्षक वैतागून जात.
मला हिटलिस्टवर ठेवल्यासारखं होतं.
मी काही बोलायच्या आधीच "आज तू काही विचारायचं नाहिस हं" अशी प्रेमळ दरडावणी होइ.
शेवटी एका प्रेमळ सरांना एक उपाय सापडला.
ते प्रश्नाला प्रतिप्रश्नाने प्रतिसाद देत.
पण लवकरच तोही उपाय बोथट झाला.
कारण मग आमच्यात प्रश्नांची जुगलबंदी सुरु झाली.
मग पारंपारिक पद्धतीने आमची धुलाई किंवा आमच्याबद्दल तक्रारी करणे सुरु झाले.
मी समोर असलो की त्यांना माझा गळा दाबावा किंवा स्वतःचा गळा दाबून घ्यावा अशी इच्छा होतिये की काय असे मला वाटे.
प्रेमळ सर खुनशी बनले.
.
.
मोठा झाल्यावर प्रश्न होतील कमी असं शाळेत एकदा व्हिजिटवर आलेल्या काउन्सिलर मावशींनी सांगून सरांची समजूत काढली.
पण प्रश्न एक्स्पोनेंशिअली वाढत गेले.
शेवटी मी शाळा सोडली तेव्हाच ह्यांची सुटका झाली.
"वृत्तपत्रे सरकारचा नेमका छळ कसा करतात ? छापलं तर छापलं आपल्याविरुद्ध काही ; म्हणून सरकार सोडून का देत नाही ?
सरकार वृत्तपत्रांना बिचकून का असते ? का वैतागते ? " असे केसरी - ब्रिटिश सरकार केस संदर्भात विचारल्यावर सरांनी
"म्हणजे....असं बघ ब्येटा.... आम्ही म्हणजे सरकार. तू म्हणजे वृत्तपत्र. तू आमचा मार खातोस. पण खरा छळ आमचाच होतो.
वैतागलेले आम्ही असतो. मनःस्वास्थ्य आमचं जातं. तू टुणटुणीत असतोस.
शिवाय तुझ्याबद्दल व्रात्यपणाची, दांडगाईची कारवाईही करता येत नाही." असे म्हणून बोळवण केली.
बहुदा गुर्जी मनापासून बोलत असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाळेत असा तर मग तु संस्थळावर सुरक्षीत कसा आता प्रश्न पडतोय....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

अरे ये तो पुराना पापी हय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अंतराआनंद लेख आवडला.

@मन तुम्हाला असे {एकामागुन एक बम्बार्डिंग स्टाइलचे} प्रश्न विचारताना नेमकि कश्या प्रकारचि ट्रीटमेंट आवडलि असती? मी हे विचारतेय कारण माझा मुलगा (वय वर्शे ६)असेच प्रश्न विचारत असतो.किंबहुना टु अ‍ॅड इन्सल्ट ट द इन्ज्युरी तो प्रत्येक उत्तराचा व्यत्ययास पण विचारतो. आणि दिलेल्या प्रत्येक उत्तराला का? हा प्रतिप्रश्न आणि त्याच्या आकलनानुसार यथेच्छ फाटे फोडुन प्रत्येक फाट्यावर परत एक प्रतिप्रश्न.

आम्हा दोघांना आता ह्याची सवय झालीय त्यामुळे सम्भाव्य प्रश्न काय येतिल हे ओळखुन आम्हि उत्तर कन्स्ट्रक्ट करु शकतो. कधी कधी आमचाही पेशन्स संपतोच म्हणा पण निदान काहि प्रमाणात त्याच शंका निरसन आम्हि करु शकतो. पण इतर व्यक्ती कंटाळतात. शाळा पारंपारिक आहे (इथे अजुन पर्याय मिळाला नाहिय मला काहि, उपलब्ध शाळांमध्ये हीच सर्वात चांगली वाटली) शाळेतल्या ह्या वर्षीच्या बाई खुप अनुभवी आणि मुलांच मानसशास्त्र समजुन घेणार्‍या होत्या शिवाय किंडरगार्टन असल्यामुळे अभ्यास कमी होता, म्हणुन हे वर्ष छान गेल पण पुढे तस होइल ह्याची खात्री नाहि. त्याला प्रश्न विचारु नकोस असही सांगावस वाटत नाहि पण इतक्या मुलांमध्ये बिझी असताना शिक्षकांना ते त्रासदायक वाटले तर (नव्हे वाटतीलच) तर त्यान्नाहि मी दोष देणार नाहि.

त्यामुळे सध्या मी पण प्रतिप्रश्न स्ट्रॅटेजी वापरते. म्हणजे प्रत्येक 'का' ला 'तुला काय वाटत अस का होत असेल, किंवा तुझ काय मत आहे काय व्हायला हव? असे प्रश्न विचारते. हेतु हा कि त्याला त्याच्या प्रश्नांवर स्वतः विचार करुन उत्तर शोधता येउ शकतात हे समजवाव. पण त्याच लॉजिक इतक तर्हेवाइक असत (किंवा आपल फार चाकोरीबधद असत Lol की ही स्ट्रॅटेजी काहि वर्क आउट होत नाहिये. त्यामुळे मला जरा वेगळी दिशा हवीय.

प्रश्न जरी मन ह्यांना उद्देशुन असला तरी बाकिच्यांचे इनपुट्स पण वाचायला आवडतील.

एक गोंधळलेली माता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याला काही प्रमाणात तोडगा म्हणजे प्रतिप्रश्न हेच आहे. तुम्ही बरोबर करताय. आपल्याला माहिती असेतोवर / पेशन्स असेतोवर उत्तरे द्यावीत, नैतर प्रतिप्रश्न विचारून त्याच्याच लॉजिकने उत्तर त्याच्याकडून काढून घ्यावे. हे करताना रिअ‍ॅलिटीचा फारसा विचार न केला तर अजूनच उत्तम, उदा. गांधीजींचा नोटेवरील चेहरा हसरा का असतो? नोटा मोजताना त्यांना गुदगुल्या होतात म्हणून. अशा थाटाची उत्तरे तुलनेने बिनमहत्त्वाच्या प्रश्नांना दिली तर मजा येईल. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उदा. गांधीजींचा नोटेवरील चेहरा हसरा का असतो? नोटा मोजताना त्यांना गुदगुल्या होतात म्हणून. अशा थाटाची उत्तरे तुलनेने बिनमहत्त्वाच्या प्रश्नांना दिली तर मजा येईल.

हाहाहा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

>>कारण माझा मुलगा (वय वर्शे ६)असेच प्रश्न विचारत असतो.

तुमच्या मुलाला जेन्युइनली प्रश्न पडत असतील.

१३-१५ वर्षादरम्यान मुलगे वयात येऊन जेव्हा इगो मोठा होतो. तेव्हा प्रत्येक गोष्टीत समोरच्यावर कुरघोडी करण्याची इच्छा असते त्यामुळे 'नसते फाते फोडून आर्ग्युमेंट करत राहणे' अशी फेज येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

१३-१५ वर्षादरम्यान मुलगे वयात येऊन जेव्हा इगो मोठा होतो. तेव्हा प्रत्येक गोष्टीत समोरच्यावर कुरघोडी करण्याची इच्छा असते त्यामुळे 'नसते फाते फोडून आर्ग्युमेंट करत राहणे' अशी फेज येते.

नक्की तेव्हाच येते का? त्याच्या अगोदरपासूनही ही फेज़ असल्याची उदा. ठाऊक आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अग्रीड.. इनफॅक्ट ७-१० वर्षे वयापर्यंत हे असतं असं वाटतं. कदाचित पूर्वी १५ वर्षे असेल आणि आता कमी झालं असेल.

१५ व्या वर्षी उलट आईबाप हे फाटे फोडत वादही न घालण्याइतपत फाट्यावर मारण्याइतके मानणे असं सगळीकडे दिसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित हे वय आई-बापांनी (पट्टी, छडी वगैरेने) मार देणे बंद करण्याच्या वयाशी संबंधित असेल. हल्ली आईबाप कधीच मारत नसल्यामुळे ते वय आधीपण येत असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हल्ली आईबाप कधीच मारत नसल्यामुळे

काय सांगता? अवघड आहे.

(एकदोनदा महाप्रसाद आणि कैकदा छोटा प्रसाद खाल्लेला) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>. १३-१५ वर्षादरम्यान मुलगे वयात येऊन जेव्हा इगो मोठा होतो. तेव्हा प्रत्येक गोष्टीत समोरच्यावर कुरघोडी करण्याची इच्छा असते त्यामुळे 'नसते फाते फोडून आर्ग्युमेंट करत राहणे' अशी फेज येते. <<

मराठी आंजावरच्या विवादांतही तशाच फेजमध्ये असल्यासारखं लोकांचं वागणं पाहून त्यांचंही मानसिक वय तेवढंच असावं की काय, असं कधी कधी वाटत राहतं Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

थोडेफारच साम्गू शकेन. प्रयत्न करतो.
फार जुन्या गोष्टी आहेत. शिवय त्यात नेमकं सांगावं काय हे ही समजत नाहिये.
तरी एक प्रयत्न करतो.
.
.
मी बहुतांश वेळा प्रश्न खरोखरच जेन्युइनली विचारत असे.
सुरुवातीला काहींनी त्यावर गप्प बसायला सांगितले होते. पण धाकाने प्रश्न सुटला नाही.
दातामध्ये बडिशेपचा तुकडा वगैरे काहीतरी अडकल्यावर तो निघेपर्यंत एक अस्वस्थता येते; तशी अस्वस्थता असे.
कितीही धाक दाखवला तरी त्यामुळे मी प्रश्न विचारुन मोकळा होइ.
प्रतिप्रश्न स्ट्रॅटेजी माझ्याही बाबतीत उपयुक्त ठरली. कधी कधी थेट उत्तर देण्यापेक्षा प्रात्यक्षिकानं मनोरंजन होइ.
प्रश्नाचं पूर्ण उत्तर समजलं नाही तरी मनोरंजनाच्या नादात मी ते विसरुनही जाइ.
ढग पांढरे का असतात ? आकाश निळं का असतं ? पाण्याला रंग नसतो , तर समुद्र निळा का ?
.
.
"पाण्याचे दोन कण एकमेकांना आपोआप कसे चिटकतात ? " ह्याबद्दल मात्र कुणी काही बोललं नाही.
(बहुतेक सर्फेस टेन्शनमुळे होत असावं.)
.
.
असलं काहीतरी मी विचारत असे तेव्हा आम्हाला शिकवणार्‍या बाईंनी माझेच खेळ वापरुन उत्तर दिलं.
मी नेहमी रोटोमॅकचा पेन वापरत असे. हा काचेचा असल्यासरखा होता.
खोलीत असताना खिडकीतून येणार्‍या उन्हात तो धरला की भिंतीवर झकास इंद्रधनु उमटे (ह्यामुळे बव्हंशी शिक्षक शिक्षिका वैतागत.)
त्यांनी तेच उदाहरण घेतलं. " एकाच प्रकाशात खूपसे रंग असतात. मग काचेतून गेले की विखुरतात. हे उत्त्तर दिलं. "
बाहेर प्लास्टिकच्या खेळणीतला भोवरा मिळे.(दोरी ओढून आपण खेळतो तो पारंपरिक भोवरा नव्हे. हा प्लास्टिकचा/कचकड्यायचा भोवरा.
स्प्रिंगच्या दांड्यात अडकवून भोवरा फिरवायचा; मग सोडायचा. मग मस्त झुर्र करुन फिरायला लागतो.
)
तो साधा न घेता त्यावर सप्तरंग असलेला भोवरा घेतला. तो भन्नाट फिरायला लागल्यावर सात रंगांऐवजी पांढरट रंग दिसू लागला.
मला पूर्ण समजलं नाही. १००% नाहिच समजलं. पण जोरात फिरल्यावर ह्या रंगांचा एकच पांढरा रंग बनतो. एकाच उन्हातून सगळी उन्हं , सगळे रंग बाहेर येतात, सगळी उन्हं येतात हे समजलं. (तेव्हा मी रंगाला "रंग" म्हणत नसे. ऊन म्हणत असे. लाल उन्ह, हिरवं उन्ह, निळं उन्ह असं म्हणत असे.)
आणि तेवढं पुरेसं होतं. प्रकाश, किरणे, लहरी वगैरेंची फ्रिक्वेन्सी, ब्यांडविड्थ ह्या संकल्पनाच तेव्हा ठाउक नव्हत्या.
पण त्या पातळीवर शंका समाधान करण्यात तेवढीच प्रात्यक्षिकं पुरेशी होती.
.
.
हे असं खेळातून आणि प्रात्यक्षिकातून सांगितल्यानं आम्ही बरेचसे शांत झालो.
.
.
नंतर मोठे झाल्यावर मार्केटमध्ये हिंडताना खूप सारे "करुन पहा आणि शिका" स्टाइल पुस्तकं दिसले.
खूप गमतीशीर प्रयोग त्यात होते. आनी हरेक प्रयोगातून एखादं महत्वाचं तत्व शिकवलं जाइ.
कित्येक खेळणीही होती वैज्ञानिक तत्व दाखवणारी. पण हे सारं खूप खूप उशीरा हाती लागलं.
जरा आधी लागलं असतं तर खूप बरं झालं असतं. तोवर ही तत्व, त्यांच्यावरची समीकरणं करण्यात मी आधीच पटाइत झालो होतो.
सुरुवातीस वआटलं असतं, तितकं नावीन्य आता वाटलं नाही. ही पुस्तकं अबचौकात जाता येतात अजूनही दिसतात.
(बहुतेक सध्याही माझ्या घरी एक पत्र्याची वीतभर नाव्/बोट/जहाज आहे. पंधरावीस रुपयात घेतली असेल.
त्यात तेल आणि वात घालून पेटवलं की फट् फट् करत ती फिरायला लागते.
हे सर्रळ सर्रळ आधुनिक युगातल्या वीज,औद्योगीकरण,आगबोट,आगगाडी ह्यांचं मूळ तत्व्/प्रिन्सिपल आहे.
)
.
.
अर्थात सारच काही गोड गोड नव्हतं. उत्सुकता म्हणून मी काय करीन ह्याचा नेम नसे.
त्याबद्दल प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून ताडकन् मुस्काटातही खाल्ली आहे.
पण माझा उद्देश निव्वळ कुतूहल हा आहे; इतर काही भलतच मी करत नाहिये; हे समजल्यावर ज्येष्ठांनाच वाईट वाटे.
कधी कधी हसू येइ. अगदि लहान असताना, बालपणी एकदा मी विचारलं होतं की आपण जी नाकाने हवा घेतो ती तशीच बाहेर टाकून देतो.
आणि आपण जे खातो ते शी मधून बाहेर पडतं. पण मग शी सोबत कधी कधी हवा बाहेर कशी येते ?
आपण कुठे तोंडाने हवा आत घेतो ?
आणि नाकातून जी हवा बाहेर सोडतो त्याला वास नसतो पण तोंडातून नैतर ढुंगणातून ती बाहेर आली तर त्याला वास का असतो ?
ह्या प्रश्नाचं उत्तर कोणीच दिलं नाही. मारही दिला नाही. सगळे वैतागून इकडे तिकडे पहात होते. कुणी हसू दाबत होतं.
.
.
एकदा मला चार पाच वर्षांचा असताना तुफ्फान जुलाब झाले होते. अगदि अगदि पात्तळ शी होइ.
डॉक्टरला सांगताना "ढुंगणातून सूस्सू होते आहे" असं म्हणालं. त्यांनी चुकून फक्त "छे रे. तिथुन सुस्सू कशी होइल. ती नुंगूमधूनच होइल."
असं समजावणीच्या सुरातलं वाक्य टाकण्याचा मूर्खपणा केला. मी लागलिच पोटातली सु स्सु नुंगू मधून जायच्या ऐवजी थोडी बाजूहून...
ढुंगणातूनही कशी जाउ शकत नाही; का जात नाही ? नुंगू ब्म्द झाली तर सुस्सु कुठे जाणार ? असं विचारत छळ सुरु केला.
डॉक्टर रडवेले झाले. आजारी कोण आहे तेच कळेना.
.
.
.
नव्वदचे दशक. माझ्या मोठ्या चुलत भावाचं लग्न होतं. लग्नासाठी आम्ही कार्यालयातच मुक्कामी थांबलो होतो.
लायटिंगचे दिवे नेमके कसे लागतात ह्याचे लै कुतूहल होते. नव्वदच्या दशकात एल ई डी दिवे प्रचलित नव्हते. लायटिंगच्या दिव्यांची माळ असे.
माळेत एकेक प्लास्टिकचा छोटा चेंडू असावा तसे दिवे असत. त्यातल्या मधोमध फटीतून वायर टाकून आतला बल्ब पेटत असे.
ते नेमके कसे होते; हे जाणून घ्यायला मी ती फट फाकवून उचकटून पहात होतो; ऐन मध्यरात्री उठून.
एका वायरच्या उघड्या टोकाला हात लावला. भयानक.
प्रच्चंड जोर्रात शॉक बसला. मी घाबरा घुबरा झालो. जोर्रात आरोळी ठोकली.
नंतर काय झाले ठाउक नाही. पण दुसर्‍अय दिवशी घरचे एकाच वेळी रागवत्,ओरडत होते; कुनी वैतागलं होतं.
कुणी केविलवानं होउन "असं का करतोस रे बाबा " म्हनत काकुळतीला आलं होतंणी.
.
.
तर सांगायचं म्हणजे विजेचे पॉइण्ट बंद ठेवणारे थ्री वे पिन सारखे प्लग मिळतात.
घरी अतिचिकित्सक महात्मे असतील तर ते लावून विजेचे पॉईण्ट बंद ठेवलेलेच बरे.
.
.
सॉरी, तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे, किंवा मला त्या वयात काय अपेक्षित होतं; ते आजही सांगू शकलो नाही.
प्रयत्न केला; पण काहीच सुचलं नाही.
फार तर डेमो/प्रयोग्/प्रात्यक्षिक दिल्यानं प्रश्न जरा कमी होतील इतकच सांगू शकतो.
पण हेसुद्धा हरेक केसम्ध्ये लागू होइलच की नाही ते ठाउक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद बॅटमॅन, नितीन आणि मन,

त्याचे प्रश्न जेन्युइन असतात म्हणजे कधीतरी आई/बाबाला जेरीस आणायला मुद्दाम ही विचारल जात नाहि अस नाहि पण ते ओळखु येतच. ९५% प्रश्न जेन्युइन असतात कारण स्वभाव खुप(च) चौकस आहे. शिवाय प्रश्नांची उत्तर मिळवण्याची चिकाटी पण खुप आहे त्यामुळे तो पाठ सोडत नाहि. आई-वडिल जितक लक्ष देतात/प्रश्नांची उत्तरे देण्ञाचा प्रयत्न करतात तितक शिक्षक कस करु शकणार त्यांना अश्या वेगवेगळ्या गरजा असलेल्या खुप मुलांकडे लक्ष पुरवाव लागणार. म्हणुन जरा काळजी वाटते.

म्हणुन मन ह्यांना प्रश्न केला की त्यांना नक्कि काय अपेक्षित असायच त्या वयात. कदाचित पुढची स्टृअ‍ॅटजी ठरवायला मदत होइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने