Skip to main content

बागकामप्रेमी ऐसीकर : २०१५ धागा - २

मागच्या धाग्यात शंभरपेक्षा अधिक प्रतिसाद आल्याने पुढील धागा सुरु केला आहे.

या वर्षी बागेत नवीन वाफे बनविण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. सुरवातीला हार्डवेअर सामानाच्या दुकानातून लाकडाच्या (सिडर) फळ्या आणून त्याचे मोठे खोके बनविले. नंतर हे खोके जमीनीवर ठेऊन त्याच्या आत जिओटेक्स्टाइल कापड लावले जेणेकरून जमीनीतून तण वर येऊ नये पण अधिकचे पाणी जमीनीत मुरावे. त्यानंतर या प्लांटर्समधे माती आणि कॉंपोस्टचे मिश्रण भरले, या कामाला सर्वाधिक वेळ आणि श्रम लागले. आता या प्लांटर्सला वरून प्लॅस्टिकने झाकण्यासाठी चार कोपरे आणि मधल्या कडांवर प्लॅस्टिकचे पाईप्स लावायचे आहेत. आमच्याकडच्या थंडीत हे प्लॅस्टिकचे झाकण वसंताच्या सुरुवातीला किंवा नंतर शिशिरात घातले तर वाफ्यातले तापमान जमीनीच्या तापमानापेक्षा अधिक ठेऊन अधिक काळ भाज्या वगैरेंचे पीक घेता येते.

303

309

310

सर्व काम घरच्या घरीच सर्व कुटुंबाने मिळून केल्याने आर्थिक बचत तर झालीच पण त्याचबरोबर आपण हे सर्व आपले आपण करू शकतो याचा आत्मविश्वास आणि समाधानही मिळाले.

याशिवाय आता घरात अनेक रोपे बनवून झाली आहेत. गवार, भेंडी इत्यादींच्या बिया पेरण्याआधी दोन दिवस पाण्यात भिजवून ठेवल्याचा उपयोग होतो हे लक्षात आले. भेंडीच्या ज्या बिया तशाच पेरल्या होत्या, त्या उगवून येण्याचे प्रमाण खूप कमी होते शिवाय ज्या उगवून आल्या त्यांच्यावरचे बियांचे कठीण आपरण निघायला कष्ट झाल्याने काही मोड तसेच वठून गेले. दरवर्षी झेंडूची वाळलेली फुले राखून त्याची रोपे लावतो तीही उगवून आली आहेत. कारल्याच्या बियांपैकी एकही बी उगवून आली नाही तेच ढबू मिरचीचेही.
आता फ्रॉस्टच्या शेवटच्या दिवसाची वाट पाहात आहोत ज्यानंतर नवीन वाफ्यात पेरणी करता येईल.
तुमचे बागकाम कुठेपर्यंत आले? यावर्षी नवीन काय लावले?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 13/04/2015 - 04:35

छान दिसतंय गो.

हे माझ्याकडचं उगवून आलेलं बेझिल. साधारण महिन्याभरात एवढंच वाढलंय; गेल्या वर्षी वाढ चटकन झाली होती. पण गेल्या वर्षी जूनच्या शेवटी (रोचनाने धागा काढला तेव्हा) पेरलं होतं. या वर्षी दणक्यात उन्हाळा सुरू व्हायच्या आधीच रोपं आलेली आहेत.

गेल्या वर्षी घरातला एकही टोमॅटो न मिळाल्यामुळे (भडकून) मोठं झाडच विकत आणलं. त्याला आता आठ टोमॅटो धरल्येत; पिकतायत कधी याची वाट बघत्ये. दुसरं टोमॅटोचं रोप आणलं, त्याला पूर्ण वाढ होण्याआधीच कळ्या दिसत आहेत.

गेल्या ‌वर्षी लावलेलं वांगं थंडीत घरात आणून टिकवलं आहे. त्याला आता कळ्या दिसत आहेत.

आणि हे अळकुड्यांमधून फुटू पाहणारं अळूचं पान -

बाकी भोपळी मिरचीची वाढ धीरे चलो सुरू आहे. बाकी झेंडू आणि झिनीया पेरलंय, त्यांनाही बेझिलासारखी चार-सहा इटुकली पानं आहेत एवढंच.

रोचना Mon, 13/04/2015 - 12:15

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टोमॅटो पिकण्याची वाट बघणे हे बागकामातले सर्वात कठीण काम आहे. छान दिसतायत टोमॅटो - त्याची आणि वांग्यांची कुठली व्हरायटी आहे? ऑक्टोबर मधे पेरलेली वांग्यांच्या रोपांनी थंडी संपल्यावर थोडे दिवस आराम केला, आणि आता नव्या जोमानं पुन्हा फळं येतायत.
बरं केलंस आळूचा फोटो टाकून - यंदा मला लावायचाय. आजच चवळी आणि कोहळ्याच्या काही बिया पेरल्या, बघू काय होतं ते.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 14/04/2015 - 04:38

In reply to by रोचना

फळं धरलेला टोमॅटो - अर्ली गर्ल
नुस्ती फुलं आलेला छोटा टोमॅटो - बिग बॉय
वांग्याची जात - ब्लॅक नाईट.

---

काल अळूच्या सगळ्यात मोठ्या कोंबाचा फोटो काढला आणि आज पान बरंच बाहेर आलेलं दिसतंय. एकूण दोन कोंब आहेत; इतर दोन अळकुड्यांचं काय झालंय बघितलं पाहिजे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 15/04/2015 - 21:41

In reply to by पिवळा डांबिस

आता तुम्ही म्हणताय म्हणून बिग बॉय आणि अर्ली गर्ल शेजारीशेजारी ठेवल्येत. आणि तिघांनाही फुलं आहेत, पण सध्या फक्त अर्ली गर्ललाच फळं आहेत.

पिवळा डांबिस Sat, 18/04/2015 - 10:46

In reply to by बॅटमॅन

टोम्याटोचटणीशौकिन.

हे टोम्या-टोचणी-शौकिन असं वाचलं...
फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे ची आठवण आली...
असो. जो जे वांछिल.....
:)

रुची Thu, 16/04/2015 - 21:53

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आमच्या मातोश्रींची पाककृती घनुने दिलेल्या पाकृसारखीच आहे पण थोडी सोपी आहे.
टोमॅटो उभे चिरून घ्यावे. तेलावर मिरच्या (चवीप्रमाणे) आणि टोंमॅटो परतून घ्यावेत (मऊ होईपर्यंत). थोडे तीळ भाजून त्याचे कूट करून घावे. नंतर परतलेले टोमॅटो, मिरच्या, थोडी कोथिंबीर, मीठ, तिळाचे कूट आणि हवा तसा गूळ हे सगळे मिक्सरवर थोडे भरड दळून घ्यावेत आणि त्यावर हिंग, मोहरी आणि हवी असल्यास किंचित हळद घालून केलेली फोडणी वरून घालावी की झाले. हे सगळं प्रमाण 'थोडे' आणि 'चवीप्रमाणे' प्रकारातले आहे त्यामुळे आवडीप्रमाणे बदल करता येतील. टोमॅटोच्या आंबटपणानुसार हळूहळू लागेल तसा गूळ घालावा.

घनु Thu, 16/04/2015 - 10:20

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही माईंना विनंती केली आहे तरी मी अगाऊपणा करून आम्ही करतो त्या चटणी ची पाककृती टाकतो (त्याचं काये की पाककृती म्हंटलं की हात लिहीण्यासाठी शिवशिवतात). अर्थात रुची ह्यांच्या पाकृ ती उत्सुकतेने मी ही वाट पहात आहेच :)

हिरव्या टॉमॅटोचे बारीक काप करून घेणे, साधारण जसे आपण कांद्याचे काप करतो कांदे-पोह्यांसाठी किंवा त्यापेक्षा बारीक असल्यासही उत्तम. कांदा बारीक चिरून घेणे (४ मध्यम टोमॅटोला २ छोटे कांदे पुरे). लसणाच्या ६-७ पाकळ्या, २ मिरच्या (तिखटाच्या गरजेप्रमाणे कमी-जास्त) आणि आलं हे सर्व वाटून घेणे. गरम तेलावर नेहमीचं फोडणीचं साहित्य घातलं की मग आलं-लसूण-मिरची वाटण घालणे, कांदा गुलाबी होईपर्यंत परतणे, त्यात टोमॅटो अ‍ॅडवणे- मग कढईतल्या मंडळींना व्यवस्थित एकजीव होईपर्यंत परतणे (कढईत कंपू-बाजी दिसायलाच नको इतकं एकजीव ;) ). बाकी मग मीठ आणि अजून काही मसाले घालायचे असल्यास खुशाल घालावे. त्यानंतर एक दणदणीत वाफ आली की गॅस बंद करून २ मिनीट वाफेवर शिजू देणे. गरम गरम पोळी/भाकरी/इडली/डोसे/अंबोळी/अप्पम/पुर्‍या/पराठे/थालीपीठ/ब्रेड बरोबर फस्त करणे.
टीप-
१. आम्ही थोडा गूळ ही घालतो. सहसा हिरवे टोमॅटो आबंट नसतात पण असल्यास गूळ घातल्याने आबंट-गोड चव छान लागते ("मेलं, ज्याच्या त्याच्यात गूळ" - काय करणार - जात नाही ती जात :( )
२. आम्ही ह्या चटणी मधे बर्‍याचदा भाजलेल्या दाण्याचा कूट ही घालतो, एकदम बारीक नाही पण जरा भरड कूट केलेले दाणे, हा कूट दणदणीत वाफ काढण्याआधी कढईत घालावा. कूटाला कढईतल्या इतर मंडळींबरोबर एकजीव करत बसू नये. काही मंडळींचं हे ही नको नी ते ही नको असं असतं - अश्यांना फक्त सामावून घ्यायचं, एकजीव वगैरे भानगड नकोच!

ऋषिकेश Thu, 16/04/2015 - 10:27

In reply to by घनु

अहाहा! आता करून खाणे आले. बरेच दिवसांत नाही केली

==
छिद्रान्वेषच करायचा तर

गरम तेलावर नेहमीचं फोडणीचं साहित्य घातलं

हे वाक्य नै आवडलं. नेहमीच्या फोडणीत "नेहमीचं" असं फक्त तेल असतं :) (तेला ऐवजी तुप असलं तर (हल्ली) त्याला नेहमीची फोडणी म्हणत नाहीत ;))
बाकी घटक कोणता पदार्थ त्यानुसार बदलतात, क्रम बदलतो तेव्हा विस्कटून सांगावे

घनु Thu, 16/04/2015 - 10:36

In reply to by ऋषिकेश

गरम तेलावर नेहमीचं फोडणीचं साहित्य घातलं

लिहीण्याचा कंटाळा हो... बरं विस्कटून म्हणजे.
फोडणीसाठी कढईत तेल घेणे, ते तापले की मोहरी-जीरं घालून ते तडतडले की त्यात हिंग घालणे. मग हिरवी मिरची-लसूण-आलं वाटण घालून परतणे. त्यानंतर कांदा गुलाबी होईपर्यंत परतणे आणि मग बारीक चिरलेला हिरवा टॉमॅटो घालून परतणे. ओके? :)

बादवे ऋ, आपल्या नेहमीच्या भाजी-बाजार अड्ड्यावर चांगले हिरवे टॉमॅटो मिळतात बरं का, तेव्हा ह्या रविवारी न विसरता घेणे :)

ऋषिकेश Thu, 16/04/2015 - 10:47

In reply to by घनु

आभार! हेच हवे होते :)

--
अवांतरः
फोडणीसाठी मोहरी की जीरं की दोन्ही, कडिपत्ता हवा की नको, उडदाची भिजवलेली डाळ, मेथीचे दाणे, आमचूर पावडर, धणे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद फोडणीत का नंतर, मसाला फोडणीत का नंतर वगैरे अनेक प्रश्न मला असतात.
शक्यतो कांदा परतायचा असेल तर हिंग, मिरची, कडीपत्ता वगैरे घातल्यावर तो लगेच परतावा (हिंग घातल्यावर मात्र हळद/आमसुल/कोथिंबीर इत्यादीच्या आधी) हिंग तेलाला हलके करतो (तेलाचे कायसेसे पृथक्करण करतो). शिवाय हिंगाविना कांदा भाजला तर तेलातील फॅट्स सॅच्युरेट होतात वगैरे वगैरे . हिंगावर लगेच कांदा परतला तर तो परतलाही छान व लवकर जातो. हळदी आधी घातल्याने कांद्याचा रंगबदलही लगेच कळतो.
आमटीला वगैरे हळद सर्वात शेवटी टाकावी - फोडणीत टाकायची गरज नाही.

असो शायनिंग संपवतो :P
----

तेव्हा ह्या रविवारी न विसरता घेणे

नक्कीच!

घनु Thu, 16/04/2015 - 11:16

In reply to by ऋषिकेश

वा हिंगाचं हे वैज्ञानिक महत्त्व सांगितल्या बद्दल विशेष आभार. मला हिंगाचा कच्चा वास जाम आवडतो त्यामुळे मी बर्‍याचदा भाजी शिजवण्याआधी थोडा हिंग वरून भुरभुरवतो, मस्त चव येते विशेषतः पातळ, रस्सा असलेल्या भाज्यांना नी आमट्यांना :)

हिंगावर लगेच कांदा परतला तर तो परतलाही छान व लवकर जातो.

ह्या टिपेसाठी विशेष धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 16/04/2015 - 22:30

In reply to by घनु

रुचीची पाककृती करायला सोपी आहे, (शिवाय त्यात कांदा नाही) त्यामुळे करण्याची शक्यता बरीच वाढली. पण घनुने आणखी पाकृ लिहायला पाहिजेत. वाचतानासुद्धा मज्जा आली पाहिजे. कढईत कंपूबाजी काय!

रोचना Mon, 13/04/2015 - 12:23

बापरे, भले मोठे ट्रेजर चेस्टच दिसतंय!! छान. पाणी जिरवणारं पण ऊब टिकवणारं लाइनिंग म्हणजे चांगली कल्पना आहे.
तुम्ही थंडीविरुद्ध उपाय शोधताय, इथे मी उन्हावर उपाय शोधतेय. बहुतेक गच्चीवर उन्हाचा ताप कमी करण्यासाठी ५०% सावलीचं जाळं लावावं लागणार आहे असं वाटतं. सध्या त्याची शोधाशोध आणि मापमोजणी चालू आहे.
माती तयार करण्यासारखी मजा नाही, खरोखर. कोकोपीट भिजवून, वाळवून खताबरोबर मिसळण्यात, कुंडीत भरण्यात तासंतास जातात आनंदात.
छोट्याशा टेरेसनेच मला वेड लावलंय, खरोखर जमीन असती तर काय केलं असतं कोणास ठाउक.

पिवळा डांबिस Tue, 14/04/2015 - 00:09

रेझ्ड बेड्स मस्त आहेत...
जमलं तर त्यांना बाहेरून पॉलीयुरेथेन स्टेनचे कोटींग द्या, पावसा-बर्फात जास्त वर्षे टिकतील...

माझ्या प्रगती-पुस्तकातील नोंदी खालीलप्रमाणे....
१. दोन बीफस्टेक आणि एक चेरी अशी टोमॅटोची तीन छोटुकली लावली होती महिन्याभरापूर्वी. त्यांनी आता चांगला जीव धरलाय...
२. यावेळेस एका चिनी मित्राकडून थाय मिरचीची छोटी रोपं मिळाली होती, तीसुद्धा जगली आहेत...
३. स्ट्रॉबेरीचा पॅच अपडेट केलाय...
४. जपानी वांग्याची दोन रोपं लावली आहेत, पण जेमतेम जगताहेत, अजून वाढीला जोर नाही...
५. मटारीचे दाणे पेरले होते, त्याला कोंब आलेत. पण अजून छोट्या कंटेनरमध्येच आहेत, वाफ्यात ट्रान्सफर नाही केले..
६. तीच गोष्ट कारले आणि स्क्वॉशची...
७. कलिंगड आणि कॅन्टेलूपच्या बिया पेरल्या होत्या छोट्या कंटेनरमध्ये. काहींना कोंब आलेत. पण त्यातले कुठले कलिंगड आणि कुठले कॅन्टलूप ते आता विसरलोय, लेबलिंग केलं नव्हतं! :( आता जगलेच आणि फळं आली की आपोआप कळेलच!!
८. मेथी आणि चवळी नुकतीच पेरली आहे डायरेक्ट जमिनीत, अजून काही उगवून आलेलं नाही....
९. मसाल्यांपैकी - रोझमेरी आणि लव्हेंडरची खुशामत केली (पेरेनियल); ओरॅगनो आणि मिंट उगवून आलं आहे.
(बेझिल लागेल तसं अदितीकडून आयतं मागवायचा विचार आहे! तिच्याकडे बेझिलचे मळे आहेत असं तिच्याकडूनच ऐकून आहे!!)
:)

रुची Tue, 14/04/2015 - 03:43

In reply to by पिवळा डांबिस

अजून थोडे फोटो टाका की तुमच्या बागेचे!

पॉलीयुरेथेन स्टेनचे कोटींग द्या

शक्यतो रासायनिक द्रव्यांचा उपयोग करायचा नाही असे ठरवले होते म्हणून कोट केले नव्हते पण जवसाचे तेल वापरूनही तोच परिणाम साधता येईल बहुतेक, पहाते. सुचवणीसाठी धन्यवाद.

मटारीचे दाणे पेरले होते, त्याला कोंब आलेत. पण अजून छोट्या कंटेनरमध्येच आहेत, वाफ्यात ट्रान्सफर नाही केले..

माझ्या मागल्या वर्षीच्या अनुभवाप्रमाणे मटार जमीनीत थेट पेरले तरी पटकन उगवून येतात (आठवडाभरात) आणि रात्रीचे तापमान शून्याच्या वर पण गार असले तरी त्याचा त्यांच्या वाढीवर परिणाम होत नाही. बरेच कोल्ड-हार्डी असतात बहुतेक मटार.

तीच गोष्ट कारले आणि स्क्वॉशची...

कारल्याच्या बिया उगवून यायला किती दिवस लागले? मी लावलेली एकही बी उगवली नाही. त्यावरून ते हादग्याचं 'कारल्याचं बी पेर गं... उगू दे गं... वाढू देगं ..सुनबाई..मग जा आपुल्या माहेरा...वगैरे' गाणं आठवलं आणि त्या कजाग सासवांचं हृदय कारल्याच्या बीयांसारखच निबर असावं आणि हे गाणं त्याबद्दलच असावं असं वाटायला लागलंय :-)

मेथी आणि चवळी नुकतीच पेरली आहे डायरेक्ट जमिनीत

मेथीला मोड आणून पेरली होती का? खूप वेळ वाचतो, दोन दिवसांत पाने येतात.

मसाल्यांपैकी - रोझमेरी आणि लव्हेंडरची खुशामत केली (पेरेनियल); ओरॅगनो आणि मिंट उगवून आलं आहे.

नशीबवान आहात, रोजमेरी आणि लव्हेंडर आमच्या हिवाळ्यात टिकत नाहीत त्यामुळे आमच्यासाठी ते अ‍ॅन्युअलच, टॅरगॉन मात्र उगवून आलंय. मागल्या वर्षी कम्युनिटी पॅचमधे लावलेलं सोरेल (आंबट चुका) एवढ्यातच उगवून आलाय आणि ऑक्टोबरमधे लावलेल्या लसणाचीही पाती आणि ह्रुबार्बही बाहेर डोकावायला लागले आहेत. यावर्षीचा हिवाळा बराच (इथल्या मानाने) सौम्य होता त्यामुळे वेळापत्रक नेहमीपेक्षा तीन-चार आठवडे अलिकडेच सरकलंय बहुदा. त्याबद्दल अर्थातच तक्रार नाही.

पिवळा डांबिस Tue, 14/04/2015 - 05:50

In reply to by रुची

शक्यतो रासायनिक द्रव्यांचा उपयोग करायचा नाही असे ठरवले होते म्हणून कोट केले नव्हते पण जवसाचे तेल वापरूनही तोच परिणाम साधता येईल बहुतेक, पहाते. सुचवणीसाठी धन्यवाद.

म्हणूनच बाहेरून कोटिंग द्या असं सुचवलं होतं. पण जवसाचं तेलही कदाचित चालू शकेल. किंवा मग लेमन ऑईल!

मटार जमीनीत थेट पेरले तरी पटकन उगवून येतात (आठवडाभरात)

मागे एकदा थेट जमिनीत पेरलेले एकूणएक मटारचे दाणे खारींनी उकरून खाल्ले (आठवड्याभरात!) :)
म्हणून या वेळेस रोपं तयार करून घेतोय आधी..

कारल्याच्या बिया उगवून यायला किती दिवस लागले?

जवळ-जवळ ३ आठवडे लागले. पण बी नर्सरीचं नव्हतं. वेळोवेळी इंडियन स्टोअरमधून कारली आणली जातात त्यातलीच एक्-दोन पिकवून त्यांच्या बिया साचवल्या होत्या, त्याच वापरल्या...

मेथी आणि चवळीला आधी मोड नव्हते आणले, तसेच पेरलेत....

रोजमेरी आणि लव्हेंडर

रोझमेरी ही रोझमेरी चिकन करायला लागते. लव्हेंडरचे तुरे आमच्या बाईसाहेब टब-बाथ घेतांना पाण्यात टाकायला वापरतात, नॅचरल इसेन्शियल ऑईल म्हणून! :)
आमच्या इथं दोन्ही पेरेनियल रहातात.

अजून थोडे फोटो टाका की तुमच्या बागेचे!

टाकायची इच्छा आहे पण मला ते तंत्र नीटसं जमलेलं नाही ऐसी अक्षरेवर.
आणि अदितीला फोनवर शिकव म्हंटलं तर ती शिकवत नाही!! :(

ऋषिकेश Tue, 14/04/2015 - 16:12

In reply to by पिवळा डांबिस

ए अदिती काय गं भाव खाते.. शिकव की पिडांकाकांना!
आम्हाला फटु बघायचेत

==

मला आल्बमची लिंक पाथवा हो नायतर व्यनीतून, मि त्यातले फटू वेळ मिळतील तसे डकवतो तुमच्या नावाने

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 14/04/2015 - 04:43

In reply to by पिवळा डांबिस

(बेझिल लागेल तसं अदितीकडून आयतं मागवायचा विचार आहे! तिच्याकडे बेझिलचे मळे आहेत असं तिच्याकडूनच ऐकून आहे!!)

जरूर. सध्या २५-३० छोटी रोपटी आहेत. उंदरा-खारींनी हल्ला केला नाही तर अजून महिन्याभरात पानं खुडता येतील अशी आशा आहे. दोनेक महिन्यांत सगळ्यांना वाटण्याइतपत मोप बेझिल यायला लागेल.

मी गेल्या वर्षी मटार आणि बीट लावायचा फार प्रयत्न केला. मटारवर डल्ला मारणारे फारच प्राणी होते. आता वैतागून सोडूनच दिलाय तो प्रकार. विकत आणलेला मटारचा पाला खायला बऱ्या अर्ध्याने नकार दिला; बीटाचा पाला खाण्यासाठी हातापाया पडावं लागतं. त्यामुळे असोच.

रुची Wed, 15/04/2015 - 20:04

In reply to by ऋता

सर्वात मोठा रेज्ड बेड ८ x ४ फूट आहे, दुसरा ८ x २ फूट आहे आणि वेगळ्या रंगातला छोटा ४ x २ फूट आहे.

रोचना Wed, 15/04/2015 - 22:45

आज घरच्या भेंडी-पडवळाची भाजी खाल्ली. बंगाल्यांमधे खसखस घालून 'पोस्तो' म्हणून प्रकार करतात, तशी केली. ढँड़ोश-चिचिंगे पोस्तो.

सगळीच रोपं उन्हाच्या तापामुळे त्रासलेली दिसतायत, येत्या वीकेंडला काही केल्या शेड नेट घालायलाच हवं.
पॉलिनेशन ला मदत होण्यासाठी तगर, शंख पुष्प आणि घाणेरी (लँटॅना) ची रोपं आणली आहेत. ती मधमाशांना आमच्या टेरेस कडे आकर्षित करतात का बघूया.
एका अननसाची शेंडी एका कुंडीत लावून पाहिली, तिला आता छान पानं येतायत. मोठ्या कुंडीत किंवा हंड्यात ते बदलून लावायला हवे कधीतरी.
सध्या अळूच्या कंदाच्या शोधात आहे. गेल्या सीझनने दमलेल्या मातीत थोडे बोनमील आणि शेणखत घालून थोडे बाजूला ठेवायचे आहे. त्यात पुन्हा थोडा जीव आल्यावर हळद, आलं, आंबेहळद आणि अळू लावायचा विचार आहे. टू मेनी टास्क्स, टू लिटल टाइम!

बॅटमॅन Wed, 15/04/2015 - 22:52

In reply to by रोचना

ओह आच्छा, ताहोले पोस्तो माने एटा! आमादेर होस्टेलेर कुकमोहाशोयरा जा बानातेन ओटा खेये तो खाओआरेर प्रोति आमरा निरिच्छो होये गियेछिलाम. जॅमोन पु लो देश्पांडेमॉहोदोय उनार 'बाँगोचित्रे' बोईते लिखेछेन तॅमोन इ मोने होलो अ‍ॅकदोम.

"बांग्ला रान्ना बानानोर रेशिपी: बाजारे गिये शॉबरॉकोमेर शोब्जिगुलो आनते हॉय. तारपोर कोन शोब्जिर कोन शोब्जिर साथे मेल थाके एशोब ना भाबेइ शॉबकिछू अ‍ॅकदोम कॉडाईते ढुकिये दिते हॉय. जॉखोन शॉब शोब्जिगुलोर मोटामोटि अ‍ॅकरॉकोम टाईपेर 'सेमी-ग्रेभी' (माराठीते लगदा) होई जाबे, तॉखोन कुकिंग दांडाते हॉय."

इत्तादि.

रोचना Wed, 15/04/2015 - 23:06

In reply to by बॅटमॅन

पू.लं. नी चॉच्चोरी कुठे खाल्ली माहित नाही, पण हॉस्टेलच्या स्वैपाकावरून कुठल्याही पाकसंस्कृतीचे चांगले वाईट ठरवू नये एवढे मात्र खरे! पोस्तो बर्‍याच भाज्यांचा होतो - बटाटा, दोडका, दोन्ही मिश्रित, पडवळ, भेंडी... बटाटा घालून केलेला बहुतेक सगळीकडे मिळतो.

बॅटमॅन Wed, 15/04/2015 - 23:27

In reply to by रोचना

हॉस्टेलच्या स्वैपाकावरून कुठल्याही पाकसंस्कृतीचे चांगले वाईट ठरवू नये एवढे मात्र खरे!

हे खरे, अन नंतर बंगाली घरातला स्वयंपाक भक्षिल्यानंतर मत जरा निवळले असले तरी पहिले इम्प्रेषण अजून तितकेसे पुसट झालेले नाही.

बाकी आलुपोस्तो सोडून अन्य पोस्तो खाल्लेले आठवत नाहीत. (होस्टेलच्या स्वयंपाकात तसाही वट्ट फरक नसे म्हणा)

पिवळा डांबिस Wed, 15/04/2015 - 23:22

In reply to by रोचना

पण पडवळं पावसाळ्यात येतात ना? मग एप्रिलमध्येच?
मी तरी पडवळ्याची भाजी फक्त पावसाळ्यातच खाल्लीये...

रोचना Fri, 17/04/2015 - 08:56

In reply to by पिवळा डांबिस

मी पहिल्यांदाच लावलीय - सगळ्या कुकुर्बिट बरोबर ही सुद्धा ˙लावली. इथे थंडीतले भोपळे, दुधी, कारली आणि उकाड्यातले असे वेगळे असतात - चुकून थंडीतली पडवळ लावली म्हणूनच आत्तापर्यंत आलीत की काय कोण जाणे.

रुची Wed, 15/04/2015 - 23:46

In reply to by रोचना

पडवळ मस्त दिसतंय. हा पोस्तो भेंडी-पडवळ एकत्र शिजवून करतात का? पाकृही सांग ना.

ढँड़ोश-चिचिंगे

हे आधी ढिंचँग-चिचँग असं वाचलं म्हटलं पडवळाची भाजी खाऊन खूपच आनंद झालेला दिसतोय :-)

ऋषिकेश Thu, 16/04/2015 - 10:24

In reply to by रुची

+१ भेंडी पडवळाची पाकृ हवी
पडवळ आम्ही भिजवलेली वाटली डाळ (त्यातच कोथिंबीर, मिरचीसह वाटणे) घालून किंवा घाई असेल तर पीठ पेरून (बेसन) करतो.

घनु Thu, 16/04/2015 - 10:54

In reply to by ऋषिकेश

भेंडी पडवळाची

भेंडी पडवळ ही त्या सापासारख्या पडवळा पेक्षा वेगळी असते का?

पडवळ आम्ही भिजवलेली वाटली डाळ (त्यातच कोथिंबीर, मिरचीसह वाटणे) घालून किंवा घाई असेल तर पीठ पेरून (बेसन) करतो.

मी पडवळ (ती लांब-लचक सापासारखी) ची भाजी दाक्षिणात्य पोरियल्/पोडियल सारखी करतो. पाककृती :
साहित्य :
पडवळ, उडीद डाळ पाव वाटी, पाऊण ते एक वाटी ओल्या नारळाचा खव, तेल-जिरं-मोहरी-हिंग-हिरव्या मिरच्या-कढीपत्ता, मीठ, गूळ- सुपारी एवढा, बारीक चिरलेली कोथींबीर
१. पडवळाच्या आतील बिया नी गर काढून त्याच्या गोल चकत्या एकसारख्या कापून घेणे.
२. कढईत तेल घेणे आणि मोहरी-जिरं-हिंगाची फोडणी करून घेणे आणि मग हिरव्या मिरच्या नी कढीपत्ता घालणे.
३. उडीद डाळ ह्या फोडणीत घालून खमंग वास येई पर्यंत परतणे - थोडी लालसर होईपर्यंत (उडीद डाळ परतताना विशेष लक्ष द्या,गरजेपेक्षा थोडा जास्त वेळ जरी परतली तरी लगेच जळते आणि भाजीला एक करपट वास येतो)
४. अता लगेच पडवळाच्या चकत्या कढईत टाका, चवी प्रमाणे मीठ टाका नी नीट परतून झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या.
५. पडवळ अर्धी-शिजलेली असताना त्यात अता नारळाचा खव घाला, नीट परतून घ्या आणि पुन्हा एकदा एक दणदणीत वाफ येऊ द्या.
६. वाफ आली की गॅस बंद करा, भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरा आणि झाकण ठेऊन २ मिनीट वाफेवर ठेवा.

ही भाजी गरम गरम पोळी आणि विशेषतः अमटी भाता बरोबर छान लागते. रंगालाही छान नी रीच दिसते - लाईट ग्रिन नी क्रिमीश :)

ऋषिकेश Thu, 16/04/2015 - 11:02

In reply to by घनु

वॉव!
लग्नानंतर काही नातेवाईकांकडे याची चव मिळाल्यापासून आम्हीसुद्धा हा प्रकार शिकून हल्लीच करू लागलो आहोत. पण नीटशी जमत नव्हती. बहुदा स्टेप क्रमांक ५ प्रमाणे नारळ नंतर घालत नव्हतो, तसेच कोथिंबीर आधीच घालत होतो, शिवाय भिजवलेली चणाडाळही घालत होतो म्हणून असेल.
आता तुझ्या पद्धतीने करून बघेन. आभार!
---

कढईत तेल घेणे आणि मोहरी-जिरं-हिंगाची फोडणी करून घेणे आणि मग हिरव्या मिरच्या नी कढीपत्ता घालणे.

अय्यो! दाक्षिणात्य भाजीच्या फोडणीमध्ये मोहरी! पापम् ;)
दाक्षिणात्य भाजीला हिंग पावडरचा पारू नये खडा वापरावा.
(रास्तापेठेत एक खास दाक्षिणात्य "एक्स्ट्रा स्ट्राँग" हिंग असतो तो या भाजीला नाही पण सांभार वगैरेला वापरावा. तुफान मजा येते)
--
उडिद डाळ आधी ५-१० मिनीटे किंचित मिठ असलेल्या पाण्यात भिजवून घ्यावी. लगेच जळत नाही.

घनु Thu, 16/04/2015 - 11:12

In reply to by ऋषिकेश

अय्यो! दाक्षिणात्य भाजीच्या फोडणीमध्ये मोहरी! पापम्

अगदी दाक्षिणात्य नाही रे, मग तर खोबरेल तेल वापरावं :). बादवे मी बर्‍याच दाक्षिणात्य पदार्थांमधे मोहरी पाहिली आहे, रादर अगदी मोठे दाणे असलेली टप्पोरी मोहरी ते वापरतात असं माझं निरीक्षण आहे.

उडिद डाळ आधी ५-१० मिनीटे किंचित मिठ असलेल्या पाण्यात भिजवून घ्यावी. लगेच जळत नाही.

पण मी असं पाहीलं आहे की डाळ जराही ओली असेल तर तो हवा असलेला खमंगपणा येत नाही म्हणून मी कोरडीच टाकतो.

रोचना Thu, 16/04/2015 - 12:05

In reply to by घनु

भेंडी आणि पडवळ या दोन वेगळ्या भाज्यांची मिश्रित भाजी - सॉरी! एरवी अशी मिश्रित करत नाहीत, पण स्वत:च्या बागेतली म्हणून एकत्र करून पाहिली.
पाकृ खूप सोप्पी आहे. आधी पोस्तो-बाटा (खसखस वाटण) करून घ्यायचे - दोन-तीन चमचे खसखस १०-१५ मिनिट कोमट पाण्यात भिजवून ठेवायचे. मग हिरव्या मिर्ची बरोबर वाटून घ्यायचे.
भेंडी आणि पडवळ बारीक चिरून घेतल्यावर मोहरीचं तेल, एक लाल मिर्ची आणि चिमूटभर कारळाच्या बिया घालून फोडणी करावी. भाज्या परतून घ्याव्या. एक वाफ आणून झाल्यावर हळद, मीठ, किंचित साखर, आणि खसखस घालावी. थोडे पाणी घालून, पूर्ण शिजू द्यावी.
हीच कृती दोडका-पडवळ, बटाटा-दोडका, वगैरेला सुद्धा वापरता येतो. या भाजीबरोबर आलं आणि बडिशेप ची फोडणी घालून केलेली "बिउली-र डाल" (उडदाची डाळ) करतात.

घनु Thu, 16/04/2015 - 16:52

In reply to by रोचना

वा मस्तय पाकृ, करून पहायला हवी.

मला एक सांगा, खसखस ने नेमका काय वेगळेपणा येत असावा पदार्थाला. नुसती खसखस खाल्ली की त्याला विशेष चव नसते आणि आपण नेहमी जे प्रमाण वापरतो खसखसीचं ते ही अगदी थोडं (नगण्यच) असतं भाजीत घातल्या जाणार्‍या इतर पदार्थांच्या मानाने. मग ह्या खसखसीने नेमका काय स्वाद येतो पदार्थाला, क्रिमीनेस, थिकनेस ह्यापैकी काही?
आमच्या घरात अनारस्यांमधेच ह्याचा जास्त वापर पाहिला आहे, आणि मग कधीतरी विशेष आमट्यांमधे (पाट-वड्या, मोदकाची आमटी), वांग्याच्या भाजी-मसाल्यातही आई वापरते हे, नी कधीतरी दोडक्याच्या सालाच्या कुरकुरीत चटणीत.

रोचना Sat, 18/04/2015 - 06:43

In reply to by घनु

तशी ठसठशीत चव वेगळी नाही. पण "थोडा क्रीमीनेस, थोडा नटीनेस" (जाने भी दो यारोंची आठवण झाली) येतो. खसखस हा उष्णतेवर उपाय म्हणतात, म्हणून उन्हाळ्यात खास अशी भाजी करतात.

रुची Sat, 18/04/2015 - 08:54

In reply to by घनु

खसखशीमुळे पदार्थांना एक खमंग नटी स्वाद येतो. मी मटण, चिकनचा मसाला वाटतानाही त्यात भाजलेली खसखस घालते. पांढर्या रश्श्यात तर खसखस हवीच.
मोदकाची आमटी काय प्रकार आहे? पहिल्यांदा ऐकला.

पिवळा डांबिस Thu, 16/04/2015 - 10:57

रुचीने विनंती केल्याप्रमाणे माझ्या बागेचे काही फोटो...
IMG_0113
पुढला दर्शनी भाग
IMG_0103
दसर्‍याचं सोनं! फुललेलं आपट्याचं झाड. याच्या फुलांना टाल्कम पावडरीसारखा मोहक सुगंध येतो. इथे याला हाँगकाँग ऑर्किड म्हणतात...
IMG_0093
ह्या अशाच काही पाईन वृक्षांच्या व्हरायटीज. पुढला आहे तो स्नो पाईन!
IMG_0092
हा निळसर पानांचा वृक्ष आहे. माझी मुंबईकर मेव्हणी याला भुताटकीचं झाड म्हणते. कारण चांदण्या रात्री हा विलक्षण चमकतो...
IMG_0105
हे मी पूर्वी म्हंटलेलं लव्हेंडरचं बुश...
IMG_0087
हे रोझमेरीचं बुश. थोडं आउट ऑफ फोकस झालंय, पुढल्या वेळी नीट फोटो काढीन...
IMG_0083
हा घायपात उर्फ आलोव्हेरा. काकूने याचा गर त्वचेवर लावायला उपयोगी असतो असं सांगितलं म्हणुन मी लावलेला. त्याची फुलं मात्र विलक्षण सुंदर असतात..
IMG_0072
हा गवती चहा. नुकतीच त्याची छाटणी केलीय. पण मयंकचा खास आवडीचा म्हणुन इथे टाकतोय...
IMG_0071
हे मोगर्‍याचं बेट. आमच्या हिला मोगरा खुप आवडतो. मुंबईत असतांना नेहमी मोगर्‍याचे गजरे घालायची. इथे ते मिळत नाहीत म्हणून तक्रार करायची. म्हणुन तिला एक मोगर्‍याचं बेट करून दिलंय. घाल किती गजरे करून घालायचे ते!!! :)
IMG_0080
हा माझ्या आवारातला झुळझुळता झरा....
IMG_0077
हे हवायन पेरूचं झाड. आत्ताशी फुलतंय. याची फळं तर मधुर असतातचं पण फुलांच्या पाकळ्याही चवदार असतात, इथे सॅलेडमध्ये घालतात...
IMG_0074
हा द्राक्षाचा वेल. सीडलेस ब्लॅक द्राक्षांची जात आहे. थोडे घड आले आहेत पण अजून फार लहान आहेत. ऑगस्ट्-सप्टेंबरापर्यंत मोठे होऊन पिकतील....
IMG_0078
हा स्ट्रॉबेरीचा पॅच...
IMG_0069
ही या सीझनमध्ये लावलेली टोमॅटोची रोपं....
...
...
दमलो!!!!
अजून फळ्झाडं आणि इतर भाज्या वगैरे आहेतच..
फळझाडांना आताशी पालवी येतेय..
मग यथावकाश त्यांचे फोटो टाकीन....
सध्या हेच फोटो गोड मानून घ्यावेत ही विनंती!
रुचिला पुन्हा एकदा धन्यवाद!!!

ऋषिकेश Thu, 16/04/2015 - 11:08

In reply to by पिवळा डांबिस

वाहव्व!! करावी तितकी कमीच.
काय तुफान बाग आहे. आम्ही गॅलरीपंथीय जळून खाक! ;) :P

--

फक्त तो आपटा नाही बहुदा कांचन आहे (आपट्याच्याच फ्यामिलीतला, पण वेगळे झाड आहे)

पिवळा डांबिस Thu, 16/04/2015 - 11:11

In reply to by ऋषिकेश

फक्त तो आपटा नाही बहुदा कांचन आहे (आपट्याच्याच फ्यामिलीतला, पण वेगळे झाड आहे)

असू शकेल. कांचन = सोनं ना?
मग हरकत नाही!!!
:)

ऋषिकेश Thu, 16/04/2015 - 11:24

In reply to by पिवळा डांबिस

होय होय सोनेच!
जरा कुतुहल वाटल्याने विश्वकोश बघितला. अधिक माहिती मिळालीये ती देतो, तुमच्याकडले झाड रक्तकांचन आहे का कोविदार कांचन हे तुम्हीच सांगू शकाल (स्॑ध्या फुललाय म्हणजे कदाचित कोविदार असण्याची शक्यता अधिक. मात्र फुले दोघांचीही गुलाबी/लाल/जांभळट लाल असतात)
अधिक उपयुक्त माहिती ठळक केली आहे ;)
-------
(१) रक्त कांचन : (देवकांचन; हिं. खैरवाल, सोना; क.सरुल, कांचिवला; सं. वनराज, रक्तपुष्प्, कोविदार; इं.पर्पल बौहीनिया, मौंटन एबनी; लॅ. बौहीनिया पुर्पुरिया; कुल-लेग्युमिनोजी; उपकुल सीसॅल्पिनिऑइडी). हा सु.६-९ मी. उंच, सरळ, ताठ, सदापर्णी व शिंबावंत (शेंगा येणारा) वृक्ष. याची साल राखी किंवा पिंगट असून फांद्या भरपूर असतात. पाने साधी, सोपपूर्ण (उपपर्णासह), आपटयाच्या पानाप्रमाणे अर्धवट विभागलेली [→ आपटा] , पण त्यापेक्षा मोठी (१०-१३ सेंमी. लांब व ह्यापेक्षा थेडी कमी रुंद); फुले सुवासिक, मोठी, गुलाबी जांभळी असून सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये फांद्यांच्या टोकास गुलुच्छासारख्या मंजरीत येतात. संवर्ताचे दोन मुख्य भाग असून पाकळया सुटया, पाच व तळाशी अरुंद असतात; जननक्षम केसरदले तीन किंवा चार व वंध्य एक किंवा दोन; किंजपुट लांब देठावर आणि किंजल्क छत्राकृती [→ फूल] . शिंबा सु.१५-३० ग २ सेंमी., सपाट, पिंगट, कठीण व एकदम तडकणारी; बिया पिंगट, लंबगोल, चपटया व १२-१६ असतात.

या वृक्षाचे लाकूड साधारण मजबूत व हलके असून साध्या घर बांधणीत व शेतीच्या अवजारांकरिता वापरतात. साल कातडी कमाविण्यास व रंगविण्यास आणि पाला गुरंना खाऊ घालण्यसा उपयुक्त. फुलांची भाजी किंवा लोणचे करतात. सालीपासून धागा व गोंद मिळतो. साल स्तंभक (आकुंचन करणारी); मूळ वायुनाशी व फुले सारक; बियांत १५ टक्के स्थिर तेल असते. मुळाची साल विषारी. बियांपासून नवीन लागवड होते. संस्कृत वाङ्मयात `कोविदार' या नावाने या वृक्षाचा उल्लेख आढळतो.
--------
(३) कोविदार : (सं.व.गु.कांचनार; हिं.कचनार; क.कांजिवला, उतिपे; सं. अशांतक; इं.व्हॅरिगेटेड बौहीनिया, कॅमल्स फूट; लॅ. बौहीनिया व्हॅरिगेटा). कांचनाच्या या जातीचे इतरांशी अनेक लक्षणांत साम्य असून काही फरकही आहेत. `कोविदारा' चा जुन्या संस्कृत ग्रंथांत उल्लेख आहे, हे मागे सांगितलेच आहे. सु.६ मी (क्वचित १० मी.) साल पिंगट व खरबरीत; पाने साधी व टोकास मध्यापेक्षा कमी विभागलेली; प्रत्येक भाग टोकास गोलसर; साधारणतः फेब्रुवारी ते मार्चअखेर ती गळून पडल्यावर फुले येतात. ती मोठी, १० सेंमी. व्यासाची, सुवासिक, गुलाबी व लाल रंगाच्या सुंदर मिश्रणाची असून मंजरीवर किंवा गुलुच्छावर येतात [पुष्पबंध]; यावेळी हा वृक्ष फार शोभिवंत दिसतो. संवर्त व पुष्पमुकुट रक्त कांचनाप्रमाणे; केसरदले पाच व लांब; शिंबा सु.३० सेंमी. (क्वचित अधिक) लांब व अरुंद असून तीवर पिंगट रेषा आणि आत १०-१५ बिया असतात. ह्या वृक्षाचा पांढऱ्या फुलाचा एक प्रकार (कॅंडिडा) आढळतो; तो सु.३ ते ४ मी. उंच असून इतर बाबतीत कोविदाराप्रमाणे असतो.

कोविदाराची साल पौष्टिक, स्तंभक व कृमिनाशक; तिचा काढा जखमा, उपदंश, कुष्ठ व चर्मरोग यांवर देतात. मुळांचा काढा अग्निमांद्य, उदरवायू, मेदवृध्दी इत्यादींवर गुणकारी; पाला सफेद कचनारप्रमाणे उपयुक्त. कळया, पाने व कोवळया शिंबा भजीकरिता वापरतात. फुले साखरेबरोबर सारक म्हणून घेतात; सुकलेल्या कळया अतिसार, आमांश, कृमी, मूळव्याध इत्यादींवर गुणकारी; सालीपासून गोंद व पिंगट रंग मिळतो. लाकूड कठीण, जड व लालसर पिंगट असून शेतीची अवजारे व जळण यांकरिता वापरतात. साल कातडी कमाविण्यास व रंगविण्यास आणि पाने बिडया बांधण्यास वापरतात. `मौंटन एबनी' हे इंग्रजी नाव या वृक्षालाही दिलेले आढळते.
----

घनु Thu, 16/04/2015 - 11:27

In reply to by पिवळा डांबिस

अहाहा.. स्वर्गच! हेवा वाटणे हा शब्दही फुटकळ वाटतोय.
हरकत नसेल तर एक वैयक्तिक प्रश्न, ही बाग/घर कोणत्या शहरात आहे?

रोचना Thu, 16/04/2015 - 11:51

In reply to by पिवळा डांबिस

भयानक जळजळ होतेय. एवढी जमीन असती तर मी वेडीच झाले असते, काय लावू नि काय नको असं झालं असत!! फारच सुरेख बाग आहे. कुठेही लॉन नाही हे पाहून फार आनंद झाला. लॉन या प्रकाराची खूप चिडचिड होते.
मला घरची (पाचगणीची) आठवण म्हणून इथे थोड्या महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेर्‍या लावायच्या होत्या पण इथल्या हवेत शक्यच नाही. लॅवेंडर सुंदर आहे.
मी मागच्या वेळेस विचारलं होतं ते पाढंरट हिरवं झाड सध्या द्राक्षाच्या वेलीमागे उजवीकडे दिसतंय - ते कोणतं आहे?

रुची Thu, 16/04/2015 - 23:06

In reply to by रोचना

अतिशय मस्त बाग आहे. आधीच राहता कॅलिफोर्नियात त्यात एवढी मोठी जागा! बागकामप्रेमींसाठी स्वर्गच आहे हे म्हणजे. टोमॅटोची झाडे एवढ्यातच किती मोठी झाली आहेत!कुठेही लॉन नाही म्हणून खरंच छान वाटलं आणि मोठी झाडे आवारात आहेत तेही छानच. इतकी मोठी झाडे असल्याने पक्षी वगैरे पण खूप येत असतील ना?
माझ्या घरामागे एक 'विपींग विलो' आणि एक स्प्रूस असे दोन मोठे वृक्ष आहेत त्यामुळे बरीच जागा जाते आणि बाकी बागकामाला फार रहात नाही अशी आधी माझी तक्रार होती पण त्यामुळे पक्षी येतात आणि त्यांना हिवाळ्यातही आसरा मिळतो हे बरे वाटते. शिवाय आठ महिने बर्फ असतानाही सूचीपर्णी हिरव्यागार रहातात त्यामुळे बाग मृतावस्थेत असल्यासारखी वाटत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 17/04/2015 - 01:11

In reply to by रुची

काकांची बाग बघून मलाही उत्साह आला होता. ते सुद्धा थंडीतली बाग बघून. या दिवसांमध्ये काकांची ऐषच असणार.

सानिया Fri, 17/04/2015 - 01:47

In reply to by पिवळा डांबिस

काय सुंदर बाग आहे! 'कॅलिफोर्नियात जावे आणि (नंदनच्या हातचे) डोसे खावेत' असे मनाशी घोकत असे, पण आता 'कॅलिफोर्नियात जावे आणि पिडाकाकांची बाग बघावी' असे घोकणार आहे.

ऋता Tue, 21/04/2015 - 10:06

In reply to by पिवळा डांबिस

वा ! सुंदर नीटनेटकी बाग आहे तुमची.

अलोवेरा (कोरफड) आणि घायपात वेगळ्या आहेत माझ्या माहिती प्रमाणे. घायपात बरीच मोठी पाने असलेली आणि पानांच्या आत गर नसून धागे असणारी असते...शेतांच्या बांधावर वगैरे दिसते. कुणाला अधिक माहित असल्यास सांगा.

पिवळा डांबिस Fri, 17/04/2015 - 02:08

ऐसीकरांनो, माझ्या बागेचे कौतुक केल्याबद्दल अनेक धन्यवाद.
प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल प्रतिसाद देऊन प्रतिसादांची संख्या उगाच वाढवण्यापेक्षा इथेच एकत्र प्रतिसाद देतोय.
घनु: ही बाग/घर दक्षिण कॅलिफोर्नियात थाऊजंड ओक्स या गावात आहे. लॉस एंजेलिस पासून उत्तरेला सुमारे ४५ मैलांवर ही जागा आहे.
रोचना: ही दाखवली ती फक्त १/३ जागा आहे. दुसर्‍या १/३ मध्ये वाफे आणि फळझाडं आहेत, ती नंतर टाकीन अजून जरा बहरली की. आमच्याकडे आत्ताशी वसंत ऋतू सुरु होतोय. तिसरा १/३ भाग (झर्‍याच्या आजूबाजूचा आणि पाठी मागे) पडीक आहे. तिथे लागवड करायची इच्छा तर खूप आहे पण जे आहे तेच नोकर्‍या सांभाळून मेंटेन करतांना आम्हा दोघांची खूप दमछाक होते. आता रिटायर झालो की मग वेळच वेळ, मग तो भाग लागवडीखाली आणायचा विचार आहे...
ते द्राक्षांच्या वेलीमागचं झाड हे फोटोत जरी पांढरट हिरवं दिसत असलं तरी प्रत्यक्षात निळसर आहे (चित्र #४). त्याला इथे स्नो पाईन म्हणतात.
रुची: हो पक्षी खूप येतात. काहीनी झाडांवरच कायमची घरटी केलेली आहेत.
पुढे आणि पाठी थोडंफार लॉनही आहे पण त्याचे फोटो दिले नाहीत. आमच्याकडे गेले चार वर्षे दुष्काळ चालू आहे, यावर्षी पाण्याचं शॉर्टेज डिक्लेअर केलेलं आहे. म्हणून लॉनचा पाणीपुरवठा मी कट ऑफ केलेला आहे. फक्त पेरेनियल्सचं पाणी चालू ठेवणार. या उन्हाळ्यात लॉन, ग्राऊंड कव्हर आणि अ‍ॅन्युअल्सचं पाणी तोडणार. वाळले तरी मग पुढल्या वर्षी बघू.
भटोबा: नियमित पाणी घाल आणि पेशन्स ठेव. काकांचा ग्.च. काही आकाशातून पडला नाही! लावला तेंव्हा पेन्सिलीच्या आकाराची एक काडी होती. गवती चहा भसाभस वाढतो, एकदा वाढायला लागला की सारखा कापत बसावा लागेल तुला!!
अदिती: ऐष कसली, खूप कामं पडली आहेत! जरा महिनाभर इथे येऊन काकांना मदत करायची ते नाही, म्हणे ऐष आहे!!! :)

आता फळझाडं बहरायला लागली आणि इतर भाजीपाला वाफ्यात ट्रान्सफर केला की अजून फोटो टाकीन...
तोपर्यंत तुमच्या बागांचे, झाडांचे, भाज्यांचे फोटो मला बघायला आवडतील.

रोचना Sat, 18/04/2015 - 08:38

In reply to by पिवळा डांबिस

कालच शेड नेट लावलेली आमची छोटी टेरेस बाग - या वर्षी पहिल्यांदाच जवळच्या एका बंगल्याच्या गच्चीवर आम्ही काही कुंड्यांमधे भाज्यांची लागवड करयोय. ऊन-पाण्याच्या प्रमाणाची त्यामुळे थोडी गफलत होतेय. मागे हिरव्या पिशव्यांमधे भेंडी आणि मिर्ची आहे, समोर मातीच्या कुंड्यांमधे मोगरा, जुई, तगर. वेली भोपळा, कारले, दुधीच्या आहेत. नेट लावल्याने परिस्थिती सुधारते का पहायचे आहे.

पिवळा डांबिस Sat, 18/04/2015 - 11:14

In reply to by रोचना

टेरेस गार्डन मस्त आहे, विशेषतः ते कुंडीतले खांबांवरून वर चढवलेले वेल!
तुम्हांला मांडव कसा घालायचा ते माहिती आहे का हो? असेल तर त्याची कृती प्लीज इथे द्याल का?

माझे कोकणातले काका उत्तम मांडव घालायचे आणि मग पावसाळ्यात त्यावर काकड्या आणि पडवळांचे वेल चढवायचे...
पण लहानपणी ते कोकणात आणि आम्ही मुंबईत. मला मुंबईत कधी मांडव घालायला लागेल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे त्यावेळेस त्यांच्याकडून शिकलो नाही.
आता ते गेले आणि एक हळहळ मात्र मनात मागे राहिली....
तुम्हाला जर माहिती असेल तर त्याची कृती इथे जरूर द्यावी...

रोचना Sat, 18/04/2015 - 20:37

In reply to by पिवळा डांबिस

मांडव घालण्याची काही ठराविक पद्धत आहे की नाही माहित नाही. वेली वाढल्य तशा मी नारळाच्या जाड दोर्‍या आडव्या बांधून वेलींना वाट देत गेले. हीच जागा पुढे वापरली तर उभ्या नळ्यांना बेताच्या बारीक काठ्या आडव्या बांधून मांडव करायचा विचार आहे. इथे बेताचे खांब सहज मिळतात, त्यांना फोडून बारीक काठ्या करून घेता येतं.
भोपळ्याची आणि पडवळची अवस्था फारच नाजूक आहे :-( एक आठवडा भरात नेट खाली प्रकृती सुधारली तर फळाची आशा आहे.
मी कॅलिफोर्नियात किती वर्षं राहिले, तेव्हा बाग करायला थोडी जागा होती, पण एक कढीपत्ता देखील लावला नाही :-( माझ्या समोरच्या फ्लॅटमधे राहणारा शेजारी अनेक प्रकारांचे लेटस उगवायचा, आणि मला ही पुरवायचा. पण घरामागे मायर लेमन चं झाड होतं, ते अजूनही आठवतं. इथे बाल्कनीतच एक लिंबाचं झाड आहे, पण बियांपासून वाढवलेलं. फळं यायला चिक्कार वेळ आहे अजून त्याला.

पिवळा डांबिस Sun, 19/04/2015 - 10:52

In reply to by रोचना

माझ्याकडे मायर लेमन आहे पण अजून जरा लहान आहे. १०-१२ लिंबं देतं दर वर्षी.
माझ्या जुन्या घरी एक मॅच्युअर मायर लेमनचं झाड होतं. ते २००-२५० लिंबं द्यायचं. मी मिसळपाववर त्यावर एक लेखही टाकला होता (त्यावेळेस ऐसी अक्षरे जन्माला आलं नव्हतं).
त्या जुन्या झाडाची लिंबं अक्षरशः भेगाळून जमिनीवर पडायची आणि नंतर टृअ‍ॅशमध्ये जायची. वापरून वापरणार तरी किती? माझी मुंबईकर मेहुणी आली की ते पाहून हळहळायची.
"अरे तुम्हाला नको असली तर दुसर्‍या कुणालातरी द्या, कचर्‍यात काय टाकताय?"
पण देणार तरी कुणाला? इथे प्रत्येकाच्याच परसात लिंबाचं झाड!!!!

बाकी मायरला कलम करावं लागतं म्हणे. मायरच्या बिया पेरून मायर लेमन येत नाही. तें थोडंसं हापुस आंब्यासारखं आहे. असं ऐकलंय, खरं खोटं देव जाणे....

रोचना Sun, 19/04/2015 - 11:05

In reply to by पिवळा डांबिस

कोणाच्या घरी जेवायला बोलावलं तर मी वाइनच्या बाटली ऐवजी लिंबांची एक पिशवी घेऊन जायचे. पण आमची सामुहिक बाग होती, सात-आठ फ्लॅटची मंडळी वापरायची त्यामुळे वाया खूपच कमी जायची. मी त्याचे मार्मलेड वगैरे खूप प्रयोग करून पाहिले होते. त्या फुलांचा सुगंध काही औरच होता - आणि हमिंगबर्ड्स त्यामुळे बागेत खूप दिसयची.
असो. बर्कलीची एक चांगली आठवण! :-)
कलम करावं लागतं असं मी ही ऐकलं होतं, कारण तो एक हाय्ब्रिड प्रकार आहे वाटतं - लिंबू आणि संत्राचा. बिया पेरल्या तर फळं देऊ शकेल ही कदाचित, पण काही गॅरंटी नाही.

पिवळा डांबिस Sun, 19/04/2015 - 11:20

In reply to by रोचना

आमच्या हिने पण पहिल्या वर्षी फुकट जायला नकोत म्हणून लिंबाचं तिखट लोणचं, गोड लोणचं, जॅम, सरबत असे सगळे प्रकार करून बरण्या भरून ठेवल्या होत्या. पण ते वर्षभरात संपता संपत नाहीत...
आणि दुसर्‍या वर्षी परत अडीचशे लिंबं हजर! आता त्यांचं काय करायचं? मग बोंबला!!!!! :)

शुचि. Mon, 20/04/2015 - 23:15

In reply to by पिवळा डांबिस

लोणची कशी काय संपत नाहीत तुमच्याकडे पिडा? कमाल आहे. लिंबाचं लोणचं किती मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त लागतं.

पिवळा डांबिस Tue, 28/04/2015 - 21:52

In reply to by शुचि.

आम्ही इन मिन साडेतीन माणसं! खाऊन खाऊन किती खाणार?
आणि पुन्हा आमच्या कडे 'सिकेपीणीने केला सारस्वत भ्रतार' हा प्रकार! :)
आमची ८०% जेवणं नॉनव्हेज!
लिंबाचं लोणचं खास जात नाही नॉनव्हेज जेवणाबरोबर...

पिवळा डांबिस Sun, 19/04/2015 - 10:59

In reply to by मराठे

असं चेष्टेतदेखील म्हणू नका. फार शारिरीक कष्टाचा व्यवसाय आहे तो!
कॉम्प्युटर वापरताय म्हणजे तुम्ही निश्चित एखाद्या चांगल्या व्यवसायात आहांत.
त्यात तुमची खूप भरभराट होवो ही सदिच्छा!!!

पिवळा डांबिस Mon, 20/04/2015 - 22:59

काल बागेतला स्प्रिंकलर सिस्टीमचा पाईप फुटला!
(नजर लागली मेल्या ऐसीकरांची!!) :)
नाही नाही, तसं काही मानत नाही मी! कृपया ह. घ्या...

असं होतं कधी कधी. विशेषतः हिवाळ्यातून उन्हाळ्यात जातांना तपमानातल्या बदलामुळे!
पण काल ते सगळं निस्तरण्यात अख्खा दिवस गेला.
आणि आज अंग जाम ठणकतंय!!!
:(

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 20/04/2015 - 23:27

In reply to by पिवळा डांबिस

आमच्याकडे शनिवारी रात्री गारा पडल्या, बराच पाऊसही झाला. (प्रगत देशात दोन मिनीटं लाईट गेले होते.) नशीब, बाल्कनीत, कुंड्यांमध्ये झाडं आहेत त्यामुळे फार नुकसान झालेलं नाही. (ब्लॅक नाईट) वांग्याची दोन, पोटं फुगलेली फुलं गायब झालेली दिसत आहेत. १२ टोमॅटो लगडलेल्या झाडाच्या पानांनी मान टाकलेली आहे. चार बाझिलची रोपं बहुदा जातील. चूक माझीच, पावसाचा अंदाज असूनही हवा कशी असेल हे दिवसभर बघितलं नाही.

पण अळूला आणखी नवीन पानं फुटत आहेत. अगदी काही नाही तरी अळूची भाजी निश्चित खाता येईल. वांग्याच्या कळ्या टिकून आहेत आणि त्यातली एक आज फुललेली आहे. शिवाय ते फूल आधीच्या फुलांपेक्षा जास्त बैंगणी रंगाचं दिसतंय.

रुची Mon, 20/04/2015 - 23:26

आता हवा गरम झाली असली तरी बहुतेक भाज्या वगैरे अजूनही बाहेर लावता येत नाहीत म्हणून या विकान्ताला बागेतले वाफे ठीक करणे, माती बदलणे/फिरवणे, ट्यूलिप-डॅफोडिल्सचे कांदे लावणे अशी कामे केली. शिवाय सास्काटून आणि हनीबेरी अशा दोन मोठ्याश्या झाडांचे (झुडपांचे) वृक्षारोपण झाले. घरात अजून काही (झुकीनी, काकडी वगैरे) भाज्यांच्या बिया पेरल्या. घरात लावलेल्या रनर बीन्सना घरातच फुले आली आहेत आता त्यांना बाहेर कसं न्यायचं असा प्रश्न आहे.
एकूण बागेत बरंच अंगमेहनतीचं काम झाल्यानं अंग आमचंही ठणकतंय!

पिवळा डांबिस Tue, 21/04/2015 - 10:24

In reply to by रुची

एकूण बागेत बरंच अंगमेहनतीचं काम झाल्यानं अंग आमचंही ठणकतंय!

"बाम या बेनगे लगाते चलो,
अपनी-अपनी हड्डियां दबाते चलो!!"
-डांबिस बागेश्वर
:)

ऋषिकेश Tue, 21/04/2015 - 09:01

मोठ्या आशेने एम्प्रेस गार्डनला गेलो होतो ऑर्गॅनिक बियाणं मिळवायला.
खरंतर ऐसी सदस्य 'मी' यांनी नाईक सीड्सवाल्यांचा नंबर दिलावता. तरी सगळे म्हणताहेत ना एम्प्रेस गार्डन एम्प्रेस गार्डन एकदा बघुचयात म्हणून गेलो.

तर काय फक्त शोभेची नी फुलांची झाडं. बियाणं कसलंच नाही. भाज्यांची रोपंही नाहीत. कंपोस्टच व्हर्मिसेलही नाही :(

पुण्यातल्या चांदण्या दुपारी फेरफटका मारून डोकं दुखू लागलं ते वेगळंच :(

ऋता Tue, 21/04/2015 - 09:59

In reply to by ऋषिकेश

एम्प्रेस गार्डन्चे सध्या अम्युझमेंट पार्क झालेलं आहे. टॉय ट्रेन्स, जायंट व्हील, इतर पाळणे वगैरे लावून खूप धुमाकूळ चालू आहे तिथे सध्या...गर्दी तर आहेच पण त्यासोबत चिकार कचरा वगैरे. तिथे फिरताना फुट्बॉल, चेंडू...नाहितर दगड लागण्याची शक्यता आहे. जरा शांत भागात गेलात तर एखादा रखवालदार नक्कीच येऊन हटकेल. त्याच्याशी सौजन्याने वागलात तर उद्धट वागणूक मिळेल.
झाडे मात्र अनेक प्रकारची आहेत तिथे. सहनशक्ति वाढवली आणि मनाच्या तयारीने गेलं तर त्यांचा आनंद घेता येऊ शकतो. नर्सरीत अजून गेले नव्हते तिथल्या...आतातर जाण्यात काहीच अर्थ नाही हे कळलं.

रोचना Tue, 21/04/2015 - 10:58

इतक्या नवीव पोस्ट बघितल्या, वाटलं छान फोटो असतील, तर कोणाचं अंग ठणकतंय तर कोणाचं डोकं! काय चाल्लंय काय!!

पण चला, तक्रारीचा सूर आम्ही ही लावतोच - आमचा शेड नेटचा काही उपयोग पडेल असं दिसत नाहीये. वार्‍याने हिरॉइनच्या दुपट्ट्यासारखं नुस्तं नाचतं मेलं, आणि खाली उमललेल्या दुधीच्या फुलांना बडवून बडवून पाडतं. व्यवस्थित खांब लावून त्याला स्थिर करायला पाहिजे, पण कॉलेजची गडबड, प्रवास इत्यादीमुळे त्यासाठी सध्या वेळही खूप कमी आहे. तूर्त जसे चाललंय तसंच ठेवून पावसाळा लागायच्या आधी त्याची डागडुजी करीन म्हणते. पण इतकी मेहनत घेऊन एकही काकडी किंवा भोपळा नाही आला म्हणून थोडं हताश व्हायला झालंय. (भेंडी मात्र चिक्कार खायला मिळतायत, त्यात आनंद आहेच!)

ऋता Fri, 24/04/2015 - 10:12

वसुंधरा दिना निमित्त पुण्यात (औंध रोडवर) कचरा हस्तांतरण केंद्रा जवळ त्यांनी बनवलेल्या कंपोस्ट खताचं वाटप करत होते. मी ही एक पिशवी आणली आणि सगळ्या झाडांना थोडे थोडे घातले.
घोसाळ्याच्या वेलाला एक घोसाळं वाढतय आणि मस्क मेलनचा वेल जोमाने वाढतोय (अजूनतरी).

गेल्या वीकएन्डला पुण्यातल्या वेताळ टेकडीवरची झाडे पाहिली. मोई, सालई, मेडशिंगी, सोनसावर, पाचुंदा, बारतोंडी (आणि नेहमी प्रमाणे बरेच न ओळखता येणारे वृक्षही) वगैरे पहायला मिळाले.

परी Sat, 25/04/2015 - 17:53

In reply to by ऋता

मी मेथी लावली आहे बरेच दिवस झाले परंतु त्याची वाढ फक्त हाताच्या बोटाएवढी झालीये त्यापेक्षा जास्त वाढ होत नाहीये
काकडी आणि दोडका वेल पण उगवला आहे पण त्याचीही वाढ नीट होईना असच दिसतंय.
मागच्या वेळी ६ व्या मजल्यावर ग्यालरी मध्ये विटांचा छोटा वाफा तयार करून त्यामध्ये माती टाकून लागवड केली होती तो वेळ खूप छान हि आला होता पण यावेळी त्याच्यापेक्षा मोठी मातीची कुंडी मध्ये लागवड करूनही भाजी आणि वेल नित उगवून आले नाहीत.

ऋता Mon, 27/04/2015 - 08:32

In reply to by परी

मी कढीपत्त्याच्या कुंडीतच बाजूने मेथी पेरली. ती आता १ आठवड्यानंतर फक्त उगवून आली आहे. अजून खरी पानं तर नाहीच पण पहिली दोन पानंही अजून नीट सुटी झाली नाहियेत. हे ही मला हळू वाटतय पण लागतोच बहुतेक इतपत वेळ.
वेलांची वाढ नीट नसेल तर शेण खत घालून पाहू शकता. नेमका दोष काय आहे हे पाहून उपाय शोधला तर आणखीन उत्तम. यावेळी कुंडीतली माती तेवढी सकस नसेल कदाचित. इथले बाग एक्सपर्ट्स काही टिप्स देऊ शकतील.

ऋषिकेश Mon, 27/04/2015 - 09:16

In reply to by परी

माझ्याकडील मेथी सुरवातीच्या आठवड्यात हळूच वाढली होती. काढली त्या आठवड्यात मात्र जोमाने वाढ होती. काही रोपांना फुले येईपर्यंत थांबलो होतो.

रोचना Mon, 27/04/2015 - 10:41

In reply to by परी

इथल्या हवेत (पूर्व भारतात) मेथी उकाड्यात चांगली उगवत नाही, थंडीतच जास्त लावतात. पुण्यातही उकाडा भरपूर असेल सध्या, कदाचित त्यामुळे असेल? थोडी सावलीत (२-३च तास ऊन मिळेल अशा जागेत) ठेवून पाहता येईल.
दोडका आणि काकडीला किती तास ऊन मिळतं? अशा फळभाज्यांना किमान ६ तास तरी ऊन हवे. ऊन व्यवस्थित मिळत असले तर शेणखत घालून पाहा.

किंचित वाळलेलं शेण कुठे मिळत असलं तर: श्रीखंड्याच्या चक्क्यासारखं एका कापडात दोन मूठ शेण बांधायचं. अर्धंच बुडेल असं दोन-तीन मगभर पाण्यात बुडवून ठेवायचं. छोटासा गुळाचा खडा पाण्यात विरघळू द्यायचा. दिवसातनं दोन-तीनदा पिशवी पाण्यात फिरवायची. दोन दिवसांनी त्याला किंचित फेस येतो. मग अजून ४-५ मग पाण्यात हे मिश्रण घालून झाडांना घालायचं.
शेण मिळत नसलं तर चांगल्या गांडूळखताने सुद्धा हा प्रयोग करता येतो. महिन्यातनं एकदा हा "चहा" झाडांना घातला की मातीत उपयोगी जंतू-जीवाणूंची भर पडते.

रुची Tue, 28/04/2015 - 21:57

In reply to by रोचना

'कॉम्पोस्ट टी'ची देशी चक्का कृती आवडली :-).
त्याचीच विदेशी पद्धत इथे आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, हा 'चहा' पानांवर मारणेही झाडांसाठी उपयुक्त असते.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 29/04/2015 - 01:50

घरचे दोन टोमॅटो खाल्ले. पण झाडाच्या कुंडीत या वर्षीसुद्धा पूर येऊन गेला. झाडाचं कितपत खरं आहे कोण जाणे.

वांग्याची मात्र फुलं झडून जात आहेत. तीन फुलं गळली. तापमानही फार विचित्र नाही, २०-३० अंश सेल्सियसमध्ये दिवसभर असतं. गेला आठवडाभर अधूनमधून होणाऱ्या पावसापाण्याचा झाडावर विपरीत परिणाम झालेला दिसत नाहीये. कळ्या चिक्कार दिसत आहेत. पण तीन फुलं मोठी होऊन गळली. काय करावं? वांग्यावर हे किडेही दिसत आहेत, यांचा बंदोबस्त करावा का यांच्याशी मयतरी करावी?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 29/04/2015 - 08:02

In reply to by अमुक

तो टोमॅटो पोटात गेला तेव्हा पिकून लाल झाला होता. लेडीबग्ज (खाण्याआधी) पिकून लाल होतील का?

असो. विकीपिडीया म्हणतंय की लेडीबग्ज अशा रंगाचेही असतात. मी त्यांना काही केलं नाहीये, पण कुंड्यांमध्ये अन्य कीड दिसत नाहीये. हे जगतायत आणि वाढतायत ते कोणाच्या जीवावर?

उदय. Wed, 29/04/2015 - 03:09

नवीन घरात गेल्यामुळे यंदा सगळी सुरुवात पहिल्यापासून करावी लागली. सर्वप्रथम रेज्ड बेड बनवला आहे.
सध्या काकडी, मिरच्या, वांगी (भरताची), टोमॅटो, बीन्स आणि भेंडी लावली आहे.
पुढील आठवड्यात गवार, घोसाळी, छोटी वांगी, पुणेरी काकडी लावणार आहे.
गेल्या आठवड्यातले फोटो.

उदय. Fri, 01/05/2015 - 19:37

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

खारी आणि ससे येऊन नासाडी करू नये म्हणून ती जाळी लावली आहे.
अजून टिप्सः पक्षी येऊन टोमॅटो खात असतील तर एक घुबडाचा पुतळा जवळच लावायचा, म्ह्णजे पक्षी येत नाहीत. ससे येत असतील, तर भाज्यांच्याजवळ प्लॅस्टिकचा साप ठेवावा, म्हणजे ते घाबरून येत नाहीत. खारी मात्र कशालाच दाद देत नाहीत, असा अनुभव आहे. म्हणून मी लांबलचक स्टील जाळी आणली. सुरुवातीला रेज्ड बेडच्या चारी बाजूनी लावली होती. पण खारी उड्या मारून आत जातात. म्हणून ती जाळी कापून प्रत्येक रोपट्याला एक असा गोलाकार पिंजरा बसवला. त्यामुळे खारींचा त्रास जवळजवळ बंद झाला आहे.
काल-परवा घराजवळ आलेले ससे:

पिवळा डांबिस Fri, 01/05/2015 - 20:41

In reply to by उदय.

खारी अगदी उच्छाद मांडतात.
खारींशी गेली काही वर्षे झगडून शेवटी या वर्षी मी माझ्याच डोक्याने एक अहिंसक उपाय शोधून काढला आहे.
इफेक्टिव्ह आहे असं दिसतंय.
उद्या फोटो टाकतो...

उदय. Fri, 01/05/2015 - 19:40

In reply to by ऋता

बॅकयार्डमध्ये भाजीपाला लावलाय त्याला बाग म्हणावं की शेत, ते समजत न्हवतं. पण बाग ही फुलांची असते, म्हणून शेत म्हटलं. :) काय ते समजून घ्या.

रोचना Fri, 01/05/2015 - 23:55

In reply to by उदय.

सुंदर! पुणेरी काकडीच्या बिया इथूनच घेऊन गेला होता का?
हे रेज्ड बेड प्रकरण चांगलं आहे. मी येत्या हिवाळ्यात सिंटेक्स ची बसकी ५ बाय ८, १ फुट उंच पाण्याची टाकी मिळते, त्यात असा वाफा गच्चीवर करून पाहणार आहे.

उदय. Sat, 02/05/2015 - 00:20

In reply to by रोचना

नाही, मी seedsofindia.com वरून मागवल्या. इथे येताना बिया, फुलं, झाडं वगैरे काही आणता येत नाही, त्यामुळे त्या फंदात पडत नाही. व्हिक्टोरिआ, कॅनडातून येतानासुद्धा फुलांच्या बिया डिक्लेर करून आणल्या होत्या.

टाकीला भोकं पाडावी लागतील, नाहीतर पाणी वाहून जाऊ शकणार नाही.

पिवळा डांबिस Wed, 29/04/2015 - 09:23

आणि हा शंभरावा प्रतिसाद!!!
हुश्श्य!!!
:)

ऋता Thu, 30/04/2015 - 14:55

४ महिन्यांपूर्वी प्लास्टिक्च्या बाटलीत कर्दळीच्या बीया पेरल्या होत्या. तीन रोपे दाटीवाटीने त्यात वाढली. आता दोन रोपांना कळ्या आल्या आहेत. उद्या परवात फुलतील तेव्हा नेमके बाहेरगावी असणार आहोत...परत येऊ तोपर्यंत टिकून असतील तर फोटो काढून इथे डकवीन.

कुणाला वृक्षांची रोपे करण्याचा अनुभव असल्यास त्याबद्दल वाचायला आवडेल. मी अनेक प्रकारच्या बीया जमवल्या आहेत; त्या पेरत असते पण काहीच उगवत नाही.